मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

बिचूकले शेवटी शेवटी जरा सुसह्य झाले. त्याआधी त्यांचा वावर प्रचंड इरिटेटींग राग आणि किळस आणणारा असा होता. अंघोळ न करणं, दात न घासता तसंच बोलणं, आणि हिनाच्या आंगचटीला जाणं वगैरे. बाथरूम खराब करणं, केळकर पुष्कर श्रोत्री, प्रसाद वगैरे आले होते तेव्हा सांगत होता.

मला वाटले की बिचुकले ना असे इम्प्रेशन दिले असावे की आता पाहुणे असले तरी नंतर सदस्य होऊ शकतात. म्हणूनच ते एंटरटेन करत होते, अ‍ॅटिट्यूड ने रहात होते इतके दिवस. ( तेच बिबॉ ला हवे असणार) पण काल त्यांना फिनाले चे तिकिट न मिळाल्याने भ्रमनिरास झाल्यासारखे दिसत होते. मूड नव्हता आज त्यांचा. तेव्हा बहुतेक समजले असावे त्यांना की आता बिदाई चा टाइम आला म्हणून. आज त्यांची एव्ही दाखवली तेव्हा त्यात एकदा ममां त्यांना अटक झाल्याचे अनाउन्स करताना दिसले घरातल्यांसमोर.
एकूण ट्रॉफी जिंकली नसली तरी एक आख्खा एपिसोड त्यांना डेडिकेट केला गेला हे म्हणजे खूप झाले!
घरात आता आता प्रेस कॉन्फरन्स , मग सगळ्यांना त्यांच्या एव्ही दाखवायचा तो एक कार्यक्रम असतो तो होईल. एकूण बोर असणार आहे हा वीक.

99 मते शिव ला ! वीणा शी मैत्री मला तरी गैर वाटत नाही,
शिवाय बेस्ट टास्क परफॉर्मर आहे.
आणि निगेटिव्ह कमी आहे, शिवानी सारखा जळत नसतो

हो मै ++११११११ बिचूकलेंचा काल अजिबात मूड नव्हता, चेहेरा पाडून बसले होते. त्यांना स्वतः ला ट्रॉफीची खात्री होती. बिबॉ आणि ममांनी पण चढवून ठेवलं होतं ना. काल फुगा फुटला. तरी जाता जाता मी का चाललोय ते कोणाला सांगता येणार नाही अशा अर्थाचा अगम्य इंग्रजी बोलून गेले

आता खरच सिझन फिनालेची गरज आहे का ?
मला वाटतं सिझन २ ला आज त्यांचा खराखुरा विनर मिळालाय, कन्टेन्ट किंग बिचुकले !
इतली स्पेशल ट्रिटम्नेट, एक अख्खा एपिसोड तर बिबॉच्या हिस्टरीमधे कुठल्याच विनरलाही मिळाला नसेल.
मला नाही वाटत त्यांचाभ्रमनिरास झाला आहे, ते २६ ला पुढची सुनवाई असल्याने जाणार ही बातमी ते परत आले तेंव्हाच आलं होती , त्यांना स्वतःला अर्थातच माहितच होते जायचय ते, वाईट मात्रं वाटत होते त्यांना.
ते २६ ला जाणारेत ही बातमी माहित असल्याने पब्लिकला उलट वाटेत होते कि रविवारच्या एपिसोडमधेच जातील, पण बिबीने हे प्लॅन केले होते तर !
बिचुकले डिझर्व्ड इट, आता हिन्दी बिबॉ मधे खरच जातात का बघु !
आज बाकी नेहाने पुन्हा एकदा किती सुरेख लिहिली होती कविता, ती खरोखरच सुंदर लिहिते, पोरगी टॅलेंटेड आहे यात वाद नाही जरी बिबॉच्या घरात आवडत नसली तरी.
किशोरी जाम नाटकी, बिचुकले बाथरुममधे जाऊन रडत होते तेंव्हा काय तोंडं करत होती खोटी खोटी एक्स्प्रेशन्स !

माझ्या अनेक मित्रांच्या दृष्टीनं 'बोगस' आणि 'भंपक' असलेल्या एका रिअॅलिटी शो चा मी जबरा फॅन ! त्यांचा रोष पत्करून मी आवर्जुन पहातो.. त्यावर भरभरून बोलतो. ते मित्र माझ्यावर वैतागतात. यापूर्वीचे हिंदीतले एक डझन आणि मराठीतला आधीचा एक आणि आत्ता सुरू असलेला, असे सगळे सिझन मी न चुकता पाहिलेत.

यावेळेसचा सिझन पहाताना मात्र लाजल्यासारखं झालं. हाच का तो आपला 'फेवरेट शो'? असा प्रश्न पडला. मुळात स्पर्धकांची निवड चुकली , मग ती चूक झाकण्यासाठी शो कर्त्यांनी अशक्य धडपड केली, ती करतानाच्या त्यांच्या काही 'स्ट्रॅटेजीज' चुकल्या आणि मग सगळंच चुकत गेलं... एका खूप इंटरेस्टिंग अशा 'इंटरनॅशनल फाॅरमॅट'ची अतिशय दयनीय मोडतोड झाली ! पार भुगा झाला !! प्रेक्षकांना मूर्ख समजून त्यांची चेष्टा केल्यासारखे निर्णय घेतले जाऊ लागले...

या सगळ्या गदारोळामुळे मी शो पहाणं सोडून देणार इतक्यात या खेळात एक अत्यंत डिग्निफाईड-ग्रेसफूल आणि मुख्य म्हणजे कम्मालीचा संयम असलेली एक स्पर्धक वर येऊ लागली. सुरूवातीला ती खूप विक होती, चाचपडत होती. इतर सगळ्या स्पर्धकांच्या मानानं ती वयानं मोठी होती, पण मानसिक आणि शारिरीक सामर्थ्याची कसोटी पहाणार्‍या या खेळात तिनं आश्चर्यकारक मुसंडी मारली. तरूण स्पर्धकांना लाजवेल अशी चपळता - जिद्द - ताकद - चिकाटी - संयम आणि मनाचा मोठेपणा या गुणांवर तिने माझ्यासारख्या अनेक प्रेक्षकांच्या मनातली आशा जिवंत ठेवली. भांडणं-चिडचिड-गाॅसीप-चुगल्या-कुचाळक्या-टोमणे हे दुर्गूण असणं ज्या खेळात 'स्ट्राँग' स्पर्धकाचं लक्षण मानलं जातं...तिथं ही बाई केवळ समजूतदारपणा-नम्रता-प्रसन्नता-संयम-साधेपणा या गुणांवर भल्याभल्यांना मात देऊ लागली. आज केवळ तिच्यासाठी लाख्खो लोक हा शो पहातात !

चुकीच्या स्पर्धकांच्या निवडीमुळे अखेरची घटका मोजू लागलेल्या या शोमध्ये जर थोडी 'धुगधुगी' जिवंत असेल तर ती याच स्पर्धकामुळे ! हा शेवटचा आठवडा. अर्थातच ही स्पर्धक फिनालेमध्ये पोचली आहे.

आता जर ही स्पर्धक, म्हणजेच - किशोरी शहाणे - जर हा शो जिंकली तर तो त्या 'ट्राॅफी'चा सन्मान असेल...
जर ती जिंकली नाही, तर.... माझे 'ते' मित्र जिंकतील, जे मला 'बिग बाॅस' पहाण्यावरुन चिडवत होते ! Happy

किरण माने

हो किरण माने ह्यावेळी ताईंना सपोर्ट करतायेत, मागच्यावर्षी मेघाला होता. मेघा, पराग पण ताईंना करतायेत.

मला एक कोणी सांगू शकेल का, की midweek eviction झालं आणि त्याआधी आपण आपली ९९ votes वापरली असतील तर परत ९९ नवीन देता येतील का की आठवडाभर एवढीच, काही झालं तरी.

नकोच व्हायला असं eviction कारण आरोह गेला तर votes शिवानी नेहाला जातील.

एकूण ट्रॉफी जिंकली नसली तरी एक आख्खा एपिसोड त्यांना डेडिकेट केला गेला हे म्हणजे खूप झाले!
घरात आता आता प्रेस कॉन्फरन्स , मग सगळ्यांना त्यांच्या एव्ही दाखवायचा तो एक कार्यक्रम असतो तो होईल. एकूण बोर असणार आहे हा वीक. >>> अगदी अगदी.

ताई किंवा नेहा तिसऱ्या चालतील पण पहिले दोन शिव वीणा असावेत.

किशोरी शहाणेबद्दल काही चुकीचे समज करून घेतलेले आहेत किरण माने यांनी,
मेघाला जर यांनी सपोर्ट केला असेल तर मेघा घरात खूप लोकांबद्दल खूप काय काय बोलली आहे,रेशमबद्दल तर शेवटी बर्याच पर्सनल कमेंट्स केल्या होत्या,आणि सईला बाजूला करून जो गेम खेळली होती तो यांना बहुतेक कळला नसेल
किशोरी शहाणेबद्दल आरोहने दिलेल मत एकदम करेक्ट.
किशोरी शहाणेच्या स्टँमिनाला सलाम
पण गॉसिप, चुगल्या या किशोरीने केल्याच नाहीत,हे संपूर्ण चुकीच आहे.

Btw voting ट्रेंड्स नवीन कोणाला माहितेयत का.

मी आत्ता बघितलं त्यात शिव पहिला, शिवानी दुसरी, वीणा तिसरी, नेहा चौथी, किशोरी पाचवी आणि आरोह सहावा आहे. शिवानी मुळे तोटा नेहा आणि वीणाला होतोय. शिवचा पहिला नं तसाच आहे पण channel काय करेल असं असेल तर. शिवानीला झुकतं माप देऊ शकते.

डीजे म्हणाली ते पटायला लागलंय की शिव खालोखाल twitter वर शिवानीला followers आहेत.

एका प्रोमोत पत्रकार परिषदेत शिव वीणालाच जास्त प्रश्न विचारले आहेत असं दिसलं. आईचे मन जिंकणे हा task आहे शिव म्हणाला, तिला लग्नासाठी तयार करावं लागेल, शिवानी म्हणाली की इथून अमरावती पर्यंत शिवला आई फटके मारत नेणार, किती जळते पण शिवने मस्त उत्तर दिलं की, प्यार के लिये कुछ भी. तोंडावर पडली शिवानी. हे सर्व दाखवतायेत का बघू. लग्न कुठे करणार विचारलं तर वीणा म्हणाली अमरावती आणि उल्हासनगर दोन्ही ठिकाणी करू.

अन्जू....।हा वोटिग ट्रेंड आजच्या एपिसोडनंतर बदलेल.
कंटेंट देण्याचा हा शेवटचा भाग,तो झाला की बिचुकल्यांसारख शिवानी आणि वीणाच काम संपल,मग त्यांच्या जागेवर नेहा आणि किशोरी येतील.
आता कल्रर्सने तंबीच दिली असेल वीणाला ठेवायची तर वीणा राहिल तिसर्या पोझिशनवर.
प्रेस कॉन्फरन्समध्ये मला शिव आणि वीणाच दिसत आहेत,शिवानी आहे मध्ये मध्ये वीणाविरोधात बोलायला.
बाकी लोक कशासाठी बसवले आहेत?

UP सगळं प्रोमोतच दाखवलं तर एपि मध्ये काय दाखवणार!
रच्याकने , यांचा प्रोमो आणि एपि पार वेग वेगळा असतो

आता कल्रर्सने तंबीच दिली असेल वीणाला ठेवायची तर वीणा राहिल तिसर्या पोझिशनवर. >>> वीणाने दिलाय की बराच कंटेंट. शिव वीणा, वीणा शिवानी, प्लस चांगले task केले. उद्धटपणा केलाय, उर्मटपणा केलाय.

नुसती कलर्सच्या जीवावर थोडी जगली, कितीतरी वेळा nominate होऊन वाचली आहे. ती आहे डीझर्विंग.

हो पण बिबॉस ला नेहा आणि लोकांच मन राखण्यासाठी नाईलाज म्हणून का होईना किशोरी हवी असेल तर?

लेटेस्ट बदल असा की शिव, वीणा, शिवानी, ताई, नेहा आणि आरोह.

मी रात्री करेन voting. नेहासाठी वाईट वाटतंय. शिवानीमुळे तोटा जास्त तिलाच होणार की काय पण मी नाही तिला voting करू शकत. दिलमे सिर्फ शिव वीणा.

आता bb नी शिवानीला votes असतील तरी मागे ठेवावं किंवा नेहाच्या fans नी जागे व्हावं.

बिचुकलेंच्या बाबतीत बहुतेक चॅनेलची बोटे दगडाखाली असावीत..... TRP दिलाही असेल त्यांनी पण ज्याप्रकारे आलेला प्रत्येक छोटा मोठा पाहुणा बिचुकलेंना जो special importance देत होता आणि या सर्वांवर कडी म्हणजे कालचा संपूर्ण एपिसोड.... हे सगळे बघता जे आपल्यासारख्या सामान्य प्रेक्षकांना दिसले नाही असे असामान्य काहीतरी बिग बॉसला त्यांच्यामध्ये दिसले असावे
आपल्या सामान्यपणाचा हा दोष असावा!
वरती कुणीतरी म्हंटलेय त्याप्रमाणे त्यांचा राग नाही आला तसेच फारसे कौतुक वगैरे ही कधी वाटले नाही

काल आरोहने मस्त घेतली मुलाखत.... अगदी सहज आणि ओघवती शैली आहे त्याची!

नेहाची कालची कविता आणि त्याबरोबर इतरांचे परफॉर्मन्स बघून शुगोलची "वैचारिक क्वॉलिटी" वाली कॉमेंट अजूनच पटली

बाकी ज्यांना टास्कमध्ये लूपहोल शोधणे म्हणजे चिटींग वाटते आणि केवळ समजूतदार, नम्र, साधी आहे म्हणून एखादी व्यक्ती जिंकावी वाटते त्यांना फक्त एकच सांगावासे वाटते.... हाय कंबख्त तूने पी ही नही!

असो!
आज पत्रकार परीषद..... प्रोमोवरुन जरी ते बाहेर भेटण्याची/मैत्री करण्याची इच्छा नाही हे वीणा शिवानीबद्दल बोलतेय असे भासवलेले असले तरी प्रत्यक्षात मात्र ती कदाचित रुपाली किंवा परागबद्दल बोलत असेल!

एबीपी माझावर पत्रकार परिषद दाखवत होते.
तुम्हांला घरातल्या तुमच्या हातून घडलेल्या कोणत्या गोष्टीची खंत वाटते असा प्रश्न प्रत्येकाला होता.
नेहा शेवटी उत्तर देत होती. आधीच्या प्रश्नाचं उत्तर देत तिनी स़ागितलं की हा सीझन पहिल्यापेक्षा व्हायोलंट नव्हे, अधिक एनर्जेटिक होता.

मी केलेल्या चुकीच्या गोष्टींचं परिमार्जन त्या त्या वेळी केलं, त्यामुळे त्याबद्दल रिग्रेट नाही.
पण घरात जो एक प्रसंग झाला......

पुढे बिग बॉसचा आवाज - पत्रकार परिषदेची वेळ स़ंपली

. उत्तर पूर्ण झालं नाही.

बिचुकलेंचा बीबी नी उपयोग करुन घेतला यूज़ ऐण्ड थ्रोव केले अशा खबरा का येत आहेत. बिचुकले आणी शिवानि मध्ये भेदभाव केला तिला सदस्य केले पण त्याना नाही केले.
बीबी नी बिचुकले ना सदस्य केले नाही कारण त्यानां 2 3दा घरा बाहेर जावे लागणार होते . शिवानि फक्त एकदाच बाहेर जाऊन आली. बिचुकले मधी ही 24तास घराबाहेर होते. आणी आता ही 26तारखेला त्याना जावे लागणार होते.
उलट बीबी ने त्याना परत पाहुणे म्हणून राहण्याची संधी दिल्ली. ह्याच्या मुळे बीबी ला जसा फायदा झाला असेल तसा त्याना ही झाला असेलच की.

पुढे बिग बॉसचा आवाज - पत्रकार परिषदेची वेळ स़ंपली >>> हो मी बघितलं हे. जबरी हसले मी Lol फार फुटेज घ्यायला लागली असं bb ना वाटलं. जाम बोलत होती.

पण घरात जो एक प्रसंग झाला. >>> अच्छा हे पण म्हणाली का, ते नाही माझ्या लक्षात आलं, बरं झालं तिला थांबवलं.

कालचा सोहळा बरा झाला. बिचकुले तसा बरा होता. एन्टरटेन करत होता थोडफार. ते क्रिमीनल रेकॉर्ड नसत तर बिबॉने त्यालाच विनर केल असत.

किशोरीचा डान्स, नेहाची कविता, आरोहच सूत्रसन्चालन चान्गल होत.

सुरुवातीच स्विमिन्ग पूलाचा सिक्वेन्स पाहिला. मस्त होता. नेहा स्विमिन्ग कॉस्च्यूममध्ये मेकअप केल्यामुळे छान दिसत होती. आरोह शिव- विणाला अफेअरवरुन टोमणे मारायचा, तोच काल शिवला तुम्ही एकत्र पाण्यात उडी मारा म्हणत होता. शिवने विणाला उचलल होत आणि विणा लाजत होती.

शेवटचा आठवडा डॉग आणि कॅट फाइट्स शिवाय गेलेला मला आवडेल. >>>>>>> कस शक्य आहे हे, आज प्रेस कॉन्फरन्समध्ये विणा- शिवानी फटाके फोडतील. Proud

फायनलला सिलेक्ट झाल्यानन्तर शिव विणाने गार्डनमध्ये वाकून प्रार्थना केली ते क्यूट होत. Happy

आरोह चं जॅकेट पण घेऊन गेले.... >>> Rofl

बिग बॉस सतत सौजन्य सप्ताहात असल्या सारखं चाललं तर बघायला मजा येणार नाही, असं कोणीतरी म्ह्टलंय. >>>>>>> ते सौजन्य सप्ताहाच मी बोलले होते.

ते बरोबर आहे. पण भांडणं , वादावादी ठरवून केलेल्या नसाव्यात. >>>>>>>> ह्याच्याशी मात्र पुर्णपणे सहमत. भांडणं, आणि प्रेमप्रकरणे सुद्दा ठरवून केलेल्या नसाव्यात.

बादवे, काल वेकअप सॉन्गला लागलेल गाण बिचुकलेच ओरिजनल गाणे आहे की हिन्दी चित्रपटाच गाण आहे? Uhoh

काल नेहा अस काय मस्करीत म्हणाली कि बिचुकले तिच्या अन्गावर धावून जाणार होता? नन्तर तिने सावरुन घेतल.

आजचा promo पाहिला... एपिसोडही पाहणार आहे.. मस्त जिरवली वीणाने भवानीची.. आता फक्त episode मध्ये दाखवा म्हणावं. मांजरेकरलाही मस्त सुनावले तिने deserving नाही वाटलीस म्हटलं त्यावरून...

काल नेहा अस काय मस्करीत म्हणाली कि बिचुकले तिच्या अन्गावर धावून जाणार होता? नन्तर तिने सावरुन घेतल. >>> ती त्यांना चला, भांडी लावा असं काहीतरी गमतीत म्हणाली. कवितेतून घेतलेले चिमटे त्यांनी व्यवस्थित झेलले म्हणून त्यांची फिरकी घ्यावी असं तिला वाटलं असेल पण बिचुकले ते गमतीत घेऊ शकले नाहीत. As usual! Total unpredictable person!
अर्थातहे शिवानी म्हटली असती तर गोष्ट वेगळी होती! Wink

वोट करून काही उपयोग नाही मित्रांनो. सगळं इ-कचऱ्यात जातं. चॅनेल ला पाहिजे तोच विनर होतो शेवटी. सगळी व्यावसायिक गणित असतात. पुढे येणाऱ्या चित्रपटात किंवा सीरियलमध्ये जर शो च्या प्रोड्युसर चे पैसे लागले असतील आणि त्यातला कोणी पात्र घरात आलं असेल तर तोच विनर ठरतो. तसं कोणी नसेल तर पुढच्या शक्यतांचा विचार करून विनर ठरवला जातो. हिंदी बिग बॉस हे त्याचा एक ढळढळीत उदाहरण आहे. मराठीतही तेच होईल यावेळी कारण मेघा सारखा सपोर्ट कोणालाच नाहीये यावेळी त्यामुळे लोकांचा उद्रेक होण्याची शक्यता कमीच. उगाच मानसिक समाधानासाठीसुद्धा वोट करण्यात काही अर्थ नाही.

वोट करून काही उपयोग नाही मित्रांनो. सगळं इ-कचऱ्यात जातं. चॅनेल ला पाहिजे तोच विनर होतो शेवटी........हे मात्र खर आहे.

गेल्यावेळी कलर्सच्या राधा आणि लक्ष्मी सदैव मंगलममधले कलाकार बीबी हॉटेल टास्कसाठी आले होते.तस या वेळी चँनेलच्या मालिकेतले कलाकार आले नाहीत.

चॅनलने परत एकदा आपल्या हिरॉईनची इमेज बील्ड मस्त सफाईदारपणे केली. शेवटच्या काही आठवड्यांपूर्वीपर्यंत ज्या वीणाला सोशल मीडीयावर जमके शिव्या पडत होत्या ती आता almost first runner up व्हायच्या तयारीत आहे. यात सगळ्यात मोठा (नंबर १) वाटा शिवानीचा व पर्यायाने (तिला परत घेवून येणार्या) चॅनेलचा आहे. शिवानीच्या सततच्या टार्गेट करण्यामुळे वीणाला सहानुभूतीची लाट तर मिळालीच पण घरात नकळतच दोन ग्रूप तयार झाले, सो कॉल्ड व्हिलन व सो कॉल्ड हिरोज. शेवटच्या २/३ आठवड्यात तर शिवानीच्या दादा (की ताई?) गिरीचा व गुंडगीरीचा कळस चालू असल्याने व त्या ग्रूपमधे सामील असल्याने शिवानी, आरोह व नेहा हा व्हिलन ग्रूप शिव्यांस पात्र झाला आणि सहाजिकच दुसरा ग्रूप हिरोंचा वाटत गेला.
सुरवातीच्या काळात भंपक KVRP या व्हीलन ठरू पाहणार्या ग्र्रूपमधून वेळीच फारकत घेतल्याने (त्याला खरंतर घमेंडी वीणाला घमेंडी पराग सहन होत नव्हता हे कारण होते, पण ते असो..) ती अचानकच इतर सगळ्यांपेक्षा हायलाईट झाली होती.
नंतरच्या काळात किशोरीशी व शीव सोडून घरातल्या प्रत्येकाशी या न त्या कारणाने सततच्या वादावादीमुळे annoying वाटू लागलेल्या वीणाला संजीवनी मिळाली शिवानीच्या येण्याने. या सगळ्या प्रवासात तिला (नंबर २ चा) फायदा ठरला शिवचा. या सिझनच्या पहिल्या भागापासून consistently संभाव्य विनर समजल्या जाणार्या शिवला तिने कधीही दूर जावू दिले नाही (पदरालाच बांधून ठेवले म्हणा ना!, पण त्यानेच 'चाल्तंय की' अ‍ॅटीट्यूड ठेवून तिला सपोर्टच दिला). आता तर शिवपंख्यांनाही (यात मीही येतो Wink ) वीणा २ नंबरवर येते की काय असे वाटू लागले आहे. जरी अजूनही माझा २ नंबरसाठी फस्ट चॉईस नेहा असली तरी...तेही असोच..
इथे आवर्जून नमूद करायला हवं की वीणाच्या टास्कमधल्या हुशारीवर व लिमीटमधे असेल तर येणार्या स्पष्टवक्तेपणाबद्दल काहीच वाद नाही, but she got more than she deserved!

हो सध्या ज्या प्रकारे फूटेज मिळत आहे त्यावरून वीणाच नं २ ला येईल असे वाटते आहे. नेहाचे नुकसान झाले आहे शिवानीमुळे. खर तर ती डिझर्विंग आहे पण फॅन फॉलोविंग दिसत नाहीये जास्त. शिवानीमुळे उलट निगेटिव झाली ती जास्त. सध्या तर आवाज आणि अस्तित्वच नाही दिसत आहे तिचे. बिबॉ पण मुद्दाम वीणा- शिवानीच्या भांडणाला आणि उरलेल्या वेळात बिचुकले ला कव्हर करत होते. आता प्रेस कॉन्फरन्स मधे प्रोमो जितके आलेत त्यात वीणा, शिव आणि शिवानीच बोलताना दिसताहेत. नेहा बाजूलाच पडलीये का? असे राहिले तर ती नं ४ वर आणि शिवानी नं ३, मनी बॅग ऑफर कँडिडेट होईल मग बरोब्बर.

Pages