" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"
कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.
"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."
पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.
निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)
(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.
(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)
(No subject)
ओके धन्यवाद हरिहर
ओके धन्यवाद हरिहर
मस्त धावतोय धागा...
मस्त धावतोय धागा...
ऋतुराज, मस्त ओळी आणि हायकू पण..
शाली दां च्या ओळी त्याहुन भारी..
फुलपाखरे खुपच सुरेखच..
ही फुलं कसली ओळखा बघू.
ही फुलं कसली ओळखा बघू.
नारळाची फुलं ना ?
नारळाची फुलं ना ?
नारळाची फुलं ना ?>>>>होSSSSS
नारळाची फुलं ना ?>>>>होSSSSS
आम्ही नाही जा,असं लगेच उत्तर देतात का? : रडकी बाहुली:
ही पेरूची फुले आहेत ना?
ही पेरूची फुले आहेत ना?
)
(बघा किट्टु, मला ओळखता नाही आले.
(No subject)
ही पेरूची फुले आहेत ना?
ही पेरूची फुले आहेत ना?

(बघा किट्टु, मला ओळखता नाही आले. )
शालीदा हा विदेशी पांढरा चाफा
शालीदा हा विदेशी पांढरा चाफा आहे ना. हल्ली सगळीकडे हाच दिसतो. लाल चाफा तर कुठे दिसतच नाही.
माहित नाही. पण या चाफ्याला
माहित नाही. पण या चाफ्याला वास नाही, फुलपाखरे येत नाहीत, काही नाही. नुसताच खुप फुलतो.
आपल्या चाफ्याला काय सुंदर वास येतो.
किटटु२१
किटटु२१
आपण ज्याला चाफा (पांढरा) म्हणतो ते मुळात परदेशी झाडच आहे
लाल चाफा ही परदेशीच
पण आता ही आपलीच झालीयेत
अजून वेगळा हिरवा चाफा... सुवासिक
आणि सोनचाफा....अतिसुवासिक
अजून एक भुईचाफा, कवठीचाफा
अजून राहिलं का काही?
जाणकारांनी भर घाला
चाफ्याच्या जाती नुकत्याच
चाफ्याच्या जाती नुकत्याच माहीत झाल्यात. मी लहानपणापासुन चाफा पाहीला तो देवचाफा. मधे पिवळसर असलेला, जाड पाकळ्यांचा, मादक वास असलेला. देवळासमोर हमखास असणारा.
हिरवा चाफा भावगीतात ऐकला व नंतर पाहीला. त्याला चाफा म्हणायला सुरवातीला मी तयारच नव्हतो.
चाफा बाहेरचा असेलही पण देवचाफ्याच्या फार सुरेख आठवणी आहेत. वर फोटो दिलाय त्याला ना वास ना स्पर्शाचा मुलायमपणा. फक्त रुप चाफ्याचे. झाडही भारदस्त नाही देवचाफ्यासारखे.
किटटु२१
किटटु२१
आपण ज्याला चाफा (पांढरा) म्हणतो ते मुळात परदेशी झाडच आहे>>>>
हा पक्षी कोणता? कालपासून
हा पक्षी कोणता? कालपासून वेड्यासारखा खिडकीच्या ग्रिलवर भिरभिरतोय काहीतरी शोधत असल्यासारखा. ह्याला काही खायला देता येईल का?
हा निखार (small minivet) आहे.
हा निखार (small minivet) आहे.
पक्ष्याचा फोटो. अस वाटल अप्पा
पक्ष्याचा फोटो. अस वाटल अप्पा परत आले कि काय.:(
धन्यवाद अदीजो! याच्याबद्दल
धन्यवाद अदीजो! याच्याबद्दल वाचल्यावर कळलं की त्याचं भिरभिरणं हे नॉर्मल आहे
आम्ही जरा काळजीत पडलो होतो की काय झालंय ह्याला.
नमस्कार निगकर
नमस्कार निगकर
जाई जुई चमेली कुंद यांचा एक सचित्र धागा होता, कोणी सांगू शकेल का?
चाफा पुराण भारीच.
चाफा पुराण भारीच.
धागा जागा करण्यासाठी
धागा जागा करण्यासाठी
https://www.maayboli.com/node
Ruturaj
hi link paha
httpss://www.maayboli.com/node/44473
धन्यवाद ssj
धन्यवाद ssj
वसंत यंदा लवकर डोकावतोय,
वसंत यंदा लवकर डोकावतोय, त्याची झलक

http://epaper.lokprabha.com
http://epaper.lokprabha.com/2571812/Lokprabha/06-03-2020#dual/46/1
धामापूर सडा , लोकप्रभा
वेका,
वेका,
डॅफोडिल्स सुंदर आहेत. न्यू यॉर्क मध्ये ठायी ठायी दिसतात.
. .सिता अशोक
.
.
वसंतातील आसमंत
वसंतातील आसमंत
https://www.loksatta.com/lokprabha/lokprabha-article-on-spring-season-ab...
प्राणिजगतात दुसऱ्या प्रजातीचे
प्राणिजगतात दुसऱ्या प्रजातीचे पिल्लू सांभाळणे व त्याचे पालनपोषण करणे शक्यतो दिसून येत नाही, परंतु अशाच काही अपवादत्मक संगोपनाबद्दल .......
ममता दुसऱ्याच्या बछड्यासाठी? अघटित !
सुनील लिमये - लोकप्रभा
http://epaper.lokprabha.com/2602115/Lokprabha/27-03-2020#dual/32/2
सर्व निसर्गप्रेमींना
सर्व निसर्गप्रेमींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
प्रचि साभार: अभिजीत भिडे
चैत्र बघतो वाकून
निळ्या नभांतून खाली
आणि वाऱयाच्या धमन्या
धुकल्या गं अंतराळी
बा सी मर्ढेकर
Pages