बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रुपाली सरड्याला पण लाजवेल !!!!>>>अगदी खरं... रुपाली पेक्षा वैशाली बरी वाटते...तिने बरीच नाती जोडली आणि टिकवली पण आहेत... शेवटी तर सगळेच पलटतात पण रुपाली धन्य आहे त्या बाबतीत... Real life मध्ये सुद्धा अशीच असेल तर कठीण आहे.. परवाच्या एपिसोडमध्ये observe केलं वैशालीच खूप लोकांशी चांगलं पटतं... आता हीनाला समजवण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतेय..

यावेळी बरेचदा हा show scripted आहे असंच वाटतंय... अभिजीत store room मधून गेला तेव्हा त्याचं दार बंद केलं होतं...सगळे तिथेच असताना दार उघडले गेले.. मग ज्या व्यक्तीने दार उघडले तो तिथून लग्गेच गायब कसा झाला? Store room la दुसरा दरवाजा आहे मान्य.. पण सगळे तिथेच असताना दार उघडले तर त्याला दुसर्‍या दाराने जायला 2-3 सेकंद तर लागतील ना... बर सगळा प्रकार झाल्यानंतर घरातले अभिजीत बद्दल काहीच बोलत पण नव्हते.. कमाल आहे..

शिवानी आल्यापासून वैशाली बदलली (किंवा तसं दाखवतात) असं वाटत नाहीए का? आपण सुद्धा सेन्सिटिव्ह आहोत असं दाखवतेय.
अभिजीतला म्हणत होती, जे लोक इथे जोड्य बनवतात, त्यांचं बरं असतं. बाकीच्यां नी त्रास दिला तर एकमेकांचे खांदे असतात, रुसवा फुगवा करता येतो.

माघव, नेहा यांनी हिनाला झिडकारून टाकण्याचं कारण काय? गेल्या शनिवारी हे पहिल्यांदा कळलं.
ही आपल्या जागेवर आली म्हणून शिवानीला ती सहन होत नाहीए का?

<बर सगळा प्रकार झाल्यानंतर घरातले अभिजीत बद्दल काहीच बोलत पण नव्हते.. कमाल आहे.>
मागच्या सीझनमध्ये पण असं काहीतरी झाल्याचं बोललं कोणीतरी त्यांच्यापैकी.
त्या आरडाओरड्यात पण माधवने नवीनच पॉइंट काढला. तुम्ही अ‍ॅक्टर्स आहात, तर अशावेळी शांत राहून ऐकायचं असतं हे तुम्हाला कळत नाही का?

तुम्ही अ‍ॅक्टर्स आहात, तर अशावेळी शांत राहून ऐकायचं असतं हे तुम्हाला कळत नाही का?>>> Lol मॅडी मॅड सारखा वागतोय.... पण माझा आवडता खेळाडु आहे.. का उगाच ती दोघं त्या हिनाच्या मागे लागलीत.. निसटलीना आता ती त्यांच्यातुन..
एक आहे पण शिव लॉयल राहिला वीणा बरोबर.. आवडलं मला ते.. तशी ती जोडी मला बिल्कुल आवडत नाहि..

शिवानी ला डम्ब च स्पेलिंग येत नाही>>
नाही कोणीतरी येत होत म्हणून तिचा B लिहायचा राहुन गेला. कोण बघत नहियेना हे लक्षात ठेवून एखादी गोष्ट करणे अवघड असते. सो घाईत लिहताना राहिले तिच्या कडुन.

त्या आरडाओरड्यात पण माधवने नवीनच पॉइंट काढला. तुम्ही अ‍ॅक्टर्स आहात, तर अशावेळी शांत राहून ऐकायचं असतं हे तुम्हाला कळत नाही का?>>
त्याचे म्हणणे होते की अ‍ॅक्टर्स आहात म्हणुन आरडाओरडा केला पाहिजे का .कारण सगळे त्या दरवाजावर हात आपटून ओरडत होते जसे सरीयल मध्ये करतात. म्हणून तो बोलला शूटिंग मध्ये जे करतो ते करायाला लागलो का इकडे. तर जरा शान्त राहुन आतला आवाज एका.
जे अ‍ॅक्टर्स आहेत त्यानीतरी सीरियल सारखा आरडाओरडा न करता शान्त रहा असे त्याचे म्हाणणे होते .
कारण वैशाली ही आरडाओरडा करत होती आणी ती सिन्गर आहे .

हिना ही माधव आणी नेहा ला विनाकारण पोक करत आहे . तिला कळले होते की शिवानि ने कपडे विस्कटले आहेत तिचे तरिही ती माधव आणी नेहा जवळ येउन भूत भूत करत होती. आता माधवचे पहिल्या आठवड्यातले रुप बाहेर आले .तेंव्हा ही तो असाच ओरडून बोलायचा.

हिना ने काल ओळखलं होतं का की शिवानी तिचा खून करायचा प्रयत्न करतेय. कारण ती नंतर आतमधे असताना एकटीच बोलत होती की शिवानी सुमारे ३-४ तास तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती आणि शिवानी ला मी अजिबात सक्सेस होउ देणार नाही. ई ई/..बहुतेक तिला कसं मारणार हे कळलं नव्हतं फक्त मारणार आहे हे कळलं होतं असं वाटलं.
तसं असेल तर हिना स्मार्ट आहे की एकदम. सावध होउन खेळतेय Happy

अभिजित ने शीव ला छान समजावले वीणा चा सांकेतिक खून करण्याकरता. शिवाय शीव ने जो वीणा चा टॉप आणलेला तो एकदम साधा होता. तो फाडला असते तर काय झाले असते. शीव ने नंतर वौशली आणी अभिजित चे उगीचच नाव घेतल्या सारखे वाटले. त्यांचा सांकेतिक खून त्याने माफी मागुन केला असता असे मला वाटते. विणा चे मन जपण्यासाठी त्याने विणा चा नाही केला सांकेतिक खून.
विणा ला allready कळले होते शीव खुनी आहे याचा ही त्याच्या टास्क वर परिणाम झाला. शीव ला वाटते असे केले म्हणजे प्रेक्षक आपल्याला सपोर्ट करतील की हा किती चांगलाआहे म्हणून.
तो बोलला की मला माहितेय मी पूढे जाणार. म्हणजे तो overconfident आहे .
पुर्वी शीव स्वत: साठी खेळायचा तरी 3आठवड्या पासुन तो फक्त विणा साठी च खेळतो.

यावेळी बरेचदा हा show scripted आहे असंच वाटतंय... अभिजीत store room मधून गेला तेव्हा त्याचं दार बंद केलं होतं...सगळे तिथेच असताना दार उघडले गेले.. मग ज्या व्यक्तीने दार उघडले तो तिथून लग्गेच गायब कसा झाला? Store room la दुसरा दरवाजा आहे मान्य.. पण सगळे तिथेच असताना दार उघडले तर त्याला दुसर्‍या दाराने जायला 2-3 सेकंद तर लागतील ना... बर सगळा प्रकार झाल्यानंतर घरातले अभिजीत बद्दल काहीच बोलत पण नव्हते.. कमाल आहे..>>>>> त्यांना याबद्दल सूचना देतात पण आपल्याला प्रत्येक सूचना दाखवत नाहीत.

अभिजीतचं गायब होणं हा ह्या टास्कचाच भाग आहे असं बिबाॕ ने सांगितलं म्हणून कदाचित ह्यावर पूढे चर्चा झाली नसावी

आता शिवने फोन परत करण्यासाठी सगळ्यात आधी स्टैर रूममध्ये यायला हवं अशी सूचना अभिजीतकरवी दिलीय.

अभिजीतने एकट्याने यावं अशी अनाउन्समेंटही केली असेल. त्याला आदल्या दिवशी डॉक्टरची गरज होती असं दाखवलेलं.

Haven't watched past 2 episodes but Twitter is flooded with rumors of Shiv Thakre leaving the show for personal reasons !
What's wrong with this season! I hope rumors are part of some task !

कालचा टास्क आवडला मला, किशोरी शहाणे यांचा खून करणं फारच सोपं होतं..
हिना वाटते तेवढी dumb नाहीये, शिवानीने खूप प्रयत्न केले तिला रडवण्याचे पण ती नाही हरली, Emotional fool नाहीये ती...पण तिने नेहाची चिठ्ठी का लपवली? आणि शिवनीचे सामान कोणी लपवले ते कळलं नाही..
हिनाच्या बडबडीला कंटाळून तिची पँट पूलमध्ये फेकली का? पण मग रुपाली ने का साथ दिली, तिला तर हिना ने मदत केली होती ना, रुपाली एक नं रंगबदलू आहे यार, आवडत नाही ती मला बिलकूल..
शिवने वीणासाठी loyalty दाखवणं त्याला महागात पडेल बहुतेक, इथे जीवनसाथी शोधायला आलाय की शो जिंकायला??? लोक त्याला सहानुभूती देतील असं वाटलं की काय त्याला??
नेहा आहे next खुनी हे मस्त, ती चांगलं डोकं चालवेल, अभिजीत पण म्हणला तसं, आजच्या एपिसोड मध्ये अजून मजा येईल..

बर सगळा प्रकार झाल्यानंतर घरातले अभिजीत बद्दल काहीच बोलत पण नव्हते.. कमाल आहे..
>>> बोलले असणार पण आपल्याला नाही दाखवले. अक्खे 24 तास अर्ध्या तासात दाखवताना भरपूर गोष्टी दाखवत नाहीत.

बिबा पण चॅप्टर आहे. वैशाली चा सांकेतिक खून करायला कापड अडगळीच्या खोलीत टाका आणि विना चा टॉप फाडा .
विना चा टॉप अडगळीच्या खोलीत टाका किंवा पूल मढे टाका असते तर शिव ने नक्की केला असता .

Thakre leaving the show for personal reasons ! >>> सो सॅड. माझा आवडता स्पर्धक. हे शॉकींग आहे माझ्यासाठी.

आता ह्या सीझनमधे जो जिंकेल तो जिंकूनही हरल्यासारखा, कारण समोरुन काही कॉम्पिटीशनच नाही. नेहाच जिंकेल पण जिंकूनही न जिंकल्यासारखीच ती.

विना चा टॉप अडगळीच्या खोलीत टाका किंवा पूल मढे टाका असते तर शिव ने नक्की केला असता . >>> खरं आहे.

विना चा टॉप अडगळीच्या खोलीत टाका किंवा पूल मढे टाका असते तर शिव ने नक्की केला असता . >>> खरं आहे.>>> हो पण शीव ने वीणा चा आणलेला टॉप खुपच साधा होता. तो फाडला असता तर काय झाले असते.
शीव बाहेर गेलाय ही अफवा आहे बहुतेक.

शीव बाहेर गेलाय ही अफवा आहे बहुतेक. >>> अफवाच असुदे.

तो म्हणालेला ना केळकरला तू, ताई आणि वीणाशी loyal राहणार मी तर असा काही task असूदे. मग केळकरसाठी जातोयस का बाहेर etc.

किंवा तो voting मध्ये एक नं वर आहे. अशा news आल्या कि लोकं votes देणं बंद करतील आणि दुसऱ्याला देतील अशी आयडिया असू शकते. आतातर मी अजून votes देते जाऊन त्याला. आधी दोन दिलेली आणि देणार नव्हते पण आता देते अजून थोडी.

Amupari तेवढी votes नाहीत आता, वेळही खूप जातो तेवढा वेळही नाही. दोन वीणा एक माधवला दिलंय आणि दोन शिवला. पण एक नऊ देईन त्याला तुम्ही सांगितलेल्यातला Lol

नऊ देते, दोन दिली आहेत. अजून सात देईन.

मस्त झाला कालचा टास्क. मज्जा आली.

वैशाली चा सांकेतिक खून करायला कापड अडगळीच्या खोलीत टाका >>>>>>> लाल रगान्च कापड टाकायला सान्गितल होत अडगळीच्या खोलीत. वैशालीने लाल टॉप घातला होता. मी जर शिवानीच्या जागी असते तर तिला अख्खीच्या अख्खी अडगळीच्या खोलीत टाकली असती.

शीव चा सांकेतिक खून झाल्यावर वीणा ला धक्का बसला असेल. >>> >>>>>> तिला कसला धक्का बसतोय? आरामात बसली होती तेव्हा जेवत.

विणा ला allready कळले होते शीव खुनी आहे याचा ही त्याच्या टास्क वर परिणाम झाला. >>>>>>> अगदी अगदी. भरीस भर म्हणजे विणाशी भाण्डला सुद्दा टास्कच्या नादात. आता आपल्याला पुन्हा हार्ट शेप्स बघावे लागतील. Proud विणा बेडवर झोपलेली असताना तिला ज्या प्रकारे तो मनवत होता ते मात्र क्यूट होत. Happy

पण तिने नेहाची चिठ्ठी का लपवली? आणि शिवनीचे सामान कोणी लपवले ते कळलं नाही.. >>>>>>>> हिनाला बिबॉने सिक्रेट टास्क तर दिला नाहीना , हाउसमेटसच्या वस्तू लपवण्याचा? Uhoh

हिनाचे कपडे बेडमधून टाकणे, टॉप पाण्यात टाकणे हे सगळ शिवानी हिनाला रडवण्यासाठी करत असावी मेबी. प्रिकॅप मात्र भन्नाट आहे.

<बर सगळा प्रकार झाल्यानंतर घरातले अभिजीत बद्दल काहीच बोलत पण नव्हते.. कमाल आहेअभिजीतचं गायब होणं हा ह्या टास्कचाच भाग आहे असं बिबाॕ ने सांगितलं म्हणून कदाचित ह्यावर पूढे चर्चा झाली नसावी.> >>>>>>>> शिव आणि शिवानीला कळलच असेल ना फोनवर बोलताना तो केळकर आहे ते.

नेहाला खुनी केल हे मात्र छान केल. अब आयेगा मजा. Happy

शीव बाहेर गेलाय ही अफवा आहे बहुतेक. >>> अफवाच असुदे. >>>>>>> आमेन अन्जू Happy

नेहा खुनी असल्याची अनाउन्समेण्ट केल्यानन्तर बिबॉ अभिजितला इन्सट्रक्शन्स देत होते ते मात्र नीट ऐकू गेल नाही. कुणी सान्गाल का नक्की बिबॉ काय करायला सान्गत होते केळकरला?- तेच शीव आता खुनी नसुन समान्य नागरिक आहे तर त्याला दिलेला मोबाइल परत करायचा आहे . तर जेंव्हा store रूम ची बेल वाजेल तेंव्हा शिवला पहिल्यांदा आत जाऊन डॉक्टर ला तो फ़ोन द्यायाचा आहे. हे केळकर ने शीव ला सांगायचे. >>>>>>>> धन्स अमुपरी. Happy

तेच शीव आता खुनी नसुन समान्य नागरिक आहे तर त्याला दिलेला मोबाइल परत करायचा आहे . तर जेंव्हा store रूम ची बेल वाजेल तेंव्हा शिवला पहिल्यांदा आत जाऊन डॉक्टर ला तो फ़ोन द्यायाचा आहे. हे केळकर ने शीव ला सांगायचे.

जेंव्हा पासुन हा वीकेंड चा वार झाला आहे . शीव मध्ये काही तरी बदल झालाय त्याच्या चेहरयावर सतत टेन्शन चे भाव दिसतात आवाज ही वेगळा वाटत आहे. थोडा confidance लो झाल्या सारखा वाटतो. या टास्क च्या वेळी ही तो इतका उत्साही नाहिये.आणी कुणाला असे वाटते का.?

Pages