Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18
नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा
या खेळूया मराठी बिग बॉस २!!!!
धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

तो परत येतोय!
( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला वाटतं नाटकात कामं करतो तो
विक्रम पहिल्यापासून हवा होता.+11 सध्या तो काय करतो.. >>> मला वाटतं नाटकात कामं करतो तो. मध्ये कोडमंत्र खूप गाजलेलं आणि मोलकरीणबाई सिरीयल मध्ये भार्गवीचा नवरा आहे बहुतेक, प्रोमोज बघितलेले. सिरीयल नाही बघत.
मेघा नेहापेक्षा जास्त उत्तम
मेघा नेहापेक्षा जास्त उत्तम होती. ती ऑलराऊंडर होती. स्मिता आणि तिचे पाठीमागे एकमेकींशी खूप पटायचं. झुंज मराठमोळी मध्ये जाम भांडखोर होती मेघा आणि नव्हती आवडली पण bb मध्ये सुरुवातीला न आवडून नंतर आवडायला लागली होती.
नेहाने एकटीने खेळावं की, वीणा नाही का म्हणत मी एकटी खेळेन. ही कशाला परागच्या पाठीमागे. आता वीणा पराग खरंच भांडण की नाटक ते कळेल.
नेहा टीम मेटना कोणालाच आवडत नाहीये म्हणजे तिचे कुठेतरी चुकतेय गेम व्यतिरिक्त, तो तिने स्वत: मध्ये बदल करायला हवाय.
>>पण ती कुणाला फारशी आवडत
>>पण ती कुणाला फारशी आवडत नसल्यामुळे तिला लॉयल फ्रेन्ड्स नाहीत कुणी. तिथेच ती मार खाणार कायम.
>>नेहा टीम मेटना कोणालाच आवडत नाहीये म्हणजे तिचे कुठेतरी चुकतेय
#शायरी मोड ऑन
वो दुश्मनी से देखते हैं देखते तो हैं
मैं शाद हूँ कि हूँ तो किसी की निगाह में
-अमीर मिनाई
#शायरी मोड ऑफ
मागच्या वेळी पण मेघा ही आऊ
मागच्या वेळी पण मेघा ही आऊ सई सोडले तर कुणाला आवडत नव्हती पुष्कर ला सुध्दा तो ही नंतर मेघाला पाठिमागे नावे ठेवायचा . मेघ फार बडबड करते आणी सारखे स्वतः बद्दल सांगत बसते असे बाकी सर्वांचे म्हणणे होते . अर्थात मेघा आणी नेहा मध्ये काही तुलना होऊ शकत नाही. नेहाचा बोलतना आवाज खुप मोठा होतो आणी तिला काही विचारले तर ती खुप explanation देत बसते ते आवडत नाही बहुतेक बाकिच्याना . मागे बाप्पा सांगत होता नेहा भरपुर काम करते पण बोलून सगळे घालवते
मोलकरीणबाई सिरीयल मध्ये
मोलकरीणबाई सिरीयल मध्ये भार्गवीचा नवरा आहे > > हो मी ही प्रोमो मध्ये पहिले होते भर्गवी त्याला वेडीओ कॉल करते त्याचे ही एक्स्ट्रा मरितल अफेयर आहे वाटत त्या सेरियल मध्ये
कालच्या एपिसोडमध्ये मला
कालच्या एपिसोडमध्ये मला परागचे एकच आवडले.... सुपु जेंव्हा नेहाला भाजी बनवण्यावरुन बोलल्या आणि ती वॉशरुममध्ये येउन रडत बसली होती तेंव्हा पराग तिला एव्हढेच म्हणाला की....काळजी करु नकोस, माझ्याबरोबर पण होते/झालेय असे!
(रेफरन्स: नेहा आणि पराग चे पोहे प्रकरण)
दिवसेंदिवस पराग अगम्य आणि
दिवसेंदिवस पराग अगम्य आणि हेकेखोर होत चालला आहे. ग्रुप यशस्वी करण्यामागे मूळात टिम प्लेयर असणं आवश्यक असतं हे त्याला (मांजरेकरांनी) सांगण्याची वेळ आलेली आहे...
मला तर वाटतय “धोबी‘ टास्क बिग
मला तर वाटतय “धोबी‘ टास्क बिग बॉसने फक्त एवढ्यासाठीच दिलय, परागला आणि ऑडीयन्सला दाखवायला ‘धोबी का कुत्ता न घरका ना घाटका‘
शाकाल दमला की हो....
शाकाल दमला की हो....
लोकहो,जर ममांं बिचुकलेना काही
लोकहो,जर ममांं बिचुकलेना काही बोलले नाहीत तर ममांना बिचुकले आणि हिनाला लीड मध्ये घेऊन एक लव्हस्टोरी असलेला सिनेमा काढावा लागेल ही शिक्षा.....
>>कदाचित कामगारांनाच अशी
>>कदाचित कामगारांनाच अशी युक्ती करण्याची मुभा असेल मॅनेजरला नसेल .
मग असे जर असेल तर मॅनेजर झाला कशाला? कामगार राहूनच करायचे ना जे काय करायचे ते! >> बिग बॉस ने नेहाला न बोलावता त्याला बोलावले म्हणून त्याला वाटले बिग बॉस ने त्यालाच मॅनेजर पद दिले नाहीतर मला कशाला बोलावतील . गैरसमजूत होत नाही का कोणाची ? नंतर लक्षात आल्यावर त्याने बॅच नेहाला परत दिला आणि कपडे आणायला आत गेला . त्याची गैरसमजूत झाली म्हणून मॅनेजर झाला . गैरसमजूत दूर झाल्यावर कामगार झाला . त्यात एवढ काय ? झालाच कशाला आणि यावं नि त्याव करत बसण्याचे काहीच कारण नाही . गैरसमजुती होत नाही का कोणाच्या ?
मला तर वाटतय “धोबी‘ टास्क बिग
मला तर वाटतय “धोबी‘ टास्क बिग बॉसने फक्त एवढ्यासाठीच दिलय, परागला आणि ऑडीयन्सला दाखवायला ‘धोबी का कुत्ता न घरका ना घाटका‘ Proud>>>झालं काय? परत तोंडावर पडला का पराग?
बिग बॉसच्या इच्छेप्रमाणे फुल
बिग बॉसच्या इच्छेप्रमाणे फुल टू राडा झाला शेवटी. उद्याही होणार.
वीणा खरं म्हणजे स्मार्ट गेम खेळली आहे.
शिव मला आवडला, जबरी टशन देतो दोन अतिशहाण्यांना पराग आणि नेहाला. पण मी नीट बघू शकले नाही, त्याचं काही चुकलं का तर तो सॉफ्ट टारगेट होणार. बाकीच्यांनी मोठ्या मोठ्या चुका केल्या तरी माफ.
अ बि कडे आता बघवत नाही आणि ती
अ बि कडे आता बघवत नाही आणि ती हीना पण काय. ह्याबाबतीत शिवानी योग्य stand घ्यायची. अ बि च्या घरचे आता बघत नाहीत का, मुलांची आठवण येत नाही का. किळस वाटते बघायला, तिच्या मागे मागे सतत.
शिव मस्त खेळतोय. आणि ते
शिव मस्त खेळतोय. आणि ते सुद्धा हसत हसत . आवडतो मला . पराग आणि नेहा ला उचकवायचं काम पर्फेकट करतो. दोन तीन आठवड्यात तो पराग आणि नेहा ला भारी पडणार आहे . फक्त मांजरेकरांनी उगीचच त्याला बोलायला नको . वीणाला सुद्धा त्याच्या पासून भीती वाटायला लागेल इतका छान खेळतोय . बाकी बिचकुले काही कामाचे नाहीत फुकट त्या हीनाला सारखी पाठ चेपायला लावतात. तिथे पण शिवने हिना ला बाजूला करून मजा आणली
आणि सुरेख ताई नुसत्याच बसून असतात. आणि इकडच्या गोष्टी तिकडे सांगतात. वैशाली पार्शालिटी करणार ते आधीपासूनच माहिती होत .
तिथे पण शिवने हिना ला बाजूला
तिथे पण शिवने हिना ला बाजूला करून मजा आणली >>>
हो हो.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=W4_XZfqLTrQ
बापरे कालचा तो अतिशय घाण
बापरे कालचा तो अतिशय घाण प्रकार एकला नुसता. किती घाण शिव्या देतो तो बिचुकले. अतिशय गलिच्छ विचारांचा माणसाला बघणे पण त्रासदायकच आहे.
शी, भयानक निगेटीविटी घेवून वावरणारे लोक आणि जेवणावरून भांडणारे लोक, जेवताना भांडणारे लोक बघुन किळस वाटतो. आणि काय ती प्रत्येकाची मानसिकता खेळ जिंकण्यासाठी.
(मैत्रीणीची माझ्हा घरी असेपरयंत हा गोंधळ आणि चर्चा मला तिच्याकडून एकावी लागते.. बोलले मी तिला , बाई काय मजा आहे बघण्यात. पण असतो एकीकीचा चॉईस.. )
>>गैरसमजूत होत नाही का कोणाची
>>गैरसमजूत होत नाही का कोणाची ? नंतर लक्षात आल्यावर त्याने बॅच नेहाला परत दिला आणि कपडे आणायला आत गेला . त्याची गैरसमजूत झाली म्हणून मॅनेजर झाला . गैरसमजूत दूर झाल्यावर कामगार झाला . त्यात एवढ काय ? झालाच कशाला आणि यावं नि त्याव करत बसण्याचे काहीच कारण नाही . गैरसमजुती होत नाही का कोणाच्या ?
रिअली? आय मीन सिरीअसली?
तुम्हाला खरच अस वाटतय की ती फक्त गैरसमजूत होती?
मला वाटतय की त्याने मौके पे चौका मारण्याचा प्रयत्न केला.... त्याचे नेहमीचे पंटर लोक त्याच्या टीममध्ये असते तर तो चालून ही गेला असता..... पण इधर तो नेहा खडी है!
बाकी एका प्रतिसादात तुम्ही म्हणता की बिग बॉसची हिंट परागने बरोबर ओळखली आणि तो मॅनेजर झाला नंतर म्हणता की परागची गैरसमजूत झाली.... मग नक्की पराग शार्प आहे की कंफ्यूज आहे?
येडपट आहे तो पराग. असले
येडपट आहे तो पराग. असले नेक्स्ट राउंड चे डील कशाला केले? ( की मुद्दाम त्यांना जिंकवतोय! पण दॅट डझ नॉट मेक सेन्स) तरी एकदा बाप्पाने फटका दिला होता त्यांना. वीणा मूर्ख असती तरच तिने प्रॉमिस ठेवले असते ते. पण ती स्मार्ट आहे. बरोबर डोकं चालवलं तिने.
साम दाम वगैरे दंगा बघून हसूच आलं मला. मग काय तर मेल्ट डाउन च झाला त्या पराग चा. काहीही .
हा टास्क शिव, वीणा ची टीम चांगलीच वरचढ ठरली आहे.
बिचुकले आणि हिनाचे आचरट चाळे बघायचा कंटाळा येतोय. बास करा म्हणावे.
बाकी एका प्रतिसादात तुम्ही
बाकी एका प्रतिसादात तुम्ही म्हणता की बिग बॉसची हिंट परागने बरोबर ओळखली आणि तो मॅनेजर झाला नंतर म्हणता की परागची गैरसमजूत झाली.... >> बिग बॉस ने दिलेली हिंट त्याने बरोबर ओळखली म्हणजे कामगार म्हणून वागू नका खेळाडू म्हणून वागा हि हिंट . तेव्हा माझा प्रतिसाद नीट वाचा आणि उत्तर द्या . बाकी आधीच्या प्रतिसादात मेघाचा डाव प्रेक्षकांना समजलाच नाही असं तुम्ही लिहिलत आणि तुमचा मागचा प्रतिसाद जेव्हा खणून काढला गेला तेव्हा तुम्ही सपशेल आपटला आहात . तेव्हा प्रतिसादच उत्तर जरा सबुरीने. घाई करू नका
काल पराग काय भयानक दिसत होता
काल पराग काय भयानक दिसत होता,व्हिलनचा रोल आरामात मिळेल.
एवढा भयानक तर खरा शाकाल(कुलभूषण खरबंदा) पण दिसला नव्हता.
काल नेहा काही पण डील करत होती.बाप्पा छान वाटले काल,गेममध्ये येत आहेत.नाही काढणार बहुतेक त्यांना.
केळकर स्वार्थी आहे आणि दुसर्याचा वापर करतो ह्या परागच्या मताशी पूर्णपणे सहमत,पण याचा अर्थ त्याला काढण्यासाठी स्वत:चा ग्रुप सोडून दुसर्या ग्रुपमध्ये परागला जाण्याची गरज नाही.
>>बाकी आधीच्या प्रतिसादात
>>बाकी आधीच्या प्रतिसादात मेघाचा डाव प्रेक्षकांना समजलाच नाही असं तुम्ही लिहिलत आणि तुमचा मागचा प्रतिसाद जेव्हा खणून काढला गेला तेव्हा तुम्ही सपशेल आपटला आहात . तेव्हा प्रतिसादच उत्तर जरा सबुरीने. घाई करू नका Lol
इतके पर्सनली का घेताय तुम्ही?
जुना कुठला राग आहे का मागच्या सीझनच्या धाग्यावरचा वगैरे?
ते सपशेल आपटला वगैरे म्हणून तुम्हाला बरे वाटत असेल तर असू बापडे पण त्याच्यावर मी मुद्देसूद उत्तर दिले आहे
बिग बॉसच्या धाग्यावर लिहतोय तर अगदी त्यांच्या लेव्हलला उतरलेच पाहिजे असे नाही ना?
आपले वाद त्या त्या स्पर्धकांपुरते ठेवले तर मजा येती नाहीतर धुळवड खेळायला राजकारणाचे धागे आहेतच की!
बाय द वे, तुमच्या परागचे कौतुकपण केले आहे मी वरच्या एका पोस्टमध्ये
Voot वर वोटींग कुठे करायचे
Voot वर वोटींग कुठे करायचे कोणी सांगेल का ? मागच्या सीझनसारखे वोटींग ऑप्शन्स दिसत नाहीयेत.
इतके पर्सनली का घेताय तुम्ही?
इतके पर्सनली का घेताय तुम्ही? >> मी नाही तुम्ही पर्सनली घेताय.. प्रत्येक वेळी माझ्या प्रतिसादाला उत्तर दिलंच पाहिजे जणू काही ती माझी ( म्हणजे तुमची ) जबाबदारीच आहे अशा पद्धतीने प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देताय . जबरदस्ती नाहीये माझ्या प्रत्येक प्रतिसादाला उत्तर दिलच पाहिजे अशी. चिल
पराग ने जरा डोक्याला
पराग ने जरा डोक्याला विश्रांती दिली पाहिजे . अजुन 75दिवस गेम बाकी आहे .
हिनाला पाठवलय कशाला बिबॉने ?
हिनाला पाठवलय कशाला बिबॉने ? बिचुकले अँड कंपनीचं दिल बहलायला ?मसाज सेंटर ओपन करायला कि अॅडल्ट कन्टेन्ट द्यायला ?


हे प्रकरण राजेश रेशम वर चाललय, बिचुकले जोकर कम व्हिलन बनताना आता एक्स्ट्रॉमॅरयटल अफेअर, चान्स मारणे आणि हिनाने मारु देणे/एन्करेज करणे , अगदीच भोजपुरी आयटेम साँगच्या वरतांड आचरट चाळे दोघांचे !
आज परागचाही जोकर झाला, काय त्याच्या फालतु स्ट्रॅटेजीज आणि झेपत नसलेला अॅग्रेसिवनेस तरी चाल्ला मारे शिवशी काँपिटिशन करायला जातोय, चक्कर येऊनच पडला शेवटी
वैशालीची स्टोरी ऐकून वाईट वाटलं, २००९ मधे तिची मुलाखत घेतली होती तेंव्हा नवरा अजुन ओके होता, १० वर्षात एकदमच बदललय ,थोडीफार आयडीआ होती तशी काही महिन्यांपूर्वी जे ऐकलं त्यातून.
वीणाची स्ट्रॅटेजी खरच चांगली होती, शिवही चांगला खेळतोय, इस्त्री मस्तं चोरली !
वीणानी परागपासून बाजुला झाल्याने स्मार्ट्ली खेळायला सुरवात केलीये , पराग येड्याचं डोकं कस चालत तेही वीणाला माहितेय !
दुसर्या टिममधे पराग सर्वात फालतु प्लेयर आहे, बिंडोकांचा रड्या राजा बिबॉकडे कंप्लेंट करत होता कि वीणा दिलेला शब्द पाळत नाहीये म्हणून
पण नेहा-माधव चांगले खेळले.
वैशाली एक नंबरची नालायक वाटते
वैशाली एक नंबरची नालायक वाटते मला असो . वीणाची मॅनेजरचा बॅच शर्टाच्या आत लावायची स्ट्रॅटेजी सुपरक्लास . मस्त डोकं चाललं तीच आणि आता म्हणतेय आमच्या टीमचा मॅनेजर रजेवर आहे . भन्नाट आयडिया आहे
तशी वीणा माझी लाडकी आहेच . वीणा, शिव आणि पराग हे पहिल्यापासून आवडत आहेत . त्यात थोडी नेहाची भर पडलेय पण तिची जरा किरकिर खूप चालते. बाकी ती टास्क उत्तम करते तिचा चौफेर लक्ष असत
बिचकुले /हिना / आणि सुपु काही कामाचे नाहीत . माधव बरा खेळतोय . केळकर पण . वैशाली का कोण जाणे आवडतच नाहीये . रुपाली -किशोरी ताई पण ठीक आहेत . बाप्पा या आठवड्यात जाणारेत असं म्हंटल जातंय
दुसर्या राउंड मधे मुळात कपडेच
दुसर्या राउंड मधे मुळात कपडेच कमी आल्यामुळे पराग ची टीम ऑर्डर पूर्ण करण्यासाठी काहीच करु शकणार नव्हती.
साम - दाम - दंड - भेद वापरा असे सांगुनही पराग टीम ने नुसतच डील करण्यात वेळ घालवला. ईस्त्री चोरणे किंवा कपडे चोरणे ही आयडीया का नाही सुचली त्यांना.आणि नेहा ने पण काही डोकं नाही लावलं..
कपडे चेक करुन अॅप्रुव्ह करायच्या निमित्ताने पराग कपड्याला हळुच डाग लावु शकला असता...हा राउंड पण ड्रॉ होउ द्यायचा ना..हाकानाका.
पराग ने वीणा वर विश्वास ठेवलाच कसा..कुठे गेली याची हुशारी.
बिचुकले चे काय चाळे चालु आहेत त्या हिना सोबत.आता नाही का त्याला ४ महिन्याची पोरगी न बायको न घरचे लोक आठवत.
आणि हिना ला कसं काय चालतय हे सगळं ? की चॅनेल ने सांगितलय तिला हे असं वागयला.
वीणा ची मॅनेजर ची सुट्टी आयडीया भारीच....काल पहिल्यांदाच पराग चा वैताग आला आणी वीणा आवडली मला.
हा सिझन वेगळाच आहे...रोज प्रत्येकजण वेगळच वागतोय. ..कधी स्मार्ट वागतायत म्हणुन आवडतायत म्हणावेत तर दुसर्याच दिवशी काहीतरी येडेपणा करतात....
मेघा सारखं मनापासुन कोणीच नाही आवडत अजुन.. तिच्या सारख्या आयडीया कोणाला सुचत पण नाहियेत
>>प्रत्येक वेळी माझ्या
>>प्रत्येक वेळी माझ्या प्रतिसादाला उत्तर दिलंच पाहिजे जणू काही ती माझी ( म्हणजे तुमची ) जबाबदारीच आहे अशा पद्धतीने प्रत्येक प्रतिसादाला उत्तर देताय
पण मी कुठल्याही प्रतिसादात तुमच्याबद्दल काहीच लिहलेले नाहीये
कुणी काही लिहले आणि आपल्याला पटले नाही तर ते आपण आपल्या पोस्टमध्ये खोडून काढतो.... ते त्या त्या मुद्द्यापुरते असते आणि ते तसेच असावे!
माझ्यापेक्षा वेगळी मते मांडू नका असे जर म्हणणे असेल तर तसा डिस्क्लेमर टाकत चला.... तुमच्या पोस्ट ओलांडून पुढे जाऊ
थंड घ्या!
Pages