बिग बॉस सिझन नंबर दोन - धागा २

Submitted by कटप्पा on 1 July, 2019 - 10:52

बिग बॉस दोन चा पहिला धागा जवळजवळ दोन हजार प्रतिसाद झाले आहेत।
पुढील चर्चेसाठी हा धागा माझ्यातर्फे तुम्हाला भेट।
माझे मत वैशाली ला - तीच जिंकणार।।।

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

विकेंडच्या वारचा ओपनिंग मानलाग मा़ंजरेकर अक्षरशः वाचुन दखवतात. कबुल आहे, स्क्रिप्टेड असल्याने टेलीप्रॉम्प्टर वरुन वाचावं लागतं, पण ते अगदिच धडा वाचल्यासारखं करु नका. कलाकार आहात ना तुम्ही? नंतर एकेकाची तासताना मात्र हे असं अवघडणं जाणवत नाहि... Wink

वैशाली.
पंचिंग bag नंतर ती खूप mellow down झाली होती असं वाटतं.

जाताना आपल्या ग्रूपला ताईचे सल्ले देऊन गेली.

आज काय काय झालं ?
शिव ला बाहेर जा म्हणाले होते म मां त्याचं काय झालं ? का नुसतंच धमकी ?
वैशाली गेली म्हणजे आता केळकर ने रडून थैमान घातले असेल आत.
आता रुपाली पुढचा नंबर. या वीक मध्ये तिने काहीच केलं नाही.

वैशाली बरोबर बोलली आज रुपालीबद्दल, तिचा काहीही भरोसा देता येत नाही...
DCH मधला dialogue आठवला - आज पूजा कल कोई दुजा Wink

वीणा टास्कमध्ये नाही तर आठवडाभर फेअर होती, टास्क फार केलाच नाही तिने. तिने पटकन हिनाला पोळी करून दिली, विरुद्ध टीमने दुपारी lunch केलं त्या दमल्या असतील ही बाजू घेतली हिनाला समजवताना, नेहाचं पत्र फाडु नको सांगितलं हिनाला, शिवला टॉप फाडला असतास तर टीममध्ये राहिला असतास सेफ, आता एकच सेफ आहे हे तिचं वागणं जसं मला आवडलं तसं म मांना आवडलं असेल, मुख्य तिने मान ठेवला त्यांचा.

याउलट शिवानी चढल्यावर तिने एकदा सांगून बाजूला झाली आणि कन्फेक्शन रूममध्ये माफी मागितली तिच्या आई बाबांची.

नेहा माधव शिवानी आल्यावर चढलेच आहेत, त्याचा माज दाखवतायेत सर्वांनाच. पण तरीही माधवला अति बोलले, तेव्हा मीही बास करा आता म्हणाले आणि हिनाला तसं कमी बोलले असं वाटलं, तिच्या अंगात नेहा वीणा शिवानी तिघी शिरल्या होत्या.

म मांनी पूर्ण आठवड्याचं रेटिंग दिलं, माझ्यामते वीणा नीट वागली त्यामुळे योग्यच होतं ते.

वैशालीने परफेक्ट वर्णन केलं रुपालीचं जाता जाता, आता रुपाली जायला हवी आहे खरंतर.

Btw आरोहने 5 फायनलिस्ट म्हणून कोणा कोणाची नावं घेतली, शिवचं घेतलं नाही ते लक्षात आलं. बरं केलं, शिवने आता तरी सिरीयस व्हावं.

पण आरोहने स्वतःचं नाही घेतलं.

शिवला आरोपी केलं ते योग्य होतं पण शिक्षा काहीही देतात, परत शिव वीणाला डान्स करायला लावतात, म मां पण कौतुक करतात, त्यांचा कंटाळा येईपर्यंत दाखवतात आणि परत तुम्ही अति करताय म्हणतात.

वैशालीच्या आधी किशोरी आणि रुपाली जायला हव्या होत्या.निदान किशोरी तरी. सु.न.ध्या.न.सारखी स्वतः बाहेर चालल्या सारखी का बोलत होती.ते काही कळलं नाही पण...

रुपाली साठी चुगली आलेली की वैशाली म्हणत होती की रुपाली रडण्याच नाटक करते..ते तिच एक कार्ड आहे.. त्यावर उत्तर देताना रुपालीने उगीच आई वडिल भाऊ मध्ये आणले.. काहिही झाल की माझ्यावर घराची जबाबदारी आहे न ऑल ची टेप सूरू होते..अगं बाई सगळेच करतात parents साठी..सारख अस बोलून ती तिच्या आई वडीलांचा मान कमी करत आहेत..म्हणजे सगळं हिच्या वरच चाललं आहे..आणि बाकी कोणी घरातल काहिच करत नाही..

प्रोमो मध्ये दाखवलेली चुगली actual एपिसोड मध्ये दिसलीच नाही..किशोरी ला चुगली आली होती की रुपाली त्याना बिनडोक म्हणते...रुपाली च म्हणण होत की मी अस म्हणालेच नाही.. त्यावर किशोरी म्हणाली की खुनाच्या टास्क मध्ये कळलच कोन बिनडोक आहे ते.. Lol किशोरीने मस्त टोला लगावला रुपाली ला.. बाकिच्याना पण उशिराच कळल काय बोलली किशोरी.. मेन एपिसोड मध्ये पूर्ण सीन दाखवायला पाहिजे होता..

हो ते बोअर होतं. मला पर्सनल सांगायचं नाही म्हणत पर्सनलचा पसारा मांडला.
शिवानीने सुद्धा हेच सांगितलेलं.
वैशाली गेल्यावर कॅमेरा अर्थातच अभिजीतच्या मागे लागला. तो आपल्याला प्रचंड दु:ख होतंय आणि आपण ते बाहेर सांडू न देण्याचा प्रयत्न करतोय असं काहीतरी दाखवत होता. टॉयलेट एरियात एकटाच जाऊन उभा राहिला. मग झोपाळ्याशी. कुकरची शिटी व्हायच्या जस्ट आधीची स्टेज. शिव आणि हीनाने व्यवस्थित रडून घेतलं. वैशालीचं वागणं छान होतं.
------
पण आता हाउस मेट्समध्ये सरळ सरळ दोन तट आहेत हे एक्झिटच्या वेळीही ठळकपणे दिसतं.
---
आरोहने बहुतेक सगळ्यांबद्दल दोन वाक्यांत सांगितलं ते पर्फेक्ट होतं. म्हणजे इथल्या सगळ्यांनाच पटेल ते.
---
शिवानी परत जाईल तेव्हा नेहा माझी ताकद गेली म्हणून खाली बसेल का?
----
अभिजीत त्याला कोणी काही चांगलं म्हटलं किंवा तो काही चांगलं म्हणत असेल, तर वाक्याला पूर्णविराम म्हणून एक ठरलेलं स्माइल देतो.
मराठी बिग बॉसवाल्यांना अभिनेत्यांशिवाय (तेही फार नाव नसलेले) दुसरं कोणी मिळत नाही का? खेळाडू, मॉडेल्स, सोशल वर्कर, लेखक, राजकारणी?

सगळ्यांबद्दलची समीकरणं प्रत्येक आठवड्यात बदलत जातात! त्यांची एकमेकांशी असलेली रिलेशन आणि प्रेक्षक म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल वाटणारं, प्रेम, किंवा राग, माझा तरी खुपच बदलत गेलाय. मला चक्क हिना आवडली मागच्या आठवड्यात. तिला नेहा माधव त्रास देत होते तेव्हा हिना चं वाईट वाटलं. शिवानी
तिला टास्कमध्ये रडवण्याचा प्रयत्न करत होती आणि ही पठ्ठी अजिबात न रडता सेन्सिबल उत्तरं देत होती ते ही आवडलं. वैशाली गेली तेव्हा वाईट वाटलं

Btw आरोहने 5 फायनलिस्ट म्हणून कोणा कोणाची नावं घेतली, शिवचं घेतलं नाही ते लक्षात आलं. बरं केलं, शिवने आता तरी सिरीयस व्हावं.

पण आरोहने स्वतःचं नाही घेतलं.>>>>>स्वत: चे सोडून 5नावे घ्यायला सांगितली होती त्याला.
त्याने नेहा शिवानि वीणा अभिजित हीना घेतली.

शिवला काल महेश सिरांनी वीणा साठी तू घराच्या बाहेर जाशील का विचारले तो हो बोलला म त्यानी विचारले आता जाशील का ? तर तो हो जाईन बोलला. त्याला माहिती होते सर सीरियसली विचारत नाहियेत पण तरी ही त्याने असे उत्तर द्यायाला नको होते.किती दिवस लोयालटि करत बसणार आहे. म शीव ला वोट करण्यार्या प्रेक्षकन्चे काय. त्यानी पण वीणा ला वोट करावीत का ? शीव खुनी म्हणून कसे खेळतो हे त्याचा fan म्हणून एखाद्याला बघायला उत्सुकता असेल तर शीव ने वीणा साठी गेम सोडून त्या fan ची निराशा नाही केली का.? शीव आवडण्यापैकी सगळे जण च शिविणा चे fan नसतील ना ?

>>शिवला काल महेश सिरांनी वीणा साठी तू घराच्या बाहेर जाशील का विचारले तो हो बोलला

त्यांनी लगोलग तोच प्रश्न वीणाला विचारायला हवा होता.... ती बहुतेक नाही म्हंटली असती!
ममां missed an opportunity!

शिवानी परत जाईल तेव्हा नेहा माझी ताकद गेली म्हणून खाली बसेल का? >>>>>>>> आता शंका वाटायला लागली आहे कि जाईल का परत ?पण जायला पाहीजे.
भरत पुर्ण पोस्ट्ला ++१

बिग बॉसने तिला सांगितलेलं की तू पाहुणी आहेस आणि हे कोणालाही सांगायचं नाही.
अर्थात बिग बॉसपण रूपालीच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असतील तर राहील ती.

मराठी बिग बॉसवाल्यांना अभिनेत्यांशिवाय (तेही फार नाव नसलेले) दुसरं कोणी मिळत नाही का? खेळाडू, मॉडेल्स, सोशल वर्कर, लेखक, राजकारणी?
>>>>>>>
राजकारणी होते ना बिचुकले गायिका वैशाली रोडीज शीव लावणी कलाकार सुरेखा पुणेकर हे सगळे अभिनेते नाहित.

काल आणि परवा चा नाही पाहिलाय .. इथे वाचून कळलं वैशाली गेली ते . रुपाली च लक जोरावर म्हणून नेमकी या हप्त्यात ती कॅप्टन होती .. नाहीतर तीच जायला हवी होती खरं तर ! नेमका आणि तिचा खून हि झाला नाहीये . आता नेक्स्ट नंबर खरंच रुपाली चा लावा . तिचा स्वतःचाच चाल्लेल्या गेम ची क्लिप बघून खरंच हसून हसून लोटपोट ... आणि कीव ही आली .. अगं मागच्या वेळचा बिग बॉस बघून अली आहेस ना ?! गेला बाजार निदान आपल्याला जे कळलंय तेच नक्की आहे का ते विचार तरी .. त्यावर बंदी थोडीच होती !?

वर टाकलेलं,
मी लोळकर लोळकर लोळकर बिगबॉसची राणी
भर पलंगावरी कुचूकुचू करते गाऱ्हाणी ssssss ...
गाणं सॉलिड हहपुवा आहे . Rofl Rofl

या टास्क दरम्यान हिना तिच्या हातात काय घेऊन फिरत होती!? मला वाटतंय केसांची इस्त्री ( केस रोल/स्ट्रेट करायचं स्ट्रेटनर ) होती का ? का पण ?ते कोणीतरी चोरेल म्हणून का ?! कारण तिच्या हातात चाबूक असल्यासारखं वाटत होत .. Proud

आता आज कोण कोण असतील उमेदवार कॅप्टन्सी साठी ?नेहा रुपाली अभिजित शिवानी हे चार का ? कारण बाकी सगळ्यांचे खून झाले ना ?! नेहा चा खून उगाच त्या आरोह च्या एन्ट्री साठी केलेला सो तो धरायला नको

काल बोरिंग एपिसोड होता. इमोजीज ची गाणी, अन सरखे काय ते शिव आणि वीणाचा नाच. मधेच ते स्पॉन्सर्स चे टास्क होते त्यालाही काही अर्थच नव्हता. वैशाली गेली फायनली. तिच्या आधी खरच रुपाली, किशोरी आणि माधव हे जायला हवे होते.
शिवानीला काल बाय बाय करतील असे वाटले होते पण बिबॉला तिला जाऊ देणे जिवावर आले असावे आता.
कपड्यांबद्दल - शिवानीने काल आधी एकदा घातलेलाच ड्रेस घातला होता का? अन तो आंबाडा अन खोटा गजरा हा लूक २-३ वेळा केला होता तो तिला फारसा चांगला दिसत नाही! नेहाबद्दल काय बोलावे कळत नाही. तिने त्या केसाच्या फ्लिक्स नव्यानेच कापून घेतल्या आहेत वाटते. अजून काहीतरी अवतार! काल वैशाली, किशोरी आणि वीणाचे ड्रेसेस चांगले होते. हिनाचा लूक नाही आवडला.
नवा मेंबर आरोह जितका बोलला त्यावरून फार काही स्पार्क दिसला नाही. जरासा चम्याच वाटला Happy बघू आता काय उजेड पाडतोय.

स्वत: चे सोडून 5नावे घ्यायला सांगितली होती त्याला.
त्याने नेहा शिवानि वीणा अभिजित हीना घेतली. >>> थँक यु.

त्याला शिवानी गेस्ट आहे तरी घेतलं मग आता नेहा माधव अजून चढणार, शिवानी असेलंच. घालवा आता तिला.

काल बोरिंग एपिसोड होता. >>> हो मी ती नाच गाणी वगैरे बघितलीच नाही.

नेहा चा खून उगाच त्या आरोह च्या एन्ट्री साठी केलेला सो तो धरायला नको >>> तो धरणार नसतील तर नेहा कॅप्टन व्हायला हवी, पण तिने जरा नीट वागावं, हसतमुख रहावं. ती किती खुन्नस देते. त्यावरुन इथे सगळेच बोलत असतात. नवरा, भाऊ, शेजारी सर्वच. त्यामुळे तिची प्रतिमा अशीच झालीय. नुसतं टास्कमधे हुशार असून चालत नाही. ओवरऑल तुम्ही कसे वागता हेही मॅटर करतं. म मां योग्यच सांगत होते.

तिने त्या केसाच्या फ्लिक्स नव्यानेच कापून घेतल्या आहेत वाटते. >>> विग घातलेला. ते विग बघत होतेना काहीजण.

धन्स अमुपरी शुक्रवारच्या अपडेटसबद्दल. Happy

तिचा स्वतःचाच चाल्लेल्या गेम ची क्लिप बघून खरंच हसून हसून लोटपोट >>>>>>>>>> अगदी अगदी Rofl

वैशाली जाताना मिम्सकिन्ग ' सासरला ही बहिण निघाली भावाची हि लाडी' मोडमध्ये होता. लास्ट सिझनला रेशमच्या एव्हिक्शनवेळी आस्ताद रडला होता त्याची आठवण झाली.

आरोहने सुरेखा पुणेकरची नक्कल छान केली.

काल व्हिल ऑफ फॉरच्यून सारखा टास्क होणार होता. तो दाखवलाच नाही.

पण आरोहने स्वतःचं नाही घेतलं. >>>>>>>>> कस शक्य आहे हे? तो तर आत्ताच आलाय.

वैशाली गेली,पण शेवटच्या गाण्याने रडवून गेली. >>>>>>>> हो ना. आरोहला आल्या आल्या रडवल. Lol

रुपालीचा टास्कमधला बावळटपणा सान्गितला तस विणाला सुद्दा झापायला पाहिजे होत. शिवच कसा खुनी आहे म्हणत फिरत होती. तसच स्टोअर रुम शिव डॉक्टरशी बोलत होता, तेव्हा हि दरवाजा उघडून आत वाकून बघत होती. कस काय चालल हे बिबॉला? Uhoh

शनिवारी किशोरी, रुपाली, विणा रात्री चक्क एकत्र बोलताना दिसले. म्हटल, हे कधी झाल? ह्यान्च पॅचअप कधी झाल?

नेहाबद्दल काय बोलावे कळत नाही. तिने त्या केसाच्या फ्लिक्स नव्यानेच कापून घेतल्या आहेत वाटते. अजून काहीतरी अवतार! >>>>>>>> +++++++++१११११११ आणि ति नथ शिवानीची घातली होती तिने.

केसांची इस्त्री >>>>>>>>>> Biggrin

प्रिकॅपमध्ये टास्कच्यावेळी शिव अभिजितशी फिजिकल झालाय अस दाखवलय. लेटस सी!

हो नं .. मला नेहा आवडते आणि ती फायनल मधे असावी असं वाटत .. पण शनिवारी कसली भयानक दिसत होती ! काय तो ड्रेस कसला चपचपीत मेक अप आणि काय ती हेअर स्टाईल .आणि त्यावर नथ ???!! आणि चेहरा चिडका आणि मारक्या म्हशीसारखा ! Sad

Pages