मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

हो मला पण तसंच वाटतं, तो मुद्दाम उचकवण्यासाठी विणा शी भांडला, तो जे मुद्दे घेउन भांडत होता नेमकं त्याच्या उलट वागत होता. छोट्या छोट्या गोष्टींचा इश्यू करत नाही असं म्हणत होता
पण तेच करत होता की, शिवानी ने त्याला मस्त पैकी हँडल दिलं, बिग बॉसच्या प्रॉपर्टी चं नुकसान असं म्हंटल्यावर हा पण लगेच असं कसं असं कसं करून भांडणात हे मुद्दे आणले :कपाळावर हात मारणारी बाहुली:

हो पाहिले आताच. तिथे पुष्की -ऋतुजा चा पण राखी व्हिडिओ दिसला एक.
सोमि वर मेघा, सुशांत आणि रेशम घरात आल्याचे फोटो पाहिले. मेघाचा भयंकर ड्रेस आहे. बँडवाल्यांसारखे सोनेरी झिरमिळ्या लावलेला. रेशम तरी फार ग्रेट नाही पण जरा ठीक दिसतेय.

रेशम सुशांत मेघा घरात टास्क ही खेळनार आहेत. रेशम च्या टिम मध्ये नेहा शीव आहेत . सुशांत च्या टिम मध्ये वीणा हीना आणी मेघा च्या टिम मध्ये शिवानि आरोह आहेत. वीकेंड पर्यंत मुक्काम करणार वाटत पाहुणे.

आरोहनी आजपण शनिवारसाठी नोट्स काढल्या.
बाथरुम बळकवायच्या शिव नेहाच्या प्रयत्नांत मात्र तो चोरावर मोर ठरला असता. स्टिकर काढले नसते तर.

पण नेहा चा फॅन असलो तरी शिव गेममध्ये राहणे हीनापेक्षा जास्त डिझर्व करतो..... नेहा, शिव, वीणा आपल्याला टॉप थ्री मध्ये पाहिजेत Happy
(आणि शिववीणाच्या फॅन्स चे votes डिव्हाईड होउन नेहा जिंकावी Wink )>>>अगदी प्रत्येक ओळीला +१ स्वरुपभाऊ.

शिववीणाच्या फॅन्स चे votes डिव्हाईड होउन नेहा जिंकावी >>> +११११

तरी सुद्धा शिवला नुसत्या नॉमिनेशनपेक्षा जास्त शिक्षा व्हायला हवी असं पण वाटतंय.

तो बिचुकले कसा काय ठेवलाय?
असल्या वर्तनाचा(हाणामारी वगैरे) धिक्कार म्हणून तो पराग काढला. आता वरचे वाचून शिवला ( चावाचावी) काढायला पाहिजे. आणि बिचुकलेला सुद्धा.

तो माणूस काही न झाल्यासारखेच वागतो पाहिले गेल्या वेळच्या भागात. एकदम निर्ल्लज.
पराग पण एकदम विचित्र माणूस वाटतो , त्याचे ते रुपालीच्या प्रेमात असलेले विडिओ आणि खिचडी पाहून. एकदमच चक्रम आणि डेस्पो काईंड.

भयानक रद्दड झालाय हा सिझन, कितीवेळा तो निर्लज्ज बिचुकले ये-जा करणार आणि अशी काय एन्टरटेन्मेन्ट देतोय तो?
टास्क्स उत्तम प्रकारे खेळणारे माधव, केळ्या पब्लिक बाहेर आणि शिवानी-बिचुकले सारखे निकम्मे लोक फिनालेत , आता तर हिना/शिव पैकी एकाला काढणार पण बिचुकले शिवानी आहेतच Uhoh

मेघानी बरच वेट पुट ऑन केलय, त्यात काय विचित्रं ड्रेस दिला होता ! रेशमही तिच्या मानानी गुटगुटीत झाली आहे, सुशान्त चांगला दिसत होता.
रेशमला नेहा-शिव मिळाल्यानी बेस्ट टिम मिळाली आहे पण मेघाच्या प्रेझेन्समुळे तिला आणि तिच्या टिमला बरच फुटेज मिळालं.
उद्याचं टास्क चांगलं दिसतय, शिव वर्सेस हिना, मस्तं आहेत दोघं टास्कमधे.

अर्धा एपिसोड बिचुकले दिसलेच नाही . म कनफेशन रूम मधुन आले रात्री पाऊणे दहा ला. आणी कारण दिले काही तांत्रिकअडचणीमुळे बिचुकले 24तास घराबाहेर होते आणी आता पाहुणे म्हणून त्यांची परत entry झाली आहे.

हो मेघाचा मेकप आणि ड्रेस असा का होता! नॉर्मल कपडे घातल्यावर जरा सुसह्य झाले सगळे. रेशम आणि सुशांत आता जस्ट एंजॉय करायला आले होते असे वाटले. मेघा मात्र खेळ पूर्वीसारखाच सिरियसली घेत होती Happy बिचुकले आणि बिबॉ चे इक्वेशन धन्य आहे. कसले कॅज्युअली जातात काय येतात काय! काय विचार करून त्यांना ठेवलंय ते समजत नाही खरंच. त्यांची आणि शिवानीची पण कधीच रवानगी करायला हवी होती तिथून. तीही काहीही व्हॅल्यू अ‍ॅड करत नाहीये आता.

येस्स, आरोह डिसक्वालिफाय झाला. शिव खुष झाला असेल.

काल सगळे छान खेळले. शिवानी सरप्राईझिन्गली छान खेळली काल, मेघा आल्यामुळे असेल कदाचित.

नेहा आणि शिवानीमध्ये पुन्हा भाण्डण झाल टास्कमध्ये.

मेघा 'बिग ब्रदर' मध्ये जाणार आहे म्हणे. Biggrin

मेघा आणि रेशमने हिनाला चान्गला सल्ला दिला. मेघा हिनाला बिचुकलेपासून दुर राहा म्हणाली.

सुशान्तने विणा- शिवला गेम सम्पेपर्यन्त डिसटन्स ठेवा म्हणाला, मात्र मेघाने त्याच्या उलट सल्ला दिला विणाला. Lol

पाहुणे म्हणून त्यांची परत entry झाली आहे. >>>>> नशीब पाहुणे म्हणूनच बोलावल त्याला. रेशमला ओळखतो म्हणे. जिवलगा का कुठल्या सिनेमाच्या शुटवेळी अशोक शिन्दे त्याच्या घरात जेवला. रेशमच्या डावीकडच्या दोन दातान्ना टाके पडले होते त्यावेळी.

सगळे स्पर्धक शिव- विणाच्या बॉण्डिन्गविरोधात गेले. पण त्यान्चही म्हणण पटत. ते सारख सारख तोण्डात भरवण बघून इरिटेटिन्ग होत.

शिवची रोमॅण्टिक स्क्रिप्ट आवडली मात्र. Happy

बिचुकले विणावर उगाच ओरडला. मेघा आणि रेशमने त्याला झापल ते चान्गल केल. ह्याला म्हणतात वुमन पॉवर! नाहीतर शिवानी, बिचकुले ' सॉरी म्हणा' किती हळुवारपणे म्हणाली. एरवी इतरान्वर विनाकारण आवाज चढवत असते. नेहा आणि विणा तिच्यापेक्षा परवडल्या, बिचकुलेला त्या अजिबात भाव देत नाही.

सुशान्त बिचकुलेला ' मुलीन्ना तुझी लायकी काय असे बोलू नका' बजावत होता. मला त्यावेळी त्याचा स्मिताबरोबरचा, तसेच सईबरोबरचा झालेला इन्सिडण्ट आठवला.

मी पहिला सीझन पाहिला नव्हता, पण काल आणि परवा मेघाला पाहून ती डिझर्विंग विनर वाटली.

टास्कचे फायनल विनर अनाउन्स झाल्यावर शिवानीचं तोंड नेहमीप्रमाणे पडलं.

रेशम स्पर्धक म्हणून जितकी चिल्ल होती त्याच्या डब्बल चिल्ल पाहुणी म्हणून वाटली..... जिंकलो तर जिंकलो नाही तर नाही..... करु आरामात टाइप्स!

मेघाने नक्कीच पुट ऑन केलय!

"पासिंग द पार्सल" कसला इनोव्हेटिव्ह टास्क शोधून काढला राव बिग बॉस ने! .....
सलाम त्या कल्पकतेला Wink

मेघाचा गुलाबी नाईट ड्रेस बघून असे वाटले की मागच्या वर्षीचाच ड्रेस घेऊन ती आली आहे. बर्‍याच वेळा या ड्रेस मध्ये वावरायची. (ही प्रतिक्रिया माझ्या घरून आहे.)
एकदम बोअर होत आहे आता. केव्हा एकदा संपतेय असे झालेय.

बिग बॉस बिग बॉस एकून हा प्रकार ह्यावर्शीच पाहिला. हिंदी बघितलाच नाही म्हणून हा या वर्षीचा मराठी बघितला ते ही एखाद दुसरा आठवडा अधून मधून. पण इतका फालतु आणि गचाळ लोकांनी भरलेला, ना क्रिएअटीवीटी ना गूड एनटंटॅनमेंट.

पुन्हा बघणार नाही.

मेघा इज मेघा, तिच्या सारखे गेमच्या बाबतीत पॅशनेट कोणीच नाही Happy
सुशान्त रेशम मेघा इतके इन्व्हॉल्व्ह झालेच नव्हते .
मेघाने डोकं वापरलं , किचन तिचा फॉर्टे आहे, गार्डन एरीआ मधले अडथळे पार करणारे फिट मेंबर तिच्याकडे नव्हते , तिनी चतुराईने किचन घेतलं.
मेघा टास्क करतेच, त्यात एन्टरटेन्मेन्ट आणते,चायनिज कुकिंग बरोबर शिवानीचा चायनिज मेकप आयडीया भारी होती Proud
बाकी काही म्हणा या आठवड्याची बेस्ट परफॉर्मर हिना ! काय मस्तं खेळली सगळी टास्क्स आणि दिलबर दिलबर गाण्यावरचा डान्स , सुपरहॉट्ट !
शिवने आज मस्तं स्क्वॅट्स मारले आरोहला उचलून, काय सुपर्ब फिटनेस लेव्हल आहे :टाळ्या:
शिवानीने म्हंटलेली कविता संदीप खरेची होती का? यावेळच्या स्पर्धकांचं सगळ्यांचं मराठी चांगलं आहे, बिचुकले सोडून सगळ्यांनी टॅलेंट शो चांगला केला.

<मेघाने डोकं वापरलं , किचन तिचा फॉर्टे आहे, गार्डन एरीआ मधले अडथळे पार करणारे फिट मेंबर तिच्याकडे नव्हते , तिनी चतुराईने किचन घेतलं.>
काय टास्क असणार आहे, ते कोणत्या दोन टीम्स खेळणार आहेत ते अनाउन्स झाल्यावरच सांगितलं गेलं.

बाथरूम एरियानंतर गार्डन एरिया आणि मग कीचन आणि त्या प्रत्येक एरियासाठी त्या त्या पद्धतीचं टास्क हे आधी पासून (गेल्यावर्षीपासून) ठरलेलं असल्यास कल्पना नाही.

अंजु आणि mmmm एव्हिक्ट झाले का >>> मी वाचतेय हो. रोमात असते. सर्वजण छान लिहितायेत.

आमच्या शिवबाबाने कांड केलंय ना यावेळी. त्याला जास्त votes द्यायला लागतील.

वीणा मात्र चमकली ह्या आठवड्यात, task मध्ये शिव चुकला हे दाखवून नंतर शिवचा आधार होऊन समजावत पण होती.

एरिया मिळवायच्या task मध्ये एकही task न खेळता वीणाने चतुराईने बेडरूम मिळवली, bb ना हीच चतुराई अपेक्षित असावी. हीनाने पण चतुराईने hall चा ताबा मिळवला. पण चतुराई सुरुवात वीणाने केली हे नक्की. शिव हीना ने task मस्त केला. हीनाचे प्रयत्न चांगले होते आणि शिव जास्त चपळ होता. हीना अंडी शोधण्यात वेळ घालवत होती.

मेघा टीमने इनोवेटीव्ह स्वयंपाक केला, prezentation पण भारी होतं.

बाकी जे शिवने झोपाळ्यावर लिहिलं त्याची बोलणी उगाच वीणाला बसली आरोह आणि शिवानीकडून.

शिवानीला आल्यापासून हिनाला काढायचं होते, बघूया सक्सेस होते का. शिव हीना कोणालाही बाहेर न काढता सिक्रेट रूममध्ये पाठवा हवं तर.

शिव वीणा हीना वर शिवानी जाम जळते ते जिंकले कुठलाही task की हिचा चेहेरा पडतो.

कविता छान म्हटली शिवानीने, पण कवि मात्र सांगायला विसरली. सुशांतने मात्र आवर्जून कवि सांगून मग कविता म्हटली.

मेघा rocking. रेशम कुल, सुशांत पण बरा वाटला. रेशमने बिचुकलेची acting छान केली.

इमानदारीत विकेंडच्या डावात शिव वीणा लांब बसलेले तर सलमान खान समोर सारखा म मां नी त्यांचा जप केला मग त्यांनी वागायचं कसं. हे बघून शिवानी अजून जळली, तिच्या पोटात दुखलं तरी तिचाही उदो उदो केला म मां नी.

आता माझे पहिले तीन शिव नेहा वीणा पण परवा शिवने जो प्रकार केला त्यावरून त्याला विनर करतील की नाही काय माहिती.

नेहा आवडत नाही तरी दुसरी यावी असं वाटतं पण शिव पहिलाच यावा. काय माहिती यावेळी काय करतात. शिवला काढलं तर trp ची वाट लागेल. परत रिस्क bb घेतात का ते बघायचं.

धनुडीने खास विपु केली, शेवटी लिहिलंच.

अन्जू, वेलकम बॅक!
लिहीत रहा.
आज माझ्यासारखं एकाच प्रतिसादात वेगवेगळे मुद्दे सुटे सुटे लिहिलेत. आवडलं. Happy

Thank u भरत. रोज लिहीन असं नाही. पण काही वाटलं तर पोस्ट करेन.

तुमची ती पोस्ट आवडली, आरोहने यावेळीपण शनिवारसाठी मुद्दे काढले.

पण तो शनिवारची वाट बघत असेल >>> हे आवडलं.

बाकी शिव वीणा थिल्लरपणा करतात कधी कधी ते आवडत नाही पण त्यांचे bonding खरोखर सुरेख आहे. पूर्ण विक वीणाने शिवला खूप आधार दिला. हे बघून ते सातवीतलेच नाहीयेत फक्त, matured पण आहेत हे आरोहला सांगावं असं वाटलं.

बाकी आता शिवने जे केलंय त्यावरून काय होतं काय माहिती, त्याआधी मात्र शिव नेहा हेच पहिले दोन आहेत हे bb नी पण दाखवलं, राम रतन धन पायो गाण्यावर नाचवून त्याना आणि तेही शेवटी म्हणजे तोपर्यंत top २ हेच दोघे गृहीत होते.

म्युझिक रिअँलिटी शोमध्ये जस एखाद्या स्पर्धकाला स्टँडबायवर ठेवतात,तस हीनाला वोट्स कमी असतील तर ठेवाव,मग या वीअमध्ये दोघांनाच नॉमिनेट करुन पुढच्या शनिवारी वोट्स बघावीत,तोपर्यंत हीनाची वोटिंग लाईन बंद ठेवावी.

Pages