डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचे तुम्ही काय करता?

Submitted by mi_anu on 4 January, 2018 - 07:02

प्रेरणा: हा धागा https://www.maayboli.com/node/44433
घरात काही प्राणी येतात का?
घरात येणारे डास, झुरळे, पाली, मुंग्या यांचा बंदोबस्त तुम्ही कसाकसा करता?
तो करताना काय काय अडचणी येतात?
शेरास सव्वाशेर प्राणी भेटतात का?
(इथे हे ३ सोडून घरात शिरणार्‍या इतर प्राण्यांबद्दल पण लिहू शकता.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चला आता या लिस्ट मधे एक अजून अ‍ॅड करते. गोगलगाय. हो सध्या माझ्या किचन ओट्यावरच धुमाकुळ असतोय. मोठ्या जाड चिकट ...यक्क! कशावरही असतात. ओट्यावर झाकायची ताटली, बर्नर जवळ, कधी सिंक मधे पण. किळस वाटते एक्दम ते चिकट ओघळ बघून.
कळत नाही कुठून येत आहेत. गॅसच्या मागे जिथे पाईप जातात तिथूनच येत असतील असं वाटतेय. येऊच नये म्हणून काय बंदोबस्त करावा सुचत नाही. कोणाला काही उपाय माहित असतील तर सुचवा.

गोगलगाय >>> जिथून येत आहेत अशी तुम्हाला शंका आहे तिथे मीठ टाकून ठेवा आणि पहा. बहुतेक तरी ते ओलांडून ती येणार नाही. मीठ अंगावर (गोगलगायीच्या Proud ) टाकल्याने ती मरते. पण असं करणार असाल तर आधी तिला पेपरवर वगैरे घ्या आणि मग मीठ टाका. कारण मीठ टाकल्यावर गोगा बचकभर चिकट द्राव सोडते.

तिथे मीठ टाकून ठेवा आणि पहा.>>>>>>> ओके.
आधी तिला पेपरवर वगैरे घ्या आणि मग मीठ टाका. कारण मीठ टाकल्यावर गोगा बचकभर चिकट द्राव सोडते.>>>>>>> नवरा पेपरवर घ्यायचे काम करेल आणि मी मिठ टाकायचे Proud

हात लावता येईल ना गोगा ला कागदावर घ्यायला? का त्याची पण शिसारी येते?
नाही तर ज्या ठिकाणाहून गोगा बाहेर येते तिथपासून दिशादर्शक बाण दाखवा कागदा पर्यंत.

cypermethrin

कुठल्याही वेटरनरी मेडिकल शॉपमध्ये हे मिळेल. Crustaceans आणि mollusks मारण्यासाठी स्वस्तात मस्त उपयोगी

-------------------

नाही तर ज्या ठिकाणाहून गोगा बाहेर येते तिथपासून दिशादर्शक बाण दाखवा कागदा पर्यंत.
Submitted by पाथफाईंड >>> Lol ह्यात थोड़ी अजुन भर --
धूम स्टाइल कोणी फिरत असेल आणि स्पीड लिमिटचे ट्रैफिक नियम मोडले तर पावती फाडा. Bydefault त्यांच्याकडे हेल्मेट असते तरी PUC वगैरे खात्रीशिरपणे तपासून पाहता येईल.

दिशादर्शक बाण >>> Rofl
गोगाला कागदावर हाताने कशाला घ्यायला हवं? एखाद्या काडी किंवा पुठ्ठ्याने वगैरे घेता येईल की! Happy

>>>> धूम स्टाइल कोणी फिरत असेल आणि स्पीड लिमिटचे ट्रैफिक नियम मोडले तर पावती फाडा. >>>> Happy हाहाहा

गोगलगाईचा बंदोबस्त-
प्रत्येकीला छानछान नावे ठेवा (सोनू, मोनू, टिंकू, अशी.. ' काय दळभद्री दिसते' , अशी नाही )
गळ्यात coloured ribbon बांधून ओळख पटवा
फिरायला घेऊन जा, तिकडेच सोडून येऊ शकता पण हे मी बोललो नाही, नाहीतर माझ्याच घरी यायच्या
अगत्याने काॅफी, पाजा, दारु पाजा, आल्याचालसणाचा चहा पाजा
मोठ्या संख्येत कोंबडी साप बेडूक कावळे पाळा आणि त्यांची गोगलगाईशी ओळख करून द्या प्राण्यांची सभा भरवा
पाण्याच्या shower ने आंघोळ घाला
त्यानच्या निवासात कचरा असू नये
असे करुन त्या तुम्हाला प्रसन्न होतील आणि निघून जातील

Jokes apart,
https://www.google.com/amp/s/m.wikihow.com/Get-Rid-of-Snails%3famp=1

हे पहा Happy पण इथेही मी दिलेले बहुतेक उपाय च आहेत Happy

सॉरी, मी सगळ्या फन पोस्ट्सना खो घालते आहे. पण सिरियसली मला पेस्ट कन्ट्रोल साठी चांगला रेफरन्स हवा आहे. गेल्या दोन आठवड्यात अचानक झुरळं दिसायला लागली आहेत, जी पूर्वी कधीच नव्हती त्यामुळे कधी पेस्ट कन्ट्रोल करायची वेळ आली नाही. मी अर्बन लॅडर कडून ताबडतोब पेस्ट कंट्रोल करून घेतलं पण 10 दिवस होऊनही झुरळं दिसताहेत आणि आता पिलू झुरळं दिसताहेत म्हणजे संख्या वाढणार. तुम्ही अनुभवलेली कोणतीही खात्रीशीर एजन्सी असेल तर प्लिज नंबर द्या.

बाकी पाल हेटर्स ग्रुप मध्ये मी पण.

मीरा, Hit Anti Cockroach Gel मिळते. ती पिस्टन असलेल्या सिरिंज मधून येते. ऑनलाइनही मिळते.
पिस्टन दाबून अर्ध्या बुंदीच्या दाण्या एवढी जेल ओट्याखाली, किचनची वरची कपाटं ओट्या खालचे रॅक्स, सिंकच्या खाली, गॅस स्टोव्हच्या खाली, इतर कपाटं इथे साधारण अर्धा अर्धा फुटांवर लावायची. पाच सहा दिवसात झुरळं जातात. सहा महिन्याने परत जेल लावायची. मी लावून आता वर्ष होत आलं आता कुठे एक दोन झुरळं दिसत आहेत, आता आणून परत लावेन.
वास नाही, सगळी भांडी बाहेर काढा पेस्ट कंट्रोलला तसला काही त्रास नाही. Hit ऐवजी अजून कुठली हर्बल जेल असेल तर ती ही वापरू शकता.

दिशादर्शक बाण>>>>>>>> Lol
वाटलेच होते इथे मस्त मस्त उपाय मिळतील. धन्यवाद लोकहो, मिठाची ट्रिक कामी येत आहे असं वाटतंय.

तुमच्या पाली वेगळ्या आमच्या वेगळ्या
आमच्या घाबरवतात, जोरात पळतात, छतावर आम्ही असलेल्या स्पॉट च्या वर थांबतात,अंगावर धावून येतात. >>> Lol सही. खरं आहे हे.

सगळ्यात घाणेरडा किळसवाणा प्राणी म्हणजे पाल.. >>> अगदी अगदी.

झुरळे पण त्रास देतात पण लाल हिट अतिशय उपयुक्त. उडणारी झुरळे नाही बघितली प्रत्यक्षात कधी.

Hit Anti Cockroach Gel >>> हे पण आणायला हवं, मस्त वाटतंय, जास्त परिणामकारक पण सध्या लाल हिटने काम होतंय.

लाल हिट खूप वापरलं जातं, लवकर संपतं.ते रुममेट च्या डिओड्रंट सारखं आहे.एकदा रूममेट बाहेर गेल्यावर हातात घेतलं की वेड्यासारखं मारत सुटावंसं वाटतं.
हिट चा जेल वापरून बघते.मागे एक वेगळी प्रसिद्ध पेस्ट आणली होती ती चिकट होती आणि तपकिरी खाकी घाण रंग होता.सगळीकडे पसरत होती दुसऱ्या दिवशी झाडू ने.

छोट्या कॉकरेच साठी पेस्ट कंट्रोल च उत्तम राहील. कारण फार लवकर ते घरभर पसरतात. आम्ही केली होती २ वर्षांपूर्वी. पूर्णपणे संपले होते तेव्हा. पण आता परत कॉ. चे दर्शन व्हायला लागलेत.
मी सुद्धा एक हर्बल जेल आणलंय बघू उपयोग झाला तर.

हो कालपासून दिसल्या नाहीयेत खरं . गोगा जिथून येतात असं वाटलं तिकडे टाकुन ठेवलं मीठ. थँकफुली अंगावर टाकायची वेळ आली नाही.

माफ करा, हा धागा अजुन वाचला नाहीये पण उंदरांना दूर कसे ठेवावे , काही स्प्रे वगैरे याबद्दल वर काही माहिती आलीये का? गॅरेजमधे शिरला होता. मेला तो, पण गॅरेज बंद असले तरी कोपर्‍यात किंचीत फट आहे तिथे काहीतरी औषध मारावे लागणार. कारण तिथुनच आला असणार.
काही सुचना?

गराज मध्ये मी स्टिकी पॅड्स वापरले होते.. त्यात ऊंदीर, सापसुरळ्या, बारके साप असे सगळे क्रिपी, क्रॉली मित्र जमा झाले. पॅड्स वर रोज जाता येता लक्ष ठेवल्याने "जिओ ऑर जिने दो" पण साधता आले. एक बर्‍यापैकी मोठासा (सवा-दीड फुट) साप सुद्धा स्टिकी पॅडमुळे अडकला होता. मग त्याला मिल्क गॅलन जार मध्ये भरून तळ्याकाठी सोडून आलो.

अबब, एकदम सापच...
आता गॅरेजच्या फटीला गोल दगड लाऊन ठेवलाय. उंदीर लहान होता, मोठा नव्हता कारण फट लहान आहे. आशा आहे आता नाही येणार. आजच नेहमीचा टर्माईटवाला येऊन स्टिकी पॅड्स ठेऊन गेला. आता २-३ दिवसाला पाहणी करत राहीन.

उंदीर थोडे फार असतील तर हाब यांचा स्टिक पॅड उपाय ठीक आहे.
जास्त असतील तर त्याव्यतिरिक्त कुठून उंदीर घरात येऊ शकतात ते नीट पाहून त्या जागा शक्य असल्यास बंद करणे, जाळ्या बसवून घेणे. पण सुळसुळाट असेल आणि त्यांची कॉलनी घरालगत असेल तर उंदीर मारण्याच्या विषाचा उपयोग अनिवार्य ठरेल. अंगात बॅक्टेरियल इनफेक्शन, जंत झाले की अँटिबायोटिक, अँटिपॅरासिटीक औषधं घेतो तसंच हे समजावं, उगा उंदीर मारण्याचं पाप वगैरे टेन्शन घ्यायचं नाही.

स्टिकी पॅडवर मीडियम साइझ उंदीर चिकटतो. पण नंतर सोडवायचा प्रयत्न केला तर त्या ची तडफड बघवत नाही. पॅडसकट टाकला होता म्हणून तो.

>>>> Very bad. Torturing is not at all good. Sad>>>> अहो या न्युसन्स असलेल्या प्राण्यांना मारु नये म्हणुन अमच्या समोरचे महाभाग पिंजर्‍यात उंदीर पकडून, कॉलनीत बाहेर सोडून देत असत. काय मूर्खपणा आहे.
__________________________
तडफड नको, मारायला नको - पण या उपद्रवी जीवांबरोबर सहजीवन असह्य होते त्याचे काय!

Pages