शिव सेनेचे काय होणार ?

Submitted by हस्तर on 31 October, 2019 - 09:13

ज्या पद्धतीने हट्टी पणा आणि बोलघेवढे पण चाललंय भाजप वाले चिडलेले असणारच
राजकारणात कोणी पण शत्रू मित्र नसते पण इथे बलाढ्य माणूस समोर आहे
खडसे ,चिक्कीताई सगळ्यांचे पत्ते साफ केले आपलेच असून हे तर दुसऱ्या पक्षाचे आहे
वर जनतेचे मनोरंजन होत आहे पण मुद्दाम केल्यासारखे आता वाटत नाही ,दिल्ली वरून पण महाराष्ट्र्र चे सरकार हरण्याना पेक्षा उशिरा (मग काही पण कारण असो ) होत आहे हे दिसतेय ,थोडक्यात महाराष्ट्र भाजपचा वट कमी आहे असे लोकांना वाटतेय
२०१४ मध्ये बाळा साहेबांची पुण्याई होती आणि २०१९ मध्ये लोकल प्रश्नांनाची ढीलाइ त्यामुळे टिकली पण २०२४ मध्ये शिवसेना असेल का ? कारण काही झाले तरी भाजप खच्चीकरण करणारच ,मुद्दाम मंत्रिपद ना देऊन ( आयारामानं मात्र दिले ),पुण्या मुंबईत जागा ना देऊन बोळवण केली आता भाजप अजून करणारच

जर शिव सेने मागण्यात तडजोड केली तर मानसिक खच्ची करण होईल ,अडून बसली आणि मागण्या पुंर्ण नाही झाल्या तर हसे होईल

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

निवडणूकीनंतर फोकस शरद पवारांवर गेला होता. तो परत भाजपा व शिवसेनेकडे वळवणे चाललंय. गेली ५ वर्षे हेच चाललंय.
खाते वाटप ठरलं की काही झालंच नाही असं वाटावं, इतक्या सहजतेने दोघे एकत्र येतील. फडणवीस परत मुख्यमंत्री बनतील.
तोपर्यंत सर्वांना सतत काहीतरी चावत बसायला टुकडे टाकायचे काम राऊत साहेबामकडे असणारेय.
Happy

आता काळजीवाहू सरकार म्हणे,

म्हणजे बाकी 5 वर्षे बेफिकीर सरकार असते ?

Proud

मोदी सरकारवर हिरीरीने लिहिणारे महान राजलेखक बेफिकिरजी कुठे गेले ?

रावणाचा प्राण त्याच्या बेंबीत होता . त्याला बाण मारल्यावर तो मेला.

राम मंदिर ही भाजपाची बेंबी आहे , एकदा निकाल लागला की मग हेही रावणासारखे खाली पडणार आहेत.

Lol Rofl

>>> राम मंदिर ही भाजपाची बेंबी आहे , एकदा निकाल लागला की मग हेही रावणासारखे खाली पडणार आहेत. >>>

भाजपचे अस्तित्व फक्त श्रीराम मंदीरावर अवलंबून नव्हते व नाही. भाजपकडे इतर अनेक मुद्दे आहेत.

गांधी घराणे ही कॉंग्रेसची बेंबी आहे. हे घराणे संपले (म्हणजे निष्प्रभ झाले) की कॉंग्रेस कायमची संपली. २०१४ पासून हे घराणे संपण्याच्या मार्गावर आहे. माताजी वयोवृद्ध झाल्याने गलितगात्र आहेत. युवराजांनी परिस्थिती ओळखल्याने ते आता परदेशी मन रमवतात. मध्यंतरी युवराज्ञींना आणण्याचा प्रयत्न असफल ठरला. आता केवळ काही दिवसांचाच प्रश्न आहे.

नेहमीचा अप प्रचार..

भारताचे पंत प्रधान व काँग्रेस अध्यक्ष ह्यात फार कमी गांधी आहेत , काँग्रेस 1885 पासून आहे, 130 वर्षे

१९६६ पासून १९९१ पर्यंत गांधी व नंतर १९९८ पासून आजतगायत गांधी. म्हणजे मागील ५३ पैकी ४६ वर्षे गांधी. त्याआधी नेहरू व त्यांचे वडील.

काँग्रेस च्या असंख्य चुका आहेत.
Bjp किंवा हिंदुत्व ह्यांना असंख्य मुद्दे आहेत निवडणूक जिंकण्यासाठी.
राम मंदिर त्यातील एक.
पण भाषिक स्वतंत्र हरवणे हिंदुत्व च्या नावावर हिंदू सहन करणार नाहीत हे पण तेवढेच सत्य आहे.
त्या .मुळे एक भाषा एक देश.
एकच निवडणूक एक देश.
एकच प्रवेश प्रक्रिया एक देश.
असल्या फालतू भानगडीत bjp नी पडू नये

>>> असू द्या हो , मनेका अन वरुण , दोन गांधी तुमच्याकडेही आहेत. >>>

त्यांच्यावर भाजप कणभरही अवलंबून नव्हता, नाही व नसेल. प्रकाश जावडेकर किंवा रावसाहेब दानवेंचे भाजपत जे स्थान व महत्त्व, तितकेच या दोघांचे.

पण कॉंग्रेसमधून गांधी वजा केले की कॉंग्रेस शून्य होते.

कॉंग्रेस व भाजप मधील फरक समजणे तुझ्या आवाक्याबाहेर आहे. तस्मात्, फार विचार करू नकोस.

असू द्या हो , मनेका अन वरुण , दोन गांधी तुमच्याकडेही आहेत.

नवीन Submitted by BLACKCAT on 3 November, 2019 - 23:03. >>

या दोघांची तुलना सोगा व रागा बरोबर करणे म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे.
वरुण गांधी यांची तुलना राहुल गांधी बरोबर करणे म्हणजे वरुण गांधींच्या बुद्धिमत्तेचा घोर अपमान आहे.

>>> या दोघांची तुलना सोगा व रागा बरोबर करणे म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे. >>>

त्याच्या मूर्खपणात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? ते तर त्याचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

>>>>>भारताचे पंत प्रधान व काँग्रेस अध्यक्ष ह्यात फार कमी गांधी आहेत ,<<<<<
जमोप्या नागडा !!

काँग्रेसने 1885 पासून, 130 वर्षे देशाचा सत्यानाशच केलाय !!!

भरत

शिवसेना जे करतेय त्यामुळे भाजप चिडून त्यांचं खच्चीकरण करणार, हे अर्धसत्य आहे.

>> कसे ? अ
यावेळी लोकसभेत ३०० पार जाऊनही युती का केली, असा प्रश्न पडला. कदाचित जनमताचा सुगावा लागला असावा.
>> मित्र घातकि म्हणु नये म्हणुन , तसे बघतले तर पंकजा मुंडे यांचा पत्ता कापलेलाच आहे अमित शहा यांनी सभा घेऊन ,म्हणजे सांगायला मोकळे कि आम्ही सर्व प्रयत्न केले पण तुमचाच उमेदवार कचा

अजूनही शिवसेनेचे कट्टर पाठिराखे त्यांच्या मागे आहेत, असं दिसलं आहे. अगदी बाळासाहेबांचं नाव घेऊन त्यांना मत देतात.
>> सहम्त

पण एकच पक्ष अतिप्रबळ होणे हे मोनोपॉलीपेक्षाही वाईट. त्यामुळे शिवसेना किमान आहे तितकी बळकट राहणे गरजेचे आहे.
>>आणि महाराष्ट्र्र वर दिल्ली राज्य नको

आणि महाराष्ट्र्र वर दिल्ली राज्य नको

ह्या वाक्याचा अर्थ असा आहे इथे जो पक्ष सत्तेवर
असेल तो स्थानिक पक्ष असावा.
आणि त्या पक्षाचा अध्यक्ष मराठी व्यक्तीचं असावा.
बाकी राज्य घटनेनुसार राज्यावर केंद्राचा घटनेत सांगितले आहे त्या कलमं नुसार अंकुश असतो ते महाराष्ट्र नाकारत नाही

आमच्या घराण्यात इतके पंतप्रधान झाले, पण मोदींसारखा कुणी झाला नाही.

असे तो वरूण भकला होता,

ह्याच्या घरचे पंतपधान मोदी होऊन फाफलत फिरले असते तर हे वरूणजी उपजले असते का ?

*भाजपात दत्तक व सावत्र पुत्रांना न्याय मिळतो, मी तर पक्षातच जन्माला आलोय – खडसे*

टीम महाराष्ट्र देशा : ‘भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांना न्याय मिळतो. दत्तक व सावत्र पुत्रांना न्याय मिळतो, मग मी तर पक्षातच जन्माला आलोय. 1980 पासून पक्षाच्या स्थापनेपासून काम करतोय. इथंच लहानाचा मोठा झालो. त्यामुळं पक्ष मला दूर लोटणार नाही. नक्कीच न्याय देईल,’ अशी आशा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे.

https://wp.me/p88Veq-oVU

शिवसेना नेतृत्व परिपक्व नाही
मीडिया समोर एवढं मूर्खपणा देशातील कोणताच राजकीय पक्ष
करत नाही .
Bjp नी खरोखर सरकार मध्ये सामील होण्याचे नाकारले तर सेना तोंडावर पडेल
शरद पवार हे राजकारण्यांचे बाप
आहेत त्यांचा पाठिंबा घेवून सेना सत्ता स्थापन करू म्हणत असेल तर त्या सरकारचे कर्तेधरते पवार असतील उध्दव नाही .

मीडिया समोर एवढं मूर्खपणा देशातील कोणताच राजकीय पक्ष
करत नाही .

केजरि वाल
कुस्वम्स्वामि

सेना भाजप नाटकाचे रोज नविन प्रवेश रंगत आहेत.. पडदा पडेपर्यंत नेमकी शेवट कसा होणर आहे हे बहुदा कुणालाच माहित नाही.
पण एकूणात अवस्था वाईट आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचा एव्हाना दोन्ही पक्षांवरील ऊरला सुरला भरवसा संपत आला असेल हेही नक्की.
वर्षानुवर्षे ऊपाशी/भुकेले असलेल्या माणसापुढे अचानक पंच पक्वांनाचे ताट ठेवले तर नेमके काय करावे हे त्याला कळत नाही तशी सेनेची अवस्था झाली आहे. त्यातहि पहिला घास युवराजांनी घ्यायचा की वडीलांनी ईथेच अडकून पडलेले दिसतात. सेना ही आजही 'संघटने' सारखी वागते आहे, तीचा एक सुद्रूढ, सुनियंत्रीत 'पक्ष' कधी होईल असे वाटत नाही. वडापाव, १० रू. जेवण, या पलिकडे सेनेकडे कधी कुठली 'व्हिजन' वा सुधारणा धोरणे असल्याचे आठवत नाही. कायम कुठल्यातरी न्यूनगंडात वावरणे हा सेनेच इतीहास काही बदलत नाही.
याऊलट भाजपा चा प्रवास मात्र प्रगल्भतेकडून प्रभंजनाकडे सुरू आहे का अशी शंका येते. मोदींची हवा, आमदार जोड तोड, सत्तेचा अहंकार ई.
दोन्ही पक्षी मात्र स्थानिक पातळीवर मुत्सद्दीपणा व हितचिंतनाची वानवा आहे. त्यातच स्वतःलाच बाळासाहेब समजणारे महाशय रोज ऊठून नविन वल्गना करत आहेत त्यामूळे विरोधक, ईतर, व सत्तापिपासूंसाठी मात्र एकच जत्रा भरली आहे. यातील कुणालाही महाराष्ट्राच्या भल्याचे काडीचेही पडलेले नाही. त्यांना फक्त सेना भाजप यांच्या भांडणात जमले तर स्वताचे भले करून घ्यायचे आहे. यात मिडीया सकट सर्वच आले.
जो पर्यंत हा धुरळा खाली बसत नाही तो पर्यंत मात्र सामान्य माणसाच्या मनातील लोकशाही वरील हतबलता, ऊद्वेग, चीड, मात्र दिवसेंदिवस वाढत जाणार हे फारच मोठे नुकसान ठरेल.
लांडग्यांच्या मदतीने डरकाळ्या फोडणारा सेनेचा वाघ बघावा लागेल असे महाराष्ट्रातील जनतेला कधीच वाटले नसेल. हे असेच सुरू राहिले तर स्व. बाळासाहेबां ची पुण्याई फार काळ या वाघाला पुरे पडेल असे वाटत नाही.
तसेच पूर्वापार धुर्त, व सुजाण नेत्रूत्व देणार्‍या भाजपा कडेही मित्र पक्षांबरोबर सामंजस्य राखून चांगले सरकार देणारे प्रगल्भ नेत्रूत्व नाही हे देखिल महा च्या पचनी पडणे अवघड आहे.

कुणाची पापणी पहिले लवते (who winks first) अशा या खेळात जनतेचे डोळे मात्र चांगलेच चुरचुरले असेच म्हणावे लागेल.

>>> सेना ही आजही 'संघटने' सारखी वागते आहे, तीचा एक सुद्रूढ, सुनियंत्रीत 'पक्ष' कधी होईल असे वाटत नाही. वडापाव, १० रू. जेवण, या पलिकडे सेनेकडे कधी कुठली 'व्हिजन' वा सुधारणा धोरणे असल्याचे आठवत नाही. कायम कुठल्यातरी न्यूनगंडात वावरणे हा सेनेच इतीहास काही बदलत नाही.
याऊलट भाजपा चा प्रवास मात्र प्रगल्भतेकडून प्रभंजनाकडे सुरू आहे का अशी शंका येते. मोदींची हवा, आमदार जोड तोड, सत्तेचा अहंकार ई.
दोन्ही पक्षी मात्र स्थानिक पातळीवर मुत्सद्दीपणा व हितचिंतनाची वानवा आहे. >>>

+ १

आज एक फॉरवर्ड आलय..

एक न घडणारे राजकीय भविष्य :

१) भाजपाने स्वतः हून सत्तेवरील दावा सोडून द्यावा. थेट वाजपेयींच्या पद्धतीने. म्हणजे सरकार स्थापनेचा प्रस्ताव राज्यपालांना द्यायचा. सरकार स्थापन्न करायचे आणि विश्वासमत प्रस्तावाच्या वेळी आमचे नंबर्स नाहीत म्हणून राजीनामा द्यायचा..
तो देताना सेनेने पडद्याआड केलेल्या सगळ्या उचापती राज्याच्या लोकांच्या समोर मांडायच्या. आणि मग सेनेला आव्हान द्यायचे आम्ही बाजूला बसलो आता दाखवा सरकार बनवून.
या गोष्टीने सेना सामन्यांच्या नजरेतून कायमची उतरेल.
या शिवाय सेनेला केंद्रातून सत्तेतून हाकलून द्यायचे, मुंबई मनपा मधील पण पाठींबा काढून घ्यायचा.
राज्य सरकार ताब्यात घेण्याची सेनेला सज्जड किंमत चुकवावी लागली पाहिजे.
२) मग सेना राष्ट्रवादी आणि कोन्ग्रेस आघाडी करून सत्तेवर आले तरी त्यांचा नैतिकतेचा बुरखा आधीच फाडला गेला असेल.
त्यामुळे ते सरकार चालेल पण किती या बद्दल कायम प्रश्नचिन्ह असेल.
३) या परिस्थितीत सरकार बनवता राष्ट्रवादी आणि कोन्ग्रेस, सेनेची अक्षरशः लचके तोडतील. आदुबाळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीही होऊ शकणार नाही.
४) पुढील निवडणुकीत भाजपा स्वबळावर सत्ता हक्काने मागू शकेल.
५) सेनेच्या शेवटाची सुरुवात होईल.
६) जरी हे सरकार ५ वर्ष टिकले तरी पर्वा इल्ले. भाजपा ने पाच वर्षात ताकद वाढवावी.
७) जर या तिन्ही पक्षांनी हिम्मत केली नाही तर ६ महिने राष्ट्रपती राजवट आणि मग निवडणुका. या सहा महिन्यात केंद्राचा निधी ओतून भाजपा लोकांचे मन जिंकू शकते.
८ ) पुढील निवडणूक भाजपा सेना वेगवेगळी लढतील , लोकांना सुद्धा निर्णय घेणे सोपे जाईल.

हे होणे कठीण आहे पण असे जर झाले तर महाराष्ट्राचे राजकारण कायमचे घराणेशाही मुक्त होऊन जाईल...

>>म्हणजे सरकार स्थापनेचा प्रस्ताव राज्यपालांना द्यायचा. सरकार स्थापन्न करायचे आणि विश्वासमत प्रस्तावाच्या वेळी आमचे नंबर्स नाहीत म्हणून राजीनामा द्यायचा..<<
सद्ध्यासारखी दोलायमान स्थिती असताना, आमदारांची संख्या (सह्या) कागदावर दाखवल्याशिवाय राज्यपाल सरकार स्थापु देतात काय? सभागृहात पाठिंबा सिद्ध करणं वगैरे हि पुढची गोष्ट. आणि तुमच्या मतानुसार फडणवीसांनी तसं केलंच, तर त्यांच्यात आणि त्या बिचुकलेत फरक काय?.. Wink

सेनेला सरकार बनवू देणे.
Bjp नी बाहेरून पाठिंबा द्यावा सत्तेत सहभाग घेवू नये.
सेने कडून असंख्य चुका होतील आणि जनतेच्या रोषास बळी पडेल सेनेचा.
आणि घडी घडी विधानसभेत धन विधेयक रोकता येतील .

सद्ध्यासारखी दोलायमान स्थिती असताना, आमदारांची संख्या (सह्या) कागदावर दाखवल्याशिवाय राज्यपाल सरकार स्थापु देतात काय?>>>>>

2014 इतक्यात विसरलात?
तेव्हा तर सभागृहात सुद्धा नेमकी किती मते आहेत हे कळले नव्हते

नाहि आठवत. तसं असेल तर फडणवीसांनी वर दिलेला भागवतांचा सल्ला मानुन ते बिचुकले नाहित हे दाखवुन द्यावं... Happy

2014 मध्ये शिवसेनेचा पाठिंबा नव्हता,
पवारांनी पहिल्या दिवशीच पाठिंबा जाहीर केला होता,
मात्र राज्यपालांकडे दिलेल्या पत्रात केवळ bjp आमदारांच्या सह्या होत्या.

सभागृहात विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने पास झाला, नेमक्या किती आमदारांचा पाठिंबा आहे हे गुलदस्तातच राहिले.

तेव्हा पुरेशी संख्या असल्याशिवाय राज्यपाल सरकार स्थापू देतील का? हा प्रश्न उपस्थित होऊ नये

Pages