मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

वीणाला शिवमुळेच सगळ्यात जास्त फायदा झाला आहे. अदरवाईज, आळशी, फटकळ आणि नॉट अ पब्लिक पर्सन म्हणून कधीच बाहेर गेली असती. त्त्यामुळे मला वीणा नं २ वरही अजिबात यायला नको आहे, >>+१११

वीणा कधीच आवडली नाही, ती कधी विनर म्हणून डिझर्विंगही वाटली नाही.>>पण ती अगदी काही शेवट वगैरे नाही वाटत मला...किशोरी बरोबर ३ नंबर विभागून देईन माझ्याकडून Wink
माझा क्रम असा -
१. शिव
२. नेहा
३. वीणा
४. किशोरी
५. शिवानी
६. आरोह

विनर निवडताना फक्त पब्लिक सपोर्ट विचारात घेणं चूक आहे. कारण हा घटक मॅनिप्यूलेट करता येतो. पण त्यांचा बिबॉच्या घरातील एकंदर वावर, घरातील कामं करण्याची क्षमता आणि इच्छा, बुद्धीची झेप, १०० दिवसात त्यांच्यात झालेला सकारात्मक बदल यासारखे क्रायटेरिया ती व्यक्ति कशी आहे हे दाखवतात आणि तेच जास्त महत्वाचे आहे. असो.>>>ज्जे ब्बात! कितीही अनफेअर वाटला तरी हाच शोचा फॉरमॅट आहे. त्यामुळे आपण फक्त बघायचं आणि आपलाच क्रम फायनल मानायचा..काय करणार! Wink

प्रे कॉं मध्ये शेवटचे दोन प्रश्न होते, या सीझनला तुलनेत अधिक हातापायी, शिवीगाळ झाली का? त्याला नेहा सोडून सगळ्यांनी हो म्हटलं.
नेहाने , यावेळी सगळ्यांची एनर्जी जास्त होती, असं म्हटलं. अगदी सुरेखा, विद्याधर यांचीही नावं घेतली.

शारीरिक बळाच्या वापराची तीन ठळक प्रकरणं तिच्याबाबतच झाली. अभिजीतने डोकं मारणं, शिवने दार अडवणं आणि पराग.
उरलेले दोन शिवचं चावणं आणि अगदी पहिली वीणा शिवानीची मारामारी. नेहा ढळढळीत खोटं बोलली. का?
पुढे ती परागच्या प्रसंगाबद्दल बोलतच होती," एक प्रसंग घडला...."
.
इथे बिबॉनी पत्रकार परिषद संपल्याची घोषणा केली.
तिचं ते अर्ध वाक्य दुपारी एबीपी माझावर दाखवलं, रात्री बिग बॉसमध्ये दाखवलं नाही. ( हे सुलु यांच्यासाठी)

वीणा उद्धट आहे हे आधी लिहून झालंय. स्पष्टवक्ततेपणा आणि उद्धटपणा यांतली रेषा तिने अनेकदा ओलांडली.
पण नेहाचे शब्द, टोन आणि बॉडी लँग्वेज हे तिन्ही उपमर्द करणारे असत.
शाळा टास्कमध्ये शिव, सातबारात किशोरी, चहाच्या कपावरून हीना हे आठवतंय.

मित्र नसलेल्यांना वाटेल ते ऐकवणारी नेहा जेव्हा तिचे सो कॉल्ड मित्र तिच्यासमोर उभे राहिले तेव्हा पार गळपटून गेली.

वीणाने आपण एकटे पडू याची फिकीर न करता परागला विरोध केला. पराग गेल्यावर ती शिवच्या जवळ आली . पण स्वतःचा गेमही खेळत राहिली. मागे राहिलेल्यांत बिचुकले आणि शिवानी सोडली तर तिचं कोणाशी शत्रुत्वाचं नातं नव्हतं.
टिकिट टु फिनालेत ती फेअर खेळेल असं मला वाटलं , असं आरोह शनिवारी म्हणाला होता.

याउलट नेहा कोणाचीच होऊ शकली नाही.
ज्या शिवानीबद्दल तिने माझी ताकद परत आली असं म्हटलं , तिनेच नेहा camera बघून रडते असं म्हटलं. त्याची तुलना नेहाने वडिलांच्या जाण्याने झालेल्या दु:खाशी केली आणि हे सगळं ऐकून पुन्हा शिवानीशी बोलायला गेली.
This is her lowest moment. सेल्फ रिस्पेक्ट गुंडाळण्यात इथे किशोरीलाही मागे टाकलं.
शिवाय पंचिंग bag नंतर ती पुष्कळ बदलली,. तरीही कोणत्याही वागण्याबद्दल regret नाही असं म्हणतेय.
वागणं बदलून एक्स हाउसमेट्सना आधीचं विसरायला लावलं असं तिचं म्हणणं असावं.

टास्कमध्ये आपल्यालाच कळतं हा तिचा बाणा अजूनही कायम आहे, ही मांजरेकर शनिवारी बोललेच.
शिवला ती फुगे किती फुगवायचे हे सांगत होती, याबद्दल मी उपरोधानी लिहिलं होतं, ते नेहा fans ना खरं वाटलं.

वाचलं नाही अजून काही पण मला वाटतं वोटिंग काहीही असलं तरी चॅनेल नेहालाच दुसरी पोझिशन देणार म्हणून तशा hints सारख्या देतात. मागे पुष्कर साठी द्यायचे, तो शेवटी नावडता झाला होता आणि विणाला खूप votes असले तरी कायम danger zone मध्ये ठेवतात, नॉमिनेशन मध्ये आलेली असते तेव्हा, यावर अनेक vloggers नी पण त्या त्या वेळी टीका केलीय.

आत्ता 6 पर्यंत शिव, वीणा, नेहा, ताई, शिवानी, आरोह असे आहेत.

मला आता खात्री आहे की चॅनेल वीणा ला 3 नं देणार आणि नेहाला 2.

शिव आणि आरोह ने आपली जागा सोडली नाहीये.

वीणा नक्कीच लोकप्रिय झालीय गेले काही दिवस नेहापेक्षा आणि स्वतःच्या हिमतीवर झालीय. ती शिव मुळे पुढे अजिबात आली नाही, उलट तिच्यामागे शिव होता, त्याला माहिती होतं, ती राधा होती, तो बघत होता. त्याची बहीण म्हणाली ना आली तेव्हा.

तिच्यात काही स्पार्कस positive, negative दिसले असतील म्हणून चॅनेल ने निवड केली ना, शिव नसता तरी ती फिनालेला काही न करता गेली असती पण सतत नॉमीनेट होऊन, प्रेक्षकांनी वाचवून स्वकर्तृत्व दाखवून गेलीय. नसतं दाखवलं तरी अलगद नेली असती, शिवानीला नेलं तसं.

वीणा डीझर्व्हिंग position 2, तिला देऊदेत अथवा न देऊदेत.

टास्कमध्ये आपल्यालाच कळतं हा तिचा बाणा अजूनही कायम आहे >>> तिथे कोणी आपला बाणा सोडला आहे म्हणून नेहानी सोडावा?
शिवानीचा अ‍ॅरोगन्स, किशोरीचा कुठचाही स्टँड न घेता गोल गोल विधानं करणे आणि धडधडीत खोटंबोलणे, शिव वीणा जे करु नका म्हणून सांगितले ते शेवटपर्यंत करत राहणे -- प्रत्येकजण आपापले बाणे टिकवून आहेत.

बाकी अनेक बदल केले नेहाने. आवाज खाली आणला. चेहऱ्यावरचे खुनशी भाव पुसले. हे एक राहिलं.
आपल्याला कळतं म्हणजे आपल्यालाच कळतं. दुसऱ्याला नाही.
फुगा किती फुगवायचा यात काय सांगायचं?
आणि शिवतर मागचा सीझन पाहून आलाय.

तिथे कोणी आपला बाणा सोडला आहे म्हणून नेहानी सोडावा?
शिवानीचा अ‍ॅरोगन्स, किशोरीचा कुठचाही स्टँड न घेता गोल गोल विधानं करणे आणि धडधडीत खोटंबोलणे, शिव वीणा जे करु नका म्हणून सांगितले ते शेवटपर्यंत करत राहणे -- प्रत्येकजण आपापले बाणे टिकवून आहेत.>> अगदी...कोणीच आपला बाणा सोडायची गरज नाही खरं तर, जिंका अथवा नका जिंकू, ती मेघा तर मागचा मराठीचा सिझन जिंकून मग हिंदी हरुन या सिझनमधे गेष्ट म्हणून आली तरी 'मला सगळं कळतं' हा बाणा कायम ठेवला होता Wink

टास्कमधल (इतरांपेक्षा) जास्त कळत म्हणून मागच्या वर्षी मेघाला पण बऱ्याच जणांनी ऐकवल होत (अगदी ममांसकट).... त्यामुळे नेहा अगदी योग्य मार्गावर आहे Wink

तितक डोक चालत तर ते दिसणारच ना! डंब खेळणाऱ्यांपेक्षा कितीतरी बरे हे!
ऐसी धाकड़ है, धाकड़ है.... ऐसी धाकड़ है!

नेहा मित्रांबरोबर भांडली नाही म्हणून तिला बोल लावणारे ती भांडली असती तरी बोललेच असते की नेहाला तर मित्र पण जपता आले नाहीत Wink
उलट या प्रवासात तिने खुप माणसे जोडली आणि जिंकली

टास्कमधल (इतरांपेक्षा) जास्त कळत म्हणून मागच्या वर्षी मेघाला पण बऱ्याच जणांनी ऐकवल होत (अगदी ममांसकट).... त्यामुळे नेहा अगदी योग्य मार्गावर आहे Wink>>> @स्वरुप, आपल्या दोघांचे विच्चार कसले टायमिंगवर पोष्टलेत. Happy

अजब, कही तू मेरा ड्यूआयडी तो नही Wink>>> नका राव असं काही बाही बोलू...आधीच नेहाला माबोवर सपोर्ट नाहीये फारसा....इतरांची समजूत व्हायची की एकच माणूस बर्याच आयड्यांनी सपोर्ट करतोय.. Wink

अजब Rofl
ओक्के ओक्के..... आम्ही नाही बर का एकमेकांचे ड्यूआयडी Wink

परागला घराबाहेर काढण्यासारखे नेमके काय झाले होते, what was that whole episode about?
याबद्दल एकाही पत्रकाराने प्रश्न का नाही विचारला, ABP माझा वाल्यांनी तर परागचा इंटरव्ह्यू पण घेतला होता, कोणीच तो विषय कसा छेडला नाही ?

स्वरुप, अजब दोघांच्या पोष्टींशी सहमत.

फुगा किती फुगवायचा यात काय सांगायचं? >>> हे खरंय, पण शिवला सांगावं लागलं. कारण फुगा मोठ्ठा फुगवायला ताकद लागते ती त्याच्याकडे असली तरी सगळे फुगे फुगवून डेकोरेट पण त्यानी करायचं होतं, ते देखील ठराविक वेळात. तेव्हा तो फुगा मॉडरेट फुगवून काम भागेल खरं तर शिवला कळायला हवं होतं. शिवच्या वैचारिक लिमीटेशन्स अशा उघड्या पडल्या.

नेहा नाही जिंकत हो. तिला फॅन्स नाहीयत. मुळात ती कोणाला आवडत असेल असेही वाटत नाही.
शिवानी पेक्षा कमी वोट असतील.
विना जिंकेल. मेबी शिव.

पराग चा इंटरव्ह्यू आला आहे की, "त्या दिवशी नक्की काय झाले" अशा टायटल ने सगळीकडे लिन्क्स आल्या होत्या.
तसेही तो प्रश्न काल विचारून काही फायदा नसता झाला. त्यावर उघड बोलणे नको हा बिबॉ चा डिसिजन अस्लयामुळे हे स्पर्धक काही बोलू शकले नसतेच.
पण त्या दिवशीचे डीटेल्स काहीच न दाखवल्यामुळे पराग चा उलट फायदाच झाला आहे. बाय डिफॉल्ट त्याला बरीच सहानुभूतीच मिळाली.

शिवची एव्ही वीणाशिवाय पुर्ण होऊच शकत नाहीच, फार मस्त आणि गोड एव्ही. शिवला वीणा टिकली लावते सतत ते आवडते आणि लांब केस. तो नंतर वीणाला सांगत होता तूच कशी जास्त होतीस एव्हीत, बाकीच्यांच्या पोटात दुखलं.. मग ते दोघे बाहेर जाऊन गप्पा मारत बसले, लय भारी मजा आली Lol . गणपतीबाप्पा मोरया.

आता mute केला, ताईची सुरू आहे. यानंतर वीणाची बघण्यात इंटरेस्ट आहे फक्त.

चालेल चंपा, त्या दोघांमुळे तर हा सिझन बघू शकले मी, थँक्स त्या दोघांना.

बिचुकले गेला चंपा, grand send off दिला त्याला.

आता नेहाची आल्यामुळे tv बंद, थोडी विश्रांती. ह्या मुलीने सॉफ्ट कॉर्नर निर्माण केलेला तो शिववर उगाच घाणेरडा आरोप केला त्यामुळे घालवला. ह्याच मुळे सो मि खूप विरोधात गेला तिच्या.

त्या दोघांमुळे तर हा सिझन बघू शकले मी, थँक्स त्या दोघांना. >> अंजुला मम . मी पण. शिवचा इनोसन्स आवडतो आणि वीणाचा स्पष्टवक्तेपणा आणि खरे पणा . खूप खर खर बोलते ती. इतक्या वेळा नॉमिनेट होऊनही स्वतःच्या हिमतीवर टिकलेय ती . नाही सारख्या बॅगा भरायला लागल्या म्हणून कधी बोलून दाखवल आणि नाही कधी कुणाची दया मिळाली. नाही कधी कोणाकडे नॉमिनेट करू नका म्हणून नेहा सारखी रडली. नाही कधी कोणाला शारीरिक दुखापत केली . बेस्ट आहे वीणा. शिव पहिल्या नंबरवर आणि विना दुसऱ्या तसेच किशोरी तिसऱ्या नंबरवर पर्फेकट आहेत .

सुजा तिचे बाबा होते तेव्हा ते नोकरी धर सोड करायचे पण हे तिने ताई सोडून कोणालाच नाही सांगितलं, ती म्हणाली मला सिपंथी कार्ड खेळायला आवडत नाही, हे अनसीन अनदेखा वर बघितलं.

तीसुद्धा वाईट परिस्थितीतुन गेलीय फक्त गाजावाजा करत नाही.

तीसुद्धा वाईट परिस्थितीतुन गेलीय फक्त गाजावाजा करत नाही.>> अगदी बरोबर. नाहीतर शिवानी. मी पण गरीब परिस्थिती बघितली आहे . आम्ही पण गरीब होतो . परवा पत्रकार परिषदेत पण तेच

सुजा तिचे बाबा होते तेव्हा ते नोकरी धर सोड करायचे पण हे तिने ताई सोडून कोणालाच नाही सांगितलं, ती म्हणाली मला सिपंथी कार्ड खेळायला आवडत नाही, हे अनसीन अनदेखा वर बघितलं.

तीसुद्धा वाईट परिस्थितीतुन गेलीय फक्त गाजावाजा करत नाही.>>>>>>++++१११११११ हो नाटकी पण नाहीये विणा, जशी आहे तशीच दाखवते ती फार स्वतःची इमेज जपत बसली नाही, रोखठोक मामला आहे.

वो तो है, तिला 2 वर आणणार bb. जिंकवू नका म्हणजे मिळवलं, शिवला तुफान वोटिंग येतंय, त्याचातरी मान ठेवा.

एनिवे मी tv बंद ठेवलेला, तिच्यावर प्रकाश पडायच्या आधी थोडा लावला, तो प्रकाश तिच्या कविता मला आवडतात म्हणून बघितला.

माझा मुलगा म्हणत होता कि आजचं वेकप साँग सेम मागच्या बिबॉ सिझन १ ला पण ह्याच दिवशी लावलेलं. मी चेक नाही केलं . बघायला पाहीजे वूट वर

जियो बिग बॉस!

काय AV बनवलीय नेहावर..... इतका कौतुकाचा वर्षाव झाल्यावर त्यापुढे त्या ट्रॉफीची पण मातब्बरी वाटेनाशी होईल एखाद्याला!

नेहा तू जिंकलस! Happy

Pages