कालच आनंदी गोपाळ चित्रपट पाहिला, चित्रपटगृह पूर्णपणे भरलेले होते. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप छान वाटले. चित्रपट अतिशय आवडला.
तर आता चित्रपटाविषयी, आनंदीबाई भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे कथा आपल्याला परिचित आहेच, परंतु त्यांचा डॉक्टर होण्यापर्यंत चा प्रवास हा चित्रपट उलगडून सांगतो.
सुरुवातीला बालपणीची यमु म्हणजेच यमुना लग्नानंतर आनंदी होऊन गोपालरावांच्या घरात जाते. गोपाळरावांची लग्नाआधीच अट असते की मुलीने शिकलं पाहिजे. त्याप्रमाणे ते तिला प्रोत्साहन देतात प्रसंगी जबरदस्ती करून तिला अभ्यास करण्यासाठी भाग पाडतात. लहानगी आनंदी सुरुवातीला घाबरते मग हळूहळू सरावत जाते. हा त्यांचा शिक्षणा बद्दलचा आग्रह इतका टोकाचा का? याचे उत्तर तेच चित्रपटाच्या शेवटच्या भागात देतात.
सुरुवातीला अभ्यास नाही केला तर गोपाळराव आपल्याला सोडून जातील या भीतीपोटी अभ्यास करणारी आनंदी तिच्या आयुष्यात आलेल्या एका वादळामुळे अधिक पेटून अभ्यास करू लागते अन स्त्री डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहते. त्यानंतर सुरु होतो या दाम्पत्याचा संघर्षमय प्रवास. संघर्ष घरच्या माणसांशी, संघर्ष तथाकथित संस्कृतिरक्षकांशी, संघर्ष समाजाशी, संघर्ष स्वतःशी. तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवऱ्याने तिला दिलेली साथ अगदी पाहण्यासारखी आहे अन ती सुद्धा त्या काळात, 1890 च्या सुमारास. मग ते शहारामागून शहर बदलणे असो, लोकांच्या धमक्या असो, पैशांची जमवाजमव असोत की आणखी बराच काही. प्रचंड जिद्दीने न कठोर मेहनतीने आनंदी जेव्हा अमेरिकेच्या womens मेडिकल कॉलेज ऑफ पेनेसिल्वानियाची डॉक्टरकीची डिग्री मिळवते तो क्षण अगदी खास बघण्यासारखा आहे, डोळे आपोआप झरू लागतात.
आता कलाकारांबद्दल, तर ललित प्रभाकर व्यक्तिशः जुयेरे पासून माझा आवडता अभिनेता आहे एक वेगळा स्पार्क आहे त्याच्यात. त्याने भूमिकेचं सोनं केलं आहे. नवोदित भाग्यश्री मिलिंद ने ही भूमिका समजून उमजून चोख बजावली आहे. बाकी बरीच मंडळी आहेत जसे क्षिती जोग बऱ्याच दिवसानंतर मराठीत दिसली आहे. लक्षात राहणारी अजून एक भूमिका केली आहे गीतांजली कुलकर्णीने, गोपळरावांच्या पहिल्या पत्नीच्या आईची. मला इकडे आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे संवाद न भाषा ही त्या काळाप्रमाणे बोजड न घेता आजच्या प्रमाणे घेतली आहे परंतु तरीही कुठे खटकत नाही. दिग्दर्शकानेच एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे मुख्य भर ती कथा न त्या दाम्पत्याचा प्रवास यावर असल्याने असे केले आहे. जुने कल्याण , ठाणे, कोल्हापूर अलिबाग इथले चित्रण छान आहे. चित्रपट संपताना तू आहेस ना हे गाणे पाठीमागे चालू असताना सगळ्या महान कार्य केलेल्या स्त्रीयांचे फोटो एकामागून एक येत जातात आणि अगदी स्तब्ध व्हायला होतं खूप सुंदर अनुभव येतो. एक स्त्री असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो.
आता राहिले गाण्यांबद्दल तर २ गाणी विशेष लक्षात राहणारी आहेत त्यातले एक सुरुवातीलाच त्यांच्या लग्नाच्या प्रसंगी आहे रंग मांडीयेला, अगदी सुंदर सोपे शब्द न गुणगुणवीशी वाटणारी चाल आणि दुसरे वाटा वाटा वाट गं हे पण गाणे छान जमून आले आहे . आणि शेवटचे तू आहेस ना. हे गाणं पार्श्वभूमीवर आहे
चित्रपट आताच प्रदर्शित झालाय आणि कथा थोडीबोहोत सर्वांच्या परिचयाची आहे म्हणून त्याबद्दल जास्त सखोल लिहिले नाही खरंतर ही सांगण्याची नाही तर पाहण्याची गोष्ट आहे, जरूर पहा मंडळी
आनंदी गोपाळ
Submitted by सान्वी on 18 February, 2019 - 06:22
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चिनुक्स छान पोस्ट्स .
चिनुक्स छान पोस्ट्स .
वरती आनंदीबाईंच्या अंतकाळात मदत न करणाऱ्या ज्या वैद्याचा उल्लेख आहे ते त्याकाळातील भारतातील सर्वश्रेष्ठ वैद्य धन्वंतरी बापूसाहेब मेहेंदळे हे होते. त्यांनी त्या काळात सर्व भारतात खुलं आव्हान दिल होतं ," जो कोणी माझा आर्यवैद्यकात आणि गीर्वाण भाषेत हात धरील त्याला साष्टांग दंडवत घालून आजन्म त्याचा शिष्य होऊन राहील आणि पुन्हा वैद्यकीला हात लावणार नाही."
पाश्चात्य उपचार फेल झाल्यावर आनंदीबाई बापूसाहेब आपल्याला बरे करतील या आशेने पुण्यात आल्या. त्याकाळातील बऱ्याच बड्या लोकांनी बापूसाहेबांपुढे आपले वजन खर्च केले पण त्यांना काही फरक नाही पडला. शेवटी शेवटी आनंदीबाईंनी स्वतः आर्जवे केली पण काही फरक झाला नाही. त्यांना क्षयाचा तो आजार ठीक करणं काही अवघड नव्हतं पण .....
याच्याबद्दल फार काही माहिती सापडली नाही मला . फक्त दोन-तीन वैद्यकीचे किस्से माहित आहेत आणि त्यांनी सांगितलेली काही औषधे. कोणाला त्यांच्यावरील एखाद पुस्तक माहित असेल तर कृपया सांगा.
त्याकाळातील बऱ्याच बड्या
त्याकाळातील बऱ्याच बड्या लोकांनी बापूसाहेबांपुढे आपले वजन खर्च केले पण त्यांना काही फरक नाही पडला. शेवटी शेवटी आनंदीबाईंनी स्वतः आर्जवे केली पण काही फरक झाला नाही. त्यांना क्षयाचा तो आजार ठीक करणं काही अवघड नव्हतं पण .....> म्हणजे त्या वैद्यांनी आनंदीबाईंवर उपचार करण्यास नकार दिलेला का?
हो सस्मित.
हो सस्मित.
नुसता नकार नाही तर शेलक्या शब्दांत नकार. गोपाळरावांच्या पत्रव्यवहारात वाचायला मिळेल.
बापुसाहेब मेहेंदळे? अजून
अजून सविस्तर माहिती द्याल का?
@सस्मित - " ती बाई
@सस्मित - " ती बाई माझ्यापेक्षा किती शहाणी ! तिने तर प्रत्यक्ष पाताळ लोकांची विद्या संपादन केली आहे. तिला माझ्यासारख्याने काय औषध द्यावे?" हे त्यांचं उत्तर असे. बापूसाहेब हे फार आधीच्या काळातील वैद्य होते आणि साहजिकच रूढीपरंपरा पाळणारे होते. आनंदीबाई गेल्या तेव्हाच यांचं वय नव्वदीत असावं. यांनी सांगितलेली सर्पविष, पिसाळलेल्या कुत्र्याचं विष, मधुमेह, भगंदर, दमा यासारख्या गंभीर आजारावरील औषधे आमच्या घरच्या लोकांच्या अनुभवात पूर्ण उतरली होती आणि पुर्वी भरपूर उपयोग झालाय-अजूनही होतोय.
मधुरा, मला नक्की शब्द आठवत
मधुरा, मला नक्की शब्द आठवत नाहीयेत आत्ता. पण विश्रब्ध शारदा खंड एक मध्ये मी वाचलं असावं बहुतेक.. मेहेंदळे वैद्यांचे बोलण्याचा आशय असा आहे की आनंदीबाई एवढ्या परदेशी जाऊन विद्या शिकून आल्या आहेत तर त्याच रोगावर उपचार करू शकतील (उपरोध )
भरत,
भरत,
अहो, ग्रामण्य प्रकरणात गोपाळराव कसे असतील टिळक आणि रानडे यांच्याबरोबर? त्यांनीच ग्रामण्य प्रकरण घडवून आणलं.
रानड्यांकडे त्यांचा प्रायश्चित्त न घेतलेला मित्र जेवायला आला, तेव्हा त्यांनीच कोण कुणाच्या पंगतीला बसलं हे पुणेवैभवमध्ये छापून आणलं होतं.
*
गोपाळराव सुधारकांच्या गोतावळ्यात होते, तसे सनातन्यांच्याही होते. सुधारकांची फजिती करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. आगरकरांवरही वाट्टेल ते आरोप केले आणि नंतर माफीही मागितली.
हो चिनूक्स. माझी शब्दरचना
हो चिनूक्स. माझी शब्दरचना चुकली.
अरेरे! किती वाईट
अरेरे! किती वाईट
प्राचीन प्रतिसाद दिल्या बद्दल
प्राचीन, प्रतिसाद दिल्या बद्दल धन्यवाद.
कठीण आहे अश्या वैद्यांचे.
हे मान्य करायला हवे की भारतीय वैद्यक शास्त्र अधिक उत्तम होत. पण अश्या वेळी मदत करणे अपेक्षित होते आणि गरजेचेही. कदाचित याच वागणूकी मुळे लोक परदेशी शिक्षणाकडे आकृष्ट झाले.
गोपाळराव सुधारकांच्या
गोपाळराव सुधारकांच्या गोतावळ्यात होते, तसे सनातन्यांच्याही होते. सुधारकांची फजिती करण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. आगरकरांवरही वाट्टेल ते आरोप केले आणि नंतर माफीही मागितली.
Submitted by चिनूक्स on 22 August, 2019 - 01:48 >>>> ओहो!! म्हणजे ते खुपच विक्षिप्त होते. प्लिज तुम्ही कसला सा दुसरा भाग लिहीणार होता ते लिहाच हो. हे असले बरेच तपशिल माझ्या वाचण्या-ऐकण्यात नाहिय… आणि पहिला भाग कुठे मिळेल ते ही सांगा.
दूरदर्शन वर आनंदी गोपाळ अशी
दूरदर्शन वर आनंदी गोपाळ अशी serial लागायची हिन्दी मध्ये. अजित भुरे आणि भार्गवि चिरमूले मुळ भुमिकेत होते... लहान असताना थोडिफार बघितलेली आठवते आहे..यूट्यूब वर सर्च केली तर सापडली..बघायला हवी.. खाली लिंक आहे पहिल्या भागाची..
https://youtu.be/SdP3Dp_X3bI
दूरदर्शन वर आनंदी गोपाळ अशी
दूरदर्शन वर आनंदी गोपाळ अशी serial लागायची हिन्दी मध्ये. अजित भुरे आणि भार्गवि चिरमूले मुळ भुमिकेत होते... लहान असताना थोडिफार बघितलेली आठवते आहे..यूट्यूब वर सर्च केली तर सापडली..बघायला हवी.. खाली लिंक आहे पहिल्या भागाची..
https://youtu.be/SdP3Dp_X3bI
मीपण काही भाग बघितलेले अजित
मीपण काही भाग बघितलेले अजित भुरे आणि भार्गवी चिरमुलेच्या सिरीयलचे पण पूर्ण नव्हती बघितली. दुपारी असायची बहुतेक.
तुरू, खूप खूप धन्यवाद लिंक
तुरू, खूप खूप धन्यवाद लिंक बद्दल. फार दिवस शोधत होते मी. भार्गवी आणि अजित भुरे यांनी अप्रतिम अभिनय केला होता या मालिकेत. विशेषतः गोपाळरावांच्या स्वभावाच्या छ्टा चांगल्याप्रकारे दाखवल्या होत्या.
ही माहिती नवी आहे.जे कोणी
ही माहिती नवी आहे.जे कोणी वैद्य असतील त्यांचे वागणे अजिबात आवडले नाही.माणूस मृत्यू च्या दारात असताना पण पॉवर प्ले आणि इगो ची भूक क्षणभर बाजूला ठेवता येऊ नये?
काही प्रसंग जरा जास्तच
काही प्रसंग जरा जास्तच अतिरंजित केल्यासारखे वाटतात.
एकदा बापूसाहेब त्यांच्या
एकदा बापूसाहेब त्यांच्या वाड्याच्या सज्जात उभे होते. त्यांच्या घरासमोरून विश्रामबागेकडे जाणारा रस्ता असल्याने येजा चालू होती. बापूसाहेबांनी अचानक त्यांच्या नोकराला हाक मारून बोलवून घेतलं. त्याला हुकूम दिला- " रस्त्यावरून तो जो माणूस चाललाय त्याच्या मागे जा बघू. तो माणूस विश्रामबागेजवळ जाऊन मरणार आहे . त्याच्या घरच्या लोकांचा तपास करून प्रेताची वाहतुकीची सोय करूनच ये परत." नोकर धावतच त्याच्या मागे गेला. पुढे पाहतो तो काय, विश्रामबागेजवळ तो माणूस कोसळला आणि पाहता पाहता गतप्राण झाला ! त्याची पुढची सोय करून आश्चर्याने थक्क होऊन तो परत घरी आला. "बापूसाहेब, तो मनुष्य मरणार हे आपल्याला एवढ्या दुरून कसं कळलं ?" बापू उत्तरले, " अरे त्याची नाडी आणि हृदयाचे ठोके बरोबर चालत नव्हते." (हॅलोजन चा मोठा
)
वरचा एक किस्सा टाकलाच तर
वरचा एक किस्सा टाकलाच तर दुसरा एक टाकल्याशिवाय राहवणार नाही.
गोव्यात दादा वैद्य म्हणून मोठे धनवंन्तरी होऊन गेलेत. तिथे त्यांचा एक मोठा पुतळा आहे आणि एक रोड आहे त्यांच्या नावाने. एक शिक्षणसंस्थाबी हाये.
https://timesofindia.indiatimes.com/city/goa/Dada-Vaidyas-legacy-ancestr...
दादा वैद्य मूत्रपरीक्षेवरून रोगनिदान करण्यात वस्ताद होते. हि बातमी तिथल्या ब्रिटिश गव्हर्नरला कळाली. त्याला हि सर्व भोंदूगिरी वाटत असल्याने त्याने दादांची परीक्षा घ्यायची ठरवली. आपल्या घोड्याचे मूत्र बाटलीत भरून नोकराकरवी ते दादांकडे पाठवून दिले. दादांनी त्या बाटलीकडे काही क्षण पाहून त्या नोकराला निरोप दिला, " ज्याचे हे मूत्र आहे त्याला पोटभर खायला भेटत नाही. अनेक दिसापासून तो अर्धपोटी आहे. त्याला पोट्भर हरबरे खाऊ घाला म्हणजे तो बरा होईल."
दादांची हि पारख पाहून तो अधिकारी त्यांचा भक्तच बनला. रोज सकाळी दादांना नमस्कार घालूनच तो पुढे जाई. दादा वारले तेव्हा त्यांचा पार्थिवाला मानाचा पहिला हार ह्या गव्हर्नरचा होता ! बहुतेक हा पुतळा त्यानेच उभारला असावा.
(हि घटना फोंड्यात सर्वत्र माहित असल्याने दिवा नाही देत यात )
यंदाच्या अमेरिकावारीत मागच्या
यंदाच्या अमेरिकावारीत मागच्या महिन्यात पोकीप्सि दफनभूमीत आनंदीबाईंची समाधी बघितली. Anandibai Joshi M D 1865-1887 First Brahmin Woman To Leave India To Obtain An Education असे कोरलेले आहे.
खरच कमाल आहे त्यांच्या ध्येयाची, हिंमतीची, बुद्धीची..
पोकीप्सि दफनभूमीत आनंदीबाईंची
पोकीप्सि दफनभूमीत आनंदीबाईंची समाधी बघितली. Anandibai Joshi M D 1865-1887 First Brahmin Woman To Leave India To Obtain An Education>>>>>>>>> ग्रेट!!
गजर्यावरून आठवले.
गजर्यावरून आठवले. गुरुचरित्रात सवाष्ण कशी असावी-दिसावी हे वर्णन करणार्या काही ओव्या आहेत. त्यात मुखी विडा, माथां वेणी अशी शब्दयोजना असल्याचे आठवते. गुरुचरित्र नित्य पारायणात नाही. एकदाच वाचले होते. कन्नड भाषेची छाप असलेली जुनी मराठी वाचण्यासाठी आणि इतर संदर्भांसाठी क्वचित हाताळले जाते. माथां वेणी आहे की फूल ते पाहायला हवे. आणि विडा की तांबूल हेही. मोठी पोथी आहे. जमले तर पडताळून पाहीन. मात्र, दक्षिण कोंकणात, गोवा आणि दक्षिण भारतात सर्वत्र निदान पूजेस बसताना तरी केसांत फुले (भरघोस फुले, गजरे वगैरे) असतातच.
पूजेला बसताना वेणी आणि
पूजेला बसताना वेणी आणि अलिबागमधल्या बाजारातली वेणी यात फरक असावा.
पूजेला बसताना तर वेणी-फुले
पूजेला बसताना तर वेणी-फुले पाहिजेतच, पण एरवीही (दक्षिण भारतात) सवाष्ण बायकांनी गजरे, फुले, वेण्या भरभरून माळण्याची पूर्वापार प्रथा आहे. तिकडे फुले नाना प्रकारे गुंफणारे कारागीर असतात.
फुले विकत घ्यायची झाली तर अलिबागच नसले तरी कुठेतरी विकत घ्यावी लागणारच.
जाता जाता : बंगाली कारागीरही फुलांच्या वेगवेगळ्या रचना (स्त्रियांनी केसांत माळण्यासाठीच असे नव्हे) करण्यात पारंगत असतात.
आणखी जाता जाता: दक्षिण भारतात आणि खासकरून किनारपट्टीच्या भागात कुलीन महिलाही फुले गुंफण्यात पटाईत असतात.
Pages