मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

रविवार एकंदरीत बोअर होतो, ती नाच गाणी जास्त बोअर पण नेहा मस्त नाचली तिचा आवडला. नेहा एवढी चांगली नाचते पण नाचू देत नाही तिला जास्त.

उपाध्ये यांच्यासमोर पण अर्धी चर्चा शिव वीणा आणि बिचुकले यांच्यावर केली म मां नी.

बिचुकले यांचा आवाज चांगला आहे मात्र, त्यात जरा शिक्षण वगैरे घेतलं तर बरं होईल.

आज कि ताई, शिवानी छान दिसत होत्या, ताई नाचल्या पण छान. हीनाही मस्त दिसत होती.

आधीच्या कमेंटस अजून वाचल्या नाहीयेत.

अत्ता बिबॉ च्या प्रिकॅप मध्ये विणा आणि शिव चं भांडण दाखवताएत तेव्हा विणाचे पांढरे केस दिसले का कोणाला? ती एरवी आवडते मला पण ह्यात कशीतरीच दिसत होती, जरा चेटकिणी सारखी मुद्दाम पांढरा रंग लावल्या सारखी.

काल पण शीव वीणा आणी बिचुकले वर च चर्चा केली . दर रवीवारी ते गाणी आणी डान्स चा टास्क घेतात. मला किशोरी ताई नी केलेला डान्स नाही आवडला.

आरोह ने एकदम बरोबर सांगितलं चुगलीचं .
किशोरीताईंबद्दल जे बोलला ते पटलं १००%
आणि काल ममांनी बिचूकलेंची लायकी का नाही हे बाकिच्यांना विचारलं त्यात नेहाच्या बोलणं एकदम पटलं, मुद्देसूत वाटलं.

त्यांना बिबॉने टास्कच तसा दिला होता , इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या घरच्यांना सळो कि पळो करून सोडायचं अशा , श.रा ने सांगितल तिच्या इन्स्टा स्टोरीज वर कि त्यांना हेच करायला सांगितलं होतं >>> हो बरोबर. पण इथे भरत यांनी जी कमेंट लिहीली की असे कुठे पाहुणे असतात का, त्यांनाच जेलमधे टाकायला हवं होतं, तीच म मांनी जशीच्या तशी उचलली आणि हेच विधान केलं.

स्मिताला उलट जमलं नाही ते टास्क , स्वतःचा स्वभाव कसाही असला तरी बिबॉने दिलेला रोल तिला नाही वठवता आला. >>> फक्त त्रास द्यायचा होता तर तिचे सिलेक्शन चूक होतं. मग तिला उलट तेव्हा आणण्यापेक्षा ये रे ये रे पैसा टीम बरोबर आणले असतं, तर तिने हिरा task उत्तम केला असता. ती त्या पिक्चरमध्ये आहे त्यामुळे ते योग्य होतं तसं तिला टीमबरोबर पाठवणे.

शराचे पोह्याचा स्कोर सेटल करणे हा तर भार्री टच वाटला होता मला!! >>> हा ते मला आवडलं, माझ्या आधी लक्षात नव्हतं मागच्यावर्षीचं, इथेच कोणीतरी नजरेस आणलं त्यामुळे ते मला आवडलं पण नेहाने केलेलं सूप छान झालेलं पिऊन उगाच केस टाकणं नाही आवडलं.

निर्झरा Lol

अत्ता बिबॉ च्या प्रिकॅप मध्ये विणा आणि शिव चं भांडण दाखवताएत तेव्हा विणाचे पांढरे केस दिसले का कोणाला? ती एरवी आवडते मला पण ह्यात कशीतरीच दिसत होती, जरा चेटकिणी सारखी मुद्दाम पांढरा रंग लावल्या सारखी. >>> नीट नाही बघितलं पण वीणा बरेचदा वाईट दिसते तेव्हाच दाखवतात. ती छान हसून खेळून असते तेव्हा छान दिसते ते फक्त voot वर अनसीन अनदेखा मध्ये बघितलं तर दिसतं.

तिने आणि ताईने तर शिव सेफ सांगितलं मग शिवला का असं वाटतं की मी सेफ झालो त्याचा वीणाला राग आलाय.

तिने डोकं दुखतं असं सांगितलं शिवला, मला वाटतं कदाचित nominate झाली असेल किंवा कॅप्टन झाली नसेल म्हणून तिची चीडचीड होत असेल.

बरं आज परत म मांनी मला तुमची जोडी आवडते असंही सांगितलं हा शिव वीणाला.

Btw ह्यावेळी मी पहिल्यांदाच 99 votes दिले, अर्थात शिवलाच. नाहीतर मला कंटाळा येतो इतकं voting करायला.

शरद उपाध्ये यांना अश्या मालिकांमध्ये येणे शोभत नाही. तसाही सगळ्यांच्या राशी आधीच ठाऊक असतात उगाच ओळखण्याची नाटकं कशाला?

बादवे हिना gracefully बाहेर पडली आज. तिला एकतर कळून चुकलं होतं आणि ती prepared पण वाटत होती. So काही फार मेलोड्रामा नाही झाला . आज हिना दिसत मात्र छान होती. ती साडी आणि नथ सुंदर दिसली तिला. पूर्ण सिझन मध्ये सगळ्यात छान ती आज दिसली. ती बाहेर जाताना वाईट वाटलं उगाच, असो.

बादवे हिना gracefully बाहेर पडली आज. तिला एकतर कळून चुकलं होतं आणि ती prepared पण वाटत होती. So काही फार मेलोड्रामा नाही झाला . आज हिना दिसत मात्र छान होती. ती साडी आणि नथ सुंदर दिसली तिला. पूर्ण सिझन मध्ये सगळ्यात छान ती आज दिसली. ती बाहेर जाताना वाईट वाटलं उगाच, असो. >>> अगदी अगदी.

वर हीनाचे नाव लिहायचं राहिले, करते एडीट. ती छान दिसत होती.

शरद उपाध्ये यांनी ३१ जुलै रोजी स्वतःच्या अधिकृत फेसबुक पेज वरून टाकलेली पोस्ट आणि आजच्या एपिसोड मध्ये त्यांचा सहभाग पाह्ता याला काय म्हणावे? सबसे बडा रुपैया?
"बिग बाॅस बघणा-या सुशिक्षितांची संख्या कमी होऊ लागली आहे कारण घरांतील मुली 'कैकयी'सारखा थयथयाट करतात किंवा सारख्या रडतात.त्यांचे नाचणे,आनंद व्यक्त करणे,प्रभातसमयी उठल्यावर अश्लिल अंगविक्षेप करणे, किळसवाणे वाटते.मुली एकमेकींकडे डोळे फाडफाडून बघतात आणि भयंकर भांडतात तेंव्हा नळावरील भांडणांचा भास होतो. महेशजींनी सूचना देऊन सुध्दा एकाच वेळी अनेकजण तारस्वरात बोलतात तेंव्हा महाचर्चेचे स्वरूप येऊन एकाचेही म्हणणे नीट कळत नाही.ही कुठल्या फॅमिलीतली मुले आली आहेत असा संभ्रम निर्माण होतो.
कार्यक्रमांतील मुलेही शामळू,छोट्या छोट्या कारणांनी मुळुमुळु रडणारी व मग कोणाच्यातरी कुशीत जाऊन मुसमुसणारी बावळट वाटतात.ग्रुप ग्रुपने बसून चहाड्या करायच्या, कोणालातरी टार्गेट करायचे,कुचुकुचु खलबते करायची,एखाद्याशी खूप भांडायचे व मग त्यालाच साॅरी म्हणून मिठ्या मारायच्या नंतर परत भांडायचे असली ठिसुळ नाती काय प्रेम,आपुलकी निर्माण करणार!नाॅमिनेशनच्या वेळी पोटतिडीकेने विरोध आणि एलिमिनेशच्या वेळी नाटकी रडणे,क्षमा मागणे हे प्रेक्षकांना उल्लू बनविण्याचा एपिसोड असतो.पण प्रेक्षक यांचे बारसे जेवलेले असतात.*टास्क* नावाचा प्रकार WWF सारखा वाटतो.महेशजींच्या सूचनांचा आदर होतच नाही.कोणालाही कोणीही केंव्हाही मिठ्या मारतो,गलिच्छ विनोद करतो हे प्रेक्षक दीड तास नाही सहन करू शकत.हे घर आहे का मासळीबाजार! तेच कळत नाही.
एखादा सदस्य छान बोलतोय,आपले अनुभव सांगतोय,
ज्षेष्ठ कलावंत वयाला साजेसा वागतोय,हसतखेळत टास्क चाललाय असे काहीच दिसत नाही.अपुरे कपडे,प्रेमाचे चाळे,असभ्य भाषा,अडाणी बायकांसारखे हातवारे आणि आरडाओरडा असह्य होऊन दहा वाजल्यापासूनच दूरदर्शन संच बंद होऊ लागतात हे कार्यक्रमाचे अपयश आहे.*बिगबाॅसचा* 'चला हवा येऊ द्या' होऊ नये ही प्रामाणिक इच्छा."

हे असं मत होतं आणि पंधरा दिवसांत बदललं मग सबसे बडा रुपय्या, हेच खरं त्यांच्याबाबतीत. येऊन कित्ती कौतुक करत होते. घरोघरी हाच कार्यक्रम चालू असतो, ही पण थाप मारली. सगळं bb यांच्या सांगण्यानुसार बोलत होते की काय. आता परत fb वर काय लिहितील हे झाल्यावर.

भयंकर पकाऊ वीकेंड.
शिवचा आता कंटाळा यायला लागलाय. त्याला वीणापासून लांब रहा टाइप अ‍ॅडव्हाइस मिळाला की तो "पक्का.... आजपासून" असं प्रॉमिस करतो.
ऑडियन्स, मांजरेकर किंवा सुशान्त, सगळ्यांसमोर हेच. जर त्याला हे फॉलो करायचं नाहीए, तर तसं बोलू नये.

दुसर्‍या बाजूने जर सारखं शिव वीणाचं PDA दाखवत असतील तर घरात इंटरेस्टिंग काहीच होत नाहीए. (तेवढ्यासाठी बिचुकले ला काढत नाहीएत?)

किशोरीचं म्हणणं होतं की ती कॅप्टन म्हणून बिचुकलेला ओरडली, अनेकदा अडगळीच्या खोलीत टाकलं. यातलं काहीच दाखवलं नाही.
आरोहला तिने दिलेलं हातभर लांब स्पष्टीकरण पण डोक्यात गेलं. आरोहला वीणासमोर सेफ केलं तर त्याला वाटलं की त्याला तिच्या पेक्षा जास्त व्होट्स आहेत. किशोरी इतके आठवडे ऑडियन्सच्याच पाठिंब्यावर आहे, तेवढं एकच वाक्य तिने आरोहच्या तोंडावर फेकायचं होतं. शब्द कोणते वापरायचे, आवाज कसा लावायचा याची तिने नेहाकडून ट्रेनिंग घ्यायची गरज आहे. मी तिचे मराठी सिनेमे पाहिलेले नाहीत. ज्या काळात ती काम करत होती, तो मराठी सिनेमाचा गुणवत्तेच्या दृष्टीने सगळ्यात वाईट काळ होता. अभिनेत्री म्हणून ती कशी आहे, काही कल्पना नाही. ती टॉपची हि रोइन होती हे बिग बॉस पाहून कळलं. तेही बिचुकलेच म्हणतात म्हणून.

मांजरेकर आणि टीम एकेकाला टारगेट करतात. आधी नेहा, मग हीना आणि आता शिव. नेहाचा आवाजच बंद झालाय. शिवानीने खाण्यावरून टोकत जाऊ नकोस असं म्हटलं त्यावर तिला उत्तरही देता येईना .

उपाध्येंनी आणखी बोअर केलं. (जे अनपेक्षित नव्हतं) त्यांनी शिव -वीणा यांच्या स्व्हभावाबद्दल सांगितलेलं एकदम उलट होतं. मांजरेकर म्हणालेसुद्धा.

आणि आता शीवच्या बाबतीत का बिग बॉस गप्प ?. >>> सांगितलं की शिवला की तू लगेच माफी मागितलीस त्याची आणि त्यानेही माफ केलं म्हणून निर्णय प्रेक्षक करतील, नाहीतर तूपण आज इथे माझ्याबरोबर उभा असतास. तिथे नसतास. >>माफी मागण्याचा ना मागण्याचा काहीच संबंध नाहीये . बिग बॉस चे नियम / रुल्स आहेत ना कोणालाही शारीरिक दुखापत केली कि बाहेर काढणार . मग या न्यायाने वैशाली आणि केळकर ला पण बाहेर काढायला पाहिजे कारण त्यांनी पण परागला शारीरिक दुखापत केली होतीच कि ? त्या दोघांचा फक्त नाव घेऊन निषेध केला . पुढे काय ? थोडक्यात सगळ्यांना एक सारखे नियम नाहीतच . पार्शल आहे बिग बॉस .

शिवचा आता कंटाळा यायला लागलाय. त्याला वीणापासून लांब रहा टाइप अ‍ॅडव्हाइस मिळाला की तो "पक्का.... आजपासून" असं प्रॉमिस करतो.ऑडियन्स, मांजरेकर किंवा सुशान्त, सगळ्यांसमोर हेच. जर त्याला हे फॉलो करायचं नाहीए, तर तसं बोलू नये. >> अगदी अगदी . नुसताच प्रॉमिस पक्का म्हणून

आणि शिवानी कशाला दर शनिवारी/रविवारी वीणा ला टार्गेट करते ? शिवानीला काहीच रागावल /बोललं जात नाही . शिवानीला नाही नाचता येत / नाही काही परफॉर्म करता येत . काहीच नाही . नुसतं वचा वचा समोरच्याला जास्त करून वीणाला बोलता येत आणि तरी ममा काहीच बोलत नाहीत . कधी पासून म्हणतेय शिवणीच विनर आहे Proud

भरत पूर्ण पोस्ट ला +++१११११
मी तिचे मराठी सिनेमे पाहिलेले नाहीत. ज्या काळात ती काम करत होती, तो मराठी सिनेमाचा गुणवत्तेच्या दृष्टीने सगळ्यात वाईट काळ होता>>>>> Lol
बादवे PDA म्हंजे?

बादवे हिना gracefully बाहेर पडली आज. तिला एकतर कळून चुकलं होतं आणि ती prepared पण वाटत होती. So काही फार मेलोड्रामा नाही झाला . आज हिना दिसत मात्र छान होती. ती साडी आणि नथ सुंदर दिसली तिला. पूर्ण सिझन मध्ये सगळ्यात छान ती आज दिसली. ती बाहेर जाताना वाईट वाटलं उगाच, असो>>>>> होय मलाही असंच वाटलं

Btw नेहाची कविता नीट ऐकली नव्हती परवा त्यासाठी खास voot वर बघितलं आत्ता. छान होती कविता आणि ती छान दिसत होती.

या मंगळवारी बिचुकले कायमचे घराबाहेर जाणार आहेत. >>> खरंच का, नाहीतर कुठल्यातरी केसची date असायची आणि पुढची तारीख मिळायची मग परत साहेब घरात Lol .

काय ते बड्डे आहे म्हणून जो तो उठतो तो कविता करत सुटलेल..केवढी तो चमचेगिरी...जस काही ममा च ठरवणार आहेत की ट्रॉफी कोणाला द्यायची.. मी तर सगळ भाग तो फॉरवर्ड केला.

ती ट्रॉफी आणि टायटल एकटा बिचुकले डिझर्व करतो, बिचुकले बिबॉचा राजा आणि बाकी एकुणएक बीबीचे गुलाम आहेत.
मंगळवारी सगळ्यांना धक्के देऊन बाहेर काढा मिडविक एव्हिक्शनमधे, रातोरात ६ लोक बाहेर, बचेगा सिर्फ बिचुकले Wink

मी तर सगळ भाग तो फॉरवर्ड केला. >>> टीव्हीवर बघते ना पण मीही बोअर होऊन उठून गेलेले पण इथे कोणीतरी लिहिलं की नेहाने कविता छान केलेली म्हणून मुद्दाम बघितली. ती पटली का नाही ती गोष्ट वेगळी Lol पण तिचे कौतुक.

किशोरी कधीही टॉपची हिरॉईन नव्हती. सुप्रिया, निवेदिता, अलका, अश्विनी, प्रिया या सगळ्या समकालीन आहेत. किशोरीने चित्रपट खूप केले आहेत कारण तिने काम खूप लवकर सुरू केले. पण ती नेहेमी बालनाट्य करतात तसेच काम करायची.
शरद उपाध्ये हा अतिशय भंपक माणूस आहे. शृंगार, शयनकक्ष, चुंबन हे अतिशय आवडते शब्द आहेत त्यांचे. फिरून फिरून याच शब्दांवर येतात. अतिशय पांचट माणूस आहे, बिबॉसाठी योग्य आहे.

किशोरी शहाणे इतकी बकवास अभिनय करायची.
तिचा तो अशोक सराफ बरोबर एक चित्रपट पाहिलेला.
तेव्हा तर भारीच किरटा आवाज आणि बेक्कार नाच असा कारभार होता.
तो काळच मराठी चित्रपट अति पांचट प्रकार होता.

मांजरेकरांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम मी पण सगळा फॉरवर्ड केला. कविता काय आरती काय.? बोर झाले फार.
ते शीव चावल्या प्रकरणी जे काही बोलले ते पराग च्या मुलाखती ला उत्तर देतात की काय असे वाटले.

ते शीव चावल्या प्रकरणी जे काही बोलले ते पराग च्या मुलाखती ला उत्तर देतात की काय असे वाटले.>>अगदी अगदी... त्यांचच मन त्याना खात असणार..म्हणून उत्तर दिल असं वाटलं

Pages