ABP माझाचा जाहीर निषेध

Submitted by उनाडटप्पू on 29 May, 2019 - 10:50

ABP माझा, या वाहिनीवर निरनिराळे कार्यक्रम आपण मोठ्या कष्टाने चालवत असाल ह्याची महाराष्ट्रतील आम्हा तमाम प्रेक्षकांना खात्री आहे. अर्थात हे कार्यक्रम चालविताना चॅनेलच्या प्रमुख जाहिरातदारांची सुद्धा आपण काळजी घेत असाल हे आम्हाला काल २८ मे च्या प्राईम टाईमच्या शो मधून मनोमन जाणवले. ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपलं अख्खे घरदार निरपेक्ष भावनेने आपल्या राष्ट्रासाठी अर्पण केले त्या महापुरुषाबद्दल आपण 'खलनायक' ही संज्ञा आपला टीआरपी वाढविण्यासाठी वापरत आहात ह्याचा आश्चर्यकारक खेद वाटतो, वाईट वाटते.

आपली पत्रकारिता ही केवळ ‘धंदा’ म्हणून राहिली आहे याचे दुःख वाटते आणि आजची पत्रकारिता नक्की समाजाला कुठे नेत आहे असा प्रश्न अनेकांना पडू शकतो इथवर आपल्या वाहिनीची मजल गेली. पत्रकारिता हे आता पत्रकारांचे व त्यांच्या मालकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन बनल्याने त्यातून नफा तर अपेक्षित आहेच, परंतु हा नफा कमावताना आपण पत्रकारितेच्या मूळ हेतूलाच नख लावतोय का याचा विचार करायला हवा. काल ज्या प्रकारे आपण चर्चा घडवून आणलीत, त्या चर्चेला जे शीर्षक दिले, तिथे आपल्या वाहिनीवरचा किंचित सैल असणारा विश्वास आज पूर्णपणे अस्त पावला.

टिळक, आगरकर, अत्रे यांच्यापासून सुरू झालेली पत्रकारितेची एक श्रीमंत दिपमाळ आज क्षीणपणे लुकलुकताना दिसते ती केवळ आपल्यासारख्या टुकार आणि नावाने प्रसन्न पत्रकारांमुळेच.

सावरकर नायक की खलनायक हे पडताळून पहाण्याची तुमची लायकी तरी आहे का हे पहा आधी मग बाकीचे बोला.

शास्त्रींची हत्त्या कोणी केली,हेरॉल्ड मध्ये कोणी शेण खाल्ले यावर पण हिम्मत असेल तर जाहीर चर्चासत्र प्रसन्न जोशीने आणि खांडेकर यांनी आयोजित करावी असे माझे आवाहन आहे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोदी ह्या वायरची battery बरोबर काढून घेतील.
तुकडे gang chi wire आहे ही आणि बॅटरी विदेशात असेल

द वायर चा इतिहास ! आणखी काय काय आहे तुझ्या जोकरटोपीत? >> ढग आहेत, रडार आहेत , सिरसेना आहेत, आंबा आहे. काय पाहिजे ते आहे. जोकरच पंतप्रधान झाल्यावर सगळीच गम्माडी गम्मत.

कुठे वाद घालताय लोकहो
पालथा घडा मानसिकता आहे
दुर्लक्ष करा

एक आठवडा वय आहे आणि पुणे शब्दही शुद्ध लिहिता येत नाही त्यावरूनच समजून घ्या, मुद्दाम काहीतरी वाद उकरून काढायला जन्माला घालण्यात आलं आहे.
ज्यांना यातच मजा वाटत असेल त्यांनी चालू द्या, बाकीचे सिरियसली प्रतिसाद देणारे असतील त्यांनी वेळीच सावध होऊन अनुल्लेखाने मारा>>+१११
थिल्लर बीग्रेडी मानसिकता आहे...सो इग्नोर!

एक आठवडा वय आहे आणि पुणे शब्दही शुद्ध लिहिता येत नाही त्यावरूनच समजून घ्या, मुद्दाम काहीतरी वाद उकरून काढायला जन्माला घालण्यात आलं आहे. >>> नाव पण राहुल आहे तेव्हा जोक्स म्हणून वाचायला हरकत नाही Lol Lol Lol

काहिहि असले तरी सावरकरांचे काहिहि योगदान नव्हते. बाकी एबीपी माझा फालतु चैनेल आहे पण हा एकच कार्यक्रम केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. नंतर त्यांनी गुडांच्या आणी देशद्रोह्यांच्या भीतीने शेपुट घातली !

ज्यांनी ब्रिटिशांना मदत केली त्या देशद्रोह्याम्ना सप्रोर्ट करणारे देश्द्रोहिच असतात. आणी असे कंडिशनिंग होत असेल तर अभिमानच आहे

नवीन Submitted by पकौडेवाला on 4 June, 2019 - 12:08

भीमा कोरेगाव च्या लढाई बद्दल काय मत आहे? कोणी कोणाला मदत केली? देशभक्त कोण? देशद्रोही कोण?

पकौडेवाला कडून उत्तर अपेक्शित.

काहिहि असले तरी सावरकरांचे खूप योगदान होते. >>>> अगदी अगदी . ब्रिटिशांना मदत करण्यात फारच जोराचे योगदान होते त्यांचे. त्यांच्या मुळे ब्रिटिशांना फोडाफोडि चे राजकारण खुप सोपे गेले. ते आणी हेडगेवार !

भीमा कोरेगाव च्या लढाई बद्दल काय मत आहे? कोणी कोणाला मदत केली? देशभक्त कोण? देशद्रोही कोण? >>>> मराठी येते का ? धागा कोणता , लिहिता काय ? दुसरा धागा काढा. इथे सावरकरांच्या माफिनाम्याचा निषेध चालु आहे.

दुसरा धागा काढा. इथे सावरकरांच्या माफिनाम्याचा निषेध चालु आहे.
नवीन Submitted by पकौडेवाला on 5 June, 2019 - 11:14
<<

एक 'पकोडा' सोडता, दुसरा कोणी ही, निषेध करताना मला तरी दिसत नाही.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं कर्तुत्व निळ्या आकाशापेक्षा मोठे आहे, अज्ञान रुपी गटारात लोळणार्या जंतूचे टिकेने ते कदापी मलिन होणार नाही.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं कर्तुत्व निळ्या आकाशापेक्षा मोठे आहे >>>> माफि नामा लिहुन देला तेव्हा समजलेच त्यांचे कर्तुत्व !

थिल्लर बीग्रेडी मानसिकता आहे... >> अहो याला इग्नोर नाही म्हणत! Rofl>>>आमच्याकडे रस्त्यात चिखल दिसल्यास 'इथे चिखल आहे' असा शेजारी बोर्ड लावायची औपचारिकता पूर्ण केली जाते. जेणेकरुन आपण दगड मारु नये हे सूज्ञाला कळते....तसाच बोर्ड हाय बघा ह्यो! Wink

आमच्याकडे रस्त्यात चिखल दिसल्यास 'इथे चिखल आहे' >>>> कमळे फुलवायची म्हणुन सगळ्या देशात चिखल पसरवला जात आहे. पण भक्तांना समजत नाहि की कितीहि कमळे फुलली तरी चिखल स्वछ होत नाहि . त्याला झाडु आणी हातच लागतो. Biggrin

ढगोबा आले पिंका टाकत . म्हणुनच पुण्यात जागोजागी पिंका दिसत असतात रस्त्यावर.

प्रसन्न जोशी पण पुण्याचेच आहेत बहुतेक !

चिखल झाडूने साफ करतात?
मला वाटतं Delhi मध्ये हाताने झाडू घेतला होता पण दोघे पण kamlachya फुला खाली दबले gele

पकौडेवाला या आयडीची तुलना एखाद्या वेड्या इसमाशीच होउ शकेल, राहुलही पकौडेवालाच्या समोर किस झाड की पत्ती असेल !

त्यामुळे या चिल्लर पकौडेवाल्याला ओलान्डुन पुढे जावे व त्याच्या बालबुद्धी प्रतिसादान्कडे दुर्लक्ष करुन विषयावर चर्चा करावी ही सर्व सुज्ञ लोकान्ना विनन्ती. नाहीतरी असले रिकाम्या डोक्याचे रिकामटेकडे लोक पुढील पाच वर्षे (आणि त्यानन्तरही) गरळ ओकत राहणारच आहेत.

मी माझा,

गेल्या पाच वर्षात नोटबंदी, gst, राफेल, गोवंश व याशिवाय मोदी सरकारपैकी कोणी श्वास घेतला तरी अभ्यासपूर्ण पोस्टी टाकून विरोध करत मिरवणाऱयांनी शेवटी सगळी जबाबदारी या पकोडेवालावर ढकलली आहे

मला मोदींना विरोधक म्हणून बसलेले बघायचे आहे, मला कन्हैया जिंकलेला बघायचा आहे ही सगळी विधाने वल्गना ठरल्यामुळे आता इथे यायला तोंड राहिलेले नाही

पाच वर्षे, चोवीस तास मोदीविरोध राबवूनही जनता आपले ऐकतच नाही हे बघून घेतलेला संन्यास मोदींनी एखादा निर्णय घेतला की संपेल आणि गाडी पूर्ववत होईल

उडवले गेलेले सदस्य सोडले तर active मोदी विरोधक कोण कोण गायब आहेत ते दिसतेच आहे

सुज्ञाला अधिक सांगणे न लगे

सावरकर iconic होते, पण आता त्यांच्याविरुद्धही एकच आय डी बरळत आहे

त्या आय डी ला कंत्राट देण्यात आले आहे येथे मोदीविरोध जिवंत ठेवण्याचे

सावरकर iconic होते, आहेत आणि या पुढेही राहतील ... असे कितीतरी पकोडेवाले, अमुकवाले तमुकवाले आले नि गेले तरी सावरकांचे आढळ स्थान कोणीच तसूभर देखील हलवू शकले नाहीत तेव्हा पकौडेवाला त्यांचे तळण सुरु ठेवावे

सावरकर iconic होते, आहेत आणि या पुढेही राहतील >>> माफिनामा देणार्यांना iconic मानणारे देशद्रोहिच असतात. नीघा गिरिराज सिंगांकडे ते देतील तुला पकिस्तानचा व्हिसा
बाकि सावरकांचे काहिहि योगदान नाहिये भारताच्या स्वांतत्र्यात माफि मागण्याशिवाय.

बाकी नावाप्रंमाणे उनाडटप्पू च आहे हा आयडी. त्यामुळे त्याने काढलेला धागा ही तसलाच फालतु असणार हे तर आलेच.

Pages