नागरिकत्व सुधारणा विधेयक मोदी सरकारने लोकसभेत पास केले आहे आणि लवकरच राज्यसभेत पास करून घेणार आहेत असे समजतेय.
काय आहे हे विधेयक - लोकसत्तामध्ये वाचल्याप्रमाणे
धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक २०१९ मध्ये आहे.
या दुरूस्तीचा कोणाला होणार नाही फायदा?
श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या विधेयकाचा लाभ मिळणार नाही.
बाकी
व्हॉटसप फेसबूकवर याबाबत उलटसुलट फॉर्वर्डेड मेसेज आदळत आहेत. भारताच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे असे काहीतरी समजतेय. काहीजण याला संविधानावरचा हल्ला म्हणत आहेत तर काही देशप्रेमी जल्लोष साजरा करत आहेत. याने दहशतवादाचा प्रश्न सुटत असेल तर चांगलेच आहे. पण नक्की हेतू काय आहे आणि काय योग्य अयोग्य हे समजत नाहीये. सर्व ॲंगल जाणून घ्यायला हा चर्चेचा धागा.
बहुमत आहे म्हणून कायदेच
बहुमत आहे म्हणून कायदेच आणायचे असतील तर
१. मायबोलीवर सरकारच्या विरोधात लिहीणा-यांचे सर कलम करावे
असे कायदे सहजच करता येतील. काहीच प्रॉब्लेम नाही. ते घटनेत बसते की नाही हा प्रश्न अलाहिदा. आमच्याकडे बहुमत आहे. उद्यापासून अमूक जातीच्या पुरूषांनी आमच्या वस्तीत येऊन जोडे साफ करून दिले पाहीजेत असाही कायदा बनवता येऊ शकतोच.
बाकी, या धाग्याचे शीर्षक
बाकी, या धाग्याचे शीर्षक देणार्याला CAB बद्दल अज्ञान आहे का मुद्दामून शेपटीवाल्या प्राण्यांची सभा भरवण्यासाठी तसे दिले आहे? या आयडी ने ईतरत्र काढलेले अशा सर्व चालु विषयावरील चालू धागे बघता, दुसरी शक्यता जास्त दिसते.

गंमत म्हणजे त्या सगळ्याच धाग्यांवर तेच दोन तीन पोपट सभापती असतात.
काही ऑफिशीयल पगारावर असतात, काही पडद्या आडून.
रच्याकने: गाढवे सुधारली (पुरोगामी झाली!) माणसे काही सुधरेनात.
भारतीय जनता पक्षाचे नेते या
भारतीय जनता पक्षाचे नेते या विधेयकाचे महत्व ४० पैसे वाल्या भक्तांना समजावून सांगत असताना.
त्यावरचे ४० पैसे वाल्यांचे विचार आणि सोशल मीडीयातले बुद्धीजीवी यांचे विचार अगदीच समसमान आहेत.
https://www.facebook.com/PeeingHuman/videos/346688042921519/
एबीपी विशेष ह्या कार्यक्रमात
एबीपी विशेष ह्या कार्यक्रमात .
Bjp,काँग्रेस,पत्रकार,आणि कम्युनिस्ट पार्टी च प्रतिनिधी होता.
ह्याच विषयावर चर्चा चालली होती..
तेव्हा त्यांना प्रश्न विचारला तुम्हाला cab वर आक्षेप काय आहे.
मग नेहमीची उत्तर घटनेची पायमल्ली,भारताच्या धर्म निरपेक्ष स्वरूपावर घाला.इती काँग्रेस,कम्युनिस्ट.
कशावरून असा प्रश्न.
कारण हे विधेयक धर्मावर आधारित आहे हे उत्तर दिले गेले पण स्पष्ट पने हे दोघे पण सांगत नाहीत की मुस्लिम लोकांना ह्या कायद्या मधून वगळले त्या मुळे विरोध..
मग शेवटी मुलाखत करत्यानी च सर्व विचारलं .
मुस्लिम लोकांना सुद्धा ह्या विधेयकात सामावून घेतले तर तुम्ही विरोध सोडलं का .
पण ह्या प्रश्न च हो म्हणून उत्तर दोन्ही पक्षाच्या प्रवक्त्याने शेवट पर्यंत दिले नाही.
मग असा प्रश्न आहे हे बोंब का मारत आहेत.फक्त वातावरण बिघडवण्या साठी
Nd टीव्ही हिंदी वाले मुंबई
Nd टीव्ही हिंदी वाले मुंबई वासी लोकांची ह्या विषयावर
प्रतिक्रिया घेत होते.
हे कसं ठरवून वातावरण बिघडवतात त्याचा उत्तम नमुना.
१) एका स्त्री ला हा प्रश्न विचारला आणि तिची प्रतिक्रिया ऐकून मी उठलोच तिची भाषा सामान्य व्यक्ती ची नव्हती तेच कॅसेट तीनी वाजवलं घटना ,धर्म निरपेक्ष पना etc लगेच लक्षात आले ही dumy आहे.
बाकी खरोखर सामान्य लोकांना विचारलं कोणी चुकीचं बोलले पण जास्त करून लोक योग्य आहे असेच बोलले बेकारी,जास्त लोकसंख्या त्या घुसखोर बाहेर जातील तेच चांगले अस सामान्य उत्तर होत.
परत ह्याचे dumy असलेल्या व्यक्तींची प्रतिक्रिया घेतली दाढी आणि tila लावलेला व्यक्ती मराठी वाटेल असा त्यांनी कॅब योग्य आहे असे सांगितलं त्या पाठी दुसरा व्यक्ती हिंदी वाला नी विरोध करणे चालू केले आज बांगलादेशी ना हकलाल उद्या मुंबई मधून हिंदी bhashi लोकांना हकलाला असली पोपट पंची चालू केली हे सर्व ठरवून घडवले लोकांना गैरसमज होण्या साठी आज बांगला देशी हाकलले आता विरोध नाही केला तर राज्यातून परप्रांतीय लोकांना मोदी हकालतील.
हे ठरवून nd टीव्ही वाले करत होते
मुंबई मध्ये वातावरण बिघडवण्याच प्रयत्न हे करत होते तर आसाम मध्ये काय काय सांगून लोकांना भडकावल असेल
योगायोगाने कुणाचा तरी आयडी मी
योगायोगाने कुणाचा तरी आयडी मी पळवल्याचा संताप व्यक्त झालेला दिसतोय. आता देतच नाही ज्जा !
हीच ती वेळ, हाच तो क्षण.
हीच ती वेळ, हाच तो क्षण. सार्थक झालं जीवनाचं.
मोदी स्वतःच वारणसीचा पर
मोदी स्वतःच वारणसीचा पर प्रांतीय आहे
ब्लॅक कॅट
ब्लॅक कॅट
तुम्ही माझी पोस्ट नीट वाचली
नाही किंवा तुम्हाला त्या पोस्ट चे आकलन झाले नाही .
त्या मुळे असंबंधित कमेंट तुम्ही दिली आहे
राजेश, लोकांनी वाचावं म्हणून
राजेश, लोकांनी वाचावं म्हणून तुम्ही लिहीत असता हे आत्ताच समजलं. लोक तुमच्या पोस्ट्स वाचायला मायबोलीवर येतात का ?
माझ्या पोस्ट माणसं साठी असतात
माझ्या पोस्ट माणसं साठी असतात त्या मुळे माणसं वाचतात.
प्राणी कसं वाचतील
खाली लिहिलेलं बरोबर आहे का?
खाली लिहिलेलं बरोबर आहे का?
1. 1995 citizenship act and CAB are different from each other
2. CAB is only for non-muslims from neighbouring countries except Srilanka who entered before 31.12.2014. Persecution due to Faith. Srilanka is excluded because although Tamil Hindus are persecuted, they were not persecuted because of their faith
3. Anyone can still apply for citizenship after 11 years of stay
4. Certain areas fron NE are already excluded from ambit of CAB
असं असेल तर protests का? Rohingya and Illegal बांगलादेशी मुसलमान करताहेत का हे किंवा हे ज्यांची votebankआहेत . मुद्दाम हिंसाचार चालू आहे
वरची माहिती चुकीची असल्यास बरोबर काय आहे ते सांगा.
बरोबर राजेश. माझ्या नावातच
बरोबर राजेश. माझ्या नावातच तुमचा आदर्श प्राणी आहे म्हणून तर.
तुमच्या पोस्ट्स माणसांसाठी असतात हे वाचून आदर वाढला. माणसांनाही तसं वाटलं तर मग काय..
अर्पणा, नागरिकत्व कायदा 1955
अर्पणा, नागरिकत्व कायदा 1955 चा आहे, आता त्यात भर घातली. नागरिकत्व कोणाला मिळणार यात भर घातली. शेजारच्या 3 देशातील धर्माच्या नावाखाली छळ होणाऱ्या 5 धर्मातील लोक जे 31.12.2014 पूर्वी भारतात आलेले आहेत त्यांना 11 वर्ष रहिवासाची अट शिथिल करून 6 वर्षांच्या रहिवासानंतर नागरिकत्व देणार अशी दुरुस्ती आहे. यात मुस्लिम नसल्यामुळे बांगलादेशी मुस्लिम व रोहीनग्यांची अडचण होणार. त्यामुळे समस्त भारतीय वाख्येच्यासेक्युलर लोकांच्या पोटात दुखतेय, अर्थात त्यामुळे भारतीय व्याख्येच्या सेक्युलर मायबोलीकरांनाही त्रास होतोय.
Oci बद्दल दुरुस्ती व अजून काही दुरुस्त्याही यात आहेत.
1955 चा कायदा नेटवर उपलब्ध आहे. तो तुम्ही डाउनलोड करून बघा व वाचा. त्यात आसामबद्दल स्वतंत्र तरतूद आहे. त्यात आताही बदल नाही. कायदा दुरुस्ती ईशान्येकडील राज्यांना लागू नाही. आणि पळून आलेले लोक नुसते तिकडेच नाहीत तर इकडे राजस्थान व दिल्लीतही आहेत. तरीही ईशान्येत आगडोंब उसळला आहे याचे कारण सहज समजून घेता येण्यासारखे आहे.
आसाममधल्या काही विरोधकांचे म्हणणे आहे की बांगला देशी बंगाली बोलणारे हिंदू त्यांच्या डोक्यावर आणून बसवणार ज्यामुळे असामी भाषा व संस्कृतीची हानी होणार. यात तथ्य आहेच. आसाम व बंगाल हा वाद खूप जुना आहे, बंगाली आमच्यावर कुरघोडी करतात अशी आसामीची खूप जुनी तक्रार आहे. कायदा 2014 च्या आधी आलेल्या लोकांना सामावून घेणार म्हणतोय तर तिथेही लोक आधीच येऊन बसले असणार, त्याबद्दल आसामी आधीच ओरडत होते (ते भारतीय बंगाल्याबद्दलही ओरडत होतेच), ह्या दुरुस्तीमुळे त्या नको असलेल्या लोकांना घालवून देणे अशक्य होणार. आसामचा प्रश्न सोडवणे अति कठीण आहे. तिथे आधीच nrc सुरू आहे, त्यात हे , त्यामुळे लोक वैतागले असणार.
आपल्याला जे चित्र पेपरातून, नेटवर मीडियात दिसते त्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती खूप वेगळी असू शकते.
लोकांनी आता मुंबईत करोडो लोक बाहेरून आयात करून आणून ठेवणार वगैरे जे चित्र रंगवायला सुरवात केलीय हे फक्त त्यांच्या कल्पनेत आहे. ज्यांना नागरिकत्व मिळणार ते आधीच भारतात आलेले आहेत. त्यातल्या ज्यांना मुंबईत यायचे होते ते मुंबईत आधीच आलेले असणार. तसेही नव्या मुंबईत तरी भरपूर आहेत, फक्त त्यात बहुसंख्य मुस्लिम आहेत.
मुस्लिमांना वगळण्याचे कारण ते 3 देश मुस्लिमबहुल आहेत. तिथल्या मुस्लिमांना इतरत्र पळून जायची गरज नसावी.
आसामचा नक्की प्रॉब्लेम
---
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर 1955 च्या नागरिकत्व च्या नियमात जे बसत नाहीत त्यांना आताच्या कॅब कायद्यांनी नागरिकत्व दिले जाणार आहे.
तांत्रिक दृष्ट्या ते घुसखोर च आहेत.
फक्त अट ही आहे की 2012 पूर्वी जे सलग 6 वर्ष भारतात राहत आहेत हिंदू,पारशी,शीख,ख्रिस्त,जैन धर्माच्या व्यक्ती अफगाणिस्तान,पाकिस्तान,बांगलादेश मधून भारतात आले आहेत त्यांना भारताचे नागरिकत्व दिले जाईल .
का दिले जाईल?
वरील सर्व धर्माच्या व्यक्ती ह्या धार्मिक झळाच्य शिकार आहेत कारण त्या संबंधित देशात अल्पसंख्य होत्या आणि तिथे त्यांच्या वर धार्मिक अत्याचार केले गेले.
त्या मुळे त्यांचा इथे येण्याचा उद्येष हा आसरा किंवा शरण घेणे हा आहे आणि त्यांच्या पुढे दुसऱ्या कोणत्याच देशाचा पर्याय नाही.
मुस्लिम ना का नाही.
तर वरील तिन्ही देशातून भारतात आलेलं मुस्लिम हे धार्मिक झळवणुकीची शिकार झालेले नाहीत ते तिथे बहुसंख्य आहेत ..त्या लोकांचा इथे येण्याचा उद्देश आसरा किंवा शरण घेणे हा नाही तर त्यांचे अनेक उद्देश असू शकतात .
भूमी काबीज करणे,देशात अशांतता निर्माण करणे आणि इत्यादी .
1955 नुसार ज्या मुस्लिम लोकांना नागरिकत्व मिळाले आहे ते अबाधित आहे .
आता फक्त एक घोषणा सरकारने करावी शिया मुस्लिम लोकांना सुधा नागरिकत्व देण्याचा विचार आहे.
मग बघा विरोध करणारे कसे रागाने लाल होतील आणि पाकिस्तान अणुबॉम्ब ची धमकी देईल .
मागे मोदींनी बलुचि स्तानचं
मागे मोदींनी बलुचि स्तानचं नाव घेतलं होतं, त्याचं खूप कौतुक झालं होत. मास्टर स्ट्रोक वगैरे. ते कशामुळे?
हेच तीन देश का घेतले? अन्य शेजारी देश, जसे श्रीलंका, नेपाळ का नाही?
फक्त धार्मिक छळव्णूकच का? इतर बाबींवरून छळ झाला तर त्यांच्यासाठी दार बंद का?
हे असं आहे की कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही ते आधी ठरवलं. मग त्याला साजेशा नियम आणि अटी बनवल्या.
मग अदनान सामीला का दिले?
मग अदनान सामीला का दिले?
>>> हेच तीन देश का घेतले?
>>> हेच तीन देश का घेतले? अन्य शेजारी देश, जसे श्रीलंका, नेपाळ का नाही? >>>
नेपाळ, श्रीलंका इ. देशात धार्मिक छळाचा इतिहास नाही (यामागचे कारण उघड आहे). समजा या देशांचाही समावेश केला असता तर कोरिआ, जपान, इंग्लंड वगैरे देश का नाही असे देशद्रोह्यांनी विचारले असते कारण त्यांचं दुखणं वेगळंच आहे.
>>> फक्त धार्मिक छळव्णूकच का? इतर बाबींवरून छळ झाला तर त्यांच्यासाठी दार बंद का? >>>
ही सुरूवात आहे. भविष्यात इतर बाबींचा विचार होऊ शकेल.
>>> हे असं आहे की कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही ते आधी ठरवलं. मग त्याला साजेशा नियम आणि अटी बनवल्या. >>>
त्यात काय चुकीचे आहे? कोणाला नागरिकत्व द्यायचे, कधी द्यायचे, कोणाला देशात येण्याची परवानगी द्यायची याविषयी सर्व देशांचे स्वत:चे नियम आहेत. भारताने अपवाद का करायचा?
सहाव्यांदा विचारतो.
सहाव्यांदा विचारतो.
त्यासाठी आधीचे कायदे होतेच. कुणाला घालवायचे, कुणाला बोलवायचे याचे निर्णय मेरीटवर घेण्याचे स्वातंत्र्य होतेच. धर्म हा शब्द न घुसडता हेच काम करता आले असते. दुसरीकडे बांग्लादेशला स्वतः मोदींनी हा आमचा अंतर्गत मामला आहे असे सांगितले आहे. म्हणजेच घुसखोरांना तुमच्याकडे पाठवणार नाही असे आश्वासन झाले.
कायदे होतेच. कुणाला घालवायचे,
कायदे होतेच. कुणाला घालवायचे, कुणाला बोलवायचे याचे निर्णय मेरीटवर घेण्याचे स्वातंत्र्य होतेच.
आधीच्या सर्व कायद्यात जे बसत नाहीत त्यांच्या साठी हा कायदा आहे.
सर्वांनी मिळून 8 व्यांदा उत्तर दिले आहे.
ज्या लोकांचा धार्मिक छळ होत आहे त्या लोकांसाठी कायदा आहे .
मुस्लिम धार्मिक छळाचे शिकार नाहीत म्हणून ते नाहीत इथे धर्माचा काही संबंध नाही.
हे आतापर्यंत 100 वेळा सर्वांनी सांगितलं आहे
पाकिस्तानमध्ये अहमदी लोक कोण
पाकिस्तानमध्ये अहमदी लोक कोण आहेत?
>>> पाकिस्तानमध्ये अहमदी लोक
>>> पाकिस्तानमध्ये अहमदी लोक कोण आहेत? >>>
मुसलमान
राजेश, तुम्हाला नाही विचारले.
राजेश, तुम्हाला नाही विचारले. आकलन असणा-यांसाठी प्रश्न आहे. इथे तुमच्याशी लोक बोलतात हा गैरसमज काढून टाका.
एखाद्या देशात बहुसंख्यां
एखाद्या देशात बहुसंख्यां कांच्या धर्मातील लोकांचा धार्मिक आधारावर छळ होऊ शकत नाही हा गोड गैरसमज आहे हे दाखवणारं सगळ्यात मोठं उदाहरण हिंदू धर्मच आहे. जात हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे आणि जातीच्या आधारावर छळ हाही.
एकाच धर्मातले लोक इतरांचा छळ करू शकत नाहीत असं म्हणणा र्यांनी बांग्लादेश निर्मितीची कारणं शोधावीत.
नेपाळमध्ये मधेसी लोक काय म्हणतात?
धर्माशिवाय इतर कारणं महत्त्वाची नाहीत असं म्हणणार्यांनी श्रीलंकेतील तामिळ संघर्ष आणि शिरकाण पहावे.
तुमच्या प्रश्नाचे एकमेव हेच
तुमच्या प्रश्नाचे एकमेव हेच उत्तर आहे ह्या पेक्षा वेगळे उत्तर नाही .
हे उत्तर आमच्या प्राणी मित्र साठी आहे
अस्पृश्यांच्या वस्त्या आणि
अस्पृश्यांच्या वस्त्या आणि डिटेन्शन कँप यात काय फरक असेल ?
एखाद्या देशात बहुसंख्यां
एखाद्या देशात बहुसंख्यां कांच्या धर्मातील लोकांचा धार्मिक आधारावर छळ होऊ शकत नाही हा गोड गैरसमज आहे हे दाखवणारं सगळ्यात मोठं उदाहरण हिंदू धर्मच आहे. जात हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे आणि जातीच्या आधारावर छळ हाही. ---- +1 (कधी 'भरत' यांना राजकीय धाग्यावर अनुमोदन देईन असे वाटले नव्हते, but here it is!) Open उर्फ unreserved मंडळींचा किती छळ होतो, सरकार धोरणांमध्ये किती सापत्न वागणूक मिळते ह्याला काही सुमार राहिलेला नाही.
धार्मिक आधारावर छळ होऊ शकत
धार्मिक आधारावर छळ होऊ शकत नाही हा गोड गैरसमज आहे हे दाखवणारं सगळ्यात मोठं उदाहरण हिंदू धर्मच आहे.
हिंदू हा जगातील सर्वात वाईट धर्म आहे.
इथे जातीभेद आहे ,जातीवरून लोकांचा छळ होतो.
त्या पेक्षा मुस्लिम धर्म श्रेष्ठ धर्म आहे ह्या धर्मात समानता आहे जातीभेद बिलकुल नाही अशा प्रकारचं मत आम्ही आमच्या स्वयं हुशार विचारवंत कडून खूप वेळा ऐकली आहेत त्या मुळे आमचे पण तसेच मत झाले होते .
पण आता कोलांटी उडी मारून मुस्लिम सुधा जातीभेद मानणारा धर्म आहे असे सांगत आहात विश्वास नाही बसत तुम्ही मुस्लिम धर्माला बदनाम करत आहात
राजसी, अशा लोकांचा नवा देश
राजसी, अशा लोकांचा नवा देश वसवायचं मनावर घ्या. स्वामी नित्यानंद मदत करू शकतील.
Pages