शिव सेनेचे काय होणार ?

Submitted by हस्तर on 31 October, 2019 - 09:13

ज्या पद्धतीने हट्टी पणा आणि बोलघेवढे पण चाललंय भाजप वाले चिडलेले असणारच
राजकारणात कोणी पण शत्रू मित्र नसते पण इथे बलाढ्य माणूस समोर आहे
खडसे ,चिक्कीताई सगळ्यांचे पत्ते साफ केले आपलेच असून हे तर दुसऱ्या पक्षाचे आहे
वर जनतेचे मनोरंजन होत आहे पण मुद्दाम केल्यासारखे आता वाटत नाही ,दिल्ली वरून पण महाराष्ट्र्र चे सरकार हरण्याना पेक्षा उशिरा (मग काही पण कारण असो ) होत आहे हे दिसतेय ,थोडक्यात महाराष्ट्र भाजपचा वट कमी आहे असे लोकांना वाटतेय
२०१४ मध्ये बाळा साहेबांची पुण्याई होती आणि २०१९ मध्ये लोकल प्रश्नांनाची ढीलाइ त्यामुळे टिकली पण २०२४ मध्ये शिवसेना असेल का ? कारण काही झाले तरी भाजप खच्चीकरण करणारच ,मुद्दाम मंत्रिपद ना देऊन ( आयारामानं मात्र दिले ),पुण्या मुंबईत जागा ना देऊन बोळवण केली आता भाजप अजून करणारच

जर शिव सेने मागण्यात तडजोड केली तर मानसिक खच्ची करण होईल ,अडून बसली आणि मागण्या पुंर्ण नाही झाल्या तर हसे होईल

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Rajesh१८८,.
उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत या माणसाला शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून पुढे केले. राऊतने म्हटलेली सर्व शिवसेनेची अधिकृत वक्तव्ये होती. त्यात एक महत्त्वाचे वक्तव्य आम्हाला १७५ आमदारांचा पाठिंबा आहे हे होतं. ते वक्तव्य शिवसेनेने कशाच्या जोरावर केलं होतं? मग वेळ आल्यावर ते सगळे आमदार कुठे गेले?

मग शिवसेनेला जर १७५ आमदारांचा पाठिंबा आहे, तर भाजप सरकार कसे काय स्थापन करणार? आज अहमद पटेल म्हणाले की शिवसेनेशी बातचीत कालच्या आधी कधीही झाली नव्हती.

वरील गोष्टीवरून खोट्या पुड्या कोण सोडतेय ते कळून येईल. आणि म्हणे बाळासाहेबांची अवलाद कधी खोटं बोलत नाही !

आता जी काही वेळ आलीय ती "१७५ - ५६ = ११९" आमदारांच्या ऐनवेळी शिवसेनेला पाठिंबा नाकारण्यामुळे आलीय, भाजप मुळे नाही.

राणे उतरले आहेत मैदानात, सेना किंवा काँग्रेस कोणाचे तरी आमदार फोडणार असं नक्की वाटतंय, भाजपला आणणार. फडणवीस यांना आणणार म्हणतायेत. फडणवीस यांनीच जबाबदारी दिलीय.

सेनेने कुऱ्हाडीवर डायरेक्ट पाय ठेवल्याने कोण काय करणार, सध्यातरी सेनेची विनाशकाले विपरीत बुद्धी दिसतेय.

>>युती करून देनारे अमित शहा कुठे गायब झालेत? शिवसेना खोटं बोलत आहे , हे त्यानीं का सांगीतले नाही?<<
"वो तो चुनावी जुमला था" असं परत एकदा पटवुन द्यावं लागु नये म्हणुन... Proud

मला तर आता वाटायला लागलं आहे कि, अमित शहा यांना एक पोलिटिकल स्ट्रॅटजिस्ट म्हणुन लायकि पेक्षा जास्त महत्व दिलं गेलेलं आहे. लेट्स होप महाराष्ट्र पोलिटिक्स डोन्ट बिगिन हिज एंड अ‍ॅज ए बिजेपि स्ट्रॅटजिस्ट...

युती करून देनारे अमित शहा कुठे गायब झालेत? शिवसेना खोटं बोलत आहे , हे त्यानीं का सांगीतले नाही?<<
"वो तो चुनावी जुमला था" असं परत एकदा पटवुन द्यावं लागु नये म्हणुन... Proud

मला तर आता वाटायला लागलं आहे कि, अमित शहा यांना एक पोलिटिकल स्ट्रॅटजिस्ट म्हणुन लायकि पेक्षा जास्त महत्व दिलं गेलेलं आहे. लेट्स होप महाराष्ट्र पोलिटिक्स डोन्ट बिगिन हिज एंड अ‍ॅज ए बिजेपि स्ट्रॅटजिस्ट...

नवीन Submitted by राज on 13 November, 2019 - 06:48 >>

बऱ्याच लोकांना बरच काही वाटत असतं. असो, खालील लिंक वर १३ ऑक्टोबर रोजी दिलेल्या अमित शहांच्या मुलाखतीतील भाग पहा.

https://www.facebook.com/sumuvai/videos/3209057992500016/

>>> मला तर आता वाटायला लागलं आहे कि, अमित शहा यांना एक पोलिटिकल स्ट्रॅटजिस्ट म्हणुन लायकि पेक्षा जास्त महत्व दिलं गेलेलं आहे. >>>

आता तसंच वाटायला लागलंय.

प्रत्यक्ष बैठकीचा व्हिडीओ किंवा लेखी असेल तर दाखवा

नवीन Submitted by BLACKCAT on 13 November, 2019 - 09:36 >>>

LOL, तसा काही व्हिडिओ असेल तर तो शिवसेनेनं दाखवायला हवा नाही का? कारण अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देणार असे आश्वासन दिल्याचा दावा शिवसेनेचा आहे.
१३ सप्टेंबर हा दिवस निवडणुकीच्या आधी होऊन गेलाय.

राज्यपाल हुशार निघाले. रोज कुणीतरी भेटायला येणार . त्यांचे चहापाणी करा . त्यांना वेळ द्या. त्यांच्याशी गप्पा मारा.त्यापेक्षा राष्ट्रपती राजवटच बरी. आधी एक बहुमताचा आकडा आणा मग बोलु. तोपर्यंत हे निवांत.

राजेश तुम्ही काय लिहीता हे तुम्हाला तरी कळते का?.. ते जेव्हा भाजपा समर्थनार्थ पोष्टी टाकत होते तेव्हा त्यांना सगळे कळत होते. सध्या हवा का रुख बदल गया हे.
राणे उतरले आहेत मैदानात.. राणे भाजपाचे संजय राउत आहेत. बडबड करत रहा काहीतरी घडतेच Happy

तसा काही व्हिडिओ असेल तर तो शिवसेनेनं दाखवायला हवा नाही का?

Sena , bjp कुणाकडेच असा व्हिडीओ किंवा लेखी नाही

टी व्ही वरून दोघेही उलटसुलट विधाने करत आहेत, म्हणजे कुणावरच विश्वास ठेवता येणार नाही

राज्यपाल हे bjp चे हस्तक असल्या सारखे वागले आहे....हे गोव्यात आणि मिसोरम मधे असेच झाले होते ना. त्यात नवीन ते काय?

खरे तर हे एका अर्थी बरे झाले आहे... सत्तेत मित्रपक्षा वर त्यांच्या नेत्यांवर दर दिवसागणीक आग पाखड करणे, आपल्याच मित्र पक्षाच्या कारभारावर टीका करणे यातच सेनेने गेली पाच वर्षे घालवली. हे लोढणे असे भाजपा च्या गळ्यातून सुटणार असेल तर बरेच आहे भाजपा च्या तब्येतीसाठी... हे आता सुचतेय? दिल्लीहुन अमित शाह स्वतः लक्श का घालत होते मग युती व्हावी म्हणुन?

काँग्रेस सेनेकडून लिहून घेणार आहे

मुख्यमंत्री कोण
पदे किती

आणि सर्वात महत्वाचे ..... , उत्तर प्रदेशी, तामिळी ह्यांना विरोध करायचा नाही, इतर धर्मियांना विरोध करायचा नाही, मुंबई सर्वांची रहाणार

पोराला मुख्यमंत्रीपद मिळते म्हटल्यावर झक मारत लिहून देईल,

पोराला मुख्यमंत्रीपद मिळते म्हटल्यावर झक मारत लिहून देईल,

नवीन Submitted by BLACKCAT on 13 November, 2019 - 12:25 >>>

बरंय बरंय , घ्या बरं लिहुन Lol

शिवसेना आल्यावर मला दहा रुपयात पोटभर जेवण पाहिजे. रविवार, बुधवार आणि शुक्रवारी कोंबडी वडे, चिकन लॉलीपॉप, चिकन बिर्याणी, तंगडी कबाब, चिकन हंडी, रोट्या, भात हा मेन्यू आणि इतर दिवशी बासुंदी, श्रीखंड, आम्रखंड, पुलाव, रसगुल्ले, पनीर मसाला, व्हेज कोफ्ता, काजू मसाला असा मेन्यू पाहिजे.

मुलाला करतील असं वाटत नाहीये आता, करूही नये. स्वतः उ ठा झाले तर होतील, किंवा ऐनवेळी दोघेही नाहीत.

मुळात हे तिघे एकत्र येऊन सरकार स्थापन होणार आहे की नाही हेच नक्की ठरत नाहीये. तो पर्यंत राणे बाजी पलटी करून फडणवीस मुख्यमंत्री होतीलही Wink .

कायदे तज्ञांना मला एक प्रश्न विचारायचा आहे? ज्या मुख्य्मंत्रीपदाकरता शिवसेना इतकी अडुन बसली आहे, त्याचे संविधानिक महत्व इतर महत्वाच्या खात्यांपेक्शा जास्त कसे? म्हणजे असा नक्की कुठला राजकिय आडव्हांटेज मिळतो?

>>> तो पर्यंत राणे बाजी पलटी करून फडणवीस मुख्यमंत्री होतीलही >>>

राणेबद्दल फारच विश्वास दिसतोय. ज्याला काळं कुत्रंही विचारत नाही तो काय डोंबलाची बाजी पलटी करणार.

राणेबद्दल फारच विश्वास दिसतोय. ज्याला काळं कुत्रंही विचारत नाही तो काय डोंबलाची बाजी पलटी करणार.

नवीन Submitted by पुरोगामी on 13 November, 2019 - 13:11 >>

असल्या उपेक्षित लोकांकडे कोणाचं लक्ष जात नाही, नि ते मागच्या मागे कारनामे करुन सगळा खेळ बिघडवतात. "३००" सिनेमामधील कुबडा सैनिक आठवा Wink

Bjp नी सत्ता स्थापन करण्याचा दावा केलाच नाही.
सेने नी केला होता त्यांना वेळ वाढवून देवून विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याची संधी देणे न्यायचे होते.
राज्यपाल हे स्वतंत्र विचाराचे असावेत.
पण राजकीय व्यक्तींना राज्यपाल पद देण्याचा पायंडा पाडून चुकीची पद्धत चालू आहे.
केंद्र सरकार chya हातातील बाहुले म्हणून राज्यपाल काम करत असतील तर ते पद कशासाठी निर्माण केले आहे.
जनतेच्या टॅक्स चे पैसे उडवण्यासाठी

राणेबद्दल फारच विश्वास दिसतोय. >>> मला अजिबात आवडत नाही कोणीही तिघांपैकी, मी तर गावी सगळ्यांना सांगितलं मत देऊ नका, पण अश्या माणसांचे काही सांगता येत नाही. पण मी लिहिताना मस्करीत लिहिलं म्हणून पुढची स्मायली टाकली होती. आपली जनसामान्यांची मस्करी केलीय या सर्वांनी तर आपण लिहून मस्करी करावी थोडी हा हेतू होता वर लिहिताना.

काळे कुत्र विचारत नाही अशी परिस्थिती आलेली पण सेनेमुळे पलटली, भाव वाढलाय त्याचा. केंद्रात मंत्रीपद मिळालं, इथे फडणवीस यांनी जबाबदारी टाकली. आता बागुलबुवा मुद्दाम उभा केलाय आणि तो फुसका बार आहे का नाही ते कळेल लवकर. पर्सनली मला नाही आवडत पण राजकारणात कधी कुठे काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही.

बरंय बरंय , घ्या बरं लिहुन

एक परदेशी ख्रिश्चन बाई लिहून घेणार की हिंदू हिंदू प्रांत ह्या विषयावरून मुंबईत भांडणार नाहीत,

हिंदू नी असा भेदभाव केला असता तर मुंबई मध्ये तर दुसऱ्या समाजातील लोकांना
ना मुंबई मध्ये घर मिळाले असतं.
ना धंदा चालवू शकले असते.
सर्व एकत्र राहत आहेत म्हणून अल्पसंख्यक आर्थिक क्षेत्रात स्थिरावला आहे .
हे सत्य डोळ्याआड करू नका

सेने नी केला होता >>

राजेश्भाउ , सेनेने सत्तास्थापनेचा दावा कधी केला? राउतची सवय तुम्हालापण लागली की काय?

बरंय बरंय , घ्या बरं लिहुन

एक परदेशी ख्रिश्चन बाई लिहून घेणार की हिंदू हिंदू प्रांत ह्या विषयावरून मुंबईत भांडणार नाहीत,

Submitted by BLACKCAT on 13 November, 2019 - 13:30 >>> चांगलय , घेउद्या की मग.

>>> आता बागुलबुवा मुद्दाम उभा केलाय आणि तो फुसका बार आहे का नाही ते कळेल लवकर. >>>

तो फुसका बार आहे हे पूर्वी अनेकदा सिद्ध झालंय.

>>> असल्या उपेक्षित लोकांकडे कोणाचं लक्ष जात नाही, नि ते मागच्या मागे कारनामे करुन सगळा खेळ बिघडवतात. "३००" सिनेमामधील कुबडा सैनिक आठवा >>>

ते फक्त चित्रपटात शक्य असतं.

ते फक्त चित्रपटात शक्य असतं.

नवीन Submitted by पुरोगामी on 13 November, 2019 - 14:13 >>>

सगळे शेवटी शक्यतेतेच खेळ असतात. असो, पाहूया काय होतंय ते.

Pages