मराठी बिग बॉस-२

Submitted by सूलू_८२ on 21 March, 2019 - 08:18

नवीन बिग बॉस, नवीन स्पर्धक, नवीन धम्माल आणि नवीन राडा

या खेळूया मराठी बिग बॉस २!!!! Happy

धागा क्र. २
https://www.maayboli.com/node/70497

pjimage-37-784x441.jpg

तो परत येतोय!

( फोटो सौजन्य: कलर्स मराठी ऑफिशियल Instagram )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

परागचा अतिशहाणा त्याच्या बैल रिकामा झालायं. अरे बाबा कोडवर्डमध्ये किंवा माईकशिवाय बोलणे बिबॉच्या नियमात बसत नाही त्यामुळे आधीच्या सिझनमध्ये कुणी केलय ते गुपचूप केले आहे (तरीही ते पकडले गेलेतच कारण एव्हढ्या कॕमेरांत काही लपणे कठीण आहे) पण हा तर मस्त कॕमेर्यासमोर बसून सांगतोय.

पराग नेहा,केळकरला बाहेर काढणार म्हणजे नक्की काय करणार आहे ?तो फारफारतर नॉमिनेट करु शकतो.
आणि गंमत म्हणजे इथे या आठवड्यात स्वत: नॉमिनेट झाला आहे आणि गप्पा पुढच्या.
मुळात नॉमिनेशन बद्दल किती विचार करतो हा?

पराग फालतू गेम्स खेळत आहे,तो किशोरी आणि रुपालीला पण लटकवेल.पण त्यांना ते कळत नाही,वीणाला ते कळल आहे,ती आज मस्त निघून गेली >>> अगदी अगदी.

नेहा मला आवडत नाही, भोचकपणा करते पण गेमबाबत डेडीकेटेड असते, कसंही जिंकायचं हे कायम डोक्यात आणि डोळ्यात तेल घालून सगळीकडे लक्ष असतं. चिटींग करण्याची पण तयारी असते.

केळ्या - साप्ताहिक कार्य आहे घाई करु नका आरामात चालु द्या
बिगबाॅस- अबे हा काय शनिवार पर्यंत कपडे धुतो का काय आता Lol

सगळं शांततेत झालेलं आवडत नाही बिग बॉस ला.. आता साम दाम दंड भेद म्हणे..घाला फुल राडा..रोडिज वाला आहेच..

नेहा मला आवडत नाही, भोचकपणा करते पण गेमबाबत डेडीकेटेड असते, कसंही जिंकायचं हे कायम डोक्यात आणि डोळ्यात तेल घालून सगळीकडे लक्ष असतं.>> खरच... दोरिला तेल लागल आहे हे पण तिला कळाल..नंतर बादल्या चेक करत होती...

किशोरी आणी रुपाली अजुनही परागच्या घुमवण्याला बळी पडतायत? किशोरी शहाणे स्वतःच डोक वापरत नाही का? सगळ पराग म्हणेल तस , ग्रुप सोडुन पराग गेला तेव्हा आता कस करायच म्हणून सगळ्ञ्त हवालदिल किशोरीच झालेली.
वीणाला परागचा खोटारडेपणा कधिच कळून चुकलाय त्यामूळेच ती उठुन गेलेली दिसतेय, शहाणी निघाली.
पराग केवढा डॉमिनेटिन्ग आहे, आला परत काहितरी येडपट क्लुप्त्या घेवुन.
मुळात नॉमिनेशन बद्दल किती विचार करतो हा?>>> अगदी अगदी! किशोरी-वीणा-रुपाली हा नॉमिनेट करणार नाही बर मग आता जो अचानक ग्रुप बनवलायस त्यातल्या कुणाला करशिल् तर ते कशाला एकुण घेतिल?
पुढच्या काहि विक्स मधे नो वन्डर तो घरातल्या बहुतेकान्च्या रडार वर असेल.
सुपु आज उगाच फुटेज खात होत्या, नेहा कशाला एवढ बोलत होत्या कुणास ठाउक? आज त्या आणी एबी नुसते बसुन होते , टास्क मधे सहभाग शुन्य

सगळं शांततेत झालेलं आवडत नाही बिग बॉस ला.. आता साम दाम दंड भेद म्हणे..घाला फुल राडा..रोडिज वाला आहेच..>>+१

बिबॉ च्या प्रेक्षकांना आपण चांगले कामगार आहात हे दाखवण्यापेक्षा उत्तम खेळाडू आहात ते दाखवा...........थोडक्यात काय...अजुन राडा कसा झाला नाही? जा लवकर राडा करा.

पराग जाम पकवत होता मात्र, वीणासारखंच मलाही तिथून उठावं म्हणजे टीव्हीसमोरुन असं वाटत होतं.

रुपालीने माफी मागितली, अ बि ने माफी मागितली पण रुपालीला हे समजलं अ बि किती खालच्या थराला जाऊन आत बोललाय, तेव्हा ती माफ करेल का.

आता पडदा टाकणार, शनिवारी एकवेळ शिवला बोलतील पण अ बि बाबत गप्प राहतील की काय bb मग एकदम शेवटी रुपाली ला व्हिडीओ दाखवतील शो संपताना म्हणजे रुपाली, अ बि दोघे फायनलपर्यंत गेले तर त्या विकमध्ये.

पराग खरंच पकवत होता. बोअर केलं नुसतं . त्यालाच स्वतःच म्हणणं नीट मांडता येत नव्हतं पण टास्क सुरु झाल्यावर मात्र बिग बॉस ने पराग ला का कन्फेशन रूम मध्ये बोलावलं ? नेहाला बोलवायला पाहिजे होत ना ? कारण ती मॅनेजर होती . पण त्याला का बोलावलं याचा उलगडा लगेचच झाला . बिग बॉस ला परागलाच काहीतरी सांगायचं होत. काय ? तर बिबॉ च्या प्रेक्षकांना आपण चांगले कामगार आहात हे दाखवण्यापेक्षा उत्तम खेळाडू आहात ते दाखवा.हे सांगायचं होत . आणि त्यामुळेच नोटीस मध्ये लिहिल्याप्रमाणे साम / दाम / दंड / भेद वापरून खेळ कसा खेळायचा हे बरोबर परागलाच स्ट्राईक झालं ( जे बिग बॉस ला माहिती होत कि हि गोष्ट परागच्याच लक्षात येईल. कारण तो शार्प आहे ) आणि लगेचच तो पाहिजे त्या वेळी नेमका घरात जाऊन कपड्यांच्या आतमध्ये घरातले कपडे लपवून ठेऊन घेऊन आला . आता ते कपडे समोरच्या टीम मॅनेजरला तो दाखवणार . . म्हणजे युक्तीचा वापर केलाच तर Happy
नुसताच कामगार नाही तर उत्तम खेळाडू आहे हे परागनेच दाखवून दिल जे बिग बॉस ला पण माहिती होत . किव्वा त्याच्या बदल खात्री होती Happy

समोरच्या टीमला जरी कळलं असेल तरी तो एक खेळाडू म्हणून वागलाय . नुसता कामगार म्हणून नाही . त्यामुळे बिग बॉस काहीच बोलणार नाहीत कारण बीबॉ ने दिलेली हिंट परागने बरोबर उचलली आहे आणि बीबॉ ने ते बघितल आहे . त्यातून त्याने कन्फेशन रूम मधून आल्यावर मॅनेजरचा बॅच नेहाकडून मागून घेऊन स्वतःच्या शर्टाला लावला आणि जेव्हा केव्हा आतून कपडे आणावेत असं त्याच्या लक्षात आलं तेव्हा ताबडतोब बॅच काढून नेहाला परत देऊन टाकला आणि कामगार बनून आत मध्ये जाऊन कपडे घेऊन आला. . बॅच परत करायचा हे पण त्याला तिथल्या तिथे सुचलं

गेल्या सिझन मध्ये उशांच्या टास्क च्या वेळी मेघाने ( आधी खेळ बघून आल्याने ) रात्रीच समोरच्या टीमची तिजोरी फोडून त्यांच्या तिजोरीतले पैसे हस्तगत केले होते आणि ते स्वतःचे पैसे म्हणून दाखवले तरी बिग बॉस काहीच बोललं नव्हतं . कारण त्यांनी नुसतं उशा शिवणारे कामगार म्हणून वागायचं नव्हतं तर एक खेळाडू म्हणून वागायचं होत . बीबॉ च्या अपेक्षेप्रमाणे गेल्या वेळी ते ( मेघाची टीम ) वागले म्हणून त्यांनी आदल्या ल्या रात्री पैसे चोरूनही बिग बॉस काहीच बोलले नाहीत . तसच इथेही बिग बॉस बोलणार नाहीत असं वाटत . बघूया उद्या काय होत ते Happy
बाकी एक चांगला खेळाडू असल्याने नॉमिनेशन चा त्याला सारखा विचार करायलाच पाहिजे . कारण एक एक खेळाडूला बाहेर काढूनच तो शेवट पर्यंत जाऊ शकणार ना ? नॉमिनेशन चा विचार करण यात काहीच चुकीचं नाहीये

पराग अतिशहाणा असला तरी हुशार आहे आणि सेम नेहा तशीच ह्याबद्दल दुमत नाही पण समोरच्या टीमला न कळता चलाखी केली तर ती मान्य होते नाहीतर नाही असं म्हणायचं आहे मला. वीणा आणि टीमने आधी कपडे चोरले आणि समोरच्यानी objection घेतलं नाही, त्यांच्या इतकं लक्षात नाही आले तर ते जिंकले.

मेघाच्या चलाखीपेक्षा हे latest उदाहरण, म मांनी सांगितलं ह्यांनी चीटिंग केली तेव्हा समजलं विरुद्ध टीमला.

तसच इथेही बिग बॉस बोलणार नाहीत असं वाटत >>> ते नाहीच बोलणार, इथे विरुद्ध टीम मेम्बर आणि संचालिका ह्यांचा रोल महत्वाचा आहे.

आतून कपडे चोरण्याची आयडिया माधवची होती आणि नेहाने समोरच्या टीमचे कपडे चोरुया म्हटलेलं पण परागने स्वतः मेहेनत घेऊन ते साकार केलं मीन्स माधव म्हणाला ते. आयडीयाचं practicle मध्ये रुपांतर परागने केलं.

समोरच्या टीमला न कळता चलाखी केली तर ती मान्य होते नाहीतर नाही असं म्हणायचं आहे मला. >> बिग बॉस जसे वाकवेल तसे नियम . आले बिग बॉस च्या मना त्यापुढे कोणाचे काही चालेना

वो तो है Lol पण वैशाली आणि परागमध्ये टशन त्यामुळे ती संचालक म्हणून ऑबजेक्शन घेण्याचे चान्सेस जास्त. ती जळते जाम परागवर.

त्यादिवशी मैथिलीने फार लक्ष दिलं नव्हतं, ही देईल बहुतेक.

हो बरोबर. वैशालीच पराग आणि नेहाशी अजिबातच पटत नसल्याने ती त्या बद्दल नक्कीच ऑब्जेक्शन घेईल . कारण ती कॅमेरासमोर ऑब्जेक्शन घेताना पण दाखवली आहे आणि नेहा काही तरी तिला बोलतेय . हे सगळंच आजच्या भागात पण परत पराग आणि नेहा शिवशी भांडताना पण दाखवले आहेत. साम /दाम /दंड /भेद केवढ्या जोरजोराने ओरडताहेत . त्यामुळे काही करून ते जिंकणार कि काय असं वाटतंय . जिन्कले नाहीत तर परत युक्ती लढवूनही परागचा फ्लॉप. पण बिग बॉस काही झाल तरी त्याला शेवटपर्यत नेतील कारण त्यांना पाहिजे परागसारखा शार्प खेळाडू Happy

पराग डोक्याने खेळतो पण जेंव्हा खरी गरज असेल तेंव्हा नांगी टाकतो. काल केळ्याच्या पहिल्या नंबरच्या बाबतीत आर्ग्युमेंट करताना त्याने फुल ऑन मैदानात उतरायला हवं होतं (सॉर्ट ऑफ रुपाली सारखं). पण या महाशयांनी तो पॉइंट रेज केला पण पुढे लावुन धरला नाहि. मी सातव्या क्रमांकावर समाधानी आहे असं म्हणुन हे महानुभाव गप्प बसले, आणि केळ्याला पहिल्या नंबरचा जॅकपॉट लागला, काहिहि कर्तुत्व नसताना. अशा रितिने तुमचं बुद्धिचातुर्य दाखवायची नामी संधी वीणा, पराग, बाप्पा, सुरेखा यांनी गमावली आणि हकनाक नॉमिनेट झाले. इफ यु डोंट आस्क, दि आन्सर इज ऑल्वेज नो...

पण बिग बॉस काही झाल तरी त्याला शेवटपर्यत नेतील >>> हो पराग असेल तिघांत, जिंकेलही कदाचित तो.

पराग आणि नेहा झुंज मराठमोळी मध्ये होते त्यामुळे तशी channelची माणसे आहेत तसेच त्याचा कुकरी शो होता आणि वीणा लेटेस्ट सिरीयल मध्ये होती.

काही आजारपण, किंवा अति नियम मोडणे वगैरे असलं मध्ये नाही आलं तर ही तिघे नक्कीच फायनल पाचात असतील.

राज गुड पोस्ट.

पराग डोक्याने खेळतो पण जेंव्हा खरी गरज असेल तेंव्हा नांगी टाकतो >>ते मात्र आहे . तो स्वतः नॉमिनेट होऊ नये म्हणून अजिबातच प्रयत्न करत नाही . त्याला ओव्हर कॉन्फिडन्स असेल कि कायम बिग बॉस आपल्याला वाचवेलच . कारण तस त्याने बोलून पण दाखवलं कि मी कायम डेंजर झोन पासून वाचलेलो आहे . या वेळी बिचुकलेच्या कंपेरिझन मध्ये त्याला डेंजर झोन मधून बाहेर काढल्याने त्याचा कान्फिडन्स आणखीनच वाढला जो घातक आहे . पण जोपर्यंत तो टास्क मन लावून खेळेल तो पर्यंत बिग बॉस त्याच्या बाजूने असतील

हो नेहा -पराग -विना हे पहिल्या तिघांत असतील आणि पुढचे तिघ शिव- रुपाली आणि किशोरीताई. मागच्या वेळी पण शेवटाला सहा जण काढले होते आणि मग एक एक गळत गेला

बिबॉ ने परागलाच आत बोलावल कारण शांततेत चाललेला टास्क बघून बिबॉसच रेस्टलेस झाले.परागला हिंट दिली,झाल आज राडा.
रुपाली आणि बिचुकलेंनी एकमेकांची माफी मागितल्याने ममांना फार काही बोलायला राहिल नसेल,हे बिबॉच्या लक्षात आल,म्हणून परिगकडून त्यांच काम करून घेतल
पण त्या साम दाम मध्ये तो पराग किती भयानक दिसत आहे
खरतर ममांनी बिबॉचीच शाळा घेतली पाहिजे.
शिवानीची उणीव तुम्हाला भासू देणार नाही ,असा विडाच उचलला आहे बिबॉसने.

पराग आणि नेहा झुंज मराठमोळी मध्ये होते त्यामुळे तशी channelची माणसे आहेत>> झुंज मध्ये पराग, पुष्कर, मनिशा केळकर,पंढरीनाथ कांबळे आणि विक्रम गायकवाड (उंच माझा झोका मधिल न्या.रानडे) हे फाइनल ला होते.. विक्रम त्यात जिंकला होता.. तो जर या शो मध्ये आला वाइल्ड कार्ड entry तर टफ कॉम्पिटिशन होईल पराग ला.. सगळी मत फिरू शकतात..विक्रम टास्क पण मस्त करायचा 1 no आणि माज कमी..पराग सारख नाही करायच..

पराग डोक्याने खेळतो पण जेंव्हा खरी गरज असेल तेंव्हा नांगी टाकतो. काल केळ्याच्या पहिल्या नंबरच्या बाबतीत आर्ग्युमेंट करताना त्याने फुल ऑन मैदानात उतरायला हवं होतं >>तिथे त्याने आळस दाखवला..पण त्याने comparision केल असणार की जिथे बाप्पा आणि सुपो आहेत nomination मध्ये तिथे त्याला धोका नाही..

काल पराग काय करत होता त्याचे त्यालाच माहित..... मी तुमच्यात आहे पण तुमच्यात नाही.... मी तुमच्यापैकी एखादीला नॉमीनेट करीन पण तरी मी तुमच्यात आहे.... तुम्ही मला नॉमीनेट करु शकता पण मी जाणार नाही.... अरे काय हे?
म्हणजे थोडक्यात अजुन दोन तीन आठवडे तो दोन्ही ग्रूप कडून सुरक्षित रहाणार..... आणि म्हणे मी ग्रूपसाठी खेळतोय.... आणि त्या किशोरी आणि रुपाली पण हा कसला डोकेबाज आहे म्हणून माना डोलावत होत्या
वीणाने परागचा डाव ओळखला असेल तर ते चांगलेच आहे पण आतुन जर ती परागला सामिल असेल तर ती उच्च ॲक्टर आहे
बाकी ते कमोडवर खराट्याच्या काडीने इनिशिअल्स लिहा वगैरे कमाल बिंडोकपणा होता
सुरेखाताईना आता KVR आणि परागचा ग्रूप जॉइन करायचाय पण किशोरी आणि पराग म्हणतायत की आम्ही आता वेगवेगळ्या ग्रूपमधून खेळतोय.... सुरेखाताई अजुनच कंफ्यूज!
ते बिग बॉसचा मेसेज ऐकून आल्यावर परागने नेहाला तो बॅच मागितला काय.... बिग बॉसने तसे करायला सांगितलेय म्हणाला काय मग परत तो नेहाला दिला काय?.... नक्की काय करायचे होते त्याला?
अतिशहाणपणा केला की असे होते!
पण बाकीचे ज्या मठ्ठ पद्धतीने खेळतायत ते बघता तो राहील शेवटच्या पाचात!

नेहा मात्र नेहमी दोन पावले पुढे असते.... सुमडीत सगळे डाव ओळखतीय ती समोरच्या टीमचे.... ती कम्माल प्लेअर आहे!
फक्त आता टास्क व्यतिरिक्तपण तिला जरा गप्पा बिप्पा मारत बसताना, जरा अजुन मज्जा मज्जा करताना बघायला आवडेल!

काल त्यांच्या टीममधून फक्त नेहा आणि पराग खेळत होते... सुरेखा पुणेकर नुसत्या बसुन होत्या.... बिचुकले नेहमीप्रमाणे वेगळ्याच जगात होते.... माधवने फक्त ते कपडे आणि साबण वगैरे आले तिकडे थोडे काम केले बाकी तो आणि हिना नुसते टिवल्या बावल्या करत फिरत होते

आता ते साम दाम दंड भेद काय आरडाओरडा करतायत ते कळेल आज!

माझा अंदाज असा आहे की पराग बाहेरचेच कपडे आत घेउन गेला असेल आणि तेच लपवल्यासारखे करुन बाहेर आणले असतील.... जस्ट समोरच्या टीमला मिसलीड करायला!
कारण काल जेंव्हा माधव म्हणाला की आपण आतले कपडे आणू, मी माझे वापरलेले कपडे आणतो, जाउदेत बाहेर गेले तर तेंव्हा नेहाने त्याला ठाम विरोध करुन सांगितलेले की आपण घरातले बाकीचे सामान वापरु शकत नाही.... आज अगदी साम दाम दंड भेद म्हंटले तरी तो नियम नाही मोडायचे ते..... ती फक्त समोरच्या टीमला गुंतवून ठेवायची ट्रीक असेल.

बाकी ते कमोडवर खराट्याच्या काडीने इनिशिअल्स लिहा वगैरे कमाल बिंडोकपणा होता>> हा हा हा..खरच..ते काही कळलच नाही.. जास्त hollywood eshtyle मिस्ट्री मूवी बघतो वाटतं..अरे बाबा पण समोरचा डंब असेल तर तू शेरलॉक होम स्टाइल मारुन काही फायदा नाही..
सुरेखाताईना आता KVR आणि परागचा ग्रूप जॉइन करायचाय पण किशोरी आणि पराग म्हणतायत की आम्ही आता वेगवेगळ्या ग्रूपमधून खेळतोय.... सुरेखाताई अजुनच कंफ्यूज!>> Lol त्या म्हणे आता तुमचा एक ग्रुप नाही?? तेव्हा म्हणावस वाटल की "आंटी आप इसी घर मे रेहेतो हो ना.!!" त्याना आता हे पण नाही माहीत की त्या कोणत्या ग्रुप मध्ये आहेत.. त्या कलाकार म्हणून नक्कीच मोठ्या आहेत.पण या शो ला लागणारे गुण नाही आहेत त्यांच्यात..

काल ती वीणा कपड्यांच्या दांडीला तेल लावत होती तेव्हा त्या तिथेच बसल्या होत्या पण अजिबात चतुरत्र नजर नाही.. पेंगत होत्या.. खेळातही सहभाग शुन्य.. ना कपडे धुवायला..वाळवायला मदत..ना कपडे घेण्यासाठी धडपड.. ते पण एकवेळ ठिक पण खेळ चालू आहे..जरा तरी एनर्जी दाखवा..काही नाही तर आवाज तरी करा..पण ते पण नाही..कपडे धूताना त्याना छान गावरान गाणी म्हणता आली असती.. काल सगळा आरामाचा मामला होता..आज नाही..

नेहा आणि पराग दोघेही शार्प आहेत. काल त्या कपडे वाळत घालायच्या दोरीवर आणि दांडीवर तेल लावलेलं नेहा ने बरोब्बर पकडलं. इतकंच नाही, तर दोरी, दांडी बरोबर बादल्याही पुसुन पुसुन घेतल्या Happy
पराग ने कपडे लपवून आणलेले मुद्दामच विरुद्ध टीमला दिसेल अश्या पद्धतीने बाहेर काढले असं वाटलं. त्यात पण त्याची काहीतरी त्याच्या दृष्टीने डोकेबाज चाल असेल तर ते त्यालाच माहित !

माझा अंदाज असा आहे की पराग बाहेरचेच कपडे आत घेउन गेला असेल आणि तेच लपवल्यासारखे करुन बाहेर आणले ........
पण तेही नियमाच्या विरोधातच आहे,मुळात गार्डन एरियात टास्क चालू असताना हे दोघ आत गेलेच कसे,आणि हे सगळ कालच झालेल दाखवल आहे,दुसरा बझर अजून झालेलाच नाही.
नेहा छान खेळते पण तिची पुस्तकी विद्या वाटते,आणि चेहर्यावर नेहमी बारा वाजलेले असतात.
तेल लावल्याच कळल्यावर गप्प बसायच,समोरच्याला अंधारात ठेवायच.ते यातच राहिले असते की नेहाच्या टीमला काही कळलच नाही म्हणून, हीने बोभाटा केला.
त्यांनी कस केल,चोरी उघडकीला येउनही,काही बोललेच नाहीत.
ती प्रत्येक वेळी
स्वत:साठी खेळत आहे,हे कळत जे पुढे तिलाच महागात पडू शकत.
आज तर चक्क मारामारीच केली आहे बहुतेक यांनी.
नक्की काय प्रकार आहे ते कळेल.

आताच कळलेल्या बातमीनुसार भाजपच्या माजी नगरसेविकेने बिचुकलेविरोधात तक्रार केली असून हा शो बंद करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Pages