अथ श्री आषाढ़ मासारम्भ ..
आषाढ़ महीना सुरु झाला की आपण आता पावसाळा खऱ्या अर्थाने लागला असं म्हणतो. वर्षातील सगळ्यात जास्त वाट बघितला गेलेला हा ऋतु. संपूर्ण निसर्गच जणू वर्षाऋतूच्या आगमनाची तयारी करत असतो, वरुणराजा येणार आणि सगळ्यांना तृप्त करणार या जाणिवेने पुलकित झालेला असतो. धरणी आपल्या कुशीतील अत्तराच्या कुप्या परत एकदा काठोकाठ भरून ठेवते. कोकिळ महाशय आपली उन्हाळी मैफिल आवरून चातकराजासाठी आसन मोकळे करून देतात. आमराया आपली उरलीसुरली फळे सोसाट्याच्या वाऱ्याला दान देऊन टाकतात. मयूर आपला पिसारा पुन्हा पुन्हा झंकारून पाहतो. तर मुंग्याची आपल्या अंड्यांना ऊन दाखवण्याची लगबग सुरु असते. मानवाच्या आनंदाला तर पारावर राहात नाही. आणि अशातच एक दिवस पश्चिम क्षितिजावर काळोख दाटून येतो. विजांचे भालदार- चोपदार वर्दी देतात आणि जणू ढोल ताशांच्या कडकडाटात, वाऱ्यावर स्वार होऊन तो येतो.. हो.. तोच तो.. मान्सून.
त्याच्या आगमनाने साऱ्या सृष्टीवर नवसंजीवनी पसरते. हिरवेगार गालिचे अंथरल्या जातात .
हा ऋतू नवनिर्मितीचा, ऋतू हिरवाईचा, ऋतू पाचूचा, ऋतू तृप्तीचा. आपण हा निर्मितीचा सोहळा दरवर्षी साजरा करतोच करतो. पिढ्यानुपिढ्या लेखकांनी, गायकांनी, कवींनी, चित्रकारांनी एकंदरीतच कलाकारांनी आपापल्या परीने पावसाला व्यक्त केलेच आहे. कधी आपल्या कुंचल्यातून तर कधी शब्दांमधून. एक राजस्थानी लोकगीत आहे. त्यात या 'पावस'काळाचं किती सुंदर वर्णन केला आहे बघा.
सुरंगी रुत आई म्हारे देस, भलेरी रुत आई म्हारे देस
मोटी-मोटी छांटयां ओसरयां ए बदली, तो छांट घड़े के मान, मेवा मिसरी
सुरंगी रुत आई म्हारे देस।
राजस्थान म्हणजे मरूभूमी. तिथल्या रहिवाश्यांसाठी तर पाऊस म्हणजे जणू अमृत वर्षा, प्रत्यक्ष देवाचा आशीर्वाद. ते म्हणतात..
"माझ्या देशात हा 'सुरंगी' ऋतु आला आहे. माझ्या देशात हा भला ऋतु आला आहे.
अरे ढगांनों तुमच्यातला एक एक थेंब आम्हाला घडाभर दिसतोय.
अरे बघा बघा, माझ्या देशात 'मेवा- मिसरी' (प्रमाणे प्रिय असा) हा 'सुरंगी' ऋतु आला आहे.
पाऊस प्रत्येकासाठी वेगवेगळा ठेवा घेऊन येतो. छोट्यांसाठी आता वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडण्याची मौज असते आणि भोलानाथाला "शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?“ असा निरागस प्रश्नपण विचारला जातो. तरुणाईला गडकिल्ले साद घालतात. शेतकरी नव्या आशेनी पेरणी सुरु करतो. "यंदा पीकपाणी भरपूर होऊ दे" असं साकडं वर्षाराणीकडे घातलं जातं. शहरी नोकरदाराला आपल्याला वेळेत ऑफिस गाठता येईल ना” ही काळजी सतावत असते. प्रेमिकांसाठी "सावन बरसें तरसें दिल" होऊन जातं. तर कोणाला आता धुतलेले कपडे कुठे वाळवू अशी चिंता भेडसावते. जितक्या वृत्ती तितक्याच प्रवृत्ती हेच खरे.
खरंतर आपल्याकडच्या शहरी भागात पाऊस म्हटला कि 'हाल-बेहाल'. गल्लीबोळात चिखल-राडा तर मुख्य रस्ते स्वतःच नाल्यांचे रूप घेतात. पण गुलजार साहेबांची नजर मात्र वेगळेच काही बघते. त्यांची लाडकी 'बारिश' येते तेव्हा काय होते...
बारिश आती है तो मेरे शहर को कुछ हो जाता है..
टिनकि छत, तर्पाल का छज्जा, पीपल, पत्ते, पर्नाला सब बजने लगते है।
तंग गली में जाते जाते,
मेरी साइकल का पहिया पानी की कुल्लियाँ करता है।
बारिशमे कुछ लम्बे हो जाते है कद भी लोगोंके
जितने ऊपर है, उतने ही पैरो के नीचे पानी में
ऊपरवाला तैरता है तो नीचेवाला डूब के चलता है.
खुश्क था तो रस्ते में टिक टिक छतरी टेंक के चलते थे
बारिशमें आकाश पे छतरी तक के टप टप चलते है..
सगळ्यां निसर्ग प्रेमींना नविन भागाच्या खुप खुप शुभेच्छा
वरील मनोगत निसर्गप्रेमी मनिम्याऊ (मृण्मयी) ने लिहिले आहे.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962
(भाग २९) http://www.maayboli.com/node/57203 (भाग ३०) http://www.maayboli.com/node/58808
(भाग ३१) http://www.maayboli.com/node/60825 (भाग ३२) https://www.maayboli.com/node/63032
शाली, अप्रतिम फोटो आहेत
शाली, अप्रतिम फोटो आहेत बाजरीचे!
विक्रमसिंह, भारीच की! घर अगदी दरवळून गेलं असेल.
विक्रमसिंह.. Lucky you..
विक्रमसिंह.. Lucky you.. एकाच दिवसात ब्रह्म आणि क्रृष्ण कमळ.. घर सुगंधित झाले असेल
<<त्यांच्या पोळ्याच्या एकदम
<<त्यांच्या पोळ्याच्या एकदम जवळ नका जाऊ. बाकी अशा काही करत नाही त्या. आमच्याकडे पण लागत असतात. सध्या जामच्या झाडावर आहे.
Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 July, 2019>>
धन्यवाद जागुताई
शालीदा, आमच्याकड़े विदर्भात
शालीदा, आमच्याकड़े विदर्भात बाजरी शक्यतो लावत नाहीत. पण एखाद्या शेतात असलीच तर त्याला 'भाल्यान्चे वावर' म्हणतात.
बाजरीबाय ले काई बोलोचा नाई..
भालेवाले शिपाई बाप्पा आत्ता करतेच लडाई...
(आजे सासूच्या संग्रहातले एक गाणे)
मधमाश्यांचं पोळं फार जवळ असेल
मधमाश्यांचं पोळं फार जवळ असेल तर मला खूप भिती वाटते.
आजचे सर्व फोटोपण मस्तच.
संकासुर पुन्हा बहरलाय दोन
संकासुर पुन्हा बहरलाय दोन दिवसांपासून.






.
आणि हे पावडर पफ. एक्सप्रेस वे च्या टोलनाक्यावर.
मुसळधार पावसात पावडर पफचा शेवींग ब्रश झाला होता.
आणि हे जागूताईच्या घरचे मोती. घाई होती त्यामुळे व्यवस्थित टिपता आले नाही.
शाली, मस्त फोटो ! शेविंग ब्रश
शाली, मस्त फोटो ! शेविंग ब्रश
पण बरोबर, ज्वारीची फुगीर असतात ना जरा?
ओके बाजरी आहे का ती? मी जवळून कधी पाहिली नव्हती ज्वारी किंवा बाजरीची कणसं
शाली, मस्त फोटो!
शाली, मस्त फोटो!
मुसळधार पावसात पावडर पफचे शेवींग ब्रश झाला होता.>>>
‘भाल्यांचे वावर’ मस्त शब्द
‘भाल्यांचे वावर’ मस्त शब्द आहे. तसेच दिसते शेत.
बाजरीबाय ले काई बोलोचा नाई..
भालेवाले शिपाई बाप्पा आत्ता करतेच लडाई...या ओळीही सुरेख आहेत अगदी.
शेविंग ब्रश हा जागूताईचा शब्द आहे.
आईशप्पथ ! कणसं कसली दिसतायत !
आईशप्पथ ! कणसं कसली दिसतायत ! आणि झेंडू पण सुरेख
विक्रमसिंह, भारीच की! घर अगदी दरवळून गेलं असेल.>> हो ना कित्ती lucky ना !
सगळेच फोटो अप्रतिम अगदी
भाल्यान्चे वावर>> अगदी चपखल नै !
बाजरीबाय ले काई बोलोचा नाई..
भालेवाले शिपाई बाप्पा आत्ता करतेच लडाई...>> मस्त वर्णन असणार यात .. अजून पुढचे येत असेल तर टाका ना ..
हो. घरात कमळच कमळ. मस्त वाटतय
हो. घरात कमळच कमळ. मस्त वाटतय. कृष्ण कमळ आतापर्यंत बरीच झाली. आता आज उद्या ब्रम्ह कमळ एकदम चार पाच अपेक्षित आहेत.
बाजरीचे फोटो जबरदस्त!!!
बाजरीचे फोटो जबरदस्त!!!
माझ्याकडे पण ब्रह्मकमळाला ५-६
माझ्याकडे पण ब्रह्मकमळाला ५-६ कळ्या आल्या आहेत. एक चांगली मोठी झाली आहे.
ब्रह्मकमळाचं खरं/ शास्त्रीय नाव काय आहे?
ब्रह्मकमळ हिमालयातल्या एका फुलाचं नाव आहे ना?
सगळे फोटो मस्तच.
सगळे फोटो मस्तच.
ऋतुराज त्याला जमिनीवरचे ऑर्चिड हेच नाव मला माहित आहे.
ब्रह्मकमळ हिमालयातल्या एका
ब्रह्मकमळ हिमालयातल्या एका फुलाचं नाव आहे ना?>>>> हो.पण ते ब्रह्मकमळ फार वेगळे असते.साधनाच्या एका लेखात त्याचा फोटो आहे.आपण जे ब्रह्मकमळ म्हणतो ते एक प्रकारचे कॅक्टस आहे.(मलाच,या धाग्यावर इतरत्र मिळालेली ही माहिती आहे.)
ब्रह्मकमळाचं शास्त्रीय नाव>>
ब्रह्मकमळाचं शास्त्रीय नाव>> Epiphyllum oxypetalum
देवकीताई बरोबर ते एक प्रकारचे कॅक्टस आहे पण काटे नसलेलं . याचं पान हेच याचं खोड असतं !!
ऑर्किड संपादित केलंय.
ऑर्किड संपादित केलंय.
(No subject)
कोकणातील एक सुंदर दृश्य ...
कोकणातील एक सुंदर दृश्य ...
रेन लिली
रेन लिली



2
3
Pinkle twinkle little stars
4

तो राजहंस एक
कोकण मस्तच! राजहंस सुरेख!
कोकण मस्तच!
राजहंस सुरेख!
एकसे बढकर एक फोटोज आहेत.
एकसे बढकर एक फोटोज आहेत.
कोकणही मस्तच..
राजहंस तर एकदम सुंदर!
नवे फोटो छान. रेनलिलीपेक्षा
नवे फोटो छान. रेनलिलीपेक्षा मला आपलं मराठमोळं गवतफुल हे नाव आवडतं
रेनलिलीपेक्षा मला आपलं
रेनलिलीपेक्षा मला आपलं मराठमोळं गवतफुल हे नाव आवडतं>>> +१.
सानसानुल्या गवतफुला रे,गवतफुला ही कविता आठवली.
फुलं आणि धबधबा मस्तच!
बुलबुल,फुलं आणि धबधबा मस्तच!
राजहंस कुठाय?
एका मळ्यात होती गवत फुले
एका मळ्यात होती गवत फुले सुरेख
शेवटच्या फोटोतील गुलाबी फुलांमधील पांढरे गवतफुल. तोच राजहंस.

मनिम्याऊंचे खास शिर्षक आहे ते.
उनाडटप्पु कुठला फोटो आहे हा नक्की?
शालीदा तुमचे आधी टाकलेले
शालीदा तुमचे आधी टाकलेले फोटोज बघितलेच नव्हते.बाजरीची कणसं,संकासुर,पावडर पफ आणि शेविंग ब्रश?
बुलबुलची जोडी तर.. एकदम cute च..
छान आलेत फोटोज.
ब्रम्हकमळ आणि कृष्णकमळ एकसाथ! क्या बात है! एकदम बढीया!
ओह अच्छा
ओह अच्छा
वेगळं फूल, तेही पांढरं म्हणून ' तो राजहंस एक' असं का? मस्तच!
सगळे फोटो सुंदर.
सगळे फोटो सुंदर.
कोकणातल्या फोटोत ते पाणि किती स्वच्च्छ आहे.
(No subject)
Pages