हिंदू धर्म हा किती प्राचीन आहे याविषयी जाणकारांमध्ये बरेच मतभेद आहेत. हिंदू म्हणजेच "आर्य सनातन वैदिक संस्कृतीच्या" ऋषींचे मत मानायचे तर प्रत्येक १५००० ते २०००० वर्षांनंतर येणाऱ्या प्रलयानंतर मानव हळू हळू पुन्हा एकदा मानव बनू लागतो... ऋषी त्यांच्या स्मृतीतून, त्यांच्या अंतरचक्षुनच्या समोर या साऱ्या सृष्टीचे, तिच्या जडण घडणीचे जे ज्ञान ऋतम्भरा प्रद्नेने दिसते ते मांडतात. म्हणून ते स्वत:ला या वेदांचे निर्माते म्हणवून घेत नाहीत तर "उद्गाते" म्हणवून घेतात. या वेदांची रचना त्यांनी स्वत: केलेली नसते तर ती कवीला ज्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे कविता सुचतात, त्याप्रमाणे ते करतात...पृथ्वीवर प्रथमत: ज्या सात ऋषींनी मानवाला आणले ते सप्तर्षी जे आहेत त्यांच्या नावाबद्दल मतभेद आहेत......यांनी लाखो वर्षांपूर्वी मानवाला पृथ्वीवर आणले....यांची कुले पुढे चालत राहिली....उगम आपण विसरलो...म्हणूनच म्हणतात की ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ शोधू नये....सापडणार नाही... आणि आपल्या आजच्या माहितीत आज पर्यंत ७ महायुगे झालेली असून या प्रत्येक महायुगात सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग या चार युगांचे चक्र पूर्ण होत होत सात माहायुगात प्रत्येकी ही चार युगे म्हणून सात चोक अठ्ठावीस म्हणून अठ्ठावीस युगे विटेवर उभा असे विठ्ठलाला म्हंटले जाते.
आता ही ७१ चतुर्युगे एका मन्वंतरात असतात. म्हणजेच मनु बदल...म्हणजेच एक मनु अर्थात त्या मनु म्हणजे मानवाच्या कालाचा राजा अथवा अधिपती, हा वेगवेगळा असतो. आत्तापर्यंत ७ मनु म्हणजेच ७ मन्वंतरे झालेली असून सध्याचा "वैवस्वत" हा मनु आहे. अजून ७ मन्वंतरे होणार आहेत. म्हणजेच वैदिकांची {म्हणजे फक्त ब्राह्मण नव्हे] अर्थात ऋषींची कालगणना अथवा संख्यांची गणना ही अणूपासून परार्धापर्यंत प्रचंड मोठी आहे. म्हणजेच हा काल किती मोठा असेल याची सर्वांनाच कल्पना आली असेल. म्हणूनच जाता जाता एक सांगावेसे वाटते सध्या २०१२ साली जग नष्ट होणार असा बागुलबुवा उभा केला आहे तो खरा नसून लाटीन अमेरिकेतील "माया" संस्कृतीचे कॅलेंडर २०१२ रोजी संपत होते. म्हणून पाश्चात्यांनी पश्चिमेच्या धार्मिक समजुतींच्या नुसार "द डे ऑफ डेस्टिनी" अथवा "कयामत का दिन" समजून त्या दिवशी जग नष्ट होऊन सर्वांना देवा समोर उभे केले जाऊन त्यांच्या पापाचा झाडा या एकाच दिवशी केला जाणार आहे असे समजून तो प्रचार चालवलेला होता. आणि वरचा हिशोब वाचला तर हे अजिबात खरे नाही हे सर्वांच्या सहज लक्षात येऊ शकते. त्यामुळे आपण निश्चिंत रहाण्यास हरकत नाही. असो...
पुढे जाण्या पूर्वी इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की फार प्राचीन काळी सध्या ज्यांना "शुद्र" अथवा दलित असे म्हंटले अथवा समजले जाते अशा समाजातील अनेक विद्वानांनी म्हणजेच ऋषींनी वेदातील अनेक ऋचा लिहिलेल्या असून एक उदाहरण द्यायचे झाले तर "दीर्घतमा" अथवा "दीर्घतमस" या एका "शुद्र ऋषींनी" वेदातील अस्यवामीय सुक्त हे अतिशय महत्वाचे सुक्त लिहिले आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आताच्या काळातील तथाकथित "जातीयता" त्यावेळेस अजिबात नव्हती...या सर्व ऋषींना अतिशय मान दिला जात असे. सूर्या सावित्री, गार्गी, मैत्र्येयी, इंद्राणी, लोपामुद्रा, अनुसया, अरुंधती अशा अनेक विद्वान स्त्रियांचे देखील योगदान वेद काळात मोठे आहे. त्यांना पडद्यात अथवा चूल मूळ सांभाळत कोंडून ठेवले जात नव्हते. यातील मैत्रेयी या ब्रह्मवादिनीने वेदातील १० ऋचा लिहिल्या आहेत. सीतामाईने स्वयंवर पद्धतीने तर आणि द्रौपदीने पण लावून आपापले वर अर्थात पती निवडलेले होते. त्यामुळे वैदिक अथवा हिंदू धर्मात स्त्रियांचा सतत छळ झाला आहे हा प्रचार खोटा आहे. हा...मधल्या म्हणजे गेल्या २००० ते २५०० वर्षांत काही घटना झाल्या असतील... पण त्यामुळे सगळ्या हिंदू संस्कृतीला दोष देणे चुकीचे आहे.
तर, हिंदू धर्माला "हिंदू" हे नाव साधारण २५०० ते ३००० वर्षांपूर्वी पडले आहे. ज्यावेळेस वैदिक संस्कृती आणि असुर, दानव आणि दैत्य संस्कृती यांच्यातील भेद वाढत गेला, त्यावेळेस इराणात आदरणीय "अहुर्मझ्द" या असुर राजाने वेगळ्या राज्याची स्थापना केली. हे लोक "स" चा उच्चार "ह" करत असल्याने "असुरमझद" चा उच्चार "आहुर माझ्द" असा केला गेला भारतातील "सरस्वती" नदीचा उच्चार "हर हवैती" असा तर "सिंधू स्थान" चा उच्चार "हिंदुस्थान" असा केला गेला. सिंधू नदी अथवा सिंधू समुद्रापलीकडील लोकांना हे लोक "सिंधू" म्हणजेच "हिंदू" म्हणत असत. कश्यप ऋषींना १३ पत्न्या होत्या. पैकी "दिती"ची मुले म्हणजे "दैत्य", "अदितीची" मुले म्हणजे "आदित्य" म्हणजेच "देव" आणि "दन्यू" या पत्नीची मुले म्हणजे "दानव" होत. हे म्हणजे राक्षस नसून देवाकडे कमी लक्ष पण उपभोगांकडे जास्त लक्ष अशी संस्कृती असलेले लोक होत. म्हणून अंतरातील देव शोधून मुक्ती मिळवायची अशी जाणीव ठेवणार्या आर्यांची स्वत:च्या रक्षणासाठी यांच्याशी नाइलाजाने युद्धे होत असत. राक्षस म्हणजे सुद्धा २-४ शिंगे असलेले, अतिशय क्रूर असे काही नसून फक्त स्वत:चे क्षेत्र, आणि स्वार्थ यांचे रक्षण करणारे असा त्याचा अर्थ आहे.
जर्मनी हा देश "Danub" या नदीच्या दोन तीरांवर वसलेला असून या "दानव" या शब्दाचा हा अपभ्रंश असू शकतो. बंगाल, उत्तर भारत, पंजाबी यांचे उच्चार आठवा म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल...तसेच जर्मनीचे मूळ नाव "द्युइश Land " म्हणजे "द्विश दल" जसे की "द्विदल धान्य"...."दानुब" नदीच्या दोन तीरांवर वसलेले असल्याने "द्विश दल" जसे की "इंग्लंड म्हणजे "आंग्ल दल"......
"धर्म" म्हणजे ....."धारयति इति धर्म" म्हणजे जो संस्कृतीचे धारण करतो आणि मानवाला जगण्यास आवश्यक असे नैतिक, सामाजिक, बौद्धिक, आर्थिक, मानसिक, भावनिक "आणि" "अध्यात्मिक" असे वातावरण तयार करतो तो धर्म ... आणि याच साठी धर्माची आवश्यकता...अन्यथा माणूस हा एक " सर्व प्राथमिक गरजा असलेला बुभुक्षित प्राणीच" आहे. त्याला धर्म "धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष" या सुसंस्कृत चौकटीत बद्ध करतो. नाहीतर दिवसा ढवळ्या बायका पळवल्या गेल्या असत्या...हे एक उदाहरण झाले.... आर्यांनी कोणत्याही एकाच देवतेची पूजा म्हणजे धर्म असे समजले नाही. आर्य धर्मात वहाणे हा पाण्याचा धर्म, पितृ धर्म, मातृधर्म, पुत्र धर्म हे धर्म सांगितले आहेत. ज्याला पाश्चात्य लोक धर्म म्हणतात त्याला आर्य "मोक्ष" कल्पना म्हणतात.
असो...आता हिंदू धर्माच्या मूळ नावाकडे वळू...
हिंदू धर्माचे मूळ नाव आहे "आर्य सनातन वैदिक संस्कृती"...
१] आर्य- अर म्हणजे चिरणे, फाडणे ...संकटांना अडचणींना चिरत पुढे जाणारे....प्रगती करणारे....फक्त गोरे दिसणारे, निळ्या घार्या डोळ्याचे लोक म्हणजे आर्य हा समज खोटा आहे. राम आणि कृष्ण हे काळे सावळे होते हे सर्वांनाच माहित आहे. आर्य असणे ही एक उच्च मानसिक, बौद्धिक, भावनिक, वैद्न्यानिक आणि अध्यात्मिक अवस्था आहे. कोणता वंश नव्हे...
२] सनातन- स: नूतन:....नित्य नूतन असणारा किंवा असणारे....हिंदू धर्म हा नित्य नवा आहे...खुळचट जुन्या समजुतींना कवटाळून बसणारा नव्हे...किंवा "सनातन" याचा अर्थ भस्माचे पट्टे ओढून जपाच्या माळा ओढत बसणे, लांब हो लांब हो ....शिवू नको असे म्हणणे मुळीच नव्हे हे पक्के लक्षात घेणे आवश्यक आहे. जसा कालचा सागर कालच्या प्रियकर प्रेयसीन्साठी आणि आजच्याही जोडप्यांसाठी "नवाच" असतो तसा काला प्रमाणे बदलणारा हिंदू धर्म हा "सनातन" म्हणजे सतत नवाच असतो....
३] वैदिक- "विद" या संस्कृत धातूचा अर्थ आहे " आतून, हृदयातून" जाणणे .....म्हणजे कसे? तर ...जर का मी तुम्हाला तासभर "आंबा" विषयावर व्याख्यान दिले तरी तुम्हाला आंबा पाहिला नसेल तर अंबा म्हणजे काय ते यथार्थपणे कळणार नाही. पण ज्या वेळेस तुम्ही आंबा कापून जिभेवर टाकणार त्यावेळेस तुम्हाला कळणार की आंबा काय चीज आहे ते....हे जे आतून कळणे आहे त्याला "विद" म्हंटले आहे. याच "विद" धातू पासून वेद हा शब्द बनला आहे. हेच वैदिक जे दक्षिणेत रहात होते त्यांनी स्वत:ला "द्रु विद" म्हणजे कोणतीही गोष्ट "द्रुत गतीने" "जाणणारे" ही पदवी लावून घेतली. याचाच अपभ्रंश होऊन "द्रविड" झाले. आजही जुन्या इंग्लिश डिक्शनरी मध्ये "Druid " हा शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे "जुने जाणते लोक"... द्रविड या शब्दाचे पुढील रूपांतरण आणि त्याचे संदर्भ हे वादाला तोंड फोडतील असे असतील असे मला वाटते आहे...त्यामुळे ज्यांना जिज्ञासा असेल त्यांना मी वैयक्तिक चर्चेत सांगू शकेन....
४] संस्कृती- प्रकृती ही मूळ आहे. प्रकृती म्हणजे जे जसे आहे तसे....कोणत्याही गोष्टीचे मूळ रूप, निसर्ग अथवा सृष्टी....त्यात बदल केला अथवा झाला की त्याला संस्कृती किंवा विकृती म्हंटले जाते. चांगला बदल- संस्कृती आणि वाईट बदल- विकृती. नुसते पाणी ही प्रकृती, गटार ही विकृती आणि तीर्थ ही संस्कृती...
तसेच माझ्याजवळ समजा २ पोळ्या आहेत आणि दुसऱ्याकडेही २ पोळ्या आहेत, तर प्रत्येकाने आपापल्या पोळ्या खाणे ही प्रकृती, दुसरयाच्या हिसकावून घेणे ही विकृती आणि आपल्याही पोळ्या त्याच्या गरजेनुसार दुसऱ्याला देणे ही संस्कृती....आणि नेमकी हीच संस्कृती दैत्य, दानव आणि असुरांकडे नव्हती....
हाच आपला धर्म. हीच आपली संस्कृती. हीच आपली ओळख मित्रांनो.
असा हा आपल्या या आर्यभूमी मधील [ जम्बूद्वीप, , भारतवर्ष अशी आपल्या देशाची प्राचीन नावे आहेत. ] वैदिक धर्माचा थोडासा परिचय. अजून खूप काही लिहायचे आहे. जस जसे शक्य होईल तस तसे विषय मांडत जाईन. लोकमान्य टिळक ज्यांना “मोक्ष मुलर” म्हणत असत असे “Max Muller” नावाचे जर्मनीचे एक विद्वान ज्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि वेदांची महती जगापुढे मांडली. पण त्यांनी हे करत असताना वेदांचा काळ, आर्यांचे उगमस्थान या बाबत बरीच गल्लत केलेली आहे. आणि आपल्या कडील काही संघटना नेमक्या याच गोष्टींचा गैरफायदा घेऊन आर्य-द्रविड-दस्यू असा संघर्ष पेटवू पहात आहेत. पण आर्यच अधिक प्रगत होऊन द्रविड झालेले आहेत हे तुमच्या आता लक्षात आलेले असेलच. हज्जारो ग्रंथ काळाच्या ओघात नष्ट झालेले आहेत. आपल्याला आपण काल कोणती भाजी खाल्ली आहे हे आठवत नाही. मग हज्जारो-लाखो वर्षांच्या पूर्वी घडून गेलेले सांगता येणे अवघडच आहे ना? आर्य हे भारताच्या बाहेरून आलेले नसून ते भारतातीलच आहेत. साधारण १०,००० वर्षांनी पृथ्वीचा ध्रुव बदलतो. आत्ता पोलारीस हा ध्रुव आहे. त्यामुळे शक्यता अशी आहे की भारताची आत्ताची जी पोझिशन आहे, जी जागा आहे ती कदाचित वेगळ्या ठिकाणी असू शकेल. पण हा अवघड विषय आहे. त्यावर काही बोलणे आणि तेही अधिकारवाणीने हे शक्य नाही. असो.
वर म्हंटल्याप्रमाणे सप्तर्षींची अधिक माहिती, मानवाचे पृथ्वीवर आगमन, दत्त गुरु म्हणजे कोण आणि कुठून आले याबद्दल जाणून घेऊ या ....सध्या ऋषी संस्कृतीला वंदन करून इथेच थांबतो....
!! इति लेखन सीमा !!
साभार -Dr हेमंत सहस्रबुद्धे उर्फ कलादास......
महाभारत असेल किंवा रामायण
महाभारत असेल किंवा रामायण ह्यातील मागचे पुढचे सर्व प्रसंग कडे दुर्लक्ष करायचे आणि हवे ते घेवून टीका करायची ही पद्धत बंद करा
Medical,science,
Medical,science,
गणित,ह्या वर भाष्य करणारे साहित्य फक्त आणि फक्त हिंदू संस्कृती मध्येच उपलब्ध आहे.
जगातील बाकी कोणताच धर्मात ह्या वर लिखाण नाही आणि हेच खरे दुखणे आहे
हिंदू धर्माविषयी बोलायचं तर
हिंदू धर्माविषयी बोलायचं तर साधारण दोन वर्षांपासून धर्मात काय त्रुटी आढळून आल्या व त्यावरचे उपाय शोधून मानवतावादी, शांती,प्रेम देणारा धर्म बनवला पाहिजे. अजून काही ठिकाणी अस्पृश्यता पाळली जाते काय हे शोधून प्रबोधन केले पाहिजे. जेणेकरून हिंदू धर्म वर्तमानातील सर्वात सोपा, समाजाभिमुख होईल व इतर धर्मीय लोकांना हिंदू धर्म स्विकारावा वाटेल. यासाठी दोन तीन पाच हजार वर्षांपूर्वी धर्म कसा होता हे शोधण्याची गरज नाही.
आज हिंदू धर्म सोडला तर इतर धर्मांना आपली सदस्य संख्या वाढविण्याची हाव आहे. त्यासाठी वेगवेगळी अमिषं दाखवतात. धर्म बदलला तरी मनुष्य अन्नच खातो, प्राणवायू वरच जगतो. धर्म बदलून जर तो उन्नत, सज्जन, साधू बनत असेल तर अवश्य धर्म बदलावा. ही संधी/ स्वातंत्र्य प्रत्येक मनुष्याला असली पाहिजे असे मत मांडतो.
एक म्हणतो पृथ्वी सपाट आहे ,
ब्रह्मास्त्र ,पासून विमान पर्यंत .
शरीर शास्त्र पासून उपचार पर्यंत .
तरी विचार करू शकतो .
आणि कामशास्त्र वर ग्रंध पण लिहू शकतो आणि शिल्प सुद्धा उभारू शकतो.
आणि हे फक्त आणि फक्त हिंदू धर्मात च घडल आहे
हिंदू धर्म इतर धर्मांपेक्षा
हिंदू धर्म इतर धर्मांपेक्षा श्रेष्ठ कसा आहे हे पांडुरंग शास्त्री आठवले यांचे लिखाण वाचले तर डोळे उघडतात. इतकं छान समजावलं आहे की मी नतमस्तक होतो.
तुम्हालग हिंदू धर्मात सुधारणा
"तुम्हाला हिंदू धर्मात सुधारणा करायला आमची परवानगी आहे," हे सांगायला त्यांच्याकडे मारेकरी पाठवले होते. ही झाली साधारण सव्वाशे वर्षांपूर्वीची गोष्ट.
दाभोलकर , त्यांची संघटना हिंदू धर्माविरोधात काम करतात, असं दुसऱ्या एका धाग्यावर वाचलं. त्यांना धडा शिकवला गेला ही गेल्या पाच सहा वर्षांतली गोष्ट.
भरत भाई मारेकरी पाठवणारे जसे
भरत भाई मारेकरी पाठवणारे जसे होते तसे मदत करणारे देखील होते. दाभोलकर केवळ हिंदू धर्माच्या सुधारणेमागे होते हे काही लोकांना आवडत नव्हतं. यामुळे जागतिक पातळीवर हिंदू धर्म अंधश्रद्धेने भरलेला होता हा संदेश जात होता. त्यामुळे ते बाह्य शक्तीचे हस्तक असल्याची भावना काही कट्टर लोकांची झाली व त्यांची हत्या करण्यात आली. हत्या करण्यापेक्षा सौम्य मार्ग जसं न्यायालयांचा उपयोग करून घेता आला असता. पण...
इथं दाभोळकर आग्रही असलेल्या
इथं दाभोळकर आग्रही असलेल्या जादूटोणाविरोधी कायद्याविषयी जास्त कुणी लिहू शकेल काय?
खि खि खि......
खि खि खि......
एकाही आक्षेपाला उत्तर न देता 2 डझन+ पोस्टी कशा पाडाव्यात हे तुम्हा दोघांकडून शिकावे
रोते रोते हसना... हसते हसते
रोते रोते हसना... हसते हसते रोना...
Medical,science,
Medical,science,
गणित,ह्या वर भाष्य करणारे साहित्य फक्त आणि फक्त हिंदू संस्कृती मध्येच उपलब्ध आहे.
जगातील बाकी कोणताच धर्मात ह्या वर लिखाण नाही आणि हेच खरे दुखणे आहे >> आं ? हे कशावरुन ? किती संस्कृतींची, धर्मांची ऐतिहासिक माहिती काढली आहे असे विधान करण्यापूर्वी ?
इंका संस्कृतीत, ग्रीक आणि रोमन संस्कृतीत, इजिप्शियन संस्कृतीत खगोल शास्त्र , गणित, स्थापत्य शास्त्र, शरीर विज्ञान, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र यांचा केवढा अभ्यास आहे . व्हॉट्सॅपशिवाय अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. शोधायची इच्छा आणि चिकाटी हवी
( मूळ लेखात आणि टवणे सर व हीरा यांच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे या सर्व संस्कृती सुद्धा एकेकाळी ' हिंदू' सनातन , आर्य वगैरे होत्या असे मानले तर मात्र तुमचे विधान एकदम बरोबर )
अहो ते इन्का हिंदू धर्मीयच
.
शिकवणी वर्ग लावायचेत का कुणास
शिकवणी वर्ग लावायचेत का कुणास?
कृपया खालील लोकांना नम्र
कृपया खालील लोकांना नम्र विनंती. हेमावैम आहे. हलकेच घेणे.
माबोवर बरेच लेख वाचून भरत, सिम्बा, black cat, अलिकडचा चिवट, टवणे सर, अजून एक जास्त उडणारा आयडी ( ज्याचा आधीचा आयडी उडाल्यानंतर मा सं ढळले आहे) यांच्या मनात मला हिंदू धर्माविषयी राग/ द्वेष आढळला आहे.
यांच्या मनात मला हिंदू
यांच्या मनात मला हिंदू धर्माविषयी राग/ द्वेष आढळला आहे. >> बरं मग ?
त्यांना कसं समजावं हे कळत
त्यांना कसं समजावं हे कळत नाही.
खि खि... मुद्द्यांचे खंडन
खि खि... मुद्द्यांचे खंडन करता आले नाही की पर्सनल हल्ले सुरू होतात.
मी हिंदूच आहे हो, अगदी अनपोलोजेटीक का काय म्हणतात तो हिंदू, पण "आत्ता "प्रचलीत असणाऱ्या धर्मापासून माझा हिंदुधर्म खूप वेगळा आहे, त्यामुळे 2500 वर्षांपूर्वी धर्माचे स्वरूप कसे होते या बद्दल चे लेख वाचण्या/लिहिण्या पेक्षा "सध्या धर्मात XYZ अपप्रवृत्ती शिरल्या आहेत त्या त्वरित थांबवा" अशा स्वरूपाचे आदेश म्हणा/ धर्मज्ञा म्हणा किंवा विनंती म्हणा माझ्या सर्वोच्च गुरूंनी काढले आहेत अशी बातमी वाचायला आवडेल.
एका तरी शंकराचार्यांनी स्त्री
एका तरी शंकराचार्यांनी स्त्री भ्रूण हत्या करू नका, मुलींना शिकवा, बायकामुलींना मारझोड करू नका, 18 च्या आत लग्न लावून देऊ नका, हुंडा देऊ घेऊ नका, अस्पृश्यता सोडून द्या, अशा पद्धतीने आवाहन केले आहे का हो?
माझ्या तरी वाचनात नाही आले,
हे धर्माधिकारी धर्म नासत असताना मिठाची गुळणी धरून बसलेले, आता ही सुधारणा करणार नाहीत आणि हे व्हाट्स अँप वरचे सहस्त्रबुद्धे 2500 वर्षांपूर्वीच्या हिंदू धर्माचे गोडवे गाणार, आणि मायबोली वरचे टाळकुटे ते कसे बरोबर आहे हे परत परत सांगणार.... चालबे ना!!!
प्रशासकांना वेळ नसेल तर
प्रशासकांना वेळ नसेल तर त्यांनी ज्यांना शक्य आहे त्यांच्याकडे प्रशासक म्हणून सूत्रे द्यावीत. कुणीही उठतं , कसलाही शिवराळ आयडी बनवतं आणि आपले आकलन नाही तया विषयावर जाणकारांवर वैयक्तिक हल्ले चढवतं हे आता मायबोलीवर सर्रास पहायला मिळते आहे. नेटभगव्यांचीच टोळी या प्रकारात जास्त सक्रीय आहे. यांना इग्नोर केले तरी अभद्र भाषेत शेरेबाजी चालू राहते. आणि नंतर प्रशासकांच्या विपूत तक्रारी होतात. प्रशासक मागचा पुढचा विचार न करता कारवाई करतात.
कोणताही रॅशनल आयडी जाणे ही वाईट वाटण्यासारखीच गोष्ट आहे. प्रशासकांनी जर मायबोलीची टॅगलाईन फक्त हिंदू, हिंदूंसाठीच केवळ अशी केली तर मग प्रश्नच येणार नाही.
वैयक्तिक शेरेबाजी इग्नोर करण्याला नक्कीच मर्यादा असतात. त्यातून शिवीगाळ होत असतानाही प्रशासन ढिम्म राहत असेल आणि फालतू तक्रारींवरून कुणाचा आयडी उडवत असेल तर हे गंमतशीर नक्कीच नाही.
हिंदू धर्माविषयी बोलायचं तर
हिंदू धर्माविषयी बोलायचं तर साधारण दोन वर्षांपासून धर्मात काय त्रुटी आढळून आल्या व त्यावरचे उपाय शोधून मानवतावादी, शांती,प्रेम देणारा धर्म बनवला पाहिजे. अजून काही ठिकाणी अस्पृश्यता पाळली जाते काय हे शोधून प्रबोधन केले पाहिजे. जेणेकरून हिंदू धर्म वर्तमानातील सर्वात सोपा, समाजाभिमुख होईल व इतर धर्मीय लोकांना हिंदू धर्म स्विकारावा वाटेल. यासाठी दोन तीन पाच हजार वर्षांपूर्वी धर्म कसा होता हे शोधण्याची गरज नाही.
हे मत वाचलं आहे का. पर्सनल हल्ला करायची गरज नाही. मी फक्त माझं वैयक्तिक मत मांडतो. कुणीही ते मानलं पाहिजे ही माझी बळजबरी नाही.
पहा आता.. यांना मिरची का
पहा आता.. यांना मिरची का लागावी.
यासाठी दोन तीन पाच हजार
यासाठी दोन तीन पाच हजार वर्षांपूर्वी धर्म कसा होता हे शोधण्याची गरज नाही.>>>>>>
भाऊ, हेच सांगितलेले पहिल्या प्रतिसादात,
अंधार जोशी, हनुमंत मारणे या
अंधार जोशी, हनुमंत मारणे या आयडींविषयी बोलत आहेत काय आपटे? तुमचे होते का ते राशनल आयडी?
अरे वा! इथे याद्या केल्या
अरे वा! इथे याद्या केल्या जाताहेत. माझं नाव यादीत पहिलं पाहून बरं वाटलं. पुढे काय होणार यादीचं / यादीतल्यांचं?
हलकेच घ्या अगोदरच विनंती केली
हलकेच घ्या अगोदरच विनंती केली होती.
माननीय आपण विचारांनी माझं मत
माननीय आपण विचारांनी माझं मत चुकीचे आहे हे समजावून सांगू शकता. उगाच वेमा कडे तक्रारी करण्यापेक्षा इथं बोला.
प्रशासक
प्रशासक
कल्पेशकुमार या अत्यंत विकृत इसमाला कृपया समज द्यावी. याने यापूर्वीही शशिराम अवतारात असताना भयंकर शिवीगाळ केली होती. त्यानंतर शक्तीराम, जयंती पी अशा अवतारात शिवीगाळ चालूच ठेवली. खान ९९ या अवतारात याने मला शिवीगाळ केली आहे. आणि वेमांकडे सातत्याने दोन दिवस तक्रार करून मी पाठपुरावा केल्यावर स्वतःच अंधार जोशी व अन्य एक आयडी बनवून स्वतःलाच शिवीगाळ करून जास्त हुषार असल्याचे दाखवले आहे. आपण काय कारवाई करणार ?
कल्पेशकुमार म्हणजेच योगेश जोशी का ? तसे असेल तर हा आयडी यापूर्वी मी_भास्कर या नावाने वावरलेला आहे का ?
कृपया हा आयडी सातत्याने वैयक्तिक होत असताना आपण यास अभय का देत आहात हे कळावे ही नम्र विनंती. आपणच यास छू म्हटले असेल तर सरळ माझा आयडी उडवावा ही अजून एक नम्र विनंती.
आभार.
आपलं नाव नाही घेतलं तर एवढी
आपलं नाव नाही घेतलं तर एवढी आग का लागली भाऊ. ते दोन आयडी माझे नाहीत हे वेमा तपासून बघू शकतील. मला इतर आयडींशी जोडण्याचा केविलवाणा प्रयत्न का केला जात आहे.
कृपया खालील लोकांना नम्र
कृपया खालील लोकांना नम्र विनंती. हेमावैम आहे. हलकेच घेणे.
माबोवर बरेच लेख वाचून भरत, सिम्बा, black cat, अलिकडचा चिवट, टवणे सर, अजून एक जास्त उडणारा आयडी ( ज्याचा आधीचा आयडी उडाल्यानंतर मा सं ढळले आहे) यांच्या मनात मला हिंदू धर्माविषयी राग/ द्वेष आढळला आहे.
Submitted by शशिकांत सातपुते on 19 July, 2019 - 08:34
>> माझं वैयक्तिक मत आहे हे लक्षात न घेत असल्याने मी प्रतिसाद परत घेत आहे. भरत,सिम्बा, black cat, चिवट , टवणे सर
कृपया क्षमा करा.
किरणु आयडी उडाल्यावर डोक्यावर
किरणु आयडी उडाल्यावर डोक्यावर फार परिणाम झालाय का ? अरेरे

गेट वेल सुन !!
कोणाचाही संबध कुठेबी लावून राहिलंय हे येडं
Pages