मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

गळा दाबल्यासारखा आवाज आहे किशोरीचा. ह्याआधीही ती कधीच नव्हती आवडली. इथे इतरांपेक्षा बरी वाटली. ममांनी झापडल्यावर शिवच्या डोळ्यांत जरा लाज दिसली. विणाकडे तीही नाही. मुर्दाडासारखी हसत होती

मुर्दाडासारखी हसत होती>>> तिच्या आईचाच तिला पाठींबा असेल तर अजुन काय हवं..
हिना खरच इतक्या दिवसात काल खुपच छान वाटली साडीमध्ये.

हा खेळ बाकी लाजवाब आहे. खेळणाऱ्यांची आणि बघणाऱ्यांची देखील मानसिकता त्रयस्थ पद्धतीने पाहणाऱ्याला कळून येते..
Submitted by अजिंक्यराव पाटील on 17 August, 2019 - 18:43 >>> +१
मागे अतुल ठाकूर की कुणीतरी तुला पाहते रे मालिकेसंदर्भात समाजशास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने एक धागा काढलेला. त्यांनी bb बघितले आणि हा धागा वाचला पाहिजे! Happy
मी बघत नाही. सुदैवाने माझ्या आईला हे बघण्यात बिलकुलच स्वारस्य नाही. वेळ घालवायला इथे येऊन वाचण्यात मजा येते.

म मां कालही टॉवेल सिनमध्येच अडकलेले. अस वाटत होत की त्यान्नाच शिव विणाच्या PDA मध्ये जास्त इण्टरेस्ट आहे. सारख सारख काय त्याच झाडावर?

बि बॉ इतकाही टुकार शो नाहीये, तस असत तर टिकला नसता. बि बॉ हिन्दी पहिल्यान्दा पाहिला तेव्हा माझीही शरद उपाध्येसारखी ' अश्लील शो' अशी ( गैर)समजूत झाली होती. पण आता मराठी बिबॉ पाहिल्यावर ती समजूत नाहीशी झाली. हा शो बुद्धीचातुर्याने १०० दिवस अश्या घरात राहून दाखवण्याचा आहे, जिथे कम्युनिकेशनच कुठलच साधन नाही, वाचायला काहीच नाही ( सन्देशपत्राशिवाय), टिव्ही नाही, इण्टरनेट नाही, साधी खिडकीही नाही. तुम्ही कठीण प्रसन्गात काय स्टॅण्ड घेता ह्याचा कस लागतो शो मध्ये. अश्या बन्द घरात कुणीही राहिल तर कुणाचही डोक फिरणारच. त्यात हि १५ वेगवेगळया स्वभावाची माणसे, सो भाण्डयाला भाण्ड लागणारच. ह्युमन सायकोलॉजी कळते त्यामुळे. त्याच त्याच डेलिसोप्सपेक्षा हे बर. मी एन्जॉय करते हा शो, हिन्दीच्या मानाने मराठी बिबॉ कितीतरी पटीने बरा. हिन्दी कधीच बघितला नाही आणि बघणारही नाही. शरद उपाध्येन्च एकच पटल, कि शो मध्ये सतत मासळीबाजार चालतो, म मांचे सल्ले स्पर्धक ऐकत नाही. WWE सारखे टास्कस असतात. बाकी त्यान्नी लिहिलेल पटल नाही ( उ. दा. मुळूमुळू रडणारे पुरुष, गलिच्छ विनोद, वै वै) असो, शेवटी एकेकाची आवड असते.

शिवने आता गेम सिरियसली घ्यायला हवा. सारख सारख विणाच्या मागे लागण आणि फिजिकल टास्कस उत्तम करण एवढच जमत का त्याला? अशाने डेण्जर झोनमध्ये जायचा पुढच्या वेळी. Sad

आता काय अजून एक एलिमिनेशन होईल फक्त. आता शिव/ वीणा ला खेळ सुधारायला वगैरे खूप उशीर झालेला आहे. आता कसेही केले तरी जातीलच दोघे फिनाले ला असे च वाटते. बिचुकले गेस्ट आहेत तर तेही जातील कधीतरी. आणि अजून एक कोणीतरी रविवारी. बहुधा आरोह??
उपाध्यांना सहन करणे शक्य नव्हते त्यामुळे कालचा भाग पाहिलाच नाही. आता या आठवड्यात टिकेट टु फिनाले टास्क आहे.

ते शिवानीलाच मिळेल अशी व्यवस्था असेल, ती नॉमीनेट कधीच होणार नाही.

कॅप्टनसी टास्क खरा यावेळी शिव वीणा हिनात हवा होता पण हिना गेली त्यामुळे हे दोघेच योग्य टास्कसाठी, त्यांनी चांगला केला.

नवीन प्रोमो शिव वीणा भांडणावर, तिथे लिहून आले इतके दिवस यांच्या लव्हस्टोरीवर trp मिळवलात, आता उरलेले दिवस भांडण आणि ब्रेकअप वर मिळवा, दुसरं काही नाहीच दाखवायला.

आत्ता पाहिला परागचा तो व्हिडीओ.
>>पराग चुकला होता याची खात्री होतीच.... त्याच्या तोंडाने त्याने ते अजुन एकदा कबूल केले ते बरे झाले..... पण त्याबरोबर जो फाफटफसारा लावला तो अनेक लोकांनी अनेक वेळा अनेक ठिकाणी बोलून झालेला आहे!
लोकांनी एखादा चांगला खेळतोय म्हणणे वेगळे आणि मी स्वतः चांगले खेळत होतो.... strong player होतो म्हणून सर्वांनी माझ्याविरुद्ध कट रचून मला बाहेर काढला म्हणणे गोष्ट वेगळी..... पराग खरच विनोदी आहे.... बघितल तर त्या आधीचे काही टास्क अगदीच फुसका खेळला होता तो आणि त्यातून खुर्चीच्या टास्कमध्ये शिव आणि किशोरी दोघेही बसून राहील्यामुळे परागसाठी न उठणे अगदी प्रतिष्ठेचे झाले होते!
समोरचा बंदूक रोखेल तर मी नाही बंदूक चालवणार का? वगैरे युक्तिवाद तर अगदीच बाळबोध होते
वैशाली आणि केळ्या बाहेर गेल्यानंतर "माझ्या फॅन्सनी त्यांची विकेट काढली" असल्या पोस्टी हा माणूस टाकत असेल तर आता नेहा ची विकेट काढण्यासाठी टायमींगवर हा माणूस interview देत आहे अशी शंका यायलाही जागा आहे! >>+१११
एक तर तो एपिसोड दोन दोन दा मुद्दाम पाहिला तरी त्याला शारिरीक इजा वगैरे करत असल्याचे वाटले नव्हते. अनॉयिंग जरूर होते. पण तोच टास्क होता. आणि आधीही सगळ्या टास्क मधे पराग पळपुटाच निघालेला आहे. आणि सगळ्यात कहर म्हणजे त्याला जर कसली का होईना पण इजा होतेय असे वाटले तर उठायचे ना मग तिथून. ते त्याने नाही केले. हिंसा केल्याचे प्रकरण अंगावर शेकल्यावर केलेला कांगावा वाटतो तो. >>+१११

त्या वीणाला कसलाही फरक पडत नव्हता पीडीए बद्दल ओरडले त्यावर , ती निर्लज्जपणानी हसत होती, शिव मान खाली घालून बसला होता>>> मस्त ओरडले ममा शीव ला वीणावरुन..शीव पण त्या वीणा बाबतीत पालथ्या घड्यावर पाणी आहे आणि वीणा तर निर्ल्लज्ज आहेच. मला तर वीणा त्या बिचुकले व शिवानीनंतरची सगळ्यात नॉन डिझर्विंग कँडिडेट वाटते ट्रॉफीसाठी.

मी सुध्द्दा शरद उपाध्ये भाग पाहिला नाही.
गेम वगैरे काही सुधारणार नाही आता कोणी, आली कि संपत स्पर्धा !
शिव तर सगळ्याच्या पलीकडे गेलाय, वर कोणीतरी लिहिलय तसं ‘पक्का ,आजपासून नाही‘ त्याचं आवडतं वाक्यं, खोटारडा म्हणतय त्याला पब्लिक आता. बर त्याला जर नाही सोडायचं वीणाकाकुला तर तसे ठामपणे मत मांडायची, डयरेक्ट सांगायची हिंमत नाही !
मागच्या सिझनला मेघा कशी कोणीही काही सांगो, ‘मी बरोबर’ वर ठाम रहायची, भर पत्रकार परिषदेत “माझं मत माझं मत असतं, समोर दहा लोक असोत कि दहा हजार“ हे क्लिअर अँड लाउड बोलायची हिंमत होती तिची, तस बोलु शकणारा एकही काँटेस्टन्ट नाही इथे.
परवा हे सगळे उरलेले टॉप ६ बघून एकच मनात आलं कि सगळे एकसे एक बिनडोक लोक उरलेत Uhoh
खरच कोणीच जिंकु नये असं वाटतय आता .
हिना , केळ्या हे आत्ताच्या टॉप ५ मधे हवे होते पण उरलाय सगळा कचरा !
शिवला अफेअर करायचच होतं तर हिना जास्त चांगली वाटली असती त्याच्याबरोबर , ते दोघे एकत्रं मस्तं डान्स करतात , एकत्रं वर्काउट मस्त करायचे, दोघेही फिट आणि टास्कमधे एकमेकांना टफ फाइट देणारे !
असो, आता हिनाला बिबॉ हिन्दी मधे किंवा नच बलिये वगैरे मधे चान्स मिळु देत.

आपल्यासारखी सेम टू सेम attraction वाटत नसेल. Opposite attracts, हिना येण्याआधीच त्यांच्यात चांगलं bonding होतं, हाच पाठीमागे होता तिच्या.

सॉरी टू से पण हिना अनेकदा चिप वाटलीय, जाताना ग्रेसफुल होती हे मान्य. तिने अनेक टास्क चीप लेव्हलला जाऊन केलेत. काही उत्तम केलेत.

वीणा नेहेमी टास्क उत्तम करते, मागच्या टास्कक्वीनला तर डोक्याने हरवलं. वीणा टास्कमध्ये मस्त डोकं वापरते हे आज आरोहपण म्हणाला.

आज वीणाबद्दल वाईट वाटलं, शिवानी खूप टार्गेट करते. वीणाला बरं पण नाहीये, मला तिला शाळेत जाणाऱ्या मुलीप्रमाणे रुमाल पिन लावून ड्रेसला बांधावासा वाटला, किती घाणेरडेपणा करतेय, हाताने नाक पुसून, शिवने पण एकदा सेम केलं, श्या. तिथे कोणीच सांगत नाही का यांना की रुमाल किंवा टिश्यू पेपर घ्या, त्यांना स्वतःला पण हे कळत नाही का, काय सारखं हे बघायचं, अशा वेळी दाखवू नका ह्यांना.

वीणा रडली आणि ताईला जे सांगत होती ते जेन्यूईन वाटलं पण.

आज परत बोअर झालं बरेच.

शिवानी उत्तरं मस्त देत होती bb जीवावर, नॉमीनेट एकदाही झाली नाहीये. ती होणार नाही याची दक्षता bb घेणार. नेहाला पण रडवलं तिने, ती गप्पच झालीय तिच्यासमोर.

नेहा पण छान बोलली. वीणा पण काही मस्त सांगत होती. तिने शिवानीला सांगायला हवं होतं मी सहा वेळा नॉमीनेट होऊन वाचले आहे, तू तर नॉमीनेट झालीच नाहीयेस. हाच मुद्दा काल act riders ने मांडला, कोण किती वेळा नॉमीनेट होऊन वाचलंय. ते youtube वर बघून लिहिलं.

मी ह्या टास्कला मध्ये मध्ये tv mute ठेवत होते.

शिवने शेवटी मस्त पचका केला विशेषतः शिवानीचा आणि बिचुकलेचा, वीणाच्या बाजूने बोलून. बाकी शिवानीला एकटीच वीणा नडतेय, त्यामुळे टार्गेट वीणा.

हिना स्वत:च्या मूर्खपणाने गेली,आधी शिवच्या सांगण्यावरून किशोरीला नॉमिनेट केल आणि मग आरोहला सेफ करून स्वत:चाच बळी दिला.
आणि भीती कोणालाच नसावी कारण या लोकांना माहित असाव फिनँलेला कोण जाणार आहे.कदाचित विनरही माहित असेल.
कदाचित पैसे वाढवून मिळत असतील शिवानी आणि वीणाला.,भांडल्यावर.

आरोप बिचुकलेला लिहून दिले होते का?

किशोरी परत एकटी बसून बडबडायला लागली.

बिचुकले जाणार हे हाउसमेट्सना कळलंय वाटतं. सेंड ऑफ वगैरे बोलत होते.

आरोप बिचुकलेला लिहून दिले होते का? >>> हो. असं बिचुकले म्हणाला एकदा.

बिचुकले जाणार हे हाउसमेट्सना कळलंय वाटतं. सेंड ऑफ वगैरे बोलत होते. >>> हे missed. हल्ली इतकं बोअर होतं की लक्ष देऊन बघितलं जात नाही, tv पण mute करते. गेला तर बरं होईल.

हिना स्वत:च्या मूर्खपणाने गेली,आधी शिवच्या सांगण्यावरून किशोरीला नॉमिनेट केल आणि मग आरोहला सेफ करून स्वत:चाच बळी दिला. >>> हो. अजून एक त्यादिवशी टास्कमधे गोंधळ घातला त्यामुळे bb च्या रडारवर होतीच ती. समहाऊ शिवानीला पण ती नको होती.

मी ज्या तऱ्हेने बाहेर गेले त्यापेक्षा दुप्पट मानाने परत आले आहे
गेम फिक्स्ड - शिवानी Winner ..
विषय संपला

हो म्हणून मी त्यादिवशी लिहून पण आले bb पेजवर की सलमान खान येणार आहे तर त्याच्या हस्ते ती trophy द्या शिवानीला. विषय कट.

Evict झालेले काहीजण येणार आहेत घरात task घ्यायला. मागच्यावर्षीपण आलेले पण task नव्हता घेतला पण सांगायला आलेले कसे खेळताय वगैरे. राजेशने तेव्हा मेघा आणि स्मिताचे कौतुक केलेलं Lol

वीणा रडली आणि ताईला जे सांगत होती ते जेन्यूईन वाटलं पण.>> कितीही प्रयत्न केला न वाटून घेण्याचा तरी वीणा कायमच फेक वाटते. महा नाटकी, सेल्फ ऑब्सेस्ड आणि लाडावलेली आहे ती.

हरकत नाही हो. आपलं आपलं मत. ती उद्धट उर्मट आगाऊ अतिशाहणी आहेच पण मला तिच्यातले गुणही दिसतात. फेक मला नाही वाटत. दुर्गुणही खूप आहेत पण गुणही आहेत.

एनीवे जे पहिल्या दिवसापासून या घरात आहेत, बाहेरून बघून परत strategy ठरवून आले नाहीयेत त्या सर्वांना पहिले क्रमांक मिळायला हवेत असं माझं प्रामाणिक मत. नंबर कसेही लागुदेत पण शिव पहिला आवडेल अर्थात अजूनही. शिव नेहा वीणा किशोरीताई हेच हवेत पहिले, कुठल्याही क्रमाने मग आरोह चालेल मला शिवानीऐवजी, त्याने तिच्यापेक्षा जास्त केलंय.

Btw आज शिवानी असं म्हणाली का की bb यांनी माझी काळजी घे, माझ्याबरोबर राहा नेहाला सांगितलं म्हणून तिने केलं. मला वाटतं सांगितलं नसते तरी नेहाने केलं असतं. ती गेली तेव्हा नेहाला जेन्युइनली खूप वाईट वाटलेलं आणि ती रडलेली मनापासून.

हरकत नाही हो. आपलं आपलं मत. >>> हे मात्र खरंय आवड आपली आपली.
रच्याकने, तुमच्या परत लिहीते होण्याचा निर्णयाबद्दल धन्स. मागच्या सिझनपासूनच तुमची प्रामणिक मते वाचायला आवडायची त्यामुळे मधेच तुम्ही रोमात गेल्यावर धाग्यावरची मजा थोडी कमी झाली होती. Happy

आरोह आधीपासुन असता तर शिवला टफ फाइट होती. असे चांगले लोक पहिल्या दिवसापसुन हवेत तर मजाय. नंतर आल्यामुळे नुकसान होते त्यांचे.
कालचा टास्क अत्यंत बोअर.

आरोह आधीपासुन असता तर शिवला टफ फाइट होती. >>> हो एक रडूबाईपणा आणि शाळकरीपणा सोडला तर, तो तसा बरा आहे.

अजब थँक्यु.

कालचा टास्क अत्यंत बोअर. >>> हो मी मधे मधे टीव्ही म्युट करत होते. शिवानी वीणा भांडणासाठीच ठेवला. जेवढी बोलते शिवानी, तेवढा टास्क मात्र करत नाही. असो काही न करता एवढा मान सन्मान मिळतोय ना bb कडून आणि आल्यावर लगेच कॅप्टनही केलं ना मग बास.

शिवचं मागच्यावर्षी आधी नाव येत होतं आणि नंतर wild card एन्ट्री म्हणूनही येत होतं पण तो मधेच आला नाही किंवा त्याला आणलं नाही ते बरं झालं. तो फायदा यावर्षी पहिल्यापासून आला म्हणून होणार आहे. आरोह मध्ये उगाच आला. त्याला bb शिवला माफ केलं म्हणून काहीतरी गिफ्ट देईल बहुतेक. त्याने माफ केलं नसतं तर शिवला बाहेर काढावं लागलं असते.

बाहेर जाऊन आलेले, वाइल्ड कार्ड आलेले कधीही ट्रॉफी जिंकलेले नाहीत .

पण आख्खा कलर्स ज्या प्रकारे शिवानीला प्रमोट करत आहे , काहीही शक्य आहे.
सध्या माझ्यासाठी शिव विनर आहे.
कोणाशी फार वाकडे नाही , टास्क चांगला करतो आणि टीआरपी बराच दिला आहे

बाहेर काढणं तुम्ही माफी मागता की नाही, मिळवू शकता की नाही यावर असतं Wink

बिग बॉसच्या इतिहासात घरात पुन्हा प्रवेश केलेली मीच आहे - शिवानी. हो बाई. हा सीझन तुझ्या एकटीसाठीच ठेवलाय.

पहिले तीन आठवडे ती शिवीगाळ करायची हे तिला मान्य आहे. पण वीणासुद्धा शिव्या देते हे दाखवून शिवानीची इमेज कशी काय सुधारणार ते कळलं नाही.

शिवानी माझी ताकद आहे, असं नेहा म्हणाली खरी. पण शिवानी आल्यापासून तिचा रंगच उडालाय. टास्क्समध्येही ती फिकी पडतेय. सातबारात वादावादीत किशोरी तिला भारी पडली.
बाथरूम एरिया जिंका यच्या टास्कमध्ये तर शिवानीनेनच तिला मात दिली.

हीनाने खरंच आरोहला टॉप टू -मध्ये निवडून मूर्खपणा केला , ज्याचा फटका इतर काहींनाही बसेल.

आरोह बोलतो छान.. तोंडावरच छान ठेवुन देतो..
विणाचं मलाहि काल खुप वाईट वाटलं.. अन शिवानी कधी बाहेर जाते अस वाटलं.. शिवानी नुसती सुड उगवल्यासारखी वागते. काय ते हावभाव अन ती विणाचं सांगत होती..
विनर नेहाच असेल.. तीच आहे सगळ्यात डिझर्व्हींग.. Happy

हीनाने खरंच आरोहला टॉप टू -मध्ये निवडून मूर्खपणा केला , ज्याचा फटका इतर काहींनाही बसेल. >>> खरं आहे. हीना स्वतः च्या कर्माने गेली. नेहाला निवडणे शाहाणपणाचे होतं तेव्हा. अर्थात वीणा आणि शिव ने सपोर्ट केला म्हणून हिनाला दोन मते तरी मिळाली, नाहीतरी तीही नसती.

काय ते हावभाव अन ती विणाचं सांगत होती.. >>> खरं आहे. ती आणि वीणा दोघी विचित्र चेहेऱ्यानेच वावरत असतात. पण शिवानी मला जास्त negative वाटते. दिसायला सुंदर आहे पण अविर्भाव बेकार. शिवानी जळते वीणावर कारण task जिंकले वीणाने एक शिव बरोबर आणि मेघा टीम मध्ये शिवानी असून मात दिली त्यामुळे. हिनापण भारी पडायची तिला.

शिवानी माझी ताकद आहे, असं नेहा म्हणाली खरी. पण शिवानी आल्यापासून तिचा रंगच उडालाय. टास्क्समध्येही ती फिकी पडतेय. सातबारात वादावादीत किशोरी तिला भारी पडली.
बाथरूम एरिया जिंका यच्या टास्कमध्ये तर शिवानीनेनच तिला मात दिली. >>> नेहा ताकद वगैरे म्हणाली अरेरे. उलट तिच्यातला रस शोषून घेतलाय शिवानीने. बाथरूम task मध्ये शिवानी चांगलं खेळली पण मेघा सर्व सांगत होती, असं कर तसं कर actually.

>>विनर नेहाच असेल.. तीच आहे सगळ्यात डिझर्व्हींग.. Happy

ज्जे बात!
काल सगळ्यात मुद्देसूद उत्तरे नेहाने दिली!
तिने मित्र तर जपलेयतच पण नेहाकडे शत्रूंना जिंकून घ्यायची कला आहे.... केळ्यासारखा तिचा कट्टर प्रतिस्पर्धी जाताजाता तिचा मित्र बनला..... बिचुकले पण गेल्या आठवड्यापासून तिच्याशी जुळवून घेउ बघतायत!
वीणा आणि शिवच्या गुडबुक्स मध्ये आहेच ती!

माधव आणि आरोहने पण दोघीतुन निवडण्याची वेळ येताच नेहाला शिवानीपेक्षा प्रेफरन्स दिलाय!

याउलट शिवानीने संधी मिळताच नेहा कुठे आणि कशी चुकते ते हायलाईट करायचा प्रयत्न केलाय

एक वेळ अशी होती जेंव्हा आख्खे घर नेहाच्या विरोधात होते पण आता एक किशोरी सोडली तर सगळ्यांशी वेगवेगळ्या लेव्हलला चांगला बॉंड तयार केलाय नेहाने
बाहेर पडलेल्या पण बहुतेक स्पर्धकांनी टॉप ३ मध्ये न चुकता नेहा चे नाव घेतलेय!

नेहाचा या खेळातला (जास्त करुन त्या पंचींग बॅग टास्कनंतरचा) प्रवास बघता मला राहत इंदोरींचा एक शेर आठवतो:
आँख में पानी रखो होंटों पे चिंगारी रखो
ज़िंदा रहना है तो तरकीबें बहुत सारी रखो

याउलट शिवानीने संधी मिळताच नेहा कुठे आणि कशी चुकते ते हायलाईट करायचा प्रयत्न केलाय >>> स्वरूप याबद्दल धन्यवाद द्या तिला, ती शिवानी असं वागली त्यामुळे माझा soft corner नेहाकडे गेला. नाहीतर तुम्हाला माहितेय मला नेहा कधीच आवडत नव्हती पण तिच्यामुळे दृष्टीकोन बदलला थोडा माझा, positive झाला नेहाकडे बघण्याचा पण जिंकायला शिव हवाय Lol

Pages