थोडेसे हिंदू धर्मा विषयी....

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 18 July, 2019 - 11:46

हिंदू धर्म हा किती प्राचीन आहे याविषयी जाणकारांमध्ये बरेच मतभेद आहेत. हिंदू म्हणजेच "आर्य सनातन वैदिक संस्कृतीच्या" ऋषींचे मत मानायचे तर प्रत्येक १५००० ते २०००० वर्षांनंतर येणाऱ्या प्रलयानंतर मानव हळू हळू पुन्हा एकदा मानव बनू लागतो... ऋषी त्यांच्या स्मृतीतून, त्यांच्या अंतरचक्षुनच्या समोर या साऱ्या सृष्टीचे, तिच्या जडण घडणीचे जे ज्ञान ऋतम्भरा प्रद्नेने दिसते ते मांडतात. म्हणून ते स्वत:ला या वेदांचे निर्माते म्हणवून घेत नाहीत तर "उद्गाते" म्हणवून घेतात. या वेदांची रचना त्यांनी स्वत: केलेली नसते तर ती कवीला ज्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे कविता सुचतात, त्याप्रमाणे ते करतात...पृथ्वीवर प्रथमत: ज्या सात ऋषींनी मानवाला आणले ते सप्तर्षी जे आहेत त्यांच्या नावाबद्दल मतभेद आहेत......यांनी लाखो वर्षांपूर्वी मानवाला पृथ्वीवर आणले....यांची कुले पुढे चालत राहिली....उगम आपण विसरलो...म्हणूनच म्हणतात की ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये....सापडणार नाही... आणि आपल्या आजच्या माहितीत आज पर्यंत ७ महायुगे झालेली असून या प्रत्येक महायुगात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चार युगांचे चक्र पूर्ण होत होत सात माहायुगात प्रत्येकी ही चार युगे म्हणून सात चोक अठ्ठावीस म्हणून अठ्ठावीस युगे विटेवर उभा असे विठ्ठलाला म्हंटले जाते.

आता ही ७१ चतुर्युगे एका मन्वंतरात असतात. म्हणजेच मनु बदल...म्हणजेच एक मनु अर्थात त्या मनु म्हणजे मानवाच्या कालाचा राजा अथवा अधिपती, हा वेगवेगळा असतो. आत्तापर्यंत ७ मनु म्हणजेच ७ मन्वंतरे झालेली असून सध्याचा "वैवस्वत" हा मनु आहे. अजून ७ मन्वंतरे होणार आहेत. म्हणजेच वैदिकांची {म्हणजे फक्त ब्राह्मण नव्हे] अर्थात ऋषींची कालगणना अथवा संख्यांची गणना ही अणूपासून परार्धापर्यंत प्रचंड मोठी आहे. म्हणजेच हा काल किती मोठा असेल याची सर्वांनाच कल्पना आली असेल. म्हणूनच जाता जाता एक सांगावेसे वाटते सध्या २०१२ साली जग नष्ट होणार असा बागुलबुवा उभा केला आहे तो खरा नसून लाटीन अमेरिकेतील "माया" संस्कृतीचे कॅलेंडर २०१२ रोजी संपत होते. म्हणून पाश्चात्यांनी पश्चिमेच्या धार्मिक समजुतींच्या नुसार "द डे ऑफ डेस्टिनी" अथवा "कयामत का दिन" समजून त्या दिवशी जग नष्ट होऊन सर्वांना देवा समोर उभे केले जाऊन त्यांच्या पापाचा झाडा या एकाच दिवशी केला जाणार आहे असे समजून तो प्रचार चालवलेला होता. आणि वरचा हिशोब वाचला तर हे अजिबात खरे नाही हे सर्वांच्या सहज लक्षात येऊ शकते. त्यामुळे आपण निश्चिंत रहाण्यास हरकत नाही. असो...

पुढे जाण्या पूर्वी इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की फार प्राचीन काळी सध्या ज्यांना "शुद्र" अथवा दलित असे म्हंटले अथवा समजले जाते अशा समाजातील अनेक विद्वानांनी म्हणजेच ऋषींनी वेदातील अनेक ऋचा लिहिलेल्या असून एक उदाहरण द्यायचे झाले तर "दीर्घतमा" अथवा "दीर्घतमस" या एका "शुद्र ऋषींनी" वेदातील अस्यवामीय सुक्त हे अतिशय महत्वाचे सुक्त लिहिले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आताच्या काळातील तथाकथित "जातीयता" त्यावेळेस अजिबात नव्हती...या सर्व ऋषींना अतिशय मान दिला जात असे. सूर्या सावित्री, गार्गी, मैत्र्येयी, इंद्राणी, लोपामुद्रा, अनुसया, अरुंधती अशा अनेक विद्वान स्त्रियांचे देखील योगदान वेद काळात मोठे आहे. त्यांना पडद्यात अथवा चूल मूळ सांभाळत कोंडून ठेवले जात नव्हते. यातील मैत्रेयी या ब्रह्मवादिनीने वेदातील १० ऋचा लिहिल्या आहेत. सीतामाईने स्वयंवर पद्धतीने तर आणि द्रौपदीने पण लावून आपापले वर अर्थात पती निवडलेले होते. त्यामुळे वैदिक अथवा हिंदू धर्मात स्त्रियांचा सतत छळ झाला आहे हा प्रचार खोटा आहे. हा...मधल्या म्हणजे गेल्या २००० ते २५०० वर्षांत काही घटना झाल्या असतील... पण त्यामुळे सगळ्या हिंदू संस्कृतीला दोष देणे चुकीचे आहे.

तर, हिंदू धर्माला "हिंदू" हे नाव साधारण २५०० ते ३००० वर्षांपूर्वी पडले आहे. ज्यावेळेस वैदिक संस्कृती आणि असुर, दानव आणि दैत्य संस्कृती यांच्यातील भेद वाढत गेला, त्यावेळेस इराणात आदरणीय "अहुर्मझ्द" या असुर राजाने वेगळ्या राज्याची स्थापना केली. हे लोक "स" चा उच्चार "ह" करत असल्याने "असुरमझद" चा उच्चार "आहुर माझ्द" असा केला गेला भारतातील "सरस्वती" नदीचा उच्चार "हर हवैती" असा तर "सिंधू स्थान" चा उच्चार "हिंदुस्थान" असा केला गेला. सिंधू नदी अथवा सिंधू समुद्रापलीकडील लोकांना हे लोक "सिंधू" म्हणजेच "हिंदू" म्हणत असत. कश्यप ऋषींना १३ पत्न्या होत्या. पैकी "दिती"ची मुले म्हणजे "दैत्य", "अदितीची" मुले म्हणजे "आदित्य" म्हणजेच "देव" आणि "दन्यू" या पत्नीची मुले म्हणजे "दानव" होत. हे म्हणजे राक्षस नसून देवाकडे कमी लक्ष पण उपभोगांकडे जास्त लक्ष अशी संस्कृती असलेले लोक होत. म्हणून अंतरातील देव शोधून मुक्ती मिळवायची अशी जाणीव ठेवणार्या आर्यांची स्वत:च्या रक्षणासाठी यांच्याशी नाइलाजाने युद्धे होत असत. राक्षस म्हणजे सुद्धा २-४ शिंगे असलेले, अतिशय क्रूर असे काही नसून फक्त स्वत:चे क्षेत्र, आणि स्वार्थ यांचे रक्षण करणारे असा त्याचा अर्थ आहे.

जर्मनी हा देश "Danub" या नदीच्या दोन तीरांवर वसलेला असून या "दानव" या शब्दाचा हा अपभ्रंश असू शकतो. बंगाल, उत्तर भारत, पंजाबी यांचे उच्चार आठवा म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल...तसेच जर्मनीचे मूळ नाव "द्युइश Land " म्हणजे "द्विश दल" जसे की "द्विदल धान्य"...."दानुब" नदीच्या दोन तीरांवर वसलेले असल्याने "द्विश दल" जसे की "इंग्लंड म्हणजे "आंग्ल दल"......

"धर्म" म्हणजे ....."धारयति इति धर्म" म्हणजे जो संस्कृतीचे धारण करतो आणि मानवाला जगण्यास आवश्यक असे नैतिक, सामाजिक, बौद्धिक, आर्थिक, मानसिक, भावनिक "आणि" "अध्यात्मिक" असे वातावरण तयार करतो तो धर्म ... आणि याच साठी धर्माची आवश्यकता...अन्यथा माणूस हा एक " सर्व प्राथमिक गरजा असलेला बुभुक्षित प्राणीच" आहे. त्याला धर्म "धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष" या सुसंस्कृत चौकटीत बद्ध करतो. नाहीतर दिवसा ढवळ्या बायका पळवल्या गेल्या असत्या...हे एक उदाहरण झाले.... आर्यांनी कोणत्याही एकाच देवतेची पूजा म्हणजे धर्म असे समजले नाही. आर्य धर्मात वहाणे हा पाण्याचा धर्म, पितृ धर्म, मातृधर्म, पुत्र धर्म हे धर्म सांगितले आहेत. ज्याला पाश्चात्य लोक धर्म म्हणतात त्याला आर्य "मोक्ष" कल्पना म्हणतात.

असो...आता हिंदू धर्माच्या मूळ नावाकडे वळू...

हिंदू धर्माचे मूळ नाव आहे "आर्य सनातन वैदिक संस्कृती"...

१] आर्य- अर म्हणजे चिरणे, फाडणे ...संकटांना अडचणींना चिरत पुढे जाणारे....प्रगती करणारे....फक्त गोरे दिसणारे, निळ्या घार्या डोळ्याचे लोक म्हणजे आर्य हा समज खोटा आहे. राम आणि कृष्ण हे काळे सावळे होते हे सर्वांनाच माहित आहे. आर्य असणे ही एक उच्च मानसिक, बौद्धिक, भावनिक, वैद्न्यानिक आणि अध्यात्मिक अवस्था आहे. कोणता वंश नव्हे...

२] सनातन- स: नूतन:....नित्य नूतन असणारा किंवा असणारे....हिंदू धर्म हा नित्य नवा आहे...खुळचट जुन्या समजुतींना कवटाळून बसणारा नव्हे...किंवा "सनातन" याचा अर्थ भस्माचे पट्टे ओढून जपाच्या माळा ओढत बसणे, लांब हो लांब हो ....शिवू नको असे म्हणणे मुळीच नव्हे हे पक्के लक्षात घेणे आवश्यक आहे. जसा कालचा सागर कालच्या प्रियकर प्रेयसीन्साठी आणि आजच्याही जोडप्यांसाठी "नवाच" असतो तसा काला प्रमाणे बदलणारा हिंदू धर्म हा "सनातन" म्हणजे सतत नवाच असतो....

३] वैदिक- "विद" या संस्कृत धातूचा अर्थ आहे " आतून, हृदयातून" जाणणे .....म्हणजे कसे? तर ...जर का मी तुम्हाला तासभर "आंबा" विषयावर व्याख्यान दिले तरी तुम्हाला आंबा पाहिला नसेल तर अंबा म्हणजे काय ते यथार्थपणे कळणार नाही. पण ज्या वेळेस तुम्ही आंबा कापून जिभेवर टाकणार त्यावेळेस तुम्हाला कळणार की आंबा काय चीज आहे ते....हे जे आतून कळणे आहे त्याला "विद" म्हंटले आहे. याच "विद" धातू पासून वेद हा शब्द बनला आहे. हेच वैदिक जे दक्षिणेत रहात होते त्यांनी स्वत:ला "द्रु विद" म्हणजे कोणतीही गोष्ट "द्रुत गतीने" "जाणणारे" ही पदवी लावून घेतली. याचाच अपभ्रंश होऊन "द्रविड" झाले. आजही जुन्या इंग्लिश डिक्शनरी मध्ये "Druid " हा शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे "जुने जाणते लोक"... द्रविड या शब्दाचे पुढील रूपांतरण आणि त्याचे संदर्भ हे वादाला तोंड फोडतील असे असतील असे मला वाटते आहे...त्यामुळे ज्यांना जिज्ञासा असेल त्यांना मी वैयक्तिक चर्चेत सांगू शकेन....

४] संस्कृती- प्रकृती ही मूळ आहे. प्रकृती म्हणजे जे जसे आहे तसे....कोणत्याही गोष्टीचे मूळ रूप, निसर्ग अथवा सृष्टी....त्यात बदल केला अथवा झाला की त्याला संस्कृती किंवा विकृती म्हंटले जाते. चांगला बदल- संस्कृती आणि वाईट बदल- विकृती. नुसते पाणी ही प्रकृती, गटार ही विकृती आणि तीर्थ ही संस्कृती...

तसेच माझ्याजवळ समजा २ पोळ्या आहेत आणि दुसऱ्याकडेही २ पोळ्या आहेत, तर प्रत्येकाने आपापल्या पोळ्या खाणे ही प्रकृती, दुसरयाच्या हिसकावून घेणे ही विकृती आणि आपल्याही पोळ्या त्याच्या गरजेनुसार दुसऱ्याला देणे ही संस्कृती....आणि नेमकी हीच संस्कृती दैत्य, दानव आणि असुरांकडे नव्हती....

हाच आपला धर्म. हीच आपली संस्कृती. हीच आपली ओळख मित्रांनो.

असा हा आपल्या या आर्यभूमी मधील [ जम्बूद्वीप, , भारतवर्ष अशी आपल्या देशाची प्राचीन नावे आहेत. ] वैदिक धर्माचा थोडासा परिचय. अजून खूप काही लिहायचे आहे. जस जसे शक्य होईल तस तसे विषय मांडत जाईन. लोकमान्य टिळक ज्यांना “मोक्ष मुलर” म्हणत असत असे “Max Muller” नावाचे जर्मनीचे एक विद्वान ज्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि वेदांची महती जगापुढे मांडली. पण त्यांनी हे करत असताना वेदांचा काळ, आर्यांचे उगमस्थान या बाबत बरीच गल्लत केलेली आहे. आणि आपल्या कडील काही संघटना नेमक्या याच गोष्टींचा गैरफायदा घेऊन आर्य-द्रविड-दस्यू असा संघर्ष पेटवू पहात आहेत. पण आर्यच अधिक प्रगत होऊन द्रविड झालेले आहेत हे तुमच्या आता लक्षात आलेले असेलच. हज्जारो ग्रंथ काळाच्या ओघात नष्ट झालेले आहेत. आपल्याला आपण काल कोणती भाजी खाल्ली आहे हे आठवत नाही. मग हज्जारो-लाखो वर्षांच्या पूर्वी घडून गेलेले सांगता येणे अवघडच आहे ना? आर्य हे भारताच्या बाहेरून आलेले नसून ते भारतातीलच आहेत. साधारण १०,००० वर्षांनी पृथ्वीचा ध्रुव बदलतो. आत्ता पोलारीस हा ध्रुव आहे. त्यामुळे शक्यता अशी आहे की भारताची आत्ताची जी पोझिशन आहे, जी जागा आहे ती कदाचित वेगळ्या ठिकाणी असू शकेल. पण हा अवघड विषय आहे. त्यावर काही बोलणे आणि तेही अधिकारवाणीने हे शक्य नाही. असो.

वर म्हंटल्याप्रमाणे सप्तर्षींची अधिक माहिती, मानवाचे पृथ्वीवर आगमन, दत्त गुरु म्हणजे कोण आणि कुठून आले याबद्दल जाणून घेऊ या ....सध्या ऋषी संस्कृतीला वंदन करून इथेच थांबतो....

!! इति लेखन सीमा !!

साभार -Dr हेमंत सहस्रबुद्धे उर्फ कलादास......

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्लम भाऊ मी कालच आलो नि माझ्या वर दोन आयडी घाण शिव्या देत तुटून पडल्या. मला उद्देशून वापरले वाक्य जास्त उडू नकोस हे वापरलं तर इकडे आग लागली.

सातपुते दादा इग्नोर करा बिचाऱ्यांस ... लई वंगाळ परिणाम झालाय डोसक्यात त्याच्या ! कुठंबी एकंच टेप लावून धरतंय (रडतय) प्रत्येक धाग्यावर ट्रोल करत.

मायबोलीवर बर्‍याच दिवसांनी एक ऊद्बोधक आणि विचारप्रवर्तक चर्चा वाचायला मिळत आहे. सर्वच नव्या-जुन्या मायबोलीकरांचा अथांग अपरिमित व्यासंग वाखाणण्याजोगा आहे. चालू द्या... वाचतो आहे ..ज्ञानकण वेचतो आहे.

वर म्हंटल्याप्रमाणे सप्तर्षींची अधिक माहिती, मानवाचे पृथ्वीवर आगमन, दत्त गुरु म्हणजे कोण आणि कुठून आले याबद्दल जाणून घेऊ या ....सध्या ऋषी संस्कृतीला वंदन करून इथेच थांबतो....>>> डॉक्टर साहेब ह्या अफूच्या गोळ्यांचे डोसेज वाढवा जरा..... आठवड्यातून तीन दिवस रोज रात्री बाटलीतल्या पाण्याबरोबर असे काही तरी करा.

भारतामध्ये व्हाट्सएप, फेसबुक इत्यादी सोशल मीडियाचा गेल्या दशकात झपाट्याने झालेला प्रसार, त्यामुळे फेक न्यूज/गांधी नेहरुंबद्दल अपप्रचार/हे असले भंपक लेख इत्यादी कानाकोपऱ्यातल्या भोळ्याभाबड्या जनतेपर्यंत सहजगत्या पोचवण्याची झालेली सोय आणि भाजपाने राजकारणात मजबूत केलेलं स्थान यातला परस्पर संबंध फक्त मलाच दिसतोय का?

म्हणून वेळीच ४जी बंदीसाठी भारत रोको आंदोलन करणे गरजेचे होते. किमान अनलिमिटेड डेटा देण्यावर तर बंदी हवीच... ना रहेगा नेट ना बजेगी व्हाट्सऐप बासुरी Light 1

अशा प्रकारच्या खूप पोस्ट येवू ध्या .
जळणाऱ्या लोकांकडे लक्ष द्यायची गरज नाही.
किती विरोध करायचा त्यांना करू ध्या त्यांच्या पोस्ट न वाचता पुढे जायचं

आपला धर्म आणि त्याबरोबर आपला समाज सर्वश्रेष्ठ व्हावा, त्यातल्या कालविसंगत गोष्टी कमी व्हाव्यात, या इच्छेपोटी कोणी काही करीत असेल, प्रसंगी जहरी टीकाटवाळी सोसून काही सांगत असेल तर तो धर्मद्वेष्टा कसा काय?
अर्थात इथे हे लिहिण्यात अर्थच नाही म्हणा. माझे घर स्वच्छ करीत असताना जर कोणी म्हणेल की तुम्ही इतरांची घरे का साफ करीत नाही? ती आधी स्वच्छ करा, तेव्हाच तुमचे घर स्वच्छ करण्याचा हक्क मिळेल, तर काय बोलणार? दुर्लक्षच केलेले बरे.

म्हणून वेळीच ४जी बंदीसाठी भारत रोको आंदोलन करणे गरजेचे होते. किमान अनलिमिटेड डेटा देण्यावर तर बंदी हवीच... ना रहेगा नेट ना बजेगी व्हाट्सऐप बासुरी Light 1
ख्या ख्या ख्या

भारतामध्ये व्हाट्सएप, फेसबुक इत्यादी सोशल मीडियाचा गेल्या दशकात झपाट्याने झालेला प्रसार, त्यामुळे फेक न्यूज/गांधी नेहरुंबद्दल अपप्रचार/हे असले भंपक लेख इत्यादी कानाकोपऱ्यातल्या भोळ्याभाबड्या जनतेपर्यंत सहजगत्या पोचवण्याची झालेली सोय आणि भाजपाने राजकारणात मजबूत केलेलं स्थान यातला परस्पर संबंध फक्त मलाच दिसतोय का?

खि खि खि

डॉक्टर साहेब ह्या अफूच्या गोळ्यांचे डोसेज वाढवा जरा..... आठवड्यातून तीन दिवस रोज रात्री बाटलीतल्या पाण्याबरोबर असे काही तरी करा.

खो खो खो

मायबोलीवर बर्‍याच दिवसांनी एक ऊद्बोधक आणि विचारप्रवर्तक चर्चा वाचायला मिळत आहे. सर्वच नव्या-जुन्या मायबोलीकरांचा अथांग अपरिमित व्यासंग वाखाणण्याजोगा आहे. चालू द्या... वाचतो आहे ..ज्ञानकण वेचतो आहे.>>>

चांगलं आहे म्हणायचं

सर्व प्रतिसादकांचे आभार

काकदॄष्टीने पाहिल्यास सर्व उमजून यीएल मात्र वक्रदॄस्टीष्टीने पाहिल्यास कशावरच विश्वास बसणार नाही

इथे नास्तिकथवा धर्मावर विश्वास नसणार्‍या मन्डळीना एवढेच सांगावेसे वाटते की ज्यांचा देवावर विश्वास आहे त्याना प्रमाणपत्र / पुरावे लागत नाहीत आणि अभक्तांस कितीहे पुरावे दिल तरी पुरत नाही

झोपलेल्यास जागे करणे शक्य आहे परन्तु झोपेचे सोंग घेतलेल्यास नाही असे मणतात ...

रच्याकने जिज्ञासू साठी

https://www.youtube.com/watch?v=uD4izuDMUQA
TIMELAPSE OF THE FUTURE: A Journey to the End of Time (4K)

How's it all gonna end? This experience takes us on a journey to the end of time, trillions of years into the future, to discover what the fate of our planet and our universe may ultimately be.

We start in 2019 and travel exponentially through time, witnessing the future of Earth, the death of the sun, the end of all stars, proton decay, zombie galaxies, possible future civilizations, exploding black holes, the effects of dark energy, alternate universes, the final fate of the cosmos - to name a few.

This is a picture of the future as painted by modern science - a picture that will surely evolve over time as we dig for more clues to how our story will unfold. Much of the science is very recent - and new puzzle pieces are still waiting to be found.

To me, this overhead view of time gives a profound perspective - that we are living inside the hot flash of the Big Bang, the perfect moment to soak in the sights and sounds of a universe in its glory days, before it all fades away. Although the end will eventually come, we have a practical infinity of time to play with if we play our cards right. The future may look bleak, but we have enormous potential as a species.

या कलादास महोदयांचे FB पोस्ट वाचले,
त्यात अमावास्येला तळणीला जास्त तेल लागते, पौर्णिमेला कमी तेल लागते वगैरे मनोरंजक गोष्टी आहेत.

इतके गाढ समज असणाऱ्या व्यक्तीची पोस्ट मी वाचली, आणि त्यावर लॉजिकल प्रश्न विचारले हि माझी चूक झाली . त्या बद्दल मला क्षमा करावी.

धार्मिक धाग्या वर पर धर्मीय,अर्धवट ,मूर्ख लोकांनी कमेंट द्यायची तसदी घेण्याची काही गरज नाही .
पटत नसेल तर आपल्या संकुचित बुध्दीला झेपेल तिथे कमेंट देणे शहाणपण आहे .
कारण तुम्ही किती ही अकलेचे तारे तोडले तरी
कठीण विषय तुमच्या बुध्दीच्या बाहेरचा आहे

ज्यांचा देवावर विश्वास आहे त्याना प्रमाणपत्र / पुरावे लागत नाहीत >>>
म्हणजे जिहादीच की तुम्ही!

>>>
धार्मिक धाग्या वर पर धर्मीय,अर्धवट
>>>
फक्त पूर्ण मूर्खांनीच प्रतिक्रिया द्यावी अशी अपेक्षा आहे का?

जेब्बात राजेशजी. एकही मारा लेकीन क्या मारा...
आपल्या अधिकारवाणीने दिलेल्या प्रतिसादांचा मी मोठा पंखा झालो आहे.

<< अशाप्रकारच्या लेखांचा उद्देश अत्यंत भोळे लोक शोधणे असतो. अश्या लोकांचा बुद्धिभेद करणे सोपे जाते. ज्याप्रकारे ख्रिस्ती स्टेज वर येशू च्या कृपेने अपंग व्यक्ती पळायला लागली असे नाटक उभे करतात जे अतिशय भोळे श्रद्धाळू लोकांनाच पटू शकते. तशाच प्रकारची पद्धत आहे ही. एक प्रकारची जाहिरात आहे. या मध्ये अजून एक पद्धत म्हणजे खोट्या आयडी ने ज्योतिष किंवा मानसिक आजारावर प्रश्न विचारायचे आणि नंतर त्यावर तज्ज्ञ बनून उत्तर द्यायचे. या आणि अश्या बऱ्याच युक्त्या असतात लोकांना फसवायला. >>
-------- प्रतिसाद आवडला... Happy

<< सीतामाईने स्वयंवर पद्धतीने तर आणि द्रौपदीने पण लावून आपापले वर अर्थात पती निवडलेले होते. त्यामुळे वैदिक अथवा हिंदू धर्मात स्त्रियांचा सतत छळ झाला आहे हा प्रचार खोटा आहे. हा...मधल्या म्हणजे गेल्या २००० ते २५०० वर्षांत काही घटना झाल्या असतील... पण त्यामुळे सगळ्या हिंदू संस्कृतीला दोष देणे चुकीचे आहे. >>

------- सीतामाई आणि द्रौपदी यांनी आपापले वर निवडले होते अथवा नाही हे माहित नाही.... पण आज भारतात साक्षी मिश्रा आणि त्यांच्या सारख्या अनेक लाखो युवतींना/ महिलांना स्वत: चा पती निवडण्याचा अधिकार नाही आहे, निवडल्यास त्यांना मानसिक तसेच शारीरिक त्रास दिला जातो .... तिच्या पतीला कोर्टाच्या आवारातच मारहाण झाली आहे.

उत्तम लेख,
इकडे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

योगायोगाने कालच व्हाट्सअप्प वर डॉ. श्री हेमंत सहस्त्रबुद्धे यांचे लिखाण आले ते खाली देते आहे. त्यावर बर्वे सरांनी शास्त्रीय स्पष्टीकरण सुद्धा दिले आहे.

त्यांनी वर्णन केलेला प्रसंग जसाच्या तसा माझ्या बाबत घडला आहे. दिवाळीचा फराळ आम्ही शेजारणी मिळून करतो. माझे चकल्यांचे तळण झाल्यावर आम्ही ब्रेक घेतला आणि परत चालू केले, पण तिच्या चकल्यांना खूपच तेल लागायला लागले, आम्हाला कळेना काय होतंय ते.. आता डोक्यात प्रकाश पडला.

खरेच आपल्या लोकांनी किती गोष्टींचा बारकाईने विचार करून ठेवला होता. त्या द्रष्ट्या लोकांना माझा नमस्कार __/\__.

श्री कलादास यांचे लिखाण खाली देत आहे.

भरती आणि ओहोटीचा स्वयंपाकावर परिणाम होतो का ?

उत्तर: हो

१) एखाद्या वर्षी दिवाळीत मोठ्या प्रमाणात चकल्या, अनारसे , शंकरपाळे केल्यावर ते पदार्थ आपण ज्या डब्यात ठेवतो, त्याच्या तळाशी खूप सारे तेल जमते, आणि ते पदार्थ ही मऊ होतात. पदार्थ करणारी व्यक्ती आणि जिन्नसाचे प्रमाण ही तेच असते परंतु त्या पदार्थांत खूप तेल शोषले जाते. बटाटेवडे / भजी केलीे तर कधी कधी ते खूप तेल पितात. ह्याचे कारण म्हणजे तो पदार्थ नेमका ओहोटीच्या वेळेत तळला गेलेला असतो.

२) जर पदार्थ भरतीच्या वेळेत तळला गेला तर खूप कमी तेल लागते व पदार्थ ही छान होतो आणि आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले असते.

३) भरती ओहोटीची वेळ कशी काढावी ? ती खालील प्रमाणे---- वृत्तपत्रात किंवा नेटवर ती मिळतेच पण एक साधी आणि सोपी पद्धत खाली देत आहेत.
कालनिर्णयवर आजची तिथी बघावी ,उदारणार्थ आजची कृ. २ आहे , तिथी कृ. २ × ३/४ = १.५ , आता १.५ म्हणजे दुपारी १.३० वाजता पूर्ण भरती आहे. पूर्ण भरतीच्या साधारण 3 तास आधी तळण सुरू करावे. (सकाळी १०.३० वाजल्यापासून ते दुपारी १.३० वाजेपर्यंत) पण जर तुम्ही दुपारी १.३० नंतर तळणाला सुरवात केलीत तर जसजशी वेळ पुढे जाईल तसतसे पदार्थ जास्त तेल शोषेल.

४) जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात तळण करणार असू तेंव्हा ही वेळ पाळली तर पदार्थात तेल खूप कमी शोषले जाईल, पदार्थही चांगला होईल आणि ते आरोग्यासही उत्तम राहील. आमच्या घरी दिवाळीचे सर्व पदार्थ वरील पद्धतीने भरती आणि ओहोटीची वेळ बघून केले जातात. हा प्रयोग तुम्हीही अवश्य करून बघा ; विशेष करून केटरिंगचा व्यवसाय करणार्यांनी.

इति लेखन सीमा !!

साभार -Dr हेमंत सहस्रबुद्धे उर्फ कलादास......
_________________

५) नमस्कार, मी सागर बर्वे, पुणे ईथून. वरील पोस्टचे शास्त्रीय विश्लेषण आपण विज्ञानात शिकलो आहे की---- Attraction - Repulsion (आकर्षण विकर्षण), Ionic bond, Covalent bond ,Vanderwaal's forces, Hydrophobic (स्निग्धता / Aromatic, oily fatty principal), Rotational, Vibrational and Translational अशा मोशन व फोर्सेस असतात. ह्या भाषेत सांगितलं की अमेरिका, युरोपाचे तळवे चाटणार्या लोकांना लगेच कळतं, पण हिंदू धर्माची चाल/रीत आहे सांगितलं, की मात्र हिंदू धर्मावर जुनाट व अंध म्हणून टीका करतात.

६) स्पष्टीकरण: -- भरतीच्या वेळेस हायड्रोफिलिक फोर्सेस (पाणीतत्व) जास्त कार्यरत असते. केवळ समुद्राचेच नाही, तर मनुष्याच्या शरीरात असलेल्या ५-६ लीटर द्रव पदार्थ, रक्त, होर्मोन्स यावर सुद्धा परिणाम होतो, पोर्णिमा, अमावस्या, अष्टमी या तिथींना हे फोर्सेस जास्त एक्टीव असतात. म्हणून, मानसिक आजार असलेल्यांत वेडाचे झटके / अंगात येणे, चिडचिड, हे प्रकार अंगातील द्रवरूप व पाणी असलेले होर्मोन्स अप डाऊन होत असल्याने या तिथींवर मूडवर जास्त परिणाम होतो. याच तत्वाने समुद्रास भरती येणे, पाऊस कमी जास्त पडणे, आणि देवतांचे शक्तीतत्व जास्त कार्यरत असणे, हे प्रकार अष्टमी व पौर्णिमेस घडतात, कारण जलतत्व जास्त कार्यरत असते. मनास चंचल, ऊद्विग्न, डीप्रेस्ड वाटत असता मूठभर मीठ कोमट पाण्यात टाकून आंघोळ करावी, भरतीच्या वेळी जलतत्व जास्त कार्यरत असल्याने जास्त सुलभतेने मीठ विरघळू शकते, मीठात NaCl मध्ये निगेटिव शक्ती खेचून घेण्याची क्षमता असते,कारण मीठ पाण्यात विरघळले, की घन व ऋण (positive & negative) आयन्स् (प्रभारित अणू) तयार होवून ते वीजवहन करू शकतात. आपल्या शरीरात पण वीजवहन सतत सुरू असते. मीठाचे पाणी अधिक पातळ व गुळगुळीत असल्याने मल साफ करण्यास पण मदत करते. यास्तव, भरतीच्या वेळेस घरच्या बादलीत मीठ पाण्यात घालून आंघोळ केल्यास मनास शांती लाभू शकते.

७) तळणीचे तेल हे पाण्याच्या विरूद्ध धर्माचे (hydrophobic) असल्याने भरतीच्या वेळेत त्याचे शोषण पदार्थात कमी होते. पाण्याचे शोषण करायची पदार्थाची वृत्ती (hydrophilic) तेव्हा असते. याऊलट ओहोटी लागताच पाण्याचा प्रभाव (हायड्रोफिलीक /hydrophilic effect) व पृथ्वीवरील जलतत्वाचा परिणाम कमी होवून तैली पदार्थ (हायड्रोफोबिक/ hydrophobic ईफेक्ट) वाढतो, त्यामुळे ओहोटी लागली की तळण जास्त तेल पीत असणार. याच तत्वाने खिचडी, दाल, वरण, भाजी करताना भरतीच्या वेळेस कमी शिट्ट्या लागून शिजावे, तर ओहोटीच्या वेळेस वेळ लागू शकतो.

८) याच तत्वाने जास्तीत जास्त शक्ती ग्रहण करायची क्षमता असलेले देवी देवता अष्टमी, वा पौर्णिमेस अवतार घेतात. ऊदाहरणार्थ -- चैत्र पौर्णिमेस हनुमान, श्रावण पौर्णिमेस बलराम, अष्टमीस कृष्ण वा देवी, आश्विन पौर्णिमेस शिववक्ती भ्रमण, मार्गशीर्ष पौर्णिमेस दत्तात्रेय ईत्यादी.

---त्यामुळे पोस्ट मधली 'तळण तळणे व भरती ओहोटी' ही माहिती अतिशय परिपूर्ण व शास्त्रीय असून त्यात भयानक, खोटे, हिंदू धार्मिक, अंधश्रद्धा वगैरे काही नाही, हे लक्षात ठेवा.

हिंदू धर्माची चाल/रीत आहे सांगितलं, की मात्र हिंदू धर्मावर जुनाट व अंध म्हणून टीका करतात. +११११११
बरोबर सुपर्णा जी. सतत हिंदू धर्मातील प्रथांवर हीन, खालच्या पातळीवर लिहिणे हे सुरूच असते. पण मुर्खांना टाळून पुढे गेलेच पाहिजे.
माझं सांगायचं तर मी हनुमान मंदीरात नारळ, तेल अर्पण करतो पण मी इतर धर्मीय चर्च मध्ये जातात, का पिराला चादर अर्पण करतात याकडे लक्ष देत नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मी आपली श्रद्धा व दुसऱ्या ची अंधश्रद्धा असा भेदभाव करत नाही.
पण काही लोक हिंदूंच्या श्रध्देला अंधश्रद्धा व इतरांच्या श्रध्देला विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेली श्रद्धा मानतात.

अमावास्येला तळणीला जास्त तेल लागते, पौर्णिमेला कमी तेल लागते>>>>> गटारी अमावस्येला वडे तळेन. तेव्हा नोंद करेन. मग पुन्हा राखीपोर्णिमेला कायबाय तळेन. बघायला पाहिजे.

इश्श, त्यासाठी पौर्णिमेची वाट नको काही बघायला,
हातच्या कंकणाला आरसा कशाला?
भरती ओहोटी रोज येत असते,
आणि वडे तळाल ,ते 8 10 तळून काही कळणार नाही मोठ्या प्रमाणावर केलेत तर फरक जाणवेल.

माझे ही तेच झालेलं रोजच्या किडुक मिडुक तळणात लक्षात येत नाही, मोठ्या प्रमाणावर चकल्या केल्या तेव्हा अनुभव आला,
अनुभव गाठीशी होता म्हणून ते पोस्ट पटले हो... नाहीतर मी पण हे काय काहीतरी म्हणून सोडून दिले असते.
आपल्या संस्कृतीचे असेच आहे, प्रत्यय आल्याशिवाय कोणी विश्वास ठेवत नाही.

Pages