निसर्गाच्या गप्पा (भाग ३४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 August, 2019 - 06:51

" कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे |
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे |
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर |"

कवयित्री इंदिरा संत यांनी 'सरकते ऋतु आणि त्या सोबत बहरणारा निसर्ग' अचुक पणे दर्शवणारे सुंदर वर्णन केल आहे. आपल्याला देखील काहीस असच वाटत असत ना ? " कोसळणार्या पावसामध्ये तल्लीन होउन चिंब भीजत रहाव, अगदी समाधी घेतल्यावर जी एकाग्रता असते त्या एकाग्रतेने स्नान करावे. मग निथळण्यासाठी सोनेरी शरदाच्या उन्हात उभे रहावे. जणू दवांत भीजलेला प्राजक्त निथळण्यासाठी शरदाचे कोवळी ऊन झेलत आहे. हेमंताचा रेशमी-उबदार शेला अंगावर ओढावा पण वस्त्र मात्र वसंतात बहरणार्या रंगी बिरंगी, सुवासिक फुला-पानांनी गुंफलेले असावे. सोबत ग्रिष्माच्या चकाकी सारखी रंगीत चोळी घालावी. आता या बरोबरच साज म्हणून गर्द विजेची माळ अगदी केवड्या प्रमाने सहज वेणीवर माळुन ऋतु सोहळ्यासाठी सज्ज असावे."
किती सुंदर भाव | अगदी तरल.

"नितळ निळाई आकाशाची अन क्षितिजाची लाली,
दवात भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी.
पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबिल पक्षांची,
झुळझुळ पाणी वेळूमधुनी उडे शिळ वाऱ्याची.
कोठेही जा अवती भवती निसर्ग एकच आहे.
हे जीवन सुंदर आहे."
विधात्याने आपल्याला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे निसर्ग. याने आपले जीवन अधिक सुंदर झाले आहे.काळ, वेळ, ठिकाण,देश,हवामान यानुसार बदलतात ती निसर्गाची रुप. पण खरच जगाच्या पाठीवर कोठेही गेल तरीही निसर्ग एकच आहे. याला ठरावीक सिमारेषा नाही. देश नाही. धर्म, प्रांत, जात-पात काही लागू पडत नाही.
" गोठ्यातील गाई पासुन ते डबक्यातील बेडका पर्यंत, आणि गर्वाने पिसारा फुलवुन नृत्य करणार्या मयुरा पासुन ते भिरभीर करत कुंपण काठीवरती बसणार्या चतूरा पर्यंत, सगळीकडे त्याची किमया आहे. निळसर पांढ-या निसुर्डी पासून ते गोलाकार, जाळीदार थेंबांनी भरुन फुलणार्या दवबिंदू पर्यंत सगळीकडे तोची किमयागार."

पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी,
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी,
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे.
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे.

निसर्गा कडून काय काय घ्यायचे याच कवी ईथे सुंदर वर्णन करतात. चंचलता, कोमलता आणि सुंदरता घेऊन धुंद होऊ पाहताना निसर्ग प्रेमींनी ही गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे की निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण घेतला पाहिजेच, पण त्या बरोबरच पुढील पिढी साठी हा नैसर्गिक ठेवा जतन, संवर्धन आणि संरक्षण करणे हि काळाची गरज आहे तसेच आपली नैतिक जबाबदारी देखील आहे.

मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच कोकण या प्रत्येक विभागाने आपल्याला भरभरून नैसर्गिक विविधता बहाल केली आहे. कास पठारावर असणारे विविध प्रकारचे पक्षी व प्राणी, कामशेत, माळशेज सारखे वैविध्यतेने नटलेले घाट, अलिबाग, दापोली, मुरुड पासून रत्नागिरी पर्यंत पसरलेले समुद्र किनारे आणि त्या लगत असणारे जलदुर्ग, महाबळेश्वर, पाचगणी सारखी थंड हवेची ठिकाणे, बुलढाण्यातील खार्या पाण्याचे लोणार सरोवर, निघोज चे रांजणखळगे, महाराजांच्या काळातील अनेक गड, किल्ले असा भरभरून मिळणारा निसर्ग कोणाला पहायला आवडणार नाही! गर्द झाडी आणि उंचसखल डोंगराळ भाग, हिरवी गार शेत, अवखळ वाहणारी नदी, खळाळून हसणारे झरे, मोजेत वेळू मधून शीळ घालणारा वारा, किलबिलाट करणारे विहंग आणि पाण्यावरील जलतरंग कोणाला पहायला आवडणार नाही! पण आजच्या काळात वेळे अभावी म्हणा किंवा शहरीकरणाचा वाढता वेग म्हणा, अशा काही कारणांमुळे आपल्याला या सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात राहण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. काहीजण फक्त बागेत जाऊन ते सुख अनुभवत असतात तर काहींच्या नशिबी ते ही नाही. अशाच निसर्गप्रेमी मंडळींना जुन्या-नवीन नैसर्गिक सौंदर्याची ओळख आणि देवाणघेवाण पुढे कायम ठेवण्यासाठी हा प्रेमळ धागा चालू आहे.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी सिद्धी या मायबोली आयडीने दिले आहे.)

1564837557-picsay.jpg

(फोटो मायबोली आयडी शाली यांच्याकडून साभार)

आला आषाढ-श्रावण

आल्या पावसाच्या सरी

किती चातकचोचीने

प्यावा वर्षा‌ऋतू तरी!

पावसाळ्यात बा सी मर्ढेकरांच्या ह्या ओळींचे स्मरण होत नसेल असा मनुष्य विरळाच. वर्षाऋतूत तृप्त न्हाऊन निघालेल्या धरणीने आता हिरवाकंच शालू नेसला आहे. सगळीकडे दिसणाऱ्या हिरव्या रंगाच्या नाना छटा आता नेत्रसुखद गारवा देतायेत. आषाढात गर्जत पडणाऱ्या पावसाने सगळीकडे वातावरण कुंद करून सोडले आहे. बळीराजा सुखावला आहे. आता श्रावणाचे दमदार आगमन ... पंचमीपासून सणासुदींना सुरुवात. मनुष्य हा मूळचा निसर्ग पूजक त्यात आपण भारतीयांनी आपल्या सर्व सणसभारंभात निसर्गातील प्रत्येक घटकाला यथोचित सामावून घेतलंय. आपल्या हिंदूसंस्कृतीत निरनिराळ्या पूजा आणि पूजेत वापरल्या जाणा-या पानाफुलांना विशेष महत्व आहे. श्रावणातली सगळी व्रतवैकल्य निसर्गाच्या समीप घेऊन जाणारी, निसर्ग अनुभवायला,जपायला शिकवणारी. या निसर्गाच्या गप्पांच्या ३४ व्या धाग्यावर सर्व नि ग करांचे मनपूर्वक स्वागत. हा निसर्गाच्या गप्पांचा धागा सर्वांसाठी निखळ आनंदी, ताण दूर करणारा, नवनवीन माहिती आणि अनुभवाची देवाणघेवाण करणारा आणि सर्वांगाने बहरणारा ठरो असे निसर्गदेवतेला आवाहन.

(वरील मनोगत नि.ग. प्रेमी ऋतूराज या मायबोली आयडी यांचे आहे)

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२)https://www.maayboli.com/node/63032 (भाग 33)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे, मग आता नको नको रे पावसा असं झालं असेल. थांबुदे लवकर. घरातच रहा, लेकीला पण सांगा. सुरक्षितता तिथेच असेल.

हो ग साधना! ४ दिवस येणार्‍यांना कित्ती मज्जा वाटते.पण जे तिथे कायम रहातात्,त्यांना काय त्रास होत असेल? >>> अगदी अगदी. हे माझे मोठे दीर, शेजारच्या चुलत जाऊबाई नेहेमी सांगतात.

दुरून डोंगर साजरे..... तरी यंदा पाऊस कमी आहे. नाहीतर घरात धुक्याचे ढग घुसणे इथे नेहमीचेच आहे.

आणि राज्य विद्युत मंडळाचा कारभार खूप सुधारलाय. आधी कित्येक दिवस वीज गडपायची. यंदा सलग 3 दिबस नव्हती, तेवढाच त्रास झाला. बाकी दिवसभर जाऊन येऊन राहते पण तरी असते.

नमस्कार निगकर्स! Happy मला रुई आणि मान्दार या दोहोतिल फरक सान्गा. हि दोन्ही कशी ओळखावी ते सांगा.
यापुर्वी या विषयावर चर्चा झाली असेल तर त्याची लिन्क द्या प्लिज! __/\__

साधना ताई वाडीत जाऊन आलीस तर मोती तळ्याचा एक फोटो काढून टाक ईथे. तितकंच डोळ्यांना सुख. आता कधी जायला मिळेल काय माहिती. Sad

आर्या रुईची फुलं जांभळी असतात आणि मांदारची पांढरी. इथे रुई खूप बघायला मिळते, ना सो त प्रचंड होती. श्रीरामपुरला मांदार खूप बघायला मिळाला होता. जांभळी रुई मारुतीला वाहतात. मांदार गणपतीसाठी, मांदार मोठा झाला की त्यात गणपतीचा आकार पण दिसतो पायथ्याशी.

हो अन्जु! हे माहित आहे कि जाम्भळी फुले रुईची आणि पांढरी फुले मान्दारची .
मला झाडांच्या पानांवरुन कसे ओळखायचे ही माहिती हवी होती.
दोन तिन प्रकारच्या जाती दिसतात यात. गोल आणि लांबुळके पान, किंवा जाड आणि पातळ पाने असतात.

मंदार आणि रुई

बरेचदा मंदार आणि रुई ह्या दोन्ही वनस्पतीबाबत संभ्रम निर्माण होतो. काहींच्या मते, या दोन वेगळ्या वनस्पती नसून एकच आहेत, असेही मत दिसून येते. या दोन वनस्पतीबाबतचे फरक व काही लक्षणे नमूद करत आहे.
वनस्पतीशास्त्रीय वर्गीकरणानुसार Calotropis giganteaCalotropis procera अश्या दोन भिन्न वनस्पती मंदार किंवा रुई म्हणून ओळखल्या जातात.
Calotropis ही समान प्रजाती (genus) असून त्यात gigantea (मंदार) व procera (रुई) अश्या दोन भिन्न जाती (species) आहेत.

Calotropis ह्या शब्दाचा अर्थ:
Kalos (Greek) म्हणजे सुंदर
Tropis (Greek) म्हणजे keel (पाकळीवरील बोटीसारखा भाग)
Gigantea म्हणजे giant, भव्य
Procera म्हणजे procerous (Latin) उंच

दोन्ही वानसाच्या जातीवाचक नावाच्या अर्थावरून भव्य, उंच असा अर्थ निघत असल्याने त्यावरून दोन्हीत फारसा फरक नसल्याचे जाणवते. मात्र, यांच्या फुलांत फरक असतो परंतु, तो फार सूक्ष्म असतो.

Calotropis gigantea (मंदार) याची फुले रुई पेक्षा थोडी मोठी असतात. यात निळसर व पांढरी अश्या दोन्ही रंगाची फुले असतात. या फुलाच्या पाकळ्या किंचित मोठ्या असतात. फुलाच्या केसराचे व किंजल्काचे मिळून एक अलंकारिक रचना तयार झालेली असते त्यास शास्त्रीय भाषेत Gynostegium असे म्हणतात.
मंदाराचा हा भाग किंचित उभट/उंच असतो. Gynostegium व पाकळ्यांना जोडून आणखी एक रचना यात दिसून येते त्यास शास्त्रीय भाषेत corona असे म्हणतात.

Calotropis procera (रुई) याची फुले मंदारापेक्षा जरा लहान असतात. रुईचे corona lobes हे gynostegium पेक्षा किंचित उंच असतात तसेच त्यांचा आकारही थोडा भिन्न असतो. तसेच रुईचे gynostegium किंचित बसके/ बुटके असते.

बारीक निरीक्षणावरून व gynostegium च्या रचनेवरून दोन वानसांमधे भेद ओळखता येतो

Identification Key:

Calotropis gigantea : Gynostegium उभट (मोदक)
Calotropis procera : Gynostegium बसके (पेढा)

Screenshot_20210211-135531.jpg

मंदारची फुले पांढरी असतात ना? >>> मीही पांढरीच बघितली आहे.

त्याला मंदार म्हणतात की मांदार कारण आम्ही मांदार म्हणतो. कोणी कोणी पांढरी रुई म्हणते.

ऋतुराज तुम्ही फार छान माहिती दिलीय. वरच्या रंगाचीही मांदारची फुलं असतात हे माहिती नव्हतं.

आपण बरेचदा पांढऱ्या फुलांचा तो मंदार असे म्हणतो,
मी चित्रकूटला मंदार चे वृक्ष पाहिले आहेत ते ही पांढऱ्या फुलाचेच
बरेचदा स्थानिक नावांमुळे संभ्रम निर्माण होतो

त्याला मंदार म्हणतात की मांदार कारण आम्ही मांदार म्हणतो. >>> हो मीही तसेच नाव ऐकलेय.बरं समुद्रमंथनातून मंदार वृक्ष बाहेर काढला त्याचा अर्थ पारिजातही वाचलाय.

समुद्रमंथनातून मंदार वृक्ष बाहेर काढला त्याचा अर्थ पारिजातही वाचलाय.>>>>>ही नवीनच माहिती, पारिजात माहीत होता

गोरखचिंचेला (Baobab) ला पारिजात नाव आहे हे माहीत आहे
ह्याच नामसाधर्म्यमुळे अयोध्येत आपल्या पारिजातकाऐवजी गोरखचिंचेच वृक्षारोपण झालं

लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा हा समुद्र मंथनातून निघालेल्या चौदा रत्नांची नावे असलेला श्लोक. ह्यात मंदार हे नाव नसून पारिजातक हे नाव आहे

देवांनी समुद्राचे मंथन करुन १४ रत्ने काढीली. - लक्ष्मी, कौस्तुभ,पारिजातक,सुरा,धन्वंतरी,चंद्रमा,कामधेनु,ऐरावत,अप्सरा,सप्तमुखी अश्व,विष,हरिधनु,शंख आणि अमृत

मंदार हे नाव नसून पारिजातक हे नाव आहे...... हो का?

माझीच चूक सुधारली गेली.मी इतके दिवस मंदारच समजत होते.
हीरा, धन्यवाद! पण मग मंदारचा अर्थ काय?

सुरेख फोटो.
माझ्या गुलाबाला आलेले गुलाब
Screenshot_20210423-074503_Gallery.jpgScreenshot_20210423-074448_Gallery.jpg
वसंतोत्सव
Screenshot_20210423-074547_Gallery.jpg

खूप खूप छान आहेत गुलाब अस्मिता .. काश्मीरी गुलाब आहे ना हा ?

हा धागा वर बघून खूप छान वाटले

कोणाला या वेलीची ओळख आहे का?
5 पाकळ्यांची हिरव्या रंगाची झुबकेदार फुले असतात.
IMG_20210505_102810.JPG

मी पुस्तका शोधले पण माहिती नाही मिळाली
IMG_20210503_194355.JPG

Thanks Varnita. You are right. Got its name on another group as हरणदोडी or म्हातारीचा वेल Uhoh

Pages