मराठी बिग बॉस २ - ३

Submitted by सूलू_८२ on 9 August, 2019 - 18:35

हाय फ्रेण्डस,

मराठी बिग बॉस २ शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे.

दर दिवसाला इक्वेशन्स बदलत आहेत.

शिवानी सुर्वे, बिचकुले ह्यान्च कमबॅक झाल आहे.

शिवानी-नेहाच ब्रेकअप झाल. विणा हिच सध्यातरी शिवानीशी नीट जुळतय.

सो, कोण होणार विनर? बघत राहा आणि चर्चा करायला या!

Bigg-Boss-Marathi-2-Contestants-List-700x525.jpg

Group content visibility: 
Use group defaults

शिवानि ने शीव ला केले असते तर आरोह किंवा नेहा यांच्यापैकी कोणीतरी दावेदार झाले असते. शीव ला शब्द द्यायची काय गरज होती शिवानि ला .

माझ्या मते नेहाचा कल आरोहकडे होता. हीना गेली तेव्हा नेहा शिवानीकडून ऑलरेडी बाद झाली होती. हीनानी शिवला बाद करावं असं तिचं मत होतं . म्हण्जे फायनल टास्क आरोह आणि किशोरी मधे झालं असतं.

मला वाटतय हिना नाही जाणार बाहेर , पुढचा नं वीणाचा लागेल बहुदा, तिला भरपूर हेटर्स आहेत आणि हिनाला भरपूर सिंपथी !
त्यानंतर शिवानी जायला हवी आणि हिना पाहिजे टॉप ५ मधे !

वीणाला घालवलं तर लव्हस्टोरी टीआरपीचं काय? ( इफ देअर इज एनी ! ) Proud

मला या आठवड्यातच शिवानीला घालवलेलं आवडेल. नंतर किशोरी.

किशोरी मला फार खोटी वाट्ते. परवा सलमानसमोर नाचायची तिची धडपड बघून तर कीव आली तिची! पार उतरली मनातून.

किशोरी मला फार खोटी वाट्ते. परवा सलमानसमोर नाचायची तिची धडपड बघून तर कीव आली तिची! >>> हो किती ते मला चान्स कधी मिळणार . इतर वेळी तर स्वत: सीनियर माझा एक औरा आहे करत असते.

किशोरी मला फार खोटी वाट्ते. परवा सलमानसमोर नाचायची तिची धडपड बघून तर कीव आली तिची! पार उतरली मनातून.
@शुगोल..
अगदीच बरोबर

परवा सलमानसमोर नाचायची तिची धडपड बघून तर कीव आली तिची! >>+१११ माझा परफॉर्मन्स राहिला मला नाचू द्या काय !!
पब्लिक चा सपोर्ट आहे आणि लोकांना तिचा वावर पॉजिटिव्ह इ. वाटतो पण मला तरी किशोरी फार पथेटिक वाटते. सतत मला नॉमिनेट करू नको म्हणुन गयावया आणि मेंढरासारखे कुणाला तरी फॉलो करणे. पहिल्यापासून क्लूलेसच आहे ती.
खेळ बघायचा झाला तर तिच्यापेक्षा अभिजीत टिकायला हवा होता. हिनाही बेटर आहे.

किशोरी प्रयत्न करते पण तिच्यात विनर क्वालिटि अजिबात नाही आहेत.
दोन च कसे फक्त . वोटिंग लाइन्स आहेत का चालू.

किशोरीकडे कास्टिंग व्होट होतं. शिवानीने तिच्या तोंडाला काळं न फासण्याचं डील आज पूर्ण झालं.

व्होटिंग लाइन्स ओपन आहेत.

उद्या सुशान्त, रेशम, मेघा येताहेत.

किशोरी दुष्टपणा करत नाही किंवा जंगली पणा करत नाही. म्हणून मला ती बरी वाटते.
जेव्हा पराग गेला त्यांनतर सर्वांनी किशोरीला isolate केलं होतं. पण त्यातून ब्रेक न होता तिने पुन्हा घरात एक स्थान बनवलं. त्यावेळी किशोरी आणि अभिजित बोलत असताना नेहाने अभिजीतला किशोरीशी बोलायलाही मनाई केली होती.ती कुजकेपणाची हद्द होती. एखादा एकटा पडलाय तर त्याची तडफड बघून मजा घ्या, अजून त्रास द्या.

बाय द वे, सोशल मीडियावर वाचलं की शिव चक्क चावला. आणि तरी त्याला फक्त नॉमिनेट केलंय. म्हणजे परागला एक न्याय आणि शिवला दुसरा.

So basically biggboss plotted against Heena ! >>येस असेच वाटत आहे . कारण हीना बरोबर शिवानि नेहा यापैकी nominate झाले असते तर कदाचित ती वाचली असती. पण शीव बरोबर chances खुप कमी आहेत.
हिन्दी मध्ये पण नेहा पेंडसे evict झालेली त्या वीक मध्ये फक्त 3च जण nominate झालेले नेहा ,करणविर आणी श्रिशंत. ते पण चौथ्या विक मध्ये. त्यामुळे ती लवकर out झाली .

So basically biggboss plotted against Heena !>> +१
किमान किशोरी, शिवानी, वीणा अथवा आरोह यांपैकी कोणी असते तर जरा फेअर चान्स मिळाला असता हीनाला. आधीच मांजरेकराने तिला कायम बळंच शिव्या घालून तिची इमेज खराब केलीय.
बाकी आजचा भाग बघीतला नाही. तो बिचुकले गेला का? काय कारण देऊन घालवला त्याला?

But actually it's not as simple as it looks like!
This nomination looks dangerous for Shiv too !
Isn't this the golden opportunity/only opportunity for Neha fans to vote for Heena and vote out Shiv, her only competition ?
Actually in a way it's Shiv fans vs fans of all remaining contestants and they all want to vote out Shiv , the strongest person Happy
Let's see !

खरंय, गुड पॉइन्ट!! काहीही पॉसिबल आहे, बाकीच्यांच्या फॅन्स ना हे लक्षात आले तर अर्थात. नाहीतर बहुधा पब्लिक आपले आवडते लोक नॉमिनेशन मधे नसतील तर वोट च करत नसतील.
त्यावरून आठवलं - परवा कुणीतरी केळ्याला विचारले तू एलिमिनेट कसा झालास तर तो म्हणाला मी कधी नॉमिनेशन मधे आलोच नाही ना, त्यामुळे माझ्या फॅन्स ना वोट करायची सवयच नाहीये म्हणे Lol

I guess random people, fans of other contestants have already started voting for Heena but still looks difficult to vote out Shiv.

Isn't this the golden opportunity/only opportunity for Neha fans to vote for Heena and vote out Shiv, her only competition ? >>> गुड पॉईंट दीपांजली!

चावणे हा खरंच मोठा ऑफेन्स आहे. ज्या कारणाकरता परागला बाहेर काढलं, त्या इतकाच सिरीयस. तेव्हा बिबॉनीच त्याला वीकेंडला घालवला तर बरं होईल. कारण परागच्या वेळेला घरच्यांना चॉइस दिला आणि त्यांनीच त्याला बाहेर काढायचं ठरवलं. बिबाँना माहितीय की शिव सगळ्यांच्या गुड बुक मधे आहे, ते त्याला बाहेर काढणार नाहीत. म्हणून आत्ता त्याला स्पेअर केला. पुढच्या चार दिवसांचा लव्ह स्टोरीचा ट्यार्पी खेचतील आणि वीकेंडला घालवतील. असं काही केलं तर मला आवडेल.

ते झोपाळ्यावर नाव कोरणे हे पण शिवच्या विरुद्ध जाणार आहे / जायला हवे.

शिव आणि किशोरीला कन्फेशन रुममधे बोलावतात तो सीन जाम भारी आहे. किशोरीला समजतच नव्हतं तिचं काय चुकलं. तिला तिचे सगळे प्लेयर खेळवणं अलाऊड होतं तरी तिनी हीनाला बाहेर ठेवलं होतं.

खरच जर शिव गेला तर मात्रं आरोहला ड्बल किंग स्लेयरचा किताब नक्की , शिवचा पत्ता कट करणे म्हणजे साक्षात नाइटकिंग ला उडवण्यासारखे आहे Proud
आरोह खूप रडारड करतो म्हणुन ट्रोलर्स त्याला ‘आ,रो’ म्हणतात Biggrin
यावेळी कोणीच नको जायला, शिव ऐवजी शिवानी चावाचावी /मारामारी करून बाहेर पडली असतं तर बरं झालं असतं.

मी ४० वोट दिले शिवला, मला तो राहायला हवाय. तसा त्याचा हा पहिलाच गुन्हा आहे. शिवानी ने इतके राडे करुन ती उजळ माथ्याने घरात वावरतेय,

खरंच २ च आहेत की नॉमिनेटेड! बिबॉ ने तरी हीनासाठीच जाळं लावलं आहे असेच वाटतेय. शिव मात्र हादरला असावा खरंच. कुछ भी हो सकता है असं वाटत असावं त्याला, केळ्याची अकाली एक्स्झिट इतक्यातच झाल्यामुळे असेल.
आरोह आणि वीणा इतके भांडले आणि लगेच टास्क मधे वीणा त्याच्या बाजूने शिव शी भांडत होती? क्या सच क्या झूठ! कुणाला माहित.
बिचुकलेचे काहीच दाखवले नाही की. कधी होणार पाठवणी त्याची!!

Pages