शिव सेनेचे काय होणार ?

Submitted by हस्तर on 31 October, 2019 - 09:13

ज्या पद्धतीने हट्टी पणा आणि बोलघेवढे पण चाललंय भाजप वाले चिडलेले असणारच
राजकारणात कोणी पण शत्रू मित्र नसते पण इथे बलाढ्य माणूस समोर आहे
खडसे ,चिक्कीताई सगळ्यांचे पत्ते साफ केले आपलेच असून हे तर दुसऱ्या पक्षाचे आहे
वर जनतेचे मनोरंजन होत आहे पण मुद्दाम केल्यासारखे आता वाटत नाही ,दिल्ली वरून पण महाराष्ट्र्र चे सरकार हरण्याना पेक्षा उशिरा (मग काही पण कारण असो ) होत आहे हे दिसतेय ,थोडक्यात महाराष्ट्र भाजपचा वट कमी आहे असे लोकांना वाटतेय
२०१४ मध्ये बाळा साहेबांची पुण्याई होती आणि २०१९ मध्ये लोकल प्रश्नांनाची ढीलाइ त्यामुळे टिकली पण २०२४ मध्ये शिवसेना असेल का ? कारण काही झाले तरी भाजप खच्चीकरण करणारच ,मुद्दाम मंत्रिपद ना देऊन ( आयारामानं मात्र दिले ),पुण्या मुंबईत जागा ना देऊन बोळवण केली आता भाजप अजून करणारच

जर शिव सेने मागण्यात तडजोड केली तर मानसिक खच्ची करण होईल ,अडून बसली आणि मागण्या पुंर्ण नाही झाल्या तर हसे होईल

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy

मला वाटते की राष्ट्रपतीराजवट येऊ द्यावी, नंतर काही काळाने निवडणुका होत असल्यास होऊ द्याव्या, निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेने युती करावी पण त्याआधी सगळ्या अटीशर्ती रीतसर कबूल होऊन कागदपत्र बनवले जावे. ते कुठेतरी एखाद्या नि:पक्ष माणसाच्या सुरक्षित तिजोरीत चोख सुरक्षाव्यवस्थेत ठेवावे . म्हणजे मग हा अडीजकीचा कठिण पाढा घोटावा लागणार नाही.

>>निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेने युती करावी<<

मला नाही वाटत की भाजपावाले आता इतक्यात लगेच परत सेनेला वाऱ्याला उभे करतील

सेने चा खेळ खल्लास!
ऊध्दव जी, नी बॅट हातात घेण्यापूर्वीच पंचांनी सामना रद्द केला कारण ते दोन रनर आलेच नाहीत...! हाय रे दैवा! आता राष्ट्रवादी व काँ बरोबर जायचे तर पुरताच खेळ फसलेला.. तेलही गेले तूपही गेले, धुपाटणेही गेले... हाती राहिलाय फक्त दात नसलेला वाघ.
केविलवाणा शब्द ईथे तोकडा वाटतोय. आदित्य ठाकरे यांना पहिलाच पेपर आ ऊ ट ऑफ पोर्शन आला. पुढील वाटचाल महा अवघड ठरणार. आणि आधार गट शिल्लक असेल का हे सांगणे कठीण आहे.
राहिला प्रश्ण सराकर स्थापनेचा मला तर असे वाटते आहे राष्तर्पती राजवट येणार.. एकाच महिन्यात सेने चे अनेक आमदार फुटून भाजपा मध्ये जातील. आणि मग भाजप आपल्या टर्म्स वर ठरवेल की सरकार स्थापन करायचे का फेर निवडणूका..

सरकार स्थापनेच्या दाव्या आधी भाजपाने राज्यपालांची 'तांत्रिक व कायदेशीर' बाबीं बाबत अडिच तास चर्चा केली होती. तेव्हाच कळून चुकले होते की थे ग्रेट चाणक्य अमित शाह यांनी हे जाणले असेल की पुढचे चित्र कसे रंगणार आहे. आणि भाजपा ने सत्त स्थापनेचा दावा न करण्याचा निर्णय हा पुन्हा एक मास्टरस्ट्रोक ठरण्याची लक्षणे आहेत. तो पर्यंत या रोजच्या सर्कशीत अजून काय घडते कोण कोण रिंगणात फिरतय. कोण जोकर ठरतय हे पुढील काही दिवस ऊलगडत जाणार आहे... अचानक मिडीया कं ला भारी खमंग कंटेंट मिळालाय आणि ते संधी पुरेपूर वसूल करत आहेत.
एक बरे झाले या सर्कशीने मात्र सर्वच पक्षांना व नेत्यांना अक्षरशः नंगे केले आहे. ईस हमाम मे सभी नंगे है...!
मतदार पुढील वेळेस अधीक जागृकतेने मतदान करेल हेच काय ते या सर्कशीचे फलित.

आमचे मधले काका जे कधी काळी कॉंग्रेस मध्ये कार्यरत होते व पिंपरी चिंचवड मधून अनेक वेळा निवडून आले होते त्यांनी एका वाक्यात सद्य परिस्थिती बद्दल प्रतिक्रीया दिली:
Politics is full of tense, yet it only recognises Present Tense!
तर आमचे चुलत सासरे 'सर' ऊर्फ मा. मनोहर जोशी (यात कुठेही फुशारकी मारण्याची ईच्छा नाही, कृ. वैयक्तीक प्रतीसाद नकोत) नेहेमी म्हणायचे की मा. बाळासाहेबांकडे एक अत्युत्तम सिध्धी होती ती ही की राजकीय बुध्दीबळातील पटावर प्यादी, घोडे, हत्ती यांना अचूक ओळखून कधी कुणाचा वापर कुठे करायचा हे त्यांना अचूक ठाऊक होते.
दुर्दैवाने सेनेत आज बुध्दी आणि बळ दोन्हीची वानवा आहे...!

गंमत म्हणजे एके काळी माझे ज्येष्ट काका भाजप (संघ) मधून काम करायचे ... आजही वयाच्या ८९ वर्षी सक्रीय असतात.. राजकारण नाही पण संघा बरोबर ईतर सर्व समाजाभिमुख कामे करणे यात त्यांनी आयुष्य वेचले, स्वतः एक ऊच्च दर्जाचे मुंबई हाय कोर्टात वकील असून देखिल. एके काळी हे काका व त्यांचे कनिष्ट बंधू (वर ऊल्लेखलेले पिंपरी चिंचवड मधील माझे काका) हे एकमेका विरोधात म्हणजे पक्षाच्या प्रचार करत असत... त्यांच्या बरोबर आम्ही फॅमिली गेट टु गेदर ला जमलो की धम्माल यायची.. गप्पा गोष्टि, एक मेकांची खेचणे... आणि निघताना चिंचवड चे काका मोठ्या काकांच्या पाया पडून 'विजयी' भव चा आशीर्वाद घेत असत. घरात एकच कुटूंब पण फिल्ड मध्ये पक्षांची तात्विक लढाई. पण तो काळ वेगळा होता. कधिही कुणाची पातळी वा पत घसरली नाही. दोन दिले दोन घेतले.. अट्टहास नाही, दुस्वास नाही, माज नाही.

त्यांची एकच खंत आहे की पुढच्या पिढीने म्हणजे आम्ही कुणिच राजकारणात सक्रीय सहभाग घेतला नाही... परिणामी आज जे काही राजकारणाचे स्वरूप आहे त्याला आम्ही पण तितकेच जबाब्दार आहोत. खरेच आहे. असो.

५६ आमदार असताना मुख्यमंत्रीपदाचा हट्ट करून बाहेर पडणे आणि १०५ आमदार आंसणाऱ्या BJP ला मुख्यमंत्री पद न देणे म्हणजे ही आत्मघाती कोती वृत्ती आणि दूरदृष्टी नसल्यामुळे आता फसवणूक नक्की अश्या ब्लॅकमेल करणाऱ्या पक्षाला काँग्रेस राष्ट्रवादी तरी मुख्यमंत्रीपद देतील का तर नक्कीच नाही... आता हे तोंडघशी पडणार एवढेच नाही तर मुख्यमंत्रीपदाचा बालहट्ट पुरवण्याचा मदत केंद्रीय मंत्रिपद पण जाणार आणि यांचा पोटापाण्याचा व्यवसाय असणारी मुंबई महापालिका सुद्धा आता यांच्या हातातून जाणार... म्हणजे जिंकून, जनादेश असून सुद्धा जनादेश पायदळी तुळवण्याची पुरेपूर किंमत आता शिवसेनेला मोजावी लागणार... वाईट हे वाटते की या सर्वात मराठी माणसाचे मात्र जसे झाले....

IMG-20191112-WA0003.jpg

IMG-20191112-WA0008.jpg

५६ आमदार असताना मुख्यमंत्रीपदाचा हट्ट करून बाहेर पडणे आणि १०५ आमदार

शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी का हट्ट धरून बसली आहे .
काय कारण असेल ते पण वाचायला आवडेल.
मुख्यमंत्री पदासाठी bmc आणि राज्यातील सत्ता पणास लावण्या एवढी दूध खुळी आहे का शिवसेना .

आता खरोखर राष्ट्रपती राजवट येऊ द्यावी भाजपशिवसेनेने. नंतर निवडणुका होऊ द्याव्यात. पण तत्पूर्वी भाजपसेनेने युती करावी. सगळ्या अटीशर्ती व्यवस्थित ठरवून लिखापढी करून तो दस्तऐवज दोघांनाही संमत असेल अशा व्यक्ति/मंडळाकडे सुरक्षित ठेवावा. युती करून निवडणुका लढवाव्या, भरघोस मते मिळवावी आणि अडीजकी औटकीचे पाढे म्हणत सुखाने संसार करावा.

युती करून देनारे अमित शहा कुठे गायब झालेत? शिवसेना खोटं बोलत आहे , हे त्यानीं का सांगीतले नाही?

येथून पुढे जो पक्ष एकटा केंद्रात सत्ता स्थापन करण्याची इच्या ठेवतो त्याला मत नाही.
महाराष्ट्र सारख्या शांतता प्रिय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून bjp नी घटनेचाच अनादर केला आहे.
राज्यपाल हे bjp चे हस्तक असल्या सारखे वागले आहे.
राज्यावर परकीय लोकांचे राज्य(देल्ही चे राज्यासाठी परकेच)
लावून भारतीय नागरिक मधील बंधू प्रेमाच्या भावनेला अपशकून केला आहे

विनोदी नाही.
पंजाब,काश्मीर, आसाम,
नागालँड,तमिळ nadu हे विनोद विनोद म्हणून दूर गेले

खरा पुणेकर .
राज्यपाल म्हणून निःपक्ष
निर्णय राज्यपाल देवू शकले नाहीत .
त्याचा निषेध n करता.
Bjp प्रेमानी वेडे होवून samardhan करताय.
राज्यामध्ये राज्यातील लोकांचेच सरकार असले पाहिजे हे राज्य घटना कराणा अपेक्षित आहे.
देशविरोधी काम होत असेल तरच राष्ट्रपती राजवट लागू करणे योग्य आहे.
महाराष्ट्र सारख्या शांतता प्रिय देश प्रेमी राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करणे हे सत्तेचा गैरवापर आहे.
Bjp नी सत्ता स्थापन करायचा दावा केला नाही त्या मुळे त्यांना मुदत देण्याची गरज नव्हती.
पण सेने नी सत्ता स्थापन करण्याचा दावा केला होता त्यांना bjp chya राज्यपालांनी मुदत देणे गरजेचे होते.
जे चूक आहे ते चूक आहे.
बुध्दी गहाण ठेवून मत व्यक्त करण्याची majburi तुमची असेल आमची नाही .
महाराष्ट्र हा अत्यंत संवेदनशील आहे.
त्याची फळे bjp ला नक्कीच भोगायला मिळतील
टिप.
मी आता पर्यंत हिंदू वादी पक्ष म्हणून युती लाच मत दिले आहे .

>>Bjp नी सत्ता स्थापन करायचा दावा केला नाही त्या मुळे त्यांना मुदत देण्याची गरज नव्हती.
जरा अभ्यास कमी पडतो आहे.. राज्यपाल बोलावतात... तेव्हा पक्ष जातात. न बोलावता जात नाहीत.

>>त्याची फळे bjp ला नक्कीच भोगायला मिळतील
हा काय तर्क आहे? आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही (कारणे एव्हाना अख्य जगाला माहित आहेत) हे भाजपा ने लगेच २४ तसातच सांगितल्यावर देखिल आता राष्ट्रपती राजवटीचे खापर भाजपा वर? ऊध्दव व कं गेले होते ना पण सर्टीफिकेट शिवाय? किंबहुना सत्तास्थापनेसाठी (आप्ल्या युती मधिल) भाजपा सोडून अन्य सर्वांबरोबर चर्चा खलबते कोण करत होते? भाजपा ने ईतर कुणाशी चर्चा न करता सरकार स्थापन करू शकत नाही हे मान्य केले.

किंबहुना सत्तेचा घोडाबाजार होवू नये म्हणून राज्यपालांनी योग्यच पाऊल ऊचलले. आप्ले असे आहे की आपला कुणावरच विश्वास नाही... राज्यपाल, CJI, ई....
फळे सर्वांनाच भोगावी लागणार आहेत... पण मुळात हातातले सोडून हाताच्या मागे पळाणार्‍या सेने मुळे आज ही परिस्थिती आली हे सूर्यप्रकाशा एव्हडे स्वच्छ आहे. तुम्ही कुठल्या वेगळ्या बातम्या बघता का? Wink
असो. वैयक्तीक टिका नाहीये पण एकंदरीत वरील संपूर्ण प्रतीसाद/पोस्ट ही वस्तूस्थितीशी भयंकर विसंगत आहे!

एव्हडा सर्व आतातयीपणा, खटाटोप, अट्टहास, आणि राजकारणाचा भोंडला खेळून (आई मला साप दे पकडोनी... त्याचा चाबूक दे करोनी...!) देखिल शेवटी सेना ना सत्तेत, ना राज्यात, ना केंद्रात शिल्लक राहिली तर मात्र सेना संपली असे म्हणावे लागेल. (सत्तेच्या) लोण्याचा हिस्सा हाती असताना माती खाणे याचे दुसरे ऊदाहरण बहुदा ईतीहासात नसेल?
पवार, चव्हाण प्रभृतीं मध्ये सेने ला मुमं पद देणारेत? खरेच का? विश्वास बसतोय का? पहिली अडीच वर्षे स्वताकडे ठेवतील. सेनेचा पुढील अडीच वर्ष येईपर्यंत सरकार चालेल याची शाश्वती आहे का?
खरे तर हे एका अर्थी बरे झाले आहे... सत्तेत मित्रपक्षा वर त्यांच्या नेत्यांवर दर दिवसागणीक आग पाखड करणे, आपल्याच मित्र पक्षाच्या कारभारावर टीका करणे यातच सेनेने गेली पाच वर्षे घालवली. हे लोढणे असे भाजपा च्या गळ्यातून सुटणार असेल तर बरेच आहे भाजपा च्या तब्येतीसाठी. 'ऊपद्रवमूल्य' या पलिकडे सेने चा फार काही सहभाग नाही. मेट्रो=च्या कार शेड वरून देखिल बराच राडा केला. आता फक्त एकच होईल. भाजपा ने सुरू केले सर्व प्रकल्प बंद करतील.. थोडक्यात नुकसान राज्याचे आणि जनतेचे.
(आणि म्हणे राष्ट्रपती राजवट आली ती भाजपामूळे. कमाल आहे!) Happy

ह्या देशात स्थिर आणि बहुमतातील केंद्र सरकारने अत्यंत katu
अनुभव देशाला दिले आहेत आणि देशविघातक शक्तींना बळ देणारे निर्णय धुंदीत घेतले आहेत.
काँग्रेस ची पाप देश विसरला नाही .
Bjp त्याच मार्गाने जात आहे
केंद्रात कमजोर सरकार असणे हे देश हिताचे आणि राज्यांच्या हिताचे आहे हे विचारी लोकांना माहीत आहे.

Pages