मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

हीना आणि शिवमध्ये निवड करायची असेल तर मात्र माझं मत शिवलाच. एकतर तो आधीपासून आहे आणि हिनाने अति कटकट पण केलीय घरात.

शिवानीला खरंतर काढायला हवं पण तिलाच कॅप्टन पण करतील bb पुढच्या आठवड्यात मीन्स ती कॅप्टन होईल अशी व्यवस्था करतील.

रेशमने मात्र खिलाडूवृत्ती दाखवली आणि हीनाने जे कॅप्चर केलं ते योग्य असं सांगितलं नाहीतर नेहाचा चोंबडेपणा सुरु होता तिथे आणि देत नव्हती तो एरिया हारूनही.

वेलकम बॅक अंजु !! :टाळ्या:
चला आता मला डिटेल्स कळतील .. मी हल्ली बघायचं सोडून दिलंय .. किंवा फाफॉ करत बघते ..

आरोहला ते बाथरुम मध्ये बसलेलं पाहुन एकदम गावाकडंची आठवण आली, गव्यांपासुन फडाची राखण करणारा शेतकरी, बरोबर ती टोपी ...परफेक्टच..

चला आता मला डिटेल्स कळतील .. मी हल्ली बघायचं सोडून दिलंय .. किंवा फाफॉ करत बघते .. >>> मी ही सेम त्यामुळे अन्जू च्या पोस्ट मुळे बरे पडते.

लावणी म्हणताना आरो महामाया म्हणाला का 'मोहमाया' ऐवजी >>> हो हो Lol आणि सुशांतने आवर्जून दोन दोनदा मोहमाया सांगितलं त्याला.

वेलकम बॅक अन्जू. Happy बरे झाले पुन्हा लिहायला सुरुवात केलीस. + १११११११११

हीना आणि शिवमध्ये निवड करायची असेल तर मात्र माझं मत शिवलाच. एकतर तो आधीपासून आहे आणि हिनाने अति कटकट पण केलीय घर===++११११
हो आणि आरोह ला मत देवून हीनाने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला . नाहीतर आरोह सुद्धा असता नॉमिनेशनला .हीना टास्क बरी खेळते पण डोकं वापरत नाही .

हो आणि आरोह ला मत देवून हीनाने आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला . नाहीतर आरोह सुद्धा असता नॉमिनेशनला >>> अति मुर्खपणा केलाय तिने.

किशोरीताई पण शेवटी तिघांत असू शकतात. परागचे सर्व fans त्यांनाच voting करणार हे नक्की.

हीनाचं voting वाढत चाललंय. परागने तिलाच सपोर्ट केलाय असं कोणीतरी पोस्ट केलंय youtube व्हिडीओवर. पण परागला एक कळत नाहीये की त्याला नेहा विनर नको असेल तर शिवला ठेवावं लागेल फायनलपर्यंत आणि सर्वांनी त्याला मारलेले म्हणजे वैशाली, माधव, केळकरने त्याने मारल्यावर पण शिव चांगला वागला असं परवा तोच एबीपी माझावर सांगत होता.

अजून एक वीणाने घेतलेला निर्णय आवडला तो म्हणजे सुशांतला सांगितलं की आता task नको, आहे तो एरिया राखूया. उत्तम डिसिजन, त्यामुळे जिंकण्यात विणाचा वाटा जास्त आहे हीनापेक्षा हे नक्की.

इतकं सर्व करूनही म मां ना विणाचे गुण दिसणार नाहीत हे नक्की.

असं होतं माझं, थोडक्यात लिहू शकत नाही, त्यापेक्षा लांब राहिलेलं बरं.

पराग आता हिनाला सपोर्ट करुन शेवटी किशोरी ताई ना सपोर्ट करणार असेल.
असं होतं माझं, थोडक्यात लिहू शकत नाही, त्यापेक्षा लांब राहिलेलं बरं.
>>>
असुदे अन्जू. तुला वाटेल तेंव्हा लिहित रहा मोठे झाले तरी चालेल.

असं होतं माझं, थोडक्यात लिहू शकत नाही, त्यापेक्षा लांब राहिलेलं बरं.>> असूदेत कि !! इथे काय शब्दमर्यादा नाहीये ..
आणि तू म्हण बरं एकदा मनात, "उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही" .. असं म्हटलंस कि इथे येऊन सविस्तर लिहायचा वसा टाकता येणार नाही .. Happy
"तुम लढो.. " च्या चालीवर: तुम लिखो हम वाचेंगे ..जिनको वाचना है वो वाचेंगे नही तो ओलांडके जाएंगे .. Light 1 Wink Lol आता मला मार मिळायच्या आधी मी पळते .. Wink

धनुडीने खास विपु केली, शेवटी लिहिलंच.>>>>>>> ठांक्यु गं , आता कसं बरं वाटतय, तुझ्या पोस्ट बघुन.
भरत ची पुर्ण पोस्ट +++१११११
बाकी कालचा एपिसोड पुर्ण मिस झालाय, वुट वर बघावा लागेल, अजुन कोणी आलं नाही का नॉमिनेशन मधे शिव आणि हिना व्यतिरिक्त? मला हिना ला पण वोट करावसं वाटतय, पण दोघंच असतील तर शिवलाच सगळे व्होट.
मी बिबॉ चा १ ला सिझन एवढा बघितला नव्ह्ता, नंतर नंतर बघाय्ला लाग्ले, प्ण माझी फेव्ह रेशमच होती. अत्ता पण आवड्ली रेशम, पण मेघाचं डोकं खतर्नाक चालतं हे दिसलं लगेच. सुशांत कधीच नाही आवडला.

येस्स, आरोह डिसक्वालिफाय झाला. शिव खुष झाला असेल.>>>>>>> ही भरत ची नाहीये ,सुलु ची आहे मोठी पोस्ट , चुकून भरत लिहीलं, Happy

संख ची कुठ्ची कविता म्हणाली शिवानी ?

गाडी सुटली ,रुमाल हलले ,क्षणात डोळे टचकन ओले.
गाडी सुटली ,पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले.
गाडी सुटली,हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हंटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सूटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते.
अशी कविता होती आयुष्यावर बोलू काही मधली
हे भलतेच अवघड असते असे नाव आहे बहुतेक कवितेचे.

अच्छा , हि होय, पण ही कविता संदिप खरेच्याच तोंडुन ऐकावी Happy मस्तच आहे. हे भलते अवघड असते, ह्या गाण्याच्या आधी हि कविता आहे सिडी मध्ये.
थँक्यु अमुपरी

मी प्रोमो मध्ये पाहिले शिवानि ने कविता म्हणलेली. मला ही माहितच नव्हती कविता . गुगल वर सर्च केल्यावर कळाले. संदीप खरे कवी आहेत. मला आवडली कविता सो सेव्ह करुन ठेवले कवितचे पेज.

टचिंग होती, डोळ्यातून पाणी आलं. पण तिने केलेली नाहीये हे नक्की वाटत होतं. नाव का सांगितलं नाही काय माहिती. BB fb वर पण लिहिलंय काही जणांनी की संदीप खरेची कविता आहे. काहीजणांना वाटलं हिनेच केली की काय.

अंजू खरंच लिहीत रहा.... आम्हांला खूप आवडतं वाचायला.
काल दाखवलेल्या आजच्या प्रोमोमध्ये शिवानीच्या चक्करचं काय गौडबंगाल आहे? अतिशय नाटकी वाटत होतं ते. शिवानी कि एक्झिट का टाईम आ गया क्या?

Breaking news task आहे, त्यात केलेलं नाटक असणार.

Thank u सर्वांना.

अंजु लिहित्या रहा. आम्हाला तुमच्या पोस्ट्स वाचायची सवय झाली आहे आणि खरंच छान चर्चा पण होते त्या निमित्ताने . वेलकम बॅक !

Thank u.

आणि तू म्हण बरं एकदा मनात, "उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही" .. असं म्हटलंस कि इथे येऊन सविस्तर लिहायचा वसा टाकता येणार नाही >>> Lol नाही वसा वगैरे घेणार. वसा भसाभसा होतो मग. हा पण जेव्हा लिहीन तेव्हा सविस्तर लिहिलं जाणार आपोआप. हीनाला म मां म्हणतात तसं होणार, fullstop नाहीच.

हा पण जेव्हा लिहीन तेव्हा सविस्तर लिहिलं जाणार आपोआप. हीनाला म मां म्हणतात तसं होणार, fullstop नाहीच.
हे जाम आवडल. नकोच आहे फुलस्टॉप.

Happy

अजून एक मजा म्हणजे कालच्या task मध्ये वीणा हीनाने मागच्यावेळेची विजेती आणि ह्या वेळेचे would be विजेते यांना सहज चीतपट केलं केवळ अक्कल हुशारीने, कारण task तर हीना हरलीच actually, त्यामुळे taskचा जिंकण्यासाठी उपयोग झाला नाही, हा हीनाला voting साठी होईल किंवा होतोय नक्कीच त्याचा फायदा.

अन्जू जे लिहिते ते वाचले की सरळ मनाचे लोक कसा विचार करतात ते कळते. अन्जू एका मोठ्या गटाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे तीने लिहिलेच पाहिजे . किशोरी मी कशी एकटीने ठाम निर्णय घेते हे दाखवण्यात यशस्वी झाली शेवटी. मेघा गुबगुबीत पण गोड दिसत होती. मला तर आता फक्त दोन आठवडे राहिलेत ह्याचाच आनंद झालाय.

वेलकम बॅक, अन्जू!!!! Happy लिहित रहा.

तुझ्या कमबॅक पोस्टीशी सहमत. सगळ काही माझ्या मनातल लिहिलस.

धन्स धनुडी. Happy

आता बिबॉमध्ये पुन्हा इण्टरेस्ट वाटायला लागला आहे टास्कसमुळे.

आरोहला पुन्हा घेतल गेममध्ये. Sad

शिवानी झेण्डे तोडायला जाणार होती , नशीब रेशमने वेळेवर तिला रोखल. अडथळयाच्या टास्कनन्तर सुद्दा असाच एग्रेसिव्हपणा दाखवायला गेली होती.

नेहाची आणि सुशान्तची कविताही छान होती.

मेघाचा घसा बसला होता काल.

अडथळयान्च्या टास्कमध्ये शिवला विणा विरोधी टिममध्ये असूनही चिअरअप करत होती. तो जिन्कावा अस तिला वाटत होत. तिच्या डोळयात परफेक्ट दिसत होत ते. ( खरच प्रेमात पडले का हे दोघे? Uhoh )

विणाच टॅलेण्ट दाखवलच नाही. ते कापल का मी मिसल? Uhoh

किचन टास्कच्या निमित्ताने बिचकुलेची खातिरदारी चालू होती! Angry

लावणी म्हणताना आरो महामाया म्हणाला का 'मोहमाया' ऐवजी >>>>>> Rofl आता काही ह्याच खर नाही किशोरीताईपुढे.

वीणाचे नाही दाखवले. तिला अ‍ॅक्टिंग्,नाच, गाणं काहीच येत नसल्यामुळे नसेल दाखवलं Happy मागच्या सीझन ला मेघाचे कधी दाखवायचे नाहीत अशा टॅलेन्ट टास्क मधले परफॉर्मन्सेस. काल रेशम ची बिचुकले अ‍ॅक्टिंग सहीच. हिनाचा डान्स पण मस्तच. बाकी बरंच फा. फॉ केलं मी. अडथळ्यांचा टास्क मात्र आवर्जून पाहिला. हिना आणि शिव चा फिटनेस भारी आहे. शिवानी आता खूपच निष्प्रभ आणि लिंबूटिंबू वाटते कॉन्टेस्टन्ट म्हणून. काढा तिला नेक्स्ट वीक.

काल सुशांत ने म्हणलेली अनामिके ची व्याख्या कविता शीव आणी वीणा साठी होती असे वाटले.
बिचुकले साठी पण कविता तयार केली त्याने.
आसमंतात तारे लुकलुकले .
सातार्यात अवतरले अभिजित बिचुकले.
त्यांच्या मैत्रीला जे मुकले.
त्यांचे भविष्य फारच हुकले
आमचे भविष्य उमलले
आमचे मित्र अभिजित बिचुकले.
त्याला म्हणे काल त्यांच्या बरोबर रहण्यामुळे ही कविता सुचली. खरच इतके चांगले आहेत का ते Uhoh

शिव हिनापेक्षा त्या शिवानी, बिचुकलेला काढा. B B ला भार आहेत हे दोघे. मजा चाललीय दोघांची वर दादागिरी फुकाची.

शिव गेला तर ट्रॉफी सरळ आरोहच्या हातात द्या, त्याने मेन दोघांना उडवलं म्हणून.

काय माहिती शिव बाबत काय करतायेत.

रेवा, सुलू थँक्स.

Amupari अनामिका कवितेवेळी bb पण कॅमेरा त्या दोघांवर मारत होते.

वीणाने सिंधी भाषेतलं गाणं वगैरे तरी म्हणायचं, ती सिंधी मध्ये मध्ये बोलत छान किस्से सांगत असते शिवला, तिच्या छोट्या भाच्यांचे , मित्रांचे वगैरे. अनसीन अनकट वर बघितलं.

जाम सर्दीचा त्रास होत होता तर रुमाल, टिश्यू पेपर जवळ न ठेवता हाताने नाक पुसत होती, तेही बघितलं तिथे, किती विचित्र वाटत होतं, कोणी काही बोललं ही नाही तिला. पण तब्येत बरी नाहीये बहुतेक तिची.

Pages