हिंदू धर्म हा किती प्राचीन आहे याविषयी जाणकारांमध्ये बरेच मतभेद आहेत. हिंदू म्हणजेच "आर्य सनातन वैदिक संस्कृतीच्या" ऋषींचे मत मानायचे तर प्रत्येक १५००० ते २०००० वर्षांनंतर येणाऱ्या प्रलयानंतर मानव हळू हळू पुन्हा एकदा मानव बनू लागतो... ऋषी त्यांच्या स्मृतीतून, त्यांच्या अंतरचक्षुनच्या समोर या साऱ्या सृष्टीचे, तिच्या जडण घडणीचे जे ज्ञान ऋतम्भरा प्रद्नेने दिसते ते मांडतात. म्हणून ते स्वत:ला या वेदांचे निर्माते म्हणवून घेत नाहीत तर "उद्गाते" म्हणवून घेतात. या वेदांची रचना त्यांनी स्वत: केलेली नसते तर ती कवीला ज्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे कविता सुचतात, त्याप्रमाणे ते करतात...पृथ्वीवर प्रथमत: ज्या सात ऋषींनी मानवाला आणले ते सप्तर्षी जे आहेत त्यांच्या नावाबद्दल मतभेद आहेत......यांनी लाखो वर्षांपूर्वी मानवाला पृथ्वीवर आणले....यांची कुले पुढे चालत राहिली....उगम आपण विसरलो...म्हणूनच म्हणतात की ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये....सापडणार नाही... आणि आपल्या आजच्या माहितीत आज पर्यंत ७ महायुगे झालेली असून या प्रत्येक महायुगात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चार युगांचे चक्र पूर्ण होत होत सात माहायुगात प्रत्येकी ही चार युगे म्हणून सात चोक अठ्ठावीस म्हणून अठ्ठावीस युगे विटेवर उभा असे विठ्ठलाला म्हंटले जाते.
आता ही ७१ चतुर्युगे एका मन्वंतरात असतात. म्हणजेच मनु बदल...म्हणजेच एक मनु अर्थात त्या मनु म्हणजे मानवाच्या कालाचा राजा अथवा अधिपती, हा वेगवेगळा असतो. आत्तापर्यंत ७ मनु म्हणजेच ७ मन्वंतरे झालेली असून सध्याचा "वैवस्वत" हा मनु आहे. अजून ७ मन्वंतरे होणार आहेत. म्हणजेच वैदिकांची {म्हणजे फक्त ब्राह्मण नव्हे] अर्थात ऋषींची कालगणना अथवा संख्यांची गणना ही अणूपासून परार्धापर्यंत प्रचंड मोठी आहे. म्हणजेच हा काल किती मोठा असेल याची सर्वांनाच कल्पना आली असेल. म्हणूनच जाता जाता एक सांगावेसे वाटते सध्या २०१२ साली जग नष्ट होणार असा बागुलबुवा उभा केला आहे तो खरा नसून लाटीन अमेरिकेतील "माया" संस्कृतीचे कॅलेंडर २०१२ रोजी संपत होते. म्हणून पाश्चात्यांनी पश्चिमेच्या धार्मिक समजुतींच्या नुसार "द डे ऑफ डेस्टिनी" अथवा "कयामत का दिन" समजून त्या दिवशी जग नष्ट होऊन सर्वांना देवा समोर उभे केले जाऊन त्यांच्या पापाचा झाडा या एकाच दिवशी केला जाणार आहे असे समजून तो प्रचार चालवलेला होता. आणि वरचा हिशोब वाचला तर हे अजिबात खरे नाही हे सर्वांच्या सहज लक्षात येऊ शकते. त्यामुळे आपण निश्चिंत रहाण्यास हरकत नाही. असो...
पुढे जाण्या पूर्वी इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की फार प्राचीन काळी सध्या ज्यांना "शुद्र" अथवा दलित असे म्हंटले अथवा समजले जाते अशा समाजातील अनेक विद्वानांनी म्हणजेच ऋषींनी वेदातील अनेक ऋचा लिहिलेल्या असून एक उदाहरण द्यायचे झाले तर "दीर्घतमा" अथवा "दीर्घतमस" या एका "शुद्र ऋषींनी" वेदातील अस्यवामीय सुक्त हे अतिशय महत्वाचे सुक्त लिहिले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आताच्या काळातील तथाकथित "जातीयता" त्यावेळेस अजिबात नव्हती...या सर्व ऋषींना अतिशय मान दिला जात असे. सूर्या सावित्री, गार्गी, मैत्र्येयी, इंद्राणी, लोपामुद्रा, अनुसया, अरुंधती अशा अनेक विद्वान स्त्रियांचे देखील योगदान वेद काळात मोठे आहे. त्यांना पडद्यात अथवा चूल मूळ सांभाळत कोंडून ठेवले जात नव्हते. यातील मैत्रेयी या ब्रह्मवादिनीने वेदातील १० ऋचा लिहिल्या आहेत. सीतामाईने स्वयंवर पद्धतीने तर आणि द्रौपदीने पण लावून आपापले वर अर्थात पती निवडलेले होते. त्यामुळे वैदिक अथवा हिंदू धर्मात स्त्रियांचा सतत छळ झाला आहे हा प्रचार खोटा आहे. हा...मधल्या म्हणजे गेल्या २००० ते २५०० वर्षांत काही घटना झाल्या असतील... पण त्यामुळे सगळ्या हिंदू संस्कृतीला दोष देणे चुकीचे आहे.
तर, हिंदू धर्माला "हिंदू" हे नाव साधारण २५०० ते ३००० वर्षांपूर्वी पडले आहे. ज्यावेळेस वैदिक संस्कृती आणि असुर, दानव आणि दैत्य संस्कृती यांच्यातील भेद वाढत गेला, त्यावेळेस इराणात आदरणीय "अहुर्मझ्द" या असुर राजाने वेगळ्या राज्याची स्थापना केली. हे लोक "स" चा उच्चार "ह" करत असल्याने "असुरमझद" चा उच्चार "आहुर माझ्द" असा केला गेला भारतातील "सरस्वती" नदीचा उच्चार "हर हवैती" असा तर "सिंधू स्थान" चा उच्चार "हिंदुस्थान" असा केला गेला. सिंधू नदी अथवा सिंधू समुद्रापलीकडील लोकांना हे लोक "सिंधू" म्हणजेच "हिंदू" म्हणत असत. कश्यप ऋषींना १३ पत्न्या होत्या. पैकी "दिती"ची मुले म्हणजे "दैत्य", "अदितीची" मुले म्हणजे "आदित्य" म्हणजेच "देव" आणि "दन्यू" या पत्नीची मुले म्हणजे "दानव" होत. हे म्हणजे राक्षस नसून देवाकडे कमी लक्ष पण उपभोगांकडे जास्त लक्ष अशी संस्कृती असलेले लोक होत. म्हणून अंतरातील देव शोधून मुक्ती मिळवायची अशी जाणीव ठेवणार्या आर्यांची स्वत:च्या रक्षणासाठी यांच्याशी नाइलाजाने युद्धे होत असत. राक्षस म्हणजे सुद्धा २-४ शिंगे असलेले, अतिशय क्रूर असे काही नसून फक्त स्वत:चे क्षेत्र, आणि स्वार्थ यांचे रक्षण करणारे असा त्याचा अर्थ आहे.
जर्मनी हा देश "Danub" या नदीच्या दोन तीरांवर वसलेला असून या "दानव" या शब्दाचा हा अपभ्रंश असू शकतो. बंगाल, उत्तर भारत, पंजाबी यांचे उच्चार आठवा म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल...तसेच जर्मनीचे मूळ नाव "द्युइश Land " म्हणजे "द्विश दल" जसे की "द्विदल धान्य"...."दानुब" नदीच्या दोन तीरांवर वसलेले असल्याने "द्विश दल" जसे की "इंग्लंड म्हणजे "आंग्ल दल"......
"धर्म" म्हणजे ....."धारयति इति धर्म" म्हणजे जो संस्कृतीचे धारण करतो आणि मानवाला जगण्यास आवश्यक असे नैतिक, सामाजिक, बौद्धिक, आर्थिक, मानसिक, भावनिक "आणि" "अध्यात्मिक" असे वातावरण तयार करतो तो धर्म ... आणि याच साठी धर्माची आवश्यकता...अन्यथा माणूस हा एक " सर्व प्राथमिक गरजा असलेला बुभुक्षित प्राणीच" आहे. त्याला धर्म "धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष" या सुसंस्कृत चौकटीत बद्ध करतो. नाहीतर दिवसा ढवळ्या बायका पळवल्या गेल्या असत्या...हे एक उदाहरण झाले.... आर्यांनी कोणत्याही एकाच देवतेची पूजा म्हणजे धर्म असे समजले नाही. आर्य धर्मात वहाणे हा पाण्याचा धर्म, पितृ धर्म, मातृधर्म, पुत्र धर्म हे धर्म सांगितले आहेत. ज्याला पाश्चात्य लोक धर्म म्हणतात त्याला आर्य "मोक्ष" कल्पना म्हणतात.
असो...आता हिंदू धर्माच्या मूळ नावाकडे वळू...
हिंदू धर्माचे मूळ नाव आहे "आर्य सनातन वैदिक संस्कृती"...
१] आर्य- अर म्हणजे चिरणे, फाडणे ...संकटांना अडचणींना चिरत पुढे जाणारे....प्रगती करणारे....फक्त गोरे दिसणारे, निळ्या घार्या डोळ्याचे लोक म्हणजे आर्य हा समज खोटा आहे. राम आणि कृष्ण हे काळे सावळे होते हे सर्वांनाच माहित आहे. आर्य असणे ही एक उच्च मानसिक, बौद्धिक, भावनिक, वैद्न्यानिक आणि अध्यात्मिक अवस्था आहे. कोणता वंश नव्हे...
२] सनातन- स: नूतन:....नित्य नूतन असणारा किंवा असणारे....हिंदू धर्म हा नित्य नवा आहे...खुळचट जुन्या समजुतींना कवटाळून बसणारा नव्हे...किंवा "सनातन" याचा अर्थ भस्माचे पट्टे ओढून जपाच्या माळा ओढत बसणे, लांब हो लांब हो ....शिवू नको असे म्हणणे मुळीच नव्हे हे पक्के लक्षात घेणे आवश्यक आहे. जसा कालचा सागर कालच्या प्रियकर प्रेयसीन्साठी आणि आजच्याही जोडप्यांसाठी "नवाच" असतो तसा काला प्रमाणे बदलणारा हिंदू धर्म हा "सनातन" म्हणजे सतत नवाच असतो....
३] वैदिक- "विद" या संस्कृत धातूचा अर्थ आहे " आतून, हृदयातून" जाणणे .....म्हणजे कसे? तर ...जर का मी तुम्हाला तासभर "आंबा" विषयावर व्याख्यान दिले तरी तुम्हाला आंबा पाहिला नसेल तर अंबा म्हणजे काय ते यथार्थपणे कळणार नाही. पण ज्या वेळेस तुम्ही आंबा कापून जिभेवर टाकणार त्यावेळेस तुम्हाला कळणार की आंबा काय चीज आहे ते....हे जे आतून कळणे आहे त्याला "विद" म्हंटले आहे. याच "विद" धातू पासून वेद हा शब्द बनला आहे. हेच वैदिक जे दक्षिणेत रहात होते त्यांनी स्वत:ला "द्रु विद" म्हणजे कोणतीही गोष्ट "द्रुत गतीने" "जाणणारे" ही पदवी लावून घेतली. याचाच अपभ्रंश होऊन "द्रविड" झाले. आजही जुन्या इंग्लिश डिक्शनरी मध्ये "Druid " हा शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे "जुने जाणते लोक"... द्रविड या शब्दाचे पुढील रूपांतरण आणि त्याचे संदर्भ हे वादाला तोंड फोडतील असे असतील असे मला वाटते आहे...त्यामुळे ज्यांना जिज्ञासा असेल त्यांना मी वैयक्तिक चर्चेत सांगू शकेन....
४] संस्कृती- प्रकृती ही मूळ आहे. प्रकृती म्हणजे जे जसे आहे तसे....कोणत्याही गोष्टीचे मूळ रूप, निसर्ग अथवा सृष्टी....त्यात बदल केला अथवा झाला की त्याला संस्कृती किंवा विकृती म्हंटले जाते. चांगला बदल- संस्कृती आणि वाईट बदल- विकृती. नुसते पाणी ही प्रकृती, गटार ही विकृती आणि तीर्थ ही संस्कृती...
तसेच माझ्याजवळ समजा २ पोळ्या आहेत आणि दुसऱ्याकडेही २ पोळ्या आहेत, तर प्रत्येकाने आपापल्या पोळ्या खाणे ही प्रकृती, दुसरयाच्या हिसकावून घेणे ही विकृती आणि आपल्याही पोळ्या त्याच्या गरजेनुसार दुसऱ्याला देणे ही संस्कृती....आणि नेमकी हीच संस्कृती दैत्य, दानव आणि असुरांकडे नव्हती....
हाच आपला धर्म. हीच आपली संस्कृती. हीच आपली ओळख मित्रांनो.
असा हा आपल्या या आर्यभूमी मधील [ जम्बूद्वीप, , भारतवर्ष अशी आपल्या देशाची प्राचीन नावे आहेत. ] वैदिक धर्माचा थोडासा परिचय. अजून खूप काही लिहायचे आहे. जस जसे शक्य होईल तस तसे विषय मांडत जाईन. लोकमान्य टिळक ज्यांना “मोक्ष मुलर” म्हणत असत असे “Max Muller” नावाचे जर्मनीचे एक विद्वान ज्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि वेदांची महती जगापुढे मांडली. पण त्यांनी हे करत असताना वेदांचा काळ, आर्यांचे उगमस्थान या बाबत बरीच गल्लत केलेली आहे. आणि आपल्या कडील काही संघटना नेमक्या याच गोष्टींचा गैरफायदा घेऊन आर्य-द्रविड-दस्यू असा संघर्ष पेटवू पहात आहेत. पण आर्यच अधिक प्रगत होऊन द्रविड झालेले आहेत हे तुमच्या आता लक्षात आलेले असेलच. हज्जारो ग्रंथ काळाच्या ओघात नष्ट झालेले आहेत. आपल्याला आपण काल कोणती भाजी खाल्ली आहे हे आठवत नाही. मग हज्जारो-लाखो वर्षांच्या पूर्वी घडून गेलेले सांगता येणे अवघडच आहे ना? आर्य हे भारताच्या बाहेरून आलेले नसून ते भारतातीलच आहेत. साधारण १०,००० वर्षांनी पृथ्वीचा ध्रुव बदलतो. आत्ता पोलारीस हा ध्रुव आहे. त्यामुळे शक्यता अशी आहे की भारताची आत्ताची जी पोझिशन आहे, जी जागा आहे ती कदाचित वेगळ्या ठिकाणी असू शकेल. पण हा अवघड विषय आहे. त्यावर काही बोलणे आणि तेही अधिकारवाणीने हे शक्य नाही. असो.
वर म्हंटल्याप्रमाणे सप्तर्षींची अधिक माहिती, मानवाचे पृथ्वीवर आगमन, दत्त गुरु म्हणजे कोण आणि कुठून आले याबद्दल जाणून घेऊ या ....सध्या ऋषी संस्कृतीला वंदन करून इथेच थांबतो....
!! इति लेखन सीमा !!
साभार -Dr हेमंत सहस्रबुद्धे उर्फ कलादास......
श्रीराम नवमीच्या अनेक अनेक
श्रीराम नवमीच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा ..........” राम” या विषयाशी संबधितच अतिशय अतिशय अतिशय महत्वाचा आहे हा लेख .......... अवश्य वाचा, शेअर करा आणि संग्रही ठेवा मित्रांनो ........ पण हात जोडून विनंती की माझे नाव न काढता शेअर करा. लेखक:- श्री. हेमंत उद्धव सहस्रबुद्धे, ९१५८५१०५९८ / ९८९०३६९८४५ मित्रांनो जय श्री राम ....जय रामजीकी...राम राम पाव्हणं .... या संबोधनाने, अशी साद घालून एकमेकांना नमस्कार आणि अभिष्टचिंतन केले जाते. हा राम भारत आणि भारताच्या बाहेर सुद्धा मनात आणि कथा कादंबऱ्यांमध्ये वसलेला आहे. श्रीलंकेमध्ये [ सध्याचे सिलोन ] प्रभू श्रीराम, सीता, हनुमान आणि रावण यांच्याशी संबंधित अनेक अनेक वास्तु आणि वस्तू मिळाल्या आहेत. आणि श्रीलंका सरकारने त्यांचे जतन तर केले आहेच आणि त्यांना उत्तम पर्यटनस्थळाचे स्वरूप दिले आहे. जेव्हा श्रीरामांनी रावणावर स्वारी करण्याच्या हेतूने लंकेला प्रस्थान केले तेव्हा त्यांनी भारताच्या लंकेच्या आधीच्या शेवटच्या टोकावर समुद्रकिनारी म्हणजे सध्याच्या रामेश्वरम इथे शिवलिंगाची स्थापना केली आणि त्याची पूजा करण्यासाठी त्यांना एखाद्या पुरोहिताची आवश्यकता होती. रावण दशग्रंथी ब्राह्मण असल्याने तेव्हा रावणाने स्वत: येऊन तेव्हा श्रीरामांच्या या शिवलिंग स्थापना पूजेच पौरोहित्य केले होते. म्हणजे पूजा सांगितली होती. पहिले विमान पुष्पक हे रावणाकडेच होते. “लं” हे भूमीतत्वाचे असलेले माया बीज असून त्याच्या जपाने सर्व सुखे मिळतात. गणपतीच्या “लं”बोदर” या नावात ते आहेच. रावण हा कुबेराचा सावत्र भाऊ. रावणाची आई “कैकसी” [ रामाची सावत्र आई “कैकयी”. या नावांमध्ये किती साम्य आहे नाही? ] अमेरिकेच्या सध्याच्या मय संस्कृती असलेल्या भागातून आलेली होती असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. लंकेत जसे “लं”का” आहे तसे इथे लाटिन अमेरिकेत “इं”का” आहे. अय्यर बंधूनी स्थापन केलेली अझटेक किंवा अष्टक संस्कृती इथेच आहे. रेड इंडियन इथलेच. इथे अनेक प्राचीन भारतीय संस्कृती नांदत होत्या. ब्राझील, अर्जेन्टिना, पेरू, मेक्सिको वगैरे भागांमध्ये या सगळ्या संस्कृती पसरलेल्या होत्या. सध्या तिथे “माचू पिचू” हा भाग बघायला लोक मोठ्या संख्येने जातात. प्रसिद्ध मायण कॅलेंडर याच मय संस्कृतीच्या लोकांचे. पांडवांना इंद्रप्रस्थ बांधून देणारा वास्तुशिल्पी “मय” हा इथलाच. रावण सुखाने राज्य करू देणार नाही म्हणून देवांनी कुबेराला लंका सोडून स्वर्गात म्हणजे सध्याचे तिबेट आहे [ खरे नाव त्रिविष्टप ] तिथे जायला सांगितले. विश्रवा ऋषी हे रावणाचे वडील तर ज्यांच्या नावाने आजही एक राज्य उभे आहे ते Palestine हे नाव ज्यांच्या नावाने आले ते पुलस्त्य ऋषी हे रावणाचे आजोबा. कुंभकर्ण आणि बिभीषण हे रावणाचे भाऊ. जय आणि विजय यांना मिळालेल्या शापानुसार त्या दोघांना पुन्हा लवकर श्री विष्णुंजवळ जाता यावे म्हणून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपु, रावण आणि कुंभकर्ण आणि कृष्णाचा मामा कंस आणि आणि आत्येभाऊ शिशुपाल यांचे जन्म घ्यावे लागले होते आणि ते श्रीविष्णूंच्या अवतारांकडून मारले गेले. तर श्रीराम यातले रावण आणि कुंभकर्ण यांचा वध करून पृथ्वी दैत्यांच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी अवतार घेऊन आलेले होते. लेखक:- श्री. हेमंत उद्धव सहस्रबुद्धे, ९१५८५१०५९८ / ९८९०३६९८४५ रम म्हणजे रमणे, तर रम या धातूला काना लावून म्हणजे त्याची शक्ती वाढवून जो शब्द बनतो तो म्हणजे राम...रमण्याची आत्यंतिक जास्त किंवा शेवटची अवस्था, म्हणजे "राम". आपण म्हणतो की त्या गोष्टीत काही राम नाही, म्हणजेच तेथे रमण्यासारखे काही नाही. रमा [ सुंदर मादक स्त्री, जिच्यात मनुष्य रमतो ती, इथे विष्णूची पत्नी असा अर्थ घेऊ नये ] , रम [ दारू, सुरा, वारुणी, लिकर, विस्की, व्होडका, वाईन {लाल व पांढरी}, शाम्पेन] आणि रमी [ पत्ते, जुगार, मटका, कसिनो आणि सुखासाठी, आनंदासाठी खेळले जाणारे सर्व खेळ] या सगळ्या सुखाच्या साधनांमध्ये आपण "रमतो" त्यात "राम" असल्यानेच. आपल्या तन-मनाला आ”राम” मिळतो तो रामनामानेच. ...तसेच "राम" हा शब्द "रं" या अग्निबिजा पासून बनला आहे. अग्नी पासून "रूप" मिळत. म्हणून "राम" हा दाढीमिशा रहित, सदा तरुण दाखविला आहे. राम या जपाने शरीरात, पोटात अग्नी उत्पन्न होऊन अन्न पचन सुलभ होते. पाठीच्या मणक्यातील क्रमांक तीनचे "मणिपूर" चक्र जागृत होते. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. मग ती चांगली का असेना!!!! म्हणून नुसत्या राम या जपाने शरीराचा दाह होण्याची शक्यता असल्याने त्याच्या मागे, "श्री" हा फिकट नारिंगी रंगाचा "फिल्टर" लावला आहे आणि "राम" या नावाला सौम्य केले आहे. तसेच "राम" या नावाला अजून सौम्य करण्या साठी "श्रीरामचंद्र" असेही म्हंटले जाते. चंद्र हा अतिशय सौम्य असल्याने "राम" या नावातील दाहकता त्यामध्ये कमी होते. श्री राम जय राम जय जय रा
दाहकता त्यामध्ये कमी होते.
दाहकता त्यामध्ये कमी होते. श्री राम जय राम जय जय राम या मंत्रा मधेही हाच उद्देश आहे. श्री हे अक्षर संपत्ती प्रदायक सुद्धा आहे. लेखक:- श्री. हेमंत उद्धव सहस्रबुद्धे, ९१५८५१०५९८ / ९८९०३६९८४५
रामरक्षे मध्ये राम हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने प्रथमा पासून संबोधन पर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने चालवला आहे. आणि तो त्यात जवळपास ७७ वेळा येतो. रामरक्षा शेवटी म्हणते की विष्णूच्या सहस्रनामा एव्हढे सामर्थ्य केवळ "एका" राम नामात आहे. रामरक्षा हे कवच आहे. रामरक्षेमध्ये आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांचा उल्लेख असून त्यांचे रक्षण करण्याची प्रार्थना केली गेली आहे आणि त्यासाठी रामाचे विशिष्ट नाव तिथे योजलेले आहे. जसे की “शिरो मे राघव: पातु, भालं दशरथात्मजा” ...... म्हणजे माझ्या शिराचे म्हणजे मस्तकाचे-डोक्याचे रक्षण “राघव” करोत. भाल म्हणजे कपाळाचे रक्षण दशरथात्मज करो. [ दशरथाचा आत्मज म्हणजे आत्म्यात असलेला म्हणजेच राम ]. कपाळाचे रक्षण का? तर मेंदूच्या कपाळाच्या भागात थोडा आतमध्ये “Amigdala” नावाचा एक बदामाच्या आकाराचा भाग असतो. एखाद्या संकटात भीती वाटते हे याच्यामुळे घडते. तसेच एखाद्या गोष्टीची लज्जा वाटणे हे ही याच्यामुळेच होते. कुत्र्यांना हा भाग नसतो हे संशोधनातून उघड झालेले आहे. त्यामुळे ते रस्त्यावर सुद्धा अर्थात कोणाची भीड भाद आणि लाज न बाळगता प्रणयप्रसंग उरकतात हे तुम्हाला माहित असेलच. या “Amigdala”चे कार्य बिघडले तर भीती वाटू लागते आणि व्यक्ती बेशरमपणे वागू लागते. तिला आपण कुठे काय करत आहोत याचे भान रहात नाही. तर भीती वाटू नये म्हणून रामरक्षेचा पाठ का करायला सांगतात हे आता तुमच्या लक्षात आले का अंगारे काकू आणि भस्मे आजोबा? रामाची ही विशिष्ट नावे त्या त्या अवयवांवर कार्य करून त्यांचे काम सुधारतात. पण त्यासाठी रोज किमान ११ वेळेला तरी कोणतेही स्तोत्र म्हंटले जाणे आवश्यक आहे. उगीच १-२ वेळेला म्हणून छाती फुगवून काहीही उपयोग होणार नाही. ११ च काय खरेतर जितक्या जास्त वेळेला जमेल तितक्या जास्त वेळेला करा या उपासना मित्रांनो .आकारण सध्याचा काळ अत्यंत कठीण असून आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, मानसिक, भावनिक, राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक अशा सर्वच आघाड्यांवर प्रत्येकाला शक्ती, शांती यांची आवश्यकता आहे. तर मित्रांनो तुम्हाला ज्या अवयवाचा त्रास असेल त्याचा मंत्र रामरक्षेतून शोधून काढा आणि त्याचा जास्तीतजास्त जप करा. इतर जवळपास सर्व देवतांची अशी कवच स्तोत्रे आहेत. त्या त्या देवतांचे भक्त त्या त्या देवतांची कवच स्तोत्रे म्हणून शकतात. इतकेच काय नवग्रहांची सुद्धा कवच स्तोत्रे आहेत. रामरक्षा म्हंटली की हनुमानाचा ओम हुं हनुमतये नम: अथवा ओम रामदूताय नम: या मंत्राचा जप अवश्य करा. तरच तुमची श्रीरामांची उपासना सफल होईल. कारण हनुमान त्यांच्या उपासनेचे वाहक आहेत. हनुमानासारखा २४ तास सेवेत राहणारा सेवक, दास दुसरा नाही. इतर सगळे घड्याळाकडे बघून काम करणारे. हनुमंतांनी नवविधा भक्ती मधील दास्य भक्ती केली होती. नवविधा भक्तीबाबत मी पुन्हा कधीतरी लिहीन मित्रांनो ......... श्रीराम आकाशतत्वाचे असल्याने त्यांच्या जवळ पोहोचण्यासाठी वायु तत्वाच्या हनुमंताची सेवा करावी लागते. रामनामाने रामाला अग्नी तत्वात आणले आहे तर वायुतत्वाच्या “मारुतीला” [ मरुत म्हणजे वात, वायु आणि हनुमंताच्या वडिलांचे नाव आहे ] शेंदरी रंग देऊन अग्नी तत्वात आम्ले आहे. वायुतत्वाला भयंकर वेग असल्याने असे केलेलं आहे. हा वेग कसा असतो तर मुळात प्रकाशवेगानेच गेल्यावर वस्तूचे वस्तुपण नष्ट होऊन वस्तुमान वाढते. म्हणजे माणसाने दूरच्या ग्रहावर या वेगाने जायचे म्हंटले तर त्याचे शरीर नष्ट होईल. वायूचा अर्थात वाततत्वाचा वेग याही पेक्षा भयंकर आहे. प्रचंड आहे. या वेगाने माणूस आधी तिरडीवर मृत अवस्थेत दिसेल. मग त्याला घरी आणतील. मग क्रमाने तो लहान लहान होत जात गर्भात जाईल. असे पुढे घडणारे आधीच दाखवणारा अचाट वेग आहे हा. मग? झेपेल तुम्हाला आम्हाला? आपल्याला साधे जत्रेतल्या पाळण्यात बसल्यावर चक्कर येते. तर इथे काय होईल? म्हणून प्रत्यक्ष वायूची, अग्नीची, जल म्हणजे पाण्याची, भूमीची म्हणजे जमिनीची [ जमीन हा अरबी फारसी शब्द आहे], आकाशाची उपासना न करता त्यांच्या देवतांची आणि मंत्राची उपासना करतात. अन्यथ आपला खेळ आटोपलाच समजा .......... लेखक:- श्री. हेमंत उद्धव सहस्रबुद्धे, ९१५८५१०५९८ / ९८९०३६९८४५
भूतबाधा, शारीरिक विकार यावर रामरक्षेचा पाठ केला आणि त्याचा अंगारा लावला तर उत्तम फायदा होतो असा अनेकांचा अनुभव आहे. पण उगाच एक वेळेस कोणतेही स्तोत्र म्हणून उपयोग होत नाही आणि होणार नाही. रात्री झोपण्यापूर्वी हात पाय धुवून एखादी मंद सुवासाची अगरबत्ती [मसाला" अगरबत्ती वापरा, कृत्रिम सेंट वाली नको. अगरबत्ती आपले मन प्रसन्न करण्यासाठी असते, देवाचे नव्ह
ले मन प्रसन्न करण्यासाठी असते
ले मन प्रसन्न करण्यासाठी असते, देवाचे नव्हे. देव नेहमीच प्रसन्न असतो. तो अप्रसन्न झाल्यावर पूर, भूकंप,वादळे,परचक्र {परकीयांचे हल्ले}, मोठे अपघात, हत्या या गोष्टी होतात] ] कमीतकमी ११ वेळा रोज एक स्तोत्र म्हंटले तर उपयोग होतो अन्यथा निराशा पदरी येते. तरुणांनी एकत्र येऊन एखाद्याच्या घरी अथवा जवळच्या मंदिरात रामरक्षा, भीमरूपी स्तोत्र, बजरंग बाण, हनुमान चालीसा, अथर्वशीर्ष अशी स्तोत्रे सामुहिकरीत्या म्हंटली तर शक्तीचा "भौमितिक गुणाकार" [२ दुने चार, चार चोक सोळा अशाच पद्धतीने तिथे जेव्हढी उपस्थिती असेल गुणिले तेव्हढाच आकडा इतक्या प्रचंड प्रमाणात "रेसोनांस" म्हणजे "समस्पंद गती" होऊन या गुणाकारा एव्हढी शक्ती प्रत्येकाला मिळेल आणि तीही कुणाचीही शक्ती कमी न होता. याचा फायदा स्वत: ते तरुण, आपला समाज, आपला देश आणि मग सारे विश्व असा सगळ्यांना होईल.... रामरक्षेतील आपण जे म्हणतो "श्री हनुमान कीलकम "....तर हनुमान हे हा रामरक्षा मंत्र किंवा त्याच्या अर्थाचा दरवाज्यावर लावलेल्या कोड Language [सांकेतिक लिपी] च्या कडी किंवा अर्गलेतील अडकवलेला एक {जबरदस्त कीलक म्हणजे खिळा आहे}. जर आपल्याला हा "कीलक" काढता आला तर रामरक्षेचे गूढ नक्की उकलेल. हे वैदिक आणि याज्ञिक गुरुजींनो संशोधकांना मदत करा रे...... लेखक:- श्री. हेमंत उद्धव सहस्रबुद्धे, ९१५८५१०५९८ / ९८९०३६९८४५
संत कबीर हे शेले विणता विणता रामाचा जप करत असत. नंतर अशी अवस्था आली की रामाचा जप आपोआप व्हायला लागला. याचे वर्णन कबीरांनी “राम हमारा जाप करे, हम बैठे आराम” .......... अर्थात माझ्या मनात रामानामाचा जप आपोआप चाललेला आहे. ज्यावेळेला आपल्या परा, पश्च्यन्ति, मध्यमा आणि वैखरी या चार वाणींपैकी परा वाणी कार्यरत होते तेव्हा अत्यंत भयानक वेगाने नामाचा जप सुरु होतो. पण तो पर्यंत आपल्याला सतत प्रयत्न करावे लागतात. अनेक संतांच्या अस्थींमधून सुद्धा रामनाम ऐकू येत असल्याचे अनुभव तुम्ही सर्वांनी वाचलेले आणि ऐकलेले नक्कीच असतील. लेखक:- श्री. हेमंत उद्धव सहस्रबुद्धे, ९१५८५१०५९८ / ९८९०३६९८४५
रामप्रभूंच्या चरणी एक प्रार्थना करून थांबतो. "हे रामप्रभू....तुम्ही आमच्या अंतर्यामी वसलेले आहात. आमच्या मनात, शरीरात, नगरात, राज्यात, देशात, जगात आणि साऱ्या विश्वात काय चालले आहे हे आपण चांगलेच जाणता. आणि अशा परिस्थितीत काय करायचे तेही जाणता....मग आता ऋषी, मुनी, योगी, ध्यानी, सिद्ध, जपी, तपी, संत, महंत आणि देवांच्या अवतारांच्या या भूमीत हे दुर्दैवाचे दशावतार का? तुमचेच मंदिर पाडणारे, तुमचा हृदये जोडणारा सेतू या भारतात आहेत. आणि हा सेतू तोडणारया यंत्रालाच ते "हनुमान " यंत्र असे नाव देतात? यापेक्षा काही जास्त आम्हाला अजून बघावे लागणार आहे का प्रभू? अधर्मी माणसे कुचकटपणे विचारतात की तुमच्या "रामाला" स्वत:चे मंदिर आणि सेतू वाचवता आला नाही? मग तो तुम्हाला काय वाचवणार....आमच्या हृदयात, मन आणि मनगटात आता काही "राम" राहिला नाहीये का राघवा ? हे दशरथनंदना या देशात
...आमच्या हृदयात, मन आणि
...आमच्या हृदयात, मन आणि मनगटात आता काही "राम" राहिला नाहीये का राघवा ? हे दशरथनंदना या देशात "रथी महारथी" असूनही "साथीचा" रोग आल्याप्रमाणे माझेच बांधव स्वत:च्याच बांधवांशी भांडून चुकीच्या मार्गाने आणि चुकीच्या नेत्यांच्या मागे का जात आहेत? तुमचे "धनुष्यबाण" आणि तुमचाच अवतार श्रीकृष्ण श्रीकृष्ण यांचे "सुदर्शन चक्र" आता अडगळीत पडले आहे का कौसल्यासुता? तुम्हाला आणि कृष्णाला आम्ही फक्त प्रतिमेत, तसबिरीत आणि मूर्तीत पुजायचे का? तुमचा आदर्श, शक्ती, युक्ती, शौर्य आम्हाला प्राप्त होणार नाहीये का? असे म्हणतात की रामायणातून कसे वागावे हे शिकावे आणि महाभारतातून कसे वागू नये हे शिकावे.....हे मर्यादा पुरुषोत्तमा आम्हाला सर्वांना हे ओळखण्याची बुद्धी दे....चुकलेल्यांना योग्य मार्ग मिळू दे.....सर्वांना सुखा समाधानात आणि आनंदात ठेव....तुझे नाम सर्वांच्या मुखात आणि काम सर्वांच्या हातात सदैव असू दे....या विश्वात कोणीही उपाशीपोटी निजू नये....आणि गर्वाने जागा होऊ नये....आणि या अत्यंत प्राचीन वैदिक धर्माची पताका पुन्हा एकदा नव्या तेजाने विश्वात फडकू दे........रे महाराजा....... लेखक:- श्री. हेमंत उद्धव सहस्रबुद्धे, ९१५८५१०५९८ / ९८९०३६९८४५
रामा चरणी जाऊ शरण , मस्त होऊ नामस्मरणी
कोणासाठी साई आहे, दत्तनाम कुणा वाणी...
कोणी म्हणे येशू ख्रिस्त, कोणी म्हणे त्याला अल्ला...
हेतू एक इथे आहे, देवाजीच्या नामी डल्ला......
कुणी म्हणतो लक्ष्मी त्याला, विष्णू कृष्ण कोणी म्हणे
कुणा बुद्धमहावीर, त्याच्या कडे अंती जाणे....
मूर्तीपूजा ही पहिली, पायरी रे साधनेची,
साधनेच्या बळे मिळे , अंती पायरी मोक्षाची
त्रेतायुगी राम जिंके, क्रोध, राग दुर्गुणाला,
डावा पाय पुढे सांगे, ओळख रे या खुणेला ....
मोडलेले धनुष्य हे, एक प्रतिक योगाचे,
मणक्याला साधनेने, मोडा पुन्हा जोडायाचे ....
परावाणी जागल्याने कबीराच्या हाती काम
राम हमारा जप करे, हम बैठे आराम....
नेहमीच आपला मित्र,
कवी Dr हेमंत उर्फ कलादास,
श्री. हेमंत उद्धव सहस्रबुद्धे,
>> साभार कलादास महाराज. यांच्या फेसबुक पेज वरून.
"थोडेसे हिंदू धर्माविषयी
"थोडेसे हिंदू धर्माविषयी लेखाचा विषय व संपुर्ण लेख ' सनातन हिंदूराष्ट्र' या नावाने फेसबुकवर आहे.
रामरक्षे बद्दल चे पोस्ट इकडे
रामरक्षे बद्दल चे पोस्ट इकडे शेअर केल्या बद्दल धन्यवाद शहाणा माणूस,
हिंदू संस्कृती च्या
हिंदू संस्कृती च्या पुनरुज्जीवनासाठी यथाशक्ती मदत करावी.
पांचजन्य मासिकाचा आजीवन सदस्य
पांचजन्य मासिकाचा आजीवन सदस्य झालो होतो. पण एक-दोन वर्षांनंतर परत आले नाही.
सर्वसमावेशक आणि गोडसेवादी -
सर्वसमावेशक आणि गोडसेवादी - टोकाचा विरोधाभास कशाला म्हणतात याचे उत्तम उदाहरण.
जर मुस्लिम धर्मा विषयी धागा
जर मुस्लिम धर्मा विषयी धागा नाही . बौध्द धर्म विषयी धागा नाही .
ख्रिस्त धर्मा विषयी धागा नाही.
तर हिंदू धर्मा विषयी चर्चा करायची गरज नाही .
चर्चा करायची असेल तर सर्व धर्म आणि त्यांचे अनुयायी ह्यांची वागणूक ह्या वर चर्चा झाली पाहिजे .
हिंदू धर्माची मस्करी उडवणारे जे आहेत त्यांनी त्यांचा धर्म सुद्धा लीहल पाहिजे .
म्हणजे ते काय लायकीचे आहेत त्या वर कमेंट करता येईल
धागा तुमच्याच लोकांनी काढला
धागा तुमच्याच लोकांनी काढला
हिंदू धर्माची मस्करी उडवणारे
हिंदू धर्माची मस्करी उडवणारे जे आहेत त्यांनी त्यांचा धर्म सुद्धा लीहल पाहिजे
>>
धर्मच मानत नसतील तर? धर्म काय जैविक नैसर्गिक बाब आहे का की प्रत्येकाला असतेच
धर्मच मानत नसतील तर धार्मिक
धर्मच मानत नसतील तर धार्मिक विषयावर मत व्यक्त करू नये
म्हणजे शाकाहार करणाऱ्यांनी
म्हणजे शाकाहार करणाऱ्यांनी मासांहारी लोकांबद्दल बोलू नये किंवा त्यावर भाष्य करू नये असेच ना?
धर्मच मानत नसतील तर धार्मिक
धर्मच मानत नसतील तर धार्मिक विषयावर मत व्यक्त करू नये +१११११११
ज्या गोष्टीचा त्याग केला आहे किंवा जी गोष्ट आपणास लागू नाही तिच्यावर चर्चा करून वेळ का दवडा? वरवर मी धर्म मानत नाही असे म्हणणे व विशिष्ट धर्माची निंदा करणं हे तो धर्म सहन होत नसल्याचं लक्षण आहे. ताकाला जाऊन भांडे लपवणे ही म्हण उगाचच पडली नाही. आपल्याला पटत नाही म्हणून वाईटच म्हणणं हे आजारी माणसाचं लक्षण आहे.
धागा तुमच्याच लोकांनी काढला
धागा तुमच्याच लोकांनी काढला
>> तुमचे आमचे म्हणजे काय? तुमचे म्हणजे हिंदू असे म्हणायचं आहे का? मग तूम्ही कोणत्या धर्माचे आहात? तूम्हाला काय पडलं हिंदू धर्माचं? तुमचे आमचे करणारांची मानसिकता लक्षात येते म्हटलं.
<< हिंदू धर्माची मस्करी
<< हिंदू धर्माची मस्करी उडवणारे जे आहेत त्यांनी त्यांचा धर्म सुद्धा लीहल पाहिजे . >>
------- धर्माची मस्करी केल्याने धर्म काही छोटा/ कमी होत नाही. त्या त्या धर्मातल्या लोकांचे आचरण ठरवतो धर्म कसा आहे.
आता जय श्री रामांच्या घोषणा देत निरपराधी नागरिकांचे प्राण घेतले जात असतील तर असे करणे धर्माची मस्करी आहे. निरपराधी लोकांना मारण्याच्या घटना देशात सातत्याने घडत असतील, विविध ठिकाणी घडत असतील आणि त्यावर विद्वान, सतर्क म्हणवणारे नागरिक / पत्रकार/ कलाकार/... चिडी चुप्प बसत असतील तर असे चुप्प बसणे रामाची आणि धर्माची चेष्टा आहे.
एखाद्या निरपराध्याकडून जबरदस्तीने/ मारहाण करुन रामाचे नाव वदवण्यात येत असेल तर असे कृत्य प्रभू श्री रामालाही आवडणार नाही.
मस्करी कोण करत आहे हे जाणा... धर्मात असलेल्या उणिवा दाखवणे हे मोठे धार्मिक कार्यच आहे.
अरे हो माझा धर्म सांगायलाच हवा का ?....
Pages