थोडेसे हिंदू धर्मा विषयी....

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 18 July, 2019 - 11:46

हिंदू धर्म हा किती प्राचीन आहे याविषयी जाणकारांमध्ये बरेच मतभेद आहेत. हिंदू म्हणजेच "आर्य सनातन वैदिक संस्कृतीच्या" ऋषींचे मत मानायचे तर प्रत्येक १५००० ते २०००० वर्षांनंतर येणाऱ्या प्रलयानंतर मानव हळू हळू पुन्हा एकदा मानव बनू लागतो... ऋषी त्यांच्या स्मृतीतून, त्यांच्या अंतरचक्षुनच्या समोर या साऱ्या सृष्टीचे, तिच्या जडण घडणीचे जे ज्ञान ऋतम्भरा प्रद्नेने दिसते ते मांडतात. म्हणून ते स्वत:ला या वेदांचे निर्माते म्हणवून घेत नाहीत तर "उद्गाते" म्हणवून घेतात. या वेदांची रचना त्यांनी स्वत: केलेली नसते तर ती कवीला ज्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे कविता सुचतात, त्याप्रमाणे ते करतात...पृथ्वीवर प्रथमत: ज्या सात ऋषींनी मानवाला आणले ते सप्तर्षी जे आहेत त्यांच्या नावाबद्दल मतभेद आहेत......यांनी लाखो वर्षांपूर्वी मानवाला पृथ्वीवर आणले....यांची कुले पुढे चालत राहिली....उगम आपण विसरलो...म्हणूनच म्हणतात की ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये....सापडणार नाही... आणि आपल्या आजच्या माहितीत आज पर्यंत ७ महायुगे झालेली असून या प्रत्येक महायुगात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चार युगांचे चक्र पूर्ण होत होत सात माहायुगात प्रत्येकी ही चार युगे म्हणून सात चोक अठ्ठावीस म्हणून अठ्ठावीस युगे विटेवर उभा असे विठ्ठलाला म्हंटले जाते.

आता ही ७१ चतुर्युगे एका मन्वंतरात असतात. म्हणजेच मनु बदल...म्हणजेच एक मनु अर्थात त्या मनु म्हणजे मानवाच्या कालाचा राजा अथवा अधिपती, हा वेगवेगळा असतो. आत्तापर्यंत ७ मनु म्हणजेच ७ मन्वंतरे झालेली असून सध्याचा "वैवस्वत" हा मनु आहे. अजून ७ मन्वंतरे होणार आहेत. म्हणजेच वैदिकांची {म्हणजे फक्त ब्राह्मण नव्हे] अर्थात ऋषींची कालगणना अथवा संख्यांची गणना ही अणूपासून परार्धापर्यंत प्रचंड मोठी आहे. म्हणजेच हा काल किती मोठा असेल याची सर्वांनाच कल्पना आली असेल. म्हणूनच जाता जाता एक सांगावेसे वाटते सध्या २०१२ साली जग नष्ट होणार असा बागुलबुवा उभा केला आहे तो खरा नसून लाटीन अमेरिकेतील "माया" संस्कृतीचे कॅलेंडर २०१२ रोजी संपत होते. म्हणून पाश्चात्यांनी पश्चिमेच्या धार्मिक समजुतींच्या नुसार "द डे ऑफ डेस्टिनी" अथवा "कयामत का दिन" समजून त्या दिवशी जग नष्ट होऊन सर्वांना देवा समोर उभे केले जाऊन त्यांच्या पापाचा झाडा या एकाच दिवशी केला जाणार आहे असे समजून तो प्रचार चालवलेला होता. आणि वरचा हिशोब वाचला तर हे अजिबात खरे नाही हे सर्वांच्या सहज लक्षात येऊ शकते. त्यामुळे आपण निश्चिंत रहाण्यास हरकत नाही. असो...

पुढे जाण्या पूर्वी इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की फार प्राचीन काळी सध्या ज्यांना "शुद्र" अथवा दलित असे म्हंटले अथवा समजले जाते अशा समाजातील अनेक विद्वानांनी म्हणजेच ऋषींनी वेदातील अनेक ऋचा लिहिलेल्या असून एक उदाहरण द्यायचे झाले तर "दीर्घतमा" अथवा "दीर्घतमस" या एका "शुद्र ऋषींनी" वेदातील अस्यवामीय सुक्त हे अतिशय महत्वाचे सुक्त लिहिले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आताच्या काळातील तथाकथित "जातीयता" त्यावेळेस अजिबात नव्हती...या सर्व ऋषींना अतिशय मान दिला जात असे. सूर्या सावित्री, गार्गी, मैत्र्येयी, इंद्राणी, लोपामुद्रा, अनुसया, अरुंधती अशा अनेक विद्वान स्त्रियांचे देखील योगदान वेद काळात मोठे आहे. त्यांना पडद्यात अथवा चूल मूळ सांभाळत कोंडून ठेवले जात नव्हते. यातील मैत्रेयी या ब्रह्मवादिनीने वेदातील १० ऋचा लिहिल्या आहेत. सीतामाईने स्वयंवर पद्धतीने तर आणि द्रौपदीने पण लावून आपापले वर अर्थात पती निवडलेले होते. त्यामुळे वैदिक अथवा हिंदू धर्मात स्त्रियांचा सतत छळ झाला आहे हा प्रचार खोटा आहे. हा...मधल्या म्हणजे गेल्या २००० ते २५०० वर्षांत काही घटना झाल्या असतील... पण त्यामुळे सगळ्या हिंदू संस्कृतीला दोष देणे चुकीचे आहे.

तर, हिंदू धर्माला "हिंदू" हे नाव साधारण २५०० ते ३००० वर्षांपूर्वी पडले आहे. ज्यावेळेस वैदिक संस्कृती आणि असुर, दानव आणि दैत्य संस्कृती यांच्यातील भेद वाढत गेला, त्यावेळेस इराणात आदरणीय "अहुर्मझ्द" या असुर राजाने वेगळ्या राज्याची स्थापना केली. हे लोक "स" चा उच्चार "ह" करत असल्याने "असुरमझद" चा उच्चार "आहुर माझ्द" असा केला गेला भारतातील "सरस्वती" नदीचा उच्चार "हर हवैती" असा तर "सिंधू स्थान" चा उच्चार "हिंदुस्थान" असा केला गेला. सिंधू नदी अथवा सिंधू समुद्रापलीकडील लोकांना हे लोक "सिंधू" म्हणजेच "हिंदू" म्हणत असत. कश्यप ऋषींना १३ पत्न्या होत्या. पैकी "दिती"ची मुले म्हणजे "दैत्य", "अदितीची" मुले म्हणजे "आदित्य" म्हणजेच "देव" आणि "दन्यू" या पत्नीची मुले म्हणजे "दानव" होत. हे म्हणजे राक्षस नसून देवाकडे कमी लक्ष पण उपभोगांकडे जास्त लक्ष अशी संस्कृती असलेले लोक होत. म्हणून अंतरातील देव शोधून मुक्ती मिळवायची अशी जाणीव ठेवणार्या आर्यांची स्वत:च्या रक्षणासाठी यांच्याशी नाइलाजाने युद्धे होत असत. राक्षस म्हणजे सुद्धा २-४ शिंगे असलेले, अतिशय क्रूर असे काही नसून फक्त स्वत:चे क्षेत्र, आणि स्वार्थ यांचे रक्षण करणारे असा त्याचा अर्थ आहे.

जर्मनी हा देश "Danub" या नदीच्या दोन तीरांवर वसलेला असून या "दानव" या शब्दाचा हा अपभ्रंश असू शकतो. बंगाल, उत्तर भारत, पंजाबी यांचे उच्चार आठवा म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल...तसेच जर्मनीचे मूळ नाव "द्युइश Land " म्हणजे "द्विश दल" जसे की "द्विदल धान्य"...."दानुब" नदीच्या दोन तीरांवर वसलेले असल्याने "द्विश दल" जसे की "इंग्लंड म्हणजे "आंग्ल दल"......

"धर्म" म्हणजे ....."धारयति इति धर्म" म्हणजे जो संस्कृतीचे धारण करतो आणि मानवाला जगण्यास आवश्यक असे नैतिक, सामाजिक, बौद्धिक, आर्थिक, मानसिक, भावनिक "आणि" "अध्यात्मिक" असे वातावरण तयार करतो तो धर्म ... आणि याच साठी धर्माची आवश्यकता...अन्यथा माणूस हा एक " सर्व प्राथमिक गरजा असलेला बुभुक्षित प्राणीच" आहे. त्याला धर्म "धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष" या सुसंस्कृत चौकटीत बद्ध करतो. नाहीतर दिवसा ढवळ्या बायका पळवल्या गेल्या असत्या...हे एक उदाहरण झाले.... आर्यांनी कोणत्याही एकाच देवतेची पूजा म्हणजे धर्म असे समजले नाही. आर्य धर्मात वहाणे हा पाण्याचा धर्म, पितृ धर्म, मातृधर्म, पुत्र धर्म हे धर्म सांगितले आहेत. ज्याला पाश्चात्य लोक धर्म म्हणतात त्याला आर्य "मोक्ष" कल्पना म्हणतात.

असो...आता हिंदू धर्माच्या मूळ नावाकडे वळू...

हिंदू धर्माचे मूळ नाव आहे "आर्य सनातन वैदिक संस्कृती"...

१] आर्य- अर म्हणजे चिरणे, फाडणे ...संकटांना अडचणींना चिरत पुढे जाणारे....प्रगती करणारे....फक्त गोरे दिसणारे, निळ्या घार्या डोळ्याचे लोक म्हणजे आर्य हा समज खोटा आहे. राम आणि कृष्ण हे काळे सावळे होते हे सर्वांनाच माहित आहे. आर्य असणे ही एक उच्च मानसिक, बौद्धिक, भावनिक, वैद्न्यानिक आणि अध्यात्मिक अवस्था आहे. कोणता वंश नव्हे...

२] सनातन- स: नूतन:....नित्य नूतन असणारा किंवा असणारे....हिंदू धर्म हा नित्य नवा आहे...खुळचट जुन्या समजुतींना कवटाळून बसणारा नव्हे...किंवा "सनातन" याचा अर्थ भस्माचे पट्टे ओढून जपाच्या माळा ओढत बसणे, लांब हो लांब हो ....शिवू नको असे म्हणणे मुळीच नव्हे हे पक्के लक्षात घेणे आवश्यक आहे. जसा कालचा सागर कालच्या प्रियकर प्रेयसीन्साठी आणि आजच्याही जोडप्यांसाठी "नवाच" असतो तसा काला प्रमाणे बदलणारा हिंदू धर्म हा "सनातन" म्हणजे सतत नवाच असतो....

३] वैदिक- "विद" या संस्कृत धातूचा अर्थ आहे " आतून, हृदयातून" जाणणे .....म्हणजे कसे? तर ...जर का मी तुम्हाला तासभर "आंबा" विषयावर व्याख्यान दिले तरी तुम्हाला आंबा पाहिला नसेल तर अंबा म्हणजे काय ते यथार्थपणे कळणार नाही. पण ज्या वेळेस तुम्ही आंबा कापून जिभेवर टाकणार त्यावेळेस तुम्हाला कळणार की आंबा काय चीज आहे ते....हे जे आतून कळणे आहे त्याला "विद" म्हंटले आहे. याच "विद" धातू पासून वेद हा शब्द बनला आहे. हेच वैदिक जे दक्षिणेत रहात होते त्यांनी स्वत:ला "द्रु विद" म्हणजे कोणतीही गोष्ट "द्रुत गतीने" "जाणणारे" ही पदवी लावून घेतली. याचाच अपभ्रंश होऊन "द्रविड" झाले. आजही जुन्या इंग्लिश डिक्शनरी मध्ये "Druid " हा शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे "जुने जाणते लोक"... द्रविड या शब्दाचे पुढील रूपांतरण आणि त्याचे संदर्भ हे वादाला तोंड फोडतील असे असतील असे मला वाटते आहे...त्यामुळे ज्यांना जिज्ञासा असेल त्यांना मी वैयक्तिक चर्चेत सांगू शकेन....

४] संस्कृती- प्रकृती ही मूळ आहे. प्रकृती म्हणजे जे जसे आहे तसे....कोणत्याही गोष्टीचे मूळ रूप, निसर्ग अथवा सृष्टी....त्यात बदल केला अथवा झाला की त्याला संस्कृती किंवा विकृती म्हंटले जाते. चांगला बदल- संस्कृती आणि वाईट बदल- विकृती. नुसते पाणी ही प्रकृती, गटार ही विकृती आणि तीर्थ ही संस्कृती...

तसेच माझ्याजवळ समजा २ पोळ्या आहेत आणि दुसऱ्याकडेही २ पोळ्या आहेत, तर प्रत्येकाने आपापल्या पोळ्या खाणे ही प्रकृती, दुसरयाच्या हिसकावून घेणे ही विकृती आणि आपल्याही पोळ्या त्याच्या गरजेनुसार दुसऱ्याला देणे ही संस्कृती....आणि नेमकी हीच संस्कृती दैत्य, दानव आणि असुरांकडे नव्हती....

हाच आपला धर्म. हीच आपली संस्कृती. हीच आपली ओळख मित्रांनो.

असा हा आपल्या या आर्यभूमी मधील [ जम्बूद्वीप, , भारतवर्ष अशी आपल्या देशाची प्राचीन नावे आहेत. ] वैदिक धर्माचा थोडासा परिचय. अजून खूप काही लिहायचे आहे. जस जसे शक्य होईल तस तसे विषय मांडत जाईन. लोकमान्य टिळक ज्यांना “मोक्ष मुलर” म्हणत असत असे “Max Muller” नावाचे जर्मनीचे एक विद्वान ज्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि वेदांची महती जगापुढे मांडली. पण त्यांनी हे करत असताना वेदांचा काळ, आर्यांचे उगमस्थान या बाबत बरीच गल्लत केलेली आहे. आणि आपल्या कडील काही संघटना नेमक्या याच गोष्टींचा गैरफायदा घेऊन आर्य-द्रविड-दस्यू असा संघर्ष पेटवू पहात आहेत. पण आर्यच अधिक प्रगत होऊन द्रविड झालेले आहेत हे तुमच्या आता लक्षात आलेले असेलच. हज्जारो ग्रंथ काळाच्या ओघात नष्ट झालेले आहेत. आपल्याला आपण काल कोणती भाजी खाल्ली आहे हे आठवत नाही. मग हज्जारो-लाखो वर्षांच्या पूर्वी घडून गेलेले सांगता येणे अवघडच आहे ना? आर्य हे भारताच्या बाहेरून आलेले नसून ते भारतातीलच आहेत. साधारण १०,००० वर्षांनी पृथ्वीचा ध्रुव बदलतो. आत्ता पोलारीस हा ध्रुव आहे. त्यामुळे शक्यता अशी आहे की भारताची आत्ताची जी पोझिशन आहे, जी जागा आहे ती कदाचित वेगळ्या ठिकाणी असू शकेल. पण हा अवघड विषय आहे. त्यावर काही बोलणे आणि तेही अधिकारवाणीने हे शक्य नाही. असो.

वर म्हंटल्याप्रमाणे सप्तर्षींची अधिक माहिती, मानवाचे पृथ्वीवर आगमन, दत्त गुरु म्हणजे कोण आणि कुठून आले याबद्दल जाणून घेऊ या ....सध्या ऋषी संस्कृतीला वंदन करून इथेच थांबतो....

!! इति लेखन सीमा !!

साभार -Dr हेमंत सहस्रबुद्धे उर्फ कलादास......

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याला आपण काल कोणती भाजी खाल्ली आहे हे आठवत नाही. मग हज्जारो-लाखो वर्षांच्या पूर्वी घडून गेलेले सांगता येणे अवघडच आहे ना? >> Rofl मस्त लिहिलंय. लिहा आणखी.

>>आपल्या आजच्या माहितीत आज पर्यंत ७ महायुगे झालेली असून या प्रत्येक महायुगात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चार युगांचे चक्र पूर्ण होत होत सात माहायुगात प्रत्येकी ही चार युगे म्हणून सात चोक अठ्ठावीस म्हणून अठ्ठावीस युगे विटेवर उभा असे विठ्ठलाला म्हंटले जाते.

आता ही ७१ चतुर्युगे एका मन्वंतरात असतात. म्हणजेच मनु बदल...म्हणजेच एक मनु अर्थात त्या मनु म्हणजे मानवाच्या कालाचा राजा अथवा अधिपती, हा वेगवेगळा असतो. आत्तापर्यंत ७ मनु म्हणजेच ७ मन्वंतरे झालेली असून सध्याचा "वैवस्वत" हा मनु आहे.
>> हे टोटल कॉन्ट्रॅडिक्टरी आहे, पण काहीच माहिती नसण्यापेक्षा चुकीची माहिती असली तरी चालेल. माहिती होणे महत्त्वाचे. सतत रिग्रेसिव्ह विचार पोचत राहिले पाहिजेत. लिहा अजुन.

७१ ला चाराने भागण्याचा प्रयत्न चालू आहे. सातने भागून झाले. एक शिल्लक राहिला. त्यावेळचे गणित कठीणच होते.
आता याचा डेरीव्हेटिव्ह काढून लिमिट टेण्ड्स टू ७१ घेतले आहे. मग याला बर्नॉलीज फॉर्म्युल्यात टाकून पाहतो. काहीतरी हाती लागावे. वैदीक गणित शिकलो असतो तर बरे झाले असते.

!

प्रत्येक १५००० ते २०००० वर्षांनंतर येणाऱ्या प्रलयानंतर मानव हळू हळू पुन्हा एकदा मानव बनू लागतो
>>>>
हे सर्व फक्त हिंदूनाच लागू होते की इतर धर्मातल्यांनापण?
जारवा/सेंटिनेल वगैरे जमातीतील लोकं पण हेच कॅलेंडर पाळणार का? जर १५००० वर्षांपुर्वीच्या प्रलयानंतर ते पुन्हा मानव बनू लागले असतील तर मध्येच कुठल्या 'युगात/महायुगात' खोडा बसला आणि ते आदीम राहिले?
मुसलमान/ख्रिश्चन यांचा कयामतच्या दिवशीच निकाल लागणार की ते पण या प्रलयचक्रात भरडले जातात?
नास्तिकांचे काय?

>>>
जर्मनी हा देश "Danub" या नदीच्या दोन तीरांवर वसलेला असून या "दानव" या शब्दाचा हा अपभ्रंश असू शकतो.
>>>
पेरु या देशाचे नाव मात्र प्राकृतातील पेरु शब्दावरुनच आहे कारण जुन्या धृवाच्या युगात तिथे पेरुच्या खूप बागा होत्या. चिली शब्दाचे पण तेचः गांजाचे उत्पादन खूप, म्हणून चिलीम, पुढे म सायलेंट झाला. धृव बदलल्यावर गांजा अफगाणिस्तान आणि हिमाचलमध्ये काही प्रमाणात आणि मेक्सिको वगैरे मध्य अमेरिकेत काही प्रमाणात सरकला. धृवाचा भांजा, चिलमीत गांजा ही म्हण त्यामुळेच इंका आणि मायन लोकांत प्रचलित झाली. अ‍ॅझटेक मात्र कोकेनला चिकटून राहिले. कोकेनसुद्धा पुर्वी कोकणात निर्मिले जात असे, म्हणून कोकेण (ण चा पुढे न). धृव बदलल्यावर कोकेन गेले मध्य/दक्षिण अमेरिकेत आणि कोकणात राहिले कोकोणट!
पुन्हा धृव बदलतो आहे याची लक्षणे दिसू लागली आहेत. गांजा आता उत्तरेकडे सरकत आजच्या कॅनडा (वैदिक कन्नडा) देशात प्रस्थापित होऊ लागला आहे.

मी यापूर्वी सुध्दा स्वामींचे लेखन वाचले आहे. त्यांना मी निरागस स्थितप्रज्ञ अशी उपाधी देऊ इच्छितो.‌ स्वामी वडाची साल पिंपळाला लावली तरी पिंपळ बदलणार थोडाच आहे. फार मोठा लेख लिहिण्यापेक्षा छोटा पटणेबल पाहिजे होता.
आर्य द्रविड मुलनिवासी या मुद्द्यावर बोलायचं तर ही चर्चा देश गुलामगिरीत होता तेव्हा कुठेही नव्हती. आता चर्चिलच्या भविष्याप्रमाणे घडायला लागले आहे लोकशाही भारतीयांना पचली नाही. अति स्वातंत्र्य मिळाले तेव्हा प्रत्येक गट महत्त्वाकांक्षी बनून असहिष्णू झालेला आहे. पुढे असंच चालू राहिलं तर देशाचे युरोपियन राष्ट्रांप्रमाणे भाषेनुसार वेगवेगळ्या देशांत विभाजन होईल. परिवर्तनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक गोष्ट ही बदलणारच. फक्त काही चांगले घडेल तर काही वाईट घडेल.

किती वेगवेगळ्या मुद्द्यांची सरमिसळ करुन लिहिलंय !
काल मापन पद्धतीविषयी माहिती हा एकच विषय धरुन त्यावर सुसंगत असे लिहिले तर वाचायला आवडले असते. सुरुवात तिथून करुन जातियवाद, मॅक्स म्युलर यांच्या चुका, आर्यन इव्हेजन थियरी आणि शेवटचे डॉयशलँड आणि द्रविड यांचे बादरायणी संबंध ! व्हॉट्सॅप वर येणार्‍या फॉरवर्ड कॅटेगरीचे लेखन झाले आहे

आर्यावर्त हा एक फार मोठा आणि प्राचीन देश होता हे आपण सगळे जाणतोच. पेरु देश हासुद्धा आर्यावर्ताचा एक भाग होता. परुष्णीच्या काठचा म्हणून पेरु. परुष्णी ही एक महाकाय नदी होती. अमेझिंगली मोठी म्हणून कालांतराने तिला ॲमेझॉन म्हणू लागले. आजही आपल्या आर्यावर्तातल्या पुण्यपत्तन नामे पुण्यभूमध्ये पेरुगीत नावाचा भाग आहे असा एक सज्जड पुरावा सु. ना. खोक यांनी आपल्या पुस्तकात दिला आहे.

अशाप्रकारच्या लेखांचा उद्देश अत्यंत भोळे लोक शोधणे असतो. अश्या लोकांचा बुद्धिभेद करणे सोपे जाते. ज्याप्रकारे ख्रिस्ती स्टेज वर येशू च्या कृपेने अपंग व्यक्ती पळायला लागली असे नाटक उभे करतात जे अतिशय भोळे श्रद्धाळू लोकांनाच पटू शकते. तशाच प्रकारची पद्धत आहे ही. एक प्रकारची जाहिरात आहे. या मध्ये अजून एक पद्धत म्हणजे खोट्या आयडी ने ज्योतिष किंवा मानसिक आजारावर प्रश्न विचारायचे आणि नंतर त्यावर तज्ज्ञ बनून उत्तर द्यायचे. या आणि अश्या बऱ्याच युक्त्या असतात लोकांना फसवायला.

या प्रकारच्या लेखांचा उद्देश हे भोळे लोक ओळखणे हा आहे. ह्या युक्त्या जर निकामी करायच्या तर जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला हे पटले आहे आणि आपण फार भोळे आहोत असे नाटक केले पाहिजे. म्हणजे खरा भोळा माणूस शोधणे अवघड आणि वेळखाऊ बनेल.

पुर्वी एकदा रत्नागिरीत एका जेष्ठ मित्रासोबत दारू पित बसलो होतो. मित्र ब्राह्मण व मी क्षत्रिय. बोलताना गाडी इतिहासाकडे वळली. मी बोलून गेलो आम्ही आर्य आहोत. तर साहेब ठासून सांगायला लागले तुम्ही आर्य नाहीत. तुम्हाला वेदांचा अधिकार नाही. तुम्ही यज्ञोपवित घालत नाही. तूम्ही द्रविडच आहात वगैरे. ते म्हणाले आम्ही ब्राह्मणच खरे आर्य आहोत. मग काय मला दारूच चढली नाही.

अतिशय **** लेख आहे.

वर म्हटलंय तसे अनंत मुद्द्यांचे कडबोळे आहे.
प्रत्येक मुद्द्यावर लिहून माझा वेळ वाया घालवणार नाही.

तूर्तास एकाच मुद्द्यावर बोलू,

>>>>>>.त्यामुळे वैदिक अथवा हिंदू धर्मात स्त्रियांचा सतत छळ झाला आहे हा प्रचार खोटा आहे. हा...मधल्या म्हणजे गेल्या २००० ते २५०० वर्षांत काही घटना झाल्या असतील... पण त्यामुळे सगळ्या हिंदू संस्कृतीला दोष देणे चुकीचे आहे.>>>>>>
1) रामायण , महाभारतातील शेलकी उदाहरणे देऊन हे पटवायचा प्रयत्न अगदीच केविलवाणा आहे,
स्वयंवर मांडून लग्न करणारी स्वतंत्र स्त्रीला आगीत शिरून आपले चारित्र्य सिद्ध करावे लागले. नंतर त्यागली गेली.

2) वनवासाला येण्या ऐवजी भरताच्या "आश्रयाने " राहायचा सल्ला देखील तिचा नवरा देतो.

3) फशी पडलेल्या अहिल्येला शाप मिळाला

4)केवळ मनात कामेच्छा झाली म्हणून रेणुकेचे मस्तक उडवले

5) तेजस्वी द्रौपदी ला द्युतसभा,जयंद्रथ, किचक कितीवेळा केवळ सुंदर दिसणारी स्त्री म्हणून भोगवस्तू सारखी वागणूक मिळाली हे एकदा मोजाच.
ही सगळी उदाहरणे तुम्ही म्हणता त्या काळातील आणि त्याच काव्यातील आहेत, कोणे एकेकाळी आपल्याकडे समानता होती, स्त्रियांना चांगली वागणूक देत होते हे थोतांड उघडे पडायला ही उदाहरणे पुरेशी व्हावीत.

दुसरा सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा,

2500 -3000 वर्षांपूर्वी हिंदू धर्म कसा होता? I don't care about it.
मला आणि माझ्या मुलाबाळांना "आज" ज्या स्वरूपात धर्म समोर येतो आहे ते आवडत नाहीये. जर मूळच्या निर्दोष धर्मात 2500 वर्षात वाईट गोष्टी शिरल्या असतील तर त्या बाहेर बदलायचा प्रयत्न का झाला नाही? 4 शंकराचार्यांनी एकत्र येऊन धर्म समीक्षा- टीका- बदल असे काही केल्याचे माझ्या ऐकिवात नाही.
उलट होता होईतो मध्ये शिरलेल्या अनिष्ट गोष्टी जपाण्याचाच धर्मपीठाचा प्रयत्न दिसतो, मग 2500 वर्षांपूर्वीचे दाखले देऊन लेखक काय सांगू इच्छीतोय?

स्त्रिया ना शिक्षणाचा हक्क नाकारणे.

स्त्री ला चूल आणि मूल ह्यातच गुंतवणे,.

स्त्री ला पती निवडायचा अधिकार नसणे.

आणि कर्मकांड
हे फक्त हिंदू धर्मात च आहेत हे मात्र साफ चुकीचं आहे सर्वच धर्मात वरील सर्व गोष्टी अस्तित्वात आहेत .
उलट आता च्या काळात बाकी धर्मा पेक्षा हिंदू स्त्रिया जास्त शिक्षित आहेत आणि त्यांच्यावर बंधन सुद्धा कमी आहेत .
लवचिक पना हा फक्त हिंदू धर्मा मध्ये आहे .
म्हणून त्यांनी काळा नुसार स्वतः मध्ये बदल केला आहे

हिंदू
धर्मात च समाज सुधारक लोकांनी कार्य केले आणि स्वः धर्मावर टीका सुद्धा केली आहे .
हे असले प्रकार बाकी धर्मात खपवून घेतले गेले असते का?
फतवा निघाला असता मृत्यू दंडाचा

अमेरिकन स्रियांना तर बांबु पासून टोचणारा, वेदनादायी पोशाख परिधान करायची सक्ती होती. चिनी स्रियांना पावलं लहान रहावीत म्हणून अत्यंत लहान बुट वापरावे लागत असत असे वाचलं होतं. इतर धर्मीय स्त्रिया फार स्वतंत्र आहे असं नाही.

थाई, फिलिपाईन्स देशातील स्रियांचे जीवन पाहिलं तर कळेल काय त्यांच्या चालीरीती आहेत.

देशाच्या धर्मा नुसार जर सर्व्ह केला तर .
शिक्षण ची टक्केवारी आणि
स्त्री स्वतंत्र
ह्यात हिंदू धर्मीय च आघाडीवर आहेत .

फुले असतील किंवा आणि कोण्ही ज्यांनी सुधारणावादी भूमिका घेतली ते सर्व हिंदू च होते कारण एवढी मोकळीक फक्त हिंदू dharmach देवु शकतो .

चिवट
ला धर्म आणि देश ह्यातील तरी फरक समजतो का .

इथे माणूस च पृथ्वी वरचा चा मूलनिवासी आहे की नाही हे पक्के माहीत नाही तिथे बाकी गोष्टींना काही किंमत नाही

इथे माणूस च पृथ्वी वरचा चा मूलनिवासी आहे की नाही हे पक्के माहीत नाही तिथे बाकी गोष्टींना काही किंमत नाही >>> शाब्बास! या नोंदीवर आता मायबोली बंद करण्यात आली तरी चालेल.

महाभारत असेल किंवा रामायण ह्यातील मागचे पुढचे सर्व प्रसंग कडे दुर्लक्ष करायचे आणि हवे ते घेवून टीका करायची ही पद्धत बंद करा

Pages