मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

जर अ बि चुकले हे खेळात काही तांत्रिक अडचणींमुळे सहभागी होउ शकत नसतील तर त्यांचे सल्ले घेणे पण पटत नाही. मी तर म्हणेन जेव्हा ते खेळत नसतील तेव्हा बिबॉ ने खेळ संपेपर्यन्त सरळ त्यांना अडगळीच्या खोलित जाउन बसायला सांगावे. तसेही ते नुसतेच खुर्चीवर बसून अथवा गादीवर लोळत पडून उगा खुनशी नजरेने बघत असतात. मला तर त्यांची ही नजर अजिबात आवडत नाही.
त्यांना जज म्हनून घेतलेले मला तरी आवडले नाही. तसेच किशोरी ताईंचा सल्लागार म्हनून किती वाईट सल्ला दिला. नेहा वर खुन्नस म्हनून तिला पण बाद करा.... बर ताईंनी तो ऐकला नाही. या वेळेस सर्वच जण थोडेफार संचालीकेचे ऐकत होते. बरं वाटल ते बघून.
प्रोमो मधे शिवानीची चक्कर बघितली. जर हा त्या खेळाच भाग नसेल तर तिला बाहेर घालवायची चांगली संधी आहे.
बाथटब घाण करायचा होता ईथे नेहाच चुकल अस मला वाटतं. तिने आधी ग्रिस ओतल्यामुळे नंतर चिखल त्या टबला चिटकून बसत न्हवता. त्या मुळे तो स्वच्छ राहीला. तर आरोह ने चिखल फासून ठेवला आणि तो सुकून बसल्या मुळे तो निघुच नाही शकला.

घरात आलेल्या यच्चयावत पाहुण्यांनी बिचुकले ला अवाजवी महत्व दिले.... बिग बॉस, मांजरेकर वगैरे कुणाचीच ठेवत नाही हा माणूस तरी त्याची मनमानी खपवून घेतली जातीय!
नक्कीच काहीतरी गोची आहे!

नेहा काल पुचाट ठरली टास्कमध्ये. शिवही भडकलेला तिच्यावर.

बिचुकले तर bb खर्चाने सातारा वाऱ्या करून परत येतात.

बाकी घरातल्याना काही माहिती नाहीये पण बाहेर जाऊन परत आलेले, पाहुणे यांना बिचुकलेचं एवढं कौतुक का, किंवा bb नी नियम केला असेल, आत जाऊन बिचुकलेला trp द्यायचा, त्याचा कौतुकसोहळा करायचा.

मेघा मात्र भाव देत नव्हती, त्याने तिला जाम इरिटेट केलंय bb त यायच्या आधी, तिने त्याचे अनेक फोन नं ब्लॉक केलेत.

मेघाच एक अजिबात भाव देत नव्हती बाकी सुशांत खुप भाव देत होता. रेशम ने त्यांची मिमीक्री केली. बिचुकले नी गायलेल हिन्दी गाणे त्यांचे ओरिजनल होत म्हणे Rofl आणी शेवटी ते ट्रोफ़ी ला डेड़िकेट केले. किती ती अजुनही आशा ट्रोफ़ी ची.

नक्कीच काहीतरी गोची आहे!>>> बिचुकलेनीच पैसे दिले असतील बिग बॉसच्या निर्मात्यांना.

बोलताना बरेच वेळा मी खुप पैसे वाला आहे हे येत असत बाहेर त्यामुळे असाव कदाचित अस......
त्या शिवानीला देखिल पैशाची मदत केली असणार म्हणून ती पण त्यांच्या जप करत असते.

कसले काय, आर्थिक फसवणुकीचे आरोप आहेत त्यांच्यावर अनेक. लोकांचेच पैसे घेऊन किंवा बुडवून पळतात ते.
निर्मात्यांना ते टिआरपी देतायत असे वाटल्यामुळे त्यांनी त्याच्या वकिलाचा, जामीनाचा वगैरे खर्च केला असावा. मग आता ती सो कॉल्ड एंटरटेनमेन्ट वसूल करायला त्याला ठेवलेय.
शिवानी पण त्यांना वापरून घेते फुटेज घ्यायला. परवा ते बिचुकले चूप, बिचुकले बंद असे ओरडताना पाळीव कुत्र्याशी टोमी सिट, टॉमी छू असे बोलावे तसे बोलत होती ती.

त्या खेळाच भाग नसेल तर तिला बाहेर घालवायची चांगली संधी आहे.
<<
कसलं काय, ब्रेकिंग न्युज टास्क आहे !
एक काहीतरी आ.रो -शिवानी लग्नाचीही न्युज दाखवली.
हे टास्क हिन्दीमधे फार छान केलं होतं, ट्विस्ट असा होता कि बातम्या खर्या पाहिजेत, फेक नाही !
श्रीसन्तने जिंकवून दिलं होतं सुरभिला भज्जीपाजीने मारलेली थोबाडीत किस्सा सांगून.
मेघाने चुकून दीपकला मार्क्स मिळवून दिले होते त्याच्यावर चप्पल फेकून,थुंकून. एबीपीने त्याचीच न्युज बनवली, “मेघाने किया दीपकपे जूतेसे हमला“ Biggrin
इथे खरं तर बिचुकले आणि शिवानीला सुवर्णसंधी आहे खर्याखुर्या सनसनाटी ब्रेकिंग न्युज द्यायची.. पण मराठी बिबॉ आहे, माती खाणारच!

त्या वीणाला अजिबातच जराही नाचता येत नाही. इतकी बोजड आहे ती. साधं भांगडावर नाचता येत न्हवते आणि हीनाकडे बघत स्टेप्स करत होती. अगदीच पात्रं आहे.
हीना फक्त त्याच त्याच स्टेप्स आणि बॉडी मूवमेंट्स करते. काही ग्रेसफूल वाटत नाही डान्स तिचा. गाणं कुठलही असो , त्याच स्टेप्स.
आणि बिचुकलेची टक लावून बघणारी विचित्र नजर हीना नाचत असताना...

वीणाला नाचताना बघून एकच म्हण आठवते.

भीक नको पण कुत्रा आवर...
तसंच, नाच नको पण स्वतःला आवर. आम्ही 'विनानाच' बिगबॉस आनंदाने बघू, पण 'वीणानाच' बिगबॉस बिलकुल नाही बघणार Lol

वीणाचा जाम पचका केला बिचुकले यांनी.

शिवानीला जाम फुटेज देतायेत, ती मस्त फायदा घेतेय. नेक्स्ट विक कॅप्टन तीच असेल.

पण खूप बोअर करतायेत सर्वजण.

एकही टास्क innovative नाही, so bored. Mute केला tv.

शिवानीला डोक्यावर बसवतायेत बिचुकले आणि ताईपण त्यावर आरोह, नेहा, वीणा बोलणार. पार्शल आहेत दोघे ते.

त्यातल्या त्यात बरी ती सोफ्याची वाटली, म मां ना involved करून केली ती, शिव ताई होत्या. नेहाची पण बरी होती, नथ वगैरे, ह्या दोन्ही वेळी tv mute ठेवला नाही, बाकी सुरू झाल्या की mute.

अरे कॅप्टन कोण आहे? किशोरी च आहे ना ?मग मुर्खासारखं कॅप्टन हटाओ असं स्वतःच शिव च्या बरोबर ओरडत बसलीये. किती बाळबोध, बावळटपणा चाललाय. काहीही बोलण्याच्या पलिकडे आहे हे.

आरोह मस्त म्हणाला, आपण टास्क घाण खेळला सर्वांनी. तो एकदम करेक्ट होता, शिवानी गप्प.

Too bored epi. लक्झरी बजेट द्यायलाच नको होतं. असलेलं काढून घ्यायला हवं होतं.

झाल एकदा,आला रडत का होईना,एकदाचा तो तेरावा आठवडा,शेवटचा काय फिनँले वीक असतो,सगळेच फायनलीस्ट,
खेचला कसातरी सिझन.

हीना फक्त त्याच त्याच स्टेप्स आणि बॉडी मूवमेंट्स करते. <<हो वेक अप सॉन्ग कोणताही असो ती सेम डांस करते . खर ती flexible आहे.

मैत्रेयी करेक्ट, पाळीव कुत्र्याला जसं वागवतात तसं वागवते शिवानी बिचुकले यांना. त्यांना ते चालतं.

वीणा किती वाईट दिसत होती, नेहेमी असाच हेअरकट का करते. केस सर्व मागे बांधते ते छान दिसतं.

हिनाच्या त्याच त्याच बोअर steps हे फक्त मलाच वाटत असेल असं वाटलं पण बऱ्याच जणांना वाटतंय, अगदी बोअर होतंय ते, एकसुरी. ती स्वतः पण आज जाम बोअर झाली एकंदरीत.

आता 2नच वीकेंड चे डाव राहिलेत ना मग डायरेक्ट फिनाले. त्यामुळे यावेळी कोणतरी evict होणार शिवाय वोटिंग ही चालू होते.

>>>>हिनाच्या त्याच त्याच बोअर steps हे फक्त मलाच वाटत असेल असं वाटलं पण बऱ्याच जणांना वाटतंय, अगदी बोअर होतंय ते, एकसुरी<<<
तेच ना. सदा सर्वकाळ कमरेत लचके आणि पाश्वभाग फिरवणे बस. पण काही जणांना अगदी मस्त नाचते वगैरे वाटतं.

किशोरीचा आज जामच राग आला. तिनी बनवलेली प्रत्येक बातमी ब्रेकींग काय? किती ही पार्शालिटी? तिचं न्यूज रीडींग तर अगदीच धन्यवाद होतं. काय समजते स्वतःला कोण जाणे!

न्यूज रीडींग तिला एकटीला का दिलं? प्रत्येकाला सं धी मिळायला हवी होती. बिचुकले तर शिवानीचा असिस्टंट असल्यासार्खा तिच्या मागे मागे फिरत होता.

किशोरी आणि बिचुकले शून्य क्रिएटिव्हीटी!

शुगोल अगदी अगदी.

शिव वीणा सगळ्यांच्यात मिक्स होत नाहीत म्हणून शिव्या खातात आणि हिनाला मिक्स व्ह्यायचं असतं सर्वांत पण तिला करुन कोणी घेत नाही, त्याचं काय. मग तिला का वेगळा न्याय. ज्यांना व्हायचं नाहीये त्यांच्या मागे मागे आणि जिला व्ह्यायचं आहे, तिला दुर लोटायचं. काय घर आहे.

शिवानी चक्कर येऊन पडली यात न्यूज व्हॅल्यू काय होती?
बिचुकले आधी बोलताना तसं म्हणाला पण होता.. शिवानीला नेहमीच असं होतं..
तरीही न्यूज निवडताना तिचीच निवडली..
मला वाटलं होतं आरोह बिचुकलेच्या रिअल अटकेवर काहीतरी मजेदार न्यूज बनवेल..
शिवानीकडून तर अपेक्षाच नाही काही

Pages