Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23
एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.
- ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
- जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
- जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
- अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
- बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
- काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
- एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
- काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत

-
-
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बास झालं आता भारत पाकिस्तान
बास झालं आता भारत पाकिस्तान खेळून. मला तरी असं दिसतं की भरत, black cat वगैरे मंडळी इथे फक्त डिवचायला येतात. इथे विरोधी पोस्टी टाकण्यापेक्षा सेपरेट धागा काढून आपले स्पष्ट विचार, संदर्भ त्या धाग्यावर टाकावेत.
सत्ताधारी व विरोधक एकाच
सत्ताधारी व विरोधक एकाच संसदेत बसतात,
इथेही तसेच असते,
पूर्वी धागा काढताना, विषयाचे नाव लिहून मग सत्य की थोतांड ? असे लिहायची पद्धत होती, ज्योतिष : सत्य की थोतांड ? म्हणजे दोन्ही पक्ष एकत्रच लिहायचे
तसे ह्या धाग्याचे नाव 370: सत्य की थोतांड ? असे आहे.
तुमच्या शहानी 3 लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला आहे. तुम्ही पेढे वाटले का ?
मी तटस्थ का असावं? इथे
मी तटस्थ का असावं? इथे लिहिणारे इतर सगळे तटस्थ आहेत का?
३७० रद्द करण्यासारखी दिलेली कारणं आणि ते करण्यासाठी निवडलेला मार्ग पटले नाहीत, असं म्हटलं. त्यात काय चूक आहे? दोन्ही गोष्टींची कारणं अनेकदा दिलीत. ती तुम्हांला वाचता येत नाहीत असं दिसलं. काही तांत्रिक अडचण असावी.
<बोलूच नये असे मी म्हणलेलेच नाही. बोलूच नये असे मी म्हणलेलेच नाही. तुम्ही तसा अर्थ काढत असाल तर दोष माझा नाही> प्रतिसादातलं अर्ध वाक्य घेऊन आणि त्या आधीचे अन्य प्रतिसाद दुर्लक्षित करून उगाच काहीही लिहिताय. मी म्हणालो नाही म्हणायला, इथे तुम्ही एकटे लिहीत नाही आहात.
"३७० रद्द करण्यासारखी दिलेली
"३७० रद्द करण्यासारखी दिलेली कारणं आणि ते करण्यासाठी निवडलेला मार्ग पटले नाहीत, असं म्हटलं." --> खरे कारण काय आहे ते जाणून घेणे फारसे अवघड नाही. ३७० चा फायदा घेऊन फोफावलेला दहशतवाद, पाकिस्तानकडे झुकत चाललेले तेथील नेते, तरुणांचा होत असलेला ब्रेनवॉश, त्यामुळे होणारी सैन्यहानी अशी अनेक करणे आहेत. ३७० रद्द करण्यामागे देशाची सुरक्षितता हा सर्वात महत्वाचा मुद्दा होता हे मी आधी लिहिले आहेच परंतु ते न सांगताही कोणालाही समजण्यासारखे आहे. आता राजकीयदृष्ट्या सर्वच गोष्टी अगदी उघडपणे मोदी शहांना सांगता येतीलच असे नाही. राहिला प्रश्न निवडलेल्या मार्गाचा तर याआधी मी त्यावर प्रतिसाद लिहिला होता. कदाचित २नही प्रतिसाद तुमच्या वाचनात आले नसावेत. काही तांत्रिक अडचण असावी. तरीही अजून खोलात जाणून घ्यायची इच्छा असेल तर वर 'युनूस' यांनी दिलेली युट्युब लिंक जरूर पहा. ३७० मुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशवाद कसा वाढला हे त्यात एका उच्चपदस्थ सैनिकानेच सांगितले आहे.
असो. तुम्ही तुमचे मत बदलावे असे माझे म्हणणे नाही. विरोधी मताचाही आदर आहेच. परंतु हा विरोध हा केवळ मोदी द्वेषातून नसावा हे माझे मत
दहशतवाद रोखायला ३७० चा अडथळा
दहशतवाद रोखायला ३७० चा अडथळा येतो आणि मोदी ते उघडपणे सांगू शकत नाहीत या अमूल्य माहितीबद्दल आभार.
दहशतवाद रोखायला ३७० चा अडथळा
दहशतवाद रोखायला ३७० चा अडथळा येतो आणि मोदी ते उघडपणे सांगू शकत नाहीत या अमूल्य माहितीबद्दल आभार.
नवीन Submitted by भरत. on 10 August, 2019 - 07:19 >>>
भरत, तुमच्याकडे कोहंसोहं यांनी मांडलेल्या वरील मुद्द्यांना उत्तरे नाहीत हे व काश्मीरचा विशेष दर्जा हटविण्याला तुमच्या विरोधामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांबद्धलची तुमची सहानुभूती आहे हे सांगितल्याबद्धल धन्यवाद...
दहशतवाद रोखायला ३७० चा अडथळा
दहशतवाद रोखायला ३७० चा अडथळा येतो आणि मोदी ते उघडपणे सांगू शकत नाहीत या अमूल्य माहितीबद्दल आभार---> धन्यवाद. त्यांनी उघडपणे काय सांगायचे आहे ते सांगितले आहे. त्यांनी काय सांगावे आणि सांगू नये हे आपल्या सर्वांपेक्षा त्यांना नक्कीच जास्त समजते नाही का?
खरे म्हणजे इथे अॅडमिन,
खरे म्हणजे इथे अॅडमिन, वेबमास्टर किंवा अन्य कुणी प्रभावी लोकांनी हस्तक्षेप करण्याची गरज आहे. मत खोडून काढणे वेगळे आणि मत का मांडता म्हणून वाद घालणे, टोमणे मारणे वेगळे. मी हे वेगवेगळ्या धाग्यांवर पाहिलेले आहे. चुकीचे मत मांडले तर ते नक्कीच मुद्दे मांडून निरस्त करता येते. पण कोर्टात जा , वाट बघा, इथे लिहू नका हा भंपकपणा मायबोलीचे प्रशासन चालवून घेते आणि एकालाही त्यात वावगे काहीच वाटत नाही हे खटकणारे आहे.
मनमोहनसिंग यांची अक्कल
मनमोहनसिंग यांची अक्कल काढणारे लोक आज अमक्या तमक्याला आपल्यापेक्षा जास्त कळते वगैरे सांगतात तेव्हां गंमच वाटते. याच अक्कल नसलेल्या मौबीबाबांकडे बजेटच्या आधी जावे लागले होते.
नावडत्या वारसांना मांडीवरून
घरातील नावडत्या वारसांना मांडीवरून ढकलणे , नको असलेल्या लोकांना चौथ्या वर्णात ढकलणे , हाच त्यांचा मर्मसिद्धांत आहे
नवीन Submitted by संजय पगारे
नवीन Submitted by संजय पगारे on 10 August, 2019 - 07:42 >>>
संजय पगारे भाऊ, प्रश्न विचारल्यावर पळून जाणे वा "मला तुमच्याशी चर्चा करायची इच्छा नाही" असला भंपकपणा सोडून त्या प्रश्नाला सामोरे गेलात तरच तुम्हाला तुमच्या अतिसंवेदनशीलतेवर व तुमच्या "मला वाटते तशीच चर्चा झाली पाहिजे" या मानसिकतेवर विजय मिळवता येईल.
असलेल्या लोकांना चौथ्या
असलेल्या लोकांना चौथ्या वर्णात ढकलणे , हाच त्यांचा मर्मसिद्धांत आहे
>> कुठल्या काळात वावरत आहात? इथे एकमेकांना एकमेकांचा वर्ण कसा कळू शकतो. चष्मा बदला कामा/काबो.
याच अक्कल नसलेल्या
याच अक्कल नसलेल्या मौबीबाबांकडे बजेटच्या आधी जावे लागले होते.
नवीन Submitted by संजय पगारे on 10 August, 2019 - 07:44 >>>
तिथे काय चर्चा झाली ते सांगता का जरा?
मुख्यमंत्री जेवतानाचे फोटो
मुख्यमंत्री जेवतानाचे फोटो टाकणे नितीनियमात बसतं वाटते.
घरातील नावडत्या वारसांना
घरातील नावडत्या वारसांना मांडीवरून ढकलणे , नको असलेल्या लोकांना चौथ्या वर्णात ढकलणे , हाच त्यांचा मर्मसिद्धांत आहे
नवीन Submitted by BLACKCAT on 10 August, 2019 - 07:50>>>>
हे काही कळले नाही. तुम्हाला असे कोणी ढकलून दिले होते की काय?
"मनमोहनसिंग यांची अक्कल
"मनमोहनसिंग यांची अक्कल काढणारे लोक आज अमक्या तमक्याला आपल्यापेक्षा जास्त कळते वगैरे सांगतात तेव्हां गंमच वाटते" -->
मी मनमोहनसिंग यांची अक्कल कधीच काढली नाही. उगाच खोट्या बातम्या पसरवू नका. अश्या खोट्या बातम्या पसरवण्याचा भंपकपणा मायबोलीचे प्रशासन चालवून घेते आणि एकालाही त्यात वावगे काहीच वाटत नाही हे खटकणारे आहे.
"याच अक्कल नसलेल्या मौबीबाबांकडे बजेटच्या आधी जावे लागले होते" --> देशहितसाठी एका अर्थतज्ञाचे मत जाणून घेणे यात वावगे काहीच नाही. परंतु असा मनाचा उदारपणा काँग्रेस किंवा त्यांच्या समर्थकांकडे नाही. कोणत्याही चांगल्या निर्णयाला केवळ तो मोदीने घेतला म्हणून विरोधच करत राहणार.
नवीन Submitted by कोहंसोहं१०
नवीन Submitted by कोहंसोहं१० on 10 August, 2019 - 07:55 >>
जाउंदया भाऊ, ते स्वतःला ममो समजतात. त्या गैरसमजातून काहीतरी खरडत असतात.
<< मंडळी, मला हि आता वाटु
<< मंडळी, मला हि आता वाटु लागलं आहे कि मोदि-शहा जोडगोळीच्या या निर्णयाचा हेतु नाहि, पण टायमिंग नक्किच चुकलेलं आहे. नोटाबंदिचा इतका मोठ्ठा (सो कॉल्ड) फियास्को होउनहि २०१९ ला या दुक्कलीने बहुमत खेचुन आणलं. कलम ३७०/३५ए चा निर्णय २०२४ च्या थोडा आधी घेतला असता तर या अशा इलइन्फॉर्म्ड हितचिंतकांनी त्यांचं काम चोख बजावुन परत भाजपाला बहुमताने निवडुन आणलं असतं. छ्या, मिस्ड अपॉर्च्युनिटी... Proud >>
------- आंतरराष्ट्रिय घडामोडी बघता टायमिंग परफेक्ट आहे.
तुम्ही मोदी - शहा यांना आणि त्यांच्या कर्तुत्वाला कमी लेखत आहात.... २०२४, २०२९ ची सोय झालेली आहे.
ईव्हीएम, निवडणूक आयोग यांना
ईव्हीएम, निवडणूक आयोग यांना सुद्धा कमी लेखून चालणार नाही.
ईव्हीएम, निवडणूक आयोग यांना
ईव्हीएम, निवडणूक आयोग यांना सुद्धा कमी लेखून चालणार नाही.
नवीन Submitted by संजय पगारे on 10 August, 2019 - 08:47 >>>
म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे संजय पगारे भाऊ?
अरे यांची गाडी अजुन पुढे
अरे यांची गाडी अजुन पुढे सरकतच नाहीये..... अजुन EVM?
जसे काही लोक अजुन नोटबंदीवर अडून बसलेत!
पुढे चला मंडळी!
राजसाहेबांचा घणाघात , यात ३७०
राजसाहेबांचा घणाघात , यात ३७० व्या कलमाबद्दल राजसाहेब काय बोलले ते ऐका. इतर मुद्देही ऐका. इथे जे लोक सांगताहेत, तेच राजसाहेब सुद्धा सांगताहेत. फक्त एकाच पक्षाचे, एकाच विचारांचे आणि केवळ दोनच माणसांचे समर्थक ऐकून घ्यायला तयार नाहीत. याचा अर्थ काय ते ही राजसाहेब सांगताहेत.
https://www.facebook.com/RajThackeray/videos/474459250040505/
बोलती बंद
बोलती बंद
आरं काय दिसनां ते राज ठाकरे
आरं काय दिसनां ते राज ठाकरे चे विचार.
३७० रद्द करायचं कारण मोदींनी
३७० रद्द करायचं कारण मोदींनी कमीतकमी भाजपच्या लोकप्रतिनिधींना आणि मंत्र्यासंत्र्यांना तरी सांगावं.
आता हरयाणाचे मुख्यमंत्री आदर्णीय मनोहरलालजी खट्टर म्हणताहेत आपण काश्मीरमधून लग्नासाठी मुली आणू शकू.
या आधी उ.प्र.म च्या एका भाजप आमदाराने आपले सगळे अवुवाहित कार्यकर्ते काश्मीरमधल्या गोर्या गोर्या मुलींशी लग्न करायला उत्सुक आहेत असं सांगितलं होतं.
(भाजप कार्यकर्त्यांची लग्नं जुळण्यात अडचणी येतात का? त्यांना मुली नकार देतात का?)
टीप -काश्मीरमधील मुलींना काश्मीरबाहेर लग्न करायला याआधीही बंदी नव्हती.
अहो त्यांना घरजावई व्हायचे
अहो त्यांना घरजावई व्हायचे असेल तर.
अरेरे. म्हणजे आणखीनच वाईट
अरेरे. म्हणजे आणखीनच वाईट स्थिती. घर नाही, रोजगार नाही.
बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचं आणि हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांचं , तसंच त्या आमदाराचं म्हणणं ऐकून वाटू लागलंय की देशातला बेरोजगारी आणि त्यामुळे लग्न न होऊ शकणार्या मुलांचा प्रश्न सोडवण्यासाठी कलम ३७० रद्द केलं.
काश्मीरची मुलेही तगडी आहेत ,
काश्मीरची मुलेही तगडी आहेत , त्यांना तुमच्या मुली देणार का , असेही मेसेज आता येताहेत
राष्ट्रीय एकात्मतेसाठी
राष्ट्रीय एकात्मतेसाठी साटंलोटं हा उत्तम मार्ग आहे.
जागतिक लोकसंख्या दिन हा
जागतिक लोकसंख्या दिन हा लोकसंख्येसाठी जागृती करण्याचा दिवस. त्या दिवशी (जुलै २०१९) भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवाराने जंतर मंतर वर कार्यक्रम ठेवला होता कि मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे यासाठी हा दिवस आहे. मुसलमानांची लोकसंख्या ४० कोटी झाली आहे असे सांगण्यात आले. आता काहीच दिवसात मुसलमान हिंदूंपेक्षा संख्येने जास्त होतील असे या कार्यक्रमात सांगितले गेले. सुदर्शन टीव्हीचा थुलथुल्या अँकर सुरेश चव्हाणके (हे कसलं आडनाव ?) , इंडीयन एअरफोर्सचे एक माजी अधिकारी , गिरीराज सिंह अशी सर्व वादग्रस्त मंडळी लोकांना खोटं नाटं सांगून भडकवत होती. जागतिक विश्व दिनाला या कार्यक्रमात हिंदू मुसलमान मुद्दा बनवला गेला.
इथे हा व्हिडीओ आहे. कृपया लिंक दिल्यानंतर रिपोर्ट करून बंद पाडू नये ही विनंती.
https://www.facebook.com/PeeingHuman/videos/346688042921519/
Pages