संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

Submitted by ऋन्मेऽऽष on 19 March, 2020 - 15:52

Latest update
२५ मार्चपासून,
संपुर्ण भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन - श्री. नरेंद्र मोदींची घोषणा

.________

२२ मार्चला पंतप्रधनांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. आधी जेव्हा माझ्या कानावर ही बातमी आली तेव्हा वाटले सरकार काही औषधांची फवारणी करणार असेल. नंतर बायकोने एक व्हॉट्सप न्यूज आणली त्यानुसार त्या दिवशी देशभर ओम नामाचा जप केला जाणार आहे. मला हसायला आले. मग मी स्वत:च थोडी शोधाशोध केली आणि खालील माहिती हाती लागली.

जर यातून कोरोनाबद्दल जनजागृतीचा उद्देश असेल तर मला ही आयडीया चांगली वाटतेय. कारण आज आपला देश दोन गटात विभागला आहे. एक मास्क आणि सॅनिटायझर वापरणारे. दुसरे हे न वापरणारे. आणि दोन्हीकडचे लोक एकमेकांना मुर्ख समजत आहेत. काही लोकं खूप पॅनिक होत आहेत तर काही लोक जराही सिरीअस नाहीयेत. कुठेतरी सारा देश एक विचारांचा होणे गरजेचे आहे.

तर काय आहे श्री. नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेला जनता कर्फ्यू याची गूगाळलेली माहिती थोडक्यत

मैं आज से जनता कर्फ्यू की मांग करता हूं। यानि जनता के लिए, जनता द्वारा लगाया गया कर्फ्यू। 22 मार्च रविवार को सुबह 7 से रात 9 बजे तक सभी देशवासियों को जनता कर्फ्यू का पालन करना है। जनता कर्फ्यू हमें आने वाली चुनौती से भी तैयार करेगी।
हमें 22 मार्च को शाम 5 बजे ताली या थाली बजाकर, सायरन बजाकर सेवाभावियों का धन्यवाद करना चाहिए।

इस दिन कोई भी नागरिक घर से बाहर न निकले, न सड़क पर जाए, न मोहल्ले में जाए। लेकिन जो जरूरी काम में लगे हैं वो अपना कर्तव्य निभाएं। जनता कर्फ्यू आने वाली चुनौती से भी हमें तैयार करेगा। राज्य सरकारों से आग्रह करूंगा कि वो जनता कर्फ्यू पालन कराएं।

22 मार्च को शाम पांच बजे हम दरवाजे, बालकनी से हम काम करने वालों के लिए आभार प्रदर्शित करें। कैसे? ताली बजाकर, घंटी बजाकर। मैं स्थानीय प्रशासन से आग्रह करता हूं कि वे सायरन बजाकर सभी को इसके बारे में बताएं।

मैं एक और गुजारिश करना चाहता हूं। लाखों लोग अस्पताल, एयरपोर्ट, दफ्तरों में व्यस्त हैं। लोगों ने दूसरों की खातिर काम किया है। उन्होंने खतरे के बावजूद लगातार काम किया है। ये लोग वायरस और देश के बीच एक सुरक्षा की तरह हैं। पूरा देश इन्हें सैल्यूट करता है।

ये जनता कर्फ्यू दुनिया को दिखाएगा कि हम इस वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

पीएम मोदी ने कहा कि एक व्यक्ति अन्य दस लोगों को जनता कर्फ्यू की जरूरत के बारे में बताए।

एनसीसी, एनएसएस व धार्मिक संस्थाएं से निवेदन करता हूं कि वो जनता कर्फ्यू के बारे में ज्यादा से ज्यादा लोगों को बताएं।

22 मार्च का दिन हमारे लिए टेस्ट का दिन होगा कि हम वायरस से लड़ने के लिए कितने तैयार हैं।

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

काही देशाच्या प्रमुखांनी पॅनिक न पसरवता, लोकांना पुरेसा वेळ देऊन अगदी स्पष्ट आणि मोजक्या शब्दांत लॉकडाउनची घो षणा केल्याची उदाहरणं आहेत.
न्युझीलंडच्या पंतप्रधानांचं भाषण पहा. https://www.newsroom.co.nz/2020/03/23/1096999/pm-jacinda-arderns-full-lo...

त्यांनी इमर्जन्सीची लेव्हल वाढवत नेली आणि पुढली लेव्हल कधी लागू होईल ते आधी सांगितलं. कंप्लीट लॉकडाउनला ४८ तासां चा वेळ दिला.
After 48 hours, the time required to ensure essential services are in place, we will move to Level 4.

काय बंद होईल हे सांगायच्या आधी काय सुरू राहील ते सांगितलं
Let me set out what these changes will mean for everyone.

Supermarkets, doctors, pharmacies, service stations, access to essential banking services will all be available throughout New Zealand at every alert level. If you do not have immediate needs, do not go to the supermarket. It will be there for you today, tomorrow, and the day after that. We must give time for supermarkets to restock their shelves, there will be enough for everyone if we shop normally.

लोक घाबरून शॉपिंग करायला बाहेर पळाल्यावर पाऊण तासाने ट्वीट नाही केलं.
उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात सगळ्या गो ष्टी शांतपणे सांगितल्या होत्या.

आज मध्यरात्रीपासून २१ दिवस घाराबाहेर पाऊलही टाकू नका, असं म्हटल्यावर लोकांनी पॅनिक होऊ नये ही अपेक्षा थोर आहे. आणि यांना म्हणे जनतेची नाडी चांगली माहीत आहे, जनता यांचं ऐकते.
तेही रविवारच्या थाळी वादन करोना सेलिब्रेशनचा अनुभव ताजा असताना.

अमा, बिग बास्केट वाले म्हणताहेत लोकल ऑथॉरिटीज आम्हाला सामानाची वाहतूक करू देत नाही आहेत. आम्ही त्यांच्याशी बोलतोय.
जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍यांना वाहनावर लावण्यासाठी स्टिकर्स दिले जा णार आहेत. ते होईपर्यंत धीर धरूया.
दोन तीन दिवसांत सुरळीत होईल सगळं.

लोकांनी नेमकं किती वाजता दुध, भाजीपाला, ग्रोसरी, औषधं विकत आणायला घराबाहेर पडावे याच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. पोलिस मारतील या भीतीनं आमच्या घरातील पुरुष वर्ग बाहेर जायला घाबरत आहे.
अशा वेळी लोकप्रतिनिधी कुठे बिळात लपले आहेत? उपासमारीने मरतील लोकं अशानं.

IMG-20200325-WA0010.jpg

आपल्याला धक्का तंत्राचे कौतुक. नंतर सारखे सारखे निर्णय बदलत राहायचे. कोणी विरोध केला की ह्यांचे गळवे फुटतात. काय करायला पाहिजे असे उलटे प्रश्न विचारले जातात.

अशा वेळी लोकप्रतिनिधी कुठे बिळात लपले आहेत?>>>>

तुमचे लोकल नगरसेवक असतील ना, फोन करा त्यांना, खेचा बिळातून बाहेर...

मोदीविरोधासाठी वेगळा धागा काढा व तिथे काथ्याकूट करा हे सांगून ज्यांना कळत नाही त्यांना _____/\____

आणि हेच लोक थाळ्या घेऊन बाहेर पडलेल्या आणि काल धावत खरेदी करायला सुटलेल्या लोकांना शिव्याही घालणार...

उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात सगळ्या गो ष्टी शांतपणे सांगितल्या होत्या.>>>>

मग त्यानी सांगितले की जीवनावश्यक सगळे सुरूच राहणार म्हणून... अजून किती वेगळे सांगायला हवे.

उद्धव ठाकरेंनी राज्यात संचारबंदी जाहीर करताना हे सांगितलं होतं.
रविवारी रात्री. (तेव्हा panic situation झाली नाही. )
मोदी़च्या भाषणानंतर त्यांना ते पुन्हा सांगावं लागलं कारण ते भाषण ऐकून लोक panic झाले आणि दुकानांत गर्दी करू लागले.

यांत आणि रविवारच्या थालीवादनात लोकांनी social distancing पाळलं नाही. त्यात रोग आणखी किती पसरला असेल?

लोकांना घरी बसा सांगण्यासाठी केलेली भाषणं ऐकून लोक बाहेर पडायला उद्युक्त होतं असतील , तेही बाहत्तर तासांत दोनदा, तर जबाबार कोण?
ठाकरेंच्या भाषणानंतर असं चित्र दिसलं का?

अशा साथी 100 वर्षातून एकदा येतात
1720
1820
1920
2020
त्यामुळे मोदी काय अन नेहरू काय, कुणी असले तरी काही ना काही त्रुटी राहातातच

year-pandemic-cycle-statistic-text-dark-background-bible-cross-coronavirus-protection-concept-174027866.jpg

हे झाले की झाले ,
2120 च्या पेंडेमिकला बहुतेक आपण नसणार

महाराष्ट्रात करोनाग्रस्त म्हणून नोंद झालेल्या पहिल्या दोन रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. काही वेळापूर्वीच त्यांना नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे या दाम्पत्याचा पाडवा गोड झाला आहे. ९ मार्च रोजी या दोघांना नायडू रुग्णालयात आणलं होतं. हे दाम्पत्य दुबईहून पुण्यात आलं होतं. ते करोना पॉझिटिव्ह ठरले होते. मात्र दोन वेळा त्यांची टेस्ट निगेटीव्ह आली. या दाम्पत्याला आज डिस्चार्ज देण्यात आला. नव्या वर्षाची त्यांची सुरुवात चांगली ठरली आहे.

चीन,इराण, इटाली,जपान आणि रिपब्लिक ऑफ कोरिया येथे प्रवास टाळा असा आज मेसेज DoT कडून आला. काय ती तत्परता

इथल्या काही पोस्ट्स वाचून हसावे की रडावे कळत नाहीये.
लॉक डाऊननंतर सर्व आवश्यक सोयी सुविधा सुरळीत चालू रहाण्यासाठी थोडा वेळ लागेल हे उघड आहे. यात मोदींना जबाबदार धरणे चुकीचे आहे. ज्या अडचणी येत आहेत त्या स्थानिक पातळीवर सुटतील असे प्रयत्न करता येतील. इथे नुसते प्रश्न मांडण्यापेक्षा प्रश्न आणि ते सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न किंवा अधिक तपशील देऊन (गाव, एरिया) मदत मागणे योग्य ठरेल.
मोदीद्वेषाची किंवा मोदीप्रेमाची ही जागा नाही आणि वेळही नाही. लॉक डाऊन आवश्यक होते म्हणून केलेले आहे. आता त्याच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी सोडवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. राजकीय मतभेद बाजूला ठेवा काही दिवस. बघा जमतंय का.

हे तर आता अंगवळणी पडलंय. त्यांनी समस्या निर्माण करायच्या, त्रास जनतेने सोसायचा आणि त्यावर उपायही जनतेनी शोधायचे.

राजकीय मतभेद सर्वानीच आणि सर्व वेळीच बाजूला ठेवायला पाहिजेत.

राहुलने मोदींना सांगितले कि ज्या उपाययोजना सुरु आहेत त्याबाबत मी खूष नाही.
तर मोदी म्हणाले कि तसे वाटत असेल तर तू तुझ्या इटलीला जा तिथे भारतापेक्षा जास्त मृत्यू झालेत ते आधी बघ...

असले सडके मेसेज फेसबुकवर फिरत आहेत. त्यावर फिदीफिदी हसणे सुरु आहे. तिथे काही कॉमेंट केल्या तर मोदीभक्तांच्या थोर संस्कृती नुसार व्यक्तिगत शिवीगाळ ठरलेली. कुठे जातात तेंव्हा राजकीय मतभेद?

"गेल्या सत्तर वर्षात" ची टेप आता का वाजत नाही? गेल्या सत्तर वर्षात रोगाच्या जागतिक साथी आल्या नाहीत कि काय? अख्ख्या देशावर इतके दिवस आणीबाणी लादण्याची देशाच्या इतिहासातली हि पहिलीच वेळ कुणाच्या काळात आली?

वास्तविक राहुल ने फेब्रुवारीच्या मध्यात मध्ये सांगिलते होते कोरोनाव्हायरस हि भयंकर समस्या आहे व वेळीच कृती करण्याची गरज आहे. तेंव्हा त्याची वेळीच दखल घेतली असती तर आज अख्खा देश २१ दिवस बंद ठेवायची हि वेळ आली नसती. अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले नसते. इथे नेतृत्वाचा खरा कस लागतो. टाळ्या वाजवायला सांगणाऱ्याने आणि त्याची तळी उचलून धरणाऱ्यांणी जबादारी घ्यायची पण हिम्मत दाखवावी. प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करून भंपकपणा करणे आणि लोकांना फसवून येनकेनप्रकारे सत्तेत राहणे एवढा एकच अजेंडा आहे.

अगदी अगदी, कोरोना सुद्धा मोदींनीच निर्माण केलाय, स्वतः च सांगितलेले नियम लोकांनी पाळू नये म्हणून त्यांच्यावर hypnotism मोदींनीच केलेलं आहे आणि ते मुद्दाम गर्दी घडवून आणत होते. एवढंच नाही तर कोरोनग्रस्त लोकांना खुशाल पळून जाऊन रेल्वे/ बसमधून प्रवास करू देण्यामागे मोडींचाच हात आहे.

जनतेची मात्र काहीही जबाबदारी नाही. अगदी सद्सद्विवेक बुद्धीही सरकारनेच जनतेला वाटली पाहिजे..

राहुल ने फेब्रुवारीच्या मध्यात मध्ये सांगिलते होते कोरोनाव्हायरस हि भयंकर समस्या आहे व वेळीच कृती करण्याची गरज आहे. >>

कोणती कृती म्हणताय इनामदार भौ? लॉकडाउन की काय? तसं असेल तर किती दिवसासाठी लॉक डाऊन करावं असं राहुल ने सांगितलं?

तुम्हाला उत्तर माहीत नाही, हे माहीत असूनही प्रश्न विचारतो आहे

हे तर आता अंगवळणी पडलंय. त्यांनी समस्या निर्माण करायच्या, त्रास जनतेने सोसायचा आणि त्यावर उपायही जनतेनी शोधायचे.>>+१. उपाय सोपा होता तेव्हा दुर्लक्ष केलं. अपयश दिसू नये म्हणून आता जनतेच्या माथी मारणार हे नक्की. बरे अजूनही लोक साथ देतील पण जनतेला विश्वासात घेण्याचे काहीच प्रयत्न नाहीत. उठांना तडकाफडकी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली यातच काय ते आले. बरे काही बोलले, उणीवा काढल्या की राजकारण. मरायची वेळ आली तरी डोकं ताळ्यावर येऊ नये? केवढी ती गुलामी.

हंगाश्शी
आता कशी गुढी पाडव्याच्या दिवशी धुळवड सुरू केली लोकांनी.

कोणती कृती म्हणताय इनामदार भौ? लॉकडाउन की काय? तसं असेल तर किती दिवसासाठी लॉक डाऊन करावं असं राहुल ने सांगितलं?
>>>>

कोणती कृती करू शकत होतो नेता म्हणून आपण यावर जरा आपण सुद्धा विचार करावा? बाकीचे सत्तर वर्ष सत्ता केलेले भ्रष्ट पक्ष त्यांनी फार फार तर विमानतळे बंद केली असती -- जी आता देशात व्हायरसला देशाच्या आत घेऊन मग केली आहेत, प्रवाशांचे स्कॅनिंग केले असते, अन्य उपाय योजना केल्या असत्या. आपण निदान टाळ्या वाजवायला तरी सांगायच्या ना तेंव्हा, नाही का? किंवा कापूर जाळायला सांगायचा देशाच्या सीमेवर, शंख वाजवायला सांगायचा, यज्ञ घालायचा चायनाच्या सीमेवर... काहीतरी करू शकलो असतो कि नाही?

धुळवड नाहीये ही, लसीकरण म्हणतात ह्याला, परंतू सरकार व्हायरसपेक्षा घातक बदल करून नवीन समस्या निर्माण करण्यात पटाईत आहे.

धुळवड? खरेंचे खोटे फॉरवर्ड सोमी वर फिरत आहेत त्यांस देशभक्ती म्हणायचं नाही का? असल्या मूर्ख माणसाला डॉक्टरकी मिळाली हे दुर्दैव समाजाचे. जर्मन इतिहास वाचून शेखचिल्ली स्वप्ने पडत असावीत. ती भूक असे काहीबाही लिहून पुरी करून घेतोस का रे मूर्खा?

आपलं ठीक आहे, आपल्याला फक्त २१ दिवस रेटायाचे आहेत. नेट चालू (सध्यातरी) असल्यामुळे वेळ तरी जातोय. ३७० काढून टाकल्यावर जम्मू काश्मीरचे काय हाल झाले असतील? तिकडे तर नेटही बंद होते.
ह्याला राजकीय धुळवड म्हणून स्वीकारण्यास हरकत नाही.

Screenshot_2020-03-25-12-42-44_1.jpg

Pages