चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एकदम एखादी शिओमी ला कॉम्पिट करणारी मोठी मोबाईल कंपनी असल्या सारखं वाटतंय.अनुमी. ☺️☺️
मी खरं तर अहल्या स्पेशली शोधत नव्हते.जॅबी कोए रिऍक्शन्स बघता बघता दिसली.
विकी वेलिंगकर पाहिला 1 तास प्राईम वर.नवरा म्हणाला की सोकू आवडणाऱ्याने पिक्चर बनवला आहे.सर्व फ्रेम कथेच्या डिमांड पेक्षा ती कशी छान दिसेल यावर एकवटल्या आहेत

स्पॉयलर
पिक्चर एका चांगल्या संकल्पनेसाठी खूप मोठा भाग खूप वेळा रिपीट करतो.म्हणजे, चांगली वेगळी कथा वाटण्यापूर्वी 'फिलर म्हणून वेळ वाढवायला रिपीट' असं कधीकधी वाटून जातं.
मुख्य लॉजिक जरा गोंधळलेलं आहे.

इथे योग्य आहे की नाही माहीत नाही तरीही...

नेटफ्लिक्सवर 'मोतीचुर चखनाचूर' पाहिला. प्रचंड आवडला. गाणी तर रिपीट मोडवर ऐकण्यासारखी. सगळ्यांची कामं मस्त.

चित्रपटातली हिंदी कोणत्या राज्यात बोलतात म्हणे?

धन्यवाद चंपा. मी मोतीचुर.. नेटफ्लिक्स वर पाहिल्याने मला वेबसिरीज वाल्या धाग्यावर लिहावं की इथे चित्रपट धाग्यावर हे कळत नव्हतं.

तामिळनाडू

>> ऑ? चेष्टा करताय का? मी कानपूरी हिंदी ऐकली आहे. मध्य प्रदेशमधील सुद्धा लहेजा ठाऊक आहे. अशी हिंदी कोणत्या राज्यात बोलतात हे खरचंच माहीत नसल्याने विचारलं. तामिळनाडू मध्ये अशी हिंदी बोलतात? हमाऊ मोडा - तुमाऊ मोडी वगैरे?

'स्काय इज पिंक' बघितला. प्रचंड हलले आतून. बघताना वाटत होतं की असेलही सत्यकथेवर आधारित. पण बरीच सिनेमॅटिक लिबर्टी असेल. ज्या पध्दतीचं त्यांचं आयुष्य आणि नातेसंबंध दाखवले ते तर इतके छान आहेत की बघताना खरेच वाटेनात.

पण शेवटी जेव्हा आयेशाचं सगळं रिअल फुटेज दाखवलं तिच्या भावाच्या गाण्यासह.. माझ्या अंगावर काटा आला. तुकड्यातुकड्यात बघूनही माझ्यावर एवढा परिणाम झाला.. सलग बघितला असता तर केमिकल लोचाच झाला असता.

प्रत्येकाने आवर्जून बघावा असा नितांत सुंदर सिनेमा !!!

शुभमंगल ज्यादा सावधान बघितला काल. सुमारच आहे.
एवढी मजा आली नाही. नेहमी आयुषमानचे जेवढे छान असतात मुव्हीज हा काही खास वाटला नाही. एकतर तेच अलाहबाद युपीचे वातावरण, भाषा तेच तेच बघून कंटाळा आला. मधे तर उठून जावेसे वाटायला लागले इतका बोर झाला काही ठिकाणी.

मर्दानी २ प्राईमवर बघितला. फास्ट आहे मुव्ही. काही काही सिन्स बघवले नाहीत. ज्याने कोणी त्या विकृत माणसाचे काम केलंय भारी केलंय.

थे योग्य आहे की नाही माहीत नाही तरीही...

नेटफ्लिक्सवर 'मोतीचुर चखनाचूर' पाहिला. प्रचंड आवडला. गाणी तर रिपीट मोडवर ऐकण्यासारखी. सगळ्यांची कामं मस्त.

चित्रपटातली हिंदी कोणत्या राज्यात बोलतात म्हणे?>> दोन पाने मागे या चित्रपटावर चर्चा आहे.
चित्रपटातली भाषा मध्य प्रदेशची आहे आणि गाव भोपाळ आहे. मला या चित्रपाटतलगावच्/परिसरच जास्त आवडला त्यामुळ परत आणि आवर्जुन इथे लिहिल.

पॅरासाईट बघाच, निदान दोनदा तरी.
अर्थगर्भ सिनेमे मनोरंजक नसतात असे मानणारा एक मोठा वर्ग आहे, त्यात काही सुमार पातळीचे 'सिनेसमिक्षक' ही आहेत. अशा मंडळींनी तर नक्कीच बघावा.

नेटफ्लिक्स वर 'द बॉडी' (हिंदी) बघितला. मस्त आहे. स्पॅनिश सिनेमाचा अधिकृत रिमेक आहे (म्हणजे क्रेडिट देऊन). शेवटपर्यंत सस्पेन्स मस्त राखलाय. तसंही, मी सस्पेन्स सिनेमा बघताना, शेवट काय असेल ह्याचे अंदाज बांधत नाही. ह्याची दोन कारणं - एक म्हणजे, माझे अंदाज हमखास चुकतात आणी दुसरं म्हणजे, सगळी मजाच निघून जाते.

मी पण पाहिला. दीड तासात मस्त बसवलाय. आवडला. इमरान हाशमी असून फार वाह्यातपणा नाहीये. रीषी कपूरचा अभिनय पण चांगला आहे.

सीमा धन्यवाद. मागे जाऊन ती 2 पानं वाचून काढली.

नेटफ्लिक्स वर 'ओह ये बॅले' बघितला. छान आहे. शॉर्ट आणि स्वीट. 2 गरीब मुलांचा बॅले डान्सर होण्यापर्यंतचा प्रवास. त्यातला फिरंगी मास्टर भाव खाऊन गेला.

शुभमंगल ज्यादा सावधान बघितला काल. सुमारच आहे.>> +१
आयुष्मान असूनही सपकच वाटला. विनोदी शैलीतून गंभीर विषय हाताळण्याची कल्पना छान आहे, मात्र यातील मूळ समलैंगीकता हा विषयच फार उथळपणे मांडलाय. बोर झाला बर्याच ठिकाणी.

Pages