मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

बघितला व्हिडियो.
जर शिव बाहेर गेला तर आरोहमुळे शिव गेला असं नाही होणार. तो आपल्याच कर्माने गेला असं होईल. शिव नेहमीच बळाचा वापर करतो. इतके दिवस पोरींविरुद्ध आणि माधव-अभिजितविरुद्ध ते चालून गेलं. आरोहसमोर शिवची ताकद कमी पडली म्हणून तो सरळ चावला. खूपच सिक कृती होती. तरी तो समर्थन करायचा प्रयत्न करत होता.
जर नेहा आणि शिव टॉप २ असतील तर नेहाला ट्रॉफी मिळावी. जरी मला नेहा आवडत नाही तरी कोणाला न चावणे हा पण निकष असूच शकतो! पण आयडियली ट्रॉफी किशोरीताईना मिळावी. किंवा इव्हन वीणा.

हीना ने आरोह ऐवजी नेहा ला वोट करायला हवं होत म्हणजे नेहा ला ४ आणि आरोह ला २ व्होट्स मिळाले असते .तर मग आरोह असता नॉमिनेशनला .मग हीनाचे सेफ होण्याचे चान्सेस वाढले असते. पण हे लोक शिवानी ला का नोमिनेत करत नाहीत .फक्त वीणा एकटीच सरळ तिला नोमिनेत करते फक्त त्या साठी तिला १०० मार्क्स .

मी ४० वोट दिले शिवला, मला तो राहायला हवाय. तसा त्याचा हा पहिलाच गुन्हा आहे. शिवानी ने इतके राडे करुन ती उजळ माथ्याने घरात वावरतेय,>>>>>>>>>> हो पण खर तर शिवानी यायला हवी होती नॉमिनेशनला हीना ऐवजी.

मी ४० वोट दिले शिवला, मला तो राहायला हवाय.>>>>>>>>>>>>> ४० का सगळे ९९ व्होट्स .द्या की शिवला मी पण करेन शिव ला वोट ९९ व्होट्स . शिवानी, नेहा ला टफ कॉम्पिटिशन द्यायला शिव राहायला हवा . हीना वाचली तर गेम अगदीच सोपा होवून जाईल .

बिग बॉस म्हणे की सगळ्यांनीच बुद्धिचातुर्य न वापरता बळाचा वापर केला. त्या टास्कमध्ये काय बुद्धिचातुर्य किंवा युक्त्या वापरता येणार होत्या?
बिग बॉसनीच टास्क ठरवताना बुद्धिचातुर्य वापरायची गरज आहे . कॅप्टनसी टास्कस ईंडिव्हिज्युअल ठेवा आणि ज्यात एकमेकांच्या शरीराला स्पर्श करावा लागणार नाही, अशी ठेवा. हिंदी बिग बॉसच्या सुरुवातीच्या सीझन्समधल्या गेम्समध्ये फिजिकल काँटॅक्ट्सची गरज नव्हती.

त्या वेळी निगेटिव्हिटी सरसकट वाईटच मानली जायची. आता हे एकीकडे आमचा शो voyeuristic आहे म्हणणार, सगळी टास्क्स निगेटिव्हिटी ने ओतप्रोत भरलेली ठेवणार (टेलिफोन बूथ, सिंहासन, चोर पोलीस हे विशेष) आणि त्यात स्पर्धकानी जास्त अ‍ॅग्रेशन दाखवलं की मांजरेकर त्यांना झाडणार, तेही निवडून निवडून.
या घोडा बोलो या चतुर. voyeuristic तर voyeuristic . मग तसाच ठेवा. ज्यांना हे पाहायला आवडतं, तेच पाहतील. नाहीतर मग एकदम कायम सौजन्य सप्ताह. तुम्ही एकमेकांच्या कार्यात विघ्न आणायला सांगणार आणि त्यातही नीट वागा सांगणार, हे कसं होईल?

शिवला त्या दरवाजा प्रकरणात वळू म्हटल्यापासून तो खूप सांभाळून खेळतोय, हे दिसून आलंय. तो बळाचा वापर फक्त अडवायला करतोय. नाहीतर सातबारामध्ये हीनाला ढकलणं त्याला अशक्य नव्हतं. रूपाली वीणा यांची फाइट त्या टास्कमध्ये जितकी ugly झाली होती त्या मानाने शिवने काहीच केलं नाही.

पुन्हा बळाचा वापर किंवा फिजिकल अ‍ॅटॅकसाठी बिग बॉसचे नियम एकसारखे लागू होत नाहीत. नाहीतर मग छातीवर लाथ मारणे, बोटं खुपसणे, वेट्स ठेवणे , बोचकारणे असल्या प्रकारांसाठी मांजरेकरांकडून " अचं नको कलू अं बाल, पलत नाई ना कलनाल" अशा स्कोल्डिंगवर भागवलं नसतं.
इतकं करून शिवला बाहेर काढायचं असेल तर ते चावला म्हणून सरळ काढायला हवं. नॉमिनेट करून त्याच्या फॅन्सला त्याला वाचवायची संधी देऊन किंवा संधी दिली असं दाखवून बाहेर काढणं बरोबर नाही.

मांजरेकरांनी शिवला त्याच्या फिजिकल स्ट्रेंग्थ वरून झाडलेलं पाहून आरोहने शिवला टारगेट करायला " तो बळाचा वापर करतो" असा ओरडा करायचा ही स्ट्रॅटेजी ठरवलेली दिसते. सातबारामध्येही तो काही करत नसताना, आणि हीनाला प्रॉब्लेम नसताना, ती मुलगी आहे, असं सांगायची गरज नव्हती.

शिव आणि वीणा काल खोटं वागले, असं मला वाटत नाही. टास्क खेळत असताना वीणाने आपल्या टीमशी फुल लॉयल्टी दाखवली. मागच्या वेळचा धडा शिकली. बिग बॉसनीही सकाळाचं तिचं आरोह बरोबरचं भांडण पाहून त्याच्याच टीममध्ये टाकलं.
उलट सगळ्यात जास्त खोटं सध्या नेहा वागतेय. तिचं आणि शिवानीचं इक्वेशन पराग- रूपालीपेक्षा फेक वाटतंय. शिवानीने जे केलं ते दुसर्‍या कोणी केलं असतं तर तिची रिअ‍ॅक्शन कशी असती?

आरोह काल अनेकदा " छोट्या छोट्या गोष्टींवरून मला बोलायचं नाही" असं म्हणत होता, पण तो स्वतःच ते करतोय. मला सकाळी उठवलंच नाही, माधवलापण नाही उठवायचा, मग मला टाँट मारला, इ.इ.
शिवाय तो शिवानी सोबत राहून जास्त निगेटिव्ह होतोय. शिव आणि वीणाचं PDA पाहून त्रास होतो इ. सगळं उगीचच होतं . शिवानी शिव - वीणावर अजूनही ग्रज ठेवून आहेच आणि त्याने शिवानीसोबत राहायचं ठरवलंय.

तो वर्गातल्या गुणी मुलासारखा वागतो, पण जिथे त्याचा संबंध नाही, तिथे मॉनिटरगिरी करायला जातोय आणि 'बाईंना सांगेन,' सारखं शनिवारचा जप करतो. This is not grown up behaviour.

हीनाने कोणत्या दोघांना सेफ केलं ते नीट बघितलं नाही किंवा विसरलो. तिने ज्यांच्याबद्दल जेन्युइनली वाटतंय त्यांच्यापेक्षा आपल्याला फार कोणी सेफ करणार नाही हे लक्षात घेऊन दोन काँटेस्टंट निवडायला हवे होते.

रियलिटी शोजमध्ये मोठ्या शहरांबाहेरून आलेल्या स्पर्धकांना त्यांच्या भागाच्या प्रादेशिक अस्मितेचा लाभ होतो. शिवला होईल. तसा आणखी कोणी आता दिसत नाही. (बिचुकलेंशिवाय. पण सध्या तो स्पर्धेत नाही. काल तांत्रिक कारणामुळे बाहेर ठेवलं असं सांगितलं. इतकी काय मजबुरी आहे, की त्यांना घरात ठेवायलाच लागतंय?)

<हीना ने आरोह ऐवजी नेहा ला वोट करायला हवं होत म्हणजे नेहा ला ४ आणि आरोह ला २ व्होट्स मिळाले असते .तर मग आरोह असता नॉमिनेशनला .मग हीनाचे सेफ होण्याचे चान्सेस वाढले असते> +१. तिने डोकं लावलं नाही.

>>Isn't this the golden opportunity/only opportunity for Neha fans to vote for Heena and vote out Shiv, her only competition ?

पॉइंट आहे!
पण नेहा चा फॅन असलो तरी शिव गेममध्ये राहणे हीनापेक्षा जास्त डिझर्व करतो..... नेहा, शिव, वीणा आपल्याला टॉप थ्री मध्ये पाहिजेत Happy
(आणि शिववीणाच्या फॅन्स चे votes डिव्हाईड होउन नेहा जिंकावी Wink )

किशोरीचा गेम कधीच फारसा आवडला नाही..... आणि हीना चा पण
शिवानी गंमत आणते पण ती बाहेर जाउन आल्यामुळे तिचा चान्स गेला
आरोह पण आवडतो..... पण वाइल्ड कार्ड Sad

काल मला वीणा पहिल्या चार आठवड्यानंतर पहिल्यांदा आवडली,नाटक असो वा काहीही असो,पण आवडली,अशी खेळली असती तर विनर होऊ शकली असती.

बर,बिचुकले साहेबांना हजेरी लावायची होती म्हणून म्हणे गेले होते,आता मेघा गेल्यावर येतील परत,पण गेस्ट म्हणूनच.
बिबॉस ,काय चालवल आहे?

मला काल वीणा आवडली. प्रेम्/मैत्री आहे तिथे आहे, टास्कच्या वेळी टास्क. ती शिवला रागावलीही आणि नंतर तिने 'हा कितवा आठवडा आहे, इतकं समजत नाही? शिक्षा मिळणारच' हे सांगितलं आणि परत समजूतही काढली. चांगल्या मैत्रिणीसारखी वागली खरंच.
शिव नॉमिनेट झाल्यानंतर पार हबकला होता. घाबरलाही आहे बहुतेक. पण अमरावतीकर वाचवणार त्याला. तोही आता उरलेले दिवस 'सॉरी, माझं चुकलं' म्हणत बसेल आणि सिम्पथी व्होट्स मिळवेल. हीनाचंच अवघड दिसतंय यंदा. ती स्ट्रॉन्ग आहे, पण अत्यंत भोचक आणि कटकटीही आहे.
डीजे म्हणते तसं, नेहाच्या फॅन्सना खरंच संधी आहे, पण तितकं डोकं कोणी चालवेल असं नाही वाटत.

काल 'बिचुकले तांत्रिक कारणामुळे या टास्कमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत' असं बिबॉने अनाऊन्स केल्यावर बिचुकलेने हाताने 'का असं करतात काही कळत नाही बाबा'वाला चेहरा केला होता Lol हळूहळू त्याचं महत्त्व कमी करून, त्याच्या घाणेरड्या सवयी कॅमेर्‍यात दाखवून, त्याची इमेज मलिन करून बिग बॉसने त्याला एव्हिक्ट केलंय, हे एक आवडलं. काल तो गेल्याचं दाखवलं नाही. आज तरी दाखवतात का, काय माहित. गेल्या वेळी त्याला अरेस्ट केलं तेव्हा काहीच दाखवलं नव्हतं.

आता मेघा गेल्यावर येतील परत,पण गेस्ट म्हणूनच.>> हो? Uhoh न्यूजमध्ये आहे का काही असं? शी! असं असेल तर खरंच बावळटपणा आहे! म्हणजे एव्हिक्ट होत नाहीचे का तो? मग माझं वरचं बिग बॉसच्या कौतुकाचं वाक्य मागे!

आजच्या एपिसोडनंतर मला परत कोणीच आवडत नाहीये , हिना आणि शिव आवडतात त्यातल्या त्यात आणि तेच नॉमिनेटेड Sad
शिव खरोखरच चावलाय त्यामुळे अचानक तो विनर होण्याचे चान्सेस कमी वाटायला लागलेत आणि नेहाचे ब्राइट .
आज वीणाचे पॉइंट्स कधी नव्हे ते बरोबर वाटले, आरोह उशीरा आला असला तरी चांगलाच गेममधे शिरलाय आणि फुटेज किंग झालाय !
तसं पाहिलं तर सगळे दंगेखोर विद्यार्थी या वर्गात !
शिव : चावरा, बळाचा वापर करणारा, आरोहः बळाचा वापर, वीणा: शिवानीला पायावर मारणारी, शिवानी: वीणाला लाथ घालणारी, नियम तोडणारी, हाकलून दिलेली! नेहा:खुर्ची सम्राटमधे धक्काबुक्की ढकलपंजी करणारी, बिचुकले: गलिच्छ, शिवीगाळ्,अर्ध्या शो मधून अरेस्ट झालेला.
राहिल्या हिना आणि किशोरीताई , हिना चांगली खेळतेय तशी , माणुस म्हणून पण चांगली वाटते पण कनफ्युज्ड टॅग मिळालाय आणि किशोरी डंब Proud

मागच्या वेळी पण कैप्टनसी चे दावेदार ठरवायच्या वेळी शीव ने नेहा ला दरवाज्यात धरुन ठेवले होते आणी त्यामुळे फोर्सने ती पडली होती. तेंव्हासर्व सदस्यांना विचारुन शीव ला डायरेक्ट nominate केले होते.
आणी आता हे चावला म्हणून दुसर्यान्दा डायरेक्ट nominate केले.
पण शीव नाही जाणार कारण हीना च्या तुलनेत त्याला भरपूर सपोर्ट आहे.
बिचुकल्यांचे आओ जाओ घर तुम्हारा चाललाय.

आरोह काल झोपाळ्यावर म्हणाला की आपण किल्ल्यावर नाव लिहायचो...वर वीणा बरोबर भांडताना म्हणाला की, तो ऊभा आहे ना pamper करायला त्याच्याकडे जा.... शिव वीणा वर जळतोय तो....

हीना ने वीणा आणी आरोह ला सेफ़ केले. शीव जर नोमीनेट नसता तर तिने शीव आणी वीणा दोघांना सेफ केले असते. पण आता तिला आरोह शिवाय दुसरा ऑप्शन नव्हताच कारण शिवानि आणी नेहा बरोबर तिचे अजिबात पटत नाही. तिने तिथे जास्त डोके लावले नाही.
शीव आणी वीणा दोघांनी ही हीना ला सेफ केले.
बिचुकले ना तांत्रिक अडचणी मुळे या नोमीनेशनच्या कार्यातून वगळले.
काहीपण .

पण आता हीनाचाच नंबर आहे.... उरलेल्यांपैकी कुणी जरी आले असते नॉमीनेशनमध्ये तरी हीना ला टफच गेले असते...... सबसे कमजोर कडी हीनाच आहे!
अर्थात ३-४ जण असतील तर votes डिव्हाईड होऊन इक्वेशन्स बदलू शकतात!

खर तर गेले काही दिवस पावसाने थैमान काही भागात घातले आहे कदाचित याची कल्पना बिबॉने सदस्यांना दिली असावी, जर दिली नसेल तर नक्की द्यावी. तसेच यावर आधारीत एक टास्क द्यावा. घरात पूरस्थिती उदभवली असून काहीजण या पूराच्या पाण्यात म्हणजेच बिबॉच्या घरातील तरण तलावात अडकले असून त्यांना पोहता येत नाही, त्यांना वाचवण्याची जबादारी उरलेल्या सदस्यांची असून त्यांच्या जवळ तातडीची सेवा सुविधा नाही. अशावेळी त्या अडकलेल्या माणसांना कोण कसे बाहेर कढू शकेल ते दाखवायचे. फार फार तर एक झाडाची फांदी, एखदा दोरीचा छोटा तुकडा, एखादे टायर अश्या काहीच वस्तू देण्यात याव्यात. तसेच या वस्तु मिळवण्यासाठी देखिल त्यांना काही अडचणी पार कराव्या लागतील.
हा कुठलाही नॉमिनेशन अथवा कॅप्टन्पदासाठिचा खेळ नसून केवळ बाहेरच्या परिस्थितीची माहिती करून देण्यासाठी घेतलेला खेळ असावा.

तसेच बिबॉ ३ मधे या सुधारणा करण्यात याव्यात असे मला वाटते.
बिबॉचे घर म्हणजे काहीजणांना शीतहवायुक्त, मऊ मऊ गादीवर दुलईत लोळत पडण्याच, जास्त काम नसलेले, आरामात पैसे मिळवण्याचे घर वाटते. तरी पुढील भागा मधे खेळाडूंना साधे पंखे असलेले, झोपण्यासाठी साध्या गाद्या, अंगावर घ्यायला साध्या चादरी, पाणी तापवायला बंब अथवा चुलिवरील भगोन्यात पाणी तापऊन घेणे, तसेच घरात फार सुखसोयी नसतील असे घर तयार करावे. अशा घरात जो १०० दिवस खेळ चांगला खेळून घालवेल त्याल्याच विजयी घोषित करावे.

पाणी तापवायला बंब अथवा चुलिवरील भगोन्यात पाणी तापऊन घेणे,>> आई गं!! Lol म्हणजे झालंच, बिग बॉस चं घर ऐवजी नाव बदलून राडा घर ठेवावं लागेल Wink

पहिल्या सीजनला नव्हती मशीन. पहिल्या सिजन ला कुणालातरी सगळ्यांचे कपडे धुण्या ची शिक्षा झालेली तेंव्हा कुणीतरी मुद्दामून भरपुर कपडे धुवायला टाकले होते.त्यावर इश्यू झालेला.पण छुपी असेल तर माहिती नाही. दाखवली तर नव्हती Wink
सुरुवातीला विणा ला घर दाखवताना नेहा ने म्हणाली होती आपल्याला वॉशिंग मशीन दिलाय.

बिचुकले ना तांत्रिक अडचणी मुळे या नोमीनेशनच्या कार्यातून वगळले. काहीपण . >>>>>>> चान्गलच झाल आहे की मग.

काल 'बिचुकले तांत्रिक कारणामुळे या टास्कमध्ये भाग घेऊ शकणार नाहीत' असं बिबॉने अनाऊन्स केल्यावर बिचुकलेने हाताने 'का असं करतात काही कळत नाही बाबा'वाला चेहरा केला होता >>>>>>>> Lol हे मात्र भारी होत. नॉमिनेशन टास्क चालू होता त्यावेळीही त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. बोलती बन्द झाली होती त्याची.

भरतच्या पूर्ण पोस्टीला अनुमोदन.

किशोरीने खेळी खेळली काल. हिनाला सेव न करुन आपल्याला कॅप्टन न केल्याचा बदला घेतला तिने. हिना तिच्याकडे रागाने बघत होती.

वीणाचे एक मला आवडले की तिचे मित्र जेव्हा चुकीचे वागतात तेव्हा ती त्यान्ना समज देते, त्यान्ची साथ देत नाही. मग ती किशोरी असो, रुपाली असो, पराग असो की शिव. त्याउलट नेहा आहे, शिवानी कशीही वागली तरी हि असतेच तिच्याबरोबर, इतक करुनसुद्दा ती तिचाच ओरडा खाते, तिचा विश्वासघात सहन करते.

बिच्चारा शिव! स्वतच्या कर्मामुळेच तो हतबल झालाय. Sad

आरोह विणाच्या भाण्डणात शिवने तिची साथ दयायला हवी होती. तो गप्प होता. ' हो आम्ही लिहिली नावे झोपाळयावर, तुला काही प्रॉब्लेम आहे का?' विचारायच होत त्याने.

आरोह काल झोपाळ्यावर म्हणाला की आपण किल्ल्यावर नाव लिहायचो. >>>>>>> किल्ल्यावर नाव लिहिलेल कस चालत त्याला. ऐतिहासिक वास्तू असतात त्या. झोपाळा आरोह किव्वा शिवानीच्या मालकीचा नाहीये.

शिवानीच्या म्हणण्यानुसार ती टास्कसमध्ये रडते ते नॅचुरल, हिना दाताला लागल म्हणून कळवळली ते ओवरएक्टिन्ग!

आरोह आणि वीणा इतके भांडले आणि लगेच टास्क मधे वीणा त्याच्या बाजूने शिव शी भांडत होती? क्या सच क्या झूठ! कुणाला माहित. >>>>>> विणा वागली ते चुकीच नव्हत. लॉयल राहिली ती आपल्या टिमशी.

विणा- शिवच भाण्डण काल एडिट केल होत का? Uhoh खुप कमी दाखवल होत ते, ती शिवला ' तुझी दादागिरी चालणार नाही' ते दाखवलच नाही.

निर्झरा, तुमच्या आयडियाज एक नम्बर!!! Bw

तुम्ही म्हणता तस घर बिबॉ हिन्दी मध्ये पुनीत इस्सारच्या सिझनला केल होत काही आठवडयासाठी.

हो चांगल च आहे. पण तांत्रिक अडचणी हे कारण काहीतरीच आहे. वीणा स्वतःची भांडणे स्वतः भां डायला समर्थ आहे, असं त्याची बहि ण , अभिजीत केळकर आणि बहुतेक मांजरेकरांनीही त्याला सांगितलंय.
हे बरोबरच आहे >>>>>>>>> +++++++++१११११११११११

काल सकाळी आरोह हिनाला मन्द म्हणाला, नॉमिनेशनमधून त्याला सेव केल्यावर हा तिची तोण्डासमोर स्तुती करत होता.

बिचुकले ना तांत्रिक अडचणी मुळे या नोमीनेशनच्या कार्यातून वगळले. काहीपण . >>>>>>> चान्गलच झाल आहे की मग.
>>>>हो चांगल च आहे. पण तांत्रिक अडचणी हे कारण काहीतरीच आहे.

भरत +++११११ छान मुद्देसूत लिहीलय. पूनम आणि डिजे ची पण आवडली पोस्ट.
हिना ने आ रो ला मत देउन खरंच चुक केलीये, नेहा ला द्यायला हवं होतं.
प्रियांका, मी माझी मतं राखून ठेवली, अजून कोणी नॉमिनेट झालं तर? नाहीच झालं तर सगळी मतं शिव ला नक्की

<आरोह विणाच्या भाण्डणात शिवने तिची साथ दयायला हवी होती. तो गप्प होता. ' हो आम्ही लिहिली नावे झोपाळयावर, तुला काही प्रॉब्लेम आहे का?' विचारायच होत त्याने.>

वीणा स्वतःची भांडणे स्वतः भां डायला समर्थ आहे, असं त्याची बहि ण , अभिजीत केळकर आणि बहुतेक मांजरेकरांनीही त्याला सांगितलंय.
हे बरोबरच आहे. तो नंतर रडताना म्हणालाही की सकाळी तुझ्या भांडणात मी पडलो नाही.

ते हार्ट वीणाने काढलं नाही म्हटल्यावर आरोहने शिवला विचारायला हवं होतं. पण तो शनिवारची वाट बघत असेल Wink

एबीपी माझा वर पराग ची मुलाखत बघितली . त्याने सांगितलं आधी सगळ्या स्पर्धकांकडून सर्टिफिकेट घेतलं कुठलही क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये असं आणि मग बिचुकलेना कुठल्या तोंडानी बिग बॉस ने एंट्री दिली . त्यांनी तर कोणाला तरी मारहाण केली होती ना ? शारीरिक इजा पोचवली होती . म्हणून त्यांच्या वर केस झाली आहे . आणखीन पण दोन तीन केस आहेत . आता सुद्धा कोर्टाची तारीख आहे म्हणून ते घराबाहेर गेले आहेत . बर आहे आपलं बिचुकलेचं बिग बॉस च्या कृपेंन कधी ही या कधी हि जा . मजाच मजा . बिग बॉस कायम स्वागताला तयार आणि शिवानीने एवढ्या बिग बॉस ना धमक्या देऊनही बिग बॉस ने परत एंट्री कशी दिली ? गेल्या वेळी सुशांत ला नाही सांगितलं . बिग बॉस त्यांचे त्यांचे नियम -कायदे -कानून व्यक्तीनुसार बदलतात

शिवने , त्याचा गळा आरोहने आवळला म्हणून त्याला चावला तर त्याला नॉमिनेशन ची शिक्षा आणि परागने वैशाली आणि नेहा ने बोट खुपसून परागला इजा केली म्हणून नेहाच्या थोबाडीत मारली तर त्याला डायरेकट घराबाहेर ? . त्याच स्वतःच तेच म्हणणं आहे किव्वा तो बोलला . बिग बॉसनं वाटत ना माझ्या हातून खूप मोठ्ठा गुन्हा घडला आहे तर मला डायरेकट घराबाहेर काढा ना . पण ते आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची नाटक का केली बिग बॉस ने .

हे बरोबरच आहे. तो नंतर रडताना म्हणालाही की सकाळी तुझ्या भांडणात मी पडलो नाही >>>+१ पण तो राग त्याच्या मनात तसाच राहिला. परिणामी तो टास्क मधे आरोहला चावला Happy आरोहला तेच हवे असेल म्हणून टास्कच्या आधी शुल्लक कारणावरून तो वीणाशी भांडला.

Pages