Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35
हाय फ्रेण्डस,
मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.
दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.
शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.
शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.
सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
काल किशोरीसमोर बिचुकले बरा
काल किशोरीसमोर बिचुकले बरा म्हणायचा अशी वेळ आली... दिलेला रोल धड करावा ना माणसाने..... काय क्रिॲटीव्हीटी दाखवायची ती न्यूज रिडींग मध्ये दाखवा ना!.... किती काय काय करता आले असते तिकडे पण ते सोडून न्यूज रिडर/रिपोर्टरच न्यूज बनवत फिरत होत्या..... उगाच सोन्याची किटली काय, जादूचा सोफा काय आणि स्वतःविरूध्द उपोषणच काय? अरेरेरे!
बाकी पण लोकांनी चांगला चमकायचा चान्स घालवला..... एक न्यूज चालू असताना जरा डोके वापरून याहून भारी न्यूज कशी बनवता येईल याचे प्लॅनिंग करता आले असते.... तर यांची आपली चालू न्यूजमध्ये घुसखोरी सुरु!
बिग बॉस इतकीच त्यातल्या स्पर्धकांमध्ये सुद्धा कल्पकतेची वानवा आहे!
आरोह ची हिम्मत नाही
आरोह ची हिम्मत नाही बिचूकलेंना काही बोलण्याची. आणि प्रेक्षकांना जेवढं माहिती आहे ते आतल्या लोकांना नाही माहि. शिवानी देउ शकली असती बिचूकले ची न्यूज
ते बिचुकलेबद्दल काहीही
ते बिचुकलेबद्दल काहीही कुठल्याहीप्रकारे सांगायला परमिशन नसेल.
मला तर वाटतं bb ना सगळं माहिती असून त्याला घेतलं आहे, जर असं नसतं तर त्याला सोडवण्यासाठी वकील वगैरे दिला नसता आणि सर्वाना manage केलं नसतं.
बि न डो क. हा एकच शब्द म्हणता
बि न डो क. हा एकच शब्द म्हणता येईल आज हे लोक जसा टास्क खेळले त्याला. मी तर फा. फॉ करून ५ मिनिटात एपि. संपवला. शून्य मार्क मिळालेत सगळ्यांना. कशाला दिलं यांना लक्झरी बजेट ?!!
परागचा हा विडिओ खुपच वायरल
परागचा हा विडिओ खुपच वायरल होतोय,
https://youtu.be/uek0CAYStQQ
हो परागचा interview खूप
हो परागचा interview खूप चांगला आणि महत्वाचा आहे. सर्वांनी नक्कीच बघा. बऱ्याच गोष्टी क्लियर होतात.
बिग बॉस बद्दल disgust वाटली सर्व ऐकून. बिचुकले प्रकरण तर अगदीच bizarre आहे.
परागचं एका बाबतीत कौतुक वाटलं की निदान हे सगळं झाल्यावर तो स्वतःचा गुन्हा कबूल करत आहे. पण इतरानाही शिक्षा करा, टाळी एका हाताने वाजलेली नाही हा मुद्दा बरोबरच आहे. खरंतर क्रिएटिव्ह टीमने स्वतः माफी मागायला पाहिजे कारण त्यांनी खूप आधी मध्ये पडायला पाहिजे होतं. आणि नेहावर कारवाई करायला हवी होती कारण तिला कन्फेशन रूममध्ये बोलावून बजावलं होतं तरी तिने बळाचा वापर, चुकीच्या जागी स्पर्श करणं थांबवलं नाही.
पराग प्रकरणात आरोपी असलेल्यापैकी वैशाली, माधव, केळकर बाहेर पडले. आता हीना गेली तर फक्त नेहा राहिल. खरंतर ती तितकीच गुन्हेगार आहे. परागला सर्व प्रकारे टॉर्चर करणं , पराग शिव दोघांना नको तसे स्पर्श करून molest करणं आणि नंतर सोयीस्कर वुमन कार्ड खेळणं. अशी क्रूर आणि चीप व्यक्ती बिग बॉसची विनर बनायला नको खरं तर.
शिवबद्दल पराग चांगलं बोललाय. तो आहेच विनर मटेरियल पण चावण्याचा प्रकार केल्यानंतर तोही deserving वाटत नाही.
आता किशोरी मोस्ट एलिजीबल किंवा मग वीणा इव्हन आरोह चालेल विनर म्हणून.
मी अगदीच बघायचं सोडलंय पण सोमि वर buzz वाचलं जातं त्यातही आता एकूणच पब्लिक वैतागलेलं आहे.
सुरुवातीच्या सीझनने अपेक्षा वाढवून ठेवणं आणि दुसरा सीझन पडणं हा आता नॉर्मच झालाय.
हं. बिग बॉस आणि मांजरेकरांवर
हं. बिग बॉस आणि मांजरेकरांवर आरोप केलेत. हे सगळं इथे लिहिलं गेलंच आहे. परागला जास्त वेळ सिंहासनावर बसवलेलं. शारीरिक इजा करू नका असं मध्ये सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं.
त्याला पुन्हा आत पाठवायचं नाटक केलं गेलं, हे खरं असेल, तर बिग बॉस इज अ बिग चीटर.
शारीरिक इजा प्रकरणी सगळ्यांना नियम एकसारखे लागू केले नाहीत. (अ,के. ने डोकं मारणे, वीणा- शिवानी मारामारी)
जर परागला याबद्दल बोलायला बंदी होती (असं तो म्हणतोय ) तर एव्हिक्ट झालेल्या इतरांनाही त्याच्याबद्दलही कोणतीही निगेटिव्ह कमेंट करायला बंदी असायला हवी होती. (रूपालीचं बाहेर आल्यानंतरचं वक्तव्य, ज्याबद्दल इथे वाचलं)
या प्रकरणात परागच्या बाजूने जे वाटत होतं , ते आणखी पक्कं झालं. मी परागचा सपोर्टर किंवा फॅन नाही. पण या घटनेत त्याच्यावर अन्याय झाला, असं मात्र नक्कीच वाटतं. तसंच बाहेर पडल्यावर हे लोक काय करतात याबद्दल कुतूहल वाटण्याइतकं कोणी आवडलेलंही नाही.
पराग काय करतोय, ते इथेच वाचायला मिळत्ण, बिग बॉसमध्ये त्याच्यावर अन्याय झाला, असं त्याला वाट्त असेल, लोकांचा पाठिंबा मिळत असेल, तर ती लोकप्रियता कॅश करण्यासाठी त्याने बिग बॉसचा वापर करणं हे बिग बॉसला योग्य उत्तर आहे.
नेहा न आवडण्याचं हे मुख्य कारण आहे. त्यावेळी तिला सांगितलं होतं की शारीरिक इजा करू नका. आणि बाहेर येऊन तिने सांगितलं की आम्ही अजिबातच (तिचा आवडता शब्द) शारीरिक इजा करत नाही. टास्कच्या दरम्यान तिचा लागणारा आवाज, बॉडी लँग्वेज यांत काहीही फरक पडलेला नाही. मेघा & कं आलेली असताना सुद्धा हे असंच होतं. टास्क संपला , बझर वाजला, आता सोड हे तिला नेहमी सांगावं लागतं.
आवाज थोडा कमी आलाय कारण समोरचा माणूसही तेवढाच आवाज लावू शकतो हे कळलंय आणि माधव आणि शिवानीने पाठीवर केलेले वार.
आपल्या मर्यादा सोडून केलेल्या वा गण्याबद्दल बहुतेकांना सॉरी म्हणायला लागलंय आणि त्यात बदल करावे लागलेत. अपवाद - नेहा आणि वैशाली. त्या मांजरेकरां समोर सॉरी च्या चवल्या टाकायच्या. नेहा अभिनेत्री असल्यामुळे किंवा तेव ढ्यापुरतं जेन्युइन वाटेल इतपत. पण मग ये रे माझ्या मागल्या.
ज्यांना हा शो voyeurism साठी आव डतो, त्यांच्यासाठी ती आदर्श खेळाडू असूच (हा ही तिचा आवडता शब्द) शकते.
शिवानी - बिचुकले बद्दल तो जे म्हणाला ते इथे अनेकांनी लिहिलंच आहे.
नेहा न आवडण्याचं हे मुख्य
नेहा न आवडण्याचं हे मुख्य कारण आहे. त्यावेळी तिला सांगितलं होतं की शारीरिक इजा करू नका. आणि बाहेर येऊन तिने सांगितलं की आम्ही अजिबातच (तिचा आवडता शब्द) शारीरिक इजा करत नाही. टास्कच्या दरम्यान तिचा लागणारा आवाज, बॉडी लँग्वेज यांत काहीही फरक पडलेला नाही. >>> हम्म्म, खरं आहे आणि bb यांनीही तिने न ऐकून खेळ थांबवला नाही. त्यावेळी म मां पण फार वरवर बोलले तिला.
परवा तिचा मस्त पचका रेशमनेच केला, हारूनही किती दादागिरी करत होती. पण हल्ली शिवानीची दादागिरी, आवाज तिच्यापेक्षा जास्त झाल्याने मला कधी कधी ती सुसह्य वाटते. पण ती जिंकू नये असंच वाटतं.
वीणा शिवानी, अ के आणि आत्ता शिव हे सर्वच task मध्ये फिजिकल झालेत पण ह्यांना शिक्षा नाही मिळाली बाहेर जाण्याची, उलट शिवानीला तर रेड कार्पेट घातलं. परागने कदाचित अति केलेय ते सांगितलं अथवा दाखवलं जात नाहीये पण त्याला instigate करणारे आणि प्रतिकार म्हणून मारहाण करणारे आणि पहिले bb हे पण दोषी खरंतर. म्हणून हे प्रकरण कोर्टात नेणार नाहीत.
काल काय तो गोंधळ... खुप बकवास
काल काय तो गोंधळ... खुप बकवास झाला न्युज चा खेळ..
पराग चुकला होता याची खात्री
पराग चुकला होता याची खात्री होतीच.... त्याच्या तोंडाने त्याने ते अजुन एकदा कबूल केले ते बरे झाले..... पण त्याबरोबर जो फाफटफसारा लावला तो अनेक लोकांनी अनेक वेळा अनेक ठिकाणी बोलून झालेला आहे!
लोकांनी एखादा चांगला खेळतोय म्हणणे वेगळे आणि मी स्वतः चांगले खेळत होतो.... strong player होतो म्हणून सर्वांनी माझ्याविरुद्ध कट रचून मला बाहेर काढला म्हणणे गोष्ट वेगळी..... पराग खरच विनोदी आहे.... बघितल तर त्या आधीचे काही टास्क अगदीच फुसका खेळला होता तो आणि त्यातून खुर्चीच्या टास्कमध्ये शिव आणि किशोरी दोघेही बसून राहील्यामुळे परागसाठी न उठणे अगदी प्रतिष्ठेचे झाले होते!
समोरचा बंदूक रोखेल तर मी नाही बंदूक चालवणार का? वगैरे युक्तिवाद तर अगदीच बाळबोध होते
बाकी ती वैशालीबद्दलची त्याची कॉमेंट पण त्याचा स्वतबद्दलचा सुपिरीअरीटी कॉंप्लेक्स दाखवते.... अगदीच नाही आवडली ती कॉमेंट!
वैशाली आणि केळ्या बाहेर गेल्यानंतर "माझ्या फॅन्सनी त्यांची विकेट काढली" असल्या पोस्टी हा माणूस टाकत असेल तर आता नेहा ची विकेट काढण्यासाठी टायमींगवर हा माणूस interview देत आहे अशी शंका यायलाही जागा आहे!
त्याने केलेल्या गुन्ह्याला शिवानी-वीणा मध्ये झालेल्या झटापटीशी, किंवा शिव नेहाच्या अंगावर पडला त्याच्याशी किंवा अगदी शिव आरोहला चावला त्याच्याशी कंपेअर करतानाचे त्याच्या फॅन्सचे युक्तिवाद ऐकले/ वाचले होते पण तो स्वत: जेंव्हा या सगळ्या गोष्टी एकाच तराजूत तोलताना दिसतो तेंव्हा सोशल मिडीयाने तयार केलेल्या बुडबुड्यात तो जगतोय याची खात्रीच पटते!
असो.... त्याची भडास एकदाची काढली त्याने बाहेर..... Now he can focus on his real life better and its good for him!
बाकी चॅनेलची आणि प्रॉडक्शन हाऊसची या सगळ्यावर प्रतिक्रिया काय असेल ते बघायला आवडेल!
स्वरूप>+1111 सायको येडछाप
स्वरूप>+1111 सायको येडछाप वाटतो तो , बेसिकली एवढया लवकर आणि अशा पद्धतीने झालेलं एविक्शन तो अजून पचवू शकला नाहीये. एकूण सीजनच भम्पक.
वैशाली आणि केळ्या बाहेर
वैशाली आणि केळ्या बाहेर गेल्यानंतर "माझ्या फॅन्सनी त्यांची विकेट काढली" असल्या पोस्टी हा माणूस टाकत असेल >>>>> अशा समजुतीत आहे का पराग? ह्या वरुन टिटवी ची गोष्ट आठवली. एक टिटवी पाय वर ( आकाशा कडे करुन )झोपलेली , तिला सगळे जण सांगत होते कि बाई सरळ हो आता कितीवेळ अशी उलटी राहाणार ? तर ती म्हणे कि हे आभाळ मी माझ्या पायावर तोललय, मि सरळ झाले तर आभाळ खाली पडेल की .

असते अशी काही लोकांची गैरसमजूत .
पराग जर नेहा वैशाली केळकर हे
पराग जर नेहा वैशाली केळकर हे खुर्ची सम्राट मध्ये त्रास देत होते म्हणून उठला असता तर आज विनर झाला असता. असेही ते टास्क जिंकून त्याला इतके काय मिळनार होते. चीडून नेहा ला कानाखाली मारल्या मुळे तो गेम मधूनच बाहेर गेला. आता काय उपयोग बोलून.
मला वाटतं त्याने जास्त
मला वाटतं त्याने जास्त काहीतरी केलंय, एक कानाखाली मारली असती तर एवढं काढलं नसतं. एकंदरीत तो त्या आठवड्यात फ्रस्ट्रेटेड होता, आपण जाणार हे गृहीत धरुन बसलेला. त्यात हा टास्क म्हणजे कितीही त्रास दिला तरी आपण करणार असं करुन करत होता. शेवटी त्याला खेचलं का ढकललं असंच दिसलं टीव्हीवर त्यामुळे त्या रागात त्याने जास्त नक्कीच केलं असावं.
बरं ज्या हिनानेही त्याला त्रास दिला टास्कमधे, आता तिच्यासाठीच वोटींग केलं त्याने. शिवतर चांगला वागलेला त्याच्याशी. त्याचे काही फॅन्स त्याचं ऐकून वोटींग करतात. काहींनी मात्र स्पष्ट लिहीलंय, हे आवडलं नाही, म्हणजे हीनाला वोटींग केलं ते पटलं नाही काहींना.
बघुया आता उद्या काय होत ते.
बघुया आता उद्या काय होत ते. उद्या जाम trp मिळणार.
शिवला वोटींग थोडं का होईना
शिवला वोटींग थोडं का होईना जास्त आहे असं समजलं आहे. पण जेव्हा अंतर वोटींगमधे कमी असतं तेव्हा मेकर्स निर्णय घेऊ शकतात हवा तो असं पण ऐकलं.
मला वाटतं त्याने जास्त
मला वाटतं त्याने जास्त काहीतरी केलंय, एक कानाखाली मारली असती तर एवढं काढलं नसतं. एकंदरीत तो त्या आठवड्यात फ्रस्ट्रेटेड होता, आपण जाणार हे गृहीत धरुन बसलेला. त्यात हा टास्क म्हणजे कितीही त्रास दिला तरी आपण करणार असं करुन करत होता. शेवटी त्याला खेचलं का ढकललं असंच दिसलं टीव्हीवर त्यामुळे त्या रागात त्याने जास्त नक्कीच केलं असावं.+++१११११
सुरेखा पुणेकरांनी एका interview मध्ये असं सांगितलं की, खुर्ची च्या टास्क च्या आधी जे परागच भांडण झालं होत सगळ्यांशी त्यावेळी पराग असं म्हणालेला की रागाच्याभरात मी सुरा खुपसीन एखाद्याच्या पोटात आणि बाहेर पडेन . ह्या वरून तो किती फ्रस्ट्रेटेड होता याची कल्पना येते.
बिग बॉसने त्याच्या मानसिक स्थिती पुरेपूर उपयोग करून घेतला . अर्थात असा उपयोग करून घेवू देणारा तो महामुर्ख.
स्वरूप आणि भरत यांच्या पोस्टला पूर्ण अनुमोदन.
त्यातल्या त्यात शिव जरा विनर म्हणून ओके वाटतोय . वासरात लंगडी गाय शहाणी टाईप्स.
भंपक, फडतुस सगळे शब्द कमी
भंपक, फडतुस सगळे शब्द कमी पडावे इतका बंडल एपिसोड!
किशोरी ही सर्वात बिनडोक, स्पाइनलेस, डंब, सुमार काँटेस्टन्ट आहे, अजिबात लायकी नाही १३ व्या आठवड्यात जायची त्या बाईची !
कसलं बकवास न्युज रिडींग आणि काय ते सिलेक्शन बातम्यांचं, किशोरी हॅज लॉस्ट इट!
खरच असले टास्क पाहिले कि वाटतं कि एकाचीही लायकी नाही ट्रॉफी घ्यायची , गुंडाळा सिझन आणि ट्रॉफी पुन्हा मेघालाच द्या
त्यातल्या त्यात शिव जरा विनर
त्यातल्या त्यात शिव जरा विनर म्हणून ओके वाटतोय . वासरात लंगडी गाय शहाणी टाईप्स.
<<
मी नेहमी ‘वासरात लंगडा वळु’ म्हणते त्याला
माझ्यामते शिवला थोडी का होईना
माझ्यामते शिवला थोडी का होईना जास्त वोटस असतील आणि एलिमिनेशन असेल तर हिनाला काढावं आणि शिवला ठेवावं.
शिवानीने राखी बांधली आणि नंतर
शिवानीने राखी बांधली आणि नंतर लग्न केलं आरोहशी...... जबरदस्त कल्पकता..
बिबॉचं टास्क वाचणे काम शिवकडे
बिबॉचं टास्क वाचणे काम शिवकडे होतं , याला ४ वाक्यं वाचता येऊ नयेत, ततपप करत होता, साधे शब्द वाचता येत नाहीत ?? वाक्यावाक्याला अडखळत होता
शिवानीने राखी बांधली आणि नंतर
शिवानीने राखी बांधली आणि नंतर लग्न केलं आरोहशी...... जबरदस्त कल्पकता.. >>>
ह्यावर कुठल्यातरी vloggerने पण रात्री दोन फोटो पोस्ट केले, आधी रक्षाबंधन मग लग्न.
बाकी परागच्या बाबतीत
बाकी परागच्या बाबतीत स्वरुपच्या वरच्या पोस्टला अनुमोदन.
तो इंटरव्ह्यु पाहून मला तरी त्याच्याबद्दल कसलीही सिंपथी नाही, त्याच्यावर अन्याय वगैरे मुळीच झाला नाहीये, हि डिझर्व्ड व्हॉट हि गॉट , जेलमधे गेला नाही हे त्याने नशीब समजावं.
सलमान खानने सांगितलं होतं कि फक्तं शो मधून हाकललं इतकीच शिक्षा असेल असं समजु नका, बिबॉ घरात पोलिस उचलून नेतील आणि जेलमधे टाकतील धक्काबुक्की केलीत तर.
वैशालीच्या बाबतीत केलेली कॉमेंट तर अतिशय वाईट, हा माणुस विकृत आहे !
शिवला आज जबरदस्त ओरडा पडायला
शिवला आज जबरदस्त ओरडा पडायला हवाच आहे, त्याने जे केलं त्याचा निषेधच. तरीही तो जाऊ नये असं मनातून वाटतंय.
बिचुकलेंना काढून या दोघांना
बिचुकलेंना काढून या दोघांना ठेवतील.त्यांचा पाहुणचार बास झाला आता,किळस वाटते आता याला पाहिल्यावर.
हो ना. त्या वीणाला पण उगाच
हो ना. त्या वीणाला पण उगाच बोलला अर्थात डाव त्याच्यावरच उलटला.
त्या शिवानीला पण काढा. उगाच दादागिरी करत फिरते. तो आरोह पण रडतो सारखा आणि इंस्टीगेट करत असतो, शिव वीणावर दोघे जाम जळतात. पण आरोह चालेल पुढे आधी शिवानीला काढा.
पहिला पराग चा इन्टरव्ह्यू !
पहिला पराग चा इन्टरव्ह्यू ! अत्यन्त सिक आणि डिल्यूजनल माणुस आहे पराग हे सिद्ध झालं! वर स्वरुप आणि डीजे च्या मताला अनुमोदन.
वैशालीबद्दलची कमेन्ट >> अत्यन्त डिसगस्टिंग मेन्टालिटी.
एक तर तो एपिसोड दोन दोन दा मुद्दाम पाहिला तरी त्याला शारिरीक इजा वगैरे करत असल्याचे वाटले नव्हते. अनॉयिंग जरूर होते. पण तोच टास्क होता. आणि आधीही सगळ्या टास्क मधे पराग पळपुटाच निघालेला आहे. आणि सगळ्यात कहर म्हणजे त्याला जर कसली का होईना पण इजा होतेय असे वाटले तर उठायचे ना मग तिथून. ते त्याने नाही केले. हिंसा केल्याचे प्रकरण अंगावर शेकल्यावर केलेला कांगावा वाटतो तो. पब्लिक ला काही न दाखवल्याने त्यांनी अफवा पसरवल्या आणि पराग ने त्या बहेर पडल्यावर सोमि वर वाचून त्याचे एक पॅकेज करून समोर ठेवल्या सारखे वाटते.
थोबाडित मारण्याव्यतिरिक्त अजूनही काहीतरी केले >> तो म्हणतोय की वैशालीला 'सेल्फ डीफेन्स' मधे ढकलताना तिच्या ब्रा चा स्ट्रॅप मधे त्याचा हात की बोट अडकले म्हणे. तिने त्याचे भांडवल केले असे त्याचे म्हणणे आहे. तो डिल्यूजनल असल्यामुळे हेच खरे असेल असे नाही. किंवा असले तरी दिसायला वेगळे दिसू शकतेच. त्यामुळे केळ्या , माधव ने त्याला लाथा घातल्या असतील तर त्यात नवल नाही वाटत मला. वर म्हणतो असे काही करायचे तर "वैशाली"सोबत का करेन?? असली हीन कमेन्ट त्याला सपोर्ट करणार्या लोकांना खटकली नाही का ??? मला तर बिबॉने त्याच्यासोबत केले ते योग्यच वाटले. आणि हो, तेव्हा त्याला संधी दिली कटघर्यात बोलावून आणि घरात जाऊन बाजू मांडायला तेव्हा तर त्याने हे असे काहीच सांगितले नव्हते! असे चुकून बोट अडकले वगैरे असते तर ते त्याला स्प्ष्ट करता आले असते घरात गेला असताना. तेव्हा तर कुणाची धड माफी पण मागितली नाही त्याने. आल्या आल्या आधी उगीच रुपाली आणि किशोरीकडे गेला आणि फालतू बडबड केली. त्यामुळे हा सगळा सो कॉल्ड खुलासा एक कुक्ड आफ्टरथॉट असण्यची शक्यता जास्त वाटते.
स्वरुप, डिजे, मैत्रेयी
स्वरुप, डिजे, मैत्रेयी ह्यान्च्या परागबद्दलच्या पोस्टीशी सहमत.
शिवला आज जबरदस्त ओरडा पडायला हवाच आहे, त्याने जे केलं त्याचा निषेधच. तरीही तो जाऊ नये असं मनातून वाटतंय. >>>>>>>> ++++++११११११११ परागने आणि नेहा, वैशालीने जे काही त्या टास्कमध्ये केलय त्या तुलनेत शिवची चूक माइल्ड आहे. त्याआधी आरोहने त्याची मान आवळली होतीच की.
कालचा टास्क बकवास होता. फक्त शिव, नेहा च्या बातम्या ठिकठाक होत्या.
बिचकुलेला काल बरच पळायला लावल टास्कच्या निमित्ताने. चॅनेल एकेक पैसा वसूल करुन घेताहेत वाटत त्याच्याकडून.
ह्या माणसाला आपल्यापेक्षा सिनियर अभिनेत्रीसमोर कस बसायच हे सुद्दा कळत नाही. शी! कसा पाय फाकून बसलेला किशोरीताईसमोर.
त्यासुद्दा त्याला काही बोलल्या सुद्दा नाहीत.
बिबॉचं टास्क वाचणे काम शिवकडे होतं , याला ४ वाक्यं वाचता येऊ नयेत, ततपप करत होता, साधे शब्द वाचता येत नाहीत ?? वाक्यावाक्याला अडखळत होता >>>>>>>> टास्क रोमन मराठीमध्ये लिहिलेले असतात का? आरोह त्याला हसत होता गालातल्या गालात. त्यालाही वाचता येत नाही टास्क.
हिनाने कुणालाच राखी बान्धली नाही. मला तिने बिचुकलेला राखी बान्धलेल आवडल असत.
विणाने बिचुकलेचा माईक लपवला ते मजेशीर होत.
किशोरी सफेद सलवार कमीजमध्ये. हिना गुलाबी क्रॉप टॉप आणि ब्लॅक पॅण्ट मध्ये छान दिसत होत्या. नेहा सुद्दा बरी दिसली साडीत.
काल कुणी नोटिस केल का, ' आमरण उपोषण' लिहिलेल्या चिठ्ठीत 'पो' वरती मात्रा लिहिलाच नव्हता. ' आमरण उपाषण' अस दिसत होत ते. घरात कुणालाच कळल नाही हे.
किशोरी ताईंबद्दल जाणवलेली
किशोरी ताईंबद्दल जाणवलेली गोष्ट म्हणजे त्या वयाने जरी मोठ्या असल्या तरी लहान मुलांसारख माझा नंबर पहिला, पहिलं मला मिळाल पाहीजे, माझच सगळ बरोबर आणि चांगल आहे......... तसेच मी मोठी वयाने आणी अनुभवाने म्हणून मला मान द्या पण माझ काही चुकल तर लहान समजून माफ करा असं वाटतं. कालपर्यन्त त्यांच्याबद्दल असलेली एक सहानुभुती खरचं कमी होउन गेली. या बिबि बातमीमुळे.
बिचुकलेनी जरा बरं केल.
नेहाचा भुताचा अवतार माला तरी अवडला नाही त्या मानाने कर्णकर्किशा ही कल्पकता खरच आवडली. आरोहने बिचुकलेची अंडरवेअर फ्रिज मधे लपवली अरे देवा मी त्या घरात असते तर फ्रिज मधे परत काही ठेवलेच नसते. त्याच्या कितीतरी दुसर्या वस्तू ठेवता आल्या असत्या.
Pages