Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
विणाला आरोहशी भांडली म्हणून
विणाला आरोहशी भांडली म्हणून ओरडतील म मां पण टास्क सुशांत आलेला तो छान केला आणि हॉल एरिया घ्यायची कल्पना तिचीच होती, हिनाची नव्हती, हिनाने तो घेतला हे कौतुक पण अनसीन अनदेखा वर बघितलं, हे डोकं तिचेच ते. परत task मध्ये शिवला ओरडली, आरोहला मलम लावलं आणि टास्कनंतर शिवला समजावलं ह्याचं सर्वांचे कौतुक मात्र म मां करणार नाहीत, असं मला वाटतंय.
रात्री समजेल नक्की काय झालं ते.
ते शिव वीणाच्या थिल्लरपणावर ओरडलेत असं वाचलं, तो उडी मार सीन, सुशांतने पण सांगितलं होतं शिवला, त्याबद्दल बोलले म मां तर योग्यच, ते मलाही आवडलं नव्हतं.
एनिवे आता काही लिहीत नाही, उगाच रात्री बघायचा इंटरेस्ट संपायचा.
परागचा इंटरव्ह्यू ऐकून शिवला
परागचा इंटरव्ह्यू ऐकून शिवला का घालवलं नाही हे समजलं.
पराग बाहेर जाण्याचं मुख्य कारण वैशालीबाबत घडलेली घटना प्लस बिबॉचं चुकीचं जजमेंट हे आहे.
मारामारी आणि आता चावाचावी पण अनऑफीशिअली अलाऊड असावी. असायलाच हवी, कारण टास्कच तसे असतात.
हीनाबद्दल खरंच खूप सहानुभूती वाटली. तिचा बळीचा बकरा झालाय.
बोलविते धनी नसल्यामुळे , किशोरी मागच्या दोन आठवड्यात चांगलीच उघडी पडली. हीनापेक्षाही आधी ती जायला हवी होती असं चॅनेललाही वाटत असेल.
हीना.एव्हिक्ट झाली.
हीना.एव्हिक्ट झाली.
Ok! मी पराग फॅन किंवा समर्थक
Ok! मी पराग फॅन किंवा समर्थक नाही! त्याने हिंसा केली, जे चूकच आहे. हा incident घडला नसता तरी कदाचित चुकीच्या मुव्हज करून लोकांच्या नजरेतून उतरून तो असाही लवकर बाहेर गेलाच असता.
पण या खुर्चीसम्राटमध्ये नेहाची टीम व बिग बॉस यांचीही खूप मोठी चूक होती इतकंच म्हणणं आहे.
नेहा आणि टीम नियम धाब्यावर बसवून परागला टॉर्चर करत होते. कॅमेऱ्यात हे पाहत असून , पराग व किशोरी वारंवार विनंती करत असून बिग बॉस टीमने दखल घेतली नाही. फक्त एकदाच नेहाला बोलावून सांगितलं जे तिने अगदीच उडवून लावलं. बिग बॉसच्या घरात असताना परागला प्रोटेक्ट करणं हीपण बिग बॉस टीमची जबाबदारी नव्हती का? त्यासाठी त्याने टास्क गिव्ह अप करणं /न करणं याने फरक पडत नाही. केवळ टीआरपीसाठी कंटेंट मिळेल म्हणून बिग बॉस टीमने तो प्रकार चालू दिला. नेहाकडे ती धरून पाच लोक खेळत होते पण परागच्या बाजूने शिव रुपाली किशोरी याना खेळायला परवानगी नव्हती. unequal strength असल्यामुळेच बळाचा वापर करायला परवानगी नव्हती. आणि वेट्स ठेवणं तरी कसं allow केलं? माणूस एकवेळ वजन सहन करेल पण तसं करताना आत काही internal damage झाला तर केवढ्याला पडेल? 90 मिनिटं बिग बॉस टीमने हे चालूच कसं दिलं? हे लीगल पॉईंट्स माहीत असल्यानेच बहुधा पराग आता म्हणतोय की सर्व फुटेज दाखवा एकदा. लीगली काय शिक्षा होईल ती मला मान्य असेल. (मै जेल जाऊंगा तो सबको साथ ले जाऊंगा. )
परागच्या जागी महिला असती आणि पुरुषांनी असे स्पर्श केले असते तर किती मोठा इश्यू झाला असता? Imagine वैशाली किंवा नेहा खुर्चीत बसली आहे आणि पराग /बिचुकले तिच्या शर्टमधून हात घालून पोटावर बोटं दाबतोय. चाललं असतं? जसं नेहाने शिववर व्यवस्थित चान्स मारून घेतला , परागच्या अंगचटीला जात होती तसं एखाद्या पुरुषाने कोणा मुलीसोबत केलं असतं तर? तर तो 'टास्क' होता म्हणून कोणी जस्टीफाय केलं असतं का? आणि जर त्या महिलेने तिला molest करणाऱ्या पुरुषाला प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून एक मुस्काटात ठेवून दिली असती तर कोणीही तिला violent, psycho म्हटलं नसतं. उलट रणरागिणी, झाशीची राणी असं कौतुक झालं असतं. मग पुरुषांच्या बाबतीत boundary नसते का?
पराग चुकला, दोषी आहे हे तो स्वतःही मान्य करतोच आहे.
पण नेहादेखील ट्रॉफी अजिबात डिझर्व करत नाही. तिचं त्या एपिसोडमधील बिहेवीयर प्रचंड सायको आणि चीप होतं. आणि आजही ती तशीच आहे. तिचे त्यावेळचे चारही टीममेट वोट आउट झालेत. तिनेही आता बाहेर जावं.
सनव >>>+111
सनव >>>+111
शिव ठकरेचा फायनली राजेश
शिव ठकरेचा फायनली राजेश शृंगारपुरे झाला आहे असं दिसतय आजच्या प्रोमो वरून !
पी.डी.ए करून अटेन्शन घेण्याची फालतु स्ट्रॅटेजी करणार्या पुढच्या सिझनच्या काँटेस्टन्ट्सने निदान यावरून धडा घ्यावा राजेश आणि शिवला मिळालेल्या ह्युमिलेशनचा, आधी चॅनल चढवेल पण ह्युमिलिएशन करून तितकेच झोडेल !
शिव खरोखरच बैलबुध्दी आहे असे वाटते बरेचदा, कित्ती हिंट्स मिळाल्या त्याला, एकदा नाही हजारवेळा, एखाद्यानी ब्रेकप करून कंप्लिट डिसकनेक्ट केलं असतं इतके फिडबॅक मिळाल्यावर.
तरी त्याला वीणा आणि तिच्याबरोबर दिसत रहाणं इतक इंपॉर्टन्ट वाटत असेल तर मांजरेकर जी नावं देतात त्याला वळु , मिठीभाई वगैरे योग्यच आहेत
आज शिव वीणाला झापताना
आज शिव वीणाला झापताना मांजरेकर OCD ओब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर ऐवजी कम्पलसरी म्हणाले
ते बिचुकले स्वतःहून बाहेर जायला तयार होते आज, का थांबवलं मग त्यांना, का का का ?

काहीही बोलत असतात ते, मधेच भृगुसंहिता कुठे काढली आणि त्यांनी ??? कंटाळा आला त्यांचा खरंच
आरोहला झापलं त्या झोपाळ्याच्या हार्टच्या मुद्यावरून ते बर केलं, तो फार कटकट करत असतो मध्येमध्ये.
आजची नेहाने मांजरेकरांसाठी केलेली कविता पण छान होती.
>>Submitted by सनव on 17
>>Submitted by सनव on 17 August, 2019 - 12:32<< +१
शिव किंवा वीणाच त्यातल्यात्यात डिझर्विंग आहेत. पण आता शिवच्या चावण्याचा मोठा इशु झाला असेल तर वीणाचं पारडं जड होइल. आणि शिवची त्यावर काहिहि तक्रार नसावी...
सनव च्या दोन्ही पोस्ट ना
सनव च्या दोन्ही पोस्ट ना +११११११११ .
आणि आता शीवच्या बाबतीत का बिग बॉस गप्प ?.
सनव प्रकरण कोर्टात गेलं ते हे
सनव, प्रकरण कोर्टात गेलं ते हे सर्वच येणार पुढे, म्हणून वैशाली बाहेर आल्यावर गेली नसावी तक्रार वगैरे करायला, bb ना पण माहिती असेल की त्यांच्यावर पण शेकणार, वैशाली आत असताना म्हणाली होतीना, मी बाहेर गेल्यावर पुढची step घेणार पण bb नीच सगळ्यांना ह्या विषयावर बोलायची बंदी केलीय बहुतेक.
आज म मां योग्य बोलले शिव वीणा दोघांना पण शिव खाली मान घालून बसला, पण वीणा जाम निर्लज्जपणे हसत होती. आगाऊपणा जाम करते पण तिने अति केलं तर काढूही शकतात तिला.
शिवानी आणि तिचे भांडण सॉलिड रंगले, शिवानीला हिनाला टॉप 3 मध्ये तिने घेतल्याचा जाम राग आला.
बाकी आरोहला बोलले पण शिवानीला नाही.
बिचुकलेला मात्र मस्त झापले, पण तो म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी, मी असा आणि मी तसा. तू कसा ते बाहेर माहीतेय. ह्या बाबतीत वीणा योग्य, त्याला भाव देत नाही अजिबात.
वीणा channelची आहे म्हणा पण शिवानीला नक्की कोणाचा पाठींबा, तीपण सतत वीणाला target करते. तिचा वशिला वीणापेक्षा मोठा आहे मात्र, तिला काही न बोलता तिचे ऐकलं जातं.
मेघासारखीला task मध्ये हरवल्याचे कौतुक मात्र फक्त एका वाक्यात उरकलं.
आणि आता शीवच्या बाबतीत का बिग
आणि आता शीवच्या बाबतीत का बिग बॉस गप्प ?. >>> सांगितलं की शिवला की तू लगेच माफी मागितलीस त्याची आणि त्यानेही माफ केलं म्हणून निर्णय प्रेक्षक करतील, नाहीतर तूपण आज इथे माझ्याबरोबर उभा असतास. तिथे नसतास.
आरोहला लागलं खुपलं ते न विचारता, कि ताई congrats वगैरे म्हणाल्या त्यावर म मां नी बोट ठेवलं. मला आठवत नाहीये काय झालं नक्की ते पण मग आरोहला वीणाने मलम लावलं त्याबद्दल एक शब्द नाही. चांगल्या गोष्टीपण सांगा की.
बिचुकले फक्त शिवानीच्या बातम्या करत होता त्यावरून मात्र बोलले, ती शिवानी पण तेव्हा निर्लज्ज असल्यासारखी हसत होती.
हीनाला काढलं, आता शिवानी खुश एकदम. तिचे पुढचं target वीणा पण खरंतर शिवानीलाच काढायला हवं. पहिल्यादिवसापासून नाहीये ती, बघून परत आलीय. तिला आणि बिचुकलेला नारळ द्या आता. नाहीतर कॅप्टन कराल तिला.
बिचुकले एवढा आवडत नाही तर का
बिचुकले एवढा आवडत नाही तर का ठेवतात त्याला घरात, तोही म्हणतो मी चाललो, मला बाहेर काम आहे, मांजरेकर म्हणतात की तुम्ही तुमच्या मर्जीने येऊ शकता पण जाऊ शकत नाही याचा अर्थ काय. वीणा बसल्या बसल्या कान चोळून मळ काढत होती आणि मग बोलायची वेळ आल्यावर तिने तो मळ बोटांनी झटकला, घाणेरडी कुठची.
हीना गेली बाहेर
हीना गेली बाहेर
उद्या शिव आणि वीणाच्या
उद्या शिव आणि वीणाच्या पत्रिका जुळवायला, राशीचक्र फेम उपाध्ये येणार आहेत.
पहिला सिझन पाहिला होता अधले
पहिला सिझन पाहिला होता अधले मधले एपिसोड.. या सिझनला 4,5 एपिसोडनंतर पुन्हा इच्छा झाली नाही. हा खेळ बाकी लाजवाब आहे. खेळणाऱ्यांची आणि बघणाऱ्यांची देखील मानसिकता त्रयस्थ पद्धतीने पाहणाऱ्याला कळून येते..
अजुन एक फालतु वीकेन्डचा डाव !
अजुन एक फालतु वीकेन्डचा डाव !


अर्ध्याहून अधिक एपिसोड बिचुकल्याने खाल्ला जो स्पर्धकच नाहीये
त्या वीणाला कसलाही फरक पडत नव्हता पीडीए बद्दल ओरडले त्यावर , ती निर्लज्जपणानी हसत होती, शिव मान खाली घालून बसला होता पण उद्या मांजरेकर पुन्हा शरद उपाध्येंना पत्रिका दाखवतायेत, म्हणजे पुढचा आठवडा पुन्हा ये रे माझ्या मागल्या होईलच दोघांचं !
वीणा तर बिचुकल्याइतकीच गलिच्छ आहे , कानात बोटं, नाकात बोटं, आंघोळीच्या टॉवेलने कमोड पुसणे आणि ती बिचुकलेला अनहायजेनिक म्हणते
बेकार अख्खा एपिसोड मांजरेकर पूर्णच सटकलाय, काय वाट्टेल तो बोलतो, शिवानीचा पी.आर बनलाय !
खुद्द होस्ट म्हणतो कि टास्क रद्द झाला असता तर तुझं काय गेलं असतं
या सगळ्यात नेहा कुठेतरी
या सगळ्यात नेहा कुठेतरी हरवल्यासारखी वाटत आहे,फक्त कविताच करत असते.
शिवानी आल्यापासून पार बँकफूटवर गेल्यासारखी वाटत आहे,या दोन वीकमध्ये काहीतरी कराव लागेल तिला नाहीतर बिबॉस हिचाही पत्ता कट करेल.
ममांना प्रंचड टार्गेट केल जात
ममांना प्रंचड टार्गेट केल जात आहे सोमिवर.लोकांच म्हणण आहे की एवढा जर शिव वीणाचा टॉवेल सिन वल्गर होता,तर दाखवायचाच नाही.
बिचुकले आणि त्या टॉवेल सिन वर खूप वेळ घालवून ,शिवने जे केल त्यावर ममां फक्त चार वाक्य बोलले,शिवानी आणि आरोहला तर डोक्यावर घेतल आहे.
जाम वैतागले आहेत सोमिवर, आणि त्यात आज शरद उपाध्येंना स्वत:च विचारत आहेत की यांच लग्न कुठे होईल
आता हे पर्सनल नाही का?
कालचा एपिसोड पूर्ण बघायला
कालचा एपिसोड पूर्ण बघायला मिळाला नाही.... शेवटचा अर्धा पाउण तास बघितला!
गेले काही वीकेंड गुडीगुडी गेल्यामुळे आज जरा सूर लावायचा असे ठरवूनच आले होते..... इतके बोलायची गरज नव्हती शिव आणि वीणाला!
तीन त्यानं प्रेम केलं ,
तीन त्यानं प्रेम केलं , मांज्या आणि भुक्कड लोकांचा काय गेलं?
हिंदी मध्ये तर एकत्र अंघोळ करायचे, लग्न लावली यांनी!
मागच्या वर्षी असेच होते.
सर्वात जास्त टीआरपी आहे म्हणून शिवानी आरोह ची ** जळत आहे
शिव विणाला एवढे बोलताहेत, मग
शिव विणाला एवढे बोलताहेत, मग बिचकुले हिना सुरुवातीच्या आठवडयात जो चिपनेसपणा करत होते त्याच काय? हिना शॉर्ट नाईट गाऊन घालून बिचकुलेच्या बेडवर हेअर स्ट्रेननिन्ग करत होती, बिचकुले तिच्याकडे बघत होता हे दाखवल होतो प्रोमोमध्ये. तेव्हा का नाही बोलले?
मान्जरेकर त्यान्च्या PDA बद्दल बोलतात. पण विणा शिव एकमेकान्च्या चुका सुधारतात, एकमेकान्ना आधार देतात हे नाही दिसल वाटत त्यान्ना. रादर ते दाखवतच नाही. आधी स्वत: त्यान्ना चढवायच, रात्री ३ वाजता मिठी मारायला येतात म्हणून सलमानसमोर चिडवायच, रोमॅण्टिक गाण्यान्वर त्यान्ना नाचवायच आणि नन्तर ' बास करा हे आता' बोलायच!
टॉवेल सिनच्या तुलनेत राजेश -रेशम किव्वा हिन्दीत राहुल महाजन, पुनीश बन्दगी जे करत होते ते फालतू होत. हिन्दीत तर बाथरुममध्ये रोमान्स चालू असतो . अर्थात, सलमानने त्याला विरोध केला होता आणि ते बरोबर होत.
बिचकुले ' मी जातो बिबॉ सोडून' म्हणत होता, म्हटल चला, बरच झाल , पिडा गेली. पण कसल काय, मान्जरेकरान्ना कुठून दुर्बुद्धी सुचली आणि थाम्बवल केसरला.
ममां इज नथिंग बट अ पपेट.
ममां इज नथिंग बट अ पपेट. प्रोग्राम मॅनेज करणारे लोक जे सांगतात त्यांच्या अंगावर जातात धावून. शब्दात फार तर करत असतील थोडे इम्प्रोवाइज. दॅट्स इट. दुसर्याच दिवशी म्हणाजे शूटिंग चा दिवस विचारात घेता काही तासातच स्वःलाच इतके कॉन्ट्रॅडिक्ट करावे लागते की कीव येते त्यांची. कन्टेस्टन्ट्स त्यांच्या झापण्याला सिरियसली घेत नाहीत त्यात नवल नाही.
किंवा ती आवडत नसल्यामुळे ती करते ते सगळंच इरिटेट होतं मला 
काल ममां बड्डे सेलिब्रेशन खूप बोर झाले.
बाकी काल शिव -वीणा आणि बिचुकले यांनाच सगळा टाइम. बाकीच्यांची नुस्ती तोंडं दिसली अधून मधून.
किशोरी जामच डोक्यात जातेय माझ्या. सारखं ते स्व्तःलाच मी स्ट्राँग आहे, मी खूप छान खेळतेय. आणि नॉमिनेशन ची वेळ आली की गयावया. हल्ली वीकेन्ड ला डान्स पण जास्त अग्रेसिव पद्धतीने करत असते असे नोटिस केलेय मी
मांजरेकर शिव व वीणाला बोलत
मांजरेकर शिव व वीणाला बोलत असताना स्क्रीन वर लग्नाच्या जाहिराती चालू होत्या
पण विणा शिव एकमेकान्च्या चुका
पण विणा शिव एकमेकान्च्या चुका सुधारतात, एकमेकान्ना आधार देतात हे नाही दिसल वाटत त्यान्ना. रादर ते दाखवतच नाही. आधी स्वत: त्यान्ना चढवायच, रात्री ३ वाजता मिठी मारायला येतात म्हणून सलमानसमोर चिडवायच, रोमॅण्टिक गाण्यान्वर त्यान्ना नाचवायच आणि नन्तर ' बास करा हे आता' बोलायच! >>> अगदी अगदी.
थिल्लरपणाबद्दल बोलले याबद्दल काही नाही पण अति ताणलं ते त्यांनी, त्यांना दोघांना नकाच दाखवू ना, आम्ही टास्कमधे बघू. बाकीचे बसलेत बोलतायेत ते दाखवा. पण त्या सीन बद्दल बोलले ते योग्य वाटलं मला.
एवढंच कशाला मेघा, शिवानी, आरोहला इतकं सहज गुंडाळलं सुशांत, वीणा आणि हिनाने आणि सर्व डोकं एकट्या वीणाचं होतं याबद्दल कौतुक नाही. तिचे दोष सांगायला सगळेच असतात पण कौतुक करायला कोणीच नसतं . ती पुर्ण आठवडा उत्तम वागली तो थिल्लरपणा आणि आरोह, शिवानीशी वाद घातला ते सोडलं तर. पण तेच हायलाईट करणार फक्त.
मांजरेकर शिव व वीणाला बोलत असताना स्क्रीन वर लग्नाच्या जाहिराती चालू होत्या >>> ह्या दोघांवर तर जास्त टीआरपी वसूल केलाय. आता नावं ठेवतायेत.
मुळात रे रा आणि शिव वीणा यांची तुलनाच चुकीची आहे. राजेशचं लग्न झालेलं, मुलं आहेत तरी त्याच्या थिल्लरपणा अति होता.
शिवानी काही अटी ठेऊन आत आलीय असं वाटायला लागलंय त्याप्रमाणे हीनाचा पत्ता कट आता वीणावर तिचा डोळा. नेहा गप्पच झालीय आणि नेहा वीणा चांगलं जमतंय हेही शिवानीच्या डोळ्यात खुपतंय. हीना एकटीच आधी तिला नडत होती आणि आता वीणा नडतेय. बाकी गप्प सर्वजण शिवानीसमोर.
हो, मलापण ममां चा खुप राग आला
हो, मलापण ममां चा खुप राग आला काल, ते त्यांना पाहिजे तेव्हा पाहिजे त्यांनाच ओरडत असतात. शिवला चिअरअप केलं विणाने त्या टास्क मधे तर काय बिघडलं? सगळेच चिअरअप करत होते.
जाउदे नावडतीचं मीठ आळणी.
रेशम मेघा आणि सुशांत चा वावर किती प्लेझंट होता , शरा सई पुष्की किती कुजकटपणा करत होते, तसे रेशम नव्हती करत. केवढा फरक वाटला दोन्ही पाहूण्यांमधे
हो तेव्हा फक्त स्मिताने मन
हो तेव्हा फक्त स्मिताने मन जिंकलं. चक्क म मां नी पण कौतुक केलं. स्मिताचा स्वभावच नाही कोणाला त्रास द्यायचा.
अरे काय तुम्ही ऑडीयन्स
अरे काय तुम्ही ऑडीयन्स गंमतीशीर आहात, शरा, सई, पुष्कि वर अजुन रागवलाय ?
त्यांना बिबॉने टास्कच तसा दिला होता , इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या घरच्यांना सळो कि पळो करून सोडायचं अशा , श.रा ने सांगितल तिच्या इन्स्टा स्टोरीज वर कि त्यांना हेच करायला सांगितलं होतं
स्मिताला उलट जमलं नाही ते टास्क , स्वतःचा स्वभाव कसाही असला तरी बिबॉने दिलेला रोल तिला नाही वठवता आला.
श.रा सगळं फुटेज घेऊन गेली.
मधे एका भागात शिवच्या डोक्यात
मधे एका भागात शिवच्या डोक्यात एक कल्पना आली होती की त्याने एक भन्नाट गाडी घेतली आहे जिच्यावर तो विणाला बसवून फिरून आणनार आहे त्यावरून माझ्या डोक्यात आलेल चित्र.....
बिबॉ संपल्यावर शिवच्या बहिणीच्या विनंतीला मान देऊन विणा अमरावतीला जाते. तिला पाहून शिवच्या घरचे तसेच त्याच्या शिकवणीतले त्याचे शिष्य आनंदित होतात. आल्या आल्या चांगला पाहूणचार होतो आणी विणा गुपचुप शिवला गाडीवर फिरून येण्याचे विचारते. तस शिव तिला डोळ्याने नंतर असे खुणावतो. जरा आई बहिणीशी गप्पा झाल्यावर शिव विणाला बाहेर हाक मारतो. चल गाडीवर फिरून येऊ म्हणतो. तशी विणा खुप खुष होते आणि आलेच आवरून म्हणून आत जाते. थोड्यावेळातच विणाबाई नाचत आपलं उड्या मारत बाहेर येतात , अंगणात उभे असलेले सगळ्यांचे डोळे पांढरे झालेले दिसतात. विणा गुढघ्याचा वर जाणारा एक कर्ट घालून आलेली असते. शिवच्या लक्षात सगळी भानगड येते आणि तो तिला समजवायला जातो, अगं बाई ऐक ना माझ, तु हे घालून नको येऊस ईथ नाही चालनाड सगड्यांना असं...... तसं फणकारत विणा बोलते, हे बघ शिव बाकिचे काय म्हणतात त्याच्याशी मला काही घेण नाही मी स्वताला नाही बदलणार कोणासाठी....... तु नको बोलूस अस माझ्याशी नाहीतर मी चालले परत...
त्यावर शिव काहीच बोलत नाही आणि गाडीच्या दिशेने निघुन जातो आणि जाताना विणाला आवज देतो, बरं चड आता लवकड नाहीतर अंधार पडेल. विणा शिवच्या बहिणीकडे तोर्यात बघत पुढे जाऊ लागते. कुठेच गाडी न दिसल्याने ती शिवला विचारते गाडी कुठाय तर हा तिला सागतो की तुझ्या समोरच आहे मी केव्हाच बसलोय तु पण चढ पटकन नाहीतर बैल कंटाडून जातिल आणि येनाड नाहीत बाहेर. तसं ती पुन्हा कपाळावर आडव्या रेषा पाडत त्या गाडीकडे बघते आणि काय घडलं आहे याची तिला जाणिव होते. आता शिव ची बहीन तिच्याकडे पाहून गाल्यातल्या गालात हसू लागते.
हिरमुसल्या चेहर्याने ती गाडीवर चढू पाहते पण तिला तिच्या कपड्यांमुळे चढता येत नाही ती शिवची मदत मागते. तसं शिव मागे येतो आणि तिल सांगतो, हे बघ मी एक दोन तिन म्हणल की तु उडी माडायची, शिव एक दोन तिन म्हणतो तसं विणा उडी मारते आणि आपले पाय त्याच्या कमरेभोवती टाकते. शिव पटकन तिला ओरडतो.... अग्ग माझे बाई, मी तुला कडेवर बस नाई म्हणले, तु उडी मारली की मी तुला गाडिवर बसवणाड होतो.....
तेवढ्यात ईतकावेळ स्वतावर ताबा ठेवलेली शिवची बहीण येते आणि म्हणते.. हे बघ विणा तु तुझी गाडीवर चढायला समर्थ आहेस. त्या साठी तुला शिवचा आधर घ्यायची गरज नाही. जरा बुद्धि वापरलीस तर तुच वर चढू शकली असतीस. समोरच चार विटा पडलेल्या होत्या त्या वापरल्या असत्यास तर तुझ काम झाल असत. शिव तुझे सगळे शिष्य ईथे उभे आहेत, दारात बाबा आणि आई आहे तुला अस वागणं शोभत नाही. आता पुढे काय करायच ते तुच ठरव.
तसं शिव विणाला म्हणतो, हे बघ विनि आपण अत्ता नको बाहेड जायला. तु कपडे बदल आणि आईला स्वयंपाकात मदत कड. उद्या बघु काय ते....
तसं विणाचा चेहरा जो काही पडतो तो कसा हे सांगायला नको........
हो डिजे, बरोबर आहे एका परीने
हो डिजे, बरोबर आहे एका परीने तुझं, पण शरा मला नाहीच आवडत म्हणून राग येत ्सेल तिचा. मान्य आहे कि त्यांना तसंच वागायला सांगितलेलं पण विणाशी आधीचा स्कोर सेटल केला ते नाही आवडलं.
अरे शरा, पुष्की आणि सई ने
अरे शरा, पुष्की आणि सई ने मस्त केला की उलट तो टास्क!! शराचे पोह्याचा स्कोर सेटल करणे हा तर भार्री टच वाटला होता मला!! कारण तो टास्कच तसा होता!!
निर्झराचे पोस्ट भारी आहे
Pages