हिंदू धर्म हा किती प्राचीन आहे याविषयी जाणकारांमध्ये बरेच मतभेद आहेत. हिंदू म्हणजेच "आर्य सनातन वैदिक संस्कृतीच्या" ऋषींचे मत मानायचे तर प्रत्येक १५००० ते २०००० वर्षांनंतर येणाऱ्या प्रलयानंतर मानव हळू हळू पुन्हा एकदा मानव बनू लागतो... ऋषी त्यांच्या स्मृतीतून, त्यांच्या अंतरचक्षुनच्या समोर या साऱ्या सृष्टीचे, तिच्या जडण घडणीचे जे ज्ञान ऋतम्भरा प्रद्नेने दिसते ते मांडतात. म्हणून ते स्वत:ला या वेदांचे निर्माते म्हणवून घेत नाहीत तर "उद्गाते" म्हणवून घेतात. या वेदांची रचना त्यांनी स्वत: केलेली नसते तर ती कवीला ज्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे कविता सुचतात, त्याप्रमाणे ते करतात...पृथ्वीवर प्रथमत: ज्या सात ऋषींनी मानवाला आणले ते सप्तर्षी जे आहेत त्यांच्या नावाबद्दल मतभेद आहेत......यांनी लाखो वर्षांपूर्वी मानवाला पृथ्वीवर आणले....यांची कुले पुढे चालत राहिली....उगम आपण विसरलो...म्हणूनच म्हणतात की ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये....सापडणार नाही... आणि आपल्या आजच्या माहितीत आज पर्यंत ७ महायुगे झालेली असून या प्रत्येक महायुगात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चार युगांचे चक्र पूर्ण होत होत सात माहायुगात प्रत्येकी ही चार युगे म्हणून सात चोक अठ्ठावीस म्हणून अठ्ठावीस युगे विटेवर उभा असे विठ्ठलाला म्हंटले जाते.
आता ही ७१ चतुर्युगे एका मन्वंतरात असतात. म्हणजेच मनु बदल...म्हणजेच एक मनु अर्थात त्या मनु म्हणजे मानवाच्या कालाचा राजा अथवा अधिपती, हा वेगवेगळा असतो. आत्तापर्यंत ७ मनु म्हणजेच ७ मन्वंतरे झालेली असून सध्याचा "वैवस्वत" हा मनु आहे. अजून ७ मन्वंतरे होणार आहेत. म्हणजेच वैदिकांची {म्हणजे फक्त ब्राह्मण नव्हे] अर्थात ऋषींची कालगणना अथवा संख्यांची गणना ही अणूपासून परार्धापर्यंत प्रचंड मोठी आहे. म्हणजेच हा काल किती मोठा असेल याची सर्वांनाच कल्पना आली असेल. म्हणूनच जाता जाता एक सांगावेसे वाटते सध्या २०१२ साली जग नष्ट होणार असा बागुलबुवा उभा केला आहे तो खरा नसून लाटीन अमेरिकेतील "माया" संस्कृतीचे कॅलेंडर २०१२ रोजी संपत होते. म्हणून पाश्चात्यांनी पश्चिमेच्या धार्मिक समजुतींच्या नुसार "द डे ऑफ डेस्टिनी" अथवा "कयामत का दिन" समजून त्या दिवशी जग नष्ट होऊन सर्वांना देवा समोर उभे केले जाऊन त्यांच्या पापाचा झाडा या एकाच दिवशी केला जाणार आहे असे समजून तो प्रचार चालवलेला होता. आणि वरचा हिशोब वाचला तर हे अजिबात खरे नाही हे सर्वांच्या सहज लक्षात येऊ शकते. त्यामुळे आपण निश्चिंत रहाण्यास हरकत नाही. असो...
पुढे जाण्या पूर्वी इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की फार प्राचीन काळी सध्या ज्यांना "शुद्र" अथवा दलित असे म्हंटले अथवा समजले जाते अशा समाजातील अनेक विद्वानांनी म्हणजेच ऋषींनी वेदातील अनेक ऋचा लिहिलेल्या असून एक उदाहरण द्यायचे झाले तर "दीर्घतमा" अथवा "दीर्घतमस" या एका "शुद्र ऋषींनी" वेदातील अस्यवामीय सुक्त हे अतिशय महत्वाचे सुक्त लिहिले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आताच्या काळातील तथाकथित "जातीयता" त्यावेळेस अजिबात नव्हती...या सर्व ऋषींना अतिशय मान दिला जात असे. सूर्या सावित्री, गार्गी, मैत्र्येयी, इंद्राणी, लोपामुद्रा, अनुसया, अरुंधती अशा अनेक विद्वान स्त्रियांचे देखील योगदान वेद काळात मोठे आहे. त्यांना पडद्यात अथवा चूल मूळ सांभाळत कोंडून ठेवले जात नव्हते. यातील मैत्रेयी या ब्रह्मवादिनीने वेदातील १० ऋचा लिहिल्या आहेत. सीतामाईने स्वयंवर पद्धतीने तर आणि द्रौपदीने पण लावून आपापले वर अर्थात पती निवडलेले होते. त्यामुळे वैदिक अथवा हिंदू धर्मात स्त्रियांचा सतत छळ झाला आहे हा प्रचार खोटा आहे. हा...मधल्या म्हणजे गेल्या २००० ते २५०० वर्षांत काही घटना झाल्या असतील... पण त्यामुळे सगळ्या हिंदू संस्कृतीला दोष देणे चुकीचे आहे.
तर, हिंदू धर्माला "हिंदू" हे नाव साधारण २५०० ते ३००० वर्षांपूर्वी पडले आहे. ज्यावेळेस वैदिक संस्कृती आणि असुर, दानव आणि दैत्य संस्कृती यांच्यातील भेद वाढत गेला, त्यावेळेस इराणात आदरणीय "अहुर्मझ्द" या असुर राजाने वेगळ्या राज्याची स्थापना केली. हे लोक "स" चा उच्चार "ह" करत असल्याने "असुरमझद" चा उच्चार "आहुर माझ्द" असा केला गेला भारतातील "सरस्वती" नदीचा उच्चार "हर हवैती" असा तर "सिंधू स्थान" चा उच्चार "हिंदुस्थान" असा केला गेला. सिंधू नदी अथवा सिंधू समुद्रापलीकडील लोकांना हे लोक "सिंधू" म्हणजेच "हिंदू" म्हणत असत. कश्यप ऋषींना १३ पत्न्या होत्या. पैकी "दिती"ची मुले म्हणजे "दैत्य", "अदितीची" मुले म्हणजे "आदित्य" म्हणजेच "देव" आणि "दन्यू" या पत्नीची मुले म्हणजे "दानव" होत. हे म्हणजे राक्षस नसून देवाकडे कमी लक्ष पण उपभोगांकडे जास्त लक्ष अशी संस्कृती असलेले लोक होत. म्हणून अंतरातील देव शोधून मुक्ती मिळवायची अशी जाणीव ठेवणार्या आर्यांची स्वत:च्या रक्षणासाठी यांच्याशी नाइलाजाने युद्धे होत असत. राक्षस म्हणजे सुद्धा २-४ शिंगे असलेले, अतिशय क्रूर असे काही नसून फक्त स्वत:चे क्षेत्र, आणि स्वार्थ यांचे रक्षण करणारे असा त्याचा अर्थ आहे.
जर्मनी हा देश "Danub" या नदीच्या दोन तीरांवर वसलेला असून या "दानव" या शब्दाचा हा अपभ्रंश असू शकतो. बंगाल, उत्तर भारत, पंजाबी यांचे उच्चार आठवा म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल...तसेच जर्मनीचे मूळ नाव "द्युइश Land " म्हणजे "द्विश दल" जसे की "द्विदल धान्य"...."दानुब" नदीच्या दोन तीरांवर वसलेले असल्याने "द्विश दल" जसे की "इंग्लंड म्हणजे "आंग्ल दल"......
"धर्म" म्हणजे ....."धारयति इति धर्म" म्हणजे जो संस्कृतीचे धारण करतो आणि मानवाला जगण्यास आवश्यक असे नैतिक, सामाजिक, बौद्धिक, आर्थिक, मानसिक, भावनिक "आणि" "अध्यात्मिक" असे वातावरण तयार करतो तो धर्म ... आणि याच साठी धर्माची आवश्यकता...अन्यथा माणूस हा एक " सर्व प्राथमिक गरजा असलेला बुभुक्षित प्राणीच" आहे. त्याला धर्म "धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष" या सुसंस्कृत चौकटीत बद्ध करतो. नाहीतर दिवसा ढवळ्या बायका पळवल्या गेल्या असत्या...हे एक उदाहरण झाले.... आर्यांनी कोणत्याही एकाच देवतेची पूजा म्हणजे धर्म असे समजले नाही. आर्य धर्मात वहाणे हा पाण्याचा धर्म, पितृ धर्म, मातृधर्म, पुत्र धर्म हे धर्म सांगितले आहेत. ज्याला पाश्चात्य लोक धर्म म्हणतात त्याला आर्य "मोक्ष" कल्पना म्हणतात.
असो...आता हिंदू धर्माच्या मूळ नावाकडे वळू...
हिंदू धर्माचे मूळ नाव आहे "आर्य सनातन वैदिक संस्कृती"...
१] आर्य- अर म्हणजे चिरणे, फाडणे ...संकटांना अडचणींना चिरत पुढे जाणारे....प्रगती करणारे....फक्त गोरे दिसणारे, निळ्या घार्या डोळ्याचे लोक म्हणजे आर्य हा समज खोटा आहे. राम आणि कृष्ण हे काळे सावळे होते हे सर्वांनाच माहित आहे. आर्य असणे ही एक उच्च मानसिक, बौद्धिक, भावनिक, वैद्न्यानिक आणि अध्यात्मिक अवस्था आहे. कोणता वंश नव्हे...
२] सनातन- स: नूतन:....नित्य नूतन असणारा किंवा असणारे....हिंदू धर्म हा नित्य नवा आहे...खुळचट जुन्या समजुतींना कवटाळून बसणारा नव्हे...किंवा "सनातन" याचा अर्थ भस्माचे पट्टे ओढून जपाच्या माळा ओढत बसणे, लांब हो लांब हो ....शिवू नको असे म्हणणे मुळीच नव्हे हे पक्के लक्षात घेणे आवश्यक आहे. जसा कालचा सागर कालच्या प्रियकर प्रेयसीन्साठी आणि आजच्याही जोडप्यांसाठी "नवाच" असतो तसा काला प्रमाणे बदलणारा हिंदू धर्म हा "सनातन" म्हणजे सतत नवाच असतो....
३] वैदिक- "विद" या संस्कृत धातूचा अर्थ आहे " आतून, हृदयातून" जाणणे .....म्हणजे कसे? तर ...जर का मी तुम्हाला तासभर "आंबा" विषयावर व्याख्यान दिले तरी तुम्हाला आंबा पाहिला नसेल तर अंबा म्हणजे काय ते यथार्थपणे कळणार नाही. पण ज्या वेळेस तुम्ही आंबा कापून जिभेवर टाकणार त्यावेळेस तुम्हाला कळणार की आंबा काय चीज आहे ते....हे जे आतून कळणे आहे त्याला "विद" म्हंटले आहे. याच "विद" धातू पासून वेद हा शब्द बनला आहे. हेच वैदिक जे दक्षिणेत रहात होते त्यांनी स्वत:ला "द्रु विद" म्हणजे कोणतीही गोष्ट "द्रुत गतीने" "जाणणारे" ही पदवी लावून घेतली. याचाच अपभ्रंश होऊन "द्रविड" झाले. आजही जुन्या इंग्लिश डिक्शनरी मध्ये "Druid " हा शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे "जुने जाणते लोक"... द्रविड या शब्दाचे पुढील रूपांतरण आणि त्याचे संदर्भ हे वादाला तोंड फोडतील असे असतील असे मला वाटते आहे...त्यामुळे ज्यांना जिज्ञासा असेल त्यांना मी वैयक्तिक चर्चेत सांगू शकेन....
४] संस्कृती- प्रकृती ही मूळ आहे. प्रकृती म्हणजे जे जसे आहे तसे....कोणत्याही गोष्टीचे मूळ रूप, निसर्ग अथवा सृष्टी....त्यात बदल केला अथवा झाला की त्याला संस्कृती किंवा विकृती म्हंटले जाते. चांगला बदल- संस्कृती आणि वाईट बदल- विकृती. नुसते पाणी ही प्रकृती, गटार ही विकृती आणि तीर्थ ही संस्कृती...
तसेच माझ्याजवळ समजा २ पोळ्या आहेत आणि दुसऱ्याकडेही २ पोळ्या आहेत, तर प्रत्येकाने आपापल्या पोळ्या खाणे ही प्रकृती, दुसरयाच्या हिसकावून घेणे ही विकृती आणि आपल्याही पोळ्या त्याच्या गरजेनुसार दुसऱ्याला देणे ही संस्कृती....आणि नेमकी हीच संस्कृती दैत्य, दानव आणि असुरांकडे नव्हती....
हाच आपला धर्म. हीच आपली संस्कृती. हीच आपली ओळख मित्रांनो.
असा हा आपल्या या आर्यभूमी मधील [ जम्बूद्वीप, , भारतवर्ष अशी आपल्या देशाची प्राचीन नावे आहेत. ] वैदिक धर्माचा थोडासा परिचय. अजून खूप काही लिहायचे आहे. जस जसे शक्य होईल तस तसे विषय मांडत जाईन. लोकमान्य टिळक ज्यांना “मोक्ष मुलर” म्हणत असत असे “Max Muller” नावाचे जर्मनीचे एक विद्वान ज्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि वेदांची महती जगापुढे मांडली. पण त्यांनी हे करत असताना वेदांचा काळ, आर्यांचे उगमस्थान या बाबत बरीच गल्लत केलेली आहे. आणि आपल्या कडील काही संघटना नेमक्या याच गोष्टींचा गैरफायदा घेऊन आर्य-द्रविड-दस्यू असा संघर्ष पेटवू पहात आहेत. पण आर्यच अधिक प्रगत होऊन द्रविड झालेले आहेत हे तुमच्या आता लक्षात आलेले असेलच. हज्जारो ग्रंथ काळाच्या ओघात नष्ट झालेले आहेत. आपल्याला आपण काल कोणती भाजी खाल्ली आहे हे आठवत नाही. मग हज्जारो-लाखो वर्षांच्या पूर्वी घडून गेलेले सांगता येणे अवघडच आहे ना? आर्य हे भारताच्या बाहेरून आलेले नसून ते भारतातीलच आहेत. साधारण १०,००० वर्षांनी पृथ्वीचा ध्रुव बदलतो. आत्ता पोलारीस हा ध्रुव आहे. त्यामुळे शक्यता अशी आहे की भारताची आत्ताची जी पोझिशन आहे, जी जागा आहे ती कदाचित वेगळ्या ठिकाणी असू शकेल. पण हा अवघड विषय आहे. त्यावर काही बोलणे आणि तेही अधिकारवाणीने हे शक्य नाही. असो.
वर म्हंटल्याप्रमाणे सप्तर्षींची अधिक माहिती, मानवाचे पृथ्वीवर आगमन, दत्त गुरु म्हणजे कोण आणि कुठून आले याबद्दल जाणून घेऊ या ....सध्या ऋषी संस्कृतीला वंदन करून इथेच थांबतो....
!! इति लेखन सीमा !!
साभार -Dr हेमंत सहस्रबुद्धे उर्फ कलादास......
छान माहिती सुपर्णाजी. केवळ
छान माहिती सुपर्णाजी. केवळ पूर्वापार आलेल्या चालीरीती म्हणून सरसकट डावलण्यापेक्षा त्यामागील विज्ञान काय असेल त्याचा विचार, निरीक्षण, किंवा प्रयोग करावेत आणि मगच विश्वास किंवा अविश्वास दाखवावा. हेच खरे बुद्धिप्रामाण्यवादाचे लक्षण आहे. असे म्हणतात कि पूर्वीच्या काळातील आपले ऋषी मुनी आत्ताच्या काळातील वैज्ञानिकांसारखेच होते. त्यांनी ही निरीक्षणे विज्ञानाच्या कसोटीवर उतरवूनच नोंदविली असणार. आता काळामुळे अथवा इतर काही कारणांमुळे चालीरीतींच्या मागील वैज्ञानिक स्पष्टीकरण कदाचित नष्ट झाले असेल परंतु पिढ्यानपिढ्या मुख्य गाभा पुढे सुरु राहिला ज्यांना आपण चालीरीती म्हणतो. एक उदाहरण घ्यायचे झाल्यास सध्याच्या काळातील multiverse, time dilation इत्यादी concepts आपल्या ग्रंथातून आलेल्या आहेत.आपल्या पूर्वजांना या सर्व गोष्टींची कल्पना होती फक्त त्यांचा संदर्भ किंवा स्पष्टीकरण त्यांनी त्या काळाला अनुसरून दिले आहे ना की आत्तासारख्या वैज्ञानिक भाषेत. परंतु यामुळे त्याचे महत्व अजिबात कमी होत नाही. उलट यावर अधिक संशोधन व्हायला पाहिजे. काही पाश्च्यात्य लोक आपले वेद, उपनिषदे यावर संशोधन करत आहेतच. आपले लोक मात्र केवळ ट्रोलिंग करण्यातच धन्यता मानतात.
हिंदू धर्माची चाल/रीत आहे सांगितलं, की मात्र हिंदू धर्मावर जुनाट व अंध म्हणून टीका करतात---> हेही अगदी खरे.
मोठ्या प्रमाणावर वडे तळून
मोठ्या प्रमाणावर वडे तळून विकायला हवेत
सोबत मिरची आणि कांदा भजी पण विकावी
आणि भरतीच्या वेळी केलेल्या वड्यांचा रेट वेगळा लावावा
आणि अमावस्येला तर वडे मिळणार नाहीत असा बोर्ड लावावा
पुण्यात असाल तर बघता बघता यशस्वी उद्योजक व्हाल
पूर्वीच्या काळातील आपले ऋषी
पूर्वीच्या काळातील आपले ऋषी मुनी आत्ताच्या काळातील वैज्ञानिकांसारखेच होते. त्यांनी ही निरीक्षणे विज्ञानाच्या कसोटीवर उतरवूनच नोंदविली असणार. आता काळामुळे अथवा इतर काही कारणांमुळे चालीरीतींच्या मागील वैज्ञानिक स्पष्टीकरण कदाचित नष्ट झाले असेल परंतु पिढ्यानपिढ्या मुख्य गाभा पुढे सुरु राहिला ज्यांना आपण चालीरीती म्हणतो. >>>>>
अगदी खरे कोहं जी
>>>>>>आणि अमावस्येला तर वडे
>>>>>>आणि अमावस्येला तर वडे मिळणार नाहीत असा बोर्ड लावावा>>>>>
एखाद्या गोष्टीचा विपर्यास कसा करावा हे इकडे पाहावे,
आधुनिक विज्ञान आपल्याकडे पूर्वापार आहे असे जरा म्हंटले ,की वितंडवाद घालणारे लोक येतात लगेच. आम्ही पूर्वीपासून मागासलेले आहोत असे ठासून सांगायची इतकी का हौस असते लोकांना न कळे.
डॉक्टरांनी फक्त भरती ओहोटीचे गणित सांभाळा इतकेच म्हंटले आहे, अमावास्येला तळण करू नका नाही म्हंटले आहे.
जाऊ दे बाई, सगळ्यांशी वाद घालून काही मी त्यांचे समाधान करू शकणार नाही, प्रचिती घ्याल तेव्हा कळेल.
थांबते इकडेच.
सुपर्णा ताई तुमचं आडनाव छान
सुपर्णा ताई तुमचं आडनाव छान आहे. मला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची आठवण झाली.
मला अपर्णा रामतीर्थकरांची.
मला अपर्णा रामतीर्थकरांची.
तीर्थ कॉमन आहे.
तीर्थ कॉमन आहे.
प्रलय वीस लाख वर्षांनी येतो.
प्रलय वीस लाख वर्षांनी येतो. असे वीस प्रलय आजपर्यंत होऊन गेले आहेत.
मग विश्वाचे गोठणे सुरू होते. पहावे तिकडे हिम.
अशा अवस्थेत विश्व पडून राहते.
हा कालावधी किती असतो याची माहिती नाही.
कारण या काळात शेषशायी विष्णू भगवान झोपलेले
प्रलयाचे कारण महादेव.
महादेवाच्या नंतर काही नाही आधी काही नाही.
महादेवाच्या वर काही नाही खाली काही नाही.
महादेव केंद्रक
केंद्रक शक्ती म्हणजे आदीशक्ती.
हिची ओळख व्हायला हवी.
आदिशक्ती म्हणजे विश्वचेतना
सृष्टी म्हणजे या चेतनेचा महाशब्दावा हिस्सा.
नाही हे इथे संपणार नाही.
अफाट आहे.
वेळ मिळाल्यावर मग लिहीन यावर.
गुरूमाला शरण जा.
अहो हा विपर्यास नव्हे
अहो हा विपर्यास नव्हे
असे वेगळे बोर्ड लागले की पुणेकरांना भारी वाटते आणि त्यातून आता कसे खेकसून बोललात तसे बोलले तर दुकानदाराच्या पुणेकरावर शिक्कामोर्तब होते
गुरुमा अवतारल्या माबोवर.
गुरुमा अवतारल्या माबोवर.
डॉ. हेमंत सहस्त्रबुद्धे आभारी
डॉ. हेमंत सहस्त्रबुद्धे आभारी आहे. अत्यंत अनमोल अशी माहीती दिलीत आपण.
विज्ञान जसजसे प्रगत होत जाईल तस तसे ते अध्यात्म सांगू लागेल यात शंकाच नको.
एका प्रयोगशा़ळेत कसलासा प्रयोग केला
तर देवकण आढळले.
शेवटी विज्ञानाला देवकण आढळले.
इथून पुढे विज्ञानासाठी जे गूढ आहे
त्याची उकल होईल
अध्यात्मिक तेज ज्यांच्या ठायी आहे
त्यांना ते केव्हांच उकलले आहे.
काय भंकस चालू आहे इथे
काय भंकस चालू आहे इथे
फार असहाय्य हतबल वाटतं हे असे मेसेज आणि त्यावर मनोभावे विश्वास ठेवणारे बघितल्यावर.
खरं आहे
खरं आहे
प्राचीन ग्रंथात विविध विषयावर
प्राचीन ग्रंथात विविध विषयावर भाष्य केले आहे ते तर सत्यच आहे कारण लिखित स्वरूपात ते अस्तित्वात आहे .
दुसरे आपल्या प्राचीन ग्रंथांचा ब्रिटिश लोकांनी सुद्धा अभ्यास केला आहे त्यांना ते अभ्यास करण्याच्या लायकीचे वाटतात त्यातच सर्व आले .
इथे जे विरोध करत आहेत किंवा विरोधी मत देत आहेत ते हिंदू धर्माच्या द्वेषाने देत आहेत .
त्यांनी काही फरक पडत नाही शेवटी सत्य हे सत्यच असते आणि ते एकच असतं ते कोणाला आवडत नाही म्हणून बदलत नाही .
बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात
बॉलिवूडचा ‘किंग’ अर्थात शाहरुख खान याच्या मुलाच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत बऱ्याच चर्चा आहेत. ‘द लायन किंग’ या चित्रपटासाठी त्याने नुकताच आवाजसुद्धा दिला आहे. पण एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खान बॉलिवूड नाही तर टॉलिवूड चित्रपटातून पदार्पण करणार असल्याचं समजतंय. एका बिग बजेट तेलुगू चित्रपटासाठी त्याला विचारण्यात आल्याचं कळतंय. हा चित्रपट ‘बाहुबली’सारखाच भव्यदिव्य असणार आहे.
विशेष म्हणजे ‘बाहुबली’चे मुख्य अभिनेते प्रभास, राणा डग्गुबत्ती यांच्यासोबत आर्यन खान काम करणार असल्याची माहिती आहे. दिग्दर्शक गुणाशेखर यांनी आर्यनला चित्रपटातील महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी विचारले आहे. ‘हिरण्यकश्यपू’ असं चित्रपटाचं नाव असून हा यामध्ये तमन्ना आणि अनुष्का शेट्टी यांच्याही भूमिका आहेत.
आर्यन खान प्रल्हाद होणार आहे.
बरं मग?
बरं मग?
किती मुद्दे आहेत , आर्य
10 अवतारात उतक्रानती दिसते, ते लिहिले नाही का कुणी?
खरं?
खरं?
गलिच्छ मानसिकता. यक्क!
गलिच्छ मानसिकता. यक्क!
कुणाची?
कुणाची?
लिखित आहे म्हणून ते सत्य ही
लिखित आहे म्हणून ते सत्य ही सत्याची व्याख्या कशी काय असू शकते? या व्याख्येनुसार सगळ्या कथा कादंबऱ्यांतले वर्णन सत्य मानावे लागेल. धर्म रूढिग्रस्त होऊन कुंठित होतो तेव्हा नवनव्या संकल्पना सामावून घेऊन त्याला नवी झळाळी देणे क्रमप्राप्त असते. आद्य शंकराचार्य आणि इतर अनेक लहानथोर साधुसंत विचारवंतांनी हे कार्य केले. ते कुणी धर्मद्वेष्टे नव्हते, उलट उत्कट धर्मप्रेमी आणि धर्मानुयायांचे कल्याण इच्छिणारे होते. आणि हे काम अव्याहत चालणारे आहे. कारण काही संकल्पना जुन्या, कालविसंगत ठरत असतात. परिस्थिती सतत बदलत असते आणि त्यानुसार काही संकल्पना समाजविकास, जनकल्याणाला अडथळा ठरतात. ही जळमटे वेळोवेळी काढून टाकावी लागतात. यात धर्मविरोधी असे काहीच नाही. जुन्याला कवटाळून बसणाऱ्यांचा आवाज आणि शक्ती हळूहळू क्षीण होतच असते. असा नवनवोन्मेषशाली धर्म नव्या युगाचा, नव्या संकल्पनांचा, नव्या शोधांचा उद्गाता आणि दीपधारी (टॉर्च बेअरर) ठरतो.
Original आणि duplicate chya
Original आणि duplicate chya दर्जा मध्ये खूप मोठा फरक असतो .
शेवटी ओरिजनल ते ओरिजनल.
Original आणि duplicate chya
Original आणि duplicate chya दर्जा मध्ये खूप मोठा फरक असतो .
शेवटी ओरिजनल ते ओरिजनल.
धर्म, संस्कृती,
धर्म, संस्कृती, अध्यात्मविज्ञान याबाबत सामान्य माणसाने मत देऊ नये
अधिकारी व्यक्तींचे ते काम असते
त्यांना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही
अन्यथा वेदांचे अर्थ लोक वाटेल तसे लावतात
ऋचा म्हणजे कोडी आहेत
ती कोडी सोडवायला तशीच दिव्य प्रतिभा लागते
गुरूमा म्हणतात ज्याचे काम त्याने करावे
गुरूमाला शरण जा
सध्या अमुक अमुक गोष्टी
सध्या अमुक अमुक गोष्टी प्राचीन ग्रंथांत आहेत, ऋषींनी लिहून ठेवल्यात असं सांगून खपवल्या जातात.
वैमानिकशास्त्र नावाचा ग्रंथ एकोणिसाव्या शतकात रचला गेला होता. वेदिक मॅथ्स नावाचा काही प्रकार वेदांमध्ये नाही.
दुसरीकडे आपल्याला सोयीचं नसलं की हे प्रक्षिप्त आहे असं ठरवलं जातं.
-------
हा वरचा ओरिजिनल आणि डुप्लिकेटचा नियम लावायचा तर ज्ञानेश्वर आणि तुकाराम केरात टाकावे लागतील.
हा दृष्टीकोण पण चुकीचा आहे
हा दृष्टीकोण पण चुकीचा आहे
पण तो वैफल्यातून आला आहे.
गुरूमा सदबुद्धी देवोत.
आपले विचार हे धर्ममार्तंडांच्या फसवणुकीमाळे आले आहेत.
पण याचा अर्थ मूळातच फसवणूक असे नाही.
आपला दृष्टीकोण फसला आहे
दोन चार जण चोर निघाले म्हणून सगळू दउनियाच चोर ठरते का ?
तो तो भाग खड्यासारखा वेचावा
फेकून द्यावा.
विद्याननिष्ठांच्या मदतीने असा भाग काढून टाकावा
पण विद्याननिष्ठांनी विवेकाने काम घ्यावे
सगळेच कचरा आहे असे समजू नये.
शेवटी देवकण सापडलेच ना ?
गुरूमाऊलीस शरण जा
अॅडमिन आणि वेमांच्या खास
अॅडमिन आणि वेमांच्या खास मर्जीतील लोकांची मतं खोडण्यासाठी त्यांच्या मर्जीतल्या लोकांनीच पुढाकार घ्यावा. मत मांडल्याने शिवीगाळ होते तरी दोघेही ढिम्म असतात. यातून शिकता येण्यासारखे आहे. मायबोली हे संस्थळ आता खुल्या चर्चेसाठी राहीले नाही असा याचा अर्थ.
आशीर्वाद गुरूमा कुठे भेटतील?
आशीर्वाद गुरूमा कुठे भेटतील?
दुसर्या एका धाग्यावर निरंजन
दुसर्या एका धाग्यावर निरंजन घाटेंचा विषय चाललाय. त्यांचा हा लेख दिसला.
https://www.facebook.com/1060416573982024/photos/pcb.2353486868008315/23...
माझाच धर्म श्रेष्ठ आहे असं
माझाच धर्म श्रेष्ठ आहे असं रेटून बोलणारी मंडळी प्रत्येक धर्मात असतात व संख्येने फार कमी असतात. पण गंमत अशी की स्वत:च्या धर्मातील लोकही यांना गांभीर्याने घेत नाहीत. धर्मातील मोठा जनसमुदाय हा तीर्थयात्रांना सहली सारखा जात असतो, व सणसमारंभाच्या वेळेस गोडधोड जेवणावर/ खाटखूट वर ताव मारत असतो. त्याच्यासाठी देवदर्शन हे पिकनिक, टूर सारखे असते.
Pages