शिव सेनेचे काय होणार ?

Submitted by हस्तर on 31 October, 2019 - 09:13

ज्या पद्धतीने हट्टी पणा आणि बोलघेवढे पण चाललंय भाजप वाले चिडलेले असणारच
राजकारणात कोणी पण शत्रू मित्र नसते पण इथे बलाढ्य माणूस समोर आहे
खडसे ,चिक्कीताई सगळ्यांचे पत्ते साफ केले आपलेच असून हे तर दुसऱ्या पक्षाचे आहे
वर जनतेचे मनोरंजन होत आहे पण मुद्दाम केल्यासारखे आता वाटत नाही ,दिल्ली वरून पण महाराष्ट्र्र चे सरकार हरण्याना पेक्षा उशिरा (मग काही पण कारण असो ) होत आहे हे दिसतेय ,थोडक्यात महाराष्ट्र भाजपचा वट कमी आहे असे लोकांना वाटतेय
२०१४ मध्ये बाळा साहेबांची पुण्याई होती आणि २०१९ मध्ये लोकल प्रश्नांनाची ढीलाइ त्यामुळे टिकली पण २०२४ मध्ये शिवसेना असेल का ? कारण काही झाले तरी भाजप खच्चीकरण करणारच ,मुद्दाम मंत्रिपद ना देऊन ( आयारामानं मात्र दिले ),पुण्या मुंबईत जागा ना देऊन बोळवण केली आता भाजप अजून करणारच

जर शिव सेने मागण्यात तडजोड केली तर मानसिक खच्ची करण होईल ,अडून बसली आणि मागण्या पुंर्ण नाही झाल्या तर हसे होईल

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Bjp ची वाढती लोकप्रियता रोकण्यासाठी हे विरोधी विचाराचे पक्ष एकत्र आले आहेत की आता पुरता विचार करून सत्ता मिळवण्यासाठी हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे.
काँग्रेस,राष्ट्रवादी,सेना ह्यांचे सरकार स्थापन झाले आणि चालले तर सत्तेत येण्यापासून bjp ला रोकणे यशस्वी झाले आणि एक हेतू साध्य झाला असे म्हणता येईल.
24 chya निवडणुकीत तिन्ही पक्ष युती करून bjp विरूद्ध लढतील का? ह्या तिन्ही पक्षांची मैत्री जास्त दिवस टिकेल असे कोण्ही म्हणणार नाही तशी हिम्मत च होणार नाही.

जागा, पदे व जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप हे फडणवीस व उद्धव या दोघांनीही शहांच्या उपस्थितीत फेब्रुवारी २०१९ मध्ये पत्रकारांसमोर सांगितले होते. >> हे फेब मधले आहे म्हणजे लोकसभेच्याही आधीचे ते आज किती रिलेवंट आहे माहित नाही.
पुन्हा जागांचे समसमान वाटप झालेच नाही ज्याला शिवसेनेने आक्षेप घेतला नाही म्हणजे काही कारणाने त्यांना युतीतला कमी हिस्सा मान्य होताच असे म्हणता येते. आता घटनापश्श्चात पदांवर बरोबरीचा दावा सांगतांना त्यांच्या वागण्यातला संधीसाधूपणा स्पष्ट दिसतो आहे.

व्हेन यु आर फ्रस्ट्रेटेड, डिनायल मोड किक्स इन...>> त्याला 'नेवर से नो' अ‍ॅटिट्यूडही म्हणता येईल.

ज्या दोन पक्षांनी 20 वर्षे राम मंदिरासाठी समाजात फूट पाडली , बाबरीचा निकाल लागला अन त्यांच्यातच इतकी मोठी फूट पडली.

ही बाबराची पनवती का ?

नवीन Submitted by BLACKCAT on 14 November, 2019 - 22:39 >>

पनवतीच माहित नाही पण वैचारिक अवलाद अजून शिल्लक आहे. म्हणजे त्याचे कारनामे वाचून काही लोकांचे हात त्याचे अनुकरण करण्यासाठी शिवशिवत असतील, पण कायद्यासमोर काही चालत नाही.

शहा बोलतात , बंद दाराआड ठरलेले सांगण्याची माझी प्रवृत्ती नाही,

म्हणजे ते जे सांगत फिरताहेत ते ठरले नव्हते का ?

भाजपयांचे बूड अन खुर्ची ह्यांचा तलाक व्हायची वेळ आली,

हात शिवशिवून काय करणार ?

म्हणजे ते जे सांगत फिरताहेत ते ठरले नव्हते का ?

नवीन Submitted by BLACKCAT on 14 November, 2019 - 23:55 >>

अमित शहा नक्की काय सांगत फिरत आहेत असं तुला वाटतं?

उद्धव व इतर नेत्यांनी प्रचारात अनेकदा हे सांगितलंय. फेब्रुवारी २०१९ मध्ये शहा-फडणीस-उद्धव यांच्या एकत्रित पत्रकार परीषदेच्या दुसऱ्याच दिवशी ज्याचं संख्याबळ जास्त त्यांचाच मुख्यमंत्री हे सूत्र मी शहीबरोबरील चर्चेत मान्य केलेले नाही व सर्व जागा, पदे समसमान वाटून घेण्याचे मान्य झाले असून शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट होऊन शिवसेना झिंदाबादच्या घोषणा झाल्या होत्या. यानंतरही अनेकदा अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची घोषणा उद्धवने केली होती. त्यावेळी भाजप गप्प राहिला.

ओके...देन आय करेक्ट मायसेल्फ. निदान सोशल मिडियात किंवा ऑनलाईन न्यूज साईट्सवर तरी हे दिसलं नाही. फडण२० पुन्हा सीएम होणार इतकंच लोक बोलत होते. उध्दव सीएम याकडे एक जोक म्हणूनच पाहिलं जात असावं. पण जर अ‍ॅक्चुअल प्रचारात ते बोलले असतील तर सेनेचा मुद्दा बरोबर आहे.

क्षणभर धरुन चाललं की शहा खोटं बोलत आहेत. मग १७५ आमदारांचा पाठींबा आहे, हे रावतांच्या करवी ठाकरेच बोलत होते ना? त्यात तरी काय खरं होतं?
राजकारण्यांनी खर्‍या खोट्याच्या गप्पा न केलेल्याच बर्‍या!

कुठे बुडणार? आणि कशी बुडणार?
भाजपाला सत्ता मिळत नाहीये आणि ती जर सेना/ काँ/ राकाँ ला मिळाली तर सेना बुडेल का मेगाभरतीत आलेली उंदिर पळतील?
करा बाबा विचार!

शिवसेना दोषी आहे आणि bjp युती तोडण्यास निर्दोष आहे असे समजायची गरज नाही.
महाराष्ट्र च नाही तर बाकी राज्यात सुधा सहयोगी दलानी bjp ची साथ सोडली .
मध्य प्रदेश ,मध्य प्रदेश सारख्या राज्यात bjp ला हार पत्करावी लागली आहे.
Bjp नी सहयोगी दलांचा वापर फक्त स्वतःच पक्ष वाढवण्यासाठी च केला आहे आणि गरज संपल्यावर त्यांना किंमत देणे बंद केले आहे हे आता सर्वांच्याच लक्षात आले आहे.
काँग्रेस चे 44 आमदार निवडून आले आहेत ते जनतेनी स्वतः निवडणूक लढवली त्या मुळे.
काँग्रेस पूर्ण कमजोर झाली होती तरी 44 आमदार काँग्रेस चे निवडून आले ह्याचा अर्थ सरळ आहे लोकमत bjp विरूद्ध जात आहे.
वर वर विचार करून सेनेला दोषी ठरवण्यात काही अर्थ नाही.
सरकार बनेल अस वाटल तर bjp राज्यपाल चा वापर करून विधानसभा भंग करेल एवढ्या खालच्या थरावर bjp जाईल.
शेवटी राज्यपाल हे केंद्राचे बाहुले असतात.
आज नाही पूर्वी पासून

विधानसभा अस्तित्वात आली का? ती यायच्या आधीच भंग करता येते का? काही पळवाट असेल तर राज्यपालांकरवी ती नक्कीच वापरतील.
पण पुन्हा निवडणुका झाल्या लगेच तर खात्रीलायक बहुमत मिळण्यासाठी सेना घरभेदी आहे हा आपटबार पुरेल का?

राज्यपाल चा वापर करून विधानसभा भंग करेल एवढ्या खालच्या थरावर bjp जाईल. >>> नक्कीच जाइल.

मनाप्रमाणे घडत नाही म्हटल्यावर संपूर्ण देशावर आणीबाणी लादणार्‍या इंदिराबाई अजून खालच्या थराला गेल्या होत्या.

तसाच उद्धव! बापानी घालून दिलेल्या आयडियॉजीला संपूर्ण तिलांजली द्यायला निघालाय, केवळ सत्तेसाठी, एका औटघटकेच्या पदासाठी!

सगळे एका माळेचे मणी आहेत आणि म्हणूनच कोणी चूक नाही नि बरोबर नाही.

बाळेसाहेबांनी तत्कालिन फायद्यासाठी तडजोडी केलेल्या की! भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलं आहे गीतेत आणि प्रत्यक्ष महाभारतात?
आयडिऑलॉजी स्टॅटिक असली तरी त्या पर्यंत जाण्याच्या रस्त्यात एखाद वळसा घालून जावं लागलं तरी अंतिम ध्येय न विसरता त्याच्या कडे बघुन मार्गक्रमण करत रहायचं. आपापले कर्म करत रहायचं सोडून शस्त्रे गाळून (मिस्ड कॉल देत) बसला की संपला!

बाळासाहेब तर कधीच मेलेत, मग आता त्यांची शपथ घेऊन काय फायदा?>> सहमत परन्तु तुमचे एक चुकले तुम्ही माननीय बाळासाहेब असे लिहायला हवे होते.

काँग्रेस,राष्ट्रवादी,सेना ह्यांचे सरकार स्थापन होईल असे आजच्या बातमीवरून वाटत आहे तसे झाल्यावर सामना मधून श्री राऊत या नव्या सरकारवर ताशेरे मारतील का जसे त्यानी गेली ५ वर्षे केले?

विदेशी श्वानांची तगमग जास्तच वाढलीए.
आज झारखंड मधे सुद्धा भाजपच्या सहयोगी दलाने साथ सोडली ! दगाबाज बलमा सोबत कोण नांदणार म्हणा!

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस ची अट...

*अधून मधून तुमच्या आदित्यला पाठवत जा आमच्या राहुल सोबत खेळायला !*

---------
*_RAHUL GANDHI IS THE ONLY POLITICIAN IN INDIA WHO GOT SCOLDED BY SUPREME COURT ON CHILDREN''S DAY FOR CHILDISH BEHAVIOR...!_*

*_RAHUL GANDHI IS THE ONLY POLITICIAN IN INDIA WHO GOT SCOLDED BY SUPREME COURT ON CHILDREN''S DAY FOR CHILDISH BEHAVIOR...!_*>>>>>>>> Rofl

ONLY POLITICIAN ऐवजी ONLY CHILD हे शब्द चपखल ठरतील.

राजकारणी धाग्यावर स्वतंत्र व्यक्ती ची कमेंट तटस्थ आणि विचारी असते
तो कमेंट देताना तटस्थ पने परिस्थीचे आलोकान करतो आणि तीच कमेंट आरसा दाखवत असते
पण आपण एकध्या पक्षाचे पाठीराखे असू तर कमेंट सुद्धा अविचारी आणि उथळ असते

ONLY CHILD --- हो, मला पण तसेच वाटलं। पण आलं तस fwd केले.

Rofl

शिवसेना आत्ता काहीही बोलूदे पण निवडणुकांच्या आधी सेनेने जरा जरी मुख्यमंत्रीपदाचा मागणीवर जोर लावला असता तर भाजपावाल्यांनीच सेनेच उमेदवार पाडले असते आणि सेना २०-२५ च्या घरात घुटमळली असती (त्याचा फायदा कुणाला झाला असता हा भाग सोडा!)
आता फक्त भाजपा आपल्याशिवाय सत्ता स्थापन करु शकत नाही याची जाणीव झाल्यावर मग "तुम्ही असे बोललात अन तसे बोललात, सर्व पर्याय खुले" असली ब्लॅकमेल करणारी भाषा आली तोंडावर.... आधी असे बोलले असते तर बारा च्या भावात गेले असते!

आवाक्याबाहेरची चुकून एखादी संधी दिसल्यावर सगळा विधीनिषेध बाजुला ठेवून जशी त्याच्यावर झडप घातली जाती ना तसे चाललेय सेने चे सध्या.
भाजपा त्यामानाने शांत आहे.... एका राज्यातल्या सरकारने त्यांना फरक पडत नाही. अजुनतरी इमेज राखून आहेत ते आणि याचा त्यांना दीर्घकालीन फायदा नक्कीच मिळेल.

कर्नाटकात पोटनिवडणुकांसाठी भाजपाने सगळे उमेदवार उभे पण केले. JDS आणि काँग्रेस ला कोणी मिळत नाहीये सिटा भरायला. महाराष्ट्रात कोणाचं JDS होणार?

भाजप ने उभे केलेले उमेदवार म्हणजे काँग्रेसकडून आयात केलेले. कर्नाटकातही महाराष्ट्राची पुनरावृत्ती होईल का? मूळचे भाजप चे किती जण अपक्ष म्हणून उभे राहताहेत?

कर्नाटकातल्या स्था स्व सं च्या निवड णुकांत काँग्रेसला सगळ्यात जास्त जागा मिळाल्यात म्हणे.

काँ ने ८ जागांसाठीचे उमेदवार ३१ ऑक्टोबरलाच घोषित केलेत की.

बाकी येडियुर प्पांसारखा निष्कलंक मुख्यमंत्री आणि तीन तीन उपमुख्यमंत्री - राज्याचा कारभार दृष्ट लागण्यासारखा चालत असणार.

>>> शिवसेना आत्ता काहीही बोलूदे पण निवडणुकांच्या आधी सेनेने जरा जरी मुख्यमंत्रीपदाचा मागणीवर जोर लावला असता तर भाजपावाल्यांनीच सेनेच उमेदवार पाडले असते >>>

तेव्हा फडणवीस स्वपक्षाचे उमेदवार पाडण्यात मग्न असल्याने सेनेचे कमी उमेदवार पाडले असावे.

Pages