मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

हीना लाइव आली होती colors च्या fb page वर त्यात ती म्हणाली की शिवानी ने पोटात लाथ मारली आणि किशोरीने बघुन सद्ध ती ममा ना म्हणाली की m not sure... हे सगळ दाखवलं नाही एपिसोड मध्ये.. ना लाथ ना confession
खाली लिंक दिली आहे..त्यात आहे 19:00मिनीट नंतर

https://m.facebook.com/story.php?story_fbid=373550356616710&id=322629307...

हे खरं असेल तर हिनाने थयथयाट करायला हवा होता. आपोआप शिव शिवानी nominate झाले असते. ती असती घरात आणि शिवानी बाहेर. मुलाखत बघितली नाहीये अजून.

आता तर शिवानी पोचली पण फिनालेला, आता तर मला वाटायला लागलं की trophy शिवानीलाच देणार.

हिनाचा इन्टरव्यु नाही बघीतला अजुन, पण शिवानीने एकतर लाथ मारली नसावी किंवा चुकुन लागली असावी, नाहीतर लाथ खावून शांत बसणार्यातील हिना नक्कीच नाहीये. सदा न कदा साध्या जेवणा वरुन भांडणारी लाथ खाऊन गप्प बसली हे पटतच नाही.

बरेच लोकान्ना शिव आवडतो, पण का? हा मला प्रश्न पडलाय. एकतर त्याला धड बोलता येत नाही, टीआरपी दिला म्हणजे काय तर विणाबर लफडे ? नाही तर बळाचा वापर. सगळ्यात म्हत्वाचे म्हणजे चावला तो आरोहला , शि SSSमला तो विनर झालेला बिल्कुल आवडणार नाही. मांजरेकर त्याला वळु बोलतात ते योग्यच आहे

खरेतर विनर मटेरीअल तिथे फक्त शिवानी आहे, पण ती बाहेर जाऊन आलिये सो तिला फायनला नेतील पण विनर करणार नाहीत , आरोह पण अर्ध्यात आलाय. किशोरी महा डंब , महा चाटु बाई सो ती पण नको व्हायला. ऊरल्या नेहा आनी विणा, दोघी आवडत नाहीत तरी शिवानी नंतर ह्या दोघीच डिजर्व करतात, सो त्यांच्यातले कोणी ही झाले तरी ठीके

अरे बिग बॉस हा फुल स्क्रिप्टेड शो आहे . त्यावेळी किशोरीने शिवानीने हिनाला लाथा मारलेल्या पहिल्या होत्या त्या वेळी इनस्टंट ली ती बोलली पण होती पण शनिवारी मात्र बिग बॉस ने किशोरीला तंबी दिली " हा विषय निघाला तर मला काही आठवत नाही असं सांगायचं " संपलंच ना . किशोरीला कंपलसरी तसच सांगावेच लागतंय . शो मध्ये राहायचं ना ? शनिवारी काय बोलायचं /काय नाही कोणी कस वागायचं/ कस नाही . आणि एडिटेड करून फुटेज काय दाखवायच- काय नाही हे बिग बॉस च ठरवतात तिथेच विषय संपतो

परागच्या बाबतीत सगळेच जण सांगत होते मला यावर बोलायचं नाही नाही किव्वा परागच चुकलाय . का ? कारण बिग बॉस सर्वे सर्वा . त्यांच्या इंस्ट्रक्शन च्या विरोधी बोलून कोण स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार ? . या सगळ्या बिग बॉस च्या सूचना बाहेर पडलेल्या सदस्यांनी तंतोतंत पाळल्या आणि त्यावेळी खर काय घडलं समजलंच नाही . मी म्हटलं तस बिग बॉस ना शिवानीलाच विनर करायचा आहे निदान टॉप थ्री पर्यंत तरी न्यायचंच आहे . हे यातून आणि बऱ्याच प्रसंगातून सिद्ध होत . शिवानीला सावरून घे अशा बिग बॉस नेच नेहाला इंस्ट्रक्शन दिल्या होत्या असं शिवानीनेच परवा सांगितलं नाही का ? तेव्हा पासून शिवानी बिग बॉस ची लाडकी आहेच

शिवानीने लाथ मारली किंवा हीना + किशोरीने तसा आरडा ओरडा केला असेल आणि तो भाग दाखवला नसेल, तर यामागचे कर्ताकरविता बिग बॉसच आहेत.
आता हीना खरं बोलतेय की खोटं हे आपापलं जजमेंट.

हिना त्यावेळी टास्क सोडून रडत आत का गेली हे आता कळल. पण कारण सान्गताना तिने दाताला बरच लागल अस सान्गितल.

किशोरीताई तर हिनाने नॉमिनेट केल्यापासूनच खार खाऊन आहेत तिच्यावर. त्यात खाम्ब टास्कमध्ये हिनाने तिला कॅप्टन न करता नेहाला कॅप्टन केला, त्याचाही राग आहेच तिला. ' मला काहीच आठवत नाही' बोलणारच ना ती. किशोरीताई सध्या फेक वाटतात मला.

शिवानीने विणाला सुद्दा लाथ मारली होती चोर- पोलिसच्या टास्कमध्ये आणि वरुन बोलते की लाथा मारायला मी काय गाढव आहे का?

त्यांच्या इंस्ट्रक्शन च्या विरोधी बोलून कोण स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार ? . या सगळ्या बिग बॉस च्या सूचना बाहेर पडलेल्या सदस्यांनी तंतोतंत पाळल्या आणि त्यावेळी खर काय घडलं समजलंच नाही . >>>>>>>. अस जर असेल तर इंस्ट्रक्शन हिनालाही मिळाल्या असतील ना. मग आता हि शिवानीविरोधात का बोलली? तेव्हा का नाही बोलली?

कालचा एपिसोड बोरिन्ग होता. टास्कमध्ये मात्र नेहा, शिव, विणा, आरोह ह्यान्नी चान्गली उत्तरे दिली. बिचकुले काल नॉर्मल वाटत होता टास्कमध्ये. बहुधा माउथवॉशचा परिणाम असेल. Biggrin माउथवॉश नेहमी घेत जा म्हणाव.

त्या माउथवॉशवरुन इतरान्चे रिएक्शन्स भारी होते.

हा सीजन बघणं कधीचाच सोडलंय, पण भरत, अंजू, सुलु८२ यांच्या पोस्ट मस्त वाटतात वाचायला. थँक यु मंडळी, माझा दिड तास वाचवल्याबद्दल...
मला या सगळ्यांमध्ये बाप्पा सगळ्यात जास्त आवडायचा. तो गेल्यापासून सीजन मध्ये मजा नाही...

त्यांच्या इंस्ट्रक्शन च्या विरोधी बोलून कोण स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार ? . या सगळ्या बिग बॉस च्या सूचना बाहेर पडलेल्या सदस्यांनी तंतोतंत पाळल्या आणि त्यावेळी खर काय घडलं समजलंच नाही . >>>>>>>. अस जर असेल तर इंस्ट्रक्शन हिनालाही मिळाल्या असतील ना. मग आता हि शिवानीविरोधात का बोलली? तेव्हा का नाही बोलली? >> तिच्या इंटरव्हू मध्ये ती म्हणाली आहे ना मी त्याचा इशू केलाहि असता पण केला नाही कारण त्या माणसाच्या इमेजवर येत होत म्हणून . मला तिचा इमेज खराब करायचा नव्हतं . कुठल्या माणसाच्या ? वरती ती म्हणते मला शिवानीचा इमेज खराब करायचा नव्हतं .म्हणून जरी तिने पोटात लाथ मारली तरी मी त्याचा इशू नाही केला

किशोरीताई तर हिनाने नॉमिनेट केल्यापासूनच खार खाऊन आहेत तिच्यावर. त्यात खाम्ब टास्कमध्ये हिनाने तिला कॅप्टन न करता नेहाला कॅप्टन केला, त्याचाही राग आहेच तिला >> मग ती ताबडतोब हीनाला शिवानीने लाथ मारली तेव्हा लाथ मारली म्हणून का ओरडली असती ? . गप्पच बसली असती

मी हल्ली एपिसोड बघत नाही पण वरचं वाचून हीना मेंटल वाटली.
लाथा तिला शिवानीने मारल्या, मग ती किशोरीला कशाला लक्ष्य करत आहे? टास्कच्या वेळी किशोरी तिच्या बाजूने बोलत, ओरडत होती ना? मग तेव्हा हीना का गप्प बसली? इतर वेळी काहीपण फालतू गोष्टीवरून कटकट करत असायची. मग कोणी लाथा घालणं हे तर बिग डील होतं. तिची काय strategy त्या मागे होती तिलाच ठाऊक. त्यावेळी नॉमिनेशन व्हायचे होते म्हणून गप्प बसली असावी. मग नंतर ५-६ दिवसांनी थेट मांजरेकरसमोर किशोरीच्या खांद्यावर बंदूक का? निदान हिनाने तिला आधी विश्वासात घेऊन सांगायचं की मी हा टॉपिक बोलणार आहे. आणि आधी का गप्प बसली हे पण सांगायचं. एकूणात किशोरी या दोन भांडखोर विचित्र fickle minded बायकांच्या भांडणात पडली नाही हे योग्यच झालं.
आणि तसंही किशोरीला मध्ये घेण्याचं कारणच नव्हतं. ५० कॅमेरा आहेत तर साक्षीदार कशाला पाहिजे? हीना फक्त 'पूर्ण फुटेज दाखवा' इतकं बोलू शकत होती. पण तिला बहुधा किशोरीला बोलतं करून शिवानी आणि किशोरीचं भांडण लावून जायचं असावं. किशोरीने तिला नॉमिनेशनपासून वाचवलं नाही याचा राग असेल.

मला त्या लाथाचा पॉइन्ट मधे तथ्य नाही वाटले फारसे. वर कुणीतरी लिहिलेय तसेच वाटले. हिना एरव्ही तेच तेच तेच भांडत बसते तास न् तास भाकरी आणि केक वरून आताच तिने सुवर्ण संधी घालवली कशी?
काल बिचुकलेंनी छान केला टास्क Happy शिवानीने नेहाला सपोर्ट केला काही बाबतीत आणि काही बाबतीत विरुद्ध मुद्दे मांडले. ती आणि वीणा पण हुषारीने खेळली असेच म्हणेन मी. नेहाने पण छान युक्तीवाद केला.
या पॉइन्ट ला नेहा सगळ्यात डिझर्विंग आणि शिव हा पुन्हा एकदा निव्वळ बैल वाटत आहे. मला वोट्स देता येत नाहीत, असती तर नेहाला दिली असती!

Submitted by स्वरुप on 19 August, 2019 - 23:08 स्वरुप यांच्या या पोस्टला संपूर्ण अनुमोदन!

तसेच मैत्रेयीच्या वरच्या पोस्टशी पण सहमत!

शिवानीची री एंट्री झाली नसती तर नेहाच्या टास्कमधल्या आणि इन जनरल क्वालिटीज अजून अधोरेखित झाल्या असत्या.

मागचे तीन आठवडे सोडले तर नेहा बहुतेक वेळा नॉमिनेट झालेली आहे.

शिवचं बाहेरचं फॅन फॉलॉइंग नेहापेक्षा खूप जास्त आहे. तेवढ्यावरच विनर ठरणार असेल तर मग नाइलाज आहे. पण घरातील १०० दिवसांचा टास्क व्यतिरिक्त वावर, घरकामांतील सहभाग आणि वैचारिक क्लॅरिटी वगैरे गोष्टी विचारात घेतल्या तर नेहा सर्वात डिझर्वींग आहे असं मला वाटतं.

नेहा, गो गर्ल! माझ्यासाठी कोणीतरी नेहाला व्होट करा.

अरे हो, बिचुकल्याबद्दल राहिलच लिहायचं, तो कसाका असेना, त्या माणसाकडे जबरी प्रेजेन्स ऑफ माइंड आहे नक्की , काल मस्तं हँडल केला त्यानी खटला !
शिव खरोखर बैलबुध्दी आहे, अज्जिबात आरोप-प्रत्यारोप नाही जमले, एक मुद्दा खोडून काढता येत नाही कि दुसर्यांवर आरोप करता येत नाहीत. सगळं फुटेज शिवानी आणि वीणाने घेतलं, हा येडा एक तर लहान मुला सारखा गुळमुळीत बोलतो ‘ती रुसल्यावर मला आवडतं तिला मनवायला‘ टाइप नाहीतर आरोप मान्य करतो, आय डोन्ट थिंक तो डिझर्विंग विनर आहे.
मागच्या वर्षी आरोप प्रत्यारोप टास्क एकदम शान्तता कोर्ट चालु आहे लेव्हलला टॉर्चरींग झाले होते.
आस्ताद , पुष्कर, सई कोणी त्यांच्यापरीने कमी ठेवली नव्हती मेघाला डिमिटिव्हेट करायला, अर्थात तरी मेघा ही मेघा आहे, सरव्हाइव्ह केले तिने शेवटचे २ आठवडे एकटी पडून.

बाय द वे, व्होटींग साठी कुठली वेब साइट ? कोणतं अ‍ॅप ? वापरायच? मी भावाला व्होटींग करायला सांगितलं आहे. पण तो हा शो बघत नाही. तेव्हा त्याला डीटेल्स हवे आहेत जे मलाही माहित नाहीत. तर प्लीज मदत पाहिजे.

मला तर कोणताच स्पर्धक डीझ्र्वीँग वाटत नाही.हो दिपांजली बिचुकले च विनर झाले असते जर पाहूणे नसते तर.

तिकीट टु फिनाले एक च असते ना यावेळी दोन कसे काय. मागच्या सीज़न ला सई ला मिळाले होते का.? मला आठवत नाहिये. मागच्या वेळी तिकीट टू फ़िनाले चे ते बॉक्स मध्ये बसायचे टास्क cancel केलेले.

Neha jinknar ahe.don number var bichukale tin number var shivani paise gheun baher padel.sagal fixed ahe.audience che votes hi afava ahe

पुष्करला मिळालेलं.

अजून इथे सांगितलं नाही पण voting त्या दोघींना होतंय.

मागच्यावर्षी चांगले टास्क तरी होते, यावेळी त्या दोघींना मिळावं ही योजना.

ट्रॉफी शिवानीलाच मिळणार, उगाच बघतेय मी वेळ घालवत Lol

Pages