नागरिकत्व सुधारणा विधेयक - हिंदूराष्ट्राकडे वाटचाल?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 December, 2019 - 13:21

नागरिकत्व सुधारणा विधेयक मोदी सरकारने लोकसभेत पास केले आहे आणि लवकरच राज्यसभेत पास करून घेणार आहेत असे समजतेय.

काय आहे हे विधेयक - लोकसत्तामध्ये वाचल्याप्रमाणे

धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये आहे.

या दुरूस्तीचा कोणाला होणार नाही फायदा?

श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.

बाकी
व्हॉटसप फेसबूकवर याबाबत उलटसुलट फॉर्वर्डेड मेसेज आदळत आहेत. भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे असे काहीतरी समजतेय. काहीजण याला संविधानावरचा हल्ला म्हणत आहेत तर काही देशप्रेमी जल्लोष साजरा करत आहेत. याने दहशतवादाचा प्रश्न सुटत असेल तर चांगलेच आहे. पण नक्की हेतू काय आहे आणि काय योग्य अयोग्य हे समजत नाहीये. सर्व ॲंगल जाणून घ्यायला हा चर्चेचा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

गावाबाहेरच्या अस्पृश्यांच्या वस्त्यांना पाणी पण दिले जात नव्हते. अन्न मेलेल्या जनावराचे खावे लागे.
आता डिटेन्शन कँप मधे जनतेच्या पैशाने बेकायदेशीर नागरीकांना दोन वेळचे अन्न, औषधोपचार द्यावे लागणार आहे.

अंदाजे एक करोड लोक बेकायदेशीर आहेत असे म्हटले जाते. एका माणसावर भारताच्या दराने वार्षिक खर्च ५५,००० रूपये होतो. हा जगात सर्वात कमी आहे. तर दरवर्षी ५५ हजार करोड रूपये अन्नपाण्यावर खर्च होईल. याच जोडीला वैद्यकीय सुविधा द्याव्या लागणार आहेत. या कँपमधे शाळा बांधाव्या लागतील. त्यात शिक्षक असतील. ते सर्व सरकारी असेल किंवा सरकारी खर्चाने असेल. हे सर्व खर्च मिळवले तर तीन लाख करोड पर्यंत खर्च जाईल.

कारण या नागरीकांना मूळ देशात परत पाठवण्याची धमक सरकार मधे नाही. त्यांना डिटेन्शन कँपमधेचे ठेवावे लागेल.

जर एव्हढा खर्च सरकार विशापितांवर करू शकत असेल तर गावाबाहेरच्या वस्त्यांना अन्नपाणी सहज देऊ शकते. ते का करत नाही ?

राजसी

भरत किंवा तत्सम लोकं सत्याची बाजू घेवून मत मांडत नाहीत.
त्यांच्या मताचा पायच असत्यावर अवलंबून आहे .
ज्यांची मत सत्य परिस्थिीनुरूप असतात ती मत ठाम असतात आणि ज्यांची तशी नसतात ती सारखी बदलत असतात .

कपिल सिब्बल किंवा बाकी नेत्यांनी लोकसभेत
सांगायला पाहिजे होते.
की मुस्लिम धर्मा मध्ये जातीच्या आधारावर खूप मोठा छळ पाकिस्तान ,बांगलादेश मध्ये होत आहे त्या मुळे जातीवरून छळ झाल्यामुळे जे मुस्लिम ह्या देशातून भारतात आले आहेत त्यांना सुधा नागरिकत्व द्यावे
अमित शाह नी हसत मागणी मान्य केली असती आणि bjp नी फुल पाठिंबा दिला असता.

अंदाजे एक करोड लोक बेकायदेशीर आहेत असे म्हटले जाते. एका माणसावर भारताच्या दराने वार्षिक खर्च ५५,००० रूपये होतो.

Proud

म्हणजे राहुल गांधींचा 72000 चा आकडाही जवळपासच होता,
जिंदाबाद

साधना, धन्यवाद.

जर persecuted मुसलमानांचा इतका कळवळा आहे तर तस्लिमा नसरीन, तारिक फतेह अशा लोकांना जीवे मारण्याची, दंगा करण्याची धमकी का दिली जाते ? तेव्हा हे सगळे पुरोगामी कुठे असतात?

अहमदी ( जनरल बाजवा ) लोकं 1995 नागरिकत्वाचा आधार घेऊन अर्ज करू शकतातच. असे किती religiously persecuted अहमदी आलेत?
चालू दंगा हा अहमदींसाठी नाही तर illegal bangladeshi आणि घुसखोर रोहिंग्यांसाठी सुरू आहे...ह्या रोहिंग्यांना बांगलादेश सुरक्षेच्या दृष्टीने धोका समजतं आणि ओवेसीला कळवळा येतो..sureshot votebank ला धक्का लागणार म्हणून पेटवलय..
आसामच्या मुद्द् 'स्थानिक संस्कृती' , जरा तरी समजू शकतो पण पश्चिम बंगाल मधे इतकी जाळपोळ? का बरं? बांगलादेशात कोण मुसलमान आहेत जे religiously persecuted आहेत? ...

राजसी यांनी नकळत संघ भाजपच्या कार्यक्रमपत्रिकेतलं पुढचं लक्ष्य उघड केलं आहे. काश्मिरी, मुस्लिम यांच्यानंतर कधी ना कधी अनु सूचित जाती, जमाती, ओबीसींचा नंबर लागेल.

प्रत्यक्षात रोजच्या आयुष्यात संघ कार्यकर्त्याला जवळून ओळखणारा कोणीही हे मान्य करणार नाही. लोकांनी खरोखरच एखादा माणूस संघ कार्यकर्ता असेल हे नक्की माहीत असेल तर त्याच्याशी सोशल ओळख करावी, आयुष्य चांगल्यासाठी बदलेल. असो.

या कायद्याला विरोध करणारे सारेच "तथाकथित फुर्रोगामी" , " मुस्लिम लान्गुलचालन वाले", "ओवेसी समर्थक", आणी "पाक चा कळवळा", "सेकुलर" वगैरे नाहीत.
तवलीन सिंग या अगदी मोदींचा उदय होण्यापूर्वी पासून मोदीसमर्थक आहेत. काँग्रेस , गांधी घराणे, आणीबाणी, यू पी ए मधले स्कँम्स यावर त्यांनी अगदी सडकून टीका केली आहे. त्यांना सलमान तासीर नवाचा एक लेखक मुलगाही आहे. त्या मुलाचे वडील पाकिस्तानी खासदार(?) होते. त्यांचा ( वडिलांचा ) खून एका धर्मांध मुस्लिम अंगरक्षकाने केला. तवलीन यांनीही या कायद्या विरुद्ध लिहिले आहे.

पाकिस्तान बद्दल "देशप्रेमी" लोकांना इतके ऑब्सेशन का असते ? अगदी पंप्र ही लोकसभेत "पाकिस्तान की भाषा" वगैरे शब्द वापरतात. हे म्हणजे एखाद्या श्रीमंत व सुंदर मुलीवर एकतर्फी प्रेम करणार्‍या रिक्षावाल्यासारखे झले. काही करून आपण पाकिस्तान सारखे होऊया हाच आदर्श दिसतो.

<< राजसी यांनी नकळत संघ भाजपच्या कार्यक्रमपत्रिकेतलं पुढचं लक्ष्य उघड केलं आहे. काश्मिरी, मुस्लिम यांच्यानंतर कधी ना कधी अनु सूचित जाती, जमाती, ओबीसींचा नंबर लागेल. >>
------- सहमत....
आज लढा मुस्लीम, ख्रिश्चन यांच्या विरुद्ध आहे. त्यांना निपटून झाल्यावर आपल्या धर्मातल्या लोकांना शिस्त लावायची...
महात्माजींचा खून करण्याचे कारणच ते होते... त्यांनी बहुजनांना अधिकार बहाल करण्याचा मोठ्ठा गुन्हा केला होता.

<< प्रत्यक्षात रोजच्या आयुष्यात संघ कार्यकर्त्याला जवळून ओळखणारा कोणीही हे मान्य करणार नाही. लोकांनी खरोखरच एखादा माणूस संघ कार्यकर्ता असेल हे नक्की माहीत असेल तर त्याच्याशी सोशल ओळख करावी, आयुष्य चांगल्यासाठी बदलेल. असो. >>
----- मोदी , कोविंद, मध्य रात्री राष्ट्रपती राजवट उठवणारे आणि भल्या पहाटे शपथ देणारे राज्यपाल... आणि अशी अनेक उदाहरणे आहेत.
ताक काय पाणी पिताना पण सावध रहा... सबका साथ और ( केवल ) अपणोंका (ही) विकास....

अनेक लोकांना अगदी जवळून बघितले आहे... जे दाखवत आहे तसे तर नक्कीच नाही....

एका धर्माचा (मुसलमानांचा) निव्वळ द्वेष हाच यांच्या विचारांचा भक्कम पाया आहे. लोकांनाही (सॉरी EVM) हेच हवे आहे Happy

<< काही करून आपण पाकिस्तान सारखे होऊया हाच आदर्श दिसतो. >>
----- त्यांचा टोकाचा द्वेष करता करता.... आपण त्यांचे अनुकरण करायला लागलो आहोत.

विचार पटले नाही... मारुन टाकायचे. गौरी लंकेश, कुलबर्गी, दाभोलकर...
विचार पटले नाहीत.... देशद्रोह्याचे लेबल लावायचे.

>>> पाकिस्तान बद्दल "देशप्रेमी" लोकांना इतके ऑब्सेशन का असते ? >>>

कारण पाकिस्तान भारताचा शत्रू आहे.

पण पाकिस्तानबद्दल फुरोगाम्यांना एवढे प्रेम का असते?

>>> त्यांचा टोकाचा द्वेष करता करता.... आपण त्यांचे अनुकरण करायला लागलो आहोत.

विचार पटले नाही... मारुन टाकायचे. गौरी लंकेश, कुलबर्गी, दाभोलकर... >>>

गौरी लंकेश, कुलबर्गी हिंदू धर्मियांचा टोकाचा द्वेष करायचे.

एक कथा वाचली होती.

एका विहरित बेडकांची वसाहत असते .
त्यातील एका बेडकाला बाकी बेडकं त्रास देत असतात तेव्हा सूड घेण्यासाठी तो सापाशी मैत्री करतो आणि त्या सापाला ती बेडकाची वसाहत दाखवण्याचे मान्य करून त्याच्या शी दोस्ती करतो.
एक एक करून सर्व बेडकं साप संपवून टाकतो शेवटी त्याचा मित्र असलेला एकच बेडूक राहतो .
सापाला भूक लागते सर्व बेडूक संपलेले असतात तेव्हा तो साप मित्र असलेल्या बेडकाला सुधा मारून खातो.
ह्याचे moral एकच आहे आपल्याच लोकांचा नाश करण्यासाठी बाहेरच्या लोकांची मदत घेवू नका नाही तर विनाश अटळ आहे

माझ्या व्याख्येत बसणारा बहुजन समाज bjp चा पाठीराखा आहे म्हणूनच स्पष्ट बहुमत आहे bjp ला केंद्रात.
आणि तो समाज asya चुकीच्या प्रचाराला बळी पडत नाही हे तर दुखणे आहे .
महाराष्ट्र निवडणूक आणि बहुजन कैवारी पक्ष हा पुरावा

>>> ह्याचे moral एकच आहे आपल्याच लोकांचा नाश करण्यासाठी बाहेरच्या लोकांची मदत घेवू नका नाही तर विनाश अटळ आहे >>>

देशद्रोही कॉंग्रेसी मोदींना हटविण्यासाठी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानची मदत मागतात.

एक कथा वाचली होती.

बेडुक शहाणा झाला अन त्याने महाराष्ट्रात अजगराशी युती तोडली,

अजगर आजही ओरडत असते, मी पुन्हा गिळीन

unnamed_0.png

एका धर्माचा (मुसलमानांचा) निव्वळ द्वेष हाच यांच्या विचारांचा भक्कम पाया आहे.

देशात सर्वात चांगली आर्थिक स्थिती मुस्लिम समाजाची गुजरात मध्येच आहे .
द्वेष करत असते तर असे घडले नसत.
जे पक्ष मुस्लिम प्रेमाचे खोटे नाटक करतात त्या up आणि बंगाल मध्ये मुस्लिम समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती काय आहे ते तपासा आणि त्याची तुलना गुजरात शी करा .
तेव्हा नाटकी प्रेम कोणाचं आहे आणि खरे प्रेम कोणाचं आहे ते माहीत पडेल

वर सलमान तासिर यांचा संदर्भ आला आहे....
Was he persecuted on the faith basis? Till he was alive wasn't he governor of Punjab?
भारताबद्दल अतिशय कडवी मतं असणारा माणूस होता

आणि हे persecuted गैरमुसलमान कोण आहेत बरं ?
बहुसंख्य वाल्मिकी समाजाचे आहेत..एरवी जिथं तिथं सामाजिक न्याय आणि तथाकथित उच्चभ्रू वर्गाला आरोपीच्या पिंजर्यात उभं करणारे या उपेक्षित समाजाला सामावून घ्यायला का बरं नाहीत तयार?

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर ज्यांची हक्काची मतपेढी आहे ते हिंसाचार करताहेत आणि करवताहेत...

In the average years of secondary schooling between ages of 7-16, Gujarat once again is ahead with 4.29 % of national average 3.26 %
In villages with over 2000 Muslim population access to education is 100 per cent with national average at 98.7 %
In the population range of 1000 to 2000, 99.9 % villages have education facilities as against national average of 95.4 %
As for the villages which have a population of less than a 1000, 98.6 % of the villages have education facility as against national average of 80.4
<

मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात येवू न देता नेहमी त्यांना मुख्य प्रवाह पासून लांब नेले ते पक्ष मुस्लिम समाजाचे खरे दुश्मन आहेत.
आणि मुस्लिम समाजाच्या प्रगती आड तेच आहेत.
Bjp नी नेहमी मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्ासाठी प्रयत्न केले आणि हे खोटे प्रेम दाखवणाऱ्या लोकांनी नेहमी त्यांना वेगळे अस्तित्व देण्याचा प्रयत्न करून मुख्य धारे पासून वंचित केले.
बहुतेक मुस्लिम लोकांना हे आता समजू लागले आहे

पाकिस्तान हा देशाचा शत्रू आहे.
फक्त मोदींना तिकडे साड्या पाठवणे, विमानातून हवाई छत्रीतून उडी मारून पाकच्या देशद्रोही वजीर ए आझम च्या वाढदिवसाचा केक कापणे असे उद्योग करायला परवानगी आहे. बांग्ला देशात जाऊन मोहब्बते, प्यार वगैरे उधळायला परवानगी आहे. त्या आधी वाजपेयींना परवानगी असायची. हे विरोधात असले की सत्तेत असलेला सरकार पक्ष देशद्रोही असतो. पण सरकारी पक्ष विरोधात गेला आणि विरोधी पक्ष सत्तेत आला की पुन्हा सत्तेतला विरोधी पक्ष देशप्रेमी होतो. मग तो पुन्हा पाकिस्तानात जातो. त्यांचा वझीर ए आझम इकडे सहकुटुंब येतो, आग्र्याला ताजमहाल ला जातो. चीन या शत्रूराष्ट्राचा अध्यक्ष गुजरातेत जाऊन झुल्यावर झुलतो...

ही समीकरणं आता
a−[a+(n−1)d]rn/1−r+dr(1−(rn)/r)/(1−r)2
यात टाकून पाहणार आहे.

>>> नवीन Submitted by पुरोगामी गाढव on 14 December, 2019 - 23:28 >>>

परराष्ट्र संबंध, परराष्ट्र धोरण, पंतप्रधानांनी एखाद्या देशाला भेट देणे हे कशासाठी असतं हे समजणं तुमच्यासारख्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे आमचा पास!

जातीसाठी काही मागणी करायचे असेल काँग्रेस म्हणते मी तुमच्या बरोबर आहे.
पण हिंदू म्हणून काही मागणी केली की तीच काँग्रेस म्हणते तू संप्रयादयिक आहेस..
ह्या वरूनच समजा ह्यांची नियत काय आहे ते

हायफनेशन : भारत व पाकिस्तान हे बरोबरीचे देश नाहीत. भारत हा अमेरिका, रशिया चीन वगैरे च्या पंगतीला बसणरा प्रगल्भ व समर्थ देश आहे, पाकिस्तान एका धर्मावर आधारित अगदीच लिंबुटिंबु व कुरापत खोर देश आहे. असे चित्र जागतीक पातळीवर रंगवणे हे भारतीय डिप्लोमॅसी चे ध्येय होते व ते बर्‍यापैकी साध्यही झले होते. या संकल्पनेला भारतीय आय एफ एस लोक नो हाय्फनेशन पॉलिसी म्हणत. त्यामुळे भारत-पाक हा शब्द वा कल्पना वापरणे टाळले जाई. कारण या प्रयोगातून दोन बरोबरीचे देश असा चुकीच संदेश जातो ( शाहरुक - तुषार कपूर यांची अभिनय जुगलबंदी अशी एकाद्या सिनेमाची जाहिरात करत नाहीत) भारतीय डिप्लोमॅसी चे हे एक यश होते. शहा मोदी दुकलीने त्यावर पाणी पाडले व भारत हाही एक पाकिस्तान शी बरोबरी करू पहाणारा देश असे चित्र झाले. शेखर गुप्ता या नी छान लेख लिहिला आहे.

Pages