वैयक्तिक अंधश्रद्धा, वैयक्तिक लढा

Submitted by aschig on 28 October, 2009 - 11:33

हा धागा अशा लोकांकरता आहे ज्यांना भविष्य सांगण्याचे विविध प्रकार हे चूक आहेत आणि समाजाकरता हानिकारक आहेत याची जाणीव आहे (हे लोकच चूक आहेत का याबद्दलचा वाद इथे अपेक्षित नाही - त्या करता इतर जागा आहेत). अंधश्रद्धा इतरही अनेक प्रकारच्या असतात, आणि या ना त्या प्रकारे समाजाला हानिकारक असतात. अशा गोष्टिंचा विचार येथे केला जावा.

जन्म व मृत्यु या दोन बाबतीत मनुष्य जास्त आगतीक असतो. त्यामुळे त्या दोन गोष्टिंभोवती सर्वात जास्त वलये निर्माण केल्या जातात. आपण मृत्युपासुनच सुरुवात करु या. नंतर इतर गोष्टि येतीलच.

नरेंद्र दाभोलकर यांच्या भ्रम आणि निरास या पुस्तकाचे परिशिष्ट आहे नार्वेकर गुरुजींचे मृत्युपत्र. ते येथे दिले आहे. (धन्यवाद प्रकाश घाटपांडें). त्या अनुषंगाने संभाषण सुरु करु शकु.

https://docs.google.com/file/d/0B2X6bSru0D7IYmt3bjNTYU9ZbWs/edit

(२३ नव्हेंबर २००९ च्या पोस्ट वरुन):

अशाप्रकारे स्वतःशिवाय सर्व गोष्टींना माया ठरविल्यावर तुम्हि करत असलेल्या गोष्टींना खालील प्रकारांमध्ये विभागा (१) आवश्यक (२) अनावश्यक (उदा. एखादी सवय किंवा कृती) - पण घरच्यांना, कुटुंबियांना, देश- व पृथ्विवासियांना त्यामुळे त्रास होत नाही (३) अनावश्यक, आणि शक्य आहे की स्वत:ला थोडि त्रासदायक, पण इतरांना (आप्तांना, किंवा अनेक गरजुंना) उपयोगी आणि (४) अनावश्यक.

स्वत:च्या मनःशांतीकरता कुणी पुजा करत असेल, आणि ते आवश्यक आहे असे वाटत असेल, आणि त्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते आवश्यक मध्ये येईल. पण त्यामुळे दुसर्यांनी अशी पुजा करावी आणि तशी करु नये असे म्हंटल्यास ते अनावश्यक मध्ये जाईल. त्याचप्रमाणे पुजेकरता एका फुलाऐवजी १००० endangered फुलांचा हार लागतो असे म्हंटल्यास तेही अनवश्यक.

वरील विभागणी योग्य वाटते का? त्यामध्ये काही बदल करावे लागतील का? कसे? ही विभागणी स्थिरस्त्वार झाली की मग पुढे जाता येईल.

(सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आलेले काही वैयक्तिक लढे) :

विश्वास नसल्यामुळे मुलाची मुंज न करणं, मृत्युनंतरचे विधी न करणं, सत्यनारायण न करणं, दृष्ट काढण्याची जबरदस्ती न करु देणं, मासीक पाळी असल्यामुळे डिस्क्रिमिनेट न करु देणं (हे सर्व फार त्रोटक झालं - त्या लोकांच्या भावना पोचण्यासाठी त्यांच्याच पोस्ट वाचाव्या).

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रकाश घाटपांडे
<<<<<लॊगवरचे विचार पटताहेत म्हणुन प्रमोशन करता आहात काय? >>>
अजिबात नाहि ईथे हा विषय चालु आहे म्ह्नुनतो लेख दिला
शाकाहार मांसाहार हा वेगळा धागा काढायला हवा

जसे वर मांस खातात तर गायीचे का नाही >>>>>>>>>>
माझ्या पोस्ट्मधले वाक्य किंवा त्याचा अर्थ तसा नाही. तुम्ही त्याचा अर्थ तसा काढला आहे.

तुम्ही ती पोस्ट् कशी वाचली माहित नाही, पण त्यात खोचक पणा खोडसाळपणा नव्हता. कुतुहल होतं. असो

मी स्वता मांसाहार करायचो तेव्हा बीफ खायचो.

तुम्ही खातात म्हणुन इतरांनी देखील खायचेच का ? Uhoh
मी वटवाघुळ खातो तुम्ही मांसाहार करताना वटवाघुळ खात होतात का ?

असो धाग्याचा विषय हा नाही म्हणुन हे माझे शेवटचे पोस्ट
माझ्यामुळे धागा भरकटु नये क्षमस्व

दिदे

आवडत नाही. खाऊन पाहिले का?

ससा चांगला लागतो परंतु इथे सगळेच ससे खाणारे नसतात वटवाघुळ देखील चविष्ट असते पण भारतात खाण्याचा रिवाज नाही . चीनी लोक साप उंदीर देखील खातात. उद्या कोंबडी खातात तर उंदीर देखील खा म्हणुन काहीही बोलायचे म्हणुन बोलतील. ससा, वटवाघूळ ह्या पैकी कोणीही ३३ कोटी देव सामावून घेणारे म्हणून ओळखले जात नाहीत. गायीच्या बाबतीत असे मानले जाते की तिच्यामधे ३३ कोटी देव वास करतात.

शाकाहारी लोक तुम्ही भाज्या खातात मग रस्त्यावरचे गवत का खात नाही. ( हे देखील शाकाहारी )
कडुलिंबाच्या पानांची भाजी करुन का खात नाहीत. ( ते सुध्दा शाकाहारी मधे येते ना )
पिंपळाच्या झाडाची पाने देखील उकळुन खावीत. ( हे देखील शाकाहारी )
आंबे चविष्ट असल्यामुळे आंब्याची पाने देखील चविष्ट असतीलच.

खाण्यायोग्य असणारे गवते, फुले, फुले झाडे ही खाल्ली जातातच पण काही गवत, पाना, फुलांमधे देवाचा अधिवास असतो म्हणून ती खात नाहीत असे तर काही ऐकिवात नाहीये. मुद्दा श्रद्धा-अंधश्रद्धांचा आहे.

रच्याकने

मासा हा दशावतारापैकी एक मानला जातो पण अनेक आस्तिक तो खातातच की असे म्हणले जाते की, किनारपट्टीच्या भागात गणपतीत, पुढच्या दारातून गणपती विसर्जनाकरता गेले की मागील दारातून मासे आत येतात.

असे म्हणले जाते की, किनारपट्टीच्या भागात गणपतीत, पुढच्या दारातून गणपती विसर्जनाकरता गेले की मागील दारातून मासे आत येतात.>>> डोंबल. विसर्जनाची वाट कशाला बघायची? गणपती घरात बसलेला असताना गौरीला माश्यामटणाचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. पण ज्यांच्या घरात मासेमटण चालतात त्यांच्याचकडे जे एरवी शाकाहारी असतात त्यांच्याकडे नाही.

दुसर्‍याच्या खाण्यावरून तिरकस शेरे मारणं हा असंस्कृतपणा आहे.

आपल्या कडे बीफ खाणे हे शाकाहार मांसाहार ईतकेच, देव आणि धर्माशी जोडलेले आहे. म्हणून विचारले.

दिवाकर असे काही नाही कि मी खातो म्हणजे ते बरोबर आहे किंवा चूकिचे आहे. मी करतो म्हणून ईतरांनी करावे असेहीनाही

तुमच्यातले किती जण बीफ खातात? जर तुमच्या समोर जर पुढे मागे गायीचे मांस आले तर खाता का/ खाल का? माहित नसताना खाल्ले तर तुम्हाला अपराधी वाटेल का?>>>>> मी मटण/ चिकन खात नाही.जर मटण/ चिकन खात असते तर बीफ खाण्यात आले असते तर अजिबात अपराधी वाटले नसते. एक क्षण जरूर बिचकले असते,तेही हे सवयीचे खाणे नाही म्हणून.
अवांतरः- माझी एक शाकाहारी कझिन ,अमेरिकेत गेल्यानंतर बरेच काही खाऊ लागली.त्यात कच्ची कालवे ऐकून मला त्यावेळी कंटाळा आला होता. तिचा वैयक्तिक प्रश्न म्हणून मी सोडून दिला.जोपर्यंत मला असे खायचा आग्रह होत नाही तोपर्यंत प्रश्न ज्याचा त्याचा!

< गणपतीत, पुढच्या दारातून गणपती विसर्जनाकरता गेले की मागील दारातून मासे आत येतात.>

गोंयच्या लोकांच्या मत्स्यप्रेमाचं वर्णन करताना हे वाक्य वापरलं गेलेलं अनेकदा ऐकलं/वाचलं आहे.

गवत पिंपळाचे पान यात सेल्युलोज असते. मानवी शरीर ते पचवु शकत नाही.

पण गाय पचु शकेल.

सावरकरानी , गाय हा उपयुक्त पशु असुन खाल्ले तर चालेल असे लिहिले आहे.

पुण्यातल्या विविध कॉलेजचे ४० विद्यार्थी एकत्र येऊन सजग, विवेकी, निर्भय होवू! ही मोहीम एसपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतलीय. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना श्रद्धांजली देत अंधश्रद्धेविरुद्ध समाजाला जागरुक करण्यासाठी हे ४० विद्यार्थी पुढं आले आहेत.
अंधश्रद्धेविरोधात माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुण्यातल्या एसपी कॉलेजमध्ये तीन दिवसीय सेमिनारचं आयोजन केलंय. या सेमिनारमध्ये भोंदूबाबा दाखवत असलेल्या विविध चमत्कारांचं वैज्ञानिक कारण समजावून सांगणार आहेत.
श्रेनिक लोढा हा बी. जे. मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी म्हणतो, “एसपी कॉलेजच्या २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या सेमिनारमध्ये सहभाग घेतला असून आम्ही चमत्कारांमागचं वैज्ञानिक सत्य आणि भोंदूबाबा नागरिकांना कसं फसवतात, याचं प्रात्यक्षिक दाखवणार आहोत.आम्हाला समाजाला अंधश्रद्धआ मुक्त करायचंय.”
माहितीचा स्रोत
www.24taas.com

लहान पणापासून आपल्याला अंधश्रद्ध वातावरणातच वा ढवले जाते. मग त्या आपल्यात रूजतात. मोठेपणी स मज आल्यावर मात्र मी जाणीवपूर्वक त्या मनातून् काढून टाकल्या. त्यामुळे मनाचा कमकुवतपणा जाउन मन बळकट झाले. अशा काही वैयक्तिक 'सुधारणा' अशा:
१. केस कापणे व तेल आणणे ही कामे मुद्दाम शनिवारी करणे. श्रावणत जरूर केस कापणे. गर्दी कमी असल्याने आपला नंबर लवकर लागतो!
२. रस्त्याने चालताना मांजर आडवे गेल्यास त्याकडे फक्त कुतुहलाने बघणे व पुढे अधिक आत्मविश्वासाने चालत राहणे
३. एखादे कामास जाताना ३ जण एकत्र जरूर जाणे
४. नारळ सोलताना त्याला 'शेंडी' न ठेवणे. उलट एकदम 'टकलू' करून टाकणे.
५. विविध ग्रहणांच्या दरम्यान हवे ते खाणे, पि णे, झोपणे व हवी ती' मजा' करणे.
६. अ मावस्येच्या दि वशी हटकून एखादा उप क्रम चालू करणे.
...अजून काही नंतर लिहीतो.
आयुष्यात मनाचे बळकटीकरण करणे अत्यंत महत्वाचे आहे. तेव्हा अंधश्रधा पायदळी तुडवल्याच पाहिजेत.

वरील गोष्टी मुद्दाम करणे ही आणि एक अंधश्रद्धा व्हायची. मी शनिवारीच केस कापतो, किंवा अमावास्येलाच प्रवासाला जातो. बळकटीकरणाचा हेतू चांगला असला तरी पटलं नाही.
केस वाढले की/ वेळ असेल तेव्हा/ गर्दी कमी असेल तेव्हा कापायला जायचं असं मुलांना शिकवलं की झालं ना.
तिकीट स्वस्त असेल तेव्हा/ सुट्टी जोडून असली की/ कामातून उसंत मिळाली की प्रवास.

सध्या गणपतीचे दिवस आहेत. त्यावरून गणपतीचा शोध असा एक ऐसी अक्षरे वरील लेख आठवला. अनेकांनी असा शोध घेण्याचा प्रयत्न केला असेल. नुकताच एबीपी माझा वर देवदत्त पटनायक यांची या विषयावर मुलाखत ऐकली

Pages