नागरिकत्व सुधारणा विधेयक - हिंदूराष्ट्राकडे वाटचाल?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 December, 2019 - 13:21

नागरिकत्व सुधारणा विधेयक मोदी सरकारने लोकसभेत पास केले आहे आणि लवकरच राज्यसभेत पास करून घेणार आहेत असे समजतेय.

काय आहे हे विधेयक - लोकसत्तामध्ये वाचल्याप्रमाणे

धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये आहे.

या दुरूस्तीचा कोणाला होणार नाही फायदा?

श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.

बाकी
व्हॉटसप फेसबूकवर याबाबत उलटसुलट फॉर्वर्डेड मेसेज आदळत आहेत. भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे असे काहीतरी समजतेय. काहीजण याला संविधानावरचा हल्ला म्हणत आहेत तर काही देशप्रेमी जल्लोष साजरा करत आहेत. याने दहशतवादाचा प्रश्न सुटत असेल तर चांगलेच आहे. पण नक्की हेतू काय आहे आणि काय योग्य अयोग्य हे समजत नाहीये. सर्व ॲंगल जाणून घ्यायला हा चर्चेचा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

अर्थात गाद्यागिरद्यांवर लोळत, लोडतक्के उशाला घेऊन पंख्याच्या वाऱ्याखाली राजवाड्यात स्थानबद्धता उपभोगणाऱ्या ब्रिटिश हस्तकांना यामागील भूमिका समजणे अशक्य आहे. <><<<<<

सहमत !!

तू पण घरातला फ़ेन काढून टाक,

प्रेयसीच्या केसातून बोटे फिरवण्यापेक्षा बंदुकीत बोट घाला , असे तुमचे गुरू बोलले होते,
बंदुक विकत घेतली की नाही अजून ?

आणि त्यांच्याकडे बंदुक होती का ? की नुसतेच तरुण बिन लग्नाच्या पोरांना बंदुक देत होते ?

भारत बचाओ आंदोलन सुरू झाले आहे. त्यात सहभाग नोंदवण्यासाठी ना देशाचे पंप्रप्रधान आले, ना गृहमंत्री आले , ना भाजप सरकार मधील कुणी जबाबदार मंत्री आले ना पक्षाकडून कुणी आले. भारत बचाओ सारख्या आंदोलनात यांना का सह्भागी व्हावेसे वाटत नसावे ? या आधीही १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात संघ सहभागी झालेला नव्हता. म्हणजेच देशाच्या दृष्टीने हिताच्या आंदोलनात हे कधीही सहभागी होत नाहीत. भारत देश वाचवण्यासाठी आपण काही लागतो हे ज्यांना वाटत नाही ते स्वतःला देशप्रेमी म्हणवून घेतात हे विडंबन अन्य कोणत्याही दुर्भागी देशाच्या वाटेला आले नसावे.

किमान गब्बर स्वतःपासून वाचवण्यासाठी टॅक्स घेऊन प्रोटेक्शन तरी देत होता.

महाराष्ट्राचे वेगळे प्रश्न आहेत वेगळ्या समस्या आहेत.
कॅब ही काय महाराष्ट्राची समस्या नाही ना ..
ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत मग त्यात बंगाल,up आसाम त्या राज्यांत निदर्शने होत त्यात त्या राज्यांचे हितसंबंध आहेत.
आपण कॅब वर डोकभोड करायची गरज नाही ..
आणि मराठी वेबसाईट वर ह्या वर चर्चा करायची सुद्धा गरज नाही ..
ज्यांना जास्तच हौस आहे त्यांनी बंगाल, आसाम मध्ये जावून सहभागी होणे

सर्व राज्य पाहिले राज्य हित आणि नंतर देश हित बघतात आपणच रिकामटेकडे आहोत राज्यात असलेल्या समस्या न सोडवता लष्कराच्या भाकऱ्या भाजत आहोत

>>> भारत बचाओ आंदोलन सुरू झाले आहे. >>>

ते भारत बचाओ आंदोलन नसून गांधी कुटुंब बचाओ आंदोलन आहे. त्यामुळेच त्यात गांधी कुटुंबाचे घरगडी सामील झाले आहेत.

अरेरे ! भारत देशाचा उल्लेख गांधी कुटूंब असा करणा-यांची काय मानसिकता असावी ? त्यामुळेच या सरकारच्या कारभारात देशाबद्द्लचे प्रेम दिसून आलेले नाही. त्यांना बहुतेक हा देश म्हणजे गांधी कुटुंब वाटत असावे. अरे बाळांनो, भारत देश म्हणजे महात्मा गांधींनी ब्रिटीशांकडून हिसकावून घेतलेला भूभाग एव्हढेच नाही. मोठे व्हा कधीतरी !

जो हिंसाचार चालू आहे आणि जितक्या प्रमाणात चालू आहे त्यावरून CAB आणि NRC किती जरूरीचं आहे हेच सिद्ध होतय.
शुक्रवार च्या प्रार्थनेनंतर अगदी 6-7 वर्षाची मुलांचे दगडफेकीचे video झळकताहेत सगळीकडे.

आणि CAB मधे हिंदूंबरोबर जैन, बौद्ध, शिख, ख्रिश्चन, पारशी हे खरे 'अल्पसंख्य' सुद्धा सामिल आहेत ..
त्यामुळे शेखर गुप्तांचा लेखात जी 'moral superiority आता राहिली नाही जगात ' भीती रंगवली आहे ती फारच ओढून ताणून आहे ....ऊगाचच

आणि हे हिंदू कोण.बरं ? तर बहुसंख्य वाल्मिकी समाजाचे..., अत्यंत हलाखीत / भीतीच्या वाथावरणात राहिलेला समाज. एरवी जिथे तिथे जात बघणारे शेखर गुप्ता आणि रविश कुमारांच्या नजरेतून कसं काय सुटलं हे?

बंगाली भाषा असलेल्या हिंदू सर्वात जास्त फायदा ह्या कायद्याने होणार आहे.
आणि बंगाल मध्ये जाळपोळ चालू केली आहे ममता दीदी नी bjp chya जागा नक्कीच बंगाल मध्ये वाढणार.
मराठी मुस्लिम ना ह्या कायद्यांनी काही धोका नाही त्यांच्या जीवनावर काही फरक पडणार नाही त्या मुळे त्यांना भडकावता येणार नाही
हे माहीत असल्या मुळे काँग्रेस नी साधं मोर्चा पण नाही काढला.
गुजरात मध्ये तीच अवस्था महारष्ट्र सारखी .
आणि महत्वाचे bjp चे रेकॉर्ड आहे जेव्हा तिने देश हिताचे निर्णय घेतले आहेत तेव्हा निदर्शनं आणि टीकेला घाबरून कधीच परत घेतले नाहीत..त्या मुळे ह्या आंदोलने मुळे कॅब परत घेतले जाणार नाही .
आणि ह्याचा राजकीय फायदा सुधा विरोध करणाऱ्यांना होणार नाही .
सर्वसामान्य मुस्लिम लोकांचा सुधा ह्या विधेयकाला विरोध नाही .
उलट जेवढा जास्त विरोध आणि जेवढी जहरी टीका तेवढे bjp चे पाठीराखे वाढतील

https://m.maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/payal-ro...

मुंबई- मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीला राजस्थान पोलिसांनी अहमदाबाद येथून आज सकाळी अटक केली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात पायलने आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर पोलिसांनी रविवारी सकाळी तिला अटक केली. स्वतः पायने तिला अटक केल्याचं ट्वीट करून सांगितलं.

आमचे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य, इतरांचे ते भुंकणे!

सोडून द्या. ते तुमच्या आवाक्याबाहेर आहे.

वेळोवेळी अधोरेखीत होत आहे !!

>>>>>>अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने मनगटाला चुना लावून ठो ठो बोंबलणारे बोंबले आता गप्प का?<<<<<<

भर्त आता मुग गीळुन गप्प !!!

फुरोगामीच सिलेक्टीव्ह व्हीवळण !!!

मोठ्या वैचारीक पोष्टी टाकण्याचा आव आणणार्याला हे माहीतीच नाही की
भारत बचाओ आंदोलन काँंग्रेसनेच सुरू केले.
ज्या भारताचा सत्यानाश काँंग्रेसनेच केला त्या भारताचा बचाओ आंदोलन काँंग्रेसच सुरू करते ह्या पेक्षा कोडगे पणा काय असेल ?
चाटुकार मात्र पेटुन उठले !!

Biggrin

सत्यानाश ?
मग सगळा विकास 2014 नन्तर झाला का?

CAB काय आणल , भारतातल्या सगळ्या मुस्लिम विद्यापीठातुन आंदोलन सुरु झालेली आहेत. देशद्रोह्यांच्या मुळावर झाव पडल्याने साप बीळाबाहेर येत आहेत.
चांगलच आहे. ही बांडगुळ आपले खरे रुप दाखवत आहेत !!

पायल रोहटगीं savarakared.
https://scroll.in/video/946391/watch-reality-tv-star-payal-rohatgi-issue...

“I am arrested by Rajasthan Police for making a video on Motilal Nehru which I made from taking information from Google,”
बीबीसी न्यूज हबवर मिळालेली माहिती वाचली होती का भक्तांच्या पोस्टरगर्लने?

सरकारने बांग्लादेशमधून होणार्‍या स्थलांतराबद्दल स्पष्टीकरण दिलंय - बांग्लादेशमधल्या बहुतेक अल्पसंख्यांकांनी स्थलांतर केलं आहे. त्यांच्यावरच्या अत्याचाराचं प्रमाणही कमी होत आलं आहे. यामुळे धार्मिक छळाच्या कारणाने तिथून मोठ्या संख्येने स्थलांतर होण्याची शक्यता फार कमी आहे. तसंच यासाठी ३१.१२.२०१४ ची मर्यादा घातली आहे.

( म्हणजे जे आलेत त्यांच्यासाठीच ही सुधारणा आहे.
शिवाय या बदलामुळे या अल्पसंख्यांकाना आपोआप नागरिकत्व मिळणार नाही. फक्त त्यां ना नागरिकत्व मिळण्याची सुविधा सुलभ होईल.

आता सांगा, या तीन देशांतल्या धार्मिक अल्पसंख्यांकांसाठी आम्ही फार काही केलेलं नाही, असं सरकार (आसामींना चुचकारण्यासाठी) म्हणतंय, तर नक्की या बदलाचा उद्देश काय?

आसामी लोकांची (स्थानिक उपरे नाही)नाराजी समजू शकतो त्यांचा विरोध न्याय आहे आणि सामान्य लोक विरोध करत आहेत .
ह्या व्यतिरिक्त जे हिंसक होत आहे ते भाडेकरू गुंड असण्याची शक्यता आहे ..पुरोगामी विचाराचे,आणि काँग्रेस ह्यांनी हिंसाचार माजवण्या साठी सुपारी दिली असली पाहिजे

दिल्ली मध्ये आंदोलन करणारे स्टूडेंट वाटत नाहीत सराईत भाडेकरू गुंड वाटत आहेत.
Delhi मधील सामान्य लोकांच्या सुरक्षे साठी सरकारने आता कडक झाले पाहिजे दिसता क्षणी गोळी मारण्याचे आदेश सुरक्षा दलाला दिले पाहिजे सामान्य जनता सरकारच्या पाठी आहे

दिल्ली देशाची राजधानी आहे आणि इथे हिंसक आंदोलन करणाऱ्या गुंडांना दयामाया दाखवायची बिलकुल गरज नाही .

गृह मंत्री तुमच्या कडून असल्या आंदोलनाच्या नावावर राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणाऱ्या आणि सामान्य जनतेला भयभीत करणाऱ्या गुंडांना धडा शिकवण्याची अपेक्षा सामान्य लोक व्यक्त करत आहेत

Pages