हिंदू धर्म हा किती प्राचीन आहे याविषयी जाणकारांमध्ये बरेच मतभेद आहेत. हिंदू म्हणजेच "आर्य सनातन वैदिक संस्कृतीच्या" ऋषींचे मत मानायचे तर प्रत्येक १५००० ते २०००० वर्षांनंतर येणाऱ्या प्रलयानंतर मानव हळू हळू पुन्हा एकदा मानव बनू लागतो... ऋषी त्यांच्या स्मृतीतून, त्यांच्या अंतरचक्षुनच्या समोर या साऱ्या सृष्टीचे, तिच्या जडण घडणीचे जे ज्ञान ऋतम्भरा प्रद्नेने दिसते ते मांडतात. म्हणून ते स्वत:ला या वेदांचे निर्माते म्हणवून घेत नाहीत तर "उद्गाते" म्हणवून घेतात. या वेदांची रचना त्यांनी स्वत: केलेली नसते तर ती कवीला ज्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे कविता सुचतात, त्याप्रमाणे ते करतात...पृथ्वीवर प्रथमत: ज्या सात ऋषींनी मानवाला आणले ते सप्तर्षी जे आहेत त्यांच्या नावाबद्दल मतभेद आहेत......यांनी लाखो वर्षांपूर्वी मानवाला पृथ्वीवर आणले....यांची कुले पुढे चालत राहिली....उगम आपण विसरलो...म्हणूनच म्हणतात की ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये....सापडणार नाही... आणि आपल्या आजच्या माहितीत आज पर्यंत ७ महायुगे झालेली असून या प्रत्येक महायुगात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चार युगांचे चक्र पूर्ण होत होत सात माहायुगात प्रत्येकी ही चार युगे म्हणून सात चोक अठ्ठावीस म्हणून अठ्ठावीस युगे विटेवर उभा असे विठ्ठलाला म्हंटले जाते.
आता ही ७१ चतुर्युगे एका मन्वंतरात असतात. म्हणजेच मनु बदल...म्हणजेच एक मनु अर्थात त्या मनु म्हणजे मानवाच्या कालाचा राजा अथवा अधिपती, हा वेगवेगळा असतो. आत्तापर्यंत ७ मनु म्हणजेच ७ मन्वंतरे झालेली असून सध्याचा "वैवस्वत" हा मनु आहे. अजून ७ मन्वंतरे होणार आहेत. म्हणजेच वैदिकांची {म्हणजे फक्त ब्राह्मण नव्हे] अर्थात ऋषींची कालगणना अथवा संख्यांची गणना ही अणूपासून परार्धापर्यंत प्रचंड मोठी आहे. म्हणजेच हा काल किती मोठा असेल याची सर्वांनाच कल्पना आली असेल. म्हणूनच जाता जाता एक सांगावेसे वाटते सध्या २०१२ साली जग नष्ट होणार असा बागुलबुवा उभा केला आहे तो खरा नसून लाटीन अमेरिकेतील "माया" संस्कृतीचे कॅलेंडर २०१२ रोजी संपत होते. म्हणून पाश्चात्यांनी पश्चिमेच्या धार्मिक समजुतींच्या नुसार "द डे ऑफ डेस्टिनी" अथवा "कयामत का दिन" समजून त्या दिवशी जग नष्ट होऊन सर्वांना देवा समोर उभे केले जाऊन त्यांच्या पापाचा झाडा या एकाच दिवशी केला जाणार आहे असे समजून तो प्रचार चालवलेला होता. आणि वरचा हिशोब वाचला तर हे अजिबात खरे नाही हे सर्वांच्या सहज लक्षात येऊ शकते. त्यामुळे आपण निश्चिंत रहाण्यास हरकत नाही. असो...
पुढे जाण्या पूर्वी इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की फार प्राचीन काळी सध्या ज्यांना "शुद्र" अथवा दलित असे म्हंटले अथवा समजले जाते अशा समाजातील अनेक विद्वानांनी म्हणजेच ऋषींनी वेदातील अनेक ऋचा लिहिलेल्या असून एक उदाहरण द्यायचे झाले तर "दीर्घतमा" अथवा "दीर्घतमस" या एका "शुद्र ऋषींनी" वेदातील अस्यवामीय सुक्त हे अतिशय महत्वाचे सुक्त लिहिले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आताच्या काळातील तथाकथित "जातीयता" त्यावेळेस अजिबात नव्हती...या सर्व ऋषींना अतिशय मान दिला जात असे. सूर्या सावित्री, गार्गी, मैत्र्येयी, इंद्राणी, लोपामुद्रा, अनुसया, अरुंधती अशा अनेक विद्वान स्त्रियांचे देखील योगदान वेद काळात मोठे आहे. त्यांना पडद्यात अथवा चूल मूळ सांभाळत कोंडून ठेवले जात नव्हते. यातील मैत्रेयी या ब्रह्मवादिनीने वेदातील १० ऋचा लिहिल्या आहेत. सीतामाईने स्वयंवर पद्धतीने तर आणि द्रौपदीने पण लावून आपापले वर अर्थात पती निवडलेले होते. त्यामुळे वैदिक अथवा हिंदू धर्मात स्त्रियांचा सतत छळ झाला आहे हा प्रचार खोटा आहे. हा...मधल्या म्हणजे गेल्या २००० ते २५०० वर्षांत काही घटना झाल्या असतील... पण त्यामुळे सगळ्या हिंदू संस्कृतीला दोष देणे चुकीचे आहे.
तर, हिंदू धर्माला "हिंदू" हे नाव साधारण २५०० ते ३००० वर्षांपूर्वी पडले आहे. ज्यावेळेस वैदिक संस्कृती आणि असुर, दानव आणि दैत्य संस्कृती यांच्यातील भेद वाढत गेला, त्यावेळेस इराणात आदरणीय "अहुर्मझ्द" या असुर राजाने वेगळ्या राज्याची स्थापना केली. हे लोक "स" चा उच्चार "ह" करत असल्याने "असुरमझद" चा उच्चार "आहुर माझ्द" असा केला गेला भारतातील "सरस्वती" नदीचा उच्चार "हर हवैती" असा तर "सिंधू स्थान" चा उच्चार "हिंदुस्थान" असा केला गेला. सिंधू नदी अथवा सिंधू समुद्रापलीकडील लोकांना हे लोक "सिंधू" म्हणजेच "हिंदू" म्हणत असत. कश्यप ऋषींना १३ पत्न्या होत्या. पैकी "दिती"ची मुले म्हणजे "दैत्य", "अदितीची" मुले म्हणजे "आदित्य" म्हणजेच "देव" आणि "दन्यू" या पत्नीची मुले म्हणजे "दानव" होत. हे म्हणजे राक्षस नसून देवाकडे कमी लक्ष पण उपभोगांकडे जास्त लक्ष अशी संस्कृती असलेले लोक होत. म्हणून अंतरातील देव शोधून मुक्ती मिळवायची अशी जाणीव ठेवणार्या आर्यांची स्वत:च्या रक्षणासाठी यांच्याशी नाइलाजाने युद्धे होत असत. राक्षस म्हणजे सुद्धा २-४ शिंगे असलेले, अतिशय क्रूर असे काही नसून फक्त स्वत:चे क्षेत्र, आणि स्वार्थ यांचे रक्षण करणारे असा त्याचा अर्थ आहे.
जर्मनी हा देश "Danub" या नदीच्या दोन तीरांवर वसलेला असून या "दानव" या शब्दाचा हा अपभ्रंश असू शकतो. बंगाल, उत्तर भारत, पंजाबी यांचे उच्चार आठवा म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल...तसेच जर्मनीचे मूळ नाव "द्युइश Land " म्हणजे "द्विश दल" जसे की "द्विदल धान्य"...."दानुब" नदीच्या दोन तीरांवर वसलेले असल्याने "द्विश दल" जसे की "इंग्लंड म्हणजे "आंग्ल दल"......
"धर्म" म्हणजे ....."धारयति इति धर्म" म्हणजे जो संस्कृतीचे धारण करतो आणि मानवाला जगण्यास आवश्यक असे नैतिक, सामाजिक, बौद्धिक, आर्थिक, मानसिक, भावनिक "आणि" "अध्यात्मिक" असे वातावरण तयार करतो तो धर्म ... आणि याच साठी धर्माची आवश्यकता...अन्यथा माणूस हा एक " सर्व प्राथमिक गरजा असलेला बुभुक्षित प्राणीच" आहे. त्याला धर्म "धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष" या सुसंस्कृत चौकटीत बद्ध करतो. नाहीतर दिवसा ढवळ्या बायका पळवल्या गेल्या असत्या...हे एक उदाहरण झाले.... आर्यांनी कोणत्याही एकाच देवतेची पूजा म्हणजे धर्म असे समजले नाही. आर्य धर्मात वहाणे हा पाण्याचा धर्म, पितृ धर्म, मातृधर्म, पुत्र धर्म हे धर्म सांगितले आहेत. ज्याला पाश्चात्य लोक धर्म म्हणतात त्याला आर्य "मोक्ष" कल्पना म्हणतात.
असो...आता हिंदू धर्माच्या मूळ नावाकडे वळू...
हिंदू धर्माचे मूळ नाव आहे "आर्य सनातन वैदिक संस्कृती"...
१] आर्य- अर म्हणजे चिरणे, फाडणे ...संकटांना अडचणींना चिरत पुढे जाणारे....प्रगती करणारे....फक्त गोरे दिसणारे, निळ्या घार्या डोळ्याचे लोक म्हणजे आर्य हा समज खोटा आहे. राम आणि कृष्ण हे काळे सावळे होते हे सर्वांनाच माहित आहे. आर्य असणे ही एक उच्च मानसिक, बौद्धिक, भावनिक, वैद्न्यानिक आणि अध्यात्मिक अवस्था आहे. कोणता वंश नव्हे...
२] सनातन- स: नूतन:....नित्य नूतन असणारा किंवा असणारे....हिंदू धर्म हा नित्य नवा आहे...खुळचट जुन्या समजुतींना कवटाळून बसणारा नव्हे...किंवा "सनातन" याचा अर्थ भस्माचे पट्टे ओढून जपाच्या माळा ओढत बसणे, लांब हो लांब हो ....शिवू नको असे म्हणणे मुळीच नव्हे हे पक्के लक्षात घेणे आवश्यक आहे. जसा कालचा सागर कालच्या प्रियकर प्रेयसीन्साठी आणि आजच्याही जोडप्यांसाठी "नवाच" असतो तसा काला प्रमाणे बदलणारा हिंदू धर्म हा "सनातन" म्हणजे सतत नवाच असतो....
३] वैदिक- "विद" या संस्कृत धातूचा अर्थ आहे " आतून, हृदयातून" जाणणे .....म्हणजे कसे? तर ...जर का मी तुम्हाला तासभर "आंबा" विषयावर व्याख्यान दिले तरी तुम्हाला आंबा पाहिला नसेल तर अंबा म्हणजे काय ते यथार्थपणे कळणार नाही. पण ज्या वेळेस तुम्ही आंबा कापून जिभेवर टाकणार त्यावेळेस तुम्हाला कळणार की आंबा काय चीज आहे ते....हे जे आतून कळणे आहे त्याला "विद" म्हंटले आहे. याच "विद" धातू पासून वेद हा शब्द बनला आहे. हेच वैदिक जे दक्षिणेत रहात होते त्यांनी स्वत:ला "द्रु विद" म्हणजे कोणतीही गोष्ट "द्रुत गतीने" "जाणणारे" ही पदवी लावून घेतली. याचाच अपभ्रंश होऊन "द्रविड" झाले. आजही जुन्या इंग्लिश डिक्शनरी मध्ये "Druid " हा शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे "जुने जाणते लोक"... द्रविड या शब्दाचे पुढील रूपांतरण आणि त्याचे संदर्भ हे वादाला तोंड फोडतील असे असतील असे मला वाटते आहे...त्यामुळे ज्यांना जिज्ञासा असेल त्यांना मी वैयक्तिक चर्चेत सांगू शकेन....
४] संस्कृती- प्रकृती ही मूळ आहे. प्रकृती म्हणजे जे जसे आहे तसे....कोणत्याही गोष्टीचे मूळ रूप, निसर्ग अथवा सृष्टी....त्यात बदल केला अथवा झाला की त्याला संस्कृती किंवा विकृती म्हंटले जाते. चांगला बदल- संस्कृती आणि वाईट बदल- विकृती. नुसते पाणी ही प्रकृती, गटार ही विकृती आणि तीर्थ ही संस्कृती...
तसेच माझ्याजवळ समजा २ पोळ्या आहेत आणि दुसऱ्याकडेही २ पोळ्या आहेत, तर प्रत्येकाने आपापल्या पोळ्या खाणे ही प्रकृती, दुसरयाच्या हिसकावून घेणे ही विकृती आणि आपल्याही पोळ्या त्याच्या गरजेनुसार दुसऱ्याला देणे ही संस्कृती....आणि नेमकी हीच संस्कृती दैत्य, दानव आणि असुरांकडे नव्हती....
हाच आपला धर्म. हीच आपली संस्कृती. हीच आपली ओळख मित्रांनो.
असा हा आपल्या या आर्यभूमी मधील [ जम्बूद्वीप, , भारतवर्ष अशी आपल्या देशाची प्राचीन नावे आहेत. ] वैदिक धर्माचा थोडासा परिचय. अजून खूप काही लिहायचे आहे. जस जसे शक्य होईल तस तसे विषय मांडत जाईन. लोकमान्य टिळक ज्यांना “मोक्ष मुलर” म्हणत असत असे “Max Muller” नावाचे जर्मनीचे एक विद्वान ज्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि वेदांची महती जगापुढे मांडली. पण त्यांनी हे करत असताना वेदांचा काळ, आर्यांचे उगमस्थान या बाबत बरीच गल्लत केलेली आहे. आणि आपल्या कडील काही संघटना नेमक्या याच गोष्टींचा गैरफायदा घेऊन आर्य-द्रविड-दस्यू असा संघर्ष पेटवू पहात आहेत. पण आर्यच अधिक प्रगत होऊन द्रविड झालेले आहेत हे तुमच्या आता लक्षात आलेले असेलच. हज्जारो ग्रंथ काळाच्या ओघात नष्ट झालेले आहेत. आपल्याला आपण काल कोणती भाजी खाल्ली आहे हे आठवत नाही. मग हज्जारो-लाखो वर्षांच्या पूर्वी घडून गेलेले सांगता येणे अवघडच आहे ना? आर्य हे भारताच्या बाहेरून आलेले नसून ते भारतातीलच आहेत. साधारण १०,००० वर्षांनी पृथ्वीचा ध्रुव बदलतो. आत्ता पोलारीस हा ध्रुव आहे. त्यामुळे शक्यता अशी आहे की भारताची आत्ताची जी पोझिशन आहे, जी जागा आहे ती कदाचित वेगळ्या ठिकाणी असू शकेल. पण हा अवघड विषय आहे. त्यावर काही बोलणे आणि तेही अधिकारवाणीने हे शक्य नाही. असो.
वर म्हंटल्याप्रमाणे सप्तर्षींची अधिक माहिती, मानवाचे पृथ्वीवर आगमन, दत्त गुरु म्हणजे कोण आणि कुठून आले याबद्दल जाणून घेऊ या ....सध्या ऋषी संस्कृतीला वंदन करून इथेच थांबतो....
!! इति लेखन सीमा !!
साभार -Dr हेमंत सहस्रबुद्धे उर्फ कलादास......
चक्रम माणसा तुझा नक्की
चक्रम माणसा तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे
निरंजन घाटे वरील लेखात ज्या
निरंजन घाटे वरील लेखात ज्या व्यक्तीबद्दल बोलत आहेत ते बहुतेक रघुनाथ नारायण शुक्ल हे आहेत. विश्व चैतन्याचे विज्ञान यात त्यांचे भन्नाट किस्से आहेत. अमानवीयच्या चाहत्यांना चांगली वाचायला. नेटवर फ्री मिळतंय कुठेतरी. मला त्यांची ओळख यातूनच झालती आणि दोन मिनटं मी गंभीरपणे विचार केला मग लेखकाला मा.राष्ट्रपती पाटील ह्यांना पुस्तकाची प्रत देताना पाहून काय समजायचं ते समजलो.
https://www.maayboli.com/node/63466?page=2 इथं त्यांचा एक भन्नाट किस्सा दिलाय. आता तो खरा-खोटा समजायला मार्ग नाही. पण अनिस च्या लोकांना आळंदीला समाधी उचकण्याचं बळ आलं असेल असं वाटत नाही कारण तशी भनक जरी लागली असती तर मुडदे पडले असते त्यांचे. हे सगळे खयाली पुलाव दिसतायेत . यात अलख निरंजन मासिकात आलेलया लेखाचा उल्लेख आहे. हे मासिक ज्यांनी सुरु केलंय तो महात्मा जाऊन ३७-३८ वर्ष झालीत आणि त्यानंतर पुलाखालून बरच पाणी गेलंय...
नाडीवाले शशिकांत ओक यांनी त्यांची घेतलेली मुलाखत https://www.youtube.com/watch?v=Dj2mlwIp2nc
चांगली करमणूक झाली सकाळीसकाळी
चक्रम माणसा तुझा नक्की
चक्रम माणसा तुझा नक्की प्रॉब्लेम काय आहे
Submitted by Rajesh188 on 24 July, 2019 -
>> मला कुणाचा, कसलाही प्रॉब्लेम नाही. माझा कोणाला आहे का माहित नाही.
शेवटी कोणताही धर्म म्हणजे
शेवटी कोणताही धर्म म्हणजे तरी काय असतं .
मग तो कोणताही असेल .
जीवन सुखी होण्यासाठी काय करायला हवे हेच शिकवलं जाते .
मनःशांती साठी ईश्वराची उपासना करा .
आरोग्य ठीक राहण्यासाठी आहार काय घेतला पाहिजे काय वर्ज्य केले पाहिजे .
नीती मत्ता टिकवण्यासाठी पाप पुण्याच्या कल्पना आणि ईश्वरी कोपाची भीती .
मूळ गाफा हाच असतो आपण उगाच एक दुसऱ्याचा द्वेष करून धर्माला नाव ठेवतो .
हिंदू धर्मात असलेली जात पद्धत
हिंदू धर्मात असलेली जात पद्धत ही मूळ धर्मात नसावी कुठे उल्लेख असेल तर त्या चा उदरनिर्वाह सर्वांचा चालला पाहिजे हाच हेतू असेल नंतर त्याला विकृत रूप दिले गेले ते काही स्वार्थी माणसांनी च दिले असणार त्यात धर्माचा काय दोष .
ईश्वर जर एक आहे असे मानले जाते तर त्याला सर्व सारखेच प्रिय आहेत त्यात उच्न नीच हा भेदभाव असू शकत नाही हे मला पटत .
समाजविघातक कृत्य करणारे ,द्वेष पसरविणारे हे खरे समाजाचे दुश्मन आहेत .
धर्म नुसार रीतिरिवाज पाळणारे समाजाचे दुश्मन नाहीत .
एकदम बरोबर.
एकदम बरोबर.
कोणतीही गोष्ट स्वार्थी आणि
कोणतीही गोष्ट स्वार्थी आणि सत्तावान माणसे आपल्याला हवी तशी वाकवीत आणि वापरीत असतात. हे लक्ष्यात घेऊन गैरवापर थांबवला पाहिजे. म्हणजेच स्वार्थी माणसांना आव्हान दिले गेले पाहिजे, त्यांना स्वार्थापासून परावृत्त करण्याची चळवळ चालवली पाहिजे. जे लोक हे काम करतात ते धर्मद्वेष्टे नव्हेत.
धर्म म्हणजे जिवंत एन्टिटी नव्हे. तो मानवनिर्मित आहे. म्हणून धर्म दोषी नसतो तर धर्मात दोष असू शकतो, कारण तो स्खलनशील (चुका करणार्या ) मानवाकडून त्याच्या तत्कालीन आकलनशक्तीनुसार निर्माण झाला आहे.
गटारी अमावस्येला वडे तळेन >>
गटारी अमावस्येला वडे तळेन >> हे पा सस्मितजी, तुम्ही हिंदुधर्मद्वेष्ट्या आहात ह्याचा ढळढळीत पुरावा. अहो दीपपूजेला तुम्ही गटारी म्हणता? गटारी नव्हे तर गताहारी चा अपभ्रंश आहे तो. कुफेहेपा??
कोणाचे वाईट करू नका ,कोणाला
कोणाचे वाईट करू नका ,कोणाला फसवू नका ,कमजोर व्यक्ती वर अन्याय करू नका ,स्त्रिया चा आदर करा ,लबाडी करू नका ,कोणाला विनाकारण त्रास देवु नका .
बस एवढेच करा धर्म तुमचा कोणताही असू ध्या.
बाकी तुम्ही सोळा सोमवार करताय,तीन वेळा नमाज अदा करताय,आणि काही पण करताय आणि हे तुमच्या घरात करताय तर बाकी लोकांना टीका करायची काही गरज नाही .
बरोबर.
बरोबर.
गताहारी>>>> म्हणजे काय भौ?
गताहारी>>>> म्हणजे काय भौ? शाकाहारी मांसाहारी माहितीये.
वाचुन कुणीतरी कशाच्या आहारी गेला असं वाटतंय.
आणि तसंही सुपर्णा तीर्थकरताईंनी इश्श अशी सुरुवात केलेली पोस्ट वाचा.
मी आता अमावस्या-पौर्णिमा न बघता भरती-ओहोटी बघुन तळण करणार.
मला तळलेले पदार्थ फार आवडतात
मला तळलेले पदार्थ फार आवडतात पण खाता येत नाही. पथ्यामुळे.
भरती ओहोटी पाहुन खावे!
भरती ओहोटी पाहुन खावे! म्हण्जे तेल कमी शोशले जाईल शरीरात
बाकी आयडी बदलण्याचे किं प्रयोजनम् चमा ???
सस्मित आणि चिवट तुम्ही दोघे
मत मांडताना ती पूर्वग्रहदूषित नसावीत .
द्वेषाने प्रेरित नसावीत .
कोणाचं मत पटत नसेल तर योग्य शब्दात विरोध जरूर करावा त्या शिवाय चूक कशी माहीत पडणार .
हेच अपेक्षित असतं सर्वांकडून .
Massage parlours मध्ये
Massage parlours मध्ये ह्यापुढे भरती-ओहोटी तक्ता आवश्यक
राजेश१८८, तुम्ही मला विकृत
राजेश१८८, तुम्ही मला विकृत म्हणण्याचे कारण?? तुम्हाला उद्देशुन मी काही बोललो आहे का?? माझ्या पोस्टची जागा ठरवणारे तुम्ही कोण ? तुम्ही स्वतःला सुसंस्कृत कसे काय म्हणवुन घेऊ शकता???
इथे माणसं जोडणं आणि विचाराची
इथे माणसं जोडणं आणि विचाराची देवाण घेणे हे अपेक्षित आहे पण तुमच्या पोस्ट एकदम विरुद्ध आहेत म्हणून विकृत हा शब्द वापरला .
इथे बाकी लोकांनी सुद्धा पोस्ट chya विरूद्ध मत मांडली पण योग्य दिशेने .
ते नक्कीच चांगली प्रथा आहे
तुम्हाला अपेक्षित लिहिले नाही
तुम्हाला अपेक्षित लिहिले नाही म्हणुन विकृत ?? छान छान!!
चिवट विकृत आहे. बरोबर चिवट
चिवट विकृत आहे. बरोबर चिवट विकृत आहे.
राजेश१८८, आपण आपली पोस्ट
राजेश१८८, आपण आपली पोस्ट संपादित केलेली दिसते. असो. त्याचा स्क्रीन शॉट आहे माझ्याकडे काळजी नसावी. ७पुतेंना मात्र यात नाक खुपसण्याचे कारण कळले नाही
चिवट सारख्या विकृती नष्ट
चिवट सारख्या विकृती नष्ट करण्यासाठी मला चक्रम बनावं लागलं आहे. नुसता विकृत नाही तर नीच आहे.
एखादी गोष्ट समोर आली की
एखादी गोष्ट समोर आली की त्याचा सगळ्या बाजुंनी पूर्ण पाठपुरावा करायची सवयच आहे मला. कोणीही कितीही टवाळी करो मी खाली मान घालून माझे काम करत राहते.
परवाची डॉक्टर साहेबांची पोस्ट अन्य त्यावर बर्वे सरांचे स्पष्टीकरण वाचून ते तत्व कुठे कुठे वापरता येईल याचा विचार चालला होता.
घरात जेष्ठ नागरिक आहेत, वयोमानाप्रमाणे त्यांना मलावरोधाचा त्रास होतो, सारक औषधे घ्यावी लागतात.
बर्वे सरांचे स्पष्टीकरण वाचले आणि तेच तत्व आरोग्याबाबत वापरता येते का पाहू म्हंटले,
गेले 2 दिवस भरतीची वेळ पाहून त्यांना शौचास जाण्यास सुचवले. आणि काय आश्चर्य, कोणतेही औषध न घेता पोट साफ झाले. घरातल्या लहान मुलांचा देखील तसाच अनुभव आला. लगोलग मी आई ला फोन लावला, बाबांच्या बाबतीत प्रयोग करायला सांगितला, तिकडेही तेच.
अजून 3 4 दिवस प्रयोग करून या निष्कर्षांवर ठोसपणे बोलता येईल, विज्ञानाबद्दल बोलत असल्याने सज्जड पुरावे असल्याशिवाय बोलणे योग्य नाही. जितके जास्त डेटा पॉईंट्स तितका जास्त विश्वासार्ह निष्कर्ष. माझी सगळ्यांना विनंती आहे कृपया पुढचा आठवडाभर तरी भरतीची वेळ पाहून विधी आटपावेत आणि नोंदी ठेवाव्यात.हे शेवटी आपल्याच जुन्या ज्ञानाचे पुरुज्जीवन करायला करतो आहोत, त्यात कुणाचा स्वार्थ नाही आहे, त्यामुळे शास्त्रीय प्रयोगात उगाच अवघडलेपण, संकोच आणू नये.
भारतीय संस्कृतीत विशेषतः वेदात दडलेले हे विज्ञान अक्षरशः चमत्कार घडवू शकते गरज आहे ती केवळ आपल्या प्रयत्नांची
सुपर्णा जी आपण फेसबुक वर आहात
सुपर्णा जी आपण फेसबुक वर आहात काय.
एखाद्या ग्रहाचा किंवा ता-याचा
एखाद्या ग्रहाचा किंवा ता-याचा स्वतःभोवती किंवा ग्रहाचा ता-याभोवती फिरण्याचा वेग कोण आणि कसा ठरवतं ?
ग्रहांचं एकमेकांपासूनचं अंतर कोण ठरवतं ?
मला लोकांशी मायबोलीबाहेर
मला लोकांशी मायबोलीबाहेर कोणत्याही प्रकारे संपर्क ठेवायचा नाहीये, हे आभासी जग मला माझ्या जगात घेऊन यायचे नाहीये,
त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकत नाही.
ते ग्रहाचे वस्तुमान ठरवते व
ते ग्रहाचे वस्तुमान ठरवते व भौतिक शास्त्राच्या गुरुत्वाकर्षण शक्ती व इतर बलाप्रमाणे ठरते.
ग्रहाचे वस्तुमान कोण ठरवते ?
ग्रहाचे वस्तुमान कोण ठरवते ?
तुम्हाला म्हणायचे आहे देव
तुम्हाला म्हणायचे आहे देव ठरवतो. देव जर इतकं खूप काही करू शकतो तर सजीव होऊन माणसांशी कॉन्फरन्स करून मानवाच्या प्रश्र्नांची उत्तरं देऊ का शकत नाही. कैक जन्म त्याला शोधत बसावं का लागतं?
देव जर इतकं खूप काही करू शकतो
देव जर इतकं खूप काही करू शकतो तर सजीव होऊन माणसांशी कॉन्फरन्स करून मानवाच्या प्रश्र्नांची उत्तरं देऊ का शकत नाही. कैक जन्म त्याला शोधत बसावं का लागतं? ---> देव देऊ शकतो परंतु मानवाची तितकी पात्रता हवी. जे मनुष्य त्यासाठी पात्र आहेत त्यांना याची सगळी उत्तरे मिळाली आहेत (जसे की ज्ञानेश्वर, तुकाराम, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस इत्यादी). या सर्वांनी देव प्रत्यक्ष पहिला त्याच्याशी संभाषण पण केले. परमेश्वर हा निर्गुण, निराकार आहे. त्याच्याशी direct contact हवा असेल तर आधी आपणही तसेच झाले पाहिजे. परंतु षड्रिपूंनी माखलेले, अहंकाराच्या ओझ्याखाली दबलेले मन घेऊन त्याचा अनुभव मिळणे केवळ दुरापास्त. चिखलाच्या दलदलीत हिरा हरवला असेल तर आधी चिखल काढायला हवे. हिरा आपोआप मिळेल. तसे न करताच हिरा का मिळत नाही असे विचारून काहीच उपयोग नाही.
पतंजली योगसूत्रामध्ये म्हणतात " योगश्चित्तवृत्तिनिरोधः | तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम् ||
योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. तसे झाले की द्रष्टा (देव, ईश्वर, परमेश्वर काहीही म्हणा) आपल्या स्वरूपात स्थित होतो म्हणजेच परमेश्वराचा अनुभव आपल्याला येतो.
अरे भाई देव परिसासारखा एका
अरे भाई देव परिसासारखा एका झटक्यात त्याच्यासारखा का करू शकत नाही. अटी घालून अडवणूक कशासाठी.
संत फक्त तत्वज्ञानाच्या एका ठराविक कल्पित स्टेजला पोहोचले. देवाशी संवाद हा इल्यूजन ही असू शकते.
Pages