आनंदी गोपाळ

Submitted by सान्वी on 18 February, 2019 - 06:22

कालच आनंदी गोपाळ चित्रपट पाहिला, चित्रपटगृह पूर्णपणे भरलेले होते. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून खूप छान वाटले. चित्रपट अतिशय आवडला.
तर आता चित्रपटाविषयी, आनंदीबाई भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्यामुळे कथा आपल्याला परिचित आहेच, परंतु त्यांचा डॉक्टर होण्यापर्यंत चा प्रवास हा चित्रपट उलगडून सांगतो.
सुरुवातीला बालपणीची यमु म्हणजेच यमुना लग्नानंतर आनंदी होऊन गोपालरावांच्या घरात जाते. गोपाळरावांची लग्नाआधीच अट असते की मुलीने शिकलं पाहिजे. त्याप्रमाणे ते तिला प्रोत्साहन देतात प्रसंगी जबरदस्ती करून तिला अभ्यास करण्यासाठी भाग पाडतात. लहानगी आनंदी सुरुवातीला घाबरते मग हळूहळू सरावत जाते. हा त्यांचा शिक्षणा बद्दलचा आग्रह इतका टोकाचा का? याचे उत्तर तेच चित्रपटाच्या शेवटच्या भागात देतात.
सुरुवातीला अभ्यास नाही केला तर गोपाळराव आपल्याला सोडून जातील या भीतीपोटी अभ्यास करणारी आनंदी तिच्या आयुष्यात आलेल्या एका वादळामुळे अधिक पेटून अभ्यास करू लागते अन स्त्री डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहते. त्यानंतर सुरु होतो या दाम्पत्याचा संघर्षमय प्रवास. संघर्ष घरच्या माणसांशी, संघर्ष तथाकथित संस्कृतिरक्षकांशी, संघर्ष समाजाशी, संघर्ष स्वतःशी. तिचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवऱ्याने तिला दिलेली साथ अगदी पाहण्यासारखी आहे अन ती सुद्धा त्या काळात, 1890 च्या सुमारास. मग ते शहारामागून शहर बदलणे असो, लोकांच्या धमक्या असो, पैशांची जमवाजमव असोत की आणखी बराच काही. प्रचंड जिद्दीने न कठोर मेहनतीने आनंदी जेव्हा अमेरिकेच्या womens मेडिकल कॉलेज ऑफ पेनेसिल्वानियाची डॉक्टरकीची डिग्री मिळवते तो क्षण अगदी खास बघण्यासारखा आहे, डोळे आपोआप झरू लागतात.
आता कलाकारांबद्दल, तर ललित प्रभाकर व्यक्तिशः जुयेरे पासून माझा आवडता अभिनेता आहे एक वेगळा स्पार्क आहे त्याच्यात. त्याने भूमिकेचं सोनं केलं आहे. नवोदित भाग्यश्री मिलिंद ने ही भूमिका समजून उमजून चोख बजावली आहे. बाकी बरीच मंडळी आहेत जसे क्षिती जोग बऱ्याच दिवसानंतर मराठीत दिसली आहे. लक्षात राहणारी अजून एक भूमिका केली आहे गीतांजली कुलकर्णीने, गोपळरावांच्या पहिल्या पत्नीच्या आईची. मला इकडे आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे संवाद न भाषा ही त्या काळाप्रमाणे बोजड न घेता आजच्या प्रमाणे घेतली आहे परंतु तरीही कुठे खटकत नाही. दिग्दर्शकानेच एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे मुख्य भर ती कथा न त्या दाम्पत्याचा प्रवास यावर असल्याने असे केले आहे. जुने कल्याण , ठाणे, कोल्हापूर अलिबाग इथले चित्रण छान आहे. चित्रपट संपताना तू आहेस ना हे गाणे पाठीमागे चालू असताना सगळ्या महान कार्य केलेल्या स्त्रीयांचे फोटो एकामागून एक येत जातात आणि अगदी स्तब्ध व्हायला होतं खूप सुंदर अनुभव येतो. एक स्त्री असल्याचा प्रचंड अभिमान वाटतो.
आता राहिले गाण्यांबद्दल तर २ गाणी विशेष लक्षात राहणारी आहेत त्यातले एक सुरुवातीलाच त्यांच्या लग्नाच्या प्रसंगी आहे रंग मांडीयेला, अगदी सुंदर सोपे शब्द न गुणगुणवीशी वाटणारी चाल आणि दुसरे वाटा वाटा वाट गं हे पण गाणे छान जमून आले आहे . आणि शेवटचे तू आहेस ना. हे गाणं पार्श्वभूमीवर आहे
चित्रपट आताच प्रदर्शित झालाय आणि कथा थोडीबोहोत सर्वांच्या परिचयाची आहे म्हणून त्याबद्दल जास्त सखोल लिहिले नाही खरंतर ही सांगण्याची नाही तर पाहण्याची गोष्ट आहे, जरूर पहा मंडळी

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Pandita Ramabai could never get into a medical school because she was deaf. Anandi was the first.

अच्छा. मी विकिपांडित्य पाजळत होते Sad

https://en.m.wikipedia.org/wiki/Pandita_Ramabai

Further, she said that as the situation in India was that women's conditions were such that women could only medically treat them, Indian women should be admitted to medical colleges. Ramabai's evidence created a great sensation and reached Queen Victoria. It bore fruit later in starting of the Women's Medical Movement by Lord Dufferin. [7]
Ramabai went to Britain in 1883 to start medical training. During her stay she converted to Christianity. From Britain she traveled to the United States in 1886 to attend the graduation of the first female Indian doctor, Anandibai Joshi , staying for two years.

The above entry does not say that she got into the school. She was denied an admission because of her handicap.
दुर्दम्य किंवा विकिपीडिया ही काही इतिहासाची विश्वासार्ह साधने नव्हेत.

दुर्दम्य काय आहे माहित नाही.
विकिपीडिया हे काही इतिहासाचे विश्वासार्ह साधन नाही हे माहित आहे.

इतिहासाचे पूर्ण खात्रीलायक, विश्वासार्ह साधन खरंच काही आहे का याबद्दल शंका आहे. टाईम ट्रॅव्हल करून तिथे प्रत्यक्ष जाऊनच बघावं लागेल...

अनेक क्षेत्रातील पहिल्या पदाचा क्लेम हा जगात नेहमीच संशयाच्या आणि वादाच्या गर्तेत सापडलेला आहे.

दुसरी बाब म्हणजे आनंदीबाई धर्माच्या पगड्याखाली इतक्या होत्या कि अमेरिकेत गेल्यानंतर आहार आणि पेहरावाच्या तेथील रूढींशी त्यांना जुळवून घेता आले नाही. चित्रपटात त्यांच्या तोंडी एक ओझरता उल्लेख आहे कि केवळ बटाट्याची भाजी खाऊनच किती दिवस काढणार. हे खूप बोलके आहे. याच तर्हेने त्यांनी तेथील अनेक पद्धती नक्कीच नाकारल्या असणार. अशा मानसिकतेत जर त्यांनी तिथे दिवस काढले असतील तर रोगप्रतिकार शक्तीची वाट लागली ह्यात विशेष काहीच नाही. परिणामी टीबीच्या संसर्गाला पट्कन बळी पडल्या. डॉक्टर असूनही अतिधार्मिक मानसिकतेने त्यावर मात केली आणि त्या जीवास मुकल्या.>>

मागे मी एक डॉक्टर श्रीनिवासा रामानुजन ह्या गणितशास्त्रज्ञावरचा एक जीवनपट पाहिला. त्यांचा आणि आनंदीबाई गोपाळ ह्यांचा काळ जवळजवळ सारखाचं आहे. विकि पेज इथे देते आहे ते वाचा: https://en.wikipedia.org/wiki/Srinivasa_Ramanujan

रामानुजनसुद्धा tuberculosis and a severe vitamin deficiency ह्याच कारणाने गेलेत. आनंदीबाई गोपाळ जोशीपण त्याच कारणाने गेल्यात.

Illness and death
Throughout his life, Ramanujan was plagued by health problems. His health worsened in England; possibly he was also less resilient due to the difficulty of keeping to the strict dietary requirements of his religion in England and wartime rationing during 1914–1918. He was diagnosed with tuberculosis and a severe vitamin deficiency at the time, and was confined to a sanatorium. In 1919 he returned to Kumbakonam, Madras Presidency, and soon thereafter, in 1920, died at the age of 32. After his death, his brother Tirunarayanan chronicled Ramanujan's remaining handwritten notes consisting of formulae on singular moduli, hypergeometric series and continued fractions and compiled them.[26]

दुर्दम्य गंगाधर गाडगीळांची कादंबरी. लोकमान्य टिळकांवर.

पार्वती बाई आठवलेंनीही त्यांच्या आठवणीत अमेरिकेत खाण्याचे कसे हाल झाले हे लिहिलं आहे. पण हे समजण्यासारखं आहे. त्याच का ळात पुण्यात लो. टिळक, न्या.रानडे आदिंवर मिशनर्‍यांसोबत चहा घेतला म्हणून प्राय श्चित्त घ्यायची वेळ आली होती.

आनंदीबाई किंवा पार्वतीबाईंनी परदेशात एकटीने राहून आपले उद्दिष्ट साध्य केले ( डॉक्टरकी /देणगी मिळवणे) पण त्यांचे विचार सुधारकी झाले होते, असे नव्हे. Still they achieved what they wanted to achieve.

भरत अनुमोदन
आणि सुधारणा अगदी वैयक्तिक पातळीवर वेगवेगळ्या दृष्टीने असू शकते ना.. ज्या काळात लोकमान्य टिळकांना देखील समुद्र उल्लंघनाबद्दल प्रायश्चित्त (त्यांची मते एवढी सनातनी नसूनही लोकमताचा आदर करण्यासाठी) घ्यावे लागले त्या काळात आनंदीबाईंचे यश अधिक कौतुकास्पद आहे.. आणि तत्कालीन स्त्रिया पतीसह बाहेर फिरायला जात नसत :तरीही गोपाळ रावांच्या आग्रहाखातर त्या भारतात, मला वाटते समुद्र किनारी फिरायला गेल्या होत्या व त्याबद्दल होणारी कुचेष्टा त्यांनी सहन केली होती.

त्याला हे स्त्री शिक्षणाचे वेड कशाने लागले असेल ह्याची उत्सुक्ता नेहमीच वाटलीय.
वॉट वाज दी ट्रिगर पाँईट? >>> Same here. >>> मला तर वाटतं उगीच करायचं म्हणुन विक्षिप्तपणामुळे घेतलेलं खुळ असावं.
नाहीतर त्या काळी अगदी ध्यास घेउन जोर जबर्दस्ती करुन मारुन मुट्कुन बायकोला शिकवायचंच होतं. त्यासाठी एखाद्या वेशेशी ही लगनाला गोपाळराव तयार होते म्हणजे कमाल वाटते.
शिवाय ख्रिस्टी धर्म स्विकारण्याची भाषा, बायबल वाचणे, चर रस्त्यात गाढवीणीशी लग्न करणे हे विक्षिप्त पणाचंच लक्षण.
शिवाय आपण्च जबरदस्ती करुन शिक्षण घ्यायला लावलेली आपली बायको दुर देशात शिक्षणासाठी गेलेली असताना तिला अतिशय वाईट भाषेत पत्र लिहिणे. हे तर प्रोत्साहनपर आजिबातच नाही.
वरचे काही प्रतिसाद वाचता हेच डोक्यात येतंय.

१८८८ चे हे पुस्तक आहे म्हणजे आनंदीबाईंच्या मृत्युनंतर लगेच लिहिलेले आहे. त्यामुळे मला तरी हे पुस्तक जास्त आवडले:
https://www.rarebooksocietyofindia.org/book_archive/196174216674_1015188...

त्याला हे स्त्री शिक्षणाचे वेड कशाने लागले असेल ह्याची उत्सुक्ता नेहमीच वाटलीय.>> मला सुद्धा हा प्रश्न अनेकदा पडतो. तसेच एकीकडे ख्रिस्ती धर्म स्वीकारायची तयारी आणि दुसरीकडे बायकोने नववारी साडीच्या ऐवजी गुजराथी पद्धतीची साडी नेसण्यासही विरोध ह्या विचारसरणीचं ही कोडं पडत. पण लक्ष्मीबाई टिळकांच आत्मचरित्र वाचताना जाणवतं की तेव्हाच्या काळातले बरेच सुशिक्षित पुरूष अश्याच काहीश्या मानसिक द्वंद्वामध्ये अडकलेले होते. पाश्चात्य समाजातील स्त्री-स्वातंत्र्य, स्त्री-पुरूषांचे एकमेकांशी मोकळे वागणे त्यांना भुरळ घालत होते. हिंदू धर्मही सर्वस्वी त्याज्य वाटत नव्हता. पण हिंदू धर्मात राहून आपल्या बायकोला शिकवण, तिच्याशी मोकळेपणाने वागण, बोलण ह्याची मुभा नव्हती.

आज ज्याला आपण सुधारकी विचार म्हणतो त्यांना त्या काळात काय म्हणत असत?

तेव्हा जे काही मूठभर सुधारकी विचारसरणीचे लोक होते त्यांचे सुधारकी विचार इथे पाश्चात्य लोकांच्या सहवासात आल्यामुळे किंवा परदेश फिरून तिथले वातावरण पाहून आल्यामुळे घडले होते. ते सुधारकी विचार इथे आचरणात आणण्यामागे सगळ्यात मोठी आडकाठी स्वधर्माची होती. त्यामुळे ज्यांना हे विचार प्रत्यक्षात उतरवायचे होते त्यांनी स्वधर्म त्यागला व जो धर्म असे विचार आचरणात आणायला आडकाठी करत नाही तो अंगिकारला.

याचा एक परिणाम असा झाला की ज्यांनी अगदी थोडासा का होईना सुधारकी वारा स्वतःला लावून घेतला त्यांच्याकडे लोक 'आता लवकरच हा माणूस स्वधर्म त्यागणार' ह्या नजरेने बघू लागले. आजही लोक आपल्याबद्दल कोण काय बोलतोय याचे प्रेशर घेतात, तर त्या काळात असे प्रेशर किती भयंकर असेल.

<सुधारकी विचार इथे आचरणात आणण्यामागे सगळ्यात मोठी आडकाठी स्वधर्माची होती. त्यामुळे ज्यांना हे विचार प्रत्यक्षात उतरवायचे होते त्यांनी स्वधर्म त्यागला व जो धर्म असे विचार आचरणात आणायला आडकाठी करत नाही तो अंगिकारला.>

लोकहितवादी, फुले, रानडे, आगरकर, घोले, विष्णुशास्त्री पंडित, कर्वे, गोखले, विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे यांनी स्वधर्माचा त्याग केला? गोपाळराव ख्रिस्ती झाले तो एक स्टंट होता. महिनाभरात परत आले हिंदूधर्मात.

आज आपण ज्याला पुरोगामी विचार म्हणतो त्याला त्या काळी सुधारकी विचार म्हणत. आज जशी पुरोगामी ही शिवी आहे, तशी त्या काळी सुधारक ही शिवी होती. म्हणून आपल्या वर्तमानपत्राला सुधारक हे नाव देणारे आगरकर धीट.

१८८८ चे हे पुस्तक आहे म्हणजे आनंदीबाईंच्या मृत्युनंतर लगेच लिहिलेले आहे. त्यामुळे मला तरी हे पुस्तक जास्त आवडले:
https://www.rarebooksocietyofindia.org/book_archive/196174216674_1015188... > या पुस्तकाचा थोडा भाग वाच्ला आहे मी. त्यानुसार गोपाळराव हे शेजारी राहायला आले. आणि यमुनेला शिकवायला येउ लागले. नंतर त्यांची बदली झाली. यमुनेला शिक्षणाची आवड म्हणोन ती पण अलीबागला गेली आणि तिला सोबत म्हणून तिची आजी तिच्याबरोबर होती . लग्न ठरलं आणि झालं ते त्यानंतर.

लोकहितवादी, फुले, रानडे, आगरकर, घोले, विष्णुशास्त्री पंडित, कर्वे, गोखले, विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधनकार ठाकरे यांनी स्वधर्माचा त्याग केला? >>>>

रेव्ह. टिळक व त्यांच्या पत्नी, पंडिता रमाबाई यांनी खिस्ती धर्म स्वीकारला.

रे. टिळक आणि लक्ष्मीबाई काही सुधारक नव्हते. एकट्या रमाबाईंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला आणि त्याची मोठी किंमतही मोजली. आगरकरांनी आपल्या मामेबहिणीला शारदासदनातून काढून घेतलं. नंतर त्यांना केडगावला जावं लागलं.

सुधारकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, ते धर्म बुडावतात असं म्हणत 1880पासून कितीतरी अफवा पसरल्या, अनेकांनी निंदा सहन केली. हे प्रकार आजही सुरू आहेत हे माहीत नव्हतं.

हे प्रकार आजही सुरू आहेत हे माहीत नव्हतं.<<< ते कधी थांबलेच नव्हते, खाजगीत कुजबूज चालूच होती, त्याबद्दल मोठ्याने बोलायचा कोडगेपणा जरा नवा आहे.

> दुर्दम्य गंगाधर गाडगीळांची कादंबरी. लोकमान्य टिळकांवर. > अच्छा.

> आनंदीबाई किंवा पार्वतीबाईंनी परदेशात एकटीने राहून आपले उद्दिष्ट साध्य केले ( डॉक्टरकी /देणगी मिळवणे) पण त्यांचे विचार सुधारकी झाले होते, असे नव्हे. Still they achieved what they wanted to achieve. > सहमत आहे. कौतुक आहेच.

. Still they achieved what they wanted to achieve.

She was twenty two!!!
तिला जर वेळ मिळाला असता तर अजून विचार केला असता तिने!
बाकी २०१९ मध्ये स्वतःला पुरोगामी, सुधारक, निधर्मी पक्ष म्हणवणारा तुमचा पक्ष जर बायकांना मंदिरात प्रवेश द्यायचा नाही म्हणून हट्ट धरतो तिथे दीडशे वर्षांपूर्वीच्या २२ वर्ष वयाच्या पोरीकडून जरा जास्तच अपेक्षा आहेत.
आपला तो बाब्या....

तर वाटतं उगीच करायचं म्हणुन विक्षिप्तपणामुळे घेतलेलं खुळ असावं.
नाहीतर त्या काळी अगदी ध्यास घेउन जोर जबर्दस्ती करुन मारुन मुट्कुन बायकोला शिकवायचंच होतं. त्यासाठी एखाद्या वेशेशी ही लगनाला गोपाळराव तयार होते म्हणजे कमाल वाटते.
शिवाय ख्रिस्टी धर्म स्विकारण्याची भाषा, बायबल वाचणे, चर रस्त्यात गाढवीणीशी लग्न करणे हे विक्षिप्त पणाचंच लक्षण.

त्यांनी गाढविणीशी लग्न केलं नव्हतं. गाढवाचं लग्न लावलं होतं जो प्रोटेस्टचा एक भाग होता असं चिनूक्स यांनी लिहिलंय. त्या काळात सुधारक radical होते पण वेडसर नव्हते.
धर्म बदलण्यात काय विक्षिप्तपणा?

त्या काळात सुधारक radical होते पण वेडसर नव्हते.>>>> मी वेडसर नाही लिहिलेलं. विक्षिप्तपणा दिसतो त्यांच्या वागण्यातुन.

92नन्तर काही पुणेकर मोकळेपणाने चहा पिऊ लागले त्यालाही गोपाळराव कारणीभूत आहेत.>>>>
चिनूक्स,
हे टिळक ग्रामण्य प्रकरण का?
चहा पिण्याबद्दल खुद्द न्यायमूर्ती रानडे आणि टिळकांना प्रायश्चित्त घ्यायला लावलेले ते?

Ho

Pages