ऐतिहासीकः जम्मु व काश्मिर राज्याचा विशेष दर्जा रद्द

Submitted by अभि_नव on 5 August, 2019 - 03:23

एवढी वर्षे भारतासाठी डोकेदुखी ठरलेले घटनेचे कलम ३७० चे १ले उपकलम वगळता ३५अ सहित इतर सर्व कलम रद्द करुन, जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश तयार करण्याचा प्रस्ताव आज संसदेत मांडण्यात आला. संसदेत त्यावर चर्चा चालू आहे.
विरोधीपक्षीनी चर्चेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला व कोणाला बोलू देत नाहीत.
पुढे काय होतय याकडे पुर्ण जगाचे लक्ष.
--
१२५ वि. ६१ मतांनी भारतीय राज्यसभेत जम्मु काश्मिर पुनर्रचना कायदा पास करण्यात आलेला आहे.
आज रोजी, भारतात २८ राज्ये व ९ केंद्रशासीत प्रदेश आहेत.
या निर्णयात सहभागी असणा-य सर्व व्यक्ती व संस्थांचे अभिनंदन व धन्यवाद.
--
लोकसभेतही कायदा संमत.
बहुसंख्य भारतीय जनता, विविध क्षेत्रातले मान्यवर व आंतरराष्ट्रीय राजकीय नेते या सर्वांकडुन निर्णयाचे जोरदार स्वागत.

  • ३७० चे १ले उपकलम वगळता, इतर कलमे व ३५अ पूर्णपणे रद्द
  • जम्मु, काश्मिर व लडाख असे दोन नवे केंद्रशासीत प्रदेश
  • जम्मु व कश्मिर च्या केंद्रशासीत प्रदेशाला स्वतःचे विधीमंडळ असेल.
  • अनेक वर्षांपासुनची लडाखी जनतेची मागनी अखेर पूर्ण.
  • बुद्धिस्ट बहुसंख्येचे लडाख भारतातले पहिले राज्य (कें.प्र).
  • काश्मिरी नागरीकांचे दुहेरी नागरीकत्व रद्द, एकच भारतीय नागरीकत्व
  • एक देश, एक घटना, एक राष्ट्रगीत व एक झेंडा
  • काश्मिरपासुन कन्याकुमारीपर्यंत अखंड भारत


-

-

Group content visibility: 
Use group defaults

तुमच्या मते भाजपच्या चुका काढणारे सगळे फक्त काँग्रेसी समर्थक असतात का ? किंवा कुठल्या तरी पक्षाचे कार्यकर्तेच असतात का ?
सामान्य नागरिकांना मतं नसतात का ?
तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहात ?

नवीन Submitted by संजय पगारे on 9 August, 2019 - 08:16 >>>

दोन सर्जिकल स्ट्राईक्स , काश्मीर मधील आताची कारवाई भाजपच्या चुका आहेत काय? इथे "विरोधक पाकिस्तानला मदत कसे करतात?" यावर कांदा मुळा यांनी काही स्पष्टीकरण मागितलं म्हणून मी ते दिलं. त्यावरून तुम्ही आता नवीन विषय सुरू करताय..

विरोधकांमध्ये काँग्रेस येते म्हणून मी कॉंग्रेसचेही उदाहरण दिले. बाकी पहिल्या सर्जिकल स्त्राईकचे पुरावे केजरींनीही मगितलेले. दुसर्या स्राइकपर्यंत ते शहाणे झाले.

पण त्यांच्या विरुद्ध काही बोलायलाच नको हे अजिबातच पटत नाही. ते पण चुका करत असतात, अपुरी किंवा खोटी महिती पुरवतात... त्यांची कृती काहींना खटकत असेल तर संयत भाषेत विरोध करणार्‍यांचे स्वागतच व्हायला हवे.

उदय, विरोध करणार्यांचे स्वागत आहेच. तुम्ही स्वत: विरोध करताना पर्सनल हल्ला करत नाही आणि इतर कुठल्या इनसिक्युरिटीज त्यात आणत नाही हे कौतुकास्पद आहेच.
फक्त विरोध करताना काही लोकांनी दोन्ही बाजूंनी बोलू नये, एक काहीतरी स्टँड घ्यावा हीच अपेक्षा आहे.
१. मोदींनी विधानसभा निवडणूक का घेतली नाही म्हणायचं, पण वन नेशन वन इलेक्शन ला विरोध करायचा.
२. राज्यांना स्वायत्तता हवी म्हणायचं पण राज ठाकरेंनी हेच महाराष्ट्रात मांडलं तर त्याला विरोध करायचा. संजय निरुपम तर युपीबिहारींना महाराष्ट्र राज्यात आरक्षण मागत आहेत. त्यांचे सरकार आले तर देतीलही. गुजरातचं उदाहरण द्यायचे पण जे कायदे काँग्रेसने केले ते योग्य होते की अयोग्य याचं उत्तर द्यायचं नाही.
३. एकीकडे म्हणायचं की काश्मिरी मुस्लिम जिहादी आहेत, ते हिंसाचार करतील म्हणून त्यांना आपण दुखावलं नाही पाहिजे. किती दशकं असं ब्लॅकमेल सहन करणार, यातून बाकीच्या गटाना काय मेसेज जातो? याचं उत्तर द्यायचं नाही. आणि दुसरीकडे म्हणायच की हे लोक शांतताप्रिय आहेत, पंडित परत येण्याला कधीच विरोध नव्हता, इत्यादी. म्हणजे नक्की काय?
४. कलम ३७० उगाच बदनाम केलं गेलं हा एक दावा करायचा. जर इतकं हार्मलेस आहे तर मग काढून टाकायला विरोध का? मग म्हणायचं आमचा काढायला विरोध नाहीच, तर त्या पद्धतीला विरोध आहे. पण दुसरी सुयोग्य पद्धत काय ते सांगू शकत नाहीत आणि तुमच्या सरकारने इतकी वर्षे का नाही केलं, हेही.
५. तुमच्याच पक्षातले मातब्बर नेते मोदींना समर्थन करत आहेत त्याला त्यांचं 'वैयक्तिक मत' म्हणून सोडून द्यायचं? पक्षात इतकी मतभिन्नता असेल तर action घेतली न जाणं व policy paralysis होणं हे किती obvious आहे. अधीर रंजन लोकसभेत म्हणतो भारताला हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? That is your MP? आवरा!

पण विरोधकांनी पुढील तीन मुद्दे उपस्थित करणं मला योग्य वाटतं-
१. मेथड अजून सुधारित करता आली असती.
२. लीगल आव्हान दिल गेलं आहे, त्याचं काय होतं पहायला हवं.
३. याचे दूरगामी परिणाम काय होतील त्यानुसारच मागे वळून बघता हा निर्णय कसा होता हे नंतर जज करू.

आमचा ३७० काढायला विरोध नाही पण ज्या पध्दतीने काढले त्याला विरोध आहे म्हणणारे लोक मला सगळ्यात मानभावी वाटतात!
म्हणजे कौतुक करायचेच नाहीये; विरोध करायचा आहे पण तो उघड केला तर आपण वाईट ठरु म्हणून मग पद्धत चुकीची वगैरे खुसपटे काढत बसतात लोक!
लैच गेम्माड लोक..... मज्जा येतीय यांची कसरत बघायला Proud

मी-माझा आणि चैतन्य रामसेवक एकच आहेत याची कबुली दिल्यानंतर आता मी-माझा कडून उरल्या सुरल्या अपेक्षाही ठेवणे चुकीचे आहे.

Biggrin

१. मोदींनी विधानसभा निवडणूक का घेतली नाही म्हणायचं, पण वन नेशन वन इलेक्शन ला विरोध करायचा. >>> या धाग्यावर याचा काय संबंध आहे ? माझे असे प्रतिसाद आहेत का ?

२. राज्यांना स्वायत्तता हवी म्हणायचं पण राज ठाकरेंनी हेच महाराष्ट्रात मांडलं तर त्याला विरोध करायचा. संजय निरुपम तर युपीबिहारींना महाराष्ट्र राज्यात आरक्षण मागत आहेत. त्यांचे सरकार आले तर देतीलही. गुजरातचं उदाहरण द्यायचे पण जे कायदे काँग्रेसने केले ते योग्य होते की अयोग्य याचं उत्तर द्यायचं नाही. >> या धाग्यावर याचा काय संबंध आहे ? माझे असे प्रतिसाद आहेत का ?

३. एकीकडे म्हणायचं की काश्मिरी मुस्लिम जिहादी आहेत, ते हिंसाचार करतील म्हणून त्यांना आपण दुखावलं नाही पाहिजे. किती दशकं असं ब्लॅकमेल सहन करणार, यातून बाकीच्या गटाना काय मेसेज जातो? याचं उत्तर द्यायचं नाही. आणि दुसरीकडे म्हणायच की हे लोक शांतताप्रिय आहेत, पंडित परत येण्याला कधीच विरोध नव्हता, इत्यादी. म्हणजे नक्की काय? >>>> असे कोण म्हटले आहे या धाग्यावर ? माझे असे प्रतिसाद आहेत का ?

४. कलम ३७० उगाच बदनाम केलं गेलं हा एक दावा करायचा. जर इतकं हार्मलेस आहे तर मग काढून टाकायला विरोध का? मग म्हणायचं आमचा काढायला विरोध नाहीच, तर त्या पद्धतीला विरोध आहे. पण दुसरी सुयोग्य पद्धत काय ते सांगू शकत नाहीत आणि तुमच्या सरकारने इतकी वर्षे का नाही केलं, हेही. >>> बदनाम होणे आणि हार्मलेस असणे हे एकच आहे का ? ३७० मुळे जे तोटे झाले असे अमित शहा यांनी संसदेत सांगितले त्याचा आणि ३७० च दूरान्वयेही संनंध नाही असे सांगणे म्हणजे ते हार्मलेस आहे किंवा नाही असे सांगणे आहे का ?

५. तुमच्याच पक्षातले मातब्बर नेते मोदींना समर्थन करत आहेत त्याला त्यांचं 'वैयक्तिक मत' म्हणून सोडून द्यायचं? पक्षात इतकी मतभिन्नता असेल तर action घेतली न जाणं व policy paralysis होणं हे किती obvious आहे. अधीर रंजन लोकसभेत म्हणतो भारताला हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? That is your MP? आवरा! >>>>> माझा पक्ष कोणता ? माझा नेता कोणता याबद्दल मला मार्गदर्शन कराल काय ?

तुमच्या मते विरोधक म्हणून फक्त कुठल्या तरी तुम्हाला अपेक्षित असलेल्या पक्षाच्या लोकांनीच चर्चेत भाग घ्यायचा आहे काय ? कारण सगळ्यांना एकाच मापात तोलत आहात.

एकूणात तुमच्या प्रतिसादाचा लसावि काय आहे ?

त्यातही मुद्दा क्र ५ मधे पक्षातल्या लोकांनी वेगळं मत मांडलं म्हणजे अ‍ॅक्शन घेतली पाहीजे हे तुम्ही लोकशाही असल्यामुळे लिहीताय असे मला वाटते. चूक असेल तर करेक्ट करा प्लीज.

<१. मोदींनी विधानसभा निवडणूक का घेतली नाही म्हणायचं, पण वन नेशन वन इलेक्शन ला विरोध करायचा.>
या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत हे कळत नसावं हे शक्य नाही. जम्मू काश्मीर विधानसभा नोव्हेंबर २०१८ मध्ये भंग झाली. लोकसभेसोबत ति थे विधानसभा निवडणुका घेणं शक्य होतं. तीन रा ज्यांत तशा झाल्या. याचा वन नेशन वन इलेक्शनशी का ही ही संबंध नाही.
राज्यातल्या नेत्यांनाही निवडणुका हव्या होत्या.
का यदा सुव्यवस्थेचं कारण दिलं, जे लोकसभा निवडणुकांच्या आड आलं नाही ?

२. ३७० रद्द करताना तिथे विधानसभा = राज्यातील जनतेचे प्रतिनिधी नको होते, म्हणून हे केलं असं म्हणायला वाव आहे.

३ .३७० मुळे लोक मागासलेले राहतात हा दावा खोटा आहे हे मानव विकास निर्देशांकावरून सिद्ध झाल्यावर त्या मुद्द्याला फाटे फोडले गेले. काश्मीरचा रँक चक्क गुजरातपेक्षा सरस आहे.

४. काश्मीरचा सेंट्रल टॅक्सेस मधला वाटा आणि काश्मीरला सेंट्रल टॅक्सेस मधून मिळणारा वाटा याबद्दल धादान्त खोटे दावे केले गेले. उत्तर प्रदेशशी तुलना केली गेली. पुन्हा, याचा ३७० शी संबंध कसा येतो? मग गेल्या साताठ वर्षांतल्या विकास आकड्यांची तुलना केली गेली.
काहीही झालं तरी लेटेस्ट आकडेवारीनुसार काश्मीर उत्तर प्रदेशच्या कित्येक पावले पुढे आहे. हे त्यामुळे लपत नाही.

५. सेंट्रल ग्रँटचा मुद्दा आला, त्यात तथ्य आहे. पण त्याची कारणं कोण सांगेल?

६. कॅग रिपोर्ट, डेफिसिट, कर्ज हे इतर राज्यांनाही लागू असलेले मुद्दे आहेत. त्यांचा संबंध ३७० शी जोडला गेला.

७. काश्मीरमध्ये प्रत्यक्ष आलेल्या दोन मोठ्या नैसर्गिक आपत्तींची तुलना आपत्तीप्रवणतेशी केली गेली. काही कळतंय?

८. करणसिंग यां च्या वक्तव्यातला सोयीचा भाग उचलला गेला. राज्यातल्या दोन प्रमुख पक्षांना गुंडाळून ठेवल्याबद्दल आणि राष्ट्रदोही ठरवण्याबद्द्ल त्यांनी आक्षेप घेतलाय.
९. डॉ. आंबेडकरांनी ३७० कलम लिहायला नकार दिला हे सांगणारे, त्यांनी काश्मीर खोर्‍यात जममत आजमावून फाळणीचा पर्याय खुला ठेवण्याबद्दल सुचवलं होतं, हे का सांगत नाहीत ? ( फाळणी म्हणजे भूभा गाची विभागणी. ज्यांना राहायचं नाही, त्यांनी चालते व्हा, असं नाही.)
.१०. गोवा, मराठवाडा इथे बळाचा वापर झाल्याचा दाखला देणारे तिथे जनताच मुक्तिसाठी लढत होती आणि बळ तिथल्या सत्ताधार्‍यांविरोधात वापरलं होतं , हे विसरतात. डिट्टो बांग्लादेश.

*१०. काश्मीरमध्ये डायनॅस्टि पॉलिटिक्स संपणार म्हणे. भाजप मध्ये देशभरात त्यांचेच अनेक नेते घराणेशाहीतून आले आहेत. ते कमी पडले तर दुसर्‍या पक्षातून सुजय विखे टाइप आयात केले गेले. शिवसेनेची तिसरी पिढी एकही निवडणूक न लढवता पक्षाची धुरा सांभाळतेय. हे सगळं ३७० कलम रद्द केल्याने थांबेल. बरोबर ?

३७० रद्द झाल्याने काय काय चमत्कार होणार हे ऐकून नोटाबंदीच्या घोषणेची आठवण आली.

असो. तेच तेच पुन्हा पुन्हा लिहिण्यात काही पॉइंट नाही. जम्मू काश्मीरमध्ये लवकरात लवकर जनजीवन सुरळीत होवो आणि तिथल्या जनतेला या निर्णयाचे लाभ मिळोत अशी आशा आणि इच्छा व्यक्त करून थांबतो.

समग्र आंबेडकर नावाचे एक फेक पुस्तक आहे. हे पुस्तक संघाला हवे असणारे आंबेडकर या दृष्टीकोणातून लिहीले आहे. त्यातले उतारेच्या उतारे फेसबुकवर कुणी तरी टाकले आहेत. आणि मागचा पुढचा विचार न करता लोक ते व्हायरल करत आहेत. या पुस्तकात खोटा मजकूर आहे. सत्याचा विपर्यास केला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काश्मीर संबंधींचे मत देशाच्या फाळणीची चर्चा चालू असतानाचे आहे. ते राज्यसभेत बोलत होते. घटनासमितीत नव्हे. घटनासमितीत बोलणे आणि राज्यसभेत बोलणे यातला फरक लक्षात घ्यायला हवा. राज्यसभेत वैयक्तिक मत मांडले जाऊ शकते. ते पास झालेच पाहीजे याचा आग्रह नसतो.

काश्मीर मधे काश्मीर खो-यातील जनता एका बाजूला, राजा एका बाश्मी, जम्मू मधील एका बाजूला तर लडाख मधली तिस-या बाजूला असे चित्र होते. त्यामुळे बाबासाहेबांनी हा पेच सोडवायचा असेल तर त्रिभाजन केले तर लडाख आणि जम्मूतील नागरिकांना आपला वेगळा निर्णय घेता येईल आणि मुस्लीम बहुसंख्य जनतेला आपला निर्णय घेता येईल असे मत मांडले होते. कारण भारतात इतर सर्व प्रांतात हेच चालू झाले होते. कुठल्या वेळी मत मांडले याला महत्व आहेच.

त्यानंतर आक्रमण झाले आणि मग महाराजा हरीसिंग यांनी सामीलीकरणाचा नव्हे तर जोडणीचा करार केला हा इतिहास आहे.
यासाठीच ३७० म्हटले की हा इतिहास मांडणे आलेच.
यात शेख अब्दुल्ला यांना नाहक दूषणे दिली जात आहेत.

असो. तेच तेच पुन्हा पुन्हा लिहिण्यात काही पॉइंट नाही. जम्मू काश्मीरमध्ये लवकरात लवकर जनजीवन सुरळीत होवो आणि तिथल्या जनतेला या निर्णयाचे लाभ मिळोत अशी आशा आणि इच्छा व्यक्त करून थांबतो.
>>
+१११११
सहमत.
धन्यवाद.
जय हिंद. जय महाराष्ट्र.

असो. तेच तेच पुन्हा पुन्हा लिहिण्यात काही पॉइंट नाही. जम्मू काश्मीरमध्ये लवकरात लवकर जनजीवन सुरळीत होवो आणि तिथल्या जनतेला या निर्णयाचे लाभ मिळोत अशी आशा आणि इच्छा व्यक्त करून थांबतो.//

+१
Same here भरत. फायनल verdict भविष्य काळातच येणार. फेसबुकवर कावडे म्हणून एक आहेत त्यांच्या पोस्ट चांगल्या आहेत (त्यातून नेहरूंची बाजू समजली.).
तुमच्याशी चर्चा करण्यामागे आणि तुमच्या पोस्ट कोट करण्यामागे तुमच्याबद्दल पर्सनली आदर आहे हे एक मुख्य कारण आहे Happy . अन्यथा काही ट्रोल आयडीजच्या पोस्ट माझ्याकडून कायमच ओलांडल्या जातात.
तुम्ही वैयक्तिक हल्ले न करता चर्चा केली याबद्दल धन्यवाद आणि माझ्याकडून काही चुकीचं बोललं असल्यास सॉरी.

सनव जी, मला ट्रोल ठरवल्याबद्दल आपलेही मनःपूर्वक आभार.
माझ्या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज त्यामुळे संपली. Happy

राज्यपाल व भारतीय संसद हे काश्मिरी व लडाखी जनतेचे प्रतिनीधी आहेत >> गम्मतच की! मग तिथे विधान्सभा कशाला हवी? खरंतर या देशातील प्रत्येक राज्यातून विधान्सभा हटवुन तिथे राज्यापाल बसवयचा.

कोणी इथे दहा मुद्दे की वीस मुद्दे मांडले तरीही प्रश्र्नांची खरी उत्तरे येणारा काळच देणार आहे. हे समजलं तर चर्चेचं गुर्हाळ लावायचं कशाला. समजूतदार पणा हवा त्यासाठी.

गम्मतच की! मग तिथे विधान्सभा कशाला हवी? खरंतर या देशातील प्रत्येक राज्यातून विधान्सभा हटवुन तिथे राज्यापाल बसवयचा.

नवीन Submitted by चिवट on 9 August, 2019 - 09:53. >>>

मस्त आयडिया आहे रे ... सांगून टाक रागा ला 2024 च्या काँगी जाहीरनाम्यात लिहायला..

भारता सारखा विचित्र देश जगात खचितच दुसरा कोणता असेल .
किती तरी धर्म,किती तरी जाती ,किती तरी भाषा, आणि किती तरी वेगवेगळ्या परंपरा .अगदी जेवणाच्या परंपरा पण वेगळ्या .
आणि ह्या सर्वांना एकत्र ठेवून त्याला देशाचे स्वरूप देणे म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे .
मुस्लिम देशांचा शेजार भारतातील लोकांना एकत्र बांधून ठेवायला जी कारण आहेत त्यातील एक कारण आहे .
राजकीय विषयात जेव्हा इथे कमेंट होते त्या कमेंट वर खूप गोष्टींचा प्रभाव असतो ,( त्यातील धर्म आणि जात आणि भाषा हे महत्त्वाचे घटक आहेत )
एक भारतीय म्हणून कमेंट दिली जात नाही .
.
तसेच पाकिस्तान मध्ये सुधा हिंदुस्थान मुळे फूट पडत नाही कारण त्यांना हिंदू ची भीती दाखवली जाते .
भारतीय हिंदू ना मुस्लिम धर्मियांची भीती वाटते .
कारण इतिहास हा हिंदू मुस्लिम लढाई चा आहे .
तो डोक्यातून जाणे शक्य नाही .
त्या मुळे पाकिस्तान ह्या विषयावर सर्व वेगळेपण विसरून हिंदू एक होतो.
आणि त्यात कोण्ही विरोधी मत दिले की तो दुश्मन वाटू लागतो

त्या मुळे पाकिस्तान ह्या विषयावर सर्व वेगळेपण विसरून हिंदू एक होतो.
आणि त्यात कोण्ही विरोधी मत दिले की तो दुश्मन वाटू लागतो >>> पाकिस्तान नसता तर काय झाले अस्ते ना? Wink

>>त्या मुळे पाकिस्तान ह्या विषयावर सर्व वेगळेपण विसरून हिंदू एक होतो.<<

इथे खरतर "हिंदू" ऐवजी "भारतीय" अपेक्षित आहे.... पण ते एक असो!
हा आपला गैरसमज आहे हे पुलवामा-बालाकोट च्या वेळेस इथल्याच काही सभासदांच्या प्रतिक्रियेतुन पुराव्याने शाबित झालेले आहे
काही विरोधकांसाठी देशापेक्षा मोदीद्वेष जास्त महत्वाचा आहे!

फर्रब, करपली का रे??

नवीन Submitted by चिवट on 9 August, 2019 - 11:44 >>>

चिवत्या ची करपली वाटत...

पाकिस्तानमध्ये फूट पडली हो महाराज. आणि तिला अंतिम रूप भारतानेच दिलं. बांग्ला देश#

शाळेत शिकवलेल्यग प्रतिज्ञेत म्हटलंय - माझ्या देशातील सम्रुद्ध आणि विविधतेने नटलेली ल्या परंपरांचा मला अभिमान आहे. आणि त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी प्रयत्न करेन.

या विविधतेबद्दल सगळ्या जगाला कौतुक आहे.
तुमचं रसायन वेगळं दिसतंय.

मी लाख प्रयत्न करीन पण माझ्या आजूबाजूला ही पात्रता अंगी नसलेले लोक असतील तर प्रतिज्ञेला काही अर्थ नाही.

भारतात जे आत्मघाती हलले पाकिस्तानी लोक करतात ते काही भारत दुश्मन देश आहे म्हणून नाही तर हिंदू हे मुस्लिमांचे क्षत्रू आहेत आणि त्यांचा नाश करणे हे आपले धर्म कार्य आहे .
असेच त्या अतिरेकी लोकांच्या डोक्यात भरलेलं असतं.
आपण उगाच च आपल्या समाधानासाठी हे सत्य मान्य करायचे टाळतो

भाषा ,परंपरा वेगळ्या असल्या तरी अस्तित्व टिकवून प्रभाव वाढवणे हे हिंदू साठी खूप गरजेचं आहे .
आणि तेच ध्येय डोळ्या समोर ठेवून आपसात मतभेद टाळणे महत्वाचे

प्रतिक्रियेतुन पुराव्याने शाबित झालेले आहे
काही विरोधकांसाठी देशापेक्षा मोदीद्वेष जास्त महत्वाचा आहे
.
१००% सहमत आहे ह्या विचाराशी .
मोदी हे हिंदुवादी पक्षाचे एक मजबुत हिंदू नेते आहेत त्या मुळे मोदींना ना विरोध आहे येथील पुरोगामी आणि कथित धर्म निरपेक्ष लोकांनाच .
एचआयव्ही चे जंतू ना आपल्या शरीराची संरक्षण व्यवस्था ओळखू शकत नाही आणि मग ते जंतू शरीराला पोखरून काढतात .
तसेच हे पुरोगामी वरून ओळखता येत नाहीत आणि त्या मुळे आपण गाफील राहतो

एच आय व्ही दुषित रक्त चढवल्याने किंवा असुरक्षित संबंध ठेवल्याने होतो राजेश भाऊ. आपण आपली खबरदारी घ्यायची.

Pages