निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Close up मस्त आलाय.. अशा फोटोजमधे बारीकसारीक डिटेल्स पटकन कळुन येताएत..

जब जब मेरे घर आना तुम,
फूल पलाश के ले आना तुम...
जब जब याद मेरी आए तो,
फूल पलाश के ले आना तुम... >>>

माझं अतिशय आवडतं गाणं. मी बघायचे ती सिरीयल. प्राजक्ता दिघे आणि अमोल नावाचा कोणीतरी होता. मस्त होती आणि टायटल song तर अहाहा.

सर्व फोटो सही एकदम.

IMG-20170108-WA0027.jpg

.

IMG-20170108-WA0026.jpg

मी महाकवी दुःखाचा
प्राचीन नदीपरि खोल
दगडाचे माझ्या हाती
वेगाने होते फूल...
-ग्रेस

पाचोळ्यात पडली सुमने
हसतात तरीही आता
देहाचे झाले सोने
दरवळती जाता जाता
........ मला सुचलेला हायकू

.......फोटो सौजन्य -मैत्रीण

आहा हा! ऋतुराज काय फोटो टाकलेत! झकास!!

हायकू मस्तच! (तिन ओळींचे असते का हायकू?)
पण हायकूपेक्षाही मला 'फोटो सौजन्य -मैत्रीण' ही ओळ जास्त आवडली. Lol Lol

हायकू मस्तच! (तिन ओळींचे असते का हायकू?)>>>>> हो बहुतेक

पण हायकूपेक्षाही मला 'फोटो सौजन्य -मैत्रीण' ही ओळ जास्त आवडली. Lol Lol

अजून छायाचित्र या विषयात मी पाळण्यातच आहे.....

हायकू मस्तच! (तिन ओळींचे असते का हायकू?)>>>>> हो बहुतेक

पण हायकूपेक्षाही मला 'फोटो सौजन्य -मैत्रीण' ही ओळ जास्त आवडली. Lol Lol

अजून छायाचित्र या विषयात मी पाळण्यातच आहे.....

IMG_20200126_072547.jpg

Striped Tiger फुलपाखरांचे स्थलांतर
मी काढलेला मोबाईल क्लीक (एवढंच जमत मला)

मस्तच फोटो आहे. कुठे दिसली ही? कधी?
Striped Tiger ही मला कधीच एकत्र दिसली नाहीत आजवर. कधी करतात हे स्थलांतर? मित्रांनी काढलेले फोटो काय सुंदर असतात. एखादी फांदी फुलांनी लगडावी तशी लगडतात ही फुलपाखरे.
डॉ. कसंबेंनी दिलेल्या लिंकवरुन मी PDF डाऊनलोड केली. ती आज पाहीली तर बऱ्याच गोष्टी समजल्या. कवडी फुलपाखरांचे मी किमान तिन प्रकार पाहीलेत हे त्यावरुन समजले. मला वाटायचे की डिझाईन वेगळे असु शकते. पण ती वेगवेगळी फुलपाखरे होती. मी ज्याला राईस स्विफ्ट समजत होतो तेही वेगळेच स्विफ्ट निघाले. येथे कुणीतरी फुलपाखरांची नावे विचारली होती, ती फुलपाखरेही त्या PDF मध्ये आहेत. नक्की डाऊनलोड करा.

शालीदा,
फुलपाखरांची दुनिया पण भन्नाट आहे.
पाखरांसारखा तो नाद बी लय वंगाळ
कसंबे तर ग्रेटच आहेत
आम्ही एक कार्यक्रमाला त्यांना बोलावलं होतं

धन्यवाद सामो

पाचोळ्यात पडली सुमने
हसतात तरीही आता
देहाचे झाले सोने
दरवळती जाता जाता>>>> अगदी सुरेख ओळी आहेत ऋतुराज. पुर्ण कर खरच.
यावरुन मला माझ्या प्रोफाईमधल्या ओळी आठवल्या.
पुजेतल्या पाना फुला, मृत्यू सर्वांगी सोहळा
धन्य निर्माल्याची कळा, धन्य निर्माल्याची कळा

पाखरांसारखा तो नाद बी लय वंगाळ>>>>> एक नाद करता करताच नाकी नऊ आलेत बाबा. त्या फुलपाखरांना नांदूदे फुलांवर सुखाने. नाहीतर एका भुताने झाड सोडले की दुसरे भुत झाड धरायचे असं होईल. Lol

पट्टेरी रुईकर>>>>चपखल नाव, ह्या फुलपाखरांची खाद्य वनस्पती रुई आहे

अशी फुले घेवड्याला येतात. अगदी अशीच पण लहान असतात. ही सध्या बरीच दिसायला लागली आहेत. त्यांच्या शेंगा घेवड्यासारख्याच पण खुप मोठ्या व जाड आहेत. उद्या याचे शेंग आणुन तिच्या आत काय आहे त्याचा फोटो देईन. जंगली घेवडा वगैरे असतो का?

ऋतुराज हायकू लय भारी.
शालीदा फोटो आणि कविता(विशेषतः दुसरी) छान.
ते वळखा बघू उत्तर सांगा आता तुम्हीच.

किटटू२१ धन्यवाद
ती लिंबाचीच फुले आहेत , हो ना शालीदा
आणि ते गुलाबी फुल अबईच आहे का?

येथे कुणाला कोडं घालायची सोयच नाही. सर्वांना सर्व माहीत असतं. Lol
हो. ती लिंबाची फुले आहेत. येथे कुणा पक्षामुळे बी आली असावी. या झाडाकडे कुणाचेच लक्ष नाही त्यामुळे त्यावर किड वगैरे भरपुर पडली आहे.
_____________
गुलाबी फुल कसले आहे ते माहीत नाही. उद्या त्याची शेंग आणतो घरी.

.

ही फुले (?) मला सज्जनगडावर नेहमी दिसतात. करवंदीच्या जाळीजवळ हमखास असतात. आज मला ही देवराईत खुप दिसली. नाव मात्र शोधूनही सापडले नाही. काय आहे हे? हे आता वाळले आहे म्हणून असे दिसते का? सुरवातीला हिरवे असते का?

याच्या आत अशा पाकळ्या असतात. बहुतेक बी असावे. हे पंख बिजवहनासाठी असावेत. (फोटो खुप जुना आहे. सज्जनगडावर काढला होता.)

कौतुकास्पद नीरीक्षण, आवड, छंद व झपाटलेपण. आय एन्वी यु. मला अशा निसर्गरम्य भागात रहायला अतोनात आवडले असते.
____
अमेरीकेमध्ये स्टेट फॉरेस्टस असतात पण मला गाडी चालवायची भीती वाटत असल्याने, एकटी कुठे जात नाही. अर्थात दळणवळणाची साधने उत्तम आहेत आमच्या भागात ४-५ प्रकारच्या ट्रेन्स, बसेस, टॅक्सीज आहेत. तेव्हा ..... निदान सेंट्रल पार्कला जाउन बसायला हवे. उन्हा ळ्यात जमेल/ जमवेन.

हो वर्षा, Common Sandpiper आहे.
मराठी नाव: तुतवार किंवा तुतारी (संस्कृत: जलरंक)

Pages