माझं काय चुकलं?

Submitted by लालू on 5 March, 2009 - 12:13

माजं काय चुकलं...?

येकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं
म्हनले आय करती तसं करशील का पिठलं?

मी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय?
बिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं

टाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं
आन मग वरुनशान डावभर त्याल घातलं

पाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी
धूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं

उकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा
चटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं

जेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला
पिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं!? Sad

असा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप
सांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं?
सांगा माजं काय चुकलं..

****************

पाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे कुठे विचारू कळत नाहीये.
माझ्याकडे प्रवीणचे कैरीचे लोणचे आहे.
त्याचे सील उघडले की काही महिन्यांनी तेल खूपच कमी होते. माझा नवरा कधीकधी त्यातले थोडे तेल घेतो त्यामुळेही कदाचित संपत असेल.
पण आता लोणचे खूपच कोरडे झाले आहे. खारसुद्धा एकदम कोरडा लागतो आहे. त्यात साधी फोडणी करून टाकली तर चांगले लागेल का?
असे विकतच्या लोणच्यात कोणी प्रयोग करुन बघितला आहे का?

धिरडी करणे सेफ वाटले म्हणून टेक केले Wink
पसवर्ड विसरल्यामुळे प्रतिक्रिया देता येत नव्हती
सगळ्यांचे खुप खुप आभार

पीनी,
लोणचे जुने झाले की वाळते.
लोणच्याच्यावर तेलाचा थर असलाच पाहिजे असे नाही. घट्ट झाकण असेल तर लोणचे कोरडे होणार नाही. अर्थात, मला वाळलेले लोणचे फार आवडते. उन्हाळ्यात / या सीझनला मी गेल्या वर्षीचे उरलेले लोणचे मुद्दाम पसरट भांड्यात काढून वाळू देतो. छान लागते.
(रच्याकने. माझ्या घरच्या कैरी लोणच्यात कधीही, थेंबभरही तेल नसते, अन हे बिना तेलाचे लोणचे वर्षभर आरामात टिकते.)

Aata hya bin telachya lonchyachi recipe dya. Kairi sodun ajun kay vaprle tar chalel te pan sanga. Lahanpani varan-bhat-lonche staple diet hote. Kityek varsh jhali lonche khaun.

धन्यवाद आ.रा.रा.
मी मागे एकदा असे कोरडे लोणचे खराब झाले असेल असे समजून टाकून दिले होते. Sad
आता हे लक्षात ठेवेन.

राजसी
मसाला पाकिटावर लिहिले तितके मीठ टाकावे. लोणचे आपोआप टिकते. कैरीचा रस निघतो तितके लिक्विड पुरते. सिम्पल. मी सैंधव मिठच वापरतो.

पिनी
पांढरे दिसते ते मिठाचे क्रिस्टल असतात. भारी टेस्टी लागतात.

मी पण कैरी चे लोणचे बिना तेलाचं बनवते. महिनाभरातच छान रसदार होते. हे लोणचे वर्ष दिड वर्ष सहज टिकते.
खायला घेताना त्यावर हिंग मोहरी ची कडकडीत फोडणी देते.
रस संपला न् फक्त खार शिल्लक राहिला तर ते थोड्या पाण्यात कालवून फोडणी देते.

पिनी,

तेल हवेच असेल तर फोडणीच्या पळीत कडकडीत गरम करुन मग नीट थंड करुन लोणच्यावर घालावे.

Thanks

मी आज कुकर मध्ये केक करायला घेतला... https://hebbarskitchen.com/cooker-cake-recipe-pressure-cooker-cake/ ही रेसिपी नुसार सगळं केलं फक्त चुकून दूध गार घेतलं ...केक 40 मिनिट मध्ये व्हायला पाहिजे होता पण आता डिड तास झालाय अजून केक झाला नाही...माझं काय चुकलं नक्की???? केक खूप फुललाय पण मध्यभागी अजून कच्चच आहे म्हणजे सुरील चिकट लागतोय मध्यभागी. काय करू अजून किती वेळ गॅस वर ठेऊ ? आणि तिथे गॅस कमी ठेवायला सांगितलं होतं मी गॅस स्लो ठेवला आहे

पालकाच्या पानांची मिक्सर मध्ये वाटून पेस्ट केल्यास थोड्या वेळाने ती कडवट होते...असा अनुभव कोणाला आला आहे का?

हो... मलाही तसेच वाटते..म्हणून मी नेहमीच पालक बारीक चिरुन घालणे प्रिफर करते....

पालक blanch करून त्याची प्युरे करता येईल.
उकळत्या पाण्यात तीसेक सेकंद ठेवून लगेच गार पाण्यातून काढायचा. मग वाटायचा.

पालक लसुणी, पालक पनीर अशा भाज्यांसाठी पालक शिजवून/ब्लांच करून तो मिक्सर मध्ये वाटून पेस्ट करून घेतल्यानंतर हा अनुभव आला आहे. एरवी पालकांची डाळ घालून शिजवून केलेली भाजी कडवट होत नाही...
पेस्ट घालून केलेली भाजी लगेच कडवट लागत नाही... साधारण अर्धा तासानंतर कडवट लागते.

मी पालक पनीर करता कायम पालक ब्लांच करुन प्युरे करते पण आजवर कधीही भाजी कडवट लागल्याचा अनुभव नाही आलेला.

मी नेहमी सायट्रिक acid ने दूध फाडून पनीर करतो. यावेळी दूध फाटून छाना वर येण्याऐवजी त्या व्हे वॉटरमध्येच मिक्स झाला होता. गाळल्यावर नेहमीइतकंच पनीर मिळाल़ पण वर वजन ठेवूनपण पावडर फॉर्मममध्येच राहिलं.
काय चुकलं असेल?

मला वाटतंय पनीर बनल्यावर पण खूप वेळ उकळलं गेलं असावं किंवा दूध खळखळा उकळण्याआधीच ऍसिड घातलं गेलं असावं(हीच शक्यता जास्त वाटतेय ) , किंवा ऍसिड कमी पडलं असावं

तापमान/ पातळ दूध प्रॉबलेम आहे.
मउ पनीरसाठी दूध उकळून, व्हे टाकायचं आणि गॅस लगेच बंद करायचा. लगेच बर्फाच्या पाण्यात टाकायचं मग गाळायचं.

कडक पनीरसाठी, दूध उकळायच, व्हे टाकायचं. गॅस लो करून एकाच दिशेने ढवळायचं आणि पाच मिनिटात गॅस बंद. अजीबात ज्यास्त उकळवत नाही रहायचं.
(इती बंगाली साबा)

लगेच बर्फाच्या पाण्यात टाकायचं मग गाळायचं>> हो, असं पनीर रसमलाई करताना लागतं मऊ मऊ लुसलुशीत

लगेच बर्फाच्या पाण्यात टाकायचं मग गाळायचं. >>> म्हणजे ते फाडलेले दूध गार पाण्यात टाकायचं आणि मग गाळायचं? की आधी एकदा गाळून तो छाना बर्फाच्या पाण्यात टाकायचा व परत गाळायचं?

मउ पनीरः गार बर्फ टाकलेलं थोडॅसेच पाणी पण बर्फ ज्यास्त असे आधी तयार ठेवायचं.
गॅस बंद केला की ते सर्व फाटके दूध हे ह्या पाण्यात टाकायचं . त्याने अजुन शिजत नाही व प्रोटीन चिवट होत नाही.?मग धवळून सुती कपडा चाळणीत ठेवून गाळायचं. जर वास नसेल गेला तर परत बर्फाच्यस पाण्यात टाकून चोळून स्वच्छ फडाक्याने गाळयचं. चाळणी नळखस्ली धरु नका. पातळ पनीर वाहून जाईल
मस्त नरम पनीर रसगुल्ल्य्यासाठी तयार.

मलख पालकपनीरसाठी हवं होतं. याआधी असंख्यवेळा केलं तेव्हा काहीच चुकलं नव्हतं. दुधाला हलकी उकळी फुटल्यावर acid घालून नीट होतं माझं.
वर छान्याचे गोळे जमताहेत वाटेतो तो पुन्हा दुधात मिक्स झालं., प्रत्येक वेळी व्हे कुठून आणणार? आम्ही ते पाणी कणीक बांधायला वापरून टाकतो.

प्रत्येक वेळी व्हे कुठून आणणार?>> साध्या लिंबाच्या रसाने फाटतच ना ?! मला एक लिटर साठी अर्ध्या लिंबाचा रस पुरतो ... अर्थात दुधा- दुधात फरक असतो ,पण साधारण अर्धा लिंबाचा (आणि वर अजून थोडा )रस पुरायला हरकत नाही

Pages