नागरिकत्व सुधारणा विधेयक मोदी सरकारने लोकसभेत पास केले आहे आणि लवकरच राज्यसभेत पास करून घेणार आहेत असे समजतेय.
काय आहे हे विधेयक - लोकसत्तामध्ये वाचल्याप्रमाणे
धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये आहे.
या दुरूस्तीचा कोणाला होणार नाही फायदा?
श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.
बाकी
व्हॉटसप फेसबूकवर याबाबत उलटसुलट फॉर्वर्डेड मेसेज आदळत आहेत. भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे असे काहीतरी समजतेय. काहीजण याला संविधानावरचा हल्ला म्हणत आहेत तर काही देशप्रेमी जल्लोष साजरा करत आहेत. याने दहशतवादाचा प्रश्न सुटत असेल तर चांगलेच आहे. पण नक्की हेतू काय आहे आणि काय योग्य अयोग्य हे समजत नाहीये. सर्व ॲंगल जाणून घ्यायला हा चर्चेचा धागा.
गाढव,
गाढव,
मग कधी सोडताय असुरक्षित देश !!
धर्माधारीत देशाची फाळणी होऊ
धर्माधारीत देशाची फाळणी होऊ देणार्यांना राष्ट्रपिता, चाचा वैगेरे बनवले.
फाळणीच्या वेळेला पाकीस्तानात जे हिंदु राहीले ते मागे राहीलेले लोक होते, जो तो स्वःताचा व कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी पाकीस्तानातुन पलायन करुन भारतात आला.
त्यावेळेला भारतात आलेल्या लाखो
सींधी लोकांची रेफ्युजी काॅलनी आजही उल्हासनगरला आहे. काँग्रेसच्या एका निर्णयामुळे ह्या सींधी लोकांची जिंदगी बदलली पण त्यामुळे भारतात आलेल्या
लोकांना रेफ्युजी म्हणुन म्हणायला कोणाला लाजा वाटल्या नाहीत.
भारत हा अमेरिका, रशिया चीन
भारत हा अमेरिका, रशिया चीन वगैरे च्या पंगतीला बसणरा प्रगल्भ
ह्या मधील एक देश चीन त्यांच्या देशातील मुस्लिम लोकांशी कसा वागतोय हे जगाला माहित आहे पण त्यांच्या देशाच्या सुरक्षतेसाठी ते योग्य आहे.
मुस्लिम समदुया ला वेगळी वागणूक देतो म्हणून चीन च पत जगात कधी कमी झाली.
वरच्याच लिस्ट मधला अमेरिका त्यांच्या देशाच्या सुरक्षते साठी देशात प्रवेश करणाऱ्या
मुस्लिम व्यक्तींना कपडे काढून चेक करतो तसे करणे गरजेचं आहे त्या मुळे अमेरिकेची पत नाही जगात कमी झाली .
आणि एका योग्य कायद्याने भारताची पत जगात कमी झाली .
मला वाटतं वाढली भारत आता खंभिर झाला असा संदेश जगात गेला
भंपक प्रतिसाद
.
ज्यांनी देश असुरक्षित केला
ज्यांनी देश असुरक्षित केला त्यांना हाकलू.. हम नही छोडते देश ! चाहे जान चली जाये.
कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे यांनी पण जीव दिला, देश नाही सोडला.
नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि
नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि एन आर सी हे एकत्रच पाहिले पाहिजेत.
The government will introduce and pass the Citizenship Amendment Bill (CAB) before compiling a National Registry of Citizens (NRC) - home minister Amit Shah
आसाममध्ये एन आर सी राबवलं, त्याने कोणाचंच समाधान झालं नाही. त्यातल्या त्रुटी समोर आल्या. भारतीय सैन्यात हयात घालवलेल्या माणसाला डिटेन्शन कँपमध्ये जावं लागलं. एन आर सी तून बाहेर राहिलेल्यालते अधिकत हिंदू असल्याने नागरिकत्व सुधारणा विधेयक आणलं.
अंतिम उद्देश अर्थातच भारतीय मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवणे हा आहे.
आता देशभरात एन आर सी लागू होईल तेव्हा असंख्य लोकांना आपल्या नागरिकत्वाचे समाधानकारक पुरावे देता येणार नाहीत. त्यात सगळ्याच धर्माचे लोक असतील. त्यात मुस्लिमेतरांना सूट मिळेल. मुसलमानांचं ना गरिकत्व काढून घेतलं जाईल.
मुस्लिमेतरांना रेफ्युजी म्हणायचं आणि मुस्लिमांना घुसखोर म्हणायचं , त्यासाठी धर्माधारित छळ हा आधार घ्यायचा हा प्लान आहे.
एक धर्म, एक भाषा, एक आहारपद्धती, एक विचार अशी सगळी एकसाची फौज (डोक्याचा वापर न करणारी) बनवायची.
>>> शहा मोदी दुकलीने त्यावर
>>> शहा मोदी दुकलीने त्यावर पाणी पाडले व भारत हाही एक पाकिस्तान शी बरोबरी करू पहाणारा देश असे चित्र झाले. >>>
असे कोणतेही चित्र तयार झालेले नाही. भारत व पाकिस्तान बरोबरीचे देश आहेत असे फक्त पाकिस्तानप्रेमी पुरोगाम्यांनाच वाटतं. परंतु वस्तुस्थिती पूर्ण वेगळी आहे.
> भारतीय सैन्यात हयात
> भारतीय सैन्यात हयात घालवलेल्या माणसाला डिटेन्शन कँपमध्ये जावं लागलं.
हे तर काहीच नाही. ५९ वर्षाच्या एका मधुबाला नावाच्या महिलेला तीन वर्षे डिटेन्शन मध्ये ठेवलं. तिला आता धड चालता येत नाही.
गंंमत म्हणजे मुळात ज्या मधुबालेच्या शोधात पोलिस गेले होते ती कधीच मेली होती. नगाला नग म्हणून हिला उचलले कारण नाव तेच आहे. मग काय फरक पडतो ?
https://www.outlookindia.com/magazine/story/india-news-foreigner-madhuba...
कायदा तर बनला. पाकिस्तानातून
कायदा तर बनला. पाकिस्तानातून येऊन सेटल झालेल्या दिलीपकुमार यांना आता डिटेन्शन कँपमधे हलवणार का ?
मोहम्मद रफी यांचे मूळ पण पाकिस्तानातच आहे. ते पाकिस्तानातून येऊन भारतात यशस्वी झाले. त्यांचे कुटुंब आजही भारतातच राहते. त्यांचीही पाठवणी करणार का ? हे तर बांग्लादेशी नाहीत. शत्रूराष्ट्रातून आले आहेत.
ईशान्य भारत पेटलेला आहे.
ईशान्य भारत पेटलेला आहे. बंगाल मध्ये मोर्चे निदर्शने चालू आहेत. देशाच्या सगळ्याच भागांत या कायद्याच्या विरोधात लोक, विद्यार्थी रस्त्यांवर उतरत आहेत. बऱ्याच ठिकाणी इंटरनेट बंद केले जात आहे. आजवर भारतात घडलेल्या घटना इंडियाच्या मिडियात दाखविले जाण्याचे प्रमाण अल्प होते मात्र आता तर इंडियात होणाऱ्या घटना देखील दडपून टाकल्या जात आहेत. आखिर कुछ तो कारण होगा ही, ग्रेट कॉज जो हैं
>>>> हे तर काहीच नाही. ५९
>>>> हे तर काहीच नाही. ५९ वर्षाच्या एका मधुबाला नावाच्या महिलेला तीन वर्षे डिटेन्शन मध्ये ठेवलं. तिला आता धड चालता येत नाही. >>>
हे तर काहीच नाही. प्रज्ञा नावाच्या एका महिलेला २००८ मध्ये विनाकारण पकडून विना आरोपपत्र, विना जामीन ९ वर्षे तुरूंगात डांबून तिचा प्रचंड छळ केला. तिचे वडील गेल्यानंतर तिला त्यांच्या अंतिम दर्शनासाठी सुद्धा तासभर सोडले नाही. न केलेल्या गुन्ह्याचा तिने कबुलीजबाब द्यावा यासाठी तिच्यावर ९ वर्षे अत्याचार करण्यात आले. शेवटी तिचे पाय गेले. आता तिला चाकांच्या खुर्चीतून हिंडावे लागते.
विना आरोपपत्र, विना जामीन ,
विना आरोपपत्र, विना जामीन , छळ या थापा आहेत. मायबोलीवर याबद्दल पुरेसं लिहिलं गेलं आहे.
मध्ये या बाई नाचताना दिसल्या होत्या.
जगाच्या पाठीवरची नायिका मध्येच आंधळी, मध्येच डोळस असते, त्यातली गत असावी.
>>> विना आरोपपत्र, विना जामीन
>>> विना आरोपपत्र, विना जामीन , छळ या थापा आहेत. मायबोलीवर याबद्दल पुरेसं लिहिलं गेलं आहे. >>>
माबोवरील कॉंग्रेसी चाटु वेगळं काय लिहिणार?
हेमंत करकरे हे सुद्धा
हेमंत करकरे हे सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला मानत होते. मात्र नोकरीशी ते अत्यंत प्रामाणिक होते.
तिला मोदी भाजपाने संरक्षण
तिला मोदी भाजपाने संरक्षण समितीत घेतले म्हणे,
पण तोंडातून गोडसेगुणचा भोपाळ गैस सोडल्याने दोनच दिवसात हाकलून काढले ,
त्या समितीत पवार आजही आहेत म्हणे,
भोपाळवाले तिला बहुतेक पुढच्या निवडणुकीत घालवतील
<< धर्माधारीत देशाची फाळणी
<< धर्माधारीत देशाची फाळणी होऊ देणार्यांना राष्ट्रपिता, चाचा वैगेरे बनवले.
फाळणीच्या वेळेला पाकीस्तानात जे हिंदु राहीले ते मागे राहीलेले लोक होते, जो तो स्वःताचा व कुटुंबाचा जीव वाचवण्यासाठी पाकीस्तानातुन पलायन करुन भारतात आला.
त्यावेळेला भारतात आलेल्या लाखो
सींधी लोकांची रेफ्युजी काॅलनी आजही उल्हासनगरला आहे. काँग्रेसच्या एका निर्णयामुळे ह्या सींधी लोकांची जिंदगी बदलली पण त्यामुळे भारतात आलेल्या
लोकांना रेफ्युजी म्हणुन म्हणायला कोणाला लाजा वाटल्या नाहीत.>>
------ धर्माच्या किंवा अन्य कुठल्याही आधारावर देशाची फाळणी होण्यास गांधीजी यांचा कठोर विरोध होता... अगदी अपरिहार्यता म्हणून काँग्रेसने ( नेहरु, पटेल) फाळणीचा स्विकार केला होता, काँग्रेसचा निर्णय झाला होता, आणि महात्मा गांधी यांना तो स्विकारण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता.
जिना यांनी पाकसाठी मुस्लीम राष्ट् मागितले आणि भारत हा सर्व धर्मासाठी मग त्यामधे बहुसंख्य हिंदू , तसेच मुस्लीम आणि इतर अनेक धर्म आले. धर्माच्या आधारावर फाळणी झाली असे पाक म्हणते... आणि अगदी तसेच नवदेशभक्त म्हणतात. यालाच वैचारिक-साम्य म्हणतात.
<< धर्माधारीत देशाची फाळणी होऊ देणार्यांना राष्ट्रपिता, चाचा वैगेरे बनवले.>>
-------- द्विराष्ट्रवादाचा पुरस्कार सावरकर यांनी केला होता ज्यांना स्वातंत्रवीर बनवले. (पुढे १९४७ मधे वेगळ्या मुस्लीम पाकला होण्याला विरोध केला आणि अखंड भारताचा ध्यास घेतला... कुठे जाणार होते एव्हढे मुस्लीम ?)
सावरकर जून १९११ मधे अंदमानच्या तुरुंगात गेले. गेल्याबरोबर लागलीच दोन महिन्यात, 30 ऑगस्ट 1911, पहिली दया याचिका सादर केली. दुसरी दया याचिका १४ नोव्हेंबर १९१३ ला... ३ ऑक्टोबर १९१४.... पुढे १९१७...
शेवटची प्रसिद्ध अशी दया याचिका... ३० मार्च १९२०
१९१३ च्या माफी पत्रातला मजकूर.
"The Mighty alone can afford to be merciful and therefore where else can the prodigal son return but to the parental doors of the Government? Hoping your Honour will kindly take into notion these points."
१९२० च्या प्रसिद्ध माफी पत्रातला मजकूर.
"I am sincere in expressing my earnest intention of treading the constitutional path and trying my humble best to render the hands of the British dominion a bond of love and respect and of mutual help. Such an Empire, as is foreshadowed in the Proclamation, wins my hearty adherence. For verily I hate no race or creed or people simply because they are not Indians!"
या सर्व दया याचिका (माफी नामे) अभ्यासण्यासारख्या आहेत... कुठेही वीर असण्याचा अभिनिवेश नाही.
>>> या सर्व दया याचिका (माफी
>>> या सर्व दया याचिका (माफी नामे) अभ्यासण्यासारख्या आहेत... कुठेही वीर असण्याचा अभिनिवेश नाही. >>>
शहाजीराजेंना आदिलशहाच्या तुरूंगातून सोडविण्यासाठी शिवाजी महाराजांनी अत्यंत नम्रपणे शहाजहानला पत्र लिहून त्याच्या सैन्यात सामील होण्याची विनंती केली होती. शहाजीराजेंना आदिलशहाने तुरूंगातून सोडल्यानंतर शिवाजी महाराजांनी लगेच शहाजहानला धुडकावून लावले.
अंदमानात ५० वर्षे खितपत पडण्याऐवजी येथून काहीही करून सुटावे व सुटल्यानंतर भारताबाहेर जाऊन स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करावेत या उद्देशाने सावरकरांनी ते पत्र लिहिले होते. परंतु इंग्रज शहाजहानसारखे मूर्ख नसल्याने त्यांनी सावरकरांना सोडले नाही. सावरकरांना सोडले तर हा अत्यंत धोकादायक माणूस आपल्याला जड जाईल हे त्यांना माहिती होते.
अर्थात गाद्यागिरद्यांवर लोळत, लोडतक्के उशाला घेऊन पंख्याच्या वाऱ्याखाली राजवाड्यात स्थानबद्धता उपभोगणाऱ्या ब्रिटिश हस्तकांना यामागील भूमिका समजणे अशक्य आहे.
म्हणजे अगदी डीमोनेटायझेशन
म्हणजे अगदी डीमोनेटायझेशन सारखा मास्टरस्ट्रोक होता तर.....
Bharat's posts are typical
Bharat's posts are typical fear mongering. Violence in North east and west bengal shows true colors of Congress TMC and peace loving people
>>>>>>>>विना आरोपपत्र, विना
>>>>>>>>विना आरोपपत्र, विना जामीन , छळ या थापा आहेत. मायबोलीवर याबद्दल पुरेसं लिहिलं गेलं आहे. <<<<<<<<<
हिंदु समाजाला "हिंदु टेरर " चे नाव देणार्या कडुन अजुन काय अपेक्षा असणार ?
हिंदू समाज वेगळा. त्यात
हिंदू समाज वेगळा. त्यात माझ्यासारख्यांचा अंतर्भाव होतो. हिंदू टेरर वेगळा. कोण ते तुम्हांला सांगायला नकोच.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/RajaSinghOfficial/videos/1060897104257752/
आ. भाजप नेते हिंदूहूदयसम्राट राजा सिंह यांचे सीएब वरचे मार्गदर्शन
सावरकरांची तुलना महाराजांशी?
सावरकरांची तुलना महाराजांशी?

राहुलबाबा / बाळ आणी अजून काय
राहुलबाबा / बाळ आणी अजून काय असेल तो. याला जर कोल्हु पिसायला पाठवला ना तर आल्यानंतर हा कायमचा टॉयलेट मध्येच बसुन राहील, बाहेर येताच यायचे नाही याला. नुसता बोलबच्चन आहे. बालीश बहु बायकात बडबडला तसे बालीश बहु दर्जाहीन बडबडला असे म्हणता येईल. एकतर डोळे मारत बसतो नाहीतर सभेत बाष्कळ बडबडतो. स्वतःच्या मतदार संघांचा विकास तर करता आला नाही याला १० वर्षात. निवडणूक आली की जातो हात पसरत तिथे.
Mandard, घर वापसी -> लह
Mandard, घर वापसी -> लह जिहाद-> बीफ बॅन (पोटावर मार) -> गोरक्षकांकडून हत्या -> ट्रिपल तलाक क्रिमिनलाइज्ड -> ३७० -> याची ही पुढची पायरी आहे.
मी फिअर माँगरिंग करतोय की काय ते पुढे दिसेलच.
Mandard, I believe this is
Mandard, I believe this is from your neighbourhood.
https://twitter.com/WeUttarPradesh/status/1205876748669243394
आय टी सेलच्या में बरांनी मास
आय टी सेलच्या में बरांनी मास धर्मांतर केलं की काय?


मैं बहूत खूश हूं, मेरा भारत
मैं बहूत खूश हूं, मेरा भारत हिंदू राष्ट्र होगा. इस्त्रायल की तरह हर हिंदू मजबूत होगा तो हिंदूंओंके दुश्मन डरकर भिगी बिल्ली की तरह कोने में पडे रहेंगे.
<< >>> या सर्व दया याचिका
<< >>> या सर्व दया याचिका (माफी नामे) अभ्यासण्यासारख्या आहेत... कुठेही वीर असण्याचा अभिनिवेश नाही. >>>
शहाजीराजेंना आदिलशहाच्या तुरूंगातून सोडविण्यासाठी शिवाजी महाराजांनी अत्यंत नम्रपणे शहाजहानला पत्र लिहून त्याच्या सैन्यात सामील होण्याची विनंती केली होती. शहाजीराजेंना आदिलशहाने तुरूंगातून सोडल्यानंतर शिवाजी महाराजांनी लगेच शहाजहानला धुडकावून लावले.
अंदमानात ५० वर्षे खितपत पडण्याऐवजी येथून काहीही करून सुटावे व सुटल्यानंतर भारताबाहेर जाऊन स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करावेत या उद्देशाने सावरकरांनी ते पत्र लिहिले होते. परंतु इंग्रज शहाजहानसारखे मूर्ख नसल्याने त्यांनी सावरकरांना सोडले नाही. सावरकरांना सोडले तर हा अत्यंत धोकादायक माणूस आपल्याला जड जाईल हे त्यांना माहिती होते.
अर्थात गाद्यागिरद्यांवर लोळत, लोडतक्के उशाला घेऊन पंख्याच्या वाऱ्याखाली राजवाड्यात स्थानबद्धता उपभोगणाऱ्या ब्रिटिश हस्तकांना यामागील भूमिका समजणे अशक्य आहे. >>
------ शिवाजी राजे यांनी आदिलशहाला लिहीलेल्या पत्राशी तुलना करणे योग्य नाही. असे करणे महाराजांवर अन्यायकारक ठरेल.
शिवाजी महाराजांचा संपुर्ण जिवनपट अचाट साहस, मर्दुमकी आणि उच्च कोटीचा मुत्सद्दी पणा याने व्यापलेला आहे. त्यांनी शुन्यातून स्वराज्य स्थापन केले आणि कुठल्याही एका धर्माचा दुस्वास केलेला नाही.
सावरकरांनी हिंसेचा पुरस्कार केला पण स्वत: कधीच पुढाकार घेतला नव्हता... १७ वर्षांच्या अनंत कान्हेरे यांना पुढे करुन जॅक्सनची हत्या करवली / मारले. तर मदनलाल धिंग्रा यांना प्रोत्साहन देत कर्झन वायली याला मारले.
)
नथुराम गोडसे याला यशस्वी होण्यासाठी हिरवा कंदिल दिला... सावरकरांना वाटले होते महात्मा गांधी यांचे १०० अपराध भरले. (गांधी यांनी अनेक शतके झोपलेल्या बहुजनांना जागे केले म्हणजे मोठाच अपराध होता
अजुन एका हत्येमधे अयशस्वी प्रयत्न झाला....
कुठेही स्वत: पुढाकार घेतलेला नव्हता.... नेहेमी बंदुक दुसर्याच्या खांद्यावरच.
माफीनामा लिहीणे चुकीचे नाही, वारंवार लिहीला असेल तरी त्यात चुकीचे असे नाही...
पणा १९११ नंतर ब्रिटिशांविरुद्ध ब्र काढला नाही , कुठे एकही मोहिम नाही, कुठे विरोधात लेख नाही.... तर कुठल्या "स्वातंत्र्याचे" वीर? असा प्रश्न येणे स्वाभाविक आहे. आणि मी उत्तरे शोधतो आहे.
आता शिवाजी महाराजांबद्दल असे म्हणता येत नाही... (माझे वाचन १९८४ च्या आधीचे आहे... आणि यादी मोठी आहे... पण एक गोशवारा)
(१) पहिला हल्ला तोरणा (प्रचंड) गडासाठी केला त्या हल्ल्याचे नेतृत्व अनुभवी बाजी पासलकरांकडे होते... पण सोबत शिवाजी राजे होतेच.
(२) शाहिस्तेखाना ला लाल किल्ल्यामधून हुसकावण्यासाठी हल्ला केला त्यावेळी मोहिमेवर स्वत: सर्वात पुढे होते.
(३) अगडबंब, भलाकाय अफझल खानाला स्वत: सामोरे गेले होते...
(४) सिद्दीमसुद च्या पोलादी विळख्या मधून (किल्ले पन्हाळा) सुटतांना केवळा ६०० मावळे... आणि बाजी प्रभू यांच्या सोबत केवळ ३०० मावळ्यांना दिले आणि पुढे विशाळगडावर (तिथेही आदिलशाहीचा वेढा होता ) केवळ ३०० मवळ्यांनिशी हल्ला केला... वेढा यशस्वी फोडला... आणि किल्याचा ताबा घेतला.
(५) तानाजीच्या मुलाचे लग्न आहे हे समजल्यावर (किल्ले कोंढाणा घेण्यासाठी) स्वत: मोहिमेवर जाणार होते.... पण तानाजींनी थपथेवर रोखले... गड आला पण तानाजी सारखा सिंह गेला.
(६) उच्च कोटीचा मुत्सद्दीपणा मिर्झाराजेंसोबत दाखवला.... स्वराज्याला वाचवण्यासाठी " तह " केला आणि आग्रा येथे लहान संभाजीला सोबत नेले. फार मोठा धोका होता आणि परतीची शाश्वती नव्हतीच.
प्रत्येक मोहिमेत स्वत: ला ते पुढे ठेवायचे... जे काम इतरांनी करावे असे वाटले ते आधी स्वत: केले. आणि मग इतरांनी अनुकरण करणॅ योगाने आलेच... आणि इथे ते अनंत योजने थोर ठरतात. तुलना करणे शक्यच नाही.
>>>>>>धर्माच्या किंवा अन्य
>>>>>>धर्माच्या किंवा अन्य कुठल्याही आधारावर देशाची फाळणी होण्यास गांधीजी यांचा कठोर विरोध होता...<<<<<<<<
गांधीजींचा कठोर विरोध कश्याला होता हे सर्वांनी पाहीलय !!
स्थलांतरीत हिंदु समाजाच्या पुर्नस्थापनेच्या तर सोडाच त्यांची साधी
विचारपुस सुद्धा केली नाही,
Pages