निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG-20191119-WA0018.jpgDrynaria quercifolia Bracket Fern
नेचेवर्गीय वनस्पती
कोकणात ,घाटमाथ्यावरील सदाहरित भागात, मोठ्या वृक्षांच्या खोडावर सर्रास दिसते

येथे तुच जाणकार आहेस.
सध्या फार टाळकं सरकलय राव. मरो ती मायबोली असं वाटायला लागलय.

हरिहर का हो अस म्हणता ?

ऋतुराज, गूगलून पाहिल तर डार्क रंगाची फुलपाखरं दिसली आणि कोशाचा रंग पिवळसर आहे. त्यातुन फुलपाखरू कधी बाहेर येईल

अर्र
तुच जाणकार आहेस हे ऋतुराजला म्हणालो. सॉरी स्निग्धा. माफ करा. खरच सॉरी.
टाळकं खरच जाग्यावर नाहीए.

हरिहर, शांत राहा बरे! तुमच्यासारखी समजदार माणसं पण असं वागू लागली तर काय करायचे! इग्नोर करावे. आपले काम पुढे चालू द्यावे.

सॉरी नको. मी पण बरेच दिवसांनी आले माबोवर. त्यामुळे संदर्भ कळला नाही पण विनीतांच्या पोस्ट मुळे काही तरी झालंय हे कळलं. सोडून द्या लक्ष देऊ नका इतकंच सांगते

स्निग्धा, कोष केल्यापासून आठ दहा दिवसांत यायला हवं बाहेर
अजून जरा गडद होईल कोष दोन दिवसात अस वाटतंय
शालीदा,
जाणकार बिनकार काही नाही, घरी जोपासले होते मागे फुलपाखरू

बाकी तुम्ही शांत राहा, तुमचा संताप समजू शकतो पण तरीही तुमचं काम चालू ठेवा, बाकी दुर्लक्ष करा

हरिहर का हो अस म्हणता ? >>> मलाही हेच विचारावसं वाटलं. मी मायबोलीवर सर्वच वाचत नाही, वेगळं सदस्यत्व कुठलंही घेतलेलं नाहीये. त्यामुळे माहीती नाही काहीच. नि. ग. आणि सिरीयल्स, रेसिपीज इथे जास्त बागडते, क्वचित राजकारण धागे जे इथे दिसतात ते.

पण हरीहर यांचे या धाग्यावर योगदान खूप होतं, त्यामुळे इथल्या आम्हासारख्या वाचकांचे नुकसान होणार हे नक्की.

ओ आहे मी अजून >>> Lol

धन्यवाद हरिहर. चला आता छान छान फोटोंची मेजवानी मिळत राहील. वरचा फोटो जबरदस्त.

हरिहर. on 12 January, 2020 - 23:43>>>>>. अरे काय जबरदस्त फोटो आहे!
मोबाइलवर पाहिला तो नीट कळलाच नव्हता.

हरिहर. on 12 January, 2020 - 23:43>>>>>. अरे काय जबरदस्त फोटो आहे!
मोबाइलवर पाहिला तो नीट कळलाच नव्हता.

आज आमच्या सोसायटीत कावळ्यांनी खूप गलका केला.सो.च्या भिंतीवर २४-२५ कावळे आणि खालीगचादर पसरावी तसे २५-३० कावळे चालत (हो चालतच) होते.वर झाडाची फांदी,कावळ्यांनी काळी झाली होती.पूर्वानुभवावरून कातर घेऊन खाली गेले.सगळीकडे पाहिले,पण कुठे कावळा अडकलेला दिसला नाही.एका विशिष्ट सुरात काव काव चालू होती. मागे आईकडे अशीच काव काव ऐकली होती,काहीवेळाने साप निघाला होता.तसं कदाचित असू शकेलही.जवळजवळ तासभर चालू होते.आता थंड झाले.


.

.

अलिकडेच यूट्यूबवर बर्‍याच सर्पमित्रांनी त्यांच्या साप पकडण्याच्या केसेसचे व्हिडिओज अपलोड केलेत ते पाहिले होते त्याची आठवण झाली

थॅन्क्यू गौरी. मी दर वर्षी हे झाड बहरताना पहातोय पण नाव शोधायचा कधी प्रयत्न केला नाही. spathodia हे नाव गुगल केल्यावर आकाश शेवगा व रुद्र पलाश ही दोन नावे मिळाली.

याला आफ्रिकन ट्युलिप /पिचकारीचं झाडही म्हणतात. याची पेलेदार फुलं विशेषतः पक्ष्यांना आकर्षित करतात.
याला शेंगा धरतात त्यावेळी ओल्या शेंगांमधल्या बिया खायला पोपटांचे थवे त्यावर येतात.
दोन होड्या एकमेकींना जोडल्यासारख्या याच्या शेंगा असतात. त्या सुकून उकलल्या की पंखवाल्या बिया भिरभिरत उडतात.
शेंगांच्या सुकलेल्या होडयाही खाली पडतात.
पिना, कानातले, पेन्सिली वगैरे ठेवायला छोट्या ट्रे सारख्या आम्ही त्या होड्या वापरत असू.

Pages