Submitted by संपदा on 22 December, 2016 - 03:39
प्रश्न जुनेच, धागा नवीन
आधीचे धागे :-
१. http://www.maayboli.com/node/2602
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी मायबोलीवर नवीन आहे please
मी मायबोलीवर नवीन आहे please मलाही तूमच्या जेवण या विषयी असणाऱ्या Tips बद्दल माहितीसाठी लिहायला आवडेल
लहान मुलं येणार असतील आणि तर
लहान मुलं येणार असतील आणि तर चीझ पिझ्झाचे तुकडे मस्ट आहे. देसी लहान मुलं ही पावभाजी खातीलच का काय नेम नाही. चीज पित्झा आणि हाय ऑन शुगर करायला अॅपल ज्यूस हवाच.
पाव भाजी ला पर्याय:
पाव भाजी ला पर्याय:
जिरा राईस्/गोभी मन्चुरियन,
दहिभात (साउथ स्टाईल), टोमॅटॉ सूप
हाका न्यूडल्स, पनिर चिली.
पेरू पावभाजी आणि एखादे गोड
पेरू पावभाजी आणि एखादे गोड पुरेसं वाटतंय मलापण, शुभेच्छा, मस्त होऊदे prgm. Twins चा बड्डे आहे का, असेल तर त्यांना advance मध्ये happy birthday........+१.
धन्य्वाद शुभेच्छांसाठी. हो मुलांचाच बड्डे आहे. पावभाजीचेच दोन व्हेरिएशन करणार आहे कारण माझी स्वतःची मुलेच खात नाहीत तिखट. मुलांसाठी ज्युस, चिप्स, पॉपकॉर्न आहेतच. लस्सीचाच फक्त विचार चालु आहे. लस्सी ऐवजी सरळ चोकोबार द्यावे असे वाटते आहे. म्हणजे मुलांनाही आवडेल.
अर्जंट मदत हवी आहे.
अर्जंट मदत हवी आहे.
उद्या संध्याकाळी घरी ८ मोठे आणि ५ छोटे येतील.
खाण्यात आणि करण्यात जास्त वेळ घालवायचा नाही, जेवायला कोणी थांबणार नाही, तरी पोटभरीचे हवे म्हणून रगडा ठरवला आहे.
बरोबर मोठ्यांना चहा आणि मुलाना ज्यूस.
किती वाटाणा लागेल?
नुसता रगडा देणार? खायला? मग
नुसता रगडा देणार? खायला? मग उसळ, मिसळ, वाटली डाळ, पोहे, उपमा, पण चालेल ना? एक आमटीची वाटीभर वाटाणे मध्ये 4 -5 जण कशी consistency आहे त्यानुसार.
रगड्याबरोबर फ्रोझन अलू टिक्की
रगड्याबरोबर फ्रोझन अलू टिक्की गरम करून. वरून टोमॅटो, कांदा, चिंच चटणी इ.
चाट करून.
मुख्य म्हणजे मुले आणि पालक शाळा-ऑफिसमधून परस्पर येतील. आम्हीपण तसेच.
मुलांना शनिवारच्या कार्यक्रमाची प्रॅक्टिस करायची आहे तेव्हा फोकस खाण्यावर आणि विविधतेवर नको.
शनिवारी परत लवकर उठून तयारी चालू म्हणून जेवणाचा घाट घालता येणार नाही.
सगळे दमलेले असल्याने पोटभरीचं, पटकन तयार होणारं आणि खाऊन होणारं काहीतरी. पोहे-उप्पीट आधी खूपदा झालं आहे.
अर्धा किलोला थोडेसे कमी वाटणे
अर्धा किलोला थोडेसे कमी वाटणे चालतील.तुमच्या घरची मंडळी त्यात धरली आहेत का?नाहीतर अर्धा किलो वाटाणे हवे.थोडे जास्त वाटले तर kadhoon thevataa येतील.
हो, धरली आहेत. पण अर्धा किलोच
हो, धरली आहेत. पण अर्धा किलोच भिजवेन. तुम्ही म्हणता तसं काढून ठेवता येईल.
धन्यवाद.
Sasubai cha birthday aahe 17
Sasubai cha birthday aahe 17 tarkhe la .bhajani mandal chya 16- 17 aaji and kakun la bolvaych aahe kahi tari potbhari ch suchava
Idly
Idly
इडली,
इडली,
साबुदाणा खिचडी
उपमा
पोहे
Veg cutlets and cream fruit
Veg cutlets and cream fruit chalel ka.means hit jhal paije. Navin menu cha competition asto
नवीन मेन्युची स्पर्धा ? अरे
नवीन मेन्युची स्पर्धा ? अरे भजनी मंडळ आहे की भोजनी मंडळ
ते गातील असं धरून तळकट ठेवू नका. मिनी इडली चटणी सॅंडविचेस, चहा/काॅफी, एखादं गोड किंवा शिरा (केकही असेल) असं बास व्हावं.
या बायकांना (पक्षी: सासावांना
या बायकांना (पक्षी: सासावांना! )पारंपरिक पदार्थ फार आवडतात.

म्हणून..वाटली डाळ, उकडीचे मोदक, दडपे पोहे, घारगे, चिरोटे, मटार करंज्या., भाजणीचे वडे...असं काहीतरी करा!
Miaris,
Miaris,
तुमचा मेनू झकास आहे की!
सासूबाइंच्या आवडीचे पदार्थ
सासूबाइंच्या आवडीचे पदार्थ करा .
किंवा एखादी थीम ठेवा - जसे उपासाचा मेनू, संक्रांतीचा मेनू, ( बाजरीची भाकरी, भोगीची भाजी, तिळाच्यावड्या ) चायनीझ डिशेस ( फ्राइड राइस, कॉर्न सूप, व्हेज मोमो, व्हेज स्टर फ्राय नूड्ल्स ) , स्ट्रीट फूड - ( भेळ, पाणीपुरी, कटलेट, चटणी सँडविच, दाबेली आणि कुल्फी) . राईसप्लेट - (लेमन राइस, कोकोनट राइस, बिसी बेळे भात , *पाल पायसम किंवा फिरनी)
*https://hebbarskitchen.com/pal-payasam-recipe-rice-kheer-recipe/
पाल (:अओ:) पायसम म्हणजे?
पाल (
) पायसम म्हणजे?
गोडात प्रसादाचा शिरा किंवा
गोडात प्रसादाचा शिरा किंवा आंब्याचा किंवा अननसाचा शिरा किंवा फिरनी (गार खायला चांगली लागेल; गरम वातावरण असेल तर)
बिसिबेळे भात + एखादी कोशिंबीर
मटाराची हिरव्या मसाल्यातली जरा ग्रेव्ही वाली उसळ्/भाजी आणि लहान कढइ टाईप भांड्यात दोसे; मध्ये थोडे जाडसर आणि कडेनी क्रिस्प असतात ते वाले (नाव नाही आठवत आता)
आणि माझं वाक्य लक्षात ठेवा, आपण साधं काही करायला गेलो की ज्ये नां च्या दृष्टीनं ते रीड - फालतू असतं. सो फार खटपटीचे नाही पण जरा मसालेदार आणि स्वादिष्ट अन जरा हटके पदार्थ आवडतात .
Idli chutney. Khobra barfi
Idli chutney. Khobra barfi mini batata Wade limbu sarbat/tea coffee check if one or two ladies are fasting. Be prepared to make sa khi on short notice.
दोसे; मध्ये थोडे जाडसर आणि
दोसे; मध्ये थोडे जाडसर आणि कडेनी क्रिस्प असतात ते वाले (नाव नाही आठवत आता) >>> अप्पम
kahi tari potbhari ch suchava
kahi tari potbhari ch suchava >>> मसालेभात, टोमॅटो सार, पापड/मिरगुंडं आणि गोड म्हणून गुलाबजाम किंवा जिलबी.
Miaris , शेवयांचा भाज्या
Miaris , शेवयांचा भाज्या घालून उपमा / मसालेभात आणि गव्हाची (दलिया ची) खीर
पाल ( Uhoh ) पायसम म्हणजे? >>
पाल ( Uhoh ) पायसम म्हणजे? >> पाल म्हणजे दूध .. दुधाची खीर
मटाराची हिरव्या मसाल्यातली
मटाराची हिरव्या मसाल्यातली जरा ग्रेव्ही वाली उसळ्>>>>> हा उसळीसाठी हिरवा मसाला कसा असतो जरा धावती रेस्पी लिहा. म्हणजे मटार किंवा वाल वैगेरे साठी.
कोथिंबीर, खोबरं आणि हिरवी
कोथिंबीर, खोबरं आणि हिरवी मिरची एकत्र वाटून, thats it.
ओके. लसुण आलं?
ओके. लसुण आलं?
हा उसळीसाठी हिरवा मसाला कसा
हा उसळीसाठी हिरवा मसाला कसा असतो जरा धावती रेस्पी लिहा. >>> म उ फॅ क्ल इथे बघा.
Thanks all.. stuffed aalu
Thanks all.. stuffed aalu tikki vatli dal ani coffee ha menu finalise.
आमची बड्डे पार्टी झाली
आमची बड्डे पार्टी झाली रविवारी. घरी पावभाजी केली. ४० मोठी माणसे आणि १५ मुले. मुलांची वेगळी. बार्बेक्युवर पाव भाजले. मँगो लस्सी कॅन्सल केली. त्याऐवजी पनीर पकोडे ऑर्डर केले ३ किलो. पावभाजी अगदी हॉटेल सारखी झाली. अजिबात उरली नाही.
पावभाजीचे प्रमाण इथे लिहुन ठेवते :
एक किलो हिरवे वाटाणे भिजवले आदल्या रात्री आणि सकाळी शिज्वले.
४ किलो बटाटे.
दिड किलो शिमला मिरची
२ किलो टोमॅटो
१ किलो कांदे.
१ किलो कोथिंबीर
एक वाटी आले लसुन पेस्ट
शिमलामिरची आधी बारीक चिरुन घेतली फूड प्रोसेसर मधे. मग मोठ्या पातेलयात टाक्ली. एक कप पाणी टाकले आणि मॅश करत करत उघडीच शिजवली मग त्यात टोमॅटो,आर्धी कोथिंबीर लाल तिखट आणि पावभाजी मसाला टाकुन परत रिपिट. मग बटाटे, वाटाणे , मसालम, मॅश रिपिट. हे सगळे उकळवले चांगले. मग पातेले उतरुन त्यात अर्धा किलो बटर टाकले. मग मोठ्या कढैत तेल + बटर मिक्स करुन टाकले , त्यात कांदा टाकला मग परत आले लसुन टाकले. परत मसाला टाकुन भाजीत टाकले. मग भाजी परत उकळवली.
Pages