चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोगरा फुलला बग्जितला काल इथे वाचून...
चंद्रकांत कुलकर्णींचे काम आवडले. त्या शेजारच्या मायाचे काम पण आवडले.

स्वप्निल फारसा आवडत नाही...त्यात ह्या सिनेमात तो जीभ जड पडल्यासारखा बोबडा का बोलतोय? मला कळले नाही.
कानाला फारच खटकतात ते उच्चार...स ला ष म्हणतो...मला तर वाटले, आस्ताद काळे आणि त्याचे बाबा दोघे ही त्याला एकदम चावले की काय Lol

कायद्याचं बोला मधे सगळ्यात गंडलय ते शर्वरी जमेनीस चं पात्र. My cousin Vinny मधे मरिसा टोमे च्या पात्राला कथेच्या क्लायमॅक्स ला खूप महत्व आहे. काय्द्याचं बोला मधे फक्त तिचा गेट-अप कॉपी केलाय, पण त्या पात्राला काही अर्थ नाहीये.

भयानक दिसते शर्वरी त्या चित्रपटात. भटकंतीची निवेदक हीच का असा प्रश्न पडावा ईतकी विचित्र.

सुनिधी, ती मावशी जास्त छान आहे. अथियाचा चेहरा खुप उग्र वाटतो.पण ठिक आहे. >>> हो, सीमा. बरोब्बर. मावशी तिकडचे हिंदी पण फार मस्त बोलली आहे.

एवढ्यात 'वीरें दि वेडिंग' आणि शुभमंगल सावधान (आयुषमान खुराणा वाला) हे दोन मुव्हीज पाहिले. चित्रपट थर्ड वर्ल्ड मध्ये घडत असावेत इतक्या अ आणि अ गोष्टी ठासून भरल्या आहेत.

आयुषमान खुराणा वाल्या शुभमंगल सावधान कडून नक्कीच जास्त अपेक्षा होत्या माझ्या. त्यात दाखवलेल्या समस्येविषयी (शीघ्रपतन) फार न बोलता फक्त समस्येची खिल्ली उडवण्यावर भर दिला आहे असं वाटलं. हेच त्याच्या इतर सिनेमात त्याने असे हटके विषय (विकी डोनर, दम लगाके.., बधाई हो, बाला) फार नाजूकपणे हाताळले आहेत.

'वीरें दी वेडिंग' तर 'पैसे कुठे कुठे आणि कसे खर्च करावेत बरं' असा प्रश्न पडणाऱ्या अति गडगंज श्रीमंत लोकांचा सिनेमा आहे. स्त्रीला ओपन किंवा लिबरल दाखवण्यासाठी तिने स्मोकिंग आणि ड्रिंकिंग केलेलं दाखवावंच लागतं का हा प्रश्न पुन्हा एकदा डोक्यात येऊन गेला. असो..

Street Dancers पाहिला.
बरा वाटला. कुठेही कंटाळा आला नाही. पण यापेक्षा जास्त drama ABCD मध्ये होता.
Dances enjoy kele. नोरा छान नाचते.

मी पण स्ट्रीट डान्सर पाहिला. मस्त वाटला. ती सगळी गँग माझ्या भारी आवडीची आहे. सगळे डान्सेसपण छान जमलेत. टाळ्या शिट्ट्या माराव्याश्या वाटल्या प्रभुदेवाच्या मुकाबला चालू झाल्यावर. त्या ढोल वाजवणार्‍या माणसाचा आणि वरूण धवनचा बसमधला सीन फारच टची होता.

फोर्ड व्हर्सेस फेरारी पाहिला. कारप्रेमींसाठी मस्ट वॉच म्हणेन. ख्रिश्चन बेल आणि मॅट डेमन दोघांचाही अभिनय कमाल. फोर्डची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचा कार मध्ये फिरवून आणल्यानंतरचा सीन छान जमून आलाय. प्रत्येक रेसिंग सीन खूप छान प्रकारे दाखवला आहे.

कोणी जवानी जानेमन पाहिला का ???

टाळ्या शिट्ट्या माराव्याश्या वाटल्या प्रभुदेवाच्या मुकाबला चालू झाल्यावर. >>>> अगदी अगदी . मी आणि नवरा एकदम भावूक झालो. Wink लेकाला त्यातली depth कळत नव्हती

पती पत्नी और वो पाहिला.
ठीक वाटला. काही विनोद, पंचेस छान होते.
पण काही केल्या कार्तिक चं वागणं जस्टिफाय होतच नाही.
भुमी तर त्याची मोठी बहिण वाटते. बायको वाटत नाही.
एक भा. प्र... ती साडीचा पदर उजव्या खांद्यावर का घेते? काहीतरीच प्रकारे नेसते साडी.
एकूणच बघितला किंवा नाही बघितला तरी ठीक.

तो अपारशक्ती खुराणा आहे बहुदा।>>>>>>>>> येस्स आत्ता गुगल केले. आयुष्मान चा भाऊ Happy जेवढा रोल आहे चांगला केलाय त्याने.

सान्ड की आन्ख आवडला पण भुमी आणि तापसीचा मेकप अगदीच चुकलाय , नुसते केस पान्ढरे केलेत पण तुकतुकित त्वचा आणि छान मेनीक्युअर हात यामुळे त्या म्हातार्‍या वाटतच नाही त्यापेक्षा नीना गुप्ता आणि कुणि अस घ्यायला हव होत.

विकी वेलिंगकर का बघितला असं वाटतंय. मध्यंतरापर्यंत एकच सीन एका वाक्याच्या फरकाने सलग तीन वेळा दाखवलाय. ईतका वैताग आला. आता काहीतरी वेगळं घडेल, मग घडेल करेपर्यंत अगदी शेवटी काहीतरी फुस्कुला बदल घडतो. तिला त्या मास्कमन शब्दावरून साळुंखेचा संशय येतो वगैरे सगळं ठिक पण मुळात ते घड्याळ कसं काम करतं हे खलनायकाला/नायिकेला माहीतच नसतं तर त्यांना ते का हवं असतं. स्पृहा स्वतःला मारून घेते ते तर फारच हास्यास्पद. त्या घड्याळाचा नक्की उपयोग मला कळलाच नाही. ते घड्याळ घालून सोनाली कधी मरणारच नाही का. सोकूचा तो बॉयफ्रेंड वगैरे घालून उगाच टीपी केलाय. सोकूचं घर किती विचित्र असतं, ती कार्टून पुस्तकं लिहिते हे शेवटी कळलं.
स्पृहाने शेवटच्या दहा मिनिटात जो अभिनय केलाय तसा अभिनय सोनालीला पूर्ण चित्रपटात जमला नाहीये. ती अभिनय करते पण त्या पांढऱ्या फक्क चेहेऱ्यात काहीच दिसत नाही, सगळं लुप्त होऊन जातं असं काहीतरी वाटतं मला. असो, परत नाही जाणार तिच्या चित्रपटाच्या वाटेला.

मध्यंतरापर्यंत एकच सीन एका वाक्याच्या फरकाने सलग तीन वेळा दाखवलाय. ईतका वैताग आला. आता काहीतरी वेगळं घडेल, मग घडेल करेपर्यंत अगदी शेवटी काहीतरी फुस्कुला बदल घडतो.

हा हा... चंपा तुम्हाला हा चित्रपट कळलाच नाही. तुम्ही happy death day आणि happy death day 2u बघा. मुळात ते घड्याळच असे असते की ते एखाद्याला टाईम लुप मध्ये टाकते. त्यामुळे ज्याने घड्याळ घातले आहे तोच टाईम लुप मध्ये असतो व एखादा प्रसंग त्याच्या बाबत सतत घडत असतो. पण इतरांना ते टाईम लुप मध्ये आहेत ते माहीत नसते. म्हणूनच खलनायक मंडळींना जरी ते घड्याळ कसे काम करते ते माहीत असले तरी त्यांना कळत नाही की ते नायिकेच्या टाईम लुपमध्ये आहेत. त्यामुळे ते परत परत तसेच वागत असतात.

विकी वेलिंगकर का बघितला असं वाटतंय. मध्यंतरापर्यंत एकच सीन एका वाक्याच्या फरकाने सलग तीन वेळा दाखवलाय. ईतका वैताग आला. आता काहीतरी वेगळं घडेल, मग घडेल करेपर्यंत अगदी शेवटी काहीतरी फुस्कुला बदल घडतो. >> अगदी अगदी! मी पण वैतागलेले तेच तेच सीन बघून...सोकु अजिबात आवडली नाही. पांढरीच दिसते.

पती पत्नी और वो पाहिला.
ठीक वाटला. काही विनोद, पंचेस छान होते. एकूणच बघितला किंवा नाही बघितला तरी ठीक. >>>
+११११

पती, पत्नी और वोह बघितला, कार्तिक मुळात दिल्लीबॉय आहे का? कानपुरीया अ‍ॅक्स्टेन्ट अजिबात जमले नाहियेत, त्याच्या नेहमिच्या एलिमेन्ट मधे नसल्याने खुप सैरभैर वाटतो, भुमी त्याच्यापेक्षा सतत मोठी वाटत राहते, दिसण्यातच नाही , अ‍ॅक्टिन्गमधे सग्ळ्यात उत्तम तीच आहे.
अन्यन्या पान्डे जरा बरा ठोकळा सध्याच्या लॉट मधला इतपतच अ‍ॅक्टिन्ग जमवली आहे तीने.
डोळयाखालची डार्क सर्कल मेकपमधुनही उठुन दिसतात, एक मजेशिर सिन आहे त्यात, अन्यन्या ट्रेन मधुन उतरते तेव्हा बॅगा काढताना बॅगा कढे बघुन काढायच्या सोडुन कॅमेरा लुक देत बॅगा उतरवते, अस्टीटन्ट ला डुलकी लागली असावी.
शेवटच्या एका मिनिटाच सुद्धा क्रुती सॅनॉन फ्रेशनेस आणते स्क्रिनवर.
भुमीच्या साड्या उलट्या नेसल्याने विचित्र वाटतात. खटकत राहतात.

भुमीच्या साड्या उलट्या नेसल्याने विचित्र वाटतात. खटकत राहतात...+१ हेच मलाही खटकलं होतं.. काहीही दाखवत्तात..
आणि ती त्याची बायको वाटत नाहीच, सतत मोठी वाटते..
कास्टिंग बरोबर नाही..

काल मर्दानी २ पाहीला. बापरे तो व्हिलन फारच विकृत, सायको दाखवलाय. अंगावर काटा येतो. राणीचे काम मस्त!

मलंग छान आहे

ड्रग , वगैरे फार दाखवले आहे , ते नको दाखवूनही सस्पेन्स स्टोरी तितकीच दमदार झाली असती

अमेझॉन प्राईमवर फॉरेस्ट गम्प बघितला.आवडला. टॉम हँक्सने भारी काम केलंय . निरागसता असूनही बालिशपणाच्या पातळीवर न जाता मस्त कॅरेक्टर उभं केलेय . टंग इन चीक संवाद मस्त वाटले
चित्रपटाला एक फ्लो आहे . संथ असूनही मस्त वाटतो त्यामुळेच Happy

मर्दानी २ पाहीला. बापरे तो व्हिलन फारच विकृत, सायको दाखवलाय. अंगावर काटा येतो. राणीचे काम मस्त! --- +1234567

भुमीच्या साड्या उलट्या नेसल्याने विचित्र वाटतात. खटकत राहतात...+१ हेच मलाही खटकलं होतं.. काहीही दाखवत्तात..
आणि ती त्याची बायको वाटत नाहीच, सतत मोठी वाटते..
कास्टिंग बरोबर नाही. --- + १२३४५६७८
अगदी भंकस पिक्चर.

हुश्श ! मर्दानी २ पहिला, एकदम जबरदस्त. राणीचं काम अप्रतिम. आजकालच्या घटना पाहता असेच चित्रपट अजून निघावे असे वाटते गुळमुळीत लव स्टोरीज पेक्षा....

फायनली राधिका आपटेची अहिल्या शॉर्ट फिल्म पाहिली.जबरदस्त आवडली.
इंद्र अहिल्येच्या प्राचीन गोष्टीत आणलेला ट्विस्ट, आणि काही परकीय कल्पना.जे काही रसायन बनलंय ते जबरदस्त.

Pages