शिव सेनेचे काय होणार ?

Submitted by हस्तर on 31 October, 2019 - 09:13

ज्या पद्धतीने हट्टी पणा आणि बोलघेवढे पण चाललंय भाजप वाले चिडलेले असणारच
राजकारणात कोणी पण शत्रू मित्र नसते पण इथे बलाढ्य माणूस समोर आहे
खडसे ,चिक्कीताई सगळ्यांचे पत्ते साफ केले आपलेच असून हे तर दुसऱ्या पक्षाचे आहे
वर जनतेचे मनोरंजन होत आहे पण मुद्दाम केल्यासारखे आता वाटत नाही ,दिल्ली वरून पण महाराष्ट्र्र चे सरकार हरण्याना पेक्षा उशिरा (मग काही पण कारण असो ) होत आहे हे दिसतेय ,थोडक्यात महाराष्ट्र भाजपचा वट कमी आहे असे लोकांना वाटतेय
२०१४ मध्ये बाळा साहेबांची पुण्याई होती आणि २०१९ मध्ये लोकल प्रश्नांनाची ढीलाइ त्यामुळे टिकली पण २०२४ मध्ये शिवसेना असेल का ? कारण काही झाले तरी भाजप खच्चीकरण करणारच ,मुद्दाम मंत्रिपद ना देऊन ( आयारामानं मात्र दिले ),पुण्या मुंबईत जागा ना देऊन बोळवण केली आता भाजप अजून करणारच

जर शिव सेने मागण्यात तडजोड केली तर मानसिक खच्ची करण होईल ,अडून बसली आणि मागण्या पुंर्ण नाही झाल्या तर हसे होईल

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>शिवसेना आल्यावर मला दहा रुपयात पोटभर जेवण पाहिजे. <<

अहो युतीत असताना दिलेली आश्वासने आघाडीत गेल्यावर पाळायची नसतात! Wink

बावळट लेकाचे ! सारख्या आपल्या बैठका घ्यायच्या, आमच्या ह्या अटी आणी तुमच्या त्या अटी. अरे चाललय काय? जनतेने निवडुन दिले ना तुम्हाला, जनतेची सेवा करणार आहात ना? मग अटी कशाला घालता फुकणीच्यांनो . तुम्ही जनतेसाठी नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी बैठका घेताय. Angry

एकदाचे काय करायचे ते करा, शपथा घ्या, अटी मान्य करा आणी या सत्तेत. भुक्कड कुठले ! Angry

भुक्कड काय त्यात? तुमच्या दुर्दैवाने का होईना पण हीच ती खरी लोकशाही. कुणा एका पक्षाची वा व्यक्तीची सत्ता नाही. तसेही आपल्या देशात सक्षम विरोधीपक्ष वगैरे गोष्टी कधी नव्हत्याच. हे असे त्रांगडे असणारे सरकार खरेतर बरी कामे करणार (हवे तर इतिहास पहा) कारण यांचा वेळ एकमेकांचे पाय खेचायची संधी शोधण्यात जास्त जाणार. त्यामुळे चुका कमी आणि कामेही स्लो बट स्टर्डी. विरोधी पक्षाची गरजच काय? Wink
तसेही लोकांना बिजेपी कायम विरोधी पक्षात असावा असेच वाटते. कारण ते कुठेही काहीच करत नाहीत मग सत्तेत असण्यापेक्षा विरोधात बरे.

तसेही लोकांना बिजेपी कायम विरोधी पक्षात असावा असेच वाटते. >>> कुठल्या लोकांना ?

>>तसेही लोकांना बिजेपी कायम विरोधी पक्षात असावा असेच वाटते.<<

हो हो, अगदी बरोबर!
म्हणूनच तर स्पष्ट बहुमत दिले.

मला वाटते
बीजेपी 2 खासदार

अहाहा!!

बाकी संजय राऊत जी हॉस्पिटल मधून धडधाकट व स्वस्थ होऊन परतले हे ऐकून आनंद झाला. त्यांची प्रक्रूती ऊत्तम राहो, सामना मध्ये अजून खूप लिखाण करायचे आहे.
फक्त ज्या सहजतेने व सुलभतेने ते स्वताच्या पायांवर हॉस्पिटल मध्ये दाखल झाले, आणि थेट अँजियोप्लास्टी ऊरकून पुन्हा स्वताच्या पायांवर परत आले, आणि धडक मुलाखती व लिखाणाचा जोर सुरू केला, शिवाय खुद्द हॉस्पिटल मध्ये देखिल नेते मंडळींच्या भेटी झाल्या हे सर्व पाहता अचंबीत व्हायला झाले. अँजियो चे भले भले रूग्ण तर किमान एक आठवडा वा महिना संपूर्ण प्रक्रियेतून स्वस्थ होईपर्यंत लागतात हे माहित आहे. (from pre checks, to admission, to procedure, to recovery, to post recovery, to normal life!)
मुंबई बाहेर नुसते एखादा विकांत ट्रीप करायचे ठरवले तरी किती आटापिटा करावा लागतो !

असो. सेना सत्तेत आल्यावर सर्व सामांन्यांचे दैनंदीन आयुष्य देखिल असेच सहज सुलभ होईल अशी आशा करूयात. अह्च्छे दिन येणार बहुतेक.

नवी दिल्ली : सरकार स्थापन करण्यासाठी एका-एका जागेला किती महत्त्वं असतं याचा अनुभव महाराष्ट्र सध्या घेतच आहे. राज्यात ५६ जागा असणाऱ्या शिवसेना आणि सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजप यांचं मुख्यमंत्रीपदावरुन बिनसलं. पण हीच भाजपा हरियाणात दबावात असल्याचं चित्र आहे. कारण, १० आमदार असलेल्या पक्षाला हरियाणातील भाजपने ११ महत्त्वाची खाती दिली आहेत. त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने भाजपला हरियाणात जननायक जनता पार्टी (जेजेपी) चा आधार घ्यावा लागला.

बाकी संजय राऊत जी हॉस्पिटल मधून धडधाकट व स्वस्थ होऊन परतले हे ऐकून आनंद झाला. त्यांची प्रक्रूती ऊत्तम राहो, सामना मध्ये अजून खूप लिखाण करायचे आहे.
फक्त ज्या सहजतेने व सुलभतेने ते स्वताच्या पायांवर हॉस्पिटल मध्ये दाखल झाले, आणि थेट अँजियोप्लास्टी ऊरकून पुन्हा स्वताच्या पायांवर परत आले, आणि धडक मुलाखती व लिखाणाचा जोर सुरू केला, शिवाय खुद्द हॉस्पिटल मध्ये देखिल नेते मंडळींच्या भेटी झाल्या हे सर्व पाहता अचंबीत व्हायला झाले. अँजियो चे भले भले रूग्ण तर किमान एक आठवडा वा महिना संपूर्ण प्रक्रियेतून स्वस्थ होईपर्यंत लागतात हे माहित आहे. (from pre checks, to admission, to procedure, to recovery, to post recovery, to normal life!)>>>>>>>> अहो ते साधेसुदे संजय नाहीत तर आधूनीक महाभारताच्या धृतराष्ट्राचे संजय आहेत. ठाण्यात म्हणे अशी अफवा ( अफवा की खरे खोटे देव जाणे ) पसरली होती की पिटले जाण्याच्या भितीने ते इस्पितळात दाखल झाले.

२ दिवसात बाबाजी आय शी यु तुन बाहेर? हायला, आमच्या पेशंटला आठवडा लागला संजय पेक्षा कमी वय असुनही.

>>ठाण्यात म्हणे अशी अफवा ( अफवा की खरे खोटे देव जाणे ) पसरली होती की पिटले जाण्याच्या भितीने ते इस्पितळात दाखल झाले.
आता खरे खोटे करायचे तर आरटीआय खाली डीटेल्स मागवावे लागतील. ! जाने भी दो यारो! Proud

बाळासाहेबांची शपथ, खोटे बोलणार नाही,

बाळासाहेब तर कधीच मेलेत, मग आता त्यांची शपथ घेऊन काय फायदा?

>>बऱ्याच लोकांना बरच काही वाटत असतं. असो, खालील लिंक वर १३ ऑक्टोबर रोजी दिलेल्या अमित शहांच्या मुलाखतीतील भाग पहा.
https://www.facebook.com/sumuvai/videos/3209057992500016/
Submitted by मी-माझा on 12 November, 2019 - 22:50<<

आता तुम्ही सुद्धा हि लिंक बघा, लोकसभा निवडणुकिच्या वाटाघाटि नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेची आहे. फडणविस १३व्या मिनिटां नंतर आणि उठा २७व्या मिनिटांनंतर काय बोलले ते बघा. अमित शहा हि आहेत तिथे...

निवडुन आल्यानंतर पद आणि जबाबदार्‍या यांत समानता राखण्याचा निर्णय आम्हि घेतलेला आहे...

आता सांगा, खोटारडा कोण आहे?..

महाराष्ट्रात भाजपा -शिवसेनेत सत्तास्थापनेवरून एकमत न झाल्यामुळे आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे. तसेच, शिवसेनेने एनडीएची साथ सोडत सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर महाशिवआघाडी निर्माण केली असल्याचा पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी शिवसेनेसह शिवसेना नेते व संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

राम माधाव यांनी शिवसेना आणि भाजपमधील सध्याच्या संबंधांवर भाष्य करताना, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे ‘जोसेफ गोबेल्स’ असल्याची खोचक टिप्पणी केली आहे. याचबरोबर त्यांनी शिवसेनेला भविष्यात पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये स्थान मिळेल, ही शक्यता मावळल्यात जमा असल्याचेही सांगितले आहे. सीएनएन-न्यूज १८ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

------

पण हिटलर तर हिंदुत्ववाद्यांना साक्षात हेडगेवारासमान ना ?

आणि आता एकमेकांना गोबेल्स बोलतात ?

-------

अफझलखान बोलून झाले
दुर्योधन बोलून झाले
आता गोबेल्स ?

पद आणि जबाबदार्‍या यात समानता हे एक जनरल- जेनेरिक विधान आहे. २.५ वर्ष मुख्यमंत्री- हे खूप स्पेसिफिक आहे. ते भाजपवाले बोलले नाहीयेत.

आणि सेनेनेही प्रचारात किंवा भाषणात किंवा सामन्यात कुठेही म्हटलेलं दिसलं नाही की आमच्या कितीही जागा आल्या तरी २.५ वर्ष आमचा सीएम असणार आहे. आदित्य किंवा उध्दवला २.५ वर्षचा सीएम म्हणून प्रचारात प्रोजेक्ट करुन , लोकांना कम्युनिकेट करुन ही मागणी केली असती तर गोष्ट वेगळी होती.
अर्थात भाजपचा माज उतरवण्यासाठी सेना-आघाडी सरकार झाल्यास त्यात आनंदच आहे पण इथे उध्दवनी मतदारांना वेडयात काढलंय हेही खरं. 'मी अडिच वर्ष सीएम असणार' हे सांगून मतं मागणं हा प्रामाणिकपणा झाला असता.

>>> आणि सेनेनेही प्रचारात किंवा भाषणात किंवा सामन्यात कुठेही म्हटलेलं दिसलं नाही की आमच्या कितीही जागा आल्या तरी २.५ वर्ष आमचा सीएम असणार आहे. >>>

उद्धव व इतर नेत्यांनी प्रचारात अनेकदा हे सांगितलंय. फेब्रुवारी २०१९ मध्ये शहा-फडणीस-उद्धव यांच्या एकत्रित पत्रकार परीषदेच्या दुसऱ्याच दिवशी ज्याचं संख्याबळ जास्त त्यांचाच मुख्यमंत्री हे सूत्र मी शहीबरोबरील चर्चेत मान्य केलेले नाही व सर्व जागा, पदे समसमान वाटून घेण्याचे मान्य झाले असून शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट होऊन शिवसेना झिंदाबादच्या घोषणा झाल्या होत्या. यानंतरही अनेकदा अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची घोषणा उद्धवने केली होती. त्यावेळी भाजप गप्प राहिला.

जे काय शहा-उद्धवमध्ये ठरलं होतं ते दोघांनीही कधीच स्पष्टपणे न सांगितल्याने आता वाद निर्माण झाला आहे.

ज्या दोन पक्षांनी 20 वर्षे राम मंदिरासाठी समाजात फूट पाडली , बाबरीचा निकाल लागला अन त्यांच्यातच इतकी मोठी फूट पडली.

ही बाबराची पनवती का ?

वॉर्डबॉयची मजल पनवती पलिकडे जात नाही. मुळातच सर्व गोष्टी आवाक्याबाहेर असल्याने पनवती शोधणं स्वाभाविक आहे.

नवीन Submitted by पुरोगामी on 14 November, 2019 - 12:05 >> हे ठाकरेंनी फडणवीस आणि शहांसमोर जाहीर सभेत म्हंटले आहे का? ह्या बढाया आमच्याकडे १७५ आमदार आहेत ह्यासारख्या स्वांतसुखाय नाहीत हे कसे समजायचे.
'मीच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार' हे फडणवीस प्रचार सभांमध्ये (भाजप कार्यकर्त्यांसमोर नाही) म्हणत असतांना ठाकरेंनी आक्षेप का नाही घेतला असेही विचारता येईल.

ज्या दोन पक्षांनी 20 वर्षे राम मंदिरासाठी समाजात फूट पाडली , बाबरीचा निकाल लागला अन त्यांच्यातच इतकी मोठी फूट पडली.

बाबराची पनवती हा शब्दप्रयोग आवडत नसेल तर ह्याला काव्यगत न्याय किंवा पोएटीक जस्टीस म्हणता येईल

>>पद आणि जबाबदार्‍या यात समानता हे एक जनरल- जेनेरिक विधान आहे. २.५ वर्ष मुख्यमंत्री- हे खूप स्पेसिफिक आहे. ते भाजपवाले बोलले नाहीयेत.<<
ठिक आहे, आता यापुढे सगळ्या राजकिय पक्षांना त्यांच्या अंतर्गत वाटाघाटिचे मिनिट्स पब्लिश करायला लावुया, लगे हाथो नोटराय्ज्ड हि करायला भाग पाडुया... Lol

>>'मीच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार' हे फडणवीस प्रचार सभांमध्ये (भाजप कार्यकर्त्यांसमोर नाही) म्हणत असतांना ठाकरेंनी आक्षेप का नाही घेतला असेही विचारता येईल.<<
आता शब्द्च्छल मांडलाच आहे तर - फडणविसांनी तरी कुठे म्हटलेलं मी संपुर्ण ५ वर्षं मुमं होणार ते. सेना समजली असेल ते फक्त २.५ वर्षांबाबत छातीठोकपणे म्हणत आहेत... Wink

शिवसेनेला मिळणारी मते महाराष्ट्रात १४ ते १६ टक्क्यांच्या रेंजमध्ये गेली ३० वर्षे राहिली आहे. त्या तुलनेत भाजपाला मिळणारा आकडा वाढत गेला आहे, विशेषतः मागल्या दोन निवडणुकात.

मी तपशिलात पाहिले नाही तरी अंदाज करू शकतो की शिवसेनेला मिळणार्‍या जागा या मुख्यत्वेकरुन मुंबई/ठाणे/नाशिक्/औरंगाबाद पट्यातल्या असतील. भाजपा आता महाराष्ट्रभर पसरला आहे. भाजपाबरोबर राहिल्याने शिवसेनेला या पट्ट्याबाहेरील प्रदेशात किमान थोडे अस्तित्व मिळत होते. ऑनलाइन्/माबोवरील प्रतिक्रिया पाहिल्या तरी शिवसेनेला सहानुभुती, शिवसेनेचा अनुभव हा मुंबई/ठाणे/कल्याण व कोकण भागातील लोकांकडूनच दिसतो. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागात लोक शिवसेनेला 'मराठी' वा महाराष्ट्राचा प्रादेशिक पक्ष म्हणून ओळखत नाहीत. इतर राज्यांतील अनेक प्रबळ प्रादेशिक पक्षांना राज्यभर पाठिंबा आहे. जसे तृणमूल बंगालमध्ये वा तेलुगु देसम/वायएसआर हे आन्ध्रात वा बिजु जनता दल हा ओरिसात वा द्रमुक-अण्णाद्रमुक तामिलनाडुत राज्यभर पसरलेले आहेत व त्या राज्यांचे प्रादेशिक पक्ष असे त्या राज्यातील मतदारांत ओळखले जातात.

भाजपाशी फारकत घेतल्याने त्यांना पक्षाचे प्रभावी क्षेत्र वाढवता येईल याची काही लक्षणे दिसत नाहीत. तसे शक्य असते तर ते यापुर्वीच झाले असते.

तेव्हा येत्या काळात या फारकतीमुळे शिवसेनेला त्यांच्या १४-१६%चा मतदार पाया मुंबई-ठाणे परिसरात पक्का करता येईल का?
उर्वरीत महाराष्ट्रात काँ/राकाँ त्यांना पाय पसरण्यास मदत करेल का? काँ/राकाँचा पारंपारीक मतदार शिवसेनेशी आयडेंटिफाय करणे अजूनच अवघड आहे (भाजपाच्या मतदारांना ते सोयीचे होते).
फक्त मुंबई-ठाणे परिसरात राहिल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर अजूनच कमी होईल का?
की भाजपापासून फारकत घेतल्याने भाजपाचा पारंपारीक मतदार शिवसेना स्वतःकडे खेचू शकेल?

सेना समजली असेल ते फक्त २.५ वर्षांबाबत छातीठोकपणे म्हणत आहेत... >> म्हणजे जसं राज्यापालांकडे जातांना फक्त willingness to form government पुरेसा आहे त्यात मिनिमम १४५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा पुरावा दाखवण्याची गरज नसते असे सेना समजली तसंच का? Lol
पुन्हा बाळाराजे छातीठोक पणे म्हणत आहेत आम्हाला विलिंगनेस मागितला तो आम्ही दिला आता हे पाठिंब्याच्या पत्रांचं झेंगाट काय काढलं राज्यपालांनी काय माहित. मग आम्ही त्यासाठी अजून टाईम मागितला तर नाहीच म्हणायले Proud

>>> हे ठाकरेंनी फडणवीस आणि शहांसमोर जाहीर सभेत म्हंटले आहे का? >>>

कोणासमोर काही म्हटल्याने ते कायदेशीर ठरते का? जागा, पदे व जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप हे फडणवीस व उद्धव या दोघांनीही शहांच्या उपस्थितीत फेब्रुवारी २०१९ मध्ये पत्रकारांसमोर सांगितले होते. आम्ही डब्यातील लाडू समसमान वाटून घेणार आहोत, याचा अर्थ डब्यातील १० लाडू्ंपैकी ५ मी दुसऱ्याला देणार असा अर्थ होत नाही, या शब्दांच्या खेळाला काहीही अर्थ नाही. नक्की काय ठरले होते ते दोघांनीही स्पष्ट न ठरविल्याने हा वाद निर्माण झाला आहे.

>>> आता शब्द्च्छल मांडलाच आहे तर - फडणविसांनी तरी कुठे म्हटलेलं मी संपुर्ण ५ वर्षं मुमं होणार ते. सेना समजली असेल ते फक्त २.५ वर्षांबाबत छातीठोकपणे म्हणत आहेत... >>>

हेच म्हणतोय. अजून शब्दाचा खेळ करायचा तर - मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून परत येणार किंवा २०१९ मध्ये परत येणार असं कुठं म्हटलंय असा वकिली प्रश्न विचारता येईल.

>>> 'मीच पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार' हे फडणवीस प्रचार सभांमध्ये (भाजप कार्यकर्त्यांसमोर नाही) म्हणत असतांना ठाकरेंनी आक्षेप का नाही घेतला असेही विचारता येईल. >>>

उद्धवने सुद्धा सेनेचा अडीच वर्षे मुख्यमंत्री हे प्रचार सभांमध्ये (सेना कार्यकर्त्यांसमोर नाही) म्हणत असताना फडणवीसांनी आक्षेप का नाही घेतला असेही विचारता येईल.

Pages