शिव सेनेचे काय होणार ?

Submitted by हस्तर on 31 October, 2019 - 09:13

ज्या पद्धतीने हट्टी पणा आणि बोलघेवढे पण चाललंय भाजप वाले चिडलेले असणारच
राजकारणात कोणी पण शत्रू मित्र नसते पण इथे बलाढ्य माणूस समोर आहे
खडसे ,चिक्कीताई सगळ्यांचे पत्ते साफ केले आपलेच असून हे तर दुसऱ्या पक्षाचे आहे
वर जनतेचे मनोरंजन होत आहे पण मुद्दाम केल्यासारखे आता वाटत नाही ,दिल्ली वरून पण महाराष्ट्र्र चे सरकार हरण्याना पेक्षा उशिरा (मग काही पण कारण असो ) होत आहे हे दिसतेय ,थोडक्यात महाराष्ट्र भाजपचा वट कमी आहे असे लोकांना वाटतेय
२०१४ मध्ये बाळा साहेबांची पुण्याई होती आणि २०१९ मध्ये लोकल प्रश्नांनाची ढीलाइ त्यामुळे टिकली पण २०२४ मध्ये शिवसेना असेल का ? कारण काही झाले तरी भाजप खच्चीकरण करणारच ,मुद्दाम मंत्रिपद ना देऊन ( आयारामानं मात्र दिले ),पुण्या मुंबईत जागा ना देऊन बोळवण केली आता भाजप अजून करणारच

जर शिव सेने मागण्यात तडजोड केली तर मानसिक खच्ची करण होईल ,अडून बसली आणि मागण्या पुंर्ण नाही झाल्या तर हसे होईल

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मोठा भाऊ चॉकलेट देत नाही, कां - राकांशी मैत्री करून हातात घड्याळ बांधणे गद्दारी ( सेनेचाच शब्द.)
तटस्थ राहिल्यास दोनचार मंत्रीपदंही नाही.

संजय राऊत रोज नवीन स्टेटमेंट देतो. >>> फार डोक्यात जातो हा माणूस. मिडीया पण काही उद्योग नसल्यासारखी ह्याच्या मागे. उद्धव ठाकरे समोर येऊन काही बोलूदेत ना, सारखं सारखं ह्यालाच दाखवतात, न्युज चॅनेल लावलं की समोर हजर.

सध्या मिडीया सर्व फुटेज फक्त दोन जणांना देतेय, शरद पवार आणि संजय राऊत.

मूळ लेखातल्या मुद्द्यांबद्दल :
शिवसेना जे करतेय त्यामुळे भाजप चिडून त्यांचं खच्चीकरण करणार, हे अर्धसत्य आहे. अन्य सगळे पक्ष संपवणे, नाममात्र ठेवणं हा भाजपचा उघड उद्देश आहे. (तेलगू देसम संपली. बिजू जनता दल, वाय एस आर काँ, टी आर एस, अण्णा द्र मुक यांचेही नंबर लागतील) गेल्या पाच वर्षांतही शिवसेनेचे खच्चीकरण केलेच आहे. युती २०१४ मध्येही तुटली होती. कारण लोकसभेतल्या निवडणुकांचा निकाल बघून भाजपला स्वबळाची खात्री वाटू लागली होती. उडी जरा कमी पडली.
यावेळी लोकसभेत ३०० पार जाऊनही युती का केली, असा प्रश्न पडला. कदाचित जनमताचा सुगावा लागला असावा.

अजूनही शिवसेनेचे कट्टर पाठिराखे त्यांच्या मागे आहेत, असं दिसलं आहे. अगदी बाळासाहेबांचं नाव घेऊन त्यांना मत देतात.

शिवसेने ने स्वतःचे हसे गेली पाच वर्षे व्यवस्थित करून घेतले आहे. पण ते त्यां चा पाठिराखा नसलेल्या वर्गात.
केंद्रात मंत्रीपदावरून रुसवेफुगवे, मग राज्यात आधी सहभागी न होता नंतर होणे, खिशातले राजीनामे कधीच बाहेर न पडणे आणि आता आरेप्रकरणीची वक्तव्य.

पण एकच पक्ष अतिप्रबळ होणे हे मोनोपॉलीपेक्षाही वाईट. त्यामुळे शिवसेना किमान आहे तितकी बळकट राहणे गरजेचे आहे.

तेलगू देसम संपली. बिजू जनता दल, वाय एस आर काँ, टी आर एस, अण्णा द्र मुक यांचेही नंबर लागतील
>>>
तेलुगू देसमची सध्याची अधोगती आणि भाजपाचा काय संबंध आहे? आंध्रात भाजपा नगण्य आहे.
या व इतर सर्व प्रादेशिक पक्षांनी जर पुढचे नेतृत्व उभे केले नाही तर भाजप असो वा नसो त्यांचा अंत होईल.

वरच्या यादीत डावे पक्ष व काँग्रेसचे नाव राहिले. यांचीच पुन्हा उभे राहण्याची शक्यता नगण्य आहे. स्थानिक पातळीवर शून्यातून उभे राहता येते हे शेकाप काँग्रेस (ysr) ने दाखवून दिले आहे

एका पक्षाचे सरकार महाराष्ट्रात भविष्यात तरी येणे कठीण आहे.
स्वबळावर सरकार बनवण्या एवढी ताकत bjp मध्ये महाराष्ट्रात तरी येणार नाही.
शिवसेना ही मराठी लोकांचे हित मुंबई मध्ये जपण्यासाठी निर्माण झाली आहे आणि तिला मतदान सुद्धा त्याच भावनेतून होते.
रचनात्मक कार्य देणे कडून काहीच झालेले नाही .
आता सेना बदलली आहे त्या मुळे मतदार सुद्धा पाठ फिरवून मनसे मागे जावू शकतात.
किती ही नावं ठेवली तरी ग्रामीण भागात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे रचनात्मक काम आहे.
तिथे bjp आणि सेना पाय रोवून उभी राहू शकणार नाही

>>> शिवसेना जे करतेय त्यामुळे भाजप चिडून त्यांचं खच्चीकरण करणार, हे अर्धसत्य आहे. >>>

शिवसेनेने स्वतःच स्वतःचे खच्चीकरण करून घेतले आहे. मुंबई-ठाण्याच्या बाहेर अस्तित्व नसलेली शिवसेना भाजपमुळे महाराष्ट्रात माहिती झाली. परंतु आपणच भाजपला मोठे केले हा भ्रम सेनेने व माध्यमांनी जोपासला. २००९ पासूनच सेनेचे पितळ उघडं पडले होते व २०१४ मध्ये ते सिद्ध झाले. परंतु २०१४ मध्ये हुकुमाची पाने हातात असूनही सेनेने चुकीची पाने खेळल्याने सेना संपत आली आहे.

>>> अन्य सगळे पक्ष संपवणे, नाममात्र ठेवणं हा भाजपचा उघड उद्देश आहे. (तेलगू देसम संपली. बिजू जनता दल, वाय एस आर काँ, टी आर एस, अण्णा द्र मुक यांचेही नंबर लागतील) गेल्या पाच वर्षांतही शिवसेनेचे खच्चीकरण केलेच आहे. युती २०१४ मध्येही तुटली होती. कारण लोकसभेतल्या निवडणुकांचा निकाल बघून भाजपला स्वबळाची खात्री वाटू लागली होती. उडी जरा कमी पडली.
यावेळी लोकसभेत ३०० पार जाऊनही युती का केली, असा प्रश्न पडला. कदाचित जनमताचा सुगावा लागला असावा. >>>

तेलगू देसम मनसेप्रमाणे उलटसुलट उड्या मारल्याने संपत आला आहे. इतर पक्ष अजूनही भक्कम आहेत.

कॉंग्रेस व राष्ट्रवादीला महाराष्ट्रातून कायमचे संपविण्यासाठी सेनेला लायकीपेक्षा खूप जास्त जागा देऊन युती केली. तीच घोडचूक ठरला. युती केली नसती किंवा सेनेला ८०-९० पेक्षा जास्त जागा दिल्या नसत्या तर आज भाजपचे स्वबळावर सरकार दिसले असते.

>>> त्यामुळे शिवसेना किमान आहे तितकी बळकट राहणे गरजेचे आहे.>>>

अत्यंत कणाहीन, मूर्ख, बढाईखोर पक्ष गरजेचा नाही.

संजय राऊत रोज नवीन स्टेटमेंट देतो.
>>
ओल्ड फॅशन कट्टर शिवसैनिक टाईप्स त्या वक्तव्यांमुळेच सेनेच्या जुन्या मतदारांचा स्वाभिमान टिकून आहे

संजय राऊत च्या स्टेटमेंट बेसलेस आहेत.
त्याला काही ही अर्थ नाही.
मुर्खासारखे बडबडतोय.
म्हणे 175 चा पाठिंबा आहे मग सरकार स्थापन करायचा दावा का करत नाही.
काँग्रेस,राष्ट्रवादी chya विरोधात निवडणूक लढली आणि त्यांचाच पाठिंबा घेवून सरकार बनवले तर लोक शेन घालतील तोंडात.
Bjp द्वेष नी जी लोकं आंधळी आहेत तेवढेच खुश होतील अशी नगण्य लोक आहेत

ते फक्त आरसा दाखवत आहेत भाजपला
की आमच्याशिवाय तुम्हीही काही नाही...

काही तरी काळेबेरे आहे ह्यांच्या बडबडी मागे.
आम्ही कसे स्वतंत्र विचाराचे आहोत हे दाखवण्या चा प्रयत्न आहे .
स्वतःचे अस्तित्व दाखवण्यासाठी चाललं आहे सारे.

काँग्रेस,राष्ट्रवादी chya विरोधात निवडणूक लढली आणि त्यांचाच पाठिंबा घेवून सरकार बनवले तर लोक शेन घालतील तोंडात.

सेना भाजप ही स्वबळावर एकमेकांच्या विरुद्ध राहिले होते अन मग शेणाचा पो खाऊनच सत्तेत बसले ना ?

ते फक्त आरसा दाखवत आहेत भाजपला
की आमच्याशिवाय तुम्हीही काही नाही...

कबुल
पण bjp बरोबर नसेल तर सेनेला दुसरा कोणी मित्र पण नाही.
सेनेची हिंदुत्व वादी विचारसरणी बाकी पक्ष स्वीकारणार नाहीत.
हिंदुत्व सोडले सेनेची ओळख काय आहे .

सेना भाजप ही स्वबळावर एकमेकांच्या विरुद्ध राहिले होते अन मग शेणाचा पो खाऊनच सत्तेत बसले ना ?
हो पण हिंदुत्व आणि उजवी विचारसरणी आणि कट्टर राष्ट्रवाद हे सामान धागे आहेत ना दोन्ही पक्षात.
तसे काँग्रेस,राष्ट्रवादी सेने च्या विरूद्ध विचारसरणी असलेले पक्ष आहेत

>>> हिंदुत्व सोडले सेनेची ओळख काय आहे . >>>

सेनेच्या मराठी बाण्याप्रमाणे सेनेचे हिदुत्व सुद्धा बेगडी आहे.

>>> हो पण हिंदुत्व आणि उजवी विचारसरणी आणि कट्टर राष्ट्रवाद हे सामान धागे आहेत ना दोन्ही पक्षात. >>>

सेनेचं हिदुत्व, उजवी विचारसरणी, राष्ट्रवाद हे सर्व बेगडी आहेत. खरं सांगायचं तर सेनेकडे कोणतेही धोरण व विचारसरणी नाही.

मग इतकी वर्ष लिव्ह इंन relation मध्ये का होते दोन्ही पक्ष.
फक्त सत्तेची मज्जा लुटायला

कबुल
पण bjp बरोबर नसेल तर सेनेला दुसरा कोणी मित्र पण नाही.
>>>>
हे जगाला माहीत.आहे
राऊत फक्त दुसरी बाजू दाखवत आहेत की सेनेशिवाय भाजपाही जास्त उडू शकत नाही.
अखेर युतीच करायची आहे हे त्यांनाही माहीत आहेच.

हे जगाला माहीत.आहे
राऊत फक्त दुसरी बाजू दाखवत आहेत की सेनेशिवाय भाजपाही जास्त उडू शकत नाही.
<<

राऊतांना दुसरी बाजू दाखवायचीच आहे, तर ती अन्य प्रकारे देखील दाखवता आली असती. मात्र सध्या माध्यमांत, ते जे काही बेताल विधाने करत आहेत ती पाहून राऊतांनी सेना-भाजपा युती तोडायची सुपारी घेतली असावी अशी शंका येते.

खरेतर भाजपाबरोबर असलेली युती तोडून शिवसेनेने, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर स्थापन केलेले सरकार पाहायची माझी जाम इच्छा आहे. म्हणजे बाळासाहेंबाना त्यांच्या उभ्या राजकिय जीवनात जे जमल नाही ते उठा व आठा यांनी काहिच महिन्यात करुन दाखवले.

एका पक्षाचे सरकार महाराष्ट्रात भविष्यात तरी येणे कठीण आहे.
स्वबळावर सरकार बनवण्या एवढी ताकत bjp मध्ये महाराष्ट्रात तरी येणार नाही.
>>>

म्हणूनच महाराष्ट्रच्ये 3 4 तुडे करणार . वेगळा विदर्भ करणार. तो बीजेपी ठेवणार. एन सी पी शी डील मारत, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा त्यांना देणार. खानदेश, कोकण वगैरे एकत्र जोडून मुंबई प्रांत सेपरेट करणार Wink

तसे काँग्रेस,राष्ट्रवादी सेने च्या विरूद्ध विचारसरणी असलेले पक्ष आहेत

त्याने आम्हाला काय फरक पडतो ? विरोधी विचारसरणी ही फक्त दोन चार मुद्द्यात असते,

काँग्रेसवाला पोलिओ डोस पाजा म्हणतो ,अन भाजपवाला पोलिओ बूथ बंद करा म्हणतो , असे तर नसते ना ? इतर गोष्टी सेमच रहातात.

आता ज्या मतदार संघात सत्तांतर झाले , उदा अणुशक्ती नगरात पूर्वी सेना होती , आता राष्ट्रवादी आले
लोकांना काय फरक पडतो ? तीच रिक्षा , तीच ट्रेन , तोच वरणभात

म्हणूनच महाराष्ट्रच्ये 3 4 तुडे करणार . वेगळा विदर्भ करणार. तो बीजेपी ठेवणार. एन सी पी शी डील मारत, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा त्यांना देणार. खानदेश, कोकण वगैरे एकत्र जोडून मुंबई प्रांत सेपरेट करणार.
हिंदी भाषिक पट्टा सोडला तर बाकी भाषिक राज्य स्वतःला वेगळा देशच समजतात.
भाषावार प्रांत रचना आणि स्थानिक भाषेत राज्य कारभार ह्या काँग्रेस च्या शाहण्या निर्णय मुळे ते भारतात न कुरकुर करता राहत आहेत.
भाषिक अस्मिता हे मधमाशांचे पोळे आहे त्या वर दगड मारून असंख्य देश आणि गृह युद्ध कोण्ही कोण्ही ओढवून घेणार नाही.
Bjp सुद्या नाही .
फक्त आंध्र प्रदेश चे विभाजन करू शकले पण तेव्हा सुद्धा प्रचंड विरोध झाला .
बाकी हिंदी भाषिक नसलेली.
कर्नाटक,तमिळ,केरळ,
बंगाल,महाराष्ट्र
गुजरात आणि इतर राज्य
ह्यांना हात लाऊन अवलक्षण करायची हीमंत कोण्ही करणार नाही

सेना होती , आता राष्ट्रवादी आले
लोकांना काय फरक पडतो ? तीच रिक्षा , तीच ट्रेन , तोच वरणभात

आज लोकल ट्रेन नी प्रवास करताना हाच विचार माझ्या डोक्यात आला.
निवडणुकी शी सामान्य लोकांचा काय संबंध
आम्ही स्वतः कष्ट करून जगत आहे .
पण सरकारनी जाहीर केले की आज पासून
लोकल ट्रेन बंद करण्यात येत आहेत .
आणि तिचे खासगी कारण करण्यात येवून पास पद्धत बंद केली जाते आहे.
मुंबई मध्ये किती लोक नोकरी करू शकतील .
८० टक्के लोकांना कामावर हजर होणे शक्यच होणार नाही
स्वतःच्या takativar कोण्ही जगू शकत नाही सरकारी निर्णय तुम्ही जगणार की मरणार हे ठरवतात.
कोणाच्या हि घरात कोण्ही ही घुसून
कब्जा करत नाही
ते तुमच्या भीती मुळे नाही
सरकारी यंत्रणेच्या भीती
मुळे .
बँका पैसे बुडवत नाही ते
सरकारी यंत्रणा मुळे.
रात्री स्ट्रीट लाईट बंद केल्या तर फेरीवाले वेडे
होतील.
कोणताही व्यक्ती सरकारी यंत्राने वर च जगू शकतो अन्यथा नाही.
त्या मुळे उत्तम लोकप्रतिनिधी ,
उत्तम सरकार ही लोकांची गरज आहे.
मला काय त्याच असे म्हणून स्वतःचे आयुष्य संकटात टाकू नका .
सजग रहा

खरेतर भाजपाबरोबर असलेली युती तोडून शिवसेनेने, कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर स्थापन केलेले सरकार पाहायची माझी जाम इच्छा आहे... हे असे बरेच लोक बोलुन दाखवत आहेत. उठाचा नक्की प्रोल्बेम काय आहे?

Pages