थोडेसे हिंदू धर्मा विषयी....

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 18 July, 2019 - 11:46

हिंदू धर्म हा किती प्राचीन आहे याविषयी जाणकारांमध्ये बरेच मतभेद आहेत. हिंदू म्हणजेच "आर्य सनातन वैदिक संस्कृतीच्या" ऋषींचे मत मानायचे तर प्रत्येक १५००० ते २०००० वर्षांनंतर येणाऱ्या प्रलयानंतर मानव हळू हळू पुन्हा एकदा मानव बनू लागतो... ऋषी त्यांच्या स्मृतीतून, त्यांच्या अंतरचक्षुनच्या समोर या साऱ्या सृष्टीचे, तिच्या जडण घडणीचे जे ज्ञान ऋतम्भरा प्रद्नेने दिसते ते मांडतात. म्हणून ते स्वत:ला या वेदांचे निर्माते म्हणवून घेत नाहीत तर "उद्गाते" म्हणवून घेतात. या वेदांची रचना त्यांनी स्वत: केलेली नसते तर ती कवीला ज्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे कविता सुचतात, त्याप्रमाणे ते करतात...पृथ्वीवर प्रथमत: ज्या सात ऋषींनी मानवाला आणले ते सप्तर्षी जे आहेत त्यांच्या नावाबद्दल मतभेद आहेत......यांनी लाखो वर्षांपूर्वी मानवाला पृथ्वीवर आणले....यांची कुले पुढे चालत राहिली....उगम आपण विसरलो...म्हणूनच म्हणतात की ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये....सापडणार नाही... आणि आपल्या आजच्या माहितीत आज पर्यंत ७ महायुगे झालेली असून या प्रत्येक महायुगात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चार युगांचे चक्र पूर्ण होत होत सात माहायुगात प्रत्येकी ही चार युगे म्हणून सात चोक अठ्ठावीस म्हणून अठ्ठावीस युगे विटेवर उभा असे विठ्ठलाला म्हंटले जाते.

आता ही ७१ चतुर्युगे एका मन्वंतरात असतात. म्हणजेच मनु बदल...म्हणजेच एक मनु अर्थात त्या मनु म्हणजे मानवाच्या कालाचा राजा अथवा अधिपती, हा वेगवेगळा असतो. आत्तापर्यंत ७ मनु म्हणजेच ७ मन्वंतरे झालेली असून सध्याचा "वैवस्वत" हा मनु आहे. अजून ७ मन्वंतरे होणार आहेत. म्हणजेच वैदिकांची {म्हणजे फक्त ब्राह्मण नव्हे] अर्थात ऋषींची कालगणना अथवा संख्यांची गणना ही अणूपासून परार्धापर्यंत प्रचंड मोठी आहे. म्हणजेच हा काल किती मोठा असेल याची सर्वांनाच कल्पना आली असेल. म्हणूनच जाता जाता एक सांगावेसे वाटते सध्या २०१२ साली जग नष्ट होणार असा बागुलबुवा उभा केला आहे तो खरा नसून लाटीन अमेरिकेतील "माया" संस्कृतीचे कॅलेंडर २०१२ रोजी संपत होते. म्हणून पाश्चात्यांनी पश्चिमेच्या धार्मिक समजुतींच्या नुसार "द डे ऑफ डेस्टिनी" अथवा "कयामत का दिन" समजून त्या दिवशी जग नष्ट होऊन सर्वांना देवा समोर उभे केले जाऊन त्यांच्या पापाचा झाडा या एकाच दिवशी केला जाणार आहे असे समजून तो प्रचार चालवलेला होता. आणि वरचा हिशोब वाचला तर हे अजिबात खरे नाही हे सर्वांच्या सहज लक्षात येऊ शकते. त्यामुळे आपण निश्चिंत रहाण्यास हरकत नाही. असो...

पुढे जाण्या पूर्वी इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की फार प्राचीन काळी सध्या ज्यांना "शुद्र" अथवा दलित असे म्हंटले अथवा समजले जाते अशा समाजातील अनेक विद्वानांनी म्हणजेच ऋषींनी वेदातील अनेक ऋचा लिहिलेल्या असून एक उदाहरण द्यायचे झाले तर "दीर्घतमा" अथवा "दीर्घतमस" या एका "शुद्र ऋषींनी" वेदातील अस्यवामीय सुक्त हे अतिशय महत्वाचे सुक्त लिहिले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आताच्या काळातील तथाकथित "जातीयता" त्यावेळेस अजिबात नव्हती...या सर्व ऋषींना अतिशय मान दिला जात असे. सूर्या सावित्री, गार्गी, मैत्र्येयी, इंद्राणी, लोपामुद्रा, अनुसया, अरुंधती अशा अनेक विद्वान स्त्रियांचे देखील योगदान वेद काळात मोठे आहे. त्यांना पडद्यात अथवा चूल मूळ सांभाळत कोंडून ठेवले जात नव्हते. यातील मैत्रेयी या ब्रह्मवादिनीने वेदातील १० ऋचा लिहिल्या आहेत. सीतामाईने स्वयंवर पद्धतीने तर आणि द्रौपदीने पण लावून आपापले वर अर्थात पती निवडलेले होते. त्यामुळे वैदिक अथवा हिंदू धर्मात स्त्रियांचा सतत छळ झाला आहे हा प्रचार खोटा आहे. हा...मधल्या म्हणजे गेल्या २००० ते २५०० वर्षांत काही घटना झाल्या असतील... पण त्यामुळे सगळ्या हिंदू संस्कृतीला दोष देणे चुकीचे आहे.

तर, हिंदू धर्माला "हिंदू" हे नाव साधारण २५०० ते ३००० वर्षांपूर्वी पडले आहे. ज्यावेळेस वैदिक संस्कृती आणि असुर, दानव आणि दैत्य संस्कृती यांच्यातील भेद वाढत गेला, त्यावेळेस इराणात आदरणीय "अहुर्मझ्द" या असुर राजाने वेगळ्या राज्याची स्थापना केली. हे लोक "स" चा उच्चार "ह" करत असल्याने "असुरमझद" चा उच्चार "आहुर माझ्द" असा केला गेला भारतातील "सरस्वती" नदीचा उच्चार "हर हवैती" असा तर "सिंधू स्थान" चा उच्चार "हिंदुस्थान" असा केला गेला. सिंधू नदी अथवा सिंधू समुद्रापलीकडील लोकांना हे लोक "सिंधू" म्हणजेच "हिंदू" म्हणत असत. कश्यप ऋषींना १३ पत्न्या होत्या. पैकी "दिती"ची मुले म्हणजे "दैत्य", "अदितीची" मुले म्हणजे "आदित्य" म्हणजेच "देव" आणि "दन्यू" या पत्नीची मुले म्हणजे "दानव" होत. हे म्हणजे राक्षस नसून देवाकडे कमी लक्ष पण उपभोगांकडे जास्त लक्ष अशी संस्कृती असलेले लोक होत. म्हणून अंतरातील देव शोधून मुक्ती मिळवायची अशी जाणीव ठेवणार्या आर्यांची स्वत:च्या रक्षणासाठी यांच्याशी नाइलाजाने युद्धे होत असत. राक्षस म्हणजे सुद्धा २-४ शिंगे असलेले, अतिशय क्रूर असे काही नसून फक्त स्वत:चे क्षेत्र, आणि स्वार्थ यांचे रक्षण करणारे असा त्याचा अर्थ आहे.

जर्मनी हा देश "Danub" या नदीच्या दोन तीरांवर वसलेला असून या "दानव" या शब्दाचा हा अपभ्रंश असू शकतो. बंगाल, उत्तर भारत, पंजाबी यांचे उच्चार आठवा म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल...तसेच जर्मनीचे मूळ नाव "द्युइश Land " म्हणजे "द्विश दल" जसे की "द्विदल धान्य"...."दानुब" नदीच्या दोन तीरांवर वसलेले असल्याने "द्विश दल" जसे की "इंग्लंड म्हणजे "आंग्ल दल"......

"धर्म" म्हणजे ....."धारयति इति धर्म" म्हणजे जो संस्कृतीचे धारण करतो आणि मानवाला जगण्यास आवश्यक असे नैतिक, सामाजिक, बौद्धिक, आर्थिक, मानसिक, भावनिक "आणि" "अध्यात्मिक" असे वातावरण तयार करतो तो धर्म ... आणि याच साठी धर्माची आवश्यकता...अन्यथा माणूस हा एक " सर्व प्राथमिक गरजा असलेला बुभुक्षित प्राणीच" आहे. त्याला धर्म "धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष" या सुसंस्कृत चौकटीत बद्ध करतो. नाहीतर दिवसा ढवळ्या बायका पळवल्या गेल्या असत्या...हे एक उदाहरण झाले.... आर्यांनी कोणत्याही एकाच देवतेची पूजा म्हणजे धर्म असे समजले नाही. आर्य धर्मात वहाणे हा पाण्याचा धर्म, पितृ धर्म, मातृधर्म, पुत्र धर्म हे धर्म सांगितले आहेत. ज्याला पाश्चात्य लोक धर्म म्हणतात त्याला आर्य "मोक्ष" कल्पना म्हणतात.

असो...आता हिंदू धर्माच्या मूळ नावाकडे वळू...

हिंदू धर्माचे मूळ नाव आहे "आर्य सनातन वैदिक संस्कृती"...

१] आर्य- अर म्हणजे चिरणे, फाडणे ...संकटांना अडचणींना चिरत पुढे जाणारे....प्रगती करणारे....फक्त गोरे दिसणारे, निळ्या घार्या डोळ्याचे लोक म्हणजे आर्य हा समज खोटा आहे. राम आणि कृष्ण हे काळे सावळे होते हे सर्वांनाच माहित आहे. आर्य असणे ही एक उच्च मानसिक, बौद्धिक, भावनिक, वैद्न्यानिक आणि अध्यात्मिक अवस्था आहे. कोणता वंश नव्हे...

२] सनातन- स: नूतन:....नित्य नूतन असणारा किंवा असणारे....हिंदू धर्म हा नित्य नवा आहे...खुळचट जुन्या समजुतींना कवटाळून बसणारा नव्हे...किंवा "सनातन" याचा अर्थ भस्माचे पट्टे ओढून जपाच्या माळा ओढत बसणे, लांब हो लांब हो ....शिवू नको असे म्हणणे मुळीच नव्हे हे पक्के लक्षात घेणे आवश्यक आहे. जसा कालचा सागर कालच्या प्रियकर प्रेयसीन्साठी आणि आजच्याही जोडप्यांसाठी "नवाच" असतो तसा काला प्रमाणे बदलणारा हिंदू धर्म हा "सनातन" म्हणजे सतत नवाच असतो....

३] वैदिक- "विद" या संस्कृत धातूचा अर्थ आहे " आतून, हृदयातून" जाणणे .....म्हणजे कसे? तर ...जर का मी तुम्हाला तासभर "आंबा" विषयावर व्याख्यान दिले तरी तुम्हाला आंबा पाहिला नसेल तर अंबा म्हणजे काय ते यथार्थपणे कळणार नाही. पण ज्या वेळेस तुम्ही आंबा कापून जिभेवर टाकणार त्यावेळेस तुम्हाला कळणार की आंबा काय चीज आहे ते....हे जे आतून कळणे आहे त्याला "विद" म्हंटले आहे. याच "विद" धातू पासून वेद हा शब्द बनला आहे. हेच वैदिक जे दक्षिणेत रहात होते त्यांनी स्वत:ला "द्रु विद" म्हणजे कोणतीही गोष्ट "द्रुत गतीने" "जाणणारे" ही पदवी लावून घेतली. याचाच अपभ्रंश होऊन "द्रविड" झाले. आजही जुन्या इंग्लिश डिक्शनरी मध्ये "Druid " हा शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे "जुने जाणते लोक"... द्रविड या शब्दाचे पुढील रूपांतरण आणि त्याचे संदर्भ हे वादाला तोंड फोडतील असे असतील असे मला वाटते आहे...त्यामुळे ज्यांना जिज्ञासा असेल त्यांना मी वैयक्तिक चर्चेत सांगू शकेन....

४] संस्कृती- प्रकृती ही मूळ आहे. प्रकृती म्हणजे जे जसे आहे तसे....कोणत्याही गोष्टीचे मूळ रूप, निसर्ग अथवा सृष्टी....त्यात बदल केला अथवा झाला की त्याला संस्कृती किंवा विकृती म्हंटले जाते. चांगला बदल- संस्कृती आणि वाईट बदल- विकृती. नुसते पाणी ही प्रकृती, गटार ही विकृती आणि तीर्थ ही संस्कृती...

तसेच माझ्याजवळ समजा २ पोळ्या आहेत आणि दुसऱ्याकडेही २ पोळ्या आहेत, तर प्रत्येकाने आपापल्या पोळ्या खाणे ही प्रकृती, दुसरयाच्या हिसकावून घेणे ही विकृती आणि आपल्याही पोळ्या त्याच्या गरजेनुसार दुसऱ्याला देणे ही संस्कृती....आणि नेमकी हीच संस्कृती दैत्य, दानव आणि असुरांकडे नव्हती....

हाच आपला धर्म. हीच आपली संस्कृती. हीच आपली ओळख मित्रांनो.

असा हा आपल्या या आर्यभूमी मधील [ जम्बूद्वीप, , भारतवर्ष अशी आपल्या देशाची प्राचीन नावे आहेत. ] वैदिक धर्माचा थोडासा परिचय. अजून खूप काही लिहायचे आहे. जस जसे शक्य होईल तस तसे विषय मांडत जाईन. लोकमान्य टिळक ज्यांना “मोक्ष मुलर” म्हणत असत असे “Max Muller” नावाचे जर्मनीचे एक विद्वान ज्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि वेदांची महती जगापुढे मांडली. पण त्यांनी हे करत असताना वेदांचा काळ, आर्यांचे उगमस्थान या बाबत बरीच गल्लत केलेली आहे. आणि आपल्या कडील काही संघटना नेमक्या याच गोष्टींचा गैरफायदा घेऊन आर्य-द्रविड-दस्यू असा संघर्ष पेटवू पहात आहेत. पण आर्यच अधिक प्रगत होऊन द्रविड झालेले आहेत हे तुमच्या आता लक्षात आलेले असेलच. हज्जारो ग्रंथ काळाच्या ओघात नष्ट झालेले आहेत. आपल्याला आपण काल कोणती भाजी खाल्ली आहे हे आठवत नाही. मग हज्जारो-लाखो वर्षांच्या पूर्वी घडून गेलेले सांगता येणे अवघडच आहे ना? आर्य हे भारताच्या बाहेरून आलेले नसून ते भारतातीलच आहेत. साधारण १०,००० वर्षांनी पृथ्वीचा ध्रुव बदलतो. आत्ता पोलारीस हा ध्रुव आहे. त्यामुळे शक्यता अशी आहे की भारताची आत्ताची जी पोझिशन आहे, जी जागा आहे ती कदाचित वेगळ्या ठिकाणी असू शकेल. पण हा अवघड विषय आहे. त्यावर काही बोलणे आणि तेही अधिकारवाणीने हे शक्य नाही. असो.

वर म्हंटल्याप्रमाणे सप्तर्षींची अधिक माहिती, मानवाचे पृथ्वीवर आगमन, दत्त गुरु म्हणजे कोण आणि कुठून आले याबद्दल जाणून घेऊ या ....सध्या ऋषी संस्कृतीला वंदन करून इथेच थांबतो....

!! इति लेखन सीमा !!

साभार -Dr हेमंत सहस्रबुद्धे उर्फ कलादास......

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वामी विवेकानंद म्हणतात - बाहेरील कुणी येऊन तुमच्या ताटातला घास हिसकावुन घेत असेल, मुलीबाळींवर हात टाकत असेल तर यापुढे चार बकऱ्यांचे काय मोल? स्पष्ट सुचवतात मांसाहार करा, शक्तिवान बनून अन्यायाला तोंड द्या.
हिंदूना दैववादी बनवल्यानं हिंदू धर्माचे लचके तोडले गेले. तैमुर सारख्यांनी रक्ताचे पाट वाहवले.

अरे भाई देव परिसासारखा एका झटक्यात त्याच्यासारखा का करू शकत नाही. अटी घालून अडवणूक कशासाठी ---> तसे केले तर सगळ्यांनाच तसे करावे लागेल. एकाला केले आणि दुसऱ्याला नाही तर तो अन्याय ठरेल दुसऱ्यावर. आणि सगळ्यांनाच त्याने त्याच्यासारखे बनवले एका झटक्यात तर सृष्टीचे प्रयोजनच ते काय राहिले? तेच करायचे असते तर मग ही सृष्टी निर्माणच नसती केली त्याने. आणि तसे जरी केले तर तोही एक प्रकारचा अन्यायच झाला कारण शेवटी एका झटक्यात सगळ्यांना तसेच बनवायचे होते तर आधी इतकी दुःखे द्यायची गरज काय होती? आणि देव हा अन्यायी नाही Happy

निर्गुण, निराकार परमेश्वर प्रत्यक्ष पाहिला? ---> निर्गुण निराकार परमेश्वर ही एक अनुभूती आहे किंवा अगदी उच्च कोटींचा अनुभव. खरेतर ते त्याहीपलीकडे आहे परंतु केवळ शब्दात मांडता यावे म्हणून तो अनुभव. पाहिलेला परमेश्वर हा निर्गुण निराकार परमेश्वराचे साकार रूप.

मला देवाची गाठ घालून द्या. त्याला विचारीन"एवढी काय खाज होती झक मारायला सृष्टी निर्माण केली."

"मला देवाची गाठ घालून द्या" --> खरे तर तो प्रत्येक क्षणाला सगळीकडे आहे फक्त आपण आपल्या inabilities मुळे आपण त्याला पाहू शकत नाही. वर लिहिल्याप्रमाणे जेंव्हा माणसाची पात्रता होईल तेंव्हा देव आपोआप प्रगट त्याच्यासमोर प्रगट होईल. आणि तेंव्हा तुम्हाला त्याला विचारायची गरज भासणार नाही...त्याचे उत्तर मिळालेले असेल. परंतु या कारणासाठी का होईना देवाला पाहण्यासाठी प्रयत्न चालू करायला काय हरकत आहे Happy

थॅनोस आपटे
24 July, 2019 - 23:13
थोडेसे हिंदू धर्माबद्दल या धाग्यावर चक्रम माणूस, शशिकांत सातपुते आणि कुठल्याशा सुपर्णा तीर्थकर हे व असे आयडीज एकाच अ‍ॅड्रेसवरून येत आहेत की वेगवेगळ्या ? असे असेल तर यांचा उद्देश काय आहे ? या अ‍ॅड्रेस वरून पूर्वी आलेल्या आयडींची हिस्टरी काय आहे ?

<< गेले 2 दिवस भरतीची वेळ पाहून त्यांना शौचास जाण्यास सुचवले. आणि काय आश्चर्य, कोणतेही औषध न घेता पोट साफ झाले. घरातल्या लहान मुलांचा देखील तसाच अनुभव आला. लगोलग मी आई ला फोन लावला, बाबांच्या बाबतीत प्रयोग करायला सांगितला, तिकडेही तेच. >>

------- भरतीच्या वेळी लावलेला फोन लागलीच जोडल्या जातो. इतर वेळी "आपण डायल केलेला नंबर या वेळी व्यस्त आहे, कृपय नंतर डायल करा. The number you are calling is currently unavailable, please try again, later." असा मेसेज ऐकायला मिळतो.

:-))

या विश्वाचे नियंत्रण कसे होते, कोण करते याचे उत्तर विज्ञानाकडे नाही. एखादी मातीची वस्तू बनवायची ठरवली तरी त्याचा आकार काय असावा, प्रमाण काय असावे हे आपण ठरवतो. तर मग हे अफाट विश्व कसे काय बनले असेल ? याचे नियम कसे बनले ? याचे उत्तर विज्ञान देत नाही.

विज्ञान नियम जाणून घेते आणि ते काय आहे हे सांगते. म्हणजे न्यूटनचा पहिला नियम काय आहे, दुसरा काय, तिसरा काय हे निरीक्षणातून ते सांगू शकते. गॅलिलिओचा नियम सांगते, आर्किमिडीजचा सिद्धांत सांगते, कोपर्निकसाचे नियम सांगू शकते, एडीसनचे नियम सांगते पण हे नियम कसे बनले याचे ज्ञान त्यांना नाही.

हे कुणी बनवले ? याचे उत्तर मी दिलेले नाही. मी ज्ञानी नाही. मी गुरूमाऊलीची शिष्या आहे.
माझे म्हणणे इतकेच की विज्ञान संपते तिथून जी जिज्ञासा निर्माण होते ती शमवण्यासाठी योग्य गुरूचा शोध घेतला पाहीजे. प्रत्येकाला एक गुरू मिळतो. त्याची जाहीरात करावी लागत नाही. फक्त ज्ञानेंद्रिये उघडी असायला हवीत, गुरू आपणहून समोर दिसतो. तसे तर अनेक जण आपले शिक्षक असतात. गुरू एकच असतो.

दरबार भरवणारे, आलिशान आश्रम असणारे बाबा, महाराज म्हणजेच गुरू नाहीत. माझ्या एका सहका-याचा गुरू तर एखाद्या फाटक्या माणसासारखा राहतो. रस्त्यात गाडीवर वडापाव विकत घेऊन खातो. त्यामुळे भगवे कपडे नेसलेला, गळ्यात माळा असलेला म्हणजेच गुरू अशा समजातून बाहेर यावे.
गुरूविना हे जीवन व्यर्थ आहे. गुरू समजला तर धर्म समजतो. आपण समजतो तो धर्म नाही. धर्म म्हणजे गुरू सांगतात तो धर्म.

गुरूमास शरण जा.

गुरूजनांबाबत कृपया टिंगल टवाळी नको ही विनंती. जे आपणास ठाऊक नाही त्याची टवाळी करणे कशाचे लक्षण आहे हे समर्थांनी सांगून ठेवले आहे.

अध्यात्माविषयी कुणाला काही जाणून घ्यायचं नसतं.
लोक कंटाळा करतात किंवा मग टिंगल टवाळी करतात.
ते स्वतःचे नुकसान करून घेत असतात. दया येते खरं तर.
गुरूमांच्या म्हणण्याप्रमाणे अध्यात्म लादता येत नाही.
अध्यात्म म्हणजे अधि + आत्म
स्वतःची ओळख, स्वतःकडे लक्ष देणे
स्वतःला पाहणे.
म्हणजेच स्वतःला पूर्णत्वास नेणे
ते कसे ?
अध्यात्म आणि धर्म या गोष्टी समान नाहीत. अध्यात्म आणि धर्म
हे दोन्ही संस्कृतीचाच भाग आहेत. मानवापेक्षा श्रेष्ठ असा देव,
अशी शक्ती किंवा असे ‘कोणीतरी’, असते
हे आध्यात्मिक माणूस मानतो अथवा नाही मानत.
आस्तिक आणि नास्तिक दोघेही आध्यात्मिक असू शकतात.
धर्म माणसाला जगण्याचा मार्ग दाखवतो. पण खूप वेळा धार्मिकता
ही रूढी-परंपरा, परमेश्वरस्तुती, पूजा-अर्चा, प्रार्थना यातून व्यक्त होते.
याउलट आध्यात्मिकतेला कर्मकांडाचे बंधन नाही. असे असले तरी
धार्मिकता, धर्मश्रद्धा आणि आध्यात्मिकता हातात हात घालून चालतात.
अध्यात्माकडे ओढा असलेले अनेकदा धार्मिकसुद्धा असतात. धार्मिक
ग्रंथांचे वाचन, निरूपण करणे, त्यांच्या अर्थाविषयी चर्चा आणि
वादविवादांमध्ये सहभाग घेणे, जप, नामस्मरण यातून मन शांत करणे,
ध्यानधारणेतून मनशक्ती वाढवणे अशा वेगवेगळ्या पद्धतींनी ‘स्व’चा शोध घेतला जातो.
यात स्वारस्य वाटणे म्हणजे अध्यात्माचा अभ्यास.
काळ आणि जडविश्व यांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्त्वाचा अभ्यास करणारे शास्त्र.

गुरूमास शरण जावे.

या धाग्याकडे लोक का दुर्लक्ष करत आहेत ?
जातीयवादाचा धागा नको असताना समोर येतो.
किती जातीवरून भांडायचे ?
अध्यात्माकडे वळाल्यास ना जाती राहतात.
ना जातीयवाद.?
कदाचित हिंदू धर्म हे नाव असल्याने का ?

<साभार -Dr हेमंत सहस्रबुद्धे उर्फ कलादास......>
याचा अर्थ दुसर्‍या कोणीतरी लिहिलेलं इथे कॉपी पेस्ट केलंय. पण याबद्दल काही लोकांना ऑब्जेक्शन दिसत नाही.

आग्गोबाई

स्वामी अमेरिकेत रहातात, चक्रमजी अमेरिकेत गेल्यास दर्शन होईल

तिरछि नजर करके, इशारो इशारोंमे ताने मारा न करो. कहना जो चाहते हो, खुलकर कहा करो. लो आज मैं कहता हूं ... आय हे......ट यू......... .

Pages